LetsUpp Marathi
Открыть в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Больше6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 день
Архив постов
6 624
मोहरम : आजच्या दिवशी का दु:खी होतात लोक? कसा साजरा करतात 'हा' सण?
LetsUpp l Special
● इस्लाममध्ये मोहरम हा दुःखाचा महिना मानला जातो. मुस्लिम समाज विशेषत: शिया समुदायाचे लोक या महिन्याच्या नवव्या किंवा दहाव्या दिवशी रोजा ठेवतात. मोहरममध्ये पैगंबर हजरत मुहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांच्यासह कर्बलाच्या लढाईत शहीद झालेल्या ७२ शहीदांची शहादत आठवून शोक व्यक्त केला जातो.
● या युद्धभूमीत केवळ हुसैन आणि त्यांचा ६ महिन्यांचा पुत्र अली असगर उरले होते. तहानेने व्याकूळ झालेल्या आपल्या पुत्रासाठी हुसैनने सैन्याकडे पाण्याची मागणी केली परंतु, पाणी देण्याऐवजी या चिमुकल्याचा बाण मारून जीव घेण्यात आला. या युद्धात हुसैन यांनाही मारण्यात आले. या नरसंहारानंतर मुस्लिम बांधव या महिन्याकडे 'मातम का महिना' म्हणून पाहतात.
● यंदा मोहरम आज (दि.१९) आहे. या दिवशी ताजिया मिरवणूक काढली जाते आणि त्यांना कर्बलामध्ये दफन केले जाते. दरम्यान, यंदा देखील गेल्या वर्षीप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये मोहरमच्या दिवशी निर्बंध लागू आहेत.
● कर्बलाची लढाई सम्राट यजीद आणि हजरत इमाम हुसेन यांच्या सैन्यात झाली होती. इस्लामचे रक्षण करण्यासाठी इमाम हुसेन यांनी आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह सर्वोच्च बलिदान दिले. त्यांची शहादत मोहरमच्या १० व्या दिवशी झाली होती. या दिवसाला आशुरा म्हणतात.
● दरवर्षी त्या शहिदांच्या स्मरणार्थ ताजिया बनवल्या जातात आणि जुलूस काढले जातात. ताजिया हे त्या शहिदांचे प्रतिक आहेत. शोक केल्यानंतर हे ताजिये कर्बलामध्ये दफन केले जातात. इराकमध्ये आजूनही इमाम हुसेन यांचा मकबरा आहे.
● मोहरमच्या दिवशी शोक व्यक्त केला जातो, तेव्हा शिया समुदायाचे लोक ‘या हुसैन, हम न हुए।’ असे म्हणतात. त्याचे विशेष महत्त्व आहे.
● शोक व्यक्त करणारे लोक म्हणतात की ‘हजरत इमाम हुसेन, आम्ही खूप दुःखी आहोत’ कारण आम्ही कर्बलाच्या युद्धात तुमच्यासोबत नव्हतो. आम्ही देखील इस्लामचे रक्षण करण्यासाठी तुमच्यासोबत शहीद झालो असतो.
सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/oJohqDo1Pib
6 624
भारत-अफगाणिस्तानच्या व्यापाराबाबत तालिबानचा फतवा
LetsUpp l Trending
● अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणांमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. एकीकडे भारत तालिबानबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची, या संभ्रमात आहे.
● तालिबानने मात्र भारताविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार आता अफगाणिस्तानमध्ये भारताला व्यापारी आणि आयात-निर्यातीसाठी बंदी घातली आहे.
● भारतीय निर्यात संघटनेचे संचालक डॉ. अजय सहाय यांनी याबाबत माहिती दिली आहे. तालिबानने व्यापारी मालाची वाहतूक बंद केली आहे.
● अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमार्गे मालाची ये-जा होत असे, आता मात्र तालिबान्यांनी हाच मार्ग रोखल्यामुळे अफगाणिस्तानमधील आयात-निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.
● भविष्यात तालिबानी प्रशासक काय निर्णय घेतात, याकडे आमचे लक्ष राहील, असे अजय सहाय यांनी सांगितले. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये अत्यंत चांगले व्यापारी संबंध आहेत.
● गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अफगाणिस्तानमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आता मात्र तालिबानच्या सत्तेनंतर ही सर्व समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे.
● भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात २०२१ मध्ये आतापर्यंत चांगला व्यापार झाला आहे. या कालावधीत भारताने अफगाणिस्तानात ८३५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
● भारत अफगाणिस्तानमध्ये साखर, औषधे, चहा, कॉफी, मसाले आणि कापड अशा गोष्टींची निर्यात करतो. अफगाणिस्तानमधून भारतात प्रामुख्याने सर्वाधिक ८५ सुकामेव्याची आयात केली जाते.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/p7VNbMH0Pib
6 624
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या
LetsUpp l Bulletin
● जानेवारीपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत १६५ रुपयांनी वाढ; १ जुलैला सिलिंडरच्या किमतीत २५.५० रुपयांनी वाढ करण्यात आली
● कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा; जनआशीर्वाद यात्रेबद्दल मंत्रिमंडळात चिंता
● राज्यात दिवसभरात ८ हजार १९६ जण कोरोनामुक्त; १५८ रूग्णांचा मृत्यू; राज्यात ५ हजार १३२ नवीन कोरोनाबाधित आढळले
----------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
● पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समितीची बैठक संपताच ‘एसीबी’चा छापा; स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेसह पाच जण ताब्यात; पालिकेत एकच खळबळ
● बीडीडी चाळवासीयांना नाममात्र मुद्रांक शुल्क प्रति सदनिका नाममात्र एक हजार रुपये आकारण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
● सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशपदासाठी नऊ जणांची कॉलेजियमकडून (न्यायवृंद) केंद्राला शिफारस; तीन महिला न्यायाधीश; न्या. श्रीनिवास ओक यांच्याही नावाचा समावेश
● सर्व भारतीयांना मायदेशी आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध : नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे; वंदे मातरम मोहिमेच्या धर्तीवर प्रयत्न
● अफगाणिस्तान : हेरात विद्यापीठातील महिलांना दिलासा; प्राध्यापिकांना काम करण्याची परवानगी, तालिबानची नवी भूमिका
● जागतिक युवा अॅथलेटिक्स स्पर्धा : भारताच्या मिश्र रिले संघाला कांस्यपदक; महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत प्रियाने दुसऱ्या विभागात तिसरे स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली
● कोरोना काळात पाहायला मिळाले चांगले-वाईट दिवस; अभिनेता जितेंद्र जोशीने व्यक्त केल्या भावना; जितेंद्र 'कार्टेल' या हिंदी वेबसीरिजमध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/FAJLGxtVPib
6 624
शाळेच्या कर्मचाऱ्यांना लावले कांदा लागवडीला ; संस्थाचालकाचा अजब कारभार
https://letsup.app.link/LoVZExk2Oib
6 624
आर आर पाटील जयंती विशेष; आबांचे 4 धडाकेबाज निर्णय
LetsUpp l Special
⭐ रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील… सर्वसामान्यांचे आबा… आज त्याच आबांची जयंती… 16 ऑगस्ट 1957 ला सांगली जिल्हातील तासगाव तालुक्यातल्या अंजनी गावातला त्यांचा जन्म… घरची हालाखीची परिस्थिती… पण शाळेत एकदम हुशार… दहावीच्या परीक्षेत तर आबा केंद्रात पहिले आले… पण परिस्थितीमुळे काम करत करत त्यांना पुढचं शिक्षण घ्यावं लागलं… ‘कमवा आणि शिका योजने’त काम करुन ते पुढचं शिक्षण घेऊ लागले…
💁♂️ पण आबांचा स्वभाव धडपड्या… तिथेही ते शांत बसले नाहीत… तिथे त्यांनी विद्यार्थ्यांचं संघटन केलं… एका आंदोलनात प्राचार्यांसमोर विद्यार्थ्यांची बाजू मांडताना त्यांनी जोरदार भाषण केलं… प्राचार्यांना आबांचं भाषण आवडलं… त्यांनी आबांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला दिला… त्यावर आबा म्हणाले, सर घरची परिस्थिती गरिबीची आहे. स्पर्धेला गेलो तर काम बुडेल, मग खाणार काय?, आबांचं उत्तर ऐकून प्राचार्यांच्या पोटात तुटलं. ते आबांना म्हणाले, काळजी करु नकोस.. तू स्पर्धेला जा… स्पर्धेच्या दिवसांत तुझ्या कामाची हजेरी लावली जाईल… तुला पैसे मिळतील… बस्स… इथूनच आबांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली…
💁♀️ आबांनी महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली… अनेक स्पर्धा जिंकल्या.. बक्षीसं जिंकली… आबांची भाषणकला दिवेसंदिवस बहरत होती… पुढे आबा राजकारणाकडे वळले… जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा राजकारणातला डोळे दिपवणारा प्रवास करुनही आबा शेवटपर्यंत सर्वसामान्यांसाठी आबाच राहिले, त्यांनी आबांचा ‘आबासाहेब’ होऊ दिला नाही…!
आर आर आबांचे चार निर्णय ज्यामुळे त्यांनी सामान्यांच्या मनात घर केलं!
💫 आघाडी सरकारमध्ये आर आर आबांनी अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. ग्रामविकास, गृह आणि पुढे उपमुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी आणि धोरणी निर्णय घेतले. ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी खांद्यावर असताना संपूर्ण राज्यभरात त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवलं. याच कामाने आबांना वेगळी ओळख मिळाली. गावंच्या गावं स्वच्छ झाली, लोकांनी एकत्र येऊन गावं स्वच्छ केलीच पण यानिमित्ताने अनेकांची मनंही स्वच्छ झाली…!
📌 गृहमंत्रीपदाच्या काळात त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवलं.. गावातल्या लोकांनी भांडणांपासून लांब रहावं आणि जरी भांडण-तंटे झाले तरी कोर्ट कचेरीची पायरी न चढता ते भांडणं गावातच मिटलं जावं, असा त्यापाठीमागचा उद्देश… या अभियानामुळे तुटलेली मनं जवळ आली…. अनेक गावांत कित्येक वर्षांचे भाऊबंदकीतले वाद संपले… दोन-दोन दशकांपांसून असलेले वाद संपुष्टात आले. गावात खऱ्या अर्थाने लक्ष्मी नांदू लागली… गावांनी विकासाच्या दिशेने एक-एक पाऊल टाकलं…
📍 आबांनी गृहमंत्री असताना मोठ्या प्रमाणात पोलीस भरती केली… त्यामुळे गोर-गरिबांची अनेक पोरं शासकीय सेवेत आली. पर्यायाने अनेक कुटुंबांची गरिबी संपली… पुढच्या पिढीला चांगले दिवस बघायला मिळाले… पण शासकीय सेवेत गेलेल्या गरीबांच्या पोरांना आबा सक्त ताकीद देत… की लग्न करताना हुंडा घ्यायचा नाही, आता आपली गरिबी संपली म्हणजे मुलीच्या घरच्यांना कर्जाच्या खाईत लोटाचयं नाही… अशा पद्धतीने पोरी-बाळींच्या बापाचा विचार करणारा राजकारणी विरळाच…
👉 आबांच्या आयुष्यातील एक गाजलेला प्रसंग म्हणजे डान्सबारवरील बंदी…डान्सबारमुळे अनेक तरुण वाममार्गाला लागतात… अनेकांचे संसार उध्वस्त होतात… अनेक तरुण पोरांनी जमिनी विकून त्यातून आलेला पैसा बारमध्ये बारबालांवर उधळला… स्वतःचा संसार आणि आयुष्य उद्ध्वस्त करुन घेतलं… अशा डान्सबारवर बंदी घालणं आवश्यक होतं… डान्सबारवर बंदी घालायचीच, असा पण आबांनी केला आणि त्यांनी तो पूर्णही करुन दाखवला. आबांच्या निर्णयाने अनेक लेकी-बाळींचे संसार वाचले… आजही कित्येक माता माऊल्या आबांना याच कामामुळे आशीर्वाद देतात… आबांबद्दल भरुभरुन बोलत असतात… हीच आबांच्या कामाची पोचपावची….
सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/LXIBE0i6Kib
6 624
राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
LetsUpp | Trending
⛈️ राज्यातील विविध भागांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान हवामान विभागाच्या मुंबई येथील केंद्राने वर्तवला आहे.
💁♂️ राज्यातील बहुतांश भागात गेल्या काही दिवस पाऊस गायब असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
🌱 पेरण्या झाल्यानंतर अपेक्षित पाऊस होत नसल्याने नापिकीचे संकट शेतकऱ्यांवर घोंगावत आहे.
👉 या परिस्थितीत हवामान विभागाने दिलेला अंदाज महत्त्वाचा आहे.
👍 विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
📍 काही भागात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यताही वर्तवली आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/RfYcbUeBLib
6 624
“..म्हणून मी देश सोडला”; अफगाणिस्तान सोडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांची फेसबुक पोस्ट
LetsUpp | International
⚡ अमेरिका आणि नाटो फौजा अफगाणिस्तानातून परत गेल्यानंतर सक्रिय झालेल्या तालिबानी बंडखोरांनी अवघ्या आठवडाभरातच जवळजवळ संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केलं आहे. तालिबाने अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर केलं आहे.
📍 २० वर्षांच्या लढाईनंतर अखेर तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. देशात हिंसाचाराला सामोरे जावं लागू नये म्हणून अनेकांनी देश सोडला आहे. दरम्यान राष्ट्रपती अशरफ घनी देखील देश सोडून पळून गेले आहेत. अफगाणिस्तानातून पळून गेलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडण्याचे कारण स्पष्ट केले आहे. फेसबुकवर रात्री उशिरा त्यांनी याबाबत माहिती दिली. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असे घनी यांनी म्हटले आहे.
काबूल उद्ध्वस्त झाला असता
💁♀️ “जर मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल,” असे घनी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
📌 मात्र, अशरफ घनी यांनी आपल्या पोस्टमध्ये ते सध्या कुठे आहेत हे सांगितले नाही. अफगाणिस्तानातील टोलो न्यूजच्या मते, घनी ताजिकिस्तानला गेले आहेत. शांती प्रक्रियेचे प्रमुख अब्दुल्ला-अब्दुल्ला यांनी अफगाणिस्तानला या स्थितीत आणण्यासाठी अश्रफ घनी यांना दोषी ठरवले. दरम्यान, अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्याचबरोबर काबूल विमानतळावरून उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.
💁♂️ तालिबानी बंडखोरांनी रविवारी काबूलमध्ये प्रवेश केला. मात्र ते शहराच्या मध्यभागाबाहेरच थांबले. दरम्यान, काही काळ काबूलच्या सीमेवर घालवल्यानंतर रविवार रात्री आपण या शहराच्या अंतर्भागात प्रवेश करू, असे तालिबानने सांगितले होते. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याने आता अफगाणिस्तान प्रशासनाच्या हाती फारसे काही उरलेले नाही.
देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/lSgx4hy8Kib
6 624
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या
LetsUpp l Bulletin
● औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असे करण्यासाठी हीच अनुकूल वेळ; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे मोठे विधान
● केबल ग्राहकांना टीव्हीवरचे कार्यक्रम आता मोबाईलवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना पाहता येणार; केबलवाल्यांनी आणली नवी यंत्रणा
● बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीतून निर्णय घ्यावा लागेल; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा इशारा; गोपीचंद पडळकर मात्र ठाम
● सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचं मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य; या वक्तव्यानंतर शिवसैनिकांकडून भरणेंवर जोरदार टीका, अखेर दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली दिलगिरी
● देशाच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी पुढील दोन वर्षांत १०० लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान गतिशक्ती योजना’ची पंतप्रधानांची घोषणा
● संसदेतील चर्चेची वाईट स्थिती; कायद्यांचा उद्देशच कळत नाही; सरन्यायाधीश एन.व्ही.रमण यांची संसदीय कामकाजावर परखड टिप्पणी
● बंगळुरूमध्ये गेल्या १० दिवसात ५०० हून अधिक मुलांना कोरोनाची लागण, तर आता ओडिशामध्ये १३८ मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आली समोर
● दिल्लीच्या शाळांमध्ये आता अभ्यासक्रमात ‘देशभक्ती’चा समावेश; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
● 'इंडियन आयडॉल'च्या बाराव्या सिझनचा विनर जाहीर; पवनदीप राजनने मारली बाजी, ठरला १२ व्या सिझनचा इंडियन आयडॉल
● अफगाणिस्तान अखेर तालिबानच्या मुठीत; राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सोडला देश, ठिकठिकाणी चकमकी
To know more click here
https://letsup.app.link/Ax7mGNGXKib
