ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Открыть в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Больше
6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - यंदा बजेट आणखी 15 दिवस लवकर सादर होणार, मात्र वित्त वर्ष एप्रिल ते मार्च असेच ठेवले जाणार, सूत्रांची माहिती 2. तूम्ही टेलिग्राम वापरता का? होय. तर लेट्सअपच्या निवडक पोस्ट आता मिळवा टेलिग्राम चॅनलवर. जॉईन करण्यासाठी क्लिक करा t.me/letsup --------------------------------------------- पृथ्वी 23 सप्टेंबरला नष्ट होणार!, सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/earthdistroy --------------------------------------------- 3. नवी दिल्ली - आता ‘आधार’ सक्तीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती 4. नवी दिल्ली - बीएसएनएल पुढील 2 वर्षांत देशभरात 1 लाख वाय-वाफ हॉटस्पॉट निर्माण करण्याच्या तयारीत, संचालक अनुपम श्रीवास्तव यांची माहिती 5. नवी दिल्ली - 1 हजार रूपयांची नोट चलनात आणण्याचा काहीही विचार नाही, केंद्र सरकारने केले स्पष्ट 6. नवी दिल्ली - हरयाणा हिंसाचार प्रकरण, जे राजीनामा मागत आहे, ते मागत राहू देत. मी माझे काम योग्य प्रकारे केलं आहे : मुख्यमंत्री मनोहरलाल खट्ट 7. गोरखपूर - उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल महाविद्यालयात 3 दिवसांमध्ये 61 बालकांचा मृत्यू, विविध रोगांमुळे नवजात बालकांनी जीव गमावला 8. चंदीगड - 18 अल्पवयीन मुलींची सिरसा येथील ‘डेरा सच्चा सौदा’च्या मुख्यालयातून सुटका, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाण्याची शक्यता 9. उत्सव काळात साखर आणि कांद्याचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरु, साठेबाजी टाळण्यासाठी कठोर पावले उचलणार 10. बीजिंग - भारताने डोकलामवर चीनचा ताबा मान्य केला आहे, त्यामुळेच सैन्य माघारी घेतले : चीनी मीडिया 11. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 31646.46, निफ्टी : 9884.40, सोने भाव : 29,597 (प्रतितोळा), चांदी : 39,715 (प्रतिकिलो) 12. मुंबई - मुंबईतील 23 ठिकाणी 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस, पालिका आयुक्तांची माहिती 13. हार्ले डेव्हिडसनच्या 2018 सॉफ्टटेल लाईनअपमधील नवी बाईक फॅट बॉबचे अपग्रेडेड व्हर्जन सादर, बाईकची एक्स शो रूम किंमत 13 लाख 52 हजार रूपये 14. बांगलादेशने मिरपूर कसोटीत बलाढ्य ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी केली मात, अष्टपैलू कामगिरी करणारा शकिब अल हसन (84 धावा आणि 10 बळी) ठरला सामनावीर 15. मुंबई - दीपक शिवदसानी दिग्दर्शित 'जुली 2' या चित्रपटाचा टीझर रिलीज, यात साऊथची अभिनेत्री राय लक्ष्मी दिसणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

👉 _*मुंबई पावसाने थांबली; देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस*_ _*Lets Up Current Affairs*_ काळ दिवसभरात मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढल्याचे चित्र पहावयास मिळाले. संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे शहरातील रस्तेवाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. जागोजागी वाहनांच्या लांबच्यालांब रांगा दिसून आल्या, तर पाणी साचल्याने अनेक ठिकाणांवरील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला. दरम्यान पावसाने धुतल्यानंतर मुंबईकरांना रात्रीत थोडासा दिलासा मिळाला आहे. पावसाची रिपरिप थांबली असली तरी मुंबईची लाईफलाईन अजूनही पूर्ववत झालेली नाही मात्र पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू सुरु आहे. मध्य रेल्वेची वाहतूक घाटकोपर ते कल्याण अशी सुरु केली होती, मात्र पुन्हा ती रोखण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेही ठप्प झाली आहे. तर दादर, माटुंगा, सायन, हिंदमाता, परळ भागात अजूनही रस्यावर पाणी आहे. हे पाणी हळूहळू ओसरण्यास सुरु झालं आहे. _*5 लाखांपेक्षा जास्त युझर्स असलेले ‘LetsUp - Digital Magazine’ जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा*_ https://goo.gl/R4iKNX 👉 _*घराबाहेर पडू नका : मुख्यमंत्री*_ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात जाऊन परिस्थितीचा अाढावा घेतला. जनतेच्या मदतीसाठी शासकीय यंत्रणा सर्व आवश्यक प्रयत्न करत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये’, असे आवाहनही त्यांनी केले. 👉 _*माेदींकडून विचारपूस, मदतीचीही तयारी*_ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. त्यावर त्यांनी केंद्र शासन राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले. मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफ दलाच्या तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. 👉 _*येत्या 24 तासात मुंबईत मुसळधार पाऊसाचा अंदाज*_ महाराष्ट्र-गुजरातमध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अलर्ट IMD ने जारी केला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांवर जमा झालेले काळे ढग, सुसाट्याचा वारा आणि तुफान पाऊस पाहून मुंबईकरांना 26 जुलैची आठवण होत आहे. परंतु, हे वादळ किंवा ढगफुटी नसल्याचे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र पुढचे 24 तास मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. 👉 _*मराठवाड्यात येत्या 48 तासांत मुसळधार*_ येत्या 24 तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात येत्या 48 तासांत मराठवाड्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्‍य प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि नॉर्थ ईस्टच्या काही भागातही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 👉 _*113 वर्षांत 156 जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी झाले*_ मान्सूनचा तीन-तृतीयांश भाग निघून गेल्यानंतरही देशातील 34 टक्के भागात सरासरीहून कमी पाऊस झाला अाहे. तसेच सुमारे 13 टक्के भागात सरासरीहून अत्याधिक पाऊस झाला. देशात अातापर्यंत सरासरीच्या 5 टक्के पाऊस कमी झाला अाहे. हवामानाच्या या असामान्य पॅटर्नला समजण्यासाठी हवामानतज्ज्ञांनी 113 वर्षांच्या पावसाच्या अाकड्यांचे विश्लेषण केले. देशात प्रथमच अशा प्रकारचा अभ्यास केला गेला. 1901 ते 2013 पर्यंत मान्सून व पूर्ण वर्षाच्या पावसाच्या विश्लेषणात पाऊस सातत्याने घटत असल्याचे समाेर अाले अाहे. देशातील 632 जिल्ह्यांपैकी 156 जिल्ह्यांत पाऊस घटला अाहे, तर 82 जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण वाढल्याचे दिसून अाले अाहे. _*5 लाखांपेक्षा जास्त युझर्स असलेले ‘LetsUp - Digital Magazine’ जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा*_ https://goo.gl/R4iKNX

photo content

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - एनएसएसओच्या ताज्या सर्व्हेक्षणातून भारतात ग्रामीण भागातील 80 टक्के गरीब लोकांच्या घरांच्या राहण्यायोग्य जमिनीचे क्षेत्रफळ 449 चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी 2. तूम्ही इंस्टाग्राम वापरता का? होय. तर लेट्सअपच्या निवडक पोस्ट आता मिळवा इंस्टाग्रामवर. फॉलो करण्यासाठी क्लिक करा instagram.com/letsup.in 3. नवी दिल्ली - जुलै महिन्यात 92 हजार 283 कोटींचा जीएसटी महसूल जमा झाल्याची केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती 4. लखनऊ - येत्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशात 70 लाख तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 5. गोरखपूर - उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेल्या 48 तासांमध्ये सात बालकांचा मृत्यू 6. हरियाणा - हत्याकांडातील आरोपी असलेला सतलोक आश्रमाचा प्रमुख स्वयंघोषित संत बाबा रामपालची हिस्सार न्यायालयाने मुक्तता केली मात्र तरीही तुरुंगातच रवानगी 7. मुंबई - महाराष्ट्रात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, पंतप्रधानांकडून मदतीची हमी 8. मुंबई - मुंबई पाण्याखाली, तिन्ही रेल्वेमार्ग ठप्प, प्रवाशांचे हाल, वीजपुरवठा खंडित, शाळांना सुटी, 30 ते 40 हजार लोक अडकून पडल्याची शक्यता, पावसाचा जोर वसरला 9. कोल्हापूर - राज्यातील सत्तारूढ भाजप महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार, राजू शेट्टी आज घोषणा करण्याची शक्यता 10. मुंबई - राज्य सरकार आणि न्या. ओक वादावर पडदा; न्यायव्यवस्थेत कुणाची लुडबूड खपवून घेणार नाही म्हणत न्यायालयाने सरकारचा बिनशर्त माफीनामा स्वीकारला 11. ह्युस्टन - हार्वे या चक्रीवादळामुळे टेक्सस प्रांतात पाऊस आणि पुरामुळे हाहाकार उडाला, वादळाने आतापर्यंत दहा जणांचा बळी घेतला 12. मुंबई - भारतातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणचा समावेश 13. कोलंबो - कसोटी आणि वनडे मालिकेत भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंका निवड समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

👉 प्लेटलेट्स म्हणजे काय? कमी होण्याची कारणं काय? Lets Up Health katta अनेकदा आपण अमुक एका व्यक्तिच्या प्लेटलेट्स कमी झाल्या असल्याचं ऐकलं असेल? पण हे प्लेटलेट म्हणजे नेमकं काय? प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं काय? तर आज त्याबद्दल जाणून घेऊयात... 👉 प्लेटलेट्स म्हणजे काय? प्लेटलेट्स या मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे शास्त्रज्ञांनी त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव दिले आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे. हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हा देखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup 👉 प्लेटलेट्स कशा तयार होतात? रक्तामध्ये प्रामुख्याने लालपेशी (आरबीसी), पांढर्‍या पेशी (डब्लूबीसी) आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका) या 3 पेशी असतात. त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते. प्लेटलेट्स या मोठया हाडांतील रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणार्‍या मेगा कॅरोसाइटस् या पेशींपासून तयार होतात. त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात. 👉 प्लेटलेट्सचं कार्य काय? रक्तवाहिन्यांतून वाहणारे रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं. ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं. तसेच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते. एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते. अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. त्यामुळेच प्लेटलेट्सना ‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं. 👉 प्लेटलेट्सची आवश्यक संख्या किती? सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते. संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन, रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास, शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो. संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो. म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं. त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्राव अधिक प्रमाणात होतो. जखम झाल्यास रक्तस्राव आटोक्यात येत नाही. जास्त रक्त गेल्याने थकवा येतो. 👉 प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं काय? डेंग्यू, मलेरियाचा ताप, अनुवंशिक आजार,केमोथेरपी . डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास, त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी. 👉 प्लेटलेट्सची संख्या कमी झाली तर… 1) लसूण खाणे टाळा. 2) अधिक श्रमाचे व्यायाम तसेच दगदग करु नये. 3) अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत. 4) दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. 5) सुर्‍या, कातरी वापरताना काळजीने वापरावे. 6) बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्लेटलेट्स कमी झाल्यास, त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत. प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत. पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं, हे लक्षात घ्या. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्सअप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

Lets Up News Updates 1. हरयाणा - बाबा राम रहीमला विशेष कोर्टाने ठोठावला 30 लाखांचा दंड तर दोन्ही प्रकरणांमध्ये 20 वर्षाचा कारावास 2. नवी दिल्ली - राम रहीमने जवळपास 300 साध्वींवर बलात्कार केला तर शेकडो तरुणांना नपुंसक केलं, डेराच्या माजी सुरक्षा रक्षकाचा गौप्यस्फोट 3. नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यात लष्करी पेच निर्माण झाल्यानंतर ओप्पो आणि विवो यांनी आपल्या 400 चिनी कर्मचा-यांना मायदेशी परत पाठविले 4. नवी दिल्ली - पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत गेल्या 3 वर्षांत 30 कोटी कुटुंबांनी जन-धन खाती उघडली असून या खात्यांत 65 हजार कोटी रुपये जमा - पंतप्रधान --------------------------------------------- आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horoaug29 --------------------------------------------- 5. नवी दिल्ली - 2 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार डिजिटल केल्यास प्रोत्साहन लाभाच्या स्वरूपात जीएसटीत 2 टक्के सवलत देण्याचा सरकारचा विचार 6. नवी दिल्ली - आगामी काळात कितीही किंमतीच्या सोन्याच्या खरेदी आणि विक्रीवर पॅन कार्ड अनिवार्य करण्यात येण्याची शक्यता 7. नवी दिल्ली - प्रतिजैविकांच्या अमर्याद वापरामुळे वाढत चाललेला धोका सरकारच्या लक्षात आला असून याच्या बेसुमार वापराला चाप लावण्याचा निर्णय 8. मुंबई - राज्य सरकारने कर्जमाफी आणि पिकविम्याची ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढवली 9. मुंबई - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अतिउत्कृष्ट कामासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी देण्यात येणाऱ्या आगाऊ वेतनवाढीचा लाभ यापुढे मिळणार नाही 10. मुंबई - एसटी कर्मचारी महिलांना प्रसुती रजेसोबत तीन महिने अतिरिक्त पगारी रजा; परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा 11. सॅन फ्रान्सिस्को - फेसबुक सोशल नेटवर्किंग साइट्‌सचा प्रमुख मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न प्राप्त झाले असून मुलीचे नाव ऑगस्ट असे ठेवले 12. मुंबई - अभिनेता अजय देवगण याच्या ‘बादशाहो’ या चित्रपटात ‘दिवार’ या चित्रपटातील ‘कह दू तुम्हे’ हे गाणे वापरण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली 13. कॅण्डी - भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या, अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे दिनेश चांदीमल उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामरहीम याला आज दुपारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात शिक्षा सुनावण्यात येणार 2. नवी दिल्ली - देशात बेरोजगारी नव्हे, तर रोजगारांची कमतरता ही मोठी समस्या असल्याचे निती आयोगाने म्हटले 3. नवी दिल्ली - ‘आधार’ क्रमांकावरून संबंधित नागरिकाची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते, ही शक्यता यूआयडीएआयने फेटाळली 4. नवी दिल्ली - सर्जिकल स्ट्राईक 29 सप्टेंबर 2016च्या पूर्वी झाल्याची नोंद नाही, माहितीच्या अधिकारात माहिती आली समोर 5. नवी दिल्ली - भारतातून काश्मीर वगळले तर आपल्या देशाला पूर्णत्व उरणार नाही, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद 6. पाटणा - 'देश बचाओ, भाजप भगाओ’ रॅलीतून लालूप्रसाद यादव यांनी राजकीय ताकद दाखवून दिली, लालूंनी केले बनावट फोटो ट्विट 7. मुंबई - शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी शनिवारी दुपारपर्यंत 32 लाख 8 हजार शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली 8. मुंबई - अवयवदानाची चळवळ रुजवण्यासाठी अवयवदात्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे माेफत उपचारांची सुविधा मिळणार 9. मुंबई - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी 'विदेश भवना'चे उदघाटन केले, या भवनात महाराष्ट्रातील विदेश मंत्रालयाची सर्व कार्यालये असणार 10. मुंबई - बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री सध्या हॉलीवूडमध्येही करिअर घडवण्यासाठी धडपडत असून या यादीत पूजा बत्रा हे नवे नाव समोर आले 11. मुंबई - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत पी. व्ही. सिंधूचा जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून पराभव, सिंधूला रौप्य पदकावर समाधान 12. पल्लीकेली - श्रीलंकेविरुद्ध भारताने तिसरा वनडे सामना सहा विकेटने जिंकत मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली, रोहितचे शतक न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

Lets Up News Updates 1. डोकलाममध्ये सुरू असलेल्या हालचालीनुसार पुढील काळात हे प्रयत्न आणखीन वाढणार, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केली शक्यता 2. तूम्ही इन्स्टाग्राम वापरता का? होय. तर लेट्सअपच्या निवडक पोस्ट आता मिळवा इन्स्टाग्रामवर. फॉलो करण्यासाठी क्लिक करा instagram.com/letsup.in 3. नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 1000 रुपयांच्या जवळपास 99 टक्के नोटा बँकेत परत, रिझर्व्ह बँकेकडून वेबसाईटवर अधिकृत आकडा जाहीर 4. नवी दिल्ली - भारत हा महात्मा गांधी आणि गौतम बुद्धांचा देश आहे. देशात कुठल्याही स्वरुपातील हिंसा खपवून घेतली जाणार नाही : पंतप्रधान मोदी 5. नवी दिल्ली - सोने खरेदीसाठी पॅनकार्डची सक्ती करण्यासाठी अर्थनियामकांच्या समितीने तसा प्रस्ताव सरकारपुढे केला सादर 6. नवी दिल्ली - बद्रिनाथकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली; वाहतुक ठप्प, मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न सुरु 7. झारखंडमध्ये महिन्याभरात 52 नवजात बालकांचा मृत्यू, कुपोषणामुळे लहानग्यांनी गमावला जीव 8. जयपूर - स्वतःला संत आणि बाबा म्हणवणारे राम रहिमसारखे लोक हे लादेनपेक्षा धोकादायक आहेत, त्यांना शिक्षा होणे योग्यच आहे : जैन मुनी तरूण सागर महाराज 9. ठाणे - गुजरातमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या डोंबिवलीतील एकाच कुटुंबातील 11 जणांचा अपघातात जागीच मृत्यू, मृतांमध्ये 5 महिलांचा समावेश 10. जळगाव - भाजपमध्ये आपली अवस्था राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखी झाली आहे : एकनाथ खडसे, माजी महसूल मंत्री 11. व्हॉटस्अ‍‍ॅप मॅसेंजरवर आता व्हेरिफाईड अकाऊंटची सुविधा, येत्या काही महिन्यांमध्ये जगभरातील युजर्सला हे फिचर देण्यात येणार 12. बॉक्सिंग जगतातील सर्वात महागडा सामना फ्लॉयड मेवेदरने जिंकला, मेवेदरने 29 वर्षीय आयरिश बॉक्सर कोनोर मॅक्ग्रेगॉरला 10 व्या फेरीत केले नॉक आऊट 13. मुंबई - अभिनेत्री कंगना राणौत हिच्या आगामी ‘सिमरन’ या चित्रपटातलं ‘मीत’ हे गाणं प्रदर्शित, सचिन-जिगर यांनी संगीतबद्ध केलं हे गाणं न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. जम्मू-काश्मीर - पुलवामामध्ये पोलीस क्वॉर्टरवर दहशतवाद्यांचा हल्ला, 8 जवान शाहिद तर दोन दहशतवाद्यांचाही खात्मा 2. तूम्ही इंस्टाग्राम वापरता का? होय. तर लेट्सअपच्या निवडक पोस्ट आता मिळवा इंस्टाग्रामवर. फॉलो करण्यासाठी क्लिक करा instagram.com/letsup.in 3. चंदीगड - आरोपी गुरमीत राम रहीमला शिक्षा सुनावण्यासाठी सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश रोहतक तुरुंगात जाऊन शिक्षा सुनावणार 4. नवी दिल्ली - ताजमहाल हे मंदिर नसून एक इस्लामी दफनस्थळच आहे, असे भारतीय पुरातत्त्व विभागाने स्थानिक न्यायालयात सांगितले 5. नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेसाठी 2 मे 2017 पर्यंत 51.33 लाख लोकांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले 6. हरयाणा - डेरा समर्थकांनी केलेल्या हिंसेप्रकरणी 552 जणांना अटक केली तर डेरा सच्चा सौदाचे 36 आश्रम सील करण्यात आले 7. मुंबई - शक्ती मिल ताब्यात घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील; मिलची मालमत्ता विकून कर्जमाफीसारख्या योजना राबवणार - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील 8. नागपूर - विदर्भातील विविध जंगलात चालू वर्षात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या वाघांची संख्या 12 वर पोहचली 9. पुणे - चीनने घेतलेली भूमिका भारतासाठी घोंगावणारे संकट, चीनविरोधी भूमिका घेतल्यास केंद्र सरकारला सुसंगत पाठिंबा देऊ - शरद पवार 10. मुंबई - फेसबुक आणि इंस्टाग्राम जवळपास अर्धा तास बंद झाल्याने जगभरातील युझर्स हैराण झाले होते, युझर्सने ट्विटरवर संताप काढला 11. अबुजा - नायजेरियामधील दहशतवादी संघटना बोको हरामने केलेल्या हल्ल्यामध्ये 27 लोकांचे प्राण गेले तर अनेक जण जखमी 12. मुंबई - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालचा पराभव; सायनाला कांस्यपद तर पी. व्ही. सिंधूने चीनच्या चेन युफेईवर मात करत अंतिम फेरी गाठली न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

photo content

⁠⁠⁠👉 गेल इंडिया लिमिटेडमध्ये भरती Lets Up Job Updates पोस्ट : फोरमन (इलेक्ट्रिकल) - जागा : 40 - पात्रता : 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंग डिप्लोमा, 02 वर्षे अनुभव पोस्ट : फोरमन (इंस्ट्रुमेंटेशन) - जागा : 35 - पात्रता : 60% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल /इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन /इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग डिप्लोमा, 02 वर्षे अनुभव पोस्ट : ज्युनियर केमिस्ट - जागा : 12 - पात्रता : 55% गुणांसह M.Sc. (Chemistry), 02 वर्षे अनुभव पोस्ट : ज्युनियर सुपरिन्टेन्डेन्ट - जागा : 05 - पात्रता : 55% गुणांसह हिंदी विषयात पदवी, हिंदी ते इंग्रजी/ इंग्रजी ते हिंदी भाषांतर डिप्लोमा/पदवी, 03 वर्षे अनुभव _*न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा*_ https://telegram.me/letsup पोस्ट : असिस्टंट (स्टोअर & पर्चेस) - जागा : 15 - पात्रता : 55% गुणांसह पदवीधर, 01 वर्ष अनुभव पोस्ट : अकाउंट्स असिस्टंट - जागा : 24 - पात्रता : 55% गुणांसह B. Com, 01 वर्ष अनुभव पोस्ट : मार्केटिंग असिस्टंट - जागा : 20 - पात्रता : 55% गुणांसह BBA/BBS/BBM/BMS, 01 वर्ष अनुभव फी : 50 रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 15 सप्टेंबर 2017 अधिक माहितीसाठी : https://goo.gl/s4rrCE ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/G2Rv1d 👉 सशस्त्र दल मेडिकल स्टोअर्स डेपो, मुंबई येथे भरती पोस्ट : स्टोअर कीपर - जागा : 01 पोस्ट : शिपाई - जागा : 01 पोस्ट : सफाईवाला - जागा : 01 पोस्ट : ट्रेड्समन मेट - जागा : 10 वय : दि. 09 सप्टेंबर 2017 रोजी 18 ते 28 वर्षे अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Commandant, AFMSD, Akurli Cross Road No. 3, Kandivali (E), Mumbai - 400101 अर्ज करण्याची मुदत : दि. 09 सप्टेंबर 2017 अधिक माहितीसाठी : https://goo.gl/zZfPdG _*न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा*_ https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. हरियाणा - रामरहीमसिंग याला दोषी ठरवल्यानंतर अनेक भागांत जाळपोळ आणि दगडफेक होऊन 32 लोक मारले गेले तर 250 लोक जखमी 2. नवी दिल्ली - निर्धारित वेळेत म्हणजेच येत्या 31 ऑगस्टपर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक असल्याचे केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले 3. नवी दिल्ली - बिहारमध्ये आलेल्या पुराने आणखी 39 बळी, उत्तर प्रदेशात पूरस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू तर आसाममध्ये पूर ओसरला 4. नवी दिल्ली - देशाच्या इतिहासात प्रथमच दोनशे रुपयांची नोट सादर मात्र ही नोट बँकांच्या एटीएममध्ये येण्यास काहीसा वेळ लागणार 5. नवी दिल्ली - साक्षी महाराजांनी गुरमित राम रहीम सिंह याचं समर्थन केले, त्यामुळे आता साक्षी महाराजांसह भाजपवरही टीका सुरु झाली 6. नागपूर - देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात चांगले काम करीत आहेत, त्यांची राज्यातच आवश्यकता, मी परिवहन मंत्रालयात समाधानी - नितीन गडकरी 7. मुंबई - हरियाणासह पाच राज्यांत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातही हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आला 8. मुंबई - जीएसटी लागू झाल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत 400 ते 500 कोटी रुपयांच्या निविदा रद्द करण्याचे राज्य शासनाने आदेश 9. पुणे - पुढील दोन दिवस राज्यात पावसाच्या सरी कोसळणार; कोकण, गोव्यात जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्राच्या मुसळधार पावसाची शक्यता 10. मुंबई - अॅपलचा आगामी आयफोन 8 हा 12 सप्टेंबरला लाँच होणार तर 22 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे 11. मुंबई - अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या 2.0 या सिनेमाचा मेकिंग व्हिडिओ रिलीज, हा सिनेमा नव्हे तर आयुष्यभराचा अनुभव - अक्षय कुमार 12. मुंबई - भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला तर श्रीकांतचे आव्हान संपुष्टात न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. तामिळनाडू - अण्णा द्रमुकच्या पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन गटांचे विलीनीकरण झाल्यापासून 24 तासांच्या आत या पक्षाचे सरकार अल्पमतात 2. नवी दिल्ली - भारतीय तुरुंगांमध्ये असलेल्या 7 पाकिस्तानी कैद्यांना मायदेशी पाठवत असताना भारताने कुलभूषण जाधव यांच्या सुटकेचा मुद्दा उचलला 3. नवी दिल्ली - UC मोबाईल ब्राऊजर वादात अडकण्याची शक्यता, अली बाबाच्या या ब्राऊजरवर भारतीय ग्राहकांचा डेटा चीनला विकल्याचा आरोप 4. नवी दिल्ली - चीनने भारताला धमकी दिली असून चिनी सैन्य भारतात घुसल्यास ‘भयंकर गोंधळ’ उडेल, असे चीनच्या परराष्ट्र विभागाने म्हटले 5. नवी दिल्ली - नौदलाकरिता 100 बहुउद्देशीय हेलिकॉप्टर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू, 'बाय अॅण्ड मेक इंडियन' तत्वावर होणार खरेदी 6. नवी दिल्ली - सीबीआयने पत्रकार राजदेव रंजन हत्येप्रकरणी राजद नेते शहाबुद्दीन यांच्‍याविरोधात चार्जशीट दाखल केले 7. मुंबई - येत्या 1 ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला 8. पुणे - विद्यार्थ्याना नीट, जेइइ अशा प्रवेश परीक्षांची तयारी करताना मदत व्हावी यासाठी राज्य शिक्षण मंडळ ऑनलाइन प्रश्नपेढी तयार करणार 9. मुंबई - राज्यात विविध जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार 10. नवी दिल्ली - बीएसई आणि एनएसई यांनी शेअर मार्केटमधील गैरव्यवहार आणि कर चोरी थांबवण्यासाठी आधार कार्ड नंबर देणे सक्तीचे केले 11. मुंबई - आमीर खान प्रॉडक्शन्सच्या आगामी सिक्रेट सुपरस्टार चित्रपटाचे मै कौन हू? हे गाणे रिलीज करण्यात आले 12. मुंबई - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पी. व्ही. सिंधूचा विजय, किम योचा केला 21-16, 21-14 असा पराभव न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - डोकलाममध्ये भारत-चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताचे नूतन राष्ट्रपती रामनाथ कोविंद लडाख दौर्‍यावर दाखल 2. नवी दिल्ली - तिहेरी अथवा तोंडी तलाक हा मुस्लिमांचा मूलभूत धार्मिक अधिकार आहे किंवा नाही या वादग्रस्त विषयावर सर्वोच्च न्यायालय आज ऐतिहासिक निर्णय देणार 3. नवी दिल्ली - अमित शहांचा तामिळनाडू दौरा रद्द, केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल आणि विस्तार होण्याची शक्यता, JDUच्‍या नेत्‍यांना संधी मिळणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup 4. नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असलेल्या एसबीआयने आपल्या विविध प्रकारच्या किरकोळ कर्जांवरील प्रोसेसिंग फीमध्ये मोठी सूट दिली 5. नवी दिल्ली - केंद्र सरकारने उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध घातले, आयात बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा 6. मुंबई - मुंबईसह राज्यभरातील सिनेमा थिएटरमध्ये फक्त तिथल्या अन्नपदार्थांची सक्ती नको, अशी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल 7. मुंबई - ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांसाठी 50 हजार रुपये ते 1 लाख 75 हजार रुपये पर्यंतची खर्च मर्यादा निवडणूक आयोगाने निश्चित केली 8. मुंबई - नारायण राणे योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, मला जर निर्णय पटला तर मीही त्यांच्या सोबत असेल - काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर 9. पुणे - डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी बेपत्ता असलेले दोन आरोपी विनय पवार व सारंग आकोलकर या दोघांची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये बक्षीस 10. बीजिंग - डोकलाम प्रश्‍नी भारतावर दबाव वाढविण्यासाठी चीनकडून आगळीक सुरूच, दुसर्‍यांदा चिनी सैनिकांनी अज्ञात ठिकाणी युद्धसराव केल्याचे उघडकीस 11. मुंबई - डेव्हिड धवनच्या बहुप्रतीक्षित 'जुडवा-2' चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज, हा चित्रपट 29 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार 12. मुंबई - वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्माने स्पेनच्या पाब्लो अबियनचा 21-8, 17-4 अशा दोन सेटमध्येच पराभव केला न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - शेतकऱ्यांना अाता पीक कर्जासाठी आधार कार्ड अनिवार्य, भारतीय रिझर्व्ह बँकेने (अारबीआय) सर्व बँकांना निर्देश दिले 2. नवी दिल्ली - 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत देशातील बँकांत तब्बल 5 हजार 77 घोटाळे उघडकीस झाल्याची माहिती 3. नवी दिल्ली - अमेरिकी काँग्रेसचा अहवाल, भारत-चीनदरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर युद्धाचा भडका उडण्याची शक्यता --------------------------------------------- आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horoaug21 --------------------------------------------- 4. नवी दिल्ली - एक ते पंधरा सप्टेंबर दरम्यान देशभरातील सर्व विद्यापीठे, कॉलेजेस व शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचे युजीसीचे आदेश 5. नवी दिल्ली - पुढच्या वर्षापासून आयआयटीची प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार 6. नवी दिल्ली - उत्कल एक्स्प्रेस दुर्घटनेप्रकरणी रेल्वे प्रशासनाची मोठी कारवाई, रेल्वेच्या आठ अधिकाऱ्यांवर प्रशासनाने केली कारवाई 7. मुंबई - सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबईचे गणेश मंडळ विमा करण्यासाठी उत्साही, 'अंधेरीचा राजा'ची घटस्थापना करणाऱ्या गणेश मंडळाचा 5 कोटींचा विमा 8. मुंबई - मिरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 47 टक्के मतदान, आज 12 वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार 9. पुणे - राज्यात अहमदनगरमध्ये सर्वाधिक 112 मिलीमीटर पावसाची नोंद, पुण्यात 43 मिमी, साताऱ्यात 10 तर औरंगाबादमध्ये 35 मिमी पाऊस 10. इस्लामाबाद - गेल्या पाच वर्षांत भारतातून स्थलांतरित झालेल्या 298 नागरिकांना पाकिस्तानने नागरिकत्व दिले, पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाची माहिती 11. पुणे - संगीत, नृत्य, कला, गायन, वादन, क्रीडा संस्कृती यांचा मिलाफ असलेला 29 वा पुणे फेस्टिव्हल 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान रंगणार 12. श्रीलंका - शिखर धवन आणि विराट कोहलीच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने मालिकेतील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर 9 विकेट मात केली 5 लाखांपेक्षा जास्त युझर्स असलेले ‘LetsUp - Digital Magazine’ जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/95CTpe

👉 फायदेशीर महिला बचत खाते... Lets Up Useful Info आर्थिक बाबतीत अजूनही महिला बर्‍याच अंशी घरातील पुरूषांवर अवलंबून असल्याचे चित्र पहायला मिळते. कित्येकदा नोकरी करणार्‍या महिलांनाही आर्थिक स्वातंत्र्य नसते. महिलांना आपला पैसा योग्य ठिकाणी सुरक्षितपणे ठेवावा, भविष्यासाठी राखून ठेवावा असे वाटत असते पण त्यांना योग्य मार्ग सापडत नाही. खास अशाच महिलांसाठी बँकांनी महिला बचत खाते सुविधा सुरु केली आहे. महिला बचत खात्याच्या रूपाने आता महिलांसाठी एक चांगली सुविधा विविध बँकांत उपलब्ध झाली आहे. तुम्ही महिला असाल तर प्रत्येक बँकेत तुम्ही महिला बचत खात्याची माहिती विचारून घ्यायलाच हवी. कारण सामान्य बचत खात्याच्या तुलनेत महिला बचत खाते अधिक फायदेशीर असते. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup महिला बचत खाते विशेष करून महिलांसाठी तयार करण्यात आले आहे. या खात्यावर कॅशबॅक रिवॉर्ड तर असतेच पण त्याचबरोबर अन्यही अनेक आकर्षक ऑफर असतात, त्यातून महिलांच्या दैनंदिन गरजा भागू शकतात. आता अनेक खासगी बँकांनी खास महिला बचत खाती सुरू केली आहेत. बचत खात्यावर ज्या महिलांना आधिकाधिक फायदे हवे असतात अशा महिलांसाठी हे खाते म्हणजे पर्वणीच म्हणावे लागेल. सामान्य बचत खात्यात ज्याप्रमाणे मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो, तसा याही खात्यावर ठेवावा लागतो. महिला बचत खाते कोणतीही महिला व्यक्तीगतरित्या किंवा जॉइंट होल्डिंग असेल तर प्रायमरी होल्डर म्हणून उघडू शकते. या खात्यांमध्ये सर्व प्रकारच्या रिवॉर्डबरोबरच कस्टमाईज फीचर्सही पेश केले जातात आणि त्यात डेबिट कार्डही लिंक्ड असते. महिला बचत खात्यांत अशा सेवा दिल्या जातात. ज्या सामान्य बचत खात्यात असत नाही. कोटक महिंद्रा बँकेने आपल्या सिल्क महिला बचत खात्यांतर्गत होम बँकींग सर्व्हिस उपलब्ध करून दिली आहे. त्यात खातेधारक कॅश पिकअप, कॅश डिलिव्हरी, चेक/ड्राफ्ट डिलीव्हरी वगैरे सेवा घेऊ शकते. अर्थात ही सेवा निवडक शहरांपुरतीच आहे. काही बँका महिला बचत खात्याला अपघात विमाही देतात. त्यामुळेही हे खाते नक्कीच फायदेशीर आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content