LetsUpp Marathi
Открыть в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Больше6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 день
Архив постов
6 624
यंदा संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलैला
LetsUpp | Trending
🏢 संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.
👨💼 संसदेचं पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालणार असून यामंध्ये १९ कामकाजाचे दिवस असणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.
👉 संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती.
👨🌾 या अधिवेशनात, सरकार अनेक बिलं सादर करु शकते. कोरोना, कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात.
📍 अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
📌 दरम्यान, संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला की नाही? तपासलं जाणार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/rn6pmierPhb
6 624
पेनेल्टी शूटआऊट अन् इटलीचा थरारक विजय
LetsUpp | Sports
⚽ युरो चषकाच्या अंतिम फेरीत यजमान इंग्लंड आणि इटली यांच्यातील सामना चांगलाच रंगला. दोन्ही संघांनी ९० मिनिटांच्या खेळात १-१ अशी बरोबरी साधली होती.
👍 पेनेल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात अखेर इटलीने ३-२ असा विजय साकारला.
✔️ अंतिम फेरीच्या दुसऱ्याच मिनिटाला इंग्लंडच्या ल्यूक शॉ याने शानदार गोल केला. दुसरीकडे त्यांनी पहिल्या सत्रात इटलीला गोल करण्यासाठी संधी दिली नाही.
💫 दुसऱ्या सत्रात इटलीने जोरदार आक्रमण केले, अखेर त्यांना ६७व्या मिनिटाला यश मिळाले. यावेळी लिओनार्डो बनुचीने भन्नाट गोल केला आणि संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली.
🎯 त्यानंतर निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळेच सामना अतिरीक्त वेळेत गेला होता.
पण यावेळी कोणालाही यश मिळाले नाही.
✨ अखेर सामना पेनेल्टी शूटआऊटपर्यंत गेला. इटलीच्या संघाना या युरोमध्येच पेनेल्टी शूटआऊटमध्ये सामना जिंकला होता. इटलीने यावेळी त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली.
To know more click here
https://letsup.app.link/FnXWBgv7Ohb
6 624
अलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद येथील पूल कोसळला
LetsUpp | Trending
⚡ अलिबाग-मुरुड मार्गावर काशीद येथील छोटा पूल कोसळला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
👉 रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जीर्ण झालेला हा पूल अतिवृष्टीमुळे कोसळला असल्याचे सांगण्यात आले आहे.
🚗 यावेळी पूलावरील दोन वाहने देखील कोसळली. मात्र, सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
☑️ सहा जणांना वाहनांमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर, वाहनं देखील बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तर या मार्गावरील वाहतूक सुपेगाव मार्गे वळविण्यात आली आहे.
📍 दरम्यान, पूल जीर्ण झाला आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
To know more click here
https://letsup.app.link/FEZErIZ6Ohb
6 624
🌧️ राज्यात पावसाबाबत सकारात्मक बातमी
LetsUpp | Trending
📍 महाराष्ट्रातील पुढील पाच दिवस सर्वत्र चांगला पाऊस बरसणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यात आज आणि उद्या कोकणाला रेड अलर्ट तर मुंबईला आजपासून पुढील ४ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
⛈️ कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. तर रत्नागिरीतल्या चिपळूण शहरात जोरदार पाऊस बरसलाय.
👉 त्यामुळे वाशिष्टी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झालीय. बाजार पुलावर आता पाणी चढू लागलंय. वाशिष्टी नदीवरील जून्या पुलाला पाणी लागलं, त्यामुळे प्रशासन आता हायअलर्टवर आहे.
🌦️ तसेच मराठवाडा विदर्भातही चांगल्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/pv36KMq0Ohb
6 624
आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी
LetsUpp | Bulletin
● केरळमध्ये कोरोना विषाणू संक्रमण अद्यापही चिंताजनक स्थितीमध्ये असतानाच केरळमध्ये आणखी एका विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. केरळमध्ये झिका व्हायरसचे 15 रुग्ण आढळून आले आहे.
● भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार
● कोकणाला पुढील दोन दिवस रेड अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर मुंबईला चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी
● बुलढाण्यात कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली, नागरिकांनी नियमांचं पालन करणं गरजेचं, जिल्हा हॉटस्पॉट ठरण्याची प्रशासनाने व्यक्त केली भीती
● लखनऊमध्ये आज दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत अल कायदा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. तर मोठ्याप्रमाणावर स्फोटकं हस्तगत करण्यात आली असून उत्तर प्रदेशात हाय अलर्ट जारी केला आहे.
● मंत्र्यांची संख्या वाढतेय; पण कोरोना लसींचा साठा वाढत नाही; काँग्रेस नेते राहुल गांधींचा केंद्र सरकारला शाब्दिक टोला
● लसीकरण झालेल्या खासदारांनी संसदेचं अधिवेशन सुरू होण्याआधी आरटीपीसीआर अहवाल देण्याची गरज नाही
● गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष गाड्या सोडा; भाजपनेते आशिष शेलार यांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी
● नव्या मंत्रीमंडळातील 78 मंत्र्यांपैकी 42 टक्के मंत्र्यांविरूद्ध गुन्हे दाखल आहेत. हा दावा नॅशनल इलेक्शन वॉच अँड असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स यांनी आपल्या ताज्या अहवालात केला आहे
● उत्तराखंडमध्ये आपचे सरकार स्थापन झाल्यास प्रत्येक कुटुंबाला 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
To know more click here
https://letsup.app.link/L94FjYk2Nhb
6 624
ब्रेकिंग ! मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्ह्याबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
LetsUpp | Trending
🚩 मराठा आंदोलनात दाखल करण्यात आलेले सरसकट सर्व गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले आहे. याबाबत खासदार छत्रपती संभाजी यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे.
💁♂️ मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक सातत्याने आंदोलन करत आहेत. या आंदोलकांनी मूक मोर्चांवर भर दिला होता. काही मोर्चांना आणि मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळणही लागलं होतं. त्यामुळे अनेक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची सातत्याने मागणी होत होती.
🙏 राज्य सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याने छत्रपती संभाजी यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तर मराठा तरुणांनीही छत्रपती संभाजी यांचे आभार मानले आहेत.
To know more click here
https://letsup.app.link/IX1COZC3Nhb
6 624
दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमाबाबत आयसीएसईचा मोठा निर्णय
LetsUpp | Trending
📔 आयसीएसईने दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
📒 आयसीएसईच्या cisce.org या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे.
🧐 दहावीच्या या विषयांच्या अभ्यासक्रमात कपात :
▪️ इतिहास आणि नागरिक शास्त्र, भूगोल, गणित, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, जैव शास्त्र, अर्थ शास्त्र, वाणिज्यिक अध्ययन, कॉम्प्युटर, गृहविज्ञान आणि पर्यावरण
💁♂️ बारावीच्या या विषयांच्या अभ्यासक्रमात कपात :
▪️ इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, समाज शास्त्र, मानसशास्त्र, अर्थ शास्त्र, वाणिज्य, लेखा, व्यवसाय, संगणक शास्त्र, पर्यावरण, जैव तंत्रज्ञान.
✒️ दरम्यान, बोर्डानं 2 जुलै रोजी दहावी आणि बारावीसाठी इंग्रजी आणि भारतीय भाषांच्या अभ्यासक्रमात कपात केली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/umqfvMNYNhb
6 624
पंकजा मुंडे दिल्लीला रवाना, तर्कवितर्कांना उधाण
LetsUpp | Trending
💫 केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आल्यानंतर प्रथमच भाजप नेत्या पंकजा मुंडे दिल्लीला रवाना झाल्या आहेत.
⚡ दिल्लीत त्या पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
✨ दरम्यान, प्रीतम मुंडे यांना न मिळालेलं मंत्रीपद, त्यानंतर मुंडे समर्थकांनी दिलेले राजीनामे, या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे दिल्लीला रवाना झाल्या आहेत.
⚡ केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा सुरु होती
📍 त्यावर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासादेखील केला होता. मात्र, मुंडे समर्थकांनी अचानक राजीनामे दिल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
📌 दरम्यान, पंकजा मुंडे यांना अचानक दिल्लीत बोलावण्यात आल्याने अधिकच खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
To know more click here
https://letsup.app.link/UjvDlAIKNhb
6 624
💫 मनुकन्याच्या विद्यार्थिनींचा सातासमुद्रापार झेंडा...
LetsUpp l Akola
⚡ आजच्या युगात शेतीला तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे. मात्र, बाजारात गरीब शेतकऱ्यास परवडेल, असे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. त्यामुळे अकोल्यातील मनुकन्या शाळेच्या नववी, दहावीतील एंजल ग्रुपच्या मुलींनी ‘मल्टिक्रॉप सिड्स सोइंग मशीन’ची निर्मिती केली. या अनोख्या यंत्राला अमेरिकेतील फर्स्ट संस्थेकडून ‘एनोव्हेशन इम्पॅक्ट अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले आहे.
💁🏻♀️ या विद्यार्थिनींना रोबोटिक्सचे प्रशिक्षण देणारी संस्था केआयटीएसच्यावतीने शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत रोबोटिक्स ट्रेनर काजल राजवैद्य व विजय भट्टड यांनी ही माहिती दिली. यावेळी मनुकन्या शाळेच्या माजी प्राचार्य डॉ. वर्षा पाठक उपस्थित होत्या.
👉🏻 फर्स्टच्या रोबोटिक्स स्पर्धेत भारतातून केआयटीएसच्या एंजल ग्रुपची निवड झाली होती. आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत सर्व मुलींनी उत्कृष्ट कामगिरी केली. अत्यंत गरीब कुटुंबातील या मुलींनी आज अकोला जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवले आहे.
🙏🏻 शेतकरी, कष्टकरी यांच्या या मुली आहेत. रोबोटिक्सच्या नवख्या क्षेत्रात त्यांना प्राविण्य मिळवायचे आहे, मात्र, यासाठी मुलींना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.
📍 दरम्यान त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांना पुढील शिक्षणाची संधी प्राप्त करून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
To know more click here
https://letsup.app.link/6xsut3IKNhb
6 624
आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी
LetsUpp | Bulletine
● राज्यात पावसाचं पुनरागमन; ११ जुलैपासूनपासून तीन दिवस वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
● केंद्रीय मंत्री मंडळात खा. प्रीतम मुंडे यांना सामावून घेतलं नसल्याने नाराज मुंडे समर्थकांकडून भाजपमधील पदाचे राजीनामा सत्र सुरू; भाजप नेत्या पंकजा मुंडे काय निर्णय घेतील? याकडे राज्याचे लक्ष
● राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने अपघात; गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या असून त्या आता सुखरुप आहेत
● साताऱ्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर आता या कारखान्याला कर्ज देणाऱ्या सातारा जिल्हा बँकेलाही ईडीने नोटीस बजावली आहे
● मुंबईत ज्यांनी लसींचे दोन डोस आहेत, त्यांना लोकलवगळता अन्यत्र सवलत देण्याविषयी पालिकेकडून सकारात्मक विचारविनिमय सुरू; १५ जुलैला मंत्रालयात बैठक असून त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार
● भारतात आत्तापर्यंत ३७ कोटी पेक्षा अधिक कोरोना डोस देण्यात आले; गेल्या २४ तासांत २७ लाखापेक्षा अधिक लसीचे डोस देण्यात आले
● कडधान्ये साठवण्यावर निर्बंध घालणारा केंद्रीय कायदा लागू झाल्याने चार दिवसांपासून व्यापाऱ्यांकडून शेतमाल खरेदी बंद; सणासुदीच्या काळात डाळींचे भाव भडकण्याची भीती
● अनंतनागमध्ये ‘लष्कर ए तोयबा’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा; जवानांकडून चकमक झालेल्या ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे
● उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या दिशेने पावलं पडण्यास सुरुवात; राज्य विधि आयोगाने उत्तर प्रदेश लोकसंख्या विधेयक २०२१ चा मसुदा केला तयार
● देशात ६० हजार किमी लांबीचा वर्ल्डक्लास नॅशनल हायवे बनविण्याचे माझे स्वप्न आहे. मला २०२४ पर्यंत ते पूर्णही करायचे आहे; एका कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य
To know more click here
https://letsup.app.link/0HbD05xsMhb
6 624
💁🏻♂️ आयडी पुरावा म्हणून घेताना आधारची पडताळणी आवश्यक
LetsUpp | Trending
💳 आजकाल सर्वच ठिकाणी आधार बंधनकारक करण्यात आले आहे. यातच यासह आवश्यकता पाहता अनेक फसवणुकीचे प्रकारांमध्ये देखील वाढ झाली आहे. यासंदर्भात यूआयडीएआयने अलर्ट जारी केला आहे.
🔎 भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) ट्विट करत इशारा दिला की, आधार आयडी पुरावा म्हणून घेताना त्याचे पडताळणी करणे आवश्यक आहे.
🕵🏻♂️ ट्विटमध्ये लिहिले आहे की सर्व 12 डिजिटल नंबर आधार क्रमांक नाहीत. अशात, हे कार्ड ओळखपत्र म्हणून स्वीकारण्यापूर्वी आधारची पडताळणी केली जावी.
📍 *असे चेक करू शकता आधारकार्ड...*
▪️ यूआयडीएआय च्या निवासी.uidai.gov.in/verify वर दिलेल्या लिंकवर थेट जावे लागेल. तिथे तुम्हाला आधार कार्डमध्ये प्रविष्ट केलेले 12 अंक टाकावे लागतील.
▪️ कॅप्चा भरल्यानंतर, क्लिक केले कि सदर आधार क्रमांक बरोबर आहे की नाही. याची सत्यता आपल्याला स्क्रीनवर दिसेल.
To know more click here
https://letsup.app.link/zIysP5Z2Lhb
