LetsUpp Marathi
Открыть в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Больше6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 день
Архив постов
6 624
राष्ट्रीय पालक दिवस ! घराचा आधारस्तंभ म्हणजे आई -बाबा
LetsUpp | Special
💁🏻♂️ आपल्या आई-वडिलांचा सन्मान करण्यासाठी 25 जुलै राष्ट्रीय पालक दिन साजरा केला जाणार आहे.
👩👩👦👦 जगामध्ये आज अनेक बदल झाले आणि हळूहळू एकत्र कुटुंब पद्धती विरळ होत चालली आहे.
😍 भारतामध्ये तुमच्या कुटुंबाची, त्यांच्या प्रेमाची, स्नेहाची, आपुलकीची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी नॅशनल पेरेंट्स डे म्हणजेच पालक दिन साजरा केला जातो.
💁🏻♂️ हा दिवस मुलांसाठी असलेले निस्वार्थ समर्पण आणि त्यांचे नाते टिकवण्याच्या दिशेने त्यांचे आजीवन त्याग म्हणून साजरा करणारा दिवस आहे.
📍 प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडीलांचं महत्वाचं स्थान असतं. पालकांनी आपल्यासाठी केलेला त्याग, खाललेल्या खस्ता याची जाणीव आपल्याला नसते असे नाही. पण रोजच्या गडबडीत त्यांना ती दाखवणे राहून जाते.
👍 मुलांना, पाल्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, स्वावलंबी करण्यासाठी, संस्कारक्षम करण्यासाठी घरातील वातावरण, पालकांचा वावर महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
👏 या निमित्ताने पालकांप्रती वाटणारे प्रेम, आदर व्यक्त करण्याची एक संधी आपल्याला मिळत आहे. त्यामुळे पालक दिनानिमित्त पालकांसोबत वेळ घालवा आणि त्यांना आपल्या प्रेमाचा ओलावा द्या.
👍 हे विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा
▪️ आई-वडिल वयाने नव्हे तर काळजीने म्हातारे होतात हे कटू आहे पण सत्य आहे
▪️ आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आई-बाबांच्या चेहऱ्यावर सुखद हास्य आणि त्याच कारण तुम्ही स्वत: असणं!
▪️ हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई-वडिल पुन्हा मिळणार नाही
▪️ न हरता न थांबता प्रयत्न कर बोलणारे 'आई-वडील'च असतात
▪️ आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कोणी नसते तिथे उत्तर म्हणून 'आई-बाबा' असतात
सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/d0yIzmbMaib
6 624
सर्वोच्च न्यायालयाचा पालकांना दिलासा; शाळांच्या शुल्कवाढीबाबत मोठा निर्णय
LetsUpp | Trending
⚡ कोरोनामुळे आर्थिक गणित कोलमडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
👉 महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे १५ टक्के शुल्क कमी करावे तसेच कोरोना कालावधीत केलेली शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.
🗣️ यावर पुढील ३ आठवड्यांत आदेश देण्याच्या सूचना देण्यास न्यायालयाने सांगितले असल्याची माहिती याचिकाकर्ते प्रसाद तुळसकर यांनी दिली आहे.
☑️ या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाच्या नावाखाली बाजारीकरण करणाऱ्या शाळा तसेच त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी व नेत्यांना दणका दिला असल्याचे मत याचिकाकर्ते पालक जयश्री देशपांडे आणि प्रसाद तुळसकर यांनी व्यक्त केले आहे.
✒️ याआधी पालकांनी सादर केलेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने १ मार्च २०२१ रोजी राज्यभरातील शाळांना केवळ पालकांनी वाढीव शुल्क भरले नाही तर त्यांच्या मुलाला शाळेतून काढून टाकू नये इतकाच दिलासा दिला होता.
💫 मात्र, कोरोना कालावधीत सुविधांचा वापर होत नसल्याने शाळांना शुल्कवाढ करण्यास बंदी करावी, शाळांचे शुल्क कमी करावे ही पालकांची मागणी मान्य करण्यास कोर्टाने नकार दिला होता.
📍 या विरोधात आम्ही पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे तुळसकर यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या याचिकेची दखल घेतली. तसेच २२ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाला आम्ही केलेल्या अर्जावर ३ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
To know more click here
https://letsup.app.link/NQs1LM1Eaib
6 624
सांगलीकरांची धाकधूक वाढली; कृष्णा नदीची पाणी पातळी ५४ फुटांपर्यंत
LetsUpp | Trending
⚡ सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
🌧️ कृष्णा नदीची पाणी पातळी ५४ फुटांच्यावर गेली आहे. कृष्णा नदीवरील पलूस तालुक्यातील नागठाणे बंधाराही पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाळवा, नागठाणे, शिरगाव, नागराळे या गावांचा संपर्क तुटला आहे.
👉 सांगलीच्या अनेक भागात पाणी शिरले आहे. हळूहळू पाण्याची पातळी वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.
☑️ तर जिल्ह्यातील १ लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. ३० ते ४० हजार जनावरांचे देखील स्थलांतर करण्यात आले आहे.
💫 काल पावसाने उघडीप दिली होती. मात्र सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सांगलीला धोका निर्माण झाला आहे. वारणा नदीवरील काही बंधारे, पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
📍 वारणा नदीवरील मांगले-कांदे पूल, ऐतवडे खुर्द-निलेवाडी पूल, कणेगाव ते भरतवाडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/HaDzuasDaib
6 624
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या
LetsUpp l Bulletin
● साताऱ्यात हाहाकार; पाटण तालुक्यात डोंगरकडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्यांखालून २१ जणांना बाहेर काढण्यात आले; मृतांचा आकडा ३० वर तर अजूनही १२ जण बेपत्ता
● महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा
● पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी जेईई मेन 2021 परीक्षेबाबत चिंता करू नये, विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
● मुंबईत वरळीत लिफ्ट कोसळून 5 मृत, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली
● आपत्कालीन प्रसंगी बीएमसीकडून मदतीचा हात, एक पथक रायगडला, तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना
● लॉकडाऊनमुळे आर्थिक गणित कोलमडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; शैक्षणिक शुल्कात १५ टक्के कपात करावी
● मराठा आरक्षणात 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यासाठी अशोक चव्हाणांची मोर्चे बांधणी, सर्वपक्षीय खासदारांना पत्र
● राज्यात शनिवारी कोरोनामुळे 224 जणांचा मृत्यू; तर 6,269 नवीन रुग्णांची नोंद; तब्बल 29 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही
● इस्रो माजी शास्त्रज्ञ एस नंबी नारायण यांच्यावरील कथित हेरगिरीच्या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयात सीबीआयने अहवाल स्टेटस रिपोर्ट सादर केला
● टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताला पदकाची आशा; पीव्ही सिंधू आणि मेरी कोम सज्ज
To know more click here
https://letsup.app.link/tRRlwVisaib
6 624
आयसीएसई दहावी, बारावीचा निकाल आज; कसा पाहाल, जाणून घ्या
LetsUpp | Trending
● इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल आज (२४ जुलै) जाहीर होणार आहे.
● निकाल दुपारी तीनला ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार असल्याची माहिती ‘आयसीएसई’तर्फे देण्यात आली. एसएसई बोर्ड आणि सीबीएसईप्रमाणे आयसीएसई बोर्डाच्या परीक्षाही यंदा करोनामुळे रद्द करण्यात आल्या होत्या.
त्यामुळे विशिष्ट सूत्र आणि वर्षभरातील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन या आधारे गुण दिले जाणार आहेत.
👉 कुठे पाहाल निकाल?
● निकाल बोर्डाच्या www.cisce.org किंवा www.results.cisce.org या वेबसाइटवर पाहता येईल. मेसेजच्या माध्यमातूनही निकालाची माहिती मिळेल. दहावीसाठी मेसेजमध्ये ICSE असे लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करायचा आहे, तर बारावीसाठी मेसेजमध्ये ISC असे लिहून त्यापुढे सात अंकी युनिक आयडी टाइप करून ०९२४८०८२८८३ या क्रमांकावर पाठवल्यास निकालाची माहिती मिळेल.
💫 स्टेप बाय स्टेप कसा पाहाल निकाल
- काउन्सिलच्या www.cisce.org किंवा www.results.cisce.org या संकेतस्थळावर जा
- होमपेजवर 'Results 2021' या लिंकवर क्लिक करा.
- आता दहावी किंवा बारावी यापैकी पर्याय निवडा
- आता विद्यार्थ्यांनी त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅपचा आदी माहिती भरून लॉगइन करावे.
To know more click here
https://letsup.app.link/6lfdKo818hb
6 624
सरकारी कार्यालयात मोबाईल वापराला नियमावली, काय आहेत नियम?
LetsUpp | National
💁♂️ शासकीय कार्यालयात ड्रेस कोड कसा असावा याचे नियम जारी केल्यानंतर आता मोबाईलचा वापर कसा करायचा या संदर्भात राज्य सरकारने परिपत्रक काढून नियम जारी केले आहेत.
👍 शासकीय कार्यालयात मोबाईल वापरताना अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाही. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचं सांगत परिपत्रक काढण्यात आलं आहे.
मोबाईल वापरण्याच्या संदर्भात काय आहे नियम-
📞 कार्यालयीन कामासाठी कार्यालयात असलेला दूरध्वनीचा (लँडलाईन) वापर करावा
📱 मोबाईल वरती बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा आणि आपल्या बाजूला इतरही उपस्थित आहे याचाही विचार करावा
🗣️ मोबाईल वरती बोलताना संविधानिक भाषेचा वापर करावा
💁♂️ मोबाईल वरती बोलत असताना लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॉल्सला तात्काळ उत्तर द्यावा
👉 अत्यावश्यक वैयक्तिक मोबाईल कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत
📍 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोबाईल सायलंट मोड वरती ठेवण्यात यावा
📌 कार्यालयीन कामासाठी दौऱ्यावरती असाल तर मोबाईल बंद ठेवू नये
To know more click here
https://letsup.app.link/ra3vEk428hb
6 624
विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांचा आज जन्म दिवस
LetsUpp | Special
👨👩👦 अझीम प्रेमजी यांचा जन्म मुंबई मधील एका भारतीय मुस्लिम कुटुंबामध्ये झाला. त्यांचे वडील हे एक नावाजलेले उद्योगपती होते व राईस किंग ऑफ बर्मा म्हणून ओळखले जात होते. अझीम प्रेमजी भारतातील दहा अतिश्रीमंत लोकांमध्ये येतात. २०१३ मध्ये त्यांनी द गिविंग प्लेज साइन करून त्यांची अर्धी संपत्ती दान करण्याचे ठरवले आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी सविस्तर...
👨💻 त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठामधून इलेकट्रीकल इंजिनीयरींग या विषयामधून पदवी घेतली आहे. त्यांनी यास्मिन यांच्याशी विवाह केला.अझीम प्रेमजी यांनी 'अझीम प्रेमजी फौंडेशन'ची स्थापना केली आहे. हे फौंडेशन भारतातील शिक्षण क्षेत्रासाठी काम करते.
👉 महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी मुहंमद हाशिम प्रेमजी यांनी १९४५ साली वेस्टर्न इंडियन वेजिटेबल प्रोडक्ट्स लि. सुरु केली. १९६६ साली वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून अझीम प्रेमजी स्टॅनफर्ड विद्यापीठामधून भारतात परतले व त्यांनी विप्रो कंपनीचा चार्ज घेतला. यावेळी ते २१ वर्षांचे होते.
🖥️ १९८० च्या दशकात माहिती तंत्रज्ञानाची महत्व ओळखून या तरुण उद्योगपतीने उच्च तंत्रज्ञानाच्या निर्मितीस सुरवात केली. सेंटीने या अमेरिकन कंपनीच्या सहकार्याने त्यांनी मिनी कॉम्प्युटरचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. याच काळात त्यांनी आपल्या कंपनीचे 'विप्रो' असे नामकरण केले. त्यांनी आपले सगळे लक्ष माहिती तंत्रज्ञानाकडे वळवले.
👑 टाईम नियतकालिकाने दोनदा त्यांचा जगातील १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान देऊन गौरव केला. २००५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०११ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
🏭 अझीम प्रेमाजीनी स्थापन केलेल्या कंपन्या
● विप्रो लायटिंग व विप्रो जीई मेडिकल सिस्टिम्स, १९९१
● विप्रो नेट, १९९९
● नेटक्रेकर, २०००
● विप्रो वॉटर, २००८
● विप्रो इकोएनर्जी, २००९
सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/2xU5C0fV8hb
6 624
'या' घडीच्या 10 महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
▪️ रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यात पावसाने थैमान सुरुच; नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ
▪️ कोल्हापुरात हाहाकार; पूरस्थितीमुळे ७,६७१ कुटुंबातील ३६ हजाराहून अधिक व्यक्तींचे स्थलांतर
▪️ गंगापूरचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर, दारणा धरणात ७५% पाणी, नाशिककरांची पाण्याची चिंता तूर्तास मिटली
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
▪️ राज्यात पावसामुळे आतापर्यंत १२९ मृत्यू; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती; कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा हाहा:कार सुरु
▪️ इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षाच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका
▪️ आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी ३ वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल
▪️ मुंबईतील बनावट लस घेतलेल्यांचं आजपासून लसीकरण, कांदिवलीतील ३९० जणांना दिली जाणार लस
▪️ मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर खंडणी मागितल्याचा दुसरा गुन्हा ठाण्यात दाखल
▪️ महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष, देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहराज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी चर्चा
▪️ टीम इंडियाचा श्रीलंकेकडून ३ विकेट्ने पराभव, भारताने २-१ ने मालिका जिंकली
To know more click here
https://letsup.app.link/4C7SjWMM8hb
6 624
'या' घडीच्या 10 महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
▪️ रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यात पावसाने थैमान सुरुच; नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ
▪️ कोल्हापुरात हाहाकार; पूरस्थितीमुळे ७,६७१ कुटुंबातील ३६ हजाराहून अधिक व्यक्तींचे स्थलांतर
▪️ गंगापूरचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर, दारणा धरणात ७५% पाणी, नाशिककरांची पाण्याची चिंता तूर्तास मिटली
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
▪️ राज्यात पावसामुळे आतापर्यंत १२९ मृत्यू; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती; कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा हाहा:कार सुरु
▪️ इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षाच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका
▪️ आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी ३ वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल
▪️ मुंबईतील बनावट लस घेतलेल्यांचं आजपासून लसीकरण, कांदिवलीतील ३९० जणांना दिली जाणार लस
▪️ मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर खंडणी मागितल्याचा दुसरा गुन्हा ठाण्यात दाखल
▪️ महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष, देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहराज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी चर्चा
▪️ टीम इंडियाचा श्रीलंकेकडून ३ विकेट्ने पराभव, भारताने २-१ ने मालिका जिंकली
To know more click here
https://letsup.app.link/4C7SjWMM8hb
