ru
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Открыть в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Больше
6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 день
Архив постов
राजीव गांधी यांच्या नावाने राज्य सरकारचा पुरस्कार LetsUpp l Trending 🏅 केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारातील राजीव गांधी यांचे नाव वगळल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने माहिती – तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. 💫 भारताच्या विकासात तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करण्यावर राजीव गांधी यांनी भर दिला होता. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम व समाजाच्या सर्वागीण विकासासाठी योगदान देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. 📍 ‘महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळ’ (महाआयटी) या पुरस्कारासाठी संस्था प्रस्तावित करेल. या वर्षी राजीव गांधी यांच्या जयंतीला म्हणजे २० ऑगस्टला पुरस्काराची घोषणा केली जाईल. तर पुरस्कार ३१ ऑक्टोबरपूर्वी प्रदान केला जाईल. पुढील वर्षीपासून दरवर्षी २० ऑगस्टला पुरस्कार प्रदान केला जाईल. 📌 माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत राजीव गांधी जयंती ही माहिती तंत्रज्ञान दिन म्हणून साजरी केली जात होती. यापुढे त्यांच्या नावे पुरस्कार दिला जाणार आहे. To know more click here https://letsup.app.link/6q5O1NyMCib

'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या Letsupp | Bulletin ● सीईटी रद्द केल्याने दहावीच्या गुणवंतांवर अन्याय;उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली मतं; राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची प्रतिक्षा; शिक्षण विभागाच्या निर्णयाकडे लक्ष ● मागासवर्ग निश्चितीबाबत विधेयक लोकसभेत मंजूर; दुरुस्तीमुळे मराठा समाजाला राज्याच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास यादीत समाविष्ट करण्याचा मार्ग सुकर मात्र, ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिलीकरणास बगल दिल्याची विरोधकांची टीका! --------------------- लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ९६२३१७४५५६ ---------------------- ● ● मुंबई लोकल सर्वसामान्यांना नियम आणि अटी घालून 15 ऑगस्टपासून सुरु होणार; आज 11 ऑगस्टपासून रेल्वे स्टेशनवर क्यूआर कोड सुविधा उपलब्ध, रेल्वे स्थानकांवर कोव्हिड लसीकरण ऑफलाईन पडताळणी करुन मासिक पास देण्याची प्रक्रिया सुरु होणार ● राजकीय पक्षांनी निवडणुकीतील उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर 48 तासांत संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती जाहीर करावी; सर्वोच्च न्यायालयाचे राजकीय पक्षांना आदेश! ● मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुकर करण्याची मोठी संधी केंद्र सरकारकडे होती. परंतु, केंद्राने ही संधी गमावली - सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण ● केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारातील राजीव गांधी यांचे नाव वगळल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा माहिती – तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय ● काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जम्मू-काश्मीरमधील खीर भवानी मंदिराला तसेच हजरतबाल या मुस्लिमांच्या धार्मिक स्थळास भेट; गांधी यांचे दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर भेटीसाठी सोमवारी आगमन ● राज्यात पावसाला पोषक हवामान तयार; आज विदर्भात सर्वत्र हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता ● राज्यातील तासिका तत्वावर कारम करणाऱ्या प्राध्यापकांना दिलासा मिळणार; नवीन पर्यायी धोरणासाठी समिती गठीत ही समिती राज्य सरकारला दोन महिन्यात अहवाल सादर करणार ● पत्रकारितेच्या शिक्षण क्षेत्रात राज्यभरात नाव असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराचा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता; या वादात आता युवा सेनेनं उडी घेतली असून, रानडे इन्स्टिट्यूटच्या मुद्द्यावरुन त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. To know more click here https://letsup.app.link/C3xCcEwFCib