LetsUpp Marathi
Открыть в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Больше6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 день
Архив постов
6 624
ब्रेकिंग! CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर होणार
LetsUpp | Trending
💁♂️ सीबीएसई बारावी रिझल्ट २०२१ ची वाट पाहणाऱ्या देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
👉 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बारावीचा निकाल कधी घोषित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होत. सीबीएसई बोर्डाने आज दुपारी 2 वाजता निकाल जाहीर करणार असल्याचे अधिकृत सांगितले आहे.
🖥️ निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात.
To know more click here
https://letsup.app.link/nZsLJLGZiib
6 624
'या' घडीच्या 10 महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
▪️ पूरग्रस्तांच्या खात्यात आजपासून दहा हजारांची मदत जमा होणार, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
▪️ केंद्राने गुजरातच्या धर्तीवर पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर करावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी
----------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ९६२३१७४५५६
----------------------
▪️ चंद्रपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व काँग्रेसच्या नागरसेवकांमध्ये राडा; एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल
▪️ राज्यात आज 11 हजार 124 रुग्णांना डिस्चार्ज, तर 7 हजार 242 रुग्णांची भर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.59 टक्क्यांवर
▪️ मनसेची पहिली मोठी घोषणा; नाशिक महापालिका निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार
▪️ पूरग्रस्त नागरिक, व्यावसायिक, दुकानदारांच्या विम्याची किमान 50 टक्के रक्कम तातडीने मिळावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र
▪️ मुंबई ठाण्यासह इतर 23 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय; तर इतर 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम
▪️ मुंबईतील विरारमध्ये आयसीआयसीआय बँकेवर दरोडा पडल्याची खळबळजनक घटना; दरोडेखोरांच्या हल्ल्यात शाखा व्यवस्थापकाचा मृत्यू तर कॅशियर जखमी
▪️ संसदेचा वेळ वाया घालवू नका, महागाई, कृषी कायदे आणि पेगॅसस प्रकरणी संसदेत चर्चा करा; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी
▪️ लावणी नृत्यांगना आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
To know more click here
https://letsup.app.link/7xZjmQpJiib
6 624
'प्रदूषणमुक्त मुंबई'साठी एक पाऊल; पालिका अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने!
LetsUpp | Positive News
🚗 स्वच्छ-सुंदर, प्रदूषणमुक्त मुंबईसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या पालिकेने आता अधिकाऱ्यांनाही इलेक्ट्रिक वाहने घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबईत विविध ठिकाणी चार्जिंग पॉइंटही सुरू करणार आहेत.
💁♂️ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबविणाऱ्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ १५ ऑगस्ट रोजी करण्याचे नियोजन असल्याचे पालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त सुनील गोडसे यांनी सांगितले.
🚌 मुंबईचे प्रदूषण कमी करण्यासाठी 'बेस्ट' उपक्रमातही इलेक्ट्रिक बस आणल्या आहेत. याच धर्तीवर यापुढे चारचाकी प्रवासी वाहनांबरोबरच अधिकाधिक हलकी इलेक्ट्रिक मालवाहू वाहनेही पालिका विकत घेणार आहे.
👍 महापौर, आयुक्तांसह, पदाधिकारी, अधिकारी यांना पालिकेची वाहने दिली जातात. सुमारे २०० च्या आसपास या वाहनांची संख्या आहे. याशिवाय मालवाहतुकीसाठी हलकी व अवजड मालवाहक वाहनेही वापरली जातात.
🔌 १०० चार्जिंग पॉईंट :
इलेक्ट्रिक वाहनांसाठी १०० ठिकाणी चार्जिंग पॉइंट सुरू करणार आहेत. यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याचेही नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात ३५ पॉईंट सुरू करण्यात येणार आहेत.
🏢 पालिका कार्यालयांमधील दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही, अशा ठिकाणी हे चार्जिंग पॉईंट तयार करण्यात येणार आहेत.
📍 सद्यस्थितीत उपक्रमासाठी पंतनगर घाटकोपर पालिका शाळा (एन वॉर्ड), देवनार शिवाजीनगर बेस्ट डेपो, माहुलगाव पालिका शाळा, चेंबूर (एम/पूर्व), वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, भायखळा पूर्व; चारकोप प्रसूतीगृह, कांदिवली (एफ/दक्षिण) या ठिकाणी चार्जिंग पॉईंट सुरू केले जाणार आहेत.
आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/rUtJXR07gib
6 624
कोरोना लसींच्या दरात वाढ; जाणून घ्या नवे दर
LetsUpp | Trending
⚡ कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यात येत आहे. याच अनुषंगाने एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
🤦🏻♂️ महागाईने आधीच जनता चिंताग्रस्त आहे. यातच आता कोरोना लसींच्या दरात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
💉 जानेवारी ते जुलै या कालावधीसाठी लसींचे दर निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यात वाढ झालेली दिसते.
▪️ जुने दर : कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या एका डोससाठी अनुक्रम 200 आणि 206 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता.
▪️ नवे दर : कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीसाठी आता अनुक्रमे 205 आणि 215 रुपये सरकारला मोजावे लागणार आहेत.
💰 आता नवीन किमतीनुसारच सरकारला ऑर्डर द्यावी लागेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/q1Vp8lDshib
6 624
अकरावी प्रवेश ! न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकार पेचात
LetsUpp | Trending
⚡ अकरावी प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाबरोबरच अन्य शिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत प्रश्नांचाही समावेश करण्याबाबत विचार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.
🤦🏻♂️ न्यायालयाच्या या निर्णयामुळे अकरावी प्रवेशाचा गुंत्यात आणखी भर पडल्याचे दिसून आले आहे..
📣 अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर केल्यामुळे राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले.
🏛️ मात्र, अद्यापही प्रवेशाचा घोळ संपलेला नाही. राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा घेण्याच्या राज्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
📚 या याचिकेवरील सुनावणीदरम्यान प्रश्नपत्रिकेत इतर मंडळांच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.
📝 अन्य मंडळांचे विद्यार्थीही या परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. तसेच परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असून वैकल्पिक प्रश्नांचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येईल, असा दावा राज्य शासनाने के ला.
💁🏻♂️ मात्र, आयसीएसई किंवा सीबीएससीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी पर्यायी विषय असलेल्या विषयांवर आधारित या बहुवैकल्पिक प्रश्नांची उत्तरे कशी देऊ शकतील? असा प्रश्न न्यायमूर्ती रमेश धानुका आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने उपस्थित केला.
👍 या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे प्रश्नपत्रिकेत इतर मंडळांच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश करावा. त्यासाठी अन्य मंडळातील सदस्यांची समिती नेमण्यात यावी, असे न्यायालयाने सांगितले.
🧑🏻🦱 तसेच दहावीला निवडलेल्या विषयांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्याचा पर्याय या विद्यार्थ्यांना उपलब्ध करता येऊ शकेल, असेही न्यायालयाने सूचवले.
✍🏻 ही परीक्षा ऐच्छिक असली तरी अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही विभागाने स्पष्ट के ले आहे.
🗓️ याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकारला 4 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/o1J0EY2qhib
6 624
💥 गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मुलाला खून प्रकरणी अटक!
LetsUpp | Pune
⚡ पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गोल्डमॅन दत्ता फुगेचा मुलगा शुभम फुगे याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी खून केल्याप्रकरणी अटक केली आहे.
🧐 शुभमने कानशिलात मारल्याचा रागातून एकाची हत्या केली आहे. भोसरी परिसरात ही घटना घडली आहे. तीन तरुणांनी मिळूनच आपल्याच मित्राचा खून केला आहे. या घटनेने पिंपरी चिंचवडसह पुणे शहर हादरले आहे.
🥂 शुभम फुगे आणि अमन सुरेश डांगळे हे दोघे जण दारु पित बसले होते. दारु पिताना या दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला.
👀 या वादात अमनने शुभमच्या कानशिलात लगावली. याचाच राग शुभमला अनावर झाल्याने याच रागात इतर दोन मित्रांच्या साथीने अमनची हत्या केली.
👮🏻 सुरुवातीला वेगळे कारण पुढे आले होते. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास अमनचा मृतदेह भोसरी गावठाण परिसरात आढळल्यानंतर पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केला.
🧐 भोसरी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली, तेव्हा पाठीमागे शस्त्राचे वार होते. अमनचा मोबाईल तपासला तेव्हा मध्यरात्री दोन वाजता पत्नी आणि लातूरहून आणखी एकाचा फोन आला होता.
📍 पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरु केला. मात्र तपासा दरम्यान शुभमच्या नावाचा देखील उल्लेख झाला. त्यानंतर पोलिसांनी शुभमसह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/w7mSHCTihib
6 624
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
LetsUpp | Pune
👨🏻💻 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीच्या ऑनलाईन शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेने इन्फोसिस कंपनीच्या सहकार्याने नवे ई-लर्निंग ॲप विकसित केले आहे.
💁♂️ दरम्यान त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देणे शक्य होणार आहे. या ॲपचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवडाभरात ते कार्यान्वित होणार आहे.
👨💼 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबतच्या संशोधनांचा अभ्यास करून स्वतः या ॲपची रचना केली आहे.
👍 या ॲपमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारने वर्गनिहाय उपलब्ध करून दिलेला आणि जिल्हा परिषदेने तयार केलेला अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.
📍 कोरोना काळात शिक्षणापासून दुरावण्याची शक्यता असलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/4VBSNdGbhib
6 624
आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी
LetsUpp | Bulletin
✂️ शालेय शिक्षण विभागाच्या 15 टक्के फी कपातीला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी; राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढणार
📚 दहावीच्या परिक्षेनंतर आता अकरावीची सीईटीही वादाच्या भोवऱ्यात, राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश
🌧️ अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प उभारणार; कोकणातील भविष्यातील धोका लक्षात घेता राज्य सरकारचा निर्णय
📍 अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयची 12 ठिकाणी छापेमारी; पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे; पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील घराची तपासणी
🔗 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून SITची नेमणूक
💰 नाशिक- करन्सी नोट प्रेस मधील गहाळ नोटांचा लागला छडा; प्रेस व्यवस्थापनाकडून सुपरवायझरवर करावाई
💵 बँक बंद पडली तर खातेधारकांना 90 दिवसात मिळणार पैसे, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ठेवीदारांला पाच लाख रुपये दिले जाणार
📱 संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ सलग दहाव्या दिवशीही कायम; पेगासिस मुद्द्यावरुन विरोधकांची एकजूट
🚑 उत्तर प्रदेशात भीषण अपघात! बसमध्ये 135 प्रवासी झोपेत असताना काळाचा घाला; 18 लोकांचा दुर्घटनेत मृत्यू, देशाला हादरवणारी घटना
🥇 टोकियो ऑलिंपिक 2020 मध्ये पीव्ही सिंधूची प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक, तर बॉक्सिंगमध्ये पूजा राणीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
To know more click here
https://letsup.app.link/lfHHUbQhgib
6 624
अकरावी सीईटीच्या परीक्षेसाठी अशी करा नोंदणी!
LetsUpp l Trending
👨🏻💻 अकरावी सीईटीच्या नोंदणीसाठी नवी वेबसाईट तयार झाली असून, या वेबसाईटवर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची २६ जुलैपासून नोंदणी सुरु झाली असून इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना २८ जुलैपासून नोंदणी करता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी नुकतीच दिली आहे.
📄 सीईटी नोंदणीबाबत डॉ. भोसले यांनी सविस्तर पत्रक प्रसिद्ध करुन माहिती दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना http://cet.11thadmission.org.in या वेबसाईटहून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना २ ऑगस्टपर्यत सीईटीसाठी नोंदणी करता येणार आहे.
👎 अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलेली वेबसाईट तांत्रिक त्रुटी असल्याने नोंदणी बंद करावी लागली होती.
आता अकरावी सीईटीच्या नोंदणीसाठी नवी वेबसाईट तयार करून ती कार्यान्वित केली आहे. जुन्या वेबसाईटहून सीईटीसाठी साधारण एक लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
💁♂️ या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज नोंदणी करण्याची गरज नाही. मात्र, अर्ज पूर्ण न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
👉 अशी करा नोंदणी :
अकरावीच्या प्रवेशाच्या हेतूने विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेचे आयोजन केले आहे. मात्र ती ऐच्छिक परीक्षा असणार आहे. सीईटी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पुढील पायऱ्यांचा वापर करा.
- महाराष्ट्र FYJC CET २०२१ ची अधिकृत वेबसाईट cet-mh-ssc.ac.in वर जा.
- ड्रॉप डाउन मेनूमध्ये आपला बोर्ड निवडा
- नोंदणीसाठी नाव, संपर्क क्रमांक, जन्म तारीख, पत्ता आणि शिक्षणाचे माध्यम यासारख्या आवश्यक सर्व माहिती भरा.
- त्यानंतर जिल्हा व तालुका निवडून परीक्षा केंद्राचा तपशील निवडा.
- फोटो, स्वाक्षरी, आयडी प्रूफ आणि काही दिव्यांग असल्यास त्याचे सर्टिफिकेट अपलोड करा.
- इतर सर्व औपचारिकता पूर्ण करा आणि सबमिटवर क्लिक करा.
- खात्रीसाठी महाराष्ट्र एफवायजेसी सीईटी २०२१ च्या अर्जाची एक प्रिंटआउट घ्या.
To know more click here
https://letsup.app.link/1b378M9Pfib
