LetsUpp Marathi
Открыть в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Больше6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
6 624
🎬 आज रिलीज (27 एप्रिल) होणारे चित्रपट
LetsUp I Entertainment Update
1) दास देव
▫ कलाकार : राहुल देव, रिचा चढ्ढा, आदिती राव हैदरी
▫ निर्माता : स्टॉर्म मोशन पिक्चर्च प्रेझेंटस, सप्तर्षी सिनेव्हिजन
▫ दिग्दर्शन : सुधीर मिश्रा
2) इश्क तेरा
▫ कलाकार : हर्षिता भट, मोहित मदन, मझहान तारनेह, शाहबाझ खान
▫ निर्माता : बिग बॅनर एन्टरटेनमेंट
▫ दिग्दर्शक : जोजो डिसोझा
3) आदित्यम
▫ कलाकार : रविकांत सिंह, निधी अग्रवाल, वंशिका, श्रद्धा कपूर
▫ निर्माता : एडी 18 मोशन पिक्चर्स
4) हमारी पलटण
▫ कलाकार : टॉम ऑल्टर, मनोज बक्षी
▫ दिग्दर्शक : जैनेंद्र जिग्यासू
5) अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर
▫ कलाकार : केरेन गिलान, रॉबर्ट डाऊनी, ख्रिस हेम्सवर्थ, मार्क रुफ्फालो, ख्रिस इव्हान्स
▫ निर्माता : केविन फिज
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🆓 जिओ देणार 112 जीबी डेटा फ्रि
LetsUp I Update
▪ आता रिलायन्स जियोने केला नवा धमाका, यावेळी जिओ देणार 56 दिवसांसाठी 112 जीबी 4 जी डेटा फ्रि
▪ रिलायन्सच्या या नव्या ऑफरच नाव जियोफोन मॅच पास आहे
▪ या ऑफरनुसार यूजर्स आपल्या मित्रांना जिओफोन खरेदी करण्यासाठी आमंत्रित करु शकतात. जर आमंत्रित केलेल्या तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने फोन खरेदी केला तर तुम्हाला 8 जीबी डेटा 4 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळणार
▪ जर जियो युजर्सच्या 10 मित्रांनी फोन खरेदी केल्यास युजरला 112 जीबी डेटा 56 दिवसांसाठी मिळणार
▪ यासोबतच सर्वाधिक मित्रांना फोन खरेदी करण्यास प्रोत्साहित केल तर Jio Dhan Dhana Dhan शोमध्ये भाग घेता येणार आहे
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp News Updates
● नवी दिल्ली - देशातील 56 ग्रामीण बँकांमधील कर्मचाऱ्यांनाही आता राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच पेन्शन मिळणार
● नवी दिल्ली - पालघर आणि गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, 28 मे रोजी मतदान तर 31 मे रोजी होणार मतमोजणी, पलूस-कडेगाव विधानसभेचीही पोटनिवडणूक 28 मे रोजी होणार
● नवी दिल्ली - पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हीरे व्यापारी नीरव मोदीने हाँगकाँगमधून अमेरिकेत पलायन केल्याची माहिती समोर
● नवी दिल्ली - भारत आणि चीन या शेजारी देशांमधील संयुक्त लष्करी कवायत चालू वर्षी पुन्हा सुरू होण्याचे संकेत
● नवी दिल्ली - सरकारने वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याच्या कोलेजियमच्या शिफारशीला दिली मंजुरी
● मुंबई - शिवसेना विधानपरिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार; उमेदवारांची नावे निश्चित
● नवी दिल्ली - माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया राजकारणात; 'हामरो सिक्कीम पार्टी' नावाच्या पक्षाची घोषणा
● नवी दिल्ली - BCCI कडून मानाच्या 'खेलरत्न पुरस्कारा'साठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची शिफारस
● हैदराबादकडून पंजाबचा 13 धावांनी पराभव, अंकित राजपूत ठरला सामनावीर
● मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या आगामी राझी चित्रपटातील नवे 'दिलबरो' गाणे रिलीज करण्यात आले
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🏦 चीनमध्ये मानवरहित बँक शाखा सुरु
LetsUp I Update
चीनमधील चायना कंस्ट्रक्शन या सरकारी बँकेने देशातील पहिली मानवरहित बँक शाखा सुरु केली आहे. या बँकेची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात...
▪ येथे ग्राहक राष्ट्रीय प्रवेशपत्र स्वाईप करून अथवा फेस रेक्ग्नीझेशन तंत्राचा वापर करून प्रवेश करू शकणार आहेत.
▪ येथे ग्राहकाशी संवाद साधु शकणारे रोबो, होलोग्राम सुविधा, फेशियल रेक्ग्नीझेशन टेक्निक अशा सुविधा दिल्या गेल्या आहेत.
▪ या बँकेत ग्राहकाने प्रवेश केला कि रोबो त्यांना नमस्कार करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
▪ येथे ग्राहक सोने खरेदी, चलन बदलून घेणे, बिले भरणे, कम्युनिस्ट पार्टी सदस्य शुल्क भरणे अशा सुविधा वापरू शकतील तसेच व्हर्च्युअल रीअॅलीटीझम, होलोग्राम मशीनचा वापर करू शकतील.
▪ येथील मशीन्सच्या सुरक्षेसाठी गार्ड तैनात केले गेले आहेत तसेच व्हीआयपी आल्यास त्याच्या मदतीसाठी काही कर्मचारी नेमले गेले आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
📣 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 398 जागांसाठी भरती
LetsUp I Job Update
पदाचे नाव : सहाय्यक कमांडंट
जागा - BSF : 169 I CRPF : 179 I CISF : 84 I ITBP : 46 I SSB : 29
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 01 ऑगस्ट 2018 रोजी 20 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट(
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फी : General & OBC : ₹200/- (SC/ST/महिला : फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 21 मे 2018
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/23eZKJ
ऑनलाईन अर्ज जाण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/So4fkN
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
👌 आता जिल्हा परिषद शिक्षक बदल्या ऑनलाईन
LetsUp I Update
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता ऑनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे साडेतीन लाख जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नव्या धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्यातील राजकीय हस्तक्षेप आणि गैरव्यवहाराला तिलांजली मिळणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच बरीच वर्षे घरापासून दूर असलेल्या शिक्षकांना आता आपल्या परिसरात येता येणार आहे. बदलीसाठी ऑनलाईन अर्ज करताना शिक्षकांना 20 पर्याय द्यावे लागणार आहेत. या 20 पर्यायांमध्ये शाळेमध्ये शिक्षकांना नियुक्ती देण्याबाबत विभाग प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp News Updates
● नवी दिल्ली - पीएफ जमा झाल्याची तत्काळ मिळेल सूचना, यासाठी खातेधारकांचा मोबाईल क्रमांक अपडेट करणे आवश्यक
● नवी दिल्ली - सर्वाधिक वेबपेजेस भारतातच 'ब्लॉक' केली जातात, अशी धक्कादायक माहिती समोर
● नवी दिल्ली - एका सर्व्हेनुसार सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असून कॅनडाने पहिला नंबर पटकावला
● नवी दिल्ली - यूजीसीकडून 24 बनावट विद्यापीठांची नावे जाहीर, यामध्ये राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूर हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ
● कथुआ बलात्कार प्रकरण, अल्पवयीन आरोपीला केले मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर, खटल्याची पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार
● नवी दिल्ली - भारताने जागतिक बँकेसोबतच्या 125 दशलक्ष डॉलरच्या कर्ज करारावर केली स्वाक्षरी
● मुंबई - राज्यातील 8 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, यवतमाळ, जळगाव आणि वाशिम जिल्ह्यांतील तालुक्यांचा समावेश
● मुंबई - जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता ऑनलाईन प्रक्रिया राबविली जाणार, बदल्यांमध्ये यापुढे कोणताही अन्याय होणार नाही : पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री
● पुणे - राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी तसेच इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके पुढील शैक्षणिक वर्षापासून (2019-20) पासून बदलणार
● चेन्नई सुपर किंग्जचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर पाच गडी राखून विजय, महेंद्रसिंग धोनी ठरला सामनावीर
● आंतरराष्ट्रीय फिल्म मेकर सुश्रुत जैन यांनी आपल्या 'द टेनंट' या आंतरराष्ट्रीय उपक्रमातील चित्रपटात शमिता शेट्टीला केलं करारबद्ध
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
📣 शेतकऱ्यांची थकित कर्ज माफ!
LetsUp I Update
▫ राज्यातील 2001 ते 2009 या कालावधीतील शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयापर्यंतचे थकित कर्ज माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
▫ त्याचबरोबर इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊस, यासाठी 2001 ते 2016 या कालावधीत घेतलेल्या परंतु, थकित राहिलेल्या कर्जाचाही या योजनेत समावेश
▫ मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 पर्यंत घेतलेल्या पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्जाच्या 30 जून 2016 च्या थकबाकी रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून 31 जुलै 2017 पर्यंतच्या मुद्दल व व्याजासह एकूण दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार
▫ 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 पर्यंत वाटप केलेल्या पीक कर्जापैकी 30 जून 2016 पूर्वी किंवा नंतर पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित झालेल्या कर्जाचे 31 जुलै 2017 पर्यंत थकित कर्ज आणि उर्वरित हप्ते दीड लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत असल्यास त्याचा कर्जमाफी योजनेत समावेश करण्यात येणार
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
⚖ ब्रेकिंग : बलात्कार प्रकरणात आसारामला जन्मठेपेची शिक्षा
LetsUp | Breaking
⚡ जोधपूर : गेल्या 1 हजार 667 दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये असलेला आसाराम अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणात दोषी ठरला आहे. जोधपूर SC आणि ST कोर्टाने, आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
तसेच याप्रकरणातील दुसरे आरोपी शरद आणि शिल्पी यांना 20-20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🏦 बँका सलग चार दिवस राहणार बंद!
LetsUp I Update
तुमची महत्त्वाची कामे असतील तर ती लवकरच आटोपून घ्या. कारण चार दिवस सलग बँका बंद राहणार आहेत. 28 एप्रिलला चौथा शनिवार, 29 एप्रिलला रविवार, 30 एप्रिलला बुद्धपोर्णिमा आणि त्यानंतर 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.
यामुळे नागरिकांना याआधीच बँकेची कामे करण्यासाठी बँकेकडे धाव घ्यावी लागणार आहे. या चार दिवसांत आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी ग्राहकांना एटीएमचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे धावपळ होऊ नये यासाठी अगोदरच प्लॅनिंग करून घ्या. 2 मेपासून पुन्हा बँका पूर्ववत सुरू होणार आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp News Updates
● वॉशिंग्टन - अमेरिकेत एच 1-बी व्हिसाधारकांचे जोडीदार नोकरीला मुकणार, निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होईल भारतीयांवर
● नवी दिल्ली - देशभरातील एसबीआयच्या 11 शाखांमध्ये एक मे पासून राजकीय पक्षांच्या देणगी स्वरूपातील रोखे विक्रीस होणार सुरुवात
● जोधपूर - अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या एका प्रकरणात जोधपूरमधील न्यायालय आज 25 एप्रिल रोजी आरोपी आसाराम बापूवर निकाल देणार
● नागपूर - गडचिरोलीत 2 दिवसांत 37 नक्षलवाद्यांना टिपले, इंद्रावती नदीत आणखी 15 नक्षल्यांचे मृतदेह सापडले
● पंढरपुरात आता रांगेशिवाय मिळणार विठुरायाचे दर्शन, आषाढीपूर्वी मोफत टोकन व्यवस्था
● मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ 2001 ते 2009 मधील थकित खातेदारांना देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
● बीएमडब्ल्यू कंपनीने आपल्या एक्स3 या मॉडेलची नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची केली घोषणा
● हैदराबादकडून मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव, रशीद खान ठरला सामनावीर
● वर्ल्डकप 2019, भारताची सलामीची लढत 5 जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी 16 जूनला टक्कर
● मुंबई - राजकुमार हिराणी यांचा बहुचर्चित संजय दत्तवरील 'संजू' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, 29 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🏏 टीम इंडिया खेळणार डे-नाईट कसोटी?
LetsUp I Update
बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ ऑक्टोबर 2018मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध आपली पहिली डे-नाईट कसोटी खेळणार आहे.
या कसोटीसाठी बीसीसीआयने हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची निवड केली आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. असे असले तरी याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🎬 संजय दत्तच्या बायोपिकचा टिझर रिलीज!
LetsUp I Update
राजकुमार हिरानी दिग्दर्शित अभिनेता संजय दत्तवर आधारीत बायोपिक 'संजू' सिनेमाचा टीझर नुकताच लाँच झाला आहे. या बायोपिकमध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे.
या सिनेमात अभिनेत्री मनिषा कोईराला संजय दत्तच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर परेश रावल संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत दिसतील. याशिवाय अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दिया मिर्झा हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. संजू सिनेमा अगोदर मार्च महिन्यात रिलीज होणार होता, मात्र नंतर ही तारीख पुढे ढकलत ती 29 जून करण्यात आली आहे.
टिझर पाहण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/zibGJJ
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
💬 संपूर्ण शहराची देखभाल रोबोट्सवर!
LetsUp I Update
आता कंटाळवाण्या आणि किचकट कामाची जबाबदारी बहुतेक रोबोट्सकडे जाईल. इंग्लंडमधील लीड्स शहराने त्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. येत्या पंधरा-सोळा वर्षांमध्ये या संपूर्ण शहराची देखभाल पूर्णपणे रोबोट्सवर सोपवली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर लीड्स या गजबजलेल्या शहरात सहा वेगवेगळ्या प्रकारचे लहानमोठे रोबोट्स वापरले जातील. युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सने हे एक चॅलेंज म्हणून जाहीर केले आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना बोलावून त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सने त्यासाठी सुमारे दोन कोटी पाऊंडची तरतूद केली आहे. सन 2035 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे गृहित धरून सर्व योजना करणे सुरू झाले आहे. पाश्चात्य देशात, विशेषत: युरोपमध्ये मनुष्यबळ कमी आहे आणि कुशल कामगारांची टंचाई सतत भासत असते. अशा वेळी हा लीड्सचा प्रकल्प यशस्वी झाला तर इतर पाश्चात्य देश त्याचे अनुकरण करतील हे नक्की!
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🏦 बँक मित्र बना आणि कमवा पैसे!
LetsUp I Update
प्रधानमंत्री जनधन योजनेशी जोडले जाऊन अर्थात बँक मित्र बनून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. बँक मित्र बनून तुम्हाला फिक्स वेतन, देवाण-घेवाणीवर वेगळे कमिशन तसेच कर्जही मिळणार आहे.
बँक मित्रसाठी कमीत-कमी फिक्स वेतन हे 5 हजार रुपये एवढे आहे. तसेच खाते खोलणे आणि त्यातून होणाऱ्या व्यवहारांसाठी त्यांना वेगळे कमिशनही ठरवण्यात आले आहे. याशिवाय बँक मित्रला कॉम्प्युटर, वाहन खरेदी करण्यासाठी 1.25 लाख रुपयांपर्यतचे कर्जही मिळेल. विशेष म्हणजे कोणतीही वयस्क व्यक्ती बँक मित्र बनू शकते.
👉 बँक मित्र नेमकं काय करणार?
▫ प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत बचत आणि इतर सुविधांची माहिती देणे.
▫ बचत आणि कर्जासंबंधी माहिती पुरवणे.
▫ ग्राहकांची ओळख बनवणे.
▫ प्राथमिक माहिती, आकडे गोळा करणे, फॉर्म साभांळून ठेवणे, लोकांकडून मिळालेली माहिती तपासणे,
▫ लोकांकडून जमा केलेले पैसे बँकेत जमा करणे.
▫ खात्यांशी संबंधित फॉर्म भरणे.
▫ कॅश योग्य वेळेत भरणे.
▫ खाती तसेच अन्य सुविधांशी संबंधित माहिती उपलब्ध करुन देणे.
अधिक माहितीसाठी भेट द्या : https://goo.gl/PFgnnQ
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🎂 बर्थ डे स्पेशल; क्रिकेटचा देव 'सचिन'
LetsUp I Special Update
▪ क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज 46व्या वर्षात पदार्पण करतोय. देशभरातूनच नव्हे जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
▪ मास्टर ब्लास्टरने क्रिकेटला अलविदा करुन साडेतीन वर्ष झाली आहेत, पण मैदानात अजूनही सचिन...सचिन...चा आवाज घुमतो.
▪ मी त्याला टीव्हीवर खेळताना पाहिलं आणि त्याच्या टेक्निकचा चाहता बनलो. मी स्वत:ला खेळताना पाहू शकत नाही, पण असं वाटतंय हा खेळाडू अगदी तसाच खेळतो, जसं मी खेळत असे : सर डॉन ब्रॅडमन
▪ सचिन केवळ पिचवरच बॅटिंग करत नसे, तर त्याचे काही ठेवणीतले शॉट प्रतिस्पर्धी संघाच्या मनाला आणि मेंदूलाही दुखापत करत असत.
▪ कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्ये सचिनने एकूण 100 शतकं ठोकली आहेत. त्यापैकी 20 ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधात सरासरी 55 च्या पार तर इंग्लंडच्या विरुद्ध 51 पेक्षा जास्त सरासरी आहे.
▪ सचिनचा मैदानावरील संयम, त्याच्या वागणुकीची आजही आठवण येते. बाद झाल्यावर ना कधी राग, संताप. गोलंदाजाने कितीही भडकवलं तरी सचिन कधीच काही बोलला नाही. उत्तर दिलं ते त्याच्या बॅटने. त्याची बॅट कधी शांत राहिली नाही.
▪ मैदानात स्ट्रेट ड्राईव्ह असो वा मध्यमवर्गीय कुटुंबातील संघर्षाची कहाणी, दोन्हीच्या बाबतीत सचिनचं उदाहरण दिले जाते. अशा या क्रिकेटच्या देवाला वाढदिवसाच्या भर-भरून शुभेच्छा!
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp News Updates
● नवी दिल्ली - आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर बनू शकतात
● नवी दिल्ली - फोर्ब्सने जगातील श्रीमंत खेळाडूंची यादी केली जाहीर, यामध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली एकमेव भारतीय नाव
● नवी दिल्ली - मेघालयमधून AFSPA हटवला, तर अरुणाचलच्या बहुतांश भागातून AFSPA हटवण्याचा निर्णय
● नवी दिल्ली- राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरण, करकरडुमा न्यायालयाने सुनावला 6 महिन्यांचा तुरुंगवास, 7 प्रकरणात प्रत्येकी 1.60 कोटींचा दंड भरावा लागणार
● वॉशिंग्टन - देशातील सुमारे 80 टक्के ज्येष्ठ नागरिक जन-धन योजनेच्या माध्यमातून बँकेशी जोडले गेले, वर्ल्ड बँकेची मोठी माहिती
● गडचिरोली - गेल्या 48 तासांच्या आत गडचिरोलीच्या सी -60 जवानांनी मोठं ऑपरेशन पार पाडलं, 6 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
● मुंबई - नाणार प्रकल्प अधीसूचना रद्द करणे सरकारचा निर्णय नाही, उद्योगमंत्र्यांच्या घोषणेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
● परभणी - पॉक्सोअंतर्गत फाशीच्या तरतुदीनंतर महाराष्ट्रातला पहिला गुन्हा परभणीमध्ये दाखल
● टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई, इन्स्टाग्रामवर अनोख्या पद्धतीने फोटो पोस्ट करत दिली गोड बातमी
● रोमहर्षक सामन्यात दिल्लीवर चार धावांनी विजय मिळवत पंजाब अव्वल, अंकित राजपूत ठरला सामनावीर
● दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची मुख्य भूमिका असलेल्या 'भारत अने नेनू' चित्रपटाने दोन दिवसांत जगभरात 100 कोटींचा गल्ला कमवला
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🏥 पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर डॉक्टर्स नाराज
LetsUp I Update
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनमध्ये केलेल्या एका वक्तव्यावर डॉक्टर्स नाराज झाले असून त्यांनी आपली नाराजी एका खुल्या पत्राद्वारे जाहीर केली आहे. डॉक्टरांच्या भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान म्हणाले होते की, परदेशी फार्मास्युटिकल कंपन्यांना प्रमोट करण्यासाठी डॉक्टर्स परदेशातील परिषदांमध्ये सहभागी होतात.
त्यावर टिप्पणी करताना डॉक्टर्सनी म्हटले आहे, की ज्या देशातील 70 टक्के वैद्यकीय प्रणाली भारतीय डॉक्टर्स चालवतात अशा देशात पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले आहे. औषधांच्या किमती निश्चित करण्याचा अधिकार सरकारकडे आहे, आमच्याकडे नाही. आणि परिषदा फार्मास्युटिकल कंपन्या आयोजित करत नाहीत; असे आयएमएचे डॉक्टर विनोद शर्मा यांनी म्हटले आहे. काही डॉक्टर्स असे असतीलही; पण पंतप्रधानांच्या वक्तव्याने डॉक्टर्सची प्रतिमा मलीन झाली आहे, असे ते म्हणाले.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp News Updates
● नवी दिल्ली - काबूल आणि बगलान येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा भारताने केला निषेध, जखमींवरील इलाजासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे दिले आश्वासन
● नवी दिल्ली - मिडीयाला मसाला देऊ नका; तुमच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा होतेय मलिन, पंतप्रधान मोदींची भाजप नेत्यांना जाहीर सूचना
● नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात जाणार चीनच्या दौऱ्यावर, 27 आणि 28 एप्रिलला शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर बैठकीत घेणार सहभाग
● नवी दिल्ली - ग्रामीण भागांमध्ये शीतगृहे बनवण्याची शिफारस कृषी विभागाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीने केली
● जम्मू-काश्मीर - हंदवादा येथे पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांच्या ठिकाणाचा भांडाफोड, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त
● गडचिरोली जंगलात 16 नक्षलींचा खात्मा; महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई
● मुंबई - कुरार येथे शिवसेना उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांच्यावर गोळीबार, उपचारांदरम्यान सावंत यांचा मृ्त्यू
● फ्लिकर या फोटो शेअरिंग साईटला स्मगमगने केले खरेदी, या माध्यमातून या दोन्ही संकेतस्थळांचा विलय होणार असल्याचे जाहीर
● चेन्नईचा हैदराबादवर 4 धावांनी रोमहर्षक विजय, ड्वेन ब्रावो ठरला सामनावीर; राजस्थानने उडवला मुंबईचा धुव्वा, जोफ्रा आर्चर ठरला सामनावीर
● मुंबई - मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि अंकिता कोवर हे दोघे अखेर विवाहबद्ध झाले
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
📣 'पोक्सो' अध्यादेशाला मंजुरी
LetsUp I Update
▫ 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी दिली मंजुरी
▫ केंद्र सरकारने नवीन अध्यादेशाला मंजुरी दिल्याने 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाणार
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
