ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Открыть в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Больше
6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
📣 चिनी हॅकर्सची व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घुसखोरी; भारतीय लष्कराकडून अलर्ट Letsup I Update चायनीज हॅकर्स व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भारतीय युजर्सना टार्गेट करत आहेत. भारतीय लष्कराने यासंबंधी अलर्ट दिला असून ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत भारतीय लष्कराने मेसेजिंग अॅप वापरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 👉 व्हिडीओत काय सांगण्यात आले? डिजिटल वर्ल्डमध्ये घुसखोरी करण्यासाठी चिनी प्रत्येक प्रकारच्या मीडिअमचा वापर करत आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सिस्टीम हॅक करण्याची नवीन पद्धत सध्या त्यांनी अवलंबली आहे. +86 पासून सुरु होणारे चिनी क्रमांक तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शिरकाव करतात आणि तुमचा डाटा चोरण्यास सुरुवात करतात. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

🌧 येत्या 24 तासांत राज्यात पावसाची शक्यता Letsup I Update राज्यातल्या बहुतांश भागात येत्या 24 तासांत पाऊस होणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

🗞 ट्विटरवर बातम्यांसाठी स्वतंत्र विभाग Letsup I Update ट्विटरसह फेसबुक आणि अन्य सोशल साईटवर ब्रेकिंग न्यूज मोठ्या प्रमाणात शेअर होत असतात. याच पार्श्वभूमीवर ट्विटरने आपल्या युजर्सला ताज्या बातम्या देण्यासाठी नवीन विभाग देण्याची चाचणी सुरू केली असून हे फिचर लवकरच सर्वांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

🤕 ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ एकदिवसीय उपोषण LetsUp I Updates पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ हे एकदिवसीय आंदोलन राज्यभरात करण्यात येत आहे. शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील किसानपुत्र या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अन्नत्याग उपोषण का? साहेबराव शेषराव करपे हे यवतमाळ जिल्ह्यातील चील-गव्हाण या गावचे शेतकरी होते. हात उसने घेतलेल्या पैशांची परतफेड करता येत नसल्याने ते अस्वस्थ होते. शेवटी त्यांनी 19 मार्च 1986 रोजी पत्नी मालती व चार अपत्यासह आत्महत्या केली. ही महाराष्ट्रातील पहिली जाहीर झालेली शेतकरी आत्महत्या होती. साहेबराव यांच्या कुटुंबियांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त हे आंदोलन करण्यात येत आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 💥

🚖 ओला-उबरचे चालक संपावर ब्रेकिंग मुंबईसह नवी दिल्‍ली, बंगळुरु, हैदराबाद आणि पुणे येथील ओला उबरचे चालक मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. कंपन्यांमध्ये असलेल्या ढिसाळ व्यवस्थापनाच्या निषेधार्थ चालकांनी हा संप पुकारला आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 💥

LetsUp I News Updates 🔅 नवी दिल्ली - मोदी हे भ्रष्टाचाराचे दुसरे नाव, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची घणाघाती टीका 🔅 नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात एका वर्षात तब्बल 1 लाख मुलांवर लैैंगिक शोषणासारखे अत्याचार 🔅 जम्मू-काश्मीर - बालाकोट परिसरात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, 5 नागरिकांचा मृत्यू 🔅 मथुरा - यमुना एक्स्प्रेस वे वर झालेल्या अपघातात एम्सच्या तीन डॉक्टरांचा जागीच मृत्यू 🔅 कोलंबो - श्रीलंकेतून 12 दिवसानंतर आणीबाणी हटवली, 6 मार्च रोजी लागू केली होती आणीबाणी 🔅 मुंबई - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निवासस्थानी काळी गुढी उभारुन शिक्षक परिषदेने आंदोलन केले 🔅 मुंबई - मोदीमुक्त भारत झाला पाहिजे, त्यासाठी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन - मनसे प्रमुख राज ठाकरे 🔅 मुंबई - इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज केविन पीटरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली 🔅 कोलंबो - तिरंगी टी-20 निदाहास चषकाच्या रोमांचक अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 4 गडी राखून पराभव केला For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💫 सर्वात स्वस्त व महागडं शहर कोणतं? Letsup I Update जगभरात 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग 2018'च्या सर्वेक्षणानुसार, दक्षिण आशियाई देश खासकरून भारत आणि पाकिस्तानातील शहर अधिक स्वस्त आहेत. सर्वात स्वस्त शहरांच्या यादीत टॉप 10 शहरांमध्ये भारतातील बंगळुरू, चेन्नई तसेच नवी दिल्ली या शहरांचा समावेश आहे. जगातील सर्वात स्वस्त शहरामध्ये सीरियाची राजधानी दमिश्कचा प्रथम क्रमांक लागतो. तर, सिंगापूर सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात महागडं शहर ठरले आहे. दुसऱ्या क्रमाकांवर पॅरिस, तिसऱ्या क्रमांकावर ज्युरिक तसेच चौथ्या क्रमांकावर हाँगकाँग आहे. 👉 सर्वात स्वस्त शहर (टॉप 10) : दमिश्क, कराकास, अल्माटी, लागोस, बंगळुरू, कराची, अल्जिअर्स, चेन्नई, बुखारेस्ट, नवी दिल्ली. 👉 सर्वात महागडी शहरं (टॉप 10) : सिंगापूर, पॅरिस, ज्युरिक, हाँगकाँग, ओस्लो, जेनेवा, सियोल, कोपेनहेगेन, तेल अवीव, सिडनी. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

⚡ जिओने वाढवली 100% कॅशबॅक ऑफरची मुदत Letsup I Update रिलायन्स जिओने आपल्या Get More than 100% कॅशबॅक ऑफरची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली आहे. या ऑफरची शेवटची तारिख 15 मार्चला होती. जर तुम्ही या ऑफरचा अजूनही लाभ घेतला नसेल तर तुमच्याकडे 15 दिवसांचा वेळ आहे. 398 रुपये किंवा त्याच्याहुन अधिक किंमतीचा रिचार्ज जिओच्या 100% कॅशबॅक ऑफरअंतर्गत प्राईम युजर्सला करावा लागेल. त्यावर तुम्हाला 400 रुपयांचे कॅशबॅक मिळेल. या ऑफरचा लाभ मिळाल्यावर 400 रुपये तुम्हाला 8 कूपनच्या स्वरुपात मिळतील. 1 कूपन 50 रुपयांचे असेल. एका वेळेस एकच कूपन वापरता येईल. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

⚡ मुंबईतील नव्या बांधकामांना सशर्त परवानगी Letsup I Update सुप्रीम कोर्टाने मुंबईतील नवीन बांधकामांवरील बंदी 6 महिन्यांकरता उठवत मुंबईकर, महनगरपालिका आणि राज्य सरकारलाही मोठा दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर साल 2016 पासून लागू असलेली बंदी उठवत नवीन बांधकामाला हायकोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. हायकोर्टाच्या निर्णयाला महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्यावतीने सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती एस.ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल.नागेश्वर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💥 पुणे ATSकडून तीन बांगलादेशींना अटक Letsup I Update दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटकडून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या या तिघांचे पाकिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण, बांगलादेशात दहशतवादी कारवायांमुळे बंदी असलेल्या अनसरुल्लाह बांगला (एबीटी) या संघटनेचे सदस्य आहेत. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

📣 बँका सलग चार दिवस बंद! Letsup I Update यंदाच्या मार्च अखेरीस सलग चार सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे जर महत्त्वाची बँकेची कामं करायची असतील तर मार्च अखेरीची वाट पाहून नका. कारण यंदा 29 मार्च ते 1 एप्रिल अशा सलग चार सुट्ट्या आल्या आहेत. 29 मार्च रोजी महावीर जयंती, 30 मार्च रोजी गुड फ्रायडे, 31 मार्च रोजी बँकांची वर्षअखेर आणि 1 एप्रिल रोजी रविवार अशा या चार सुट्ट्या असणार आहेत. या चार दिवसांमध्ये बँकांचे दैनंदिन व्यवहार बंद असणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना बँकेचे व्यवहार करणे शक्य होणार नाही. या काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून बँकांनी आधीच ग्राहकांना मेसेज पाठवून सूचना दिल्या आहेत. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💥 अंगणवाडी सेविका अत्यावश्यक सेवा कायद्यात Letsup I Update अंगणवाडी सेविकांनी संप करू नये म्हणून आता अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांना मेस्मा (महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा) कक्षेत आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापुढे संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचे आदेशच महिला व बालकल्याण विभागाने दिले आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप हाणून पाडण्यासाठी राज्य सरकारने 'मेस्मा'चे हत्यार उपसले असल्याचे बोलले जात आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

🏏 बांगलादेश-श्रीलंकेत राडा; बांगलादेशचा नागीण डान्स Letsup I Update निदहास चषक टी 20 सामन्यात यजमान श्रीलंकेला नमवून बांगलादेशने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र या सामन्यात शेवटच्या दोन्ही संघात चांगलाच राडा झाला. त्यामुळे मैदानातले वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. 👉 नेमके काय घडले? सामन्याच्या शेवटच्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा मेहदी हसन धावबाद झाला. यावेळी षटकातला हा दुसरा बाऊंसर असल्याने नो बॉल असल्याचे सांगत मैदानाबाहेर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने पंचांशी हुज्जत घातली. त्यामुळे खेळ काही काळ थांबला. या दरम्यान कर्णधार हसनने दोघा खेळाडूंना मैदान सोडण्यासाठी खुणावले. दरम्यान सामन्यानंतर मैदानातून बाहेर जात असतानाही दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये झटापट झाली. 👉 बांगलादेशचा नागीण डान्स श्रीलंकेला पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी मैदानात जल्लोष केला. संघातील खेळाडूंनी नागिन डान्स करत विजय साजरा केला. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

🚚 वाहन स्क्रॅप धोरण मंजूर; जुन्या वाहनांवर कायमची बंदी Letsup I Update सरकारच्या उच्चस्तरीय समितीने वाहन स्क्रॅप धोरणास तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या नवीन धोरणानुसार आता 1 एप्रिल 2020 पासून 20 वर्षांपेक्षा जुनी ट्रक, बस, टॅक्सीसारखी व्यावसायिक वाहने चालवता येणार नाहीत. रस्ते परिवहन मंत्रालय याबाबत तीन महिन्यांत अधिसूचना जारी करू शकते. देशात सध्या 2 कोटी 80 लाखांपेक्षा जास्त व्यावसायिक वाहने 20 वर्षांपेक्षा जुनी आहेत. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

LetsUp I News Updates 🔅 नवी दिल्ली - पदवी अभ्यासक्रमासाठी तीन वर्षांचा कालावधी बदलून चार वर्षांचा करण्याचा सरकारचा विचार 🔅 नवी दिल्ली - 31 फरार उद्योगपतींकडे सुमारे 40 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती 🔅 नवी दिल्ली - दोन हजार रुपयांची नोट रद्द करणार नसल्याचा पुनरुच्चार केंद्र सरकारने लोकसभेत केला 🔅 नवी दिल्ली - राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसच्या पहिल्याच महाअधिवेशनास प्रारंभ झाला 🔅 श्रीनगर - पुलवामा सेक्टरमध्ये जवानांनी राबवलेल्या मोहिमेदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा 🔅 मुंबई - पक्षस्थापना दिनानिम्मित 6 एप्रिलला मुंबईतल्या बीकेसी मैदानावर भाजपतर्फे महामेळावा आयोजित 🔅 मुंबई - राज्यात प्लास्टिक बंदी, विक्रेत्यांसोबत प्लास्टिक वापरणा-यांवरही करणार कारवाईची घोषणा 🔅 नवी दिल्ली - पंजाबी गायक दलेर मेहंदीला दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा, मानवी तस्करी प्रकरणात दोषी 🔅 कोलंबो - निदाहास टी-20 मालिकेत बांगलादेशने श्रीलंकेचा 2 गडी राखून पराभव केला, फायनलमध्ये भारताशी मुकाबला For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🎬 आठ दिवसांत बबन'चा युट्युबवर धुमाकूळ! Letsup I Update 'ख्वाडा' फेम दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या बहुप्रतीक्षित 'बबन' या मराठी चित्रपटाने युट्युबवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. आठ दिवसांत या चित्रपटाच्या ट्रेलरने आठ लाखांचा टप्पा ओलांडलाय. रोमान्स, अॅक्शन, टेरर, दोस्ती यांचा धमाकेदार पॅक असलेला हा ट्रेलर पाहून चाहत्यांना चित्रपटात काय असेल याची कमालीची उत्सुकता लागली आहे. येत्या 23 मार्च रोजी चाहत्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहे. मग तोपर्यंत पहा ट्रेलरची एक झलक... ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा : https://youtu.be/XXbl0S0k8hA मग मंडळी 'कसं..? बबन म्हणेल तसं...!' For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💧 जगभरातील बाटलीबंद पाण्याची गुणवत्ता धक्कादायक Letsup I Update जगभरातील बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार, प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण जगभरातील 90 टक्के बाटलीबंद पाण्यात आढळून आले आहेत. जगातील 9 देशांतील 11 मोठ्या ब्रँडसचा यात समावेश आहे. यात भारतातील ब्रिस्लरी, अॅक्वाफिना आणि ईव्हियनसारख्या कंपन्यांचाही समावेश आहे. यासाठी दिल्ली, चेन्नई, मुंबईसह जगातील 19 शहरांतील नमुने गोळा करण्यात आले होते. चाचणीदरम्यान 1 लिटर पाण्याच्या बाटलीत 10.4 मायक्रोप्लॅस्टिक अवशेष मिळाले. नळाच्या पाण्याच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. भारतातील 93 टक्के नमुन्यांत प्लॅस्टिकचे अंश सापडले. यात भारतातील बिस्लरी आणि अॅक्वाफिना, अॅक्वा, दसानी, एव्हियन, नेस्ले प्युअर लाइफ आणि सान पेलेग्रिनोसारख्या ब्रॅडचा समावेश आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

⚖ दलेर मेहंदीला 2 वर्षांची शिक्षा Letsup I Update प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला मानव तस्करी प्रकरणी दोषी धरत पंजाबमधील पटियाला न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर पोलिसांनी तातडीने दलेर मेहंदीला अटक केले आहे. मानव तस्कर प्रकरण हे 2003 मधील असून, तब्बल 15 वर्षांनी दलेर मेहंदी दोषी ठरला. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💥 सरकारविरोधात आज अविश्‍वास ठराव! Letsup I Update मोदी सरकारविरोधात आज लोकसभेमध्ये अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाची मागणी करणाऱ्या वायएसआर काँग्रेस पक्षाकडून हा अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. वायएसआर काँग्रेसने सरकारविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली असून, त्यावर आज लोकसभेत विचार होईल. या नोटिसीला किमान 50 खासदारांचा पाठिंबा मिळाला तरच ठराव आणला जाईल. दरम्यान वायएसआर काँग्रेसचे केवळ नऊच खासदार आहेत. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

LetsUp I News Updates 🔹 नवी दिल्ली - नरेंद्र मोदींचे व जागतिक नेत्यांचे फॉलोअर्स फेक असल्याचा सर्व्हे आमचा नाही; ट्विटरचे स्पष्टीकरण 🔹 नवी दिल्ली - केंद्रात आधी भाजपला हरवायचे, नंतर नेता ठरवायचा, विरोधकांच्या एकीचा नवा फॉर्म्युला 🔹 हरियाणा - 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा, हरियाणा विधानसभेत विधेयक मंजूर 🔹 तामिळनाडू - एआयएडीएमकेचे बंडखोर नेते टी. टी. व्ही. दिनकरन यांनी मेलुरमध्ये नव्या पक्षाची घोषणा केली 🔹 मुंबई - विजया रहाटकर यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज मागे, महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक बिनविरोध 🔹 मुंबई - राज्यातील सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय 🔹 मुंबई - संभाजी भिडेंना अटक करा नाहीतर मोर्चा काढू, प्रकाश आंबेडकरांचे सरकारला 26 मार्चचे अल्टीमेटम 🔹 मुंबई - कोकण, मराठवाडा, विदर्भात तुरळक पावसाची शक्यता, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा 🔹 नवी दिल्ली - हॉलिवूड अभिनेते पियर्स ब्रॉसनन यांनी पान मसाला कंपनीकडून फसवणूक झाल्याचा आरोप केला 🔹 बेंगळुरू - विस्डेन इंडिया अल्मनॅकच्या सहाव्या आवृत्तीत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून लोकेश राहुलची निवड For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup