LetsUpp Marathi
Открыть в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Больше6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 день
Архив постов
6 624
एमपीएससी परीक्षेच्या तारखा जाहीर! असे आहे वेळापत्रक पहा...
LetsUpp | Trending
● महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्षाच्या परीक्षेसाठी अंदाजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. एमपीएससीची २०२१ साठी राज्यसेवा परीक्षा २ जानेवारी २०२२ ला होणार आहे. तसेच २०२२ ची राज्यसेवा परीक्षा जून आणि ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे.
● महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २०२१ वर्षाची राज्यसेवा पूर्व परीक्षा २ जानेवारी, २०२२ रोजी आणि मुख्य परीक्षा ७, ८ आणि ९ मे, २०२२ रोजी असेल. परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर आहे.
● महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक खालील प्रमाणे असेल :
- राज्यसेवा परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा : दिनांक २ जानेवारी २०२२
मुख्य परीक्षा : ०७, ०८ आणि ०९ मे २०२२
- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा : १२ मार्च २०२२
मुख्य परीक्षा : ०२ जुलै २०२२
- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा : २६ फेब्रुवारी २०२२
मुख्य परीक्षा : ०९ जुलै ते ३१ जुलै २०२२
- महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा : ०३ एप्रिल २०२२
मुख्य परीक्षा : ०६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२२
- महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा : ३० एप्रिल २०२२
मुख्य परीक्षा : २४ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान
- पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा : १६ एप्रिल २०२२
मुख्य परीक्षा : ३ जुलै २०२२
- राज्यसेवा परीक्षा २०२२
पूर्व परीक्षा : १९ जून २०२२
मुख्य परीक्षा : १५,१६ व १७ ऑक्टोबर २०२२
- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२
पूर्व परीक्षा : ०८ ऑक्टोबर २०२२
मुख्य परीक्षा : २४ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३
- महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२
पूर्व परीक्षा : ५ नोव्हेंबर २०२२
मुख्य परीक्षा : ४ फेब्रुवारी २०२३ ते ११ मार्च २०२३ दरम्यान
- महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२
पूर्व परीक्षा : २६ नोव्हेंबर
मुख्य परीक्षा : १८ मार्च ते २३ एप्रिल २०२३ दरम्यान होणार
- सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२२
पूर्व परीक्षा : १० डिसेंबर २०२२
मुख्य परीक्षा : ३० एप्रिल २०२३
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/GweUZGB5Hlb
6 624
*एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात रिझर्व्ह बँकेने केला मोठा बदल!*
* LetsUpp | Trending*
● एटीएममधून पैसे काढताना मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या शुल्काशी संबंधित नियमात रिझर्व्ह बँकेने बदल केला आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढणे येत्या जानेवारीपासून किंचितसे महाग होणार आहे.
● रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकांच्या इंटरचेंज शुल्कात वाढ झाली आहे.
तसेच सामान्य खर्चही वाढला आहे, याची भरपाई करण्यासाठी बँका एटीएम व्यवहारावर आकारत असलेले
शुल्क वाढवून २१ रुपये करणार आहे. ही वाढ १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल. सध्या हे शुल्क २० रुपये आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, एटीएम स्थापनेचा खर्च वाढला आहे. तसेच एटीएमच्या देखभाल खर्चातही वाढ
झाली आहे. त्यामुळे या शुल्कात वाढ करण्यात आली आहे.
● सूत्रांनी सांगितले की, जून २०१९ मध्ये रिझर्व्ह बँकेने एटीएम शुल्काच्या आढाव्यासाठी एक समिती स्थापन
केली होती. इंडियन बँक्स असोसिएशनचे चेअरमन या समितीचे अध्यक्ष होते. या समितीच्या शिफारशींनुसार रिझर्व्ह बँकेने बँकाना एटीएमच्या शुल्कामध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. तो खर्च ग्राहकांना पडेल.
● रिझर्व्ह बँकेने अलीकडेच बँकांच्या इंटरचेंज शुल्कात वाढ केली होती. वित्तीय व्यवहारांचे इंटरचेंज शुल्क
१५ रुपयावरून १७ रुपये, तर बिगर-वित्तीय व्यवहाराचे इंटरचेंज शुल्क ५ रुपयावरून ६रुपये करण्यात आले आहे. १ ऑगस्ट २०२१ रोजी हे नवे दर लागू झाले.
● बँक ग्राहकाचे ज्या बँकेत खाते आहे, त्याच बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला पाच वित्तीय व बिगर-वित्तीय व्यवहार मोफत करता येतात. त्याचवेळी इतर बँकांच्या एटीएमधून मेट्रो शहरात तीनवेळा आणि बिगर-मेट्रो शहरात पाचवेळा मोफत पैसे काढता येतात. त्यावरच्या व्यवहारांसाठी बँका शुल्क आकारू शकतात.
त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आता अधिक झळ बसणार आहे.
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/1FqG6MBQHlb
6 624
सावध व्हा! कोरोनाचा नवा व्हेरीएंट ओमायक्रॉनचा भारतात शिरकाव...
LetsUpp | Breaking
● जगभरात कोरोनाबाबत नव्याने धास्ती निर्माण करणारा ओमायक्रॉन व्हेरिएंट अद्याप भारतापासून दूर असल्यामुळे देशातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, भारतीयांची ही निश्चिंतता अल्पजीवी ठरली आहे.
● कारण भारतात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
● पत्रकार परिषदेत बोलताना लव अग्रवाल यांनी कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याचं सांगितलं असून आत्तापर्यंत एकूण 29 देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याचं देखील सांगितलं. त्यामुळे ओमायक्रॉन आता हळूहळू हातपाय पसरायला लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/L6qdlYoTElb
6 624
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले ‘1 ओटीटी’चे अनावरण
अभिनेता स्वप्नील जोशी आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्यातील संयुक्त प्रकल्प असलेल्या ‘1 ओटीटी’ या ‘अपने भारत का अपना मोबाईल टीव्ही’चा शुभारंभ करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ‘1 ओटीटी’ या नवीन ओटीटीच्या लोगोचे अनावरण राज भवन येथे अत्यंत दिमाखदार अशा समारंभात करण्यात आले. ‘1 ओटीटी’ (ओव्हर द टोप) हे व्यासपीठ हे सर्व भारतीय भाषांमधील कार्यक्रमांसाठी तयार झाले असून त्याद्वारे तो ‘अपने भारत का अपना मोबाइल टीव्ही’ असणार आहे. हिंदीबरोबरच मराठी, बंगाली आणि इतर भारतीय भाषांमधील कार्यक्रम सादर करत हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने ‘अपने भारत का अपना मोबाईल टीव्ही’ ठरणार आहे.
6 624
बहुभाषिक ओटीटी प्लॅटफॉर्म ‘1 ओटीटी’चा लोगो सादर
आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रख्यात उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्त्व नरेंद्र फिरोदिया यांचा संयुक्त प्रकल्प असलेले ‘1 ओटीटी’ (ओव्हर द टोप) हे व्यासपीठ आता आपल्या भेटीला आले आहे.
6 624
वैद्यकीय शिक्षण विभागात भरतीबाबत मोठी बातमी!
LetsUpp | Trending
⚡ वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागामार्फत दीड हजार पदांची भरती करण्यात येणार आहे.
💁♂️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग पदांसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
💫 राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागामार्फतची ही मोठी पद भरती आहे. आतापर्यंत या विभागामार्फत एकूण 1 हजार 584 वर्ग ‘अ’ आणि ‘ब’ पदांसाठीचे मागणीपत्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आले आहे.
👍 यापैकी 1 हजार 269 पदे वैद्यकीय शिक्षण कक्षाची आहेत. या पदांपैकी बहुतांश पदांसाठी आयोगामार्फत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
🗣️ भरतीची प्रक्रिया सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले. वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील रिक्त पदे सध्या 50 टक्क्यांपर्यंत भरण्याची मंजुरी मिळालेली आहे.
🏥 तर वर्ग 4 मधील पदे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणार्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना कंत्राटी पद्धतीने भरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
📍 वर्ग 4 बाबत मंजूर पदांपैकी 50 टक्के पदे भरण्याची परवानगी राज्य शासनाची असल्याने भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी, असे निर्देश देशमुख यांनी दिले आहेत.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/rxSQCTlUClb
6 624
बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय?
https://youtu.be/b-FsB1gNWJY
गेल्या काही दिवसापासून सातत्याने क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन वैगरे ऐकत असाल पण तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल कि क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन आहे तरी काय ? हेच समजून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. तेही अगदी सोप्या शब्दात म्हणजे 'बातमी सोप्या शब्दात'...
