ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Открыть в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Больше
6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
👉 जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2017 Let's Up Political Update 👉 पुणे (75) - शिवसेना (13) - भाजपा (6) - काँग्रेस (7) - राष्ट्रवादी (41) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (3) 👉 अहमदनगर (72) - शिवसेना (7) - भाजपा (13) - काँग्रेस (20) - राष्ट्रवादी (17) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (3) 👉 औरंगाबाद (62) - शिवसेना (19) - भाजपा (23) - काँग्रेस (16) - राष्ट्रवादी (2) - मनसे (1) - इतर पक्ष / आघाडी (1) 👉 जालना (56) - शिवसेना (14) - भाजपा (22) - काँग्रेस (5) - राष्ट्रवादी (13) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (2) (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 परभणी (54) - शिवसेना (13) - भाजपा (3) - काँग्रेस (5) - राष्ट्रवादी (24) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (6) 👉 बीड(60) - शिवसेना (4) - भाजपा (19) - काँग्रेस (3) - राष्ट्रवादी (25) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (9) 👉 हिंगोली (52) - शिवसेना (15) - भाजपा (10) - काँग्रेस (12) - राष्ट्रवादी (12) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (3) 👉 नांदेड (63) - शिवसेना (10) - भाजपा (13) - काँग्रेस (28) - राष्ट्रवादी (10) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (2) 👉 उस्मानाबाद (55) - शिवसेना (11) - भाजपा (4) - काँग्रेस (13) - राष्ट्रवादी (26) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (1) 👉 लातूर (58) - शिवसेना (1) - भाजपा (36) - काँग्रेस (15) - राष्ट्रवादी (5) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (1) 👉 जळगांव (67) - शिवसेना (14) - भाजपा (33) - काँग्रेस (4) - राष्ट्रवादी (16) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (0) 👉 नाशिक (73) - शिवसेना (25) - भाजपा (15) - काँग्रेस (7) - राष्ट्रवादी (19) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (7) 👉 कोल्हापूर (67) - शिवसेना (8) - भाजपा (6) - काँग्रेस (8) - राष्ट्रवादी (8) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (9) 👉 सांगली (60) - शिवसेना (3) - भाजपा (25) - काँग्रेस (10) - राष्ट्रवादी (14) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (8) 👉 सातारा (64) - शिवसेना (0) - भाजपा (3) - काँग्रेस (4) - राष्ट्रवादी (34) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (6) 👉 रत्नागिरी (55) - शिवसेना (39) - भाजपा (0) - काँग्रेस (1) - राष्ट्रवादी (15) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (0) 👉 सिंधुदूर्ग (50) - शिवसेना (16) - भाजपा (6) - काँग्रेस (27) - राष्ट्रवादी (1) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (0) 👉 रायगड (59) - शिवसेना (16) - भाजपा (3) - काँग्रेस (3) - राष्ट्रवादी (12) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (20) 👉 अमरावती (59) - शिवसेना (2) - भाजपा (14) - काँग्रेस (27) - राष्ट्रवादी (5) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (11) 👉 बुलडाणा (60) - शिवसेना (10) - भाजपा (24) - काँग्रेस (13) - राष्ट्रवादी (8) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (5) 👉 यवतमाळ (61) - शिवसेना (20) - भाजपा (16) - काँग्रेस (13) - राष्ट्रवादी (11) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (1) 👉 वर्धा (52) - शिवसेना (2) - भाजपा (31) - काँग्रेस (13) - राष्ट्रवादी (2) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (4) 👉 चंद्रपूर (56) - शिवसेना (0) - भाजपा (33) - काँग्रेस (20) - राष्ट्रवादी (0) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (3) 👉 गडचिरोली (51) - शिवसेना (0) - भाजपा (20) - काँग्रेस (15) - राष्ट्रवादी (5) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (11) 👉 सोलापूर(68) - शिवसेना (1) - भाजपा (15) - काँग्रेस (6) - राष्ट्रवादी (23) - मनसे (0) - इतर पक्ष / आघाडी (23) (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

व्यवसाय आणि सोशल मीडिया Let's Up Useful Info सोशल मीडियाने डिजीटल मार्केटिंगचा फंडा बदलून गेलेला आपल्याला दिसून येतो. सोशल मीडियामुळे मार्केट अगदी आपल्या हातात आलेले असले तरीही आजकालची टेक्नोसॅव्ही मंडळी या गोष्टीचा वापर करत नाहीत. त्यामुळे या माध्यमाचा उपयोग सेल्फी पोस्ट करण्यापलीकडे देखील इतर कामांसाठी केला जाऊ शकतो. फक्त तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे... 👉 सोशल मीडियाचा वापर अनोळखी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केला जाऊ शकतो. या अनोळखी व्यक्तींचा मार्केटिंगच्या दृष्टीने उपयोग करून घ्यायला शिकलं पाहिजे. एकाच गोष्टीचे वेगवेगळे उपयोग शिकून घेण्याने फायदा होतो. 👉 सोशल मीडियाचा उपयोग व्यावसायिक फायद्यासाठी करून घ्यायला शिका. तुमच्या व्यवसायासंदर्भात सतत पोस्ट करत राहा. असे केल्याने प्रसिद्धी मिळविण्यास सोपे जाईल. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 नवीन ट्रेंड हे सोशल मीडिया वरूनच माहिती होतात. त्यामुळे बाहेरच्या जगात कशाची चलती आहे, त्याबद्दल सतत पोस्ट करत राहा. चालू ट्रेंडचा उपयोग तुमच्या फायद्यासाठी करून घ्यायला शिका. 👉 सोशल मीडियावर जास्त वापर कोणत्या गोष्टींचा केला जातो, याकडे बारीक लक्ष ठेवा. याचा फायदा तुमच्या बिझनेससाठी होऊ शकतो. हॅशटॅग, टॅग, शेअर यांसारख्या गोष्टीचा वापर देखील कामासाठी केला जाऊ शकतो. 👉 तुमच्या कामाबद्दल इतरांना माहिती देत राहा. व्हॉटसअ‍ॅप असो किंवा फेसबूक, तुमचे अपडेट मधून तुम्ही तुमच्या कामाबद्दल बोला. 👉 व्यवसायासाठी सोशल मीडिया वापरत असाल तर फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, पिंटरेस्ट यासारख्या साईटसवर सतत अ‍ॅक्‍टिव राहा. स्वत:ला अपडेटेड ठेवा. जर शक्‍य असेल, तर सर्व सोशल मीडिया साईटसद्वारे लोकांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न करा. 👉 तुमच्या ग्राहकांच्या कमेंटसला नेहमी उत्तर द्या. संवाद साधणे तुम्हाला नेहमी ग्राहकांशी कनेक्‍टेड ठेवते. याने तुमचे ग्राहकही वाढतील. सोशल मीडियाद्वारे तुम्ही तुमच्या प्रॉडक्‍ट बद्दल प्रतिक्रिया मागवून घेऊ शकता. 👉 तुम्ही जर नियमित अ‍ॅक्टिव्ह राहिला नाहीत, तर तुमची ओळख संपुष्टात येईल. स्पर्धेच्या युगात नियमितता महत्वाची ठरते त्यामुळे सतत काहीतरी पोस्ट करत राहा. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 इंटरनॅशनल फंड Let's Up Finance Katta देशाबाहेर गुंतवणूक करण्यासाठी जे गुंतवणूकदार उत्सुक आहेत ते इंटरनॅशनल फंडांत गुंतवणूक करू शकतात. या फंडांच्या माध्यमातून कोणत्याही देशातील किंवा प्रदेशातील इक्विटींमध्ये तसेच निश्चित उत्पन्नाच्या रोख्यांतून गुंतवणूक करता येते... इंटरनॅशन फंडांचे प्रकार : देशनिहाय, प्रदेशनिहाय व थिमॅटिक असे इंटरनॅशनल फंड उपलब्ध असतात. अमेरिका, ब्राझील व युरोपमध्ये गुंतवणूक करणारे काही फंड आहेत. याशिवाय कन्झम्पशन, ऊर्जा व रिअल इस्टेट अशा विशिष्ट क्षेत्रांत गुंतवणूक करणारे फंडही असतात. इंटरनॅशनल फंडाचे फायदे : असे अनेक स्टॉक्स किंवा व्यवसाय आहेत जे भारतात नोंदवले गेलेले नाहीत. अशा कंपन्यांतून गुंतवणूक करायची इच्छा असेल तर ती इंटरनॅशनल फंडांच्या माध्यमातून करता येते. भारतीय भांडवल बाजार योग्य परतावा देत नसतील तर अशावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणूक चांगला परतावा देण्याची शक्यता असते. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 सीकेवायसी म्हणजे काय? सेंट्रल केवायसी रजिस्ट्री किंवा सीकेवायसीआर या प्रक्रियेमुळे वेगवेगळ्या आर्थिक व्यवहारांसाठी अनेक केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यापासून गुंतवणूकदारांची सुटका होणार आहे. बँकेत खाते उघडणे, आयुर्विमा पॉलिसी घेणे व म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणे आदींसाठी वेगवेगळी केवायसी प्रक्रिया सध्या पूर्ण करावी लागते. त्याऐवजी आता एकच सीकेवायसी असेल. याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सरकारने सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन अँड अॅसेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडिया या संस्थेकडे दिली आहे. 👉 सीकेवायसी कशासाठी पूर्ण केली जाते गुंतवणूकदारांना एकाच केवायसी मंचावर आणण्यासाठी सीकेवायसी पूर्ण केली जाते. यापूर्वी अनेक आर्थिक योजनांसाठी वेगवेगळ्या केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. आता सर्व माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार आहे. त्यामुळे डुप्लिकेट माहिती टाळता येईल. यामुळे संबंधित वित्तसंस्थेला तिचा ग्राहक केवायसी पूर्तता केलेला आहे काय हे शोधणेही सोपे जाणार आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 यंदा बारावीचा निकाल उशीरा... Let's Up Current Affair येत्या 28 फेब्रुवारीपासून 12 वी बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. मात्र परीक्षा सुरु होण्याआधीच निकाल उशीरा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्यातल्या 72 हजार शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीबाबत असहकार आंदोलन पुकारले आहे. 3 मार्चपासून एक शिक्षक 12 वीचा केवळ एकच पेपर तपासणार असल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने घेतली आहे. कायम विनाअनुदानित कॉलेजांचा प्रश्न आणि 2012-13 पासून रुजू झालेल्या शिक्षकांच्या मान्यतेचा प्रश्न प्रलंबित आहे. गेल्यावर्षी शिक्षणमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या. पण अद्याप त्याबाबत अंमलबजावणी झाली नसल्याने शिक्षकांनी आंदोनाची भूमिका घेतली आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 अमेरिकेतील 3 लाख भारतीयांना फटका! अमेरिकेचे अधिकृत नागरिकत्व न घेतलेल्या तब्बल 1.1 कोटी स्थलांतरितांना देशाबाहेर धाडण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या (डिपोर्टेशन) योजनेचा या देशात सध्या राहत असलेल्या किमान 3 लाख भारतीयांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रास याचा प्रामुख्याने फटका बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या योजनेस कोणाचाही अपवाद केला जाणार नसल्याचा इशारा येथील देशांतर्गत सुरक्षा (होमलॅंड) मंत्रालयाने दिला आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांस स्थलांतरितांसंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याचा संशय असलेल्या कोणत्याही नागरिकास अटक करण्याचा अधिकार असेल, असे यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या स्थलांतरितांना या योजनेंतर्गत विशेष लक्ष्य केले जाणार असले; तरी तांत्रिकदृष्टया बेकायदेशीर असलेल्या इतर स्थलांतरितांवर कारवाई केले जाण्याची शक्यता आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - एक हजार रुपयांची नवी नोट आणण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी ट्विट करून दिले 👉 नवी दिल्ली - एका रिसर्च एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणानुसार 2017 मध्ये विविध क्षेत्रातील नोकरदारांना मिळणाऱ्या पगारात 9.5 टक्क्यांची वाढ होऊ शकते 👉 नवी दिल्ली - जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या राड्यात 8 पोलीस जखमी झाल्याची दिल्ली पोलिसांची माहिती (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 पृथ्वीसारखेच सात ग्रह सूर्याभोवती फिरत असल्याचा शोध नासाने लावला असून विशेष म्हणजे या ग्रहांवर पाणी व जीवसृष्टीही असण्याची दाट शक्यता वर्तवली 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - मुंबई महापालिकेसह 10 महापालिकांवर वर्चस्व कोणाचे आणि 25 जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा कौल कोणाकडे याचा फैसला आज होणार 👉 मुंबई - शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली, त्यामुळे पुन्हा एकत्र यायचं असेल तर शिवसेनेनं हात पुढे करावा - रावसाहेब दानवे 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 नॅककडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ए-प्लसचा दर्जा, 4.00 पैकी 3.60 गुण मिळवून पुणे विद्यापीठ राज्यात प्रथम 👉 मुंबई - 2013 साली मुलुंडमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी 9 जण दोषी, सत्र न्यायालयाचा निकाल 👉 मुंबई - 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी महाराष्ट्र सरकारने खेळाडू आणि त्यांच्या सुविधांसाठी 3 कोटी रुपये मंजूर केले 👉 नाशिक - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदार यद्यांमधील गोंधळाची निवडणूक आयोगाकडून दखल, सोमवारी होणार राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक 👉 सांगली - येथील राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्यावतीने दरवर्षी दिला जाणाऱ्या 'जनसेवा पुरस्कार' यंदा महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांना जाहीर 🎯 खेळ घडामोडी : 👉 पुणे - 12 वर्षांपासून भारतात विजयाच्या प्रतिक्षेत असलेला आॅस्ट्रेलिया व यजमान भारत यांच्यात आजपासून 4 कसोटी सामन्यांची मालिका होणार सुरु 👉 नवी दिल्ली - सोफियात सुरू असलेल्या 68 व्या आमंत्रित बॉक्सिंग स्पर्धेत भारतीयांना सुरुवातीला संमिश्र यश, एक बॉक्सर विजयी तर दोन जण पराभूत 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - दीपिका पदुकोणचा पहिला हॉलीवूडपट ‘ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ जेंडर केज’ जागतिक स्तरावर हिट ठरला, 31 कोटी डॉलर्सची केली कमाई 👉 पुणे - 56 व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे उद्घाटन (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - 1000 ची नवी नोट आणण्याची कोणतीही योजना नसून 500 च्या नव्या नोटांची छपाई आणि पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत : केंद्रीय अर्थसचिव शक्तीकांता दास 👉 नवी दिल्ली- सौरऊर्जेची क्षमता 20 हजार मेगावॅटवरून 40 हजार मेगावॅट करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी 👉 चेन्नई विमानतळावर बुटात, मोबाइल बॉक्समध्ये लपवलेली विदेशी चलनातली 60 लाखांची रोकड जप्त 👉 विजयवाडा - तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तिरुपती मंदिरात 5 कोटी सोन्याचे दागिने केले दान 👉 केरळ - कोझिकोडेत एस एम स्ट्रीटवर लागलेल्या आगीत, 15 हून अधिक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, अग्निशमन दलाच्या 10 बंबांचा आग विझवण्याचा प्रयत्न 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 इस्लामाबाद - मुंबई 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदविरोधातील पाकिस्तानने केली आणखी कठोर कारवाई, नजरकैदेनंतर हाफीज सईदचा शस्त्रपरवानाही पाकिस्तानकडून रद्द (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 राजकीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - आमच्या कुटुंबीयांत जर वाद झाला नसता तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये आघाडीच झाली नसती : मुख्यमंत्री अखिलेश यादव 👉 मुंबई - मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर पालिका या 6 ठिकाणी भाजपला बहुमत मिळेल. इतर ठिकाणी आमच्या शिवाय सत्ता येणार नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा दावा 👉 पुणे - पुण्यात भाजपची एकहाती सत्ता आली नाही, तर सक्रिय राजकारणातून निवृत्त होईन, भाजप खासदार संजय काकडेंची वाडेश्वर कट्ट्यावर घोषणा 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - गोवा सरकार जर बलात्कार पीडित महिलांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई देते, तर महाराष्ट्रात केवळ 3 लाख का?, हायकोर्टाने विचारला प्रश्न 👉 मुंबई - इमारती पाडण्याचे आदेश देऊनही आंदोलन का? दिघावासियांना उच्च न्यायालयाने फटकारले, स्थानिक राजकारण्यांची यादी मागवली 👉 औरंगाबाद - रेल्वे स्टेशनवर आढळला अज्ञाताचा (वय 50 वर्ष) मृतदेह, हत्या झाल्याची प्राथमिक माहिती, लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू 👉 सोलापूर - आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांविरोधातच्या वक्तव्याप्रकरणी निषेध करण्यासाठी आज पंढरपूर बंद, बाजार पेठा बंद, शहरात शुकशूकाट 👉 पुणे - डिफेन्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे 25 फेब्रुवारीला डिमा एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण, डॉ सतीश रेड्डी यांची उपस्थिती 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28864.71, निफ्टी : 8926.90, सोने भाव : 29,284 (प्रतितोळा), चांदी : 42,715 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 नवी दिल्ली - स्काईप आधार कार्डशी जोडले जाणार, जेणेकरून सर्व शासकीय सेवा तसेच बिझनेस टू बिझनेस सेवा आधार ओळखपत्रावर शक्य होतील : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला 👉 नवी दिल्ली - माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते भारतातला पहिला पॅनिक बटणचा फोन लाँच, एलजीच्या या फोनचे नाव K10 2017 असे आहे 🎯 खेळ घडामोडी : 👉 पुणे - ऑस्ट्रेलियासंबंधी आम्ही काही विशेष चिंता नाही करत आहोत. आम्ही विरोधी संघाचा आदर करतो : विराट कोहली 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - मी करिना कपूरचा खूप मोठा फॅन आहे आणि माझे तिच्यासोबत चांगले जमते. पुन्हा एकदा तिच्यासोबत काम करता येईल अशी अपेक्षा बाळगून आहे : दिग्दर्शक विशाल भारद्वाज (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 भाजीपाला : कीड नियंत्रण Let's Up Agri वेलवर्गीय भाजीपाल्यांचे प्रमाण आपल्याकडे जास्त प्रमाणात आढळते. तसेच या वर्गात किडीचे व रोगाचे प्रमाणही जास्त दिसून येते. या पालेभाज्यांची योग्य ती काळजी घेतली नाही तर ती जाळून जातात परिणामी आपले नुकसान होते. त्यामुळे अशा प्रकारच्या पालेभाजांवरील किडीवर कसे नियंत्रण मिळवावे त्याबद्दल माहिती... 👉 फळमाशी : लक्षणे : लहान अवस्थेतील फळांची गळ होते. कीडग्रस्त पक्क्या फळांचा आकार वाकडा होऊन ती सडून जातात. अळी फळातून बाहेर निघून गेल्यानंतर फळावर छिद्रे दिसतात. नुकसान : फळमाशीची अळी फळामध्ये शिरून आतील गर खाते. त्या जागी चट्टा पडतो. अशा फळामध्ये जिवाणूंचा शिरकाव होऊन फळे सडतात. फवारणी : प्रमाण प्रति लिटर पाणी सायॲंट्रानिलीप्रोल (10.26 % ओ.डी.) - 1.8 मि.लि. 👉 मावा : लक्षणे : मावा कीड ही समूहाने पानामागे आणि कोवळ्या खोडावर राहून रस शोषण करते, त्यामुळे पाने पिवळी पडतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास कोवळी पाने आकसतात व वेडीवाकडी होतात, तसेच ही कीड शरीरातून चिकट द्रव सोडते. त्यावर बुरशी वाढून पाने काळी पडतात. नुकसान : प्रकाशसंश्‍लेषण क्रियेत बाधा येते. फळावर प्रादुर्भाव झाल्यास त्याची प्रत खराब होते. माव्याद्वारे विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो. फवारणी : प्रमाण प्रतिलिटर पाणी सायॲंट्रानिलीप्रोल (10.26 % ओ.डी.) - 1.8 मि.लि. किंवा इमिडाक्लाेप्रिड (70 % डब्ल्यूजी) 0.07 ग्रॅम (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 नागअळी : लक्षणे : आळी पानाच्या आत शिरून आतील हिरवा भाग खाते, त्यामुळे पानावर पांढऱ्या नागमोडी रेषा दिसतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने वाळून गळतात. नुकसान : पाने पांढरी दिसतात तसेच त्यांची गळ झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. फवारणी : प्रमाण प्रतिलिटर पाणी सायट्रानिलीप्रोल (10.26 % ओ.डी.) - 1.8 मि.लि. 👉 पानावरील भुंगेरे : लक्षणे : पानावर वर्तुळाकार छिद्रे दिसतात. जमिनीलगत असलेली फळे कुरतडल्यासारखी दिसतात. नुकसान : प्रौढ भुंगेरे पानावर वर्तुळाकार छिद्र पाडून पान खातात. प्रौढ फुलांनासुद्धा नुकसान पोचवितात. आळी जमिनीमध्ये मुळांवर, तसेच जमिनीलगतच्या खोडावर उपजीविका करते. फळामध्ये शिरून फळही खाते. रोपावस्थेत प्रादुर्भाव झाल्यास रोप मरून जाते. फवारणी : प्रमाण प्रतिलिटर पाणी डायक्लोरव्हॉस (76 % इ.सी.) 1.25 मि.लि. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 सरकार देणार मोफत अ‍ॅन्टी-व्हायरस Let's Up Current Affair हॅकर आणि सायबर गुन्हय़ांपासून नागरिकांच्या लॅपटॉप आणि संगणकाची सुरक्षा करण्यासाठी केंद्र सरकारकडून मोफत अ‍ॅन्टी-व्हायरस देण्यात येणार असल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशकर प्रसाद यांनी दिली आहे. बॉटनेक क्लिनिंग अ‍ॅण्ड मालवेअर अ‍ॅनालिसिस सेंन्टरमध्ये या उपक्रमाची सुरुवात केली असून स्मार्टफोनधारकांनाही याचा लाभ घेता येईल. हा उपक्रम ‘सायबर स्वच्छता केंद्र’ या नावाने सुरू करण्यात आला असून लवकरच नागरिकांना मोफत अ‍ॅन्टी-व्हायरस डाऊनलोड करता येणार आहे. या उपक्रमासाठी सरकारला 90 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. पुढील 5 वर्षांसाठी ही सेवा देण्यात येणार आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 आता PF साठी फक्त एक फॉर्म आता पीएफमध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैसे काढण्यासाठी फक्त एक पानी फॉर्म भरून द्यावा लागणार आहे.पीएफचे पैसे काढण्यासाठी लग्नपत्रिकेसारख्या कागदपत्रांची अट आता नसेल. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पैसे काढायचे असल्यास अगोदर संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या लग्नाची पत्रिकाही द्यावी लागत होती. मात्र अशा कागदपत्रांची अट आता शिथिल करण्यात आली आहे. पीएफचे पैसे काढण्यासाठीची जाचक प्रक्रिया कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरत होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या नियमांनुसार पीएफ काढण्यासाठी विविध प्रकारची कागदपत्रे तसंच प्रमाणपत्र सादर करावी लागतात. उदाहरणार्थ घरखरेदी किंवा घराच्या बांधकामासाठी पैसे काढायचे असतील तर बिल्डरकडून मिळवायची सर्व कायगदपत्रे आणि घर खरेदीच्या नोंदणीचे पुरावे द्यावे लागतात. मात्र आता त्याची गरज लागणार नाही. केवळ स्वयंघोषणापत्र द्यावं लागेल. नव्याने जारी करण्यात येणाऱ्या एक पानी फॉर्मनुसार पीएफ अकाऊंटशी आधार लिंक केलेलं असेल तर, एम्प्लॉयर म्हणजेच तुमच्या मालकाकडे किंवा कंपनीकडे जाण्याची गरज पडणार नाही. मात्र आधार लिंक नसेल तर एम्प्लॉयरची परवानगी अनिवार्य असेल. 👉 राज्यातील 17 सर्वात प्रदुषित शहरं केंद्राच्या एका रिपोर्टनुसार राज्यातील 17 शहरं प्रदुषित आहेत. या शहरातील हवा आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे या रिपोर्टमध्ये देण्यात आले आहे. देशातील सर्वाधिक प्रदूषित 94 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 17 शहरांचा समावेश झाला आहे. राज्यातील या 17 शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर आणि पुण्याचा समावेश आहे. केंद्रीय प्रदूषण नियत्रंण मंडळाने 2011 ते 2015 या काळात केलेल्या सर्वेक्षण आणि चाचण्यात राज्यातील 17 शहरातील हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर 10’ या प्रदूषित घटकाचे प्रमाण निश्चित पातळीपेक्षा अनेक पटीने जास्त असल्याचे आढळून आले आहे. पुणे, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरात ‘पार्टिक्युलेट मॅटर 10’ सह नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) या घटकाची पातळी प्रमाणापेक्षा अधिक आहे. केंद्राने निश्चित केलेल्या मानकानुसार, ‘पार्टिक्युलेट मॅटर 10’ चे वार्षिक सरासरी प्रमाण 60 आणि नायट्रोजन डॉयऑक्साइडचे वार्षिक सरासरी प्रमाण 40 पेक्षा अधिक असल्यास त्या शहरांना प्रदूषित शहर म्हटले जाते. महाराष्ट्रानंतर प्रदूषणात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. कारण उत्तर प्रदेशातील 15 शहरं सर्वाधिक प्रदूषित आहेत. तर पंजाबमधील 8, हिमाचल प्रदेशामधील 7 शहरांचा समावेश आहे. गुजरातमधील सूरत, तामिळनाडूमधील तुतीकोरीन, कर्नाटकातील 4 आणि आंध्र प्रदेशातील 4 शहरं प्रदूषित आहेत. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 अनावश्यक खाणे टाळाच... Let's Up Health Katta भूक लागली कि, आपण लगेच काहीही खायला तयार असतो. आपला स्वत:वर ताबाच राहत नाही. अशानेच आपल्या शरीरातील कॅलरीज वाढतात आणि मग शरीरावरील ताबा सुटतो. त्यामुळे नको त्या आजारांनाही निमंत्रणही मिळते. म्हणून अनावश्यक खाणे टाळले पाहिजे. त्यासाठी काही टिप्स... 👉 अनेकदा शरीराला गरज नसल्यावरही आपण काहीतरी खात असतो. सर्वात आधी ही सवय तोडा. 👉 व्यायामात रस असू द्या. कंटाळा असेल तर रोज निरनिराळे व्यायाम करा. व्यायामादरम्यान आणि नंतर भरपूर पाणी प्या. पाण्यामुळे तुमचे पोट भरलेले राहील. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 नाश्ता, लंच आणि डिनरच्या 15 ते 20 मिनीटांआधी ग्लासभर पाणी घ्या. याने भूक कमी होईल. 👉 तेलकट, तुपकट खाण्याऐवजी फळ, दूध कडधान्य असे पदार्थ घ्या, याने पोटही भरेल आणि अशक्तपणा वाटणार नाही. 👉 शक्य असल्यास जेवण्याच्या अर्ध्या तासाआधी व्यायाम करा, याने हेवी नाश्ता टाळता येईल. 👉 चेहऱ्यावर पिंपल्स का येतात? हार्मोन्सचे असंतुलन, मलावरोध, अनियमित मासिक पाळी, जास्त मीठ, आंबट आणि मसालेदार जेवण ही पिंपल्स येण्याची प्रमुख कारणे आहेत. पिंपल्सला सतत स्पर्श केल्याने चेहऱ्यावर पिंपल्सची लस पसरते. मात्र तुम्हाला माहीत आहे का? ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेही पिपंल्सची समस्या निर्माण होऊ शकते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पिंपल्ससाठी कारणीभूत बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील. तर काकडीच्या गोल चकत्यांनी चेहऱ्याला मसाज केल्यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. त्या व्यतिरिक्त दररोज चेहरा गुलाब पाण्याने स्वच्छ केल्यामुळे आराम मिळेल. हळद, मुलतानी माती, गुलाब जल आणि बेसन हे सर्व एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानं पिंपल्स रोखण्यास मदत होते. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 Reliance JIO ची नवी ऑफर... Let's Up Techno Katta रिलायन्सने ‘जिओ प्राईम मेंबरशिप’ ही नवी योजना त्यांनी लाँच केली आहे. यानुसार 1 ते 31 मार्चदरम्यान जिओची मेंबरशिप घेता येईल. सध्या जिओ वापरत असलेल्या किंवा 31 मार्चपर्यंत जिओ सिम घेतील अशा ग्राहकांना 99 रुपयांत प्राईम मेंबरशिप घेता येईल. या ऑफरनुसार जिओची मोफत 4G डेटा सेवा आणखी 1 वर्षासाठी मिळेल. जिओचे नवे दर आणि मेंबरशिपचे इतर फायदे लवकरच जिओ अॅपवर जाहीर केले जातील. मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना जिओचे सर्व अॅप 1 वर्षासाठी मोफत वापरता येतील. तर जिओच्या सहयोगी कंपन्यांच्या ऑफर्सचाही लाभ घेता येईल, असे अंबानींनी सांगितले. मेंबरशिप घेतल्यास 303 रुपये प्रतिमहिना दराने 31 मार्च 2018 पर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा वापरता येईल. म्हणजेच आता जिओ वापरण्यासाठी प्रतिदिन 10 रुपये खर्च येणार आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) प्राईम मेंबरशिप जिओच्या वेबसाईटवर किंवा अॅपवरुन मिळवता येईल. शिवाय जिओ स्टोअरमध्ये जाऊनही मेंबरशिप घेता येईल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे 2017 च्या अखेरपर्यंत संपूर्ण देशात जिओ नेटवर्क असणार आहे. 2017 अखेरपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात जिओ नेटवर्क उपलब्ध असेल, अशी घोषणा अंबानींनी केली. तसेच त्यांनी दावा केला आहे की 4G मोबाईल धारकांपैकी 99 टक्के युझर्सकडे जिओ असणार आहे. एका दिवसात जिओ युझर्स व्हॉईस कॉलिंगचा वापर 200 कोटी मिनिट एवढा करतात. तर जानेवारीमध्ये एकूण 100 कोटी GB डेटा वापरण्यात आला असून प्रतिदिन 3.3 कोटी GB डेटा वापरण्यात येतो, असे अंबानींनी सांगितले. जिओने अवघ्या 170 दिवसांमध्ये 10 कोटी ग्राहक जोडले असून हा एक विक्रम मानला जात आहे. 👉 एक्सपिरिया एक्सवर भरघोस सूट ‘सोनी’ कंपनी ने एक्सपीरिया एक्स या स्मार्टफोनवर भरघोस सूट दिली आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनवर 14,000 रु. सूट देण्यात आल्यामुळे आता हा स्मार्टफोन 24,999 रु. खरेदी करु शकता. एक्सपीरिया X लाँच केला त्यावेळी त्याची किंमत 48,990 रु. होती. आता हा स्मार्टफोन जवळजवळ अर्ध्या किंमतीला उपलब्ध आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 हिमाचल प्रदेश - किन्नोर जिल्ह्यात कारवर दरड कोसळल्याने बीआरओच्या तीन कामगारांचा मृत्यू तर 2 जण जखमी 👉 नवी दिल्ली - जिओच्या फ्री प्लॅन विरुद्ध वोडोफोन कोर्टात, या प्रकरणी 27 फेब्रुवारीला दिल्ली हायकोर्टात होणार सुनावणी 👉 छत्तीसगढ - नारायणपूर येथे सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 कडूना - मध्य नायजेरियामध्ये कुरण आणि पाण्याच्या उपलब्धतेवरुन झालेल्या संघर्षामध्ये 14 जण ठार झाल्याची माहिती 🎯 राजकीय घडामोडी : 👉 उत्तर प्रदेश - विधानसभा निवडणुकांदरम्यान निवडणूक आयोगाने आतापर्यंत 1 अब्ज रूपये आणि 19 लाख लिटर दारू केली जप्त 👉 राज्यातील 10 महानगरपालिकांसाठी सरासरी 56.30 टक्के, तर 11 जिल्हा परिषदा 188 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान 👉 इंडिया टुडे-अ‍ॅक्सिसने घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये मुंबईत शिवसेनेला 86 ते 92 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला 👉 मुंबई - मुंबईतील लाखो मतदारांची नावं यादीतून गायब, शिक्षणमंत्री विनोद तावडे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार 👉 सातारा - राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या गाडीवर दगडफेक, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानेच उदयनराजेंच्या गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 गडचिरोली - पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांना केली अटक, निलेश पोटावी आणि अजित पुडे यांना इटापल्लीच्या जंगलातून केली अटक 👉 कोल्हापूर - ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांची चोरीला गेलेली गाडी सापडली, पोलिसांनी पुण्यातून कार ताब्यात घेतली, जुबेर रज्जाक सय्यद याला अटक 🎯 खेळ घडामोडी : 👉 कोलंबो - भारतीय महिला संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1 गडी राखून विजय, हरमनप्रीत कौरने अखेरच्या दोन चेंडूंवर षटकार व दोन धावा वसूल करत मिळवला विजय (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 _*Let's Up Status Katta*_ 👉 महसूस तब हुआ जब सारा शहर, मुझसे जलने लगा है । तब समझ मे आ गया कि, अपना नाम भी चलने लगा है । 👉 हम क्या है वो सिर्फ हम ही जानते है, लोग तो सिर्फ हमारे बारे में अंदाज़ा लगा सकते है! 👉 परिंदो को मिलेगी मंज़िल एक दिन, ये फैले हुए उनके पर बोलते है, और वही लोग रहते है खामोश अक्सर, ज़माने में जिनके हुनर बोलते है… 👉 कहती है दुनिया जिसे प्यार, नशा है, खताह है! हमने भी किया है प्यार, इसलिए हमे भी पता है! मिलती है थोड़ी खुशियाँ ज्यादा गम! पर इसमें ठोकर खाने का भी कुछ अलग ही मज़ा है! _*जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अ‍‍ॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा*_ https://goo.gl/bdnv64 👉 आज यारो ने हँसा दिया, गम ए उल्फत भुला दिया, मैं लेटा जो आके दीवान पे, यादों ने फिर जगा दिया... 👉 तलाश है एक ऐसे सख्स की, जो आँखों में उस वक्त दर्द देख ले जब दुनिया हमसे कहती है क्या यार तुम मुस्कुराते बहुत हो... 👉 हर पल हर लम्हा ख़ुशी के नगमे होंगे, गम जो सताये तो थामेंगे हाथ जो अपने होंगे, जब पाओगे खुद को तनहा, उठा के नज़र देखना हम ही हम होंगे | 👉 जो अपनी कमजोरियों मे आग लगा सकते है, उन्हें हक है वो सूरज से आंख मिला सकते है, बुलंदिया ही जिनका मकसद बन गई हों, वो मुश्किलों से अपनी मंजिल छीन सकते है। ( *जॉईन लेट्स अप* : https://goo.gl/bdnv64 । Lets Up Magazine विषयी आपला *अभिप्राय कळवा* feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let’s Up Market Updates: 21 February 2017 शेअर मार्केट 👉 ओपनिंग : सेन्सेक्स - 28716.70 निफ्टी - 8890.75 👉 दि.20 फेब्रुवारी 2017 क्लोजिंग : सेन्सेक्स - 28468.75 निफ्टी - 8821.70 👉 आजचे सोन्या-चांदीचे भाव : सोने - 29,303 (-57) (प्रति 10 ग्रॅम) चांदी - 42,900 (-37) (प्रति 1 किलो) 👉 करन्सी 1 डॉलर = 66.98 (-0.11) रुपये (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - भारताकडे स्वत:चे अंतराळ स्थानक विकसित करण्याची क्षमता, ज्या दिवशी देश याबाबत निर्णय घेईल त्या दिवशी आम्ही या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करू - इस्त्रोचे प्रमुख ए.एस. किरणकुमार 👉 नवी दिल्ली - पंतप्रधान कार्यालयाच्या परवानगीशिवाय पंतप्रधानांचे फोटो प्रसिद्ध न करण्याच्या केंद्र सरकारच्या खादी कमिशनला सूचना 👉 कोहिमा - नागालँडच्या मुख्यमंत्रिपदासाठी सहमतीचे उमेदवार म्हणून नागालँड पीपल्स फ्रन्टचे अध्यक्ष शुरहोझेलाई लिझित्सू यांची निवड (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 पाकिस्तानने 85 दहशतवादी आणि 32 दहशतवादी तळांवर कारवाई करावी, अफगाणिस्तानची पाकिस्तानकडे मागणी 👉 वॉशिंग्टन - अ‍ॅडॉल्फ हिटलरने दुसऱ्या महायुद्धामध्ये लाखो लोकांच्या हत्येचे आदेश ज्या टेलिफोनवरून दिला होता, तो लिलावात 2 लाख डॉलर्सना विकला 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - मुंबईसह 10 महानगरपालिकांसाठी आज मतदान, 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठीही होणार आज मतदान 👉 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शिवसेना निवडणुक आयोगाकडे करणार तक्रार, प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मुलाखत दिलाचा आरोप 👉 नवी दिल्ली - तामिळनाडू विधानसभेच्या अध्यक्षाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणणार - एम. के. स्टालिन, डीएमके 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - दोन लाखांपेक्षा अधिक किंमतीचे सोने खरेदीवर 1 टक्का टीसीएस कर द्यावा लागणार, यापूर्वी 5 लाखांपेक्षा अधिकच्या खरेदीवर द्यावा लागत होता टीसीएस 👉 पुणे - अभियांत्रिकीच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना ‘कॅप’ फेर्‍यांमध्ये अधिक सोपे जावे यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने ‘कॅप’ची एक फेरी कमी करण्याचा निर्णय घेतला 👉 नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कार्यकर्त्याच्या घरातून निघत असताना बांगलादेशी कामगारांचा घेराव 👉 पंढरपूर - टोळी युध्दाच्या वादातून ऋषिकेश नवनाथ मेटकरी व निलेश बारसकर या युवकावर 8 ते 10 जणांच्या टोळक्याने धारधार हत्याराने वार केले 🎯 खेळ घडामोडी : 👉 नवी दिल्ली - विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय अंध संघाला क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दहा लाखाचे बक्षीस केले जाहीर 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - एव्हरग्रीन मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने तीन दिवसांत 517 कि.मी. अंतराची मॅरेथॉन स्पर्धा पार केली, फ्लोरिडात रंगलेली मॅरेथॉन स्पर्धा जगातील सर्वात कठीण समजली जाते (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - नोटाबंदीच्या काळात विविध कारणांमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 👉 नवी दिल्ली - वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) या संस्थेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमकडून आर्थिक रसद पुरविण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर 👉 नवी दिल्ली - कोळसा घोटाळाप्रकरणी पटियाला हाउस कोर्टातली सुनावणी 6 मार्चपर्यंत स्थगित 👉 नवी दिल्ली - देशातील संरक्षण दलाची 14 हजार एकर जमीन अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने पावले उचलण्याचे दिले निर्देश 👉 पश्चिम बंगाल - बीएसएफने नाडिया जिल्ह्यातल्या मालदाच्या वैष्णवनगर भागातून 2 हजारांच्या चलनातल्या 96 हजारांच्या बनावट नोटा केल्या जप्त 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 बीजिंग - चिनी मीडियाने अवकाश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारत करत असलेल्या रोजगार निर्मितीचा इतर देशांनी धडा घ्यावा, असा सल्ला दिला आहे (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 राजकीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - मुस्लिम मतांच्या विभाजनासाठी ओवेसींनी अमित शहांकडून घेतले 400 कोटी : दिग्विजयसिंह 👉 उत्तर प्रदेश - बीएसपीचे नाव आता बहुजन समाज पार्टी नव्हे; 'बहनजी संपत्ती पार्टी' बनले आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 👉 लखनऊ - मी महानायक अमिताभ बच्चन यांना विनंती करतो की, त्यांनी गुजरातमधल्या गाढवांची जाहीरात करणे बंद करावे : मुख्यमंत्री अखिलेश यादव 👉 मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार केल्यास, त्याची चौकशी होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 कोल्हापूर - सांगली रस्त्यावरील उदगाव येथे डम्पर आणि बाईकची समोरासमोर धडक, अपघातात वडिलांसहीत मुलीचा जागीच मृत्यू, दादासो वनखंडे आणि तृप्ती वनखंडे मृतांची नावे, संतप्त जमावाने पेटवला डम्पर 👉 सोलापूर - आमदार प्रशांत परिचारक यांच्याविरोधात माजी सैनिक आक्रमक, पंढरपूर व मंगळवेढा येथे रास्ता रोको आंदोलन, सैनिकांच्या पत्नींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात कारवाईची मागणी 👉 अकोला - अकोट येथील सोनू चौकातील झी महासेल दुकानाला आग, 10 लाखांचे साहित्य जळून खाक, फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28661.58, निफ्टी : 8879.20, सोने भाव : 29,239 (प्रतितोळा), चांदी : 42,720 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 मारूती सुझुकीने नवीन अल्टो के 10 प्लस हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत केले सादर, यात रिव्हर्स पार्कींग सेन्सर, सेंट्रल लॉकींग, फ्रंट पॉवर विंडोज आदींसह अन्य फिचर्सचा समावेश 🎯 खेळ घडामोडी : 👉 विराट कोहलीचा ‘पुमा’शी 100 कोटींचा विक्रमी करार, एकाच कंपनीशी इतक्या मोठ्या रकमेचा करार करणारा विराट पहिलाच क्रीडापटू 👉 कोलकाता - मोहन बगान फूटबॉल क्लबचे माजी फुटबॉलपटू शिबाजी बॅनर्जी यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - बॉलिवूडचा फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने जान्हवी कपूरचा व्हिडीओ केला शेअर, या व्हिडीओमध्ये जान्हवी तिचा बॉयफ्रेण्ड शिखर पहारियासोबत डान्स करताना दिसत आहे (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 आयपीएल लिलाव ; कोणत्या खेळाडूवर किती बोली? Let's Up Sports Katta इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) या देशातील सर्वात लोकप्रिय टी-20 स्पर्धेसाठीच्या आगामी दहाव्या पर्वासाठीच्या खेळाडूंचा लिलाव आज सोमवारी बंगळुरूत पार पडला. यंदा इंग्लंडच्या अष्टपैलू बेन स्टोक्सला 14 कोटी 50 लाखांचा सर्वाधिक भाव मिळाला. पुणे सुपर जाएंट्स संघाचे गोयंका यांनी बेन स्टोक्सवर सर्वाधिक बोली लावली. त्यापाठोपाठ इंग्लंडच्याच टायमल मिल्स या डावखुऱया वेगवान गोलंदाजाला 12 कोटींचा भाव मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने टायमल मिल्सला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 इयान मॉर्गन - 2 कोटी - किंग्स इलेवन पंजाब 👉 पवन नेगी - 1 कोटी - रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु 👉 अॅंजिलो मॅथ्यूज - 2 कोटी - दिल्ली डेयरडेविल्स 👉 बेन स्टोक्स - 14.5 कोटी - रायझिंग पुणे सुपरजायंट्स 👉 कोरी अॅंडरसन - 1 कोटी -दिल्ली डेयरडेविल्स 👉 निकोलस पूरन - 30 लाख - मुंबई इंडियन्स 👉 कॅगिसो रबाडा - 5 कोटी - दिल्ली डेयरडेविल्स 👉 ट्रेन्ट बोल्ट - 5 कोटी - कोलकाता नाइट राइडर्स 👉 टॅमल मिल्स - 12 कोटी - रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु 👉 पॅट कमिंस - 4.5 कोटी - दिल्ली डेयरडेविल्स 👉 मिशेल जॉन्सन - 2 कोटी - मुंबई इंडियन्स 👉 अंकित बवाने - 10 लाख - दिल्ली डेयरडेविल्स 👉 तन्मय अग्रवाल - 10 लाख - सनराइजर्स हैदराबाद 👉 मोहम्मद नबी - 30 लाख - सनराइजर्स हैदराबाद 👉 कृष्णप्पा गौतम - 2 करोड़ - मुंबई इंडियंस 👉 राहुल तेवतिया - 25 लाख - किंग्स इलेवन पंजाब 👉 एकलव्य द्विवेदी - 75 लाख - सनराइजर्स हैदराबाद 👉 अनिकेत चौधरी - 2 कोटी - रॉयल चॅलेंजर्स बेंलगुरु 👉 टी. नटराजन - 3 कोटी - किंग्स इलेवन पंजाब 👉 नाथू सिंह - 50 लाख - गुजरात लायन्स 👉 बासिल थम्पी - 85 लाख - गुजरात लायन्स 👉 एम. अश्विन - 1 कोटी - दिल्ली डेयरडेविल्स 👉 टीएस बरोका - 10 लाख - गुजरात लायन्स 👉 राशिद खान - 4 करोड़ - सनराइजर्स हैदराबाद 👉 प्रवीण तांबे - 10 लाख - सनराइजर्स हैदराबाद 👉 क्रिस वोक्स - 4.2 कोटी - कोलकाता नाइट राइडर्स 👉 कर्ण शर्मा - 3.2 कोटी - मुंबई इंडियन्स 👉 ऋषी धवन - 55 लाख - कोलकाता नाइट रायडर्स 👉 मॅट हेनरी - 50 लाख - किंग्ज इलेव्हन पंजाब 👉 जयदेव उनदकड़ - 30 लाख - रायझिंग पुणे सुपरजाइंट्स 👉 वरुण अॅरॉन - 2.8 कोटी - किंग्ज इलेव्हन पंजाब 👉 मनप्रीत गोनी - 60 लाख - गुजरात लायन्स 👉 मार्टिन गुप्टिल - 50 लाख - किंग्ज इलेव्हन पंजाब 👉 जेसन रॉय - 1 कोटी - गुजरात लायन्स 👉 सौरभ तिवारी - 30 लाख - मुंबई इंडियन्स (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 आलियाचा लाईफ पार्टनर बद्दल खुलासा Let's Up Entertainment Katta आलिया भट्ट तिच्या आगामी 'बद्रीनाथ की दुल्हनिया' सिनेमात मजेशीर भूमिका केली असून यात ती वधू बनणार आहे. तिने नुकताच तिला कसा लाईफ पार्टनर हवा आहे याबाबत खुलासा केला आहे. आलियाने म्हटले की, तिचा लाईफ पार्टनर एक मित्र असावा. माझा आणि माझा लाईफ पार्टनरमध्ये मैत्रीचे नाते असले पाहिजे. आमचे विचार एकमेकांशी मिळाले पाहिजे. मला माझा कामावर खूप प्रेम आहे. लग्नानंतर किंवा मुले झाल्यानंतर मला सिनेसृष्टीतून बाहेर जायचे नाही. त्यामुळे माझा लाईफ पार्टनरने माझे काम समजून घ्यावे. आलिया म्हणते की, ती कधीही अॅरेंज मॅरेज नाही करणार. तिने म्हटलं की, तिचा लाईफ पार्टनर तिच्या विचारांसारखा असावा. पालकांना माहित नसतं की मुलाचे विचार कसे आहेत त्यामुळे मी माझा लाईफ पार्टनर स्वत: निवडणार आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 अक्षयने दिला स्वच्छतेचा संदेश अभिनेता अक्षय कुमार आगामी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटातून ‘स्वच्छ भारत अभियाना’चा संदेश देताना दिसणार आहे. अक्षय कुमार सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मध्यप्रदेशमधील होशंगाबादमध्ये आहे. अक्कीने होशंगाबादमध्ये पत्रकारासोबत बोलताना शौचालयाचा वापर करा, असा संदेश दिला. यावेळी त्याने अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारावर भाष्य केले. 1 हजार मुलांचा अतिसरामुळे मृत्यू झाल्याचा दाखला देत त्याने स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. अक्षयने यावेळी सामाजिक जन जागृतीसाठी अनेक मोठे प्रोजेक्ट राबविण्यात येत असून ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले. अक्कीने यावेळी भोपाळ आणि होशंगाबाद शहरामधील स्वच्छतेचे कौतुक देखील केले. मुंबईपेक्षाही अधिक स्वच्छता याठिकाणी आहे, असे तो म्हणाला. 👉 शशिकला यांच्या जीवनावर चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिताच्या निकटवर्तीय व्ही. के. शशिकला यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार आहे. याबाबत ट्विटरवर राम गोपाल वर्मा यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ट्विटमध्ये रामू यांनी लिहिले, की शशिकला ही मन्नारगुडी माफिया फॅमिलीतील ‘डॉन विटो कार्लिओनो’ आहे. तिला नकार दिलेला आवडत नाही, शशिकला आणि जयललिता यांच्यातील खरे संबंधही चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. शशिकला आणि जयललिता यांच्यातील संबंध कसे होते हे मला पोयस गार्डनमधील नोकरांनी सांगितले आहे. हे खूपच अकल्पनीय आणि धक्कादायक आहे आणि ते मी दाखवणार आहे, असेही आरजीव्हीने लिहिले आहे. आता हा चित्रपट किती यशस्वी होतो हे चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 मे पासून ‘पीएफ’ काढा ऑनलाईन Let's Up Current Affair पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीबाबतची सर्व डोकेदुखी आता लवकरच दूर होणार आहे. कारण, आता मे महिन्यापासून तुम्ही तुमचे पीएफचे पैसे ऑनलाईन काढू शकणार आहात. व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. पीएफ काढून घेण्याचा अर्ज, पेन्शन मिळणे किंवा समूह विम्याचा फायदा मिळणे याबाबत ‘ईपीएफओ’ दरवर्षी अंदाजे 1 कोटी अर्ज येतात. त्यांच्यावरील प्रक्रिया वेगाने होण्यासाठी सर्व 123 फील्ड ऑफिसेसना केंद्रीय सर्व्हरशी जोडण्याचे काम सुरू आहे. सर्व प्रकारचे अर्ज ऑनलाइन सादर करता यावेत, यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे ईपीएफओ आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी सांगितले. अर्ज ऑनलाइन सादर केल्यानंतर काही तासांमध्येच त्यावरील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) येत्या 31 मार्चपर्यंत ईपीएफओ धारकांनी आधार कार्ड किंवा आधार कार्ड क्रमांक ईपीएफओला सादर करावा लागेल. पेन्शन बँक आणि बँक खाती आधार कार्डद्वारे जोडली जाणार आहेत. आधार कार्ड क्रमांक जोडला असेल, तरच रक्कम मिळेल. ईपीएफओची आतापर्यंत 50 कार्यालयं केंद्रीय सर्व्हरल जोडली असून, अजून 123 कार्यालयं जोडण्याचं काम सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वर्गणीदारांना ऑनलाईन सेवेचा लाभ घेता येणार आहे. 👉 आजपासून बचत खात्यातून काढा 50 हजार बँक खातेधारकांना आपल्या बचत खात्यातून आजपासून आठवड्याला पन्नास हजारांची रक्कम काढता येणार आहे. नोटाबंदी निर्णयानंतर बचत खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात आले असून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आजपासून बचत खात्यातून आठवड्याला 50 हजारांपर्यंत रक्कम काढणे शक्य होणार आहे. यापुर्वी ही मर्यादा 24 हजार इतकी होती. 13 मार्चपासून बचत खात्यातून पैसे काढण्यावरील सर्व बंधनं मागे घेण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अगोदरच यासंदर्भात घोषणा केली आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पत्नी सलमा अन्सारीसोबत रवांडा आणि युगांडाच्या 5 दिवसांच्या दौ-यासाठी रवाना 👉 नवी दिल्ली- उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी 33 मध्यान्ह भोजनाच्या स्वयंपाकघराच्या चौकशीचे दिले आदेश 👉 नवी दिल्ली - दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोख दागिने खरेदीवर आता 1 टक्का टीसीएस द्यावा लागणार 👉 मुंबईत विमानतळाजवळ प्रायव्हेट एअरलाइन्सच्या पायलटला ड्रोनसारखी वस्तू दिसली, एटीसी आणि पोलिसांचे हायअलर्ट जारी (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 दमास्कस - दहशतवादी गटांचे वर्चस्व असलेल्या दमास्कस शहराच्या ईशान्य भागात सीरियन सैन्याने केलेल्या बॉम्बहल्ल्यात 9 जणांचा मृत्यू 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - 10 महापालिका, 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या, दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी उद्या होणार मतदान 👉 लखनऊ - विधानपरिषद निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात 61.16 टक्के मतदान, किरकोळ घटना वगळता 12 जिल्ह्यांच्या 69 मतदारसंघात शांततेत मतदान 👉 उत्तर प्रदेश - विधानपरिषद निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात 38.40 कोटी रुपयांची रोकड आणि 2.4 लाख लिटर दारू केली जप्त - निवडणूक आयोग 👉 नवी दिल्ली - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भोजपुरी अभिनेता रवीकिशनने भाजपमध्ये केला प्रवेश 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 कल्याण - 1000 आणि 500 च्या जुन्या नोटा बदली करायला आलेले दोन जण 55 लाख 50 हजार रुपये रकमेसह पोलिसांच्या ताब्यात 👉 ठाणे - काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी महेश पंडित म्हात्रे आणि मयूर म्हात्रे उर्फ प्रकाश म्हात्रे या दोघांना अटक, दोन्ही आरोपींकडून गुन्ह्याची कबूली 👉 नाशिक- राज्य उत्पादन शुल्क विभाग लखमापूर फाट्यावर वाहनांची तपासणी करीत असताना 3 लाख 47 हजार रुपयांचा बेकायदा दारूसाठा केला जप्त 🎯 खेळ घडामोडी : 👉 कोलकाता - आयपीएल मधील रायजिंग पुणे सुपरजॉइंट्स या संघाने महेंद्रसिंह धोनीला कर्णधारपदावरून हटवले, त्याच्या जागी आॅस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथकडे संघाची धुरा 👉 इस्लामाबाद - पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज शाहीद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत पडली प्रेमात, त्या खास व्यक्तीसोबत डेटींग नाही तर थेट बोहल्यावरच चढणार असल्याची तिने केली इच्छा व्यक्त 👉 मुंबई - सयानी गुप्ताला आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करण्याची संधी, हंगेरियन चित्रपटात सयानी नसिरूद्दिन शाह आणि टिस्का चोपडा यांच्यासोबत करणार काम (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

'👉 वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये विविध पदांची भरती Let's Up Job Updates पोस्ट : अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (स्थापत्य) - जागा : 04 - पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा, MS-CIT, मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान पोस्ट : अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (विद्युत) - जागा : 01 - पात्रता : विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा, MS-CIT, मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान पोस्ट : अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (संगणक) - जागा : 01 - पात्रता : संगणक अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा, MS-CIT, मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान पोस्ट : लेखा परिक्षण व लेखा सहाय्यक लेखापरिक्षण - जागा : 01 - पात्रता : वाणिज्य शाखेची पदवी, ICWA किंवा CA, MS-CIT, मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) पोस्ट : कर निर्धारक व प्रशासकीय सेवा - जागा : 18 - पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, पुढील पैकी कोणत्याही एका शाखेतील पदव्युत्तर पदवी – समाजकार्य, लोक प्रशासन, नगर व ग्राम नियोजन , राज्यशास्त्र, विधी, वाणिज्य, MBA, कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी, MS-CIT, मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान पोस्ट : अग्नीशमन सेवा संवर्ग - जागा : 08 - पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांचा उपस्थानक अधिकारी अभ्यासक (Sub Officers) कोर्स उत्तीर्ण वय : दि. 05 मार्च 2017 रोजी 18 ते 38 वर्षे फी : 300 रुपये (मागासवर्गीय 150 रुपये) परीक्षा : दि. 05 मार्च 2017 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 23 फेब्रुवारी 2017 अधिक माहितीसाठी : https://goo.gl/Np60TU 👉 भारतीय रिजर्व बैंक नोट मुद्रणालयात भरती पोस्ट : सहाय्यक व्यवस्थापक - जागा : 57 पोस्ट : प्रशिक्षणार्थी कामगार - जागा : 350 जागा वय : दि. 28 फेब्रुवारी 2017 रोजी 18 ते 31 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 28 फेब्रुवारी 2017 अधिक माहितीसाठी : https://goo.gl/vbhjJm ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/A0EhBJ (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)