LetsUpp Marathi
Открыть в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Больше6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - देशाच्या विविध राज्यांतील शिल्प खाद्यपदार्थांची रेलचेल असणारा हुनर हाट मेळा 11 फेब्रुवारीपासून दिल्लीत सुरू होणार
👉 नवी दिल्लीत विमानतळाजवळील हॉटेलमधून दोन आफ्रिकन महिलांना 4 किलो कोकेनसह केली अटक, या कोकेनची बाजारात किंमत 30 कोटी रुपये
👉 चंदिगड - गोव्यात विक्रमी 83 टक्के, तर पंजाबमध्ये 70 टक्के मतदान, पंजाबमध्ये काही ठिकाणी किरकोळ हिंसाचार, गोव्यात मतदान शांततेत
👉 बंगळुरू - नागरिकांच्या आधार कार्डप्रमाणे आता तुमच्या घराचाही डिजिटल आयडी क्रमांक, घराचा 8 अंकी अल्फान्यूमेरिक कोड असेल, यास स्टँडर्ड डिजिटल अॅड्रेस नंबर संबोधले जाईल
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 7 मुस्लिम देशातील नागरिकांवर अमेरिकेने घातलेली बंदी मागे, ट्रम्प प्रशासनाचा निर्णय
👉 इस्लामाबाद - भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांची नवाझ शरीफ सरकारने देशाच्या नव्या विदेश सचिवपदी केली नियुक्ती
👉 मेघालयमध्ये बंदी घालण्यात आलेले 50 लाख रुपयांचे फेन्सेडील कफ सिरप कस्टम विभागाने केले जप्त
👉 संयुक्त राष्ट्रे - संयुक्तराष्ट्राने 'काबुलचा कसाई' नावाने कुख्यात गुलबुद्दीन हिकमतयारची अतिरेक्यांच्या यादीतून काढले बाहेर
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मुंबई - महापालिका निवडणुक, यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना गोंधळ उडाल्याने तब्बल 140 उमेदवारांचे अर्ज बाद
👉 मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्यामुळेच मुंबईचा विकास होऊ शकला नाही, हे दुसरं कुणी नाही तर त्यांचाच सत्तेतला मित्रपक्ष सांगतोय - शरद पवार
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 सांगली - सांगलीतील कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात भर दुपारी गोळाबाराची, अक्षय सुरवसे या तरुणावर दुचाकीस्वारांनी केला गोळीबार, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
👉 जालना - औरंगाबाद-नांदेड महामार्गावर बदनापूरजवळ दुधना नदीच्या पुलावर चालकास डुलकी, अपघातात 2 जण ठार तर 5 जण गंभीर जखमी
👉 औरंगाबाद - वाहन अपघाताच्या नावाखाली बनावट कागदपत्रे सादर करून विमा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी 3 आरोपींना 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 गुगलने आयओएस युजर्ससाठी क्रोम ब्राऊजरमध्ये आता क्युआर आणि बार कोड स्कॅनर हे इनबिल्ट स्वरूपात केले प्रदान
🎯 खेळ घडामोडी :
👉 जोहान्सबर्ग - आता दक्षिण आफ्रिकेत 8 संघांच्या फ्रँचायझी आधारित टी-20 ग्लोबल लीग, या वर्षअखेर होऊ शकते आयोजन
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - पाकिस्तानातील प्रेक्षक 'रईस' चित्रपटाची प्रतीक्षा करीत आहे : अभिनेत्री माहिरा खान
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
तुमच्या फायद्याचे Flipkart अॅप
Flipkart ही भारतातली एक अग्रणीय ई-कॉमर्स अथवा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य कंपनी असून तिचे मुख्यालय बंगळूरू, कर्नाटक येथे आहे. Flipkart ची स्थापना सचिन बन्सल व बिन्नी बन्सल यांनी सन 2007 मध्ये केली आहे. सुरुवातीच्या काळात फ्लिपकार्टने आपले लक्ष विविध पुस्तके विकण्यात केंद्रित केले होते परंतु आता ते सुईपासून ते अगदी जहाजापर्यंत वस्तूंची विक्री करतात...
🎯 Flipkart चा इतिहास
👉 Flipkart एक प्रायव्हेट कंपनी आहे...
👉 स्थापना : 2007
👉 संस्थापक : सचिन बन्सल व बिन्नी बन्सल
👉 मुख्यालय : बंगळुरू, कनार्टक, इंडिया
👉 सेवा : ई-कॉमर्स (ऑनलाईन सर्व्हिसेस)
👉 स्लोगन : "अब हर Wish होगी पूरी"
🎯 Flipkart चे फायदे
👉 विविध प्रकारचे डिस्काउंट आणि ऑफर उपलब्ध
👉 अतिशय सोप्या पद्धतीची सेवा…
👉 सहज हाताळता येईल अशा पद्धतीची वेबसाईट…
👉 ग्राहकांना जास्तीत जबरदस्त सेवा देऊन संतुष्ट करणे…
👉 पेड करण्याच्या विविध उपलब्ध…
अशा प्रकारे Flipkart ने काळानुसार बदल करत ग्राहकांना विविध सेवांद्वारे आकर्षित केले आहे. त्यामुळे ऑनलाईन जमान्यासोबत राहण्यासाठी आपल्या सर्वांकडे Flipkart सारखे अॅप मोबाईलमध्ये असायलाच हवे.. हो की नाही? हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा http://fkrt.it/su9FLTuuuN
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 जम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे पोलीस चकमकीत ठार झालेल्या 2 अतिरेक्यांकडून 1 पिस्तूल आणि 1 ऐके-47 रायफल जप्त
👉 नवी दिल्ली - जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरल्याप्रकरणी पेटीएम आणि रिलायन्सला ग्राहक व्यवहार, अन्न आणि पुरवठा मंत्रालयातर्फे नोटीस
👉 हिमाचल प्रदेश भूकंपाने हादरले, चंबा जिल्ह्यात जाणवले धक्के, या भूकंपाची तीव्रता 3.5 रिस्टर स्केल इतकी होती
👉 गडचिरोली - अवैधरित्या दारुची तस्करी करणा-या ठिकाणावर कारवाई, साडे अकरा लाख रुपयांची दारू जप्त, गडचिरोली राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
👉 छत्तीसगड - दंतेवाडाच्या मार्गावर मिळाला 5 किलोचा आयईडी बॉम्ब, बॉम्ब निरोधक पथकाने केला निष्क्रिय
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 वॉशिंग्टन - अमेरिकेत 7 मुस्लीम देशांतील नागरिकांना प्रवेश बंदी आदेशानंतर तब्बल 1 लाख व्हिसा रद्द, या आदेशामुळे ट्रम्प यांच्यावर चौफेर टीका
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मेरठ - भाजपसाठी उत्तर प्रदेश विधानसभेची ही निवडणूक ही ‘स्कॅम’विरोधातील लढाई आहे आणि सपा, काँग्रेस, अखिलेश आणि मायावती हे ‘स्कॅम’ आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
👉 पटना - अमित शहा कोणी राजकीय व्यक्ती नसून ते तर एक उद्योगपती आहेत. ते पैशांचा खेळ करतात : लालूप्रसाद यादव
👉 नाशिक - भाजपकडून एका तिकीटासाठी चक्क 2 लाख रुपये कार्यालयातच गोळा केले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - ज्युसरच्या मोटरमधून नेण्यात येत असलेले 1048 ग्रॅम सोने जप्त, सोन्याची किंमत 27 लाख 81 हजार 308 रुपये, एकाला अटक
👉 पुणे - सॉफ्टवेअर इंजिनीअर रसिला राजू ओपी हिच्या खून प्रकरणी सुरक्षारक्षकाच्या पोलीस कोठडीत 7 फेब्रुवारीपर्यंत वाढ
👉 नाशिक - विनायक पांडे मारहाण प्रकरण, नाशिकमध्ये 6 शिवसैनिकांवर शस्त्रबंदी कायदा भंगप्रकरणी गुन्हा दाखल
👉 सोलापूर - महिलेला बेदम मारहाण करत गावगुंडाने केला तिचा विनयभंग, बार्शीतील घटना, महिलेची तक्रार घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ झाल्याचा आरोप
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 नवी दिल्ली - 'हीरो' कंपनीने आपली एक नवी कोरी इको-फ्रेंडली स्कूटर 'फ्लॅश' लॉन्च केली, ही एक इलेक्ट्रिक स्कूटर असून ती चार्ज केल्यावर चालते, या स्कुटरची दिल्लीमध्ये शोरुम किंमत 19,990 रुपये आहे
🎯 खेळ घडामोडी :
👉 नवी दिल्ली - क्रिकेटचे बायबल समजल्या जाणाऱ्या विस्डेनने भारताचा कर्णधार विराट कोहलीचे चित्र आपल्या कव्हरपेजवर छापले
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री माही गिल यांच्या आगामी ‘वेडींग अॅनिव्हर्सरी’ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 फायदेशीर संकेतस्थळे...
Let's Up Faide Ki Baat
इंटरनेटवर बरीचशी संकेतस्थळे निरनिराळी ऑनलाईन सेवा देतात म्हणजेच एखादी गोष्ट करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर डाऊनलोड न करता आपण ते काम ऑनलाईन आणि मोफत करु शकतो. अशाच काही आवश्यक कामासाठी लागणार्या संकेतस्थळांची यादी जाणून घेऊयात...
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 ऑनलाईन टिव्ही सोबत मंदिरांचे ऑनलाईन दर्शन : www.dittotv.com
👉 इंटरनेटवरुन मोफत फोन करा : www.call2friends.com
👉 PDF फाईल बनविण्यासाठी : www.pdfonline.com
👉 अनेक PDF फाईलींची एकच फाईल करण्यासाठी : www.mergepdf.net
👉 ऑनलाईन गाण्याचा प्रकार बदलण्यासाठी : www.mediaconverter.org
👉 एखाद्या संकेतस्थळीची PDF फाईल बनविण्यासाठी : www.pdfmyurl.com
👉 फाईलचा प्रकार बदलण्यासाठी : www.convertfiles.com व www.online-convert.com
👉 इंग्रजी - मराठी शब्दकोश (Dictionary) : www.khandbahale.com
👉 ऑनलाईन टॅक्स भरण्याचे संकेतस्थळ : www.incometaxindiaefiling.gov.in
👉 आकाराने मोठ्या फाईल्स पाठविण्यास मदत करणारे संकेतस्थळ : www.wetransfer.com
👉 गाड्यांच्या क्र. माहिती, फोन क्र., पीनकोडची माहितीसाठी : www.indiatrace.com
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 फेसबुकचे पौगंडावस्थेत पदार्पण!
Let's Up Techno Katta
सोशल नेटवर्किंग म्हटलं कि, फेसबुक आठवतंच. 4 फेब्रुवारी 2004 रोजी अस्तित्वात आलेल्या फेसबुकला आता 13 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजे रूढ अर्थाने आता फेसबुकने पौगंडावस्थेत पदार्पण केले आहे. यानिमित्त जगभरातील युजर्सला ‘फ्रेंडस् डे’ साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, फ्रेंडस् डे साजरा करण्यासाठी फेसबुकने आपल्या युजर्सला खास व्हिडीओ शेअर करण्याची सुविधा दिली आहे. यात संबंधीत युजरचे आपल्या अन्य मित्रांसोबतचे क्षण देण्यात आले आहेत. कुणीही हा व्हिडीओ आपल्या टाईमलाईनवर शेअर करू शकतो. याचप्रमाणे मित्रांसोबत हा दिवस साजरा करण्यासाठी फेसबुक मॅसेंजरवर खास GIF अॅनिमेशनयुक्त थीम्स सादर करण्यात आल्या आहेत.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 बीएसएनएलची खास ऑफर
बीएसएनएलने आपल्या दरात सुमारे 3/4 ने कपात करत 3 जी इंटरनेटची खास ऑफर जाहीर केली आहे. त्यानुसार आता 1 जीबी डाटा फक्त 36 तर 2 जीबी डाटा हा 78 रुपयांत मिळणार आहे. आपल्या स्पेशल टेरिफ व्हॉऊचर्सचा डाटामध्ये भारत संचार निगम लिमीटेड यांनी 4 पट वाढ केली आहे. असे बीएससएनएलने पत्रकात म्हटले आहे. 291 रुपयांत आता 8 जीबी डाटा 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसाठी मिळणार आहे. टेलीकॉम इंडस्ट्रीत सर्वात कमी दरात म्हणजे 36 रुपयांत 1 जीबी डाटा देण्याची बीएसएनएलकडून ऑफर देण्यात आली आहे. रिलायन्सने आपल्या ग्राहकांना 31 मार्चपर्यंत फ्री डाटा देण्याची ऑफर दिली आहे. पण दिवसात 1 जीबी डाटा वापरण्याची मुभा दिली आहे...
👉 भारतात फेसबूक तेजीत
रिलायन्स जिओने दिलेल्या फ्री इंटरनेटचा फेसबूकला जबरदस्त फायदा झाला आहे. डिसेंबरच्या तिमाहीत भारतातून फेसबूकचा वापर वाढल्याची माहिती फेसबूककडून देण्यात आली आहे. भारतातून झालेली ही वाढ विक्रमी असल्याचेही फेसबूकने सांगितले आहे. यंदाच्या तिमाहीत आशियातून मंथली यूजर्सनी 44 दशलक्षचा टप्पा ओलांडला आहे. फेसबूकचे भारतामध्ये 19 कोटी 50 लाख यूजर्स आहेत. भारतानंतर अमेरिकेचे 19 कोटी 10 लाख यूजर्स आहेत.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात भरती
Let's Up Job Updates
पोस्ट : फील्ड वैद्यकीय अधिकारी - जागा : 05 - पात्रता : M.B.B.S
पोस्ट : जनरल शुल्क वैद्यकीय अधिकारी - जागा : 01 - पात्रता : M.B.B.S
वया : दि. 04 फेब्रुवारी 2017 रोजी 60 वर्षे
थेट मुलाखत : दि. 04 फेब्रुवारी 2017 (वेळ: 9.30 AM)
मुलाखतीचे ठिकाण : 2nd Floor- Conference Hall, NBP Green Heights, Plot No C-69 , Opposite MCA, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051.
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/TMSOxZ
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/FrQWJ5
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
NEET 2017-18
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत MBBS/BDS अभ्यासक्रम प्रवेशाकरिता राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे.
वय : दि. 07 मे 2017 रोजी 25 वर्षे (SC/ST/OBC:05 वर्षे सूट)
फी : 1400 रुपये (SC/ST/PH 750रुपये)
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) : दि. 07 मे 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 01 मार्च 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/GQH4bw
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/5Wk13T
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 ‘बघतोस काय मुजरा कर’
Let's Up Movie Review
बहुचर्चित ‘बघतोस काय मुजरा कर’ हा सिनेमा आज रिलीज झाला. शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी करोडो रूपये दिले जातात. पण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी, विकासासाठी, डागडुजीसाठी राजकीय लोक उदासिन दिसतात. या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना केवळ गळ्यात घालून फिरणा-या आणि त्यांच्या विचारांना अजिबात थारा न देणा-यांसाठी चांगला मेसेज आहे. नुकतीच मंजूरी मिळालेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकावरही हा सिनेमा अप्रत्यक्षिरित्या भाष्य करतो.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
कथा : हि कथा आहे सातारा जिल्ह्याच्या एका गावातील 3 तरूणांची. त्यातील एक नानासाहेब देशमुख (जितेंद्र जोशी) हा गावचा सरपंच आहे. तर त्याचे मित्र पांडा (अभिकेत विश्वासराव) आणि शिवा (अक्षय तांकसाळे) हे आहेत. नानासाहेब हे शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित आहे. त्यांना शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं संवर्धन करायचं आहे. त्यासाठी त्यांनी एक प्रोजेक्टही तयार केला आहे. पण राजकीय उदासिनतेमुळे त्यांचा प्रोजेक्ट नाकारला जातो.
या प्रोजेक्टमधून महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनासोबतच पर्यावरणपुरक कामेही त्यांना करायची आहे. हे सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही आमदार व्हा, असं सुचवतात. त्यानुसार ते तिकीट मागायला जातात. पण पक्षश्रेष्ठी नानासाहेबांना काहीतरी मोठं करण्याचा सल्ला देतात. त्यानुसार नानासाहेब आणि त्यांचे मित्र शिवाजी महाराजांची लंडनमधील तलवार परत आणण्याचा निर्धार करतात. ते लंडनला जातात आणि तेथून महाराजांची तलवार चोरून परतही आणतात. पण त्यानंतर मोठं रामायण घडतं, ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमाच पाहावा लागेल.
कलाकारांचा अभिनय : अभिनेता जितेंद्र जोशी याने साकारलेला शिवप्रेमी तरूण सरपंच चांगला झालाय. अनिकेत विश्वासराव, अक्षय तांकसाळे, हेमंत ढोमे, नेहा जोशी, पर्ण पेठे सर्वांनी चांगलं काम केलंय.
या सिनेमातील सर्वच गाणी उत्तम असून मजेदार संवादही छान झाले आहेत. दिग्दर्शक हेमंत ढोमे याने या सिनेमासाठी लेखन चांगलं केलं आहे. दिग्दर्शक म्हणून हा हेमंतचा पहिलाच सिनेमा असला तरी त्याने तो चांगल्याप्रकारे समोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्याने कास्टींग चांगलं केलं आहे. ही कथा काही वाईट नाहीये, पण जेवढ्या अपेक्षा या सिनेमाकडून होत्या त्या पूर्ण होत नाहीत, हे हि तितकेच खरे…
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर घालण्यात आलेले सारे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. लवकरच बचत खात्याची 24000 रुपये काढण्याची मर्यादाही संपुष्टात येईल : अर्थसचिव शक्तीकांत दास
👉 नवी दिल्ली - सराफांचा संप, व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक असणे आणि नोटाबंदीचा निर्णय यामुळे सोन्याच्या मागणीत 21 टक्क्यांची घट : वर्ल्ड गोल्ड काऊंसिल
👉 नवी दिल्ली - कॅशलेसच्या प्रचारासाठी केंद्राकडून 3 महिन्यांत 94 कोटींचा खर्च, राज्यवर्धन सिंग राठोड यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला हे लेखी उत्तर दिले
👉 नवी दिल्ली - युपीए-एनडीएच्या सामन्यात मधल्यामध्ये माझा फुटबॉल झाल्याने दाद मागायला अंपायरही नाही, विजय मल्ल्यांनी केले ट्विट
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 पॅरिस - फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील लुवर संग्रहालयात घुसखोरीचा प्रयत्न, संशयित घुसखोराला अडवताना 1 सैनिक जखमी, हल्लेखोर अद्याप जिवंत
🎯 राजकीय घडामोडी :
👉 उत्तर प्रदेश - शिवपाल यादव यांच्यासाठी 9 फेब्रुवारीपासून प्रचार करणार, त्यानंतर अखिलेशसाठी प्रचार करणार, मुलायमसिंग यादव यांची घोषणा
👉 मुंबई - मुंबईत भाजप आणि मित्रपक्षाच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित, भाजप 195 जागांवर लढणार, तर मित्रपक्षांना एकूण 34 जागा
👉 मुंबई - महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेचे 175 उमेदवार जाहीर, यादी जाहीर न करता मनसेकडून थेट एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले
👉 ठाणे - शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक बाळा घाग आणि त्यांची पत्नी संगीता घाग यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज केला दाखल
👉 नाशिक - नाशिमधील चांडक सर्कल परिसरात तिकीट वाटपावरुन शिवसेनेच्या दोन गटात राडा, माजी महापौर विनायक पांडे आणि शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते समर्थक भिडले
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 नागपूर - विष प्रयोग करुन पत्नीची हत्या, आरोपी मुकेश पाटील विरोधात गुन्हा दाखल, यशोधारांगरातील धक्कादायक प्रकार
👉 औरंगाबाद - बनावट अपघातांची कागदपत्रे तयार करुन विमा कंपन्याना फसवणूक करणा-या रॅकेटचा पर्दाफाश, डॉक्टर, वकिलासह पोलीस कर्मचारी अटकेत
👉 कोल्हापूर - इचलकरंजी नगरपालिका बरखास्त का करु नये ?, अशी विचारणा उच्च न्यायालयाने नगरपालिकेला केली आहे
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28240.52, निफ्टी : 8740.95, सोने भाव : 28,900 (प्रतितोळा), चांदी : 41,619 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 बंगळुरू - अॅपल कंपनी भारतात (बंगळुरूमध्ये) आयफोन्सची निर्मिती करणार हे आता अधिकृतरित्या जाहीर, हा आयफोन बाजारपेठेत येण्यासाठी जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता
🎯 खेळ घडामोडी :
👉 मेलबर्न - लवकर स्पिन खेळणं शिका, जर स्पिन खेळणं येत नसेल तर भारतात जाऊच नका : केविन पीटरसन
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या 'बाहुबली - द कन्क्लुजन' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच तब्बल 500 कोटी रुपयांची केली कमाई
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 आयसीसी क्रमवारी जाहीर...
Let's Up Sports Katta
आयसीसी क्रमवारीत टी-20 सामन्यांसाठीच्या फलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अव्वल स्थान कायम राखले आहे. इंग्लंडवर मिळवलेल्या 2-1 अशा विजयाच्या निकषावर भारतीय संघ टी-20च्या आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर दाखल झाला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा अॅरॉन फिन्च हा दुसऱ्या स्थानावर असून, विराटच्या खात्यात फिन्चपेक्षा 28 गुण अधिक आहेत. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. के. एल. राहुलने 15 व्या स्थानावर मजल मारली आहे.
भारताचा कर्णधार कोहली कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या, तर वन डे सामन्यांसाठीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समध्ये पहिल्या पाचात स्थान मिळवणारा तो एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे. टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला इम्रान ताहिरपेक्षा फक्त 4 गुण कमी आहेत. रविचंद्रन अश्विन आठव्या, तर आशिष नेहरा 24 व्या स्थानावर आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 धोनीच्या नावे अनोख्या विक्रमाची नोंद!
क्रिकेटविश्वात एक फलंदाज म्हणून मॅच विनर अशी ओळख भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या धोनीने निर्माण केली. धोनीच्या नावावर टी-20 करिअरमध्ये तर एका अनोख्या विक्रमाची नोंद आहे. धोनी गेल्या 11 वर्षात एकदाही शून्यावर बाद झालेला नाही. धोनी टी-20 क्रिकेटमध्ये याआधी 2006 साली द.आफ्रिकेविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. यानंतर धोनीने एकूण 64 टी-20 सामने खेळले आणि यात धोनी एकदाही शून्यावर बाद झालेला नाही.
👉 म्हणून आयपीएल लिलाव उशिरा...
गेल्या नोव्हेंबरमध्ये आयपीएल आयोजन परिषदेने आयपीएल 2017 साली 5 एप्रिल ते 21 मे अशी तारीख ठरविली होती व त्यासाठीचे लिलाव 4 फेब्रुवारीला होणार होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे अध्यक्ष ठाकूर व सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविल्याने व सर्वोच्च न्यायालयाकडून बीसीसीआयवर प्रशासक नियुक्ती करण्यास विलंब झाल्याने आयपीएल साठीचा निर्णय घेण्यास उशीर होत असल्याचे समजते.
बीसीसीआयचे सीईओ राहुल जौहरी यांच्या मते अजूनही हे लिलाव 4 फेब्रुवारीला होऊ शकले असते मात्र देशात सध्या स्थानिक टी-20 सामने सुरू आहेत ते 18 फेब्रुवारीला संपणार आहेत. या सामन्यातूनही काही टॅलेंटेड खेळाडू शोधण्यास मदत होईल म्हणून लिलाव नंतर होतील. हे लिलाव दि. 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे. मात्र बीसीसीआयने या लिलावांची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 27 महापालिका ; महापौरपदाची सोडत जाहीर
Let's Up Special Update
महाराष्ट्र राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. 27 महानगरपालिकांपैकी 14 महानगरपालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. महापौरपदाच्या आरक्षण सोडतीत अनुसूचित जमातीसाठी 1, अनुसूचीत जातीसाठी 3, इतर मागास वर्ग महिला 4, इतर मागास वर्ग सर्वसाधारण 3, खुला प्रवर्ग महिला 8 आणि खुला प्रवर्ग सर्वसाधारण 8 असे आरक्षण जाहीर झाले आहे.
महापौरपदांच्या आरक्षणाच्या सोडत खालील प्रमाणे…
नाशिक : अनुसूचित जमाती । पनवेल : अनुसूचित जाती (महिला) । नांदेड वाघाळा : अनुसूचित जाती (महिला) । अमरावती : अनुसूचित जाती
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित महापालिका
मीरा भाईंदर : ओबीसी महिला
नवी मुंबई : सर्वसाधारण
पिंपरी चिंचवड : सर्वसाधारण
सांगली मिरज कुपवड : ओबीसी महिला
जळगाव : ओबीसी महिला
औरंगाबाद : सर्वसाधारण
चंद्रपूर : ओबीसी महिला
खुल्या प्रवर्गासाठी 16 महापालिका आरक्षित
खुला गट - पुरुष
मुंबई : खुला साधारण
वसई विरार : खुला साधारण
भिवंडी : खुला साधारण
लातूर : खुला साधारण
मालेगाव : खुला साधारण
धुळे : खुला साधारण
अकोला : खुला साधारण
अहमदनगर : खुला साधारण
खुला गट- महिला
ठाणे : खुला प्रवर्ग महिला
कल्याण डोंबिवली : खुला प्रवर्ग महिला
नागपूर : खुला प्रवर्ग महिला
पुणे : खुला प्रवर्ग महिला
उल्हासनगर : खुला प्रवर्ग महिला
परभणी : खुला प्रवर्ग महिला
सोलापूर : खुला प्रवर्ग महिला
कोल्हापूर : खुला प्रवर्ग महिला
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 आता इंस्टाग्रामवर करा मल्टि फोटो शेअरिंग...
Let's Up Techno Katta
इंस्टाग्राम हे व्हिडीओ आणि फोटो शेअरिंगसाठीचे लोकप्रिय माध्यम आहे. इंस्टाग्राम यूजरसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, आम्ही तुम्हाला जी बातमी सांगणार आहोत ती खरी आहे. इंस्टाग्राममध्ये नवीन फिचर लाँच होणार आहे. पूर्वी इंस्टाग्रामवर एकावेळी फक्त एक फोटो शेअर करता येत होता पण नव्या फिचर नुसार आता युजर्सला आपल्या पोस्टमध्ये एकापेक्षा जास्त फोटो शेअर करण्याची सुविधा मिळणार असून या फिचरची चाचणी सुरू आहे.
इंस्टाग्रामवर सध्या ही सुविधा पेड युजरला देण्यात आली आहे. तर काही अॅप्लीकेशनच्या मदतीने कोणताही युजर फोटोंचा कोलाज अपलोड करू शकतो. मात्र आता अल्बम अपडेट करण्याचे फिचर सर्व युजर्सलाही मिळणार आहे. इंस्टाग्रामच्या या आगामी अपडेटमध्ये कोणताही युजर आपल्या गॅलरीतील दहा फोटो निवडून त्याला विविध फिल्टर्सच्या मदतीने एडिट करून त्यांना अल्बमच्या स्वरूपात शेअर करू शकणार आहेत.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 आजपासून ट्विटरवरही भरणार साहित्य संमेलन
मराठी साहित्य संमेलनाच्या मानात आणखी एक तुरा रोवला जाणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाची आजपासून सुरुवात झाली असून तंत्रज्ञानाच्या बाबतीतही मराठी साहित्य संमेलन मागे नसणार आहे, कारण ट्विटरवर ही संमेलन भरणार आहे. ‘मराठी वर्ड’ या ट्विटर अकाऊंट ग्रुपने ट्विटर संमेलनाचं आयोजन केले आहे. 3 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान ट्विटर संमेलन असेल. यामध्ये 4 दिवस वेगवेगळ्या हॅश टॅगचा वापर करून मराठी यूझर्स संमेलनात सहभागी होऊ शकतील.
ट्विटर संमेलनाचा मुख्य हॅशटॅग #ट्विटरसंमेलन आहे आणि सोबत 12 हॅशटॅग देण्यात आले आहेत. या हॅशटॅगचा वापर करुन व्यक्त होण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
12 हॅशटॅग :
#माझीकविता I #माझीकथा I #माझाब्लॉग I #माझीबोली I #साहित्यसंमेलन I #वाचनिय I #हायटेकमराठी I #बोलतोमराठी I #मराठीशाळा I #भटकंती I #खमंग I #माझाछंद
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी, मुंबई येथे विविध पदांची भरती
Let's Up Job Updates
पोस्ट : पदव्युत्तर शिक्षक (PGT) - जागा : 02 - पात्रता : 50 % गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed.
पोस्ट : प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) - जागा : 12 - पात्रता : 50 % गुणांसह पदवी, CTET iii) B.Ed
पोस्ट : विशेष शिक्षक - जागा : 01 - पात्रता : 50 % गुणांसह पदवी, CTET iii) B.Ed
पोस्ट : ग्रंथपाल - जागा : 03 - पात्रता : 50 % गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदवी
पोस्ट : प्राथमिक शिक्षक - जागा : 30 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण, CTET, D.Ed
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
पोस्ट : PRT (Music) - जागा : 06 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण, 50 % गुणांसह Music पदवी
पोस्ट : प्रास्तविक शिक्षक - जागा : 08 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण, 50 % गुणांसह ECCEd./NST/PPTT डिप्लोमा
पोस्ट : कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT) - जागा : 01 - पात्रता : पदवीधर, हिंदी / इंग्रजी अनुवाद पदव्युत्तर डिप्लोमा, 02 वर्षे अनुभव
वय : दि. 17 फेब्रुवारी 2017 रोजी 40 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट , OBC: 03 वर्षे सूट)
फी : 750 रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Administrative Officer, Atomic Energy Education Society, Central Office, Western Sector, Anushakti nagar, Mumbai - 400094
अर्ज करण्याची मुदत : दि. 17 फेब्रुवारी 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/HDDihf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/tiFP27
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - शारदा चिट फंड घोटाळ्यात ईडीने मतंग सिंग यांची दिल्लीतील 63 कोटींची संपत्ती केली जप्त, आतापर्यंत 700 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली
👉 गुजरात - कच्छ जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळील सर क्रीकजवळ बीएसएफने पाकिस्तानी मच्छीमारांची बोट केली जप्त
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एच-वन बी व्हिसासंबंधी कार्यकारी आदेश काढण्याची कोणतीही योजना नाही, प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन देणगीदार शलभ शॅली कुमार यांची माहिती
🎯 राजकीय घडामोडी :
👉 पंजाब व गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली, पंजाबच्या 117 आणि गोव्याच्या 40 जागांसाठी शनिवारी मतदान होणार
👉 ठाणे - ठाणे महापालिका निवडणुकीत महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार, भाजपसोबत बोलणी फिस्कटल्याने घेतला निर्णय
👉 मुंबई - राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात येणार
👉 सोलापूर - महापालिकेच्या निवडणुकीसाठी काल एका दिवसात 149 उमेदवारी अर्ज दाखल, तर एकूण 191 अर्ज दाखल
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - नेक्स्टला विरोध करण्यासाठी राज्यभरात विविध रुग्णालयांमध्ये मार्डच्या डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला
👉 कोल्हापूर - कागल तालुक्यातील पिराचीवाडी गावात चालणार्या गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांच्या पथकाने टाकला छापा
👉 उस्मानाबाद - प्रेमप्रकरणातून काढलेल्या व्हिडीओची धमकी देत युवतीवर अत्याचार, एकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
🎯 खेळ घडामोडी :
👉 मुंबई - कर्णधार विराट कोहली आयसीसी क्रमवारीत T-20 सामन्यातील फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी कायम तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर
👉 मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघातील जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामी आणि सुकन्या परिदा जखमी, वर्ल्डकपच्या पात्रता सामन्यांना मुकणार
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - दिव्या खोसला कुमारचे कभी यादोंमे हे नवीन गाणं रीलिज झाल असून अवघ्या 4 दिवसांमध्ये तब्बल 72 लाख जणांनी हे गाणं यु ट्यूबवर पाहिलं
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 लवकरच पोस्टऑफीसमध्ये मिळणार पासपोर्ट
Let's Up Current Affair
पासपोर्ट बनवण्यासाठी आता अधिक कष्ट घ्यावे लागणार नाही. कारण आता पोस्ट ऑफीसमध्येच पासपोर्ट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. बजेटमध्ये केंद्र सरकारने यासंदर्भात घोषणा केली आहे. यानुसार काही शहरांमधील मुख्य पोस्ट ऑफीसमध्ये पासपोर्टसाठी अर्ज करुन त्यानंतर त्यांना ते डिलीव्हर केले जातील. यासाठी परराष्ट्र मंत्रालयांने पासपोर्ट अॅक्टनुसार पोस्ट ऑफीसला अधिकार देणार आहे. यासाठी पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना खास ट्रेनिंग दिली जाणार आहे. पुढील काही महिन्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्याची सरकारची योजना आहे. सामान्यांना याचा अधिक फायदा होणार आहे...
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 स्मार्टफोनच्या किंमती वाढणार
2017-18 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रिंटेड सर्किट बोर्ड्सवर 2 टक्क्यांचा विशेष अतिरिक्त कर आकारणार असल्याची घोषणा केली आहे. प्रिंटेड सर्किट बोर्ड्स परदेशातून भारतात आयात केले जातात. त्यामुळे स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये येत्या आर्थिक वर्षात मोठी वाढ होणार आहे. देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देण्यासाठी प्रिंटेड सर्किट बोर्ड्सवर 2 टक्क्यांचा विशेष अतिरिक्त कर लावण्यात येत असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. यामुळे देशात प्रिंटेड सर्किट बोर्ड्सची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना फायदा होईल, असे जेटली यांनी म्हटले आहे.
👉 आयटी रिटर्न वेळेवर भरा अन्यथा होईल दंड!
नव्या करदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी यांच्या बजेटमध्ये एक नवी घोषणा केली आहे. जे करदाता पहिल्यांदा आयकर रिटर्न फाइल करतील त्यांना एका वर्षापर्यंत स्क्रूटनी असणार नाही. तसेच 5 लाखांपर्यंत उत्पन्नधारकांना एक पानी फॉर्म भरुन आयटी रिटर्न भरता येईल. पण जे उशीरा रिर्टन फाइल करतील त्यांना मात्र दंड भरावा लागेल. आयटी रिटर्न जमा करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर जर रिटर्न भरल्यास त्यावर 5000 दंड लागणार आहे. तसेच 31 डिसेंबरनंतर आयटी रिटर्न भरल्यास 10,000 रु. दंड लागणार आहे. ज्यांचे उत्पन्न 5 लाखाहून कमी आहे अशा उत्पन्नधारकांना मात्र, 1,000 दंड बसणार आहे. यापुढे जर तुम्ही वेळेत आयटी रिटर्न फाईल केले नाही तर तुम्हाला दंड बसू शकतो.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 जम्मू काश्मीर - सांबा विभागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, बीएसएफच्या पोस्टवर केला गोळीबार
👉 नवी दिल्ली - सप्टेंबर 2017 पर्यंत लँडिंग रेटमध्ये बँका 50 ते 75 टक्के कपात करु शकतात, बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या अहवालात वर्तवण्यात आला अंदाज
👉 नवी दिल्ली - 5 राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना आणि अन्य कोणत्याही व्यक्तीला सरकारच्या प्रमाणपत्राशिवाय 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी वृत्तपत्रात जाहिरात देण्यात येणार नाही : निवडणूक आयोग
👉 उत्तरप्रदेश - मुगलसरायमध्ये रेल्वे मार्गावर मालवाहतूक ट्रेन आणि पिकअप व्हॅनमध्ये धडक, व्हॅन ड्रायव्हर जखमी
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 कुवेत - कुवेतने सीरिया, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणमधील नागरिकांना व्हिसा देणे केले स्थगित
👉 श्रीलंकेच्या सागरी हद्दीत मासेमारी केल्याच्या आरोपावरुन श्रीलंकन नौदलाने तामिळनाडूच्या 5 मच्छीमारांना केली अटक, त्यांच्या बोटी केल्या जप्त
👉 अबुजा - 130 महिलांचा पती आणि 203 मुलांचा पिता असलेल्या नायजेरियाचे मौलवी मोहम्मद बेल्लो अबुबकर यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन
🎯 राजकीय घडामोडी :
👉 उत्तर प्रदेश - विरोधी पक्ष खोटे ओपिनियन पोल आणि सर्वे दाखवून निवडणुकीसाठी आपली हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुका झाल्या की यांची पोलखोल होईल : मायावती
👉 मुंबई - मी महापालिका निवडणूक लढणार नाही, मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेने नेत्या शुभा राऊळ यांनी केले जाहीर
👉 मुंबई - शिवसेनेचे नाराज विद्यमान नगरसेवक नाना आंबोले यांनी शिवसेनेला रामराम करत भाजपची वाट धरली
👉 मुंबई - वॉर्ड क्रमांक 199 मधून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी जाहीर
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमणे तात्काळ हटवा अन्यथा तेथील वन अधिकाऱ्यांना कायमचे वनात पाठवू : उच्च न्यायालय
👉 उस्मानाबाद - जिल्ह्यातील 8 जण 3 ते 6 महिन्यांसाठी हद्दपार, पोलिसांच्या अहवालानुसार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई
👉 नाशिक - मनपा निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी भाजपा उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप उद्या केले जाणार, पालकमंत्री गिरीश महाजन यांची माहिती
👉 अहमदनगर - क्रिकेटपट्टू झहीर खान याला अहमदनगरचा ब्रँड अम्बेसिडर होण्याचे रसिक ग्रूपचे निमंत्रण, अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी झहीरची भेट घेऊन केली विनंती
👉 कोल्हापूर - जिल्हापरिषद महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ, याबाबत राज्य निवडणूक आयोगाने काढले आदेश
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28226.61, निफ्टी : 8734.25, सोने भाव : 29,160 (प्रतितोळा), चांदी : 42,441 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 नवी दिल्ली - महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आपली नवी केयुव्ही 100 ही कार भारतीय बाजारपेठेत केली लाँच, या कारची दिल्ली एक्स-शोरुम किंमत 6 लाख 37 हजार रुपये
👉 मुंबई - क्रोम ब्राऊझरच्या जुन्या व्हर्जनवर Gmail सपोर्ट बंद होणार : गुगल
🎯 खेळ घडामोडी :
👉 सिडनी - सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारांमधून वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलवर एका वर्षाची बंदी, ऑस्ट्रेलियन टी-20 क्लबने दिली माहिती
👉 मुंबई - 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होणा-या ऑस्ट्रेलियाच्या सराव सामन्यासाठी भारत अ संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - ‘काबिल’ चित्रपटात अंध व्यक्तिची भूमिका साकारल्यानंतर ह्रतिकने नेत्रदान करण्याचा घेतला निर्णय
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 आपण धापा का टाकतो?
Let's Up Knowledge Katta
आपण दर मिनिटाला 18 ते 20 वेळा श्वास घेतो व सोडतो. श्वास घेताना फुप्फूस प्रसरण पावतात व श्वास सोडताना आकुंचन पावतात. ही क्रिया छातीचे स्नायू व पोटाचे स्नायू यांच्यामुळे होते. काही कारणांमुळे शारीरिक हालचाल वाढली, तर या जास्त हालचालींसाठी जास्त शक्तीची गरज असते. ही जास्त शक्ती रासायनिक ज्वलनातून निर्माण होते. हे अतिरिक्त रासायनिक ज्वलन होण्यासाठी अधिक प्राणवायू मिळत नाही, तेव्हा श्वासोच्छ्वासांचा वेग वाढवावा लागतो. त्यामुळे छाती व पोट अधिक जोराने आकुंचन-प्रसरण पावते. दर मिनिटाला ही प्रक्रिया अधिक वेळा होते, तेव्हा एरवी श्वासोच्छ्वास चालू असताना आपणाला जाणीव नसते, त्या गोष्टीची तीव्रतेने जाणीव होते. ही जाणीव म्हणजेच धाप लागणं. पळणे, उडया मारणे, उंच टेकडी, डोंगर, जिना चढणे या शारीरिक क्रियांना अधिक प्राणवायूची गरज असते. ती पुरवण्यासाठी जो जादा वेगाने व जोराने श्वास घेतला जातो त्याचाच अर्थ धापा टाकणं.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 प्रकाशवर्ष म्हणजे नेमकं किती?
जमिनीवरून आकाशातले तारे पाहताना आपल्याला प्रश्न पडतो की, हे तारे आपल्यापासून नेमके किती दूर असतील? कारण जमिनीवरून पाहताना तार्यांचा आकार अगदी लहान दिसत असला तरी प्रत्यक्षात हे तारे आकाराने खूप मोठे आहेत, असं आपण विज्ञानाच्या पुस्तकात वाचलेलं असतं. म्हणजे ज्याअर्थी हे तारे जमिनीवरून आपल्याला इतके लहान दिसतात, त्याअर्थी ते आपल्यापासून पुष्कळ लांब असले पाहिजेत. म्हणून तार्यांचं पृथ्वीपासूनचं अंतर मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे माप वापरतात. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला 2,99,791 मैल इतका असतो. तर पृथ्वी व चंद्र यांतील अंतर सुमारे 3,85,000 किमी आहे. प्रकाशाचा वेग आणि चंद्र व पृथ्वीमधले अंतर यानुसार चंद्रापासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 1.3 सेकंद लागतात. तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर सुमारे 149, 597, 890 किमी आहे. यानुसार सूर्यापासून निघालेला प्रकाशाचा किरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8 मिनिटं लागतात.
👉 इस्त्री तापली की, चुरगळलेले कपडे पुर्ववत कसे होतात?
एका चुटकीसरशी छान कडक इस्त्री केली की, आपले चुरघळलेले कपडे पुर्ववत होतात. मात्र तुम्ही न तापवता जर चुरघळलेल्या कपडयांवर इस्त्री करण्याचा प्रयत्न केलात, तर मात्र तुमच्या कपडयावरच्या चुण्या तशाच राहतील. पण असा प्रश्न पडतो ना, की इस्त्री गरम करून कपडयावरच्या चुन्या कशा नाहीशा होत असतील? त्याचं उत्तर आहे. कपडयाचे धागे रसायनांनी एकमेकांशी बांधलेले असतात. कपडयाची जेव्हा घडी होते किंवा आपण कसेतरी चुरघळून ते टाकून देतो तेव्हा कपडयातील धागे एकमेकांभोवती गुंडाळले जातात आणि कपडयावर चुण्या पडतात. जेव्हा गरम इस्त्री चुरघळलेल्या कपडयावर फिरवली जाते तेव्हा गुंतलेले धागे उष्णतेने क्षीण होतात आणि इस्त्रीचे वजन त्यांना सपाट आकारात यायला मदत करतात. आणि आपल्याला कडक इस्त्रीचे कपडे मिळतात.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक, जवळपास 20 मिनिटे पिटीआयचं अकाउंट हॅक झाले होते
👉 नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात आलेल्या महिलेवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना, तीन आरोपींना अटक
👉 आंध्रप्रदेश - आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 4 पोलीस शहीद
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 लंडन - युरोपीय संघातून ब्रिटनने बाहेर पडण्यासाठी (ब्रेक्झिट) ब्रिटिश संसदेने पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली
🎯 राजकीय घडामोडी :
👉 पणजी - संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना निवडणूक आयोगाची नोटीस, निवडणुकीत कुणाकडूनही पैसे घ्या पण मत भाजपला द्या असे आवाहन पर्रीकर यांनी केले होते
👉 मुंबई - शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष आतून एकमेकांना मिळालेले, शिवसेनेसोबत युतीचा विषय आज माझ्यासाठी संपल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर केले
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - अॅण्टोपहील येथील शाळेची भिंत कोसळून 5 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू तर आईसह अन्य दोन जखमी, जखमींवर उपचार सुरु
👉 मुंबई - कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने लागू केलेला चार दिवसांचा ड्राय डे उच्च न्यायालयाने केला रद्द, आता फक्त दोन दिवस असणार ड्राय डे
👉 सोलापूर - टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीत दरोड्यांच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद, सोलापूर ग्रामीण पोलीसांची कामगिरी
🎯 खेळ घडामोडी :
👉 बेंगळुरू - येथील T-20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 75 धावांनी दणदणीत विजय, 6 विकेट घेणा-या चहलला सामनावीर व मालिकावीर पुरस्कार
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 दिल्ली - 'बिग बॉस 10'चा विजेता मनवीर गुर्जर याच्याविरोधात नोएडा पोलिसांनी दाखल केली एफआयआर, ट्रॅफिक जाममुळे पोलिसांनी केली कारवाई
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 आत्मविश्वास कसा वाढवायचा?
Let's Up Think Katta
कोणतीही गोष्ट करताना आपल्यापैकी कित्येकांच्या मनात एक वेगळ्याच प्रकारची धाकधुक असते की, हे काम आपल्याकडून होईल की नाही, हे मला जमेल की नाही. चार चौघांत माझं हसू झालं तर? असे प्रश्न मनात निर्माण होतात आणि शेवटी आपण माघार घेतो परिणामी आपल्या मनात असलेली ही अनामिक भिती जिंकत जाते. हे सर्व तुमच्यासोबतही होत असेल कदाचित. मात्र त्यामागील कारण जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्नच करत नाही. मित्रांनो हे सगळं होतं ते आत्मविश्वासाअभावी…
आयुष्यात घडणार्या अनेक गोष्टींमुळे आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. आणि याचाच परिणाम आपल्या दैनंदीन जीवनावर होतो. मात्र काही गोष्टी नियमीत केल्यास आपला आत्मविश्वास आपल्याला परत मिळवता येऊ शकतो. तो कसा ते पाहूयात...
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
स्वतःलाच शाबासकी द्या - सकाळी उठल्यानंतर दिवसभरात हाती घेतलेले काम पुर्णत्वास नेण्याचा निर्धार करा. मी हे काम अतिशय व्यवस्थित करू शकतो हे आधी स्वतःला पटवून द्या. नियोजन बनवा आणि सर्व कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न करा. हाती घेतलेले काम पुर्ण झाल्यास स्वतःची स्तुती करा व स्वतःलाच शाबासकी द्या.
गर्व करू नका - जर आपली कोणी स्तुती केल्यास त्यांचे आभार माना, गर्व करू नका. कारण गर्वाचे घर नेहमी खालीच असते हे लक्षात ठेवा.
इम्प्रेसिव पेहराव ठेवा - रोज घरातून बाहेर पडताना काही तरी घालायचं म्हणून घालू नका. कारण आपले कपडे देखील आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी चांगली कामगिरी पार पाडतात.
विश्वास ठेवा - उगाच कुठल्याही गोष्टीबद्दल अनावश्यक काळजी बाळगू नका. हे काम आपणच करणार आहोत त्यामुळे ते पुर्ण होईलच असा विश्वास मनाशी बाळगा. नेहमी चेहर्यावर स्मित हास्य असू द्या. कोणी काहीही बोलले तरी प्रेमाने उत्तर द्या. सर्वांना स्वतःहून मदत करा. एखाद्याचे चुकत असल्यास त्याच्या चुकीवर पांघरून न घालता त्याला समजावून सांगा, आक्रमक होऊ नका. यामुळे लोकांचा तुमच्याबद्दल असलेला दृष्टीकोन बदलेल. व लोकांचा हा बदललेला दृष्टीकोन तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास कारणीभुत ठरेल.
संगत वाढवते आत्मविश्वास - तुमचा आत्मविश्वास हा तुमच्या सभोवताली असणार्या तुमच्याच जवळच्या लोकांवर देखील अवलंबून असतो. चुकीची अथवा वाईट संगत तुमचा आत्मविश्वास खालावू शकते. एखादे काम हाती घेतल्यावर बर्याचदा लोक तुम्हाला प्रोत्साहित करण्याऐवजी पाय खेचत असतील तर वेळीच सावध व्हा. आपण हाती घेत असलेले काम हे योग्य आहे व त्यामुळे कोणाचेच नुकसान होणार नाही याची खात्री असेल तर बिनधास्त ते काम करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
स्वत:साठी वेळ काढा - दिवसातून थोडा वेळ तुमच्या छंदासाठी द्या. आपल्याला काय आवडते, काय केल्यानंतर बरे वाटते याचा विचार करा व उत्तर मिळाल्यावर किमान आपला एक तास तरी त्यासाठी द्या. मग बघा आपला आत्मविश्वास कसा वाढतो ते.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 जम्मू-काश्मीर - लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी उत्तर काश्मीरमधील बारामुला आणि कुपवाडा जिल्ह्यांचा दौरा करून अधिकाऱ्यांसोबत घेतल्या बैठका
👉 नवी दिल्ली - हा अर्थसंकल्प प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करणारा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला अर्थसंकल्पावर कौतुकाचा वर्षाव
👉 नवी दिल्ली - इस्त्रायल दौ-यावर जाणारे पंतप्रधान मोदी भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार, इस्त्रायलमधील भारताचे राजदूत पवन कपूर यांनी वायनेट या संकेतस्थळाला दिली माहिती
👉 पंजाब - येथील भटिंडा शहराजवळ काँग्रेस उमदेवाराच्या प्रचारार्थ निघालेल्या रॅलीजवळ एका कारमध्ये झाला शक्तिशाली स्फोट, 3 लोकांचा मृत्यू
👉 भोपाळ - सुनील जोशी हत्या प्रकरण, देवास न्यायालयाने बुधवारी साध्वी प्रज्ञा सिंहसह 8 आरोपींची निर्दोष केली मुक्तता
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 वॉशिंग्टन - पुराणमतवादी न्यायाधीश नील गॉरस्यूख यांचे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये केले नामांकन, या निवडीला डेमॉक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी केला कडाडून विरोध
🎯 राजकीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेरो-शायरींचा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात शेतकरी आणि तरुणांसाठी काहीच नाही : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी
👉 पंजाब - आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत डेरा सच्चा सौदाने शिरोमणी अकाली दल-भाजपा आघाडीला दिला पाठिंबा
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात मुंबई महापालिका पारदर्शक कारभारात देशात पहिल्या क्रमांकावर
👉 मुंबई - ऐतिहासिक शब्दाची व्याख्या खऱ्या अर्थाने स्पष्ट करणारा, नवभारताची निर्मिती करणारा, सर्वसमावेशक अर्थसंकल्प : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
👉 उस्मानाबाद - उमरगामधील शिवपुरी कॉलनीत हरिष माखिजा व्यापाऱ्यावर घरात घुसून हल्ला, हल्ल्यामागील कारण अस्पष्ट, हल्ल्यात व्यापा-याची पत्नी गंभीर जखमी
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28141.64, निफ्टी : 8716.40, सोने भाव : 28,955 (प्रतितोळा), चांदी : 42,210 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 स्वित्झर्लंड - नुकतीच स्वित्झर्लंडची कंपनी फिलाईन मोटारसाइकल्सने आपली हायटेक डिलक्स बाईक ‘फिलाईन वन’ केली लॉन्च, या बाईकची किंमत 280 हजार डॉलर (सुमारे 1 कोटी 75 लाख रुपये), आतापर्यंत कंपनीने केवळ 50 बाईक्स केल्या तयार
🎯 खेळ घडामोडी :
👉 मुंबई - चालू महिन्यात 10व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंचा लिलाव होणार, रजनीश गुप्ता यांनी दिली माहिती
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 नवी दिल्ली - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने आपला मुलगा अबरामसह सुवर्ण मंदिराला दिली भेट, 'रईस' च्या यशानंतर तो प्रार्थना करण्यासाठी आला होता
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 गृहिणींसाठी हेल्दी लाईफस्टाईल टिप्स!
Let's Up Tips & Tricks
गृहिणींची लाईफ स्टाईल जरा जास्तच बिझी असते. कामाचा व्याप पाहता त्यांना बहुतेक वेळा स्वतःकडे पाहण्यासाठीही पुरेसा वेळच उरत नाही. म्हणूनच विशेषतः गृहिणींना आपल्या दैनंदिन जीवनात फिट आणि आरोग्यदायी राहण्यासाठी आवश्यक सवयी अंगी बाणवणे महत्त्वाचे झाले आहे. म्हणूनच, तुमच्या दैनंदिन वेळापत्रकाचा भाग बनू शकतील अशा काही टिप्स पाहूयात...
छंद जोपासा : रोज-रोज तेच काम करून कंटाळा, ताणतणाव जीवनात शिरकाव करू शकतो. म्हणून जीवनाला प्रेरणादायी ठरू शकतील, असे छंद जोपासणे फार आवश्यक आहे. वाचन, कुकिंग क्लासेस, चित्रकला, लिखाण, गायन अशा काही उपक्रमांमधून तुम्ही शांत आणि तणावांपासून दूर राहता.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
भेटत रहा : आठवडयातून किमान एकदा किंवा दोनदा तुमच्या मित्रमंडळींना भेटायला हवे. सामाजिक पातळीवर लोकांना भेटत राहिल्यास नवनवीन गोष्टी तुम्हाला गुंतवून ठेवतात आणि तुमचा आत्मविश्वास वाढवून तुम्हाला सक्रिय ठेवतात.
आहारावर नियंत्रण : कमी प्रमाणात साखर वापरून तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी नवनवीन पण आरोग्यदायी पदार्थ किंवा मिष्टान्न बनवा. आहारातील साखरेवर नियंत्रण ठेवा आणि आहारात सॅलॅडचा समावेश करा. तुम्हाला दिवसभर खाण्याची सवय असेल तर जंकफूडऐवजी आरोग्यदायी नाश्ता खा.
पुरेशी झोप घ्याच : झोपेची वेळ कमी करणे, ही बाब फारशी स्वीकारार्ह नाही. दिवसभरातील कामे आणि तुमचे आरोग्य जपण्यासाठी दररोज नियमितपणे किमान 7 तासांची झोप घ्यायलाच हवी.
व्यायामासाठी वेळ काढा : व्यायामाला तुमच्या दैनंदिन वेळापत्रकात किमान 15 ते 30 मिनिटांची जागा द्या. काही व्यायाम तर अगदी टीव्ही पाहतानाही करता येतात. शरीरातील पाण्याची पातळी जपण्यासाठी सतत कोमट पाणी आणि ताज्या फळांचे रस पित राहा.
राग-चिडचिड टाळा : मुलांचा राग येतोय, कामामुळे वैताग झालाय. लगेच 30 पासून उलटे अंक मोजायला सुरुवात करा, तुम्हाला शांत वाटेल. चीडचीड किंवा ताण यामुळे विविध प्रकारचे हृदयरोगवाहिनीचे विकार जडू शकतात.
आर्थिक बाबींवर लक्ष ठेवा : आर्थिक बाबींवर योग्य लक्ष द्या. सगळे हिशोब स्वत:च मांडून त्यांची जबाबदारी घेण्यास सुरुवात करा. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
डॉक्टरांची नियमित भेट घेत जा : दर 3 महिन्यांनी डॉक्टरकडे जायलाच हवे. त्यामुळे तुमच्या शरीरात काही बदल होत आहेत का हे पाहून त्यानुसार डॉक्टर तुम्हाला काही उपचार सुचवू शकतील.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
