ru
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Открыть в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Больше
6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 день
Архив постов
*टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!* LetsUpp | Bulletin ● राज्यांच्या कारभारात लुडबुड नको ! केंद्राच्या दडपशाहीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आव्हान; हिंदूत्व धोक्यात आहे ते परक्यांपासून नाही तर ह्या नवहिंदूंपासून, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली ● देशात उपचाराधीन रुग्णांत सातत्याने घट; देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४० लाख ३७ हजार ५९२ जणांना कोरोनाची लागण तर २ लाख ०३ हजार ६७८ रुग्णसंख्या गुरुवारी नोंदली गेली ● पैशांचा पाऊस पडण्याचे आमिष दाखवून ४ महिलांवर बलात्कार ; विरार मधल्या भोंदू बाबाचा अघोरी प्रकार; फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर या चारही पीडित महिलांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली ● अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आहाराकरिता रोख रक्कम; शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा साडेतीन तर जिल्हा व तालुकास्तरावरील विद्यार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ● आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये १८४ कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न उघडीस; ७ ऑक्टोबरपासून पुणे, बारामती, मुंबई, गोवा, जयपूरमध्ये आयकर विभागाची शोध मोहिम हाती ● शाळा परिसरात मद्यपरवाना देण्याविरोधातील याचिका फेटाळली; आदिवासी परिसरातील मुलांसाठी शाळा आणि वसतिगृह चालवणारे देवेंद्र मुंढे यांच्यासह तिघांनी ही याचिका केली होती ● गावागावांत संविधान सभागृहे, ग्रंथालय, अभ्यासिका ; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती ● नवज्योत सिंग सिद्धूंनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला; नवज्योत सिंग सिद्धूच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहणार आहेत ● रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविडकडे टीम इंडियाचं मुख्य प्रशिक्षकपद; BCCIकडून दुजोरा; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे ● चेन्नईचा विजयी चौकार ! फॅफ डय़ूप्लेसिस-शार्दूल यांच्यामुळे कोलकातावर २७ धावांनी मात; महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईचे हे चौथे ‘T20 लीग’ जेतेपद ठरले *अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा* https://letsup.app.link/UfpSzCycokb

टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ● दसऱ्याच्या मुहूर्तावर 'गिफ्ट', पदोन्नतीसंदर्भात मोठा निर्णय, तब्बल 45 हजार पोलिसांना होणार थेट फायदा ● लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या सरसंघचालकाकडून केंद्राला सूचना ● नगरमधील भुईकोट शिवपट्टण किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा , रोहित पवारांची संकल्पना ● बीड येथील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडणार; या दसऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष! ● ठिकठिकाणी भगवे झेंडे आणि बॅनर लावत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी ● औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गावर 17 स्थानके निश्चित, सर्वेक्षणासाठी 18 कोटींचा निधी लागणार ● जेईई ॲडवान्स परीक्षेचा निकाल जाहीर, मृदूल अग्रवाल देशात पहिला, मुलींमधून काव्या चोप्राची बाजी ● संभाजी भिडेंचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान ● आता 18 वर्षाच्या आतील मुलांनाही रेल्वे प्रवासाची मुभा, रेल्वे प्रशासनाचा निर्णय ● दिल्ली जवळ संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य टेंटजवळ पोलिस बॅरिकेटला मृतदेह बांधलेला आढळल्याने एकच खळबळ अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/9XAzhUX0mkb

टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या! LetsUpp | Bulletin ● नाशिकमध्ये कोथिंबिरच्या जुडीला मिळाला २०० रुपयांचा विक्रमी भाव; संबंधित शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले ● शिर्डी : साईबाबा संस्थानच्यावतीने पुण्यतिथी उत्सव प्रतीकात्मक स्वरूपात; आज दि.१४ ते १७ ऑक्टोबर दरम्यान हा उत्सव साजरा करण्यात येणार ● माजी पंतप्रधान मनमोहन सिंग प्रकृती बिघडल्याने एम्स रुग्णालयात दाखल; सध्या ते डाॅ. नितीश नायक यांच्या देखरेखाली आहेत ---------------------- लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : 7798655655 ----------------------- ● नागरी भागातील नैसर्गिक नद्या-नाले निचरा प्रणाली पुनर्स्थापित केली जाणार; कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या पूर नियंत्रणासाठी उपाय योजना राबविण्याबाबत नेमलेल्या कृष्णा खोरे पूर अभ्यास समितीची शिफारस ● वैफल्यातून केंद्रीय यंत्रणांचा वापर; शरद पवार यांचा भाजपवर आरोप; अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी गेले सहा दिवस छापे टाकले जात आहेत ● अर्धवातानुकूलित लोकल प्रकल्पाला तूर्तास स्थगिती; मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रस्तावित २३८ लोकल संपूर्ण वातानुकूलित ● आर्यन हा तस्करीच्या कटाचा भाग असल्याचा ‘एनसीबी’चा आरोप; विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली ● आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: साक्षीदार किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांची लूकआऊट नोटीस; क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणात गोसावी साक्षीदार आहे ● आशीष मिश्राचा जामीन अर्ज फेटाळला; लखीमपूर हिंसाचारप्रकरणी आणखी दोघांना अटक; विशेष तपास पथकाने १२ तासांच्या चौकशीनंतर ९ ऑक्टोबरला आशीष मिश्राला अटक केली होती ● कोविड काळात वाढले टीबी-एड्सचे रुग्ण; देशात २० टक्के टीबीच्या तर १० टक्के एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूंमध्ये वाढ अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/6PiPju8Rkkb

टॉप 10 हेडलाईन्स ! सकाळच्या महत्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ● पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात आठवीत शिकणाऱ्या एका कबड्डीपटूची हत्या करण्यात आली; प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती ● मुलांचे लसीकरण लवकरच ; २ ते १८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लस वापराची शिफारस तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांकडे केली ● देशांतर्गत विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास हवाई वाहतूक कंपन्यांना १८ ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात आली; केंद्र सरकारचा निर्णय ● भिवंडीत तीन गोदामांतून 'हुक्का' फ्लेवरचा 9 कोटी रुपयांचा साठा जप्त; ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू ● पीएम केअर फंडसाठी राजमुद्रा, तिरंगा आणि पंतप्रधानांचा फोटो कशासाठी?, हायकोर्टात याचिका; आपत्कालीन परिस्थितीसाठी 'पीएम केअर फंड चॅरिटेबल ट्रस्ट'ची स्थापना ● राज्यात मंगळवारी 2, 069 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर 97.36 टक्के; राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के ● काही समाजकंटकांकडून दहिसरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील वारकरी शिल्पाची तोडफोड; तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली ● अवैध इंधन, बनावट बायोडिझेल विक्री रोखण्यासाठी तातडीने कारवाई करा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचे निर्देश ● ठाण्यात सिरो सर्व्हेला सुरुवात, अँटिबॉडीचे प्रमाण तपासले जाणार, सहकार्य करण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के यांचे आवाहन ● राज्यावरील वीज संकटासाठी ठाकरे सरकार जबाबदार : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतात आयात करण्यात येणाऱ्या कोळशाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/d05DCY3djkb

टॉप 10 हेडलाईन्स; दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ● राज्यभरातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे देखील पुन्हा सुरू होणार; कार्यपद्धती व नियमांचा अध्यादेश शासनाकडून जारी; मात्र प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यास परवानगी नाही ● राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन; राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती ● राज्याला मान्सूनचा शेवटचा तडाखा बसणार; येत्या २४ तासात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघ गर्जनेसह पाऊस तसेच शनिवारी विदर्भात पावसाची शक्यता ● पुणे हादरलं! बिबवेवाडीत एकतर्फी प्रेमातून आठवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलीचा खून; घटनेमुळे परिसरात एकच खळबळ ● एकनाथ खडसेंना मोठा झटका! पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी पत्नी मंदाकिनी खडसे यांचा जामीन अर्ज फेटाळला, अटकेची शक्यता ● राज्यात खुल्या आणि बंदिस्त जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी; त्यामुळे यंदा दिवाळी पहाट आणि पाडवा पहाटसारखे कार्यक्रम घेता येणार ● क्रूझवरील छापेमारीमुळे चर्चेत आलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप; एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची भेट घेत दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची केली तक्रार ● सात दिवसांच्या दरवाढीनंतर अखेर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला आज लगाम बसला; आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नाही त्यामुळे सर्वसामान्यांना किमान आजपुरता दिलासा मिळाला आहे ● पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली; पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात; निर्बंधांमुळं यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांचा झाला होता हिरमोड ● भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावरील १२ एकर परिसरात होणार; गड परिसरातील डागडूजी आणि इतर कामांना वेग; कोरोना नियमांचे पालन करत हा मेळावा पार पडणार असल्याची भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांची माहिती अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/44EQ72Yvikb

टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या! LetsUpp l Bulletin ● मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, Covaxin च्या आपातकालीन वापराची DCGI कडे शिफारस ● राज्यात कोळसा टंचाई; विद्युत उपकरणांचा कमीत-कमी वापर करावा; ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे आवाहन ● मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन; १८ महिन्यांत पूर्ण होणार काम ● चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्यासंदर्भात कार्यपद्धती आणि नियमांचा अध्यादेश जारी! ● शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचं आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा; बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन ● 'आजही मीच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं', देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'मन की बात' ● तुम्ही मुख्यमंत्री नाही हे मनातून काढून टाका; नवाब मलिकांची फडणवीसांवर मिश्किल टिप्पणी ● 'ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं'; भाजप नेत्या पंकजा मुंडे ● आर्यन खानला जामीन मिळवून देण्यात सतीश मानेशिंदे अपयशी, शाहरुखनं आता वकीलच बदलला! ● “अमित शाह यांनी जम्मू -काश्मीरमध्ये नवं युग आणलं;” न्यायमूर्ती अरुण मिश्रा अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/42FOpNAhikb

*टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या!* * LetsUpp | Bulletin * ● गृहमंत्र्यांनी तशा कोणत्याही सूचना कुणाला दिल्या नसल्याचं सांगत'मुंबई पोलीस पाळत ठेवत असल्याच्या समीर वानखेडेंच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण ● कालच्या महाराष्ट्र बंदसह नेक मुद्द्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केली नाराजी ● महिन्याचा पगार वेळेवर न झाल्यामुळे बस चालकाची आत्महत्या; बीड आगारातील धक्कादायक प्रकार! ● आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी केंद्र सरकार 6 कोटी नोकरदारांच्या खात्यात पीएफच्या व्याजाचे पैसे जमा करणार ● काश्मीरमध्ये नायब राज्यपालांच्या माजी सल्लागाराच्या घरी सीबीआयचे छापे; बनावट शस्त्र परवान्याचे रॅकेट चालवल्याचा आरोप ● राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या (NHRC) २८ व्या स्थापना दिवसाच्या कार्क्रमात मानवी हक्कांच्या नावाखाली देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम काही लोक करतायत; पंतप्रधान मोदींचा घणाघात ● देशात गेल्या काही दिवसांपासून कोळशाच्या संभाव्य टंचाईची मोठी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे कोळशाचा पुरवठा राज्य स्तरावर होत नसल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे केंद्रीय पातळीवरून मंत्र्यांकडून कोळसा टंचाई नसल्याचे स्पष्ट ● भारतीय सैन्याने घेतला बदला; जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान, शस्त्रसाठा जप्त ● जम्मू -काश्मीरमधील दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा सक्रिय; द रेझिस्टन्स फोर्स आणि पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या भूमिगत कार्यकर्त्यांच्या 18 ठिकाणी छापे ● चीनमधील सायनोवॅक आणि सायनोफार्म या लसी घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी WHOचा महत्त्वाचा सल्ला; या नागरिकांना कोरोना लसीचा तिसरा डोस घ्यावा लागणार आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/ow3xqXF0hkb