ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Открыть в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Больше
6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
💥 एमआरपीपेक्षा जास्त पैसे आकारल्यास 5 लाखाचा दंड होणार? LetsUp I Updates एमआरपीपेक्षा जास्त पैशांना वस्तूंची विक्री करणे विक्रेत्यांना आता महागात पडू शकते. कारण अशा विक्रेत्यांवर ग्राहक मंत्रालय कठोर कारवाई करण्याचा विचार करत आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव स्वीकारल्यास संबंधित विक्रेत्यांना 5 लाख रुपये दंड आणि दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. त्यामुळे आता केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे. तक्रार कुठे करावी? एमआरपीपेक्षा जास्त पैसे आकारून वस्तूची विक्री करणाऱ्यांविरोधात 1800 11 4000 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते. +918130009809 या क्रमांकावर SMS करूनही तक्रार केली जाऊ शकते. याशिवाय मंत्रालयाच्या consumerhelpline.gov.in या वेबसाइटवरही तक्रार करता येते. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

💥 कर्नाटकमध्ये निवडणुकांचे बिगूल वाजले! ब्रेकिंग देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगूल वाजले आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. एकाच टप्प्यात 56 हजार मतदान केंद्रांवर हे मतदान होणार असून या निवडणुकीत 4.96 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावनार आहेत. याठिकाणी आजपासूनच आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही आयोगाने केली आहे. महत्त्वाच्या तारखा 👉 अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 25 एप्रिल 2018 👉 अर्ज मागे घेण्याची तारीख - 27 एप्रिल 2018 👉 मतदानाची तारीख - 12 मे 2018 👉 मतमोजणीची तारीख - 15 मे 2018 For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

💥 रेल्वे भरती; 2 कोटी उमेदवारी अर्ज दाखल LetsUp I Updates रेल्वेने यंदा गट ‘क’ आणि गट ‘ड’ साठी 90 हजार जागांसाठी मेगा भरती काढली आहे. मात्र, या 90 हजार जागांसाठी 2 कोटीपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे अद्याप 5 दिवस बाकी आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवसांत आणखी अर्ज येण्याची शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

💥 छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ LetsUp I Updates जामीनावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा नकार दिल्याने, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात अटकेत असलेले छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च 2016 पासून तर त्यांचा पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी 2016 पासून कैदेत आहेत. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

LetsUp I News Updates 🔅 नवी दिल्ली - भाजपच्या आरोपानंतर प्ले स्टोअरवरून काँग्रेसने पक्षाचे अॅप हटवले, डेटा लीक झाल्याचा भाजपचा आरोप 🔅 नवी दिल्ली - अण्णांच्या आंदोलनावर आज तोडगा निघेल, अण्णा हजारेंशी झालेल्या चर्चेनंतर गिरीश महाजन यांचा दावा 🔅 नवी दिल्ली - लोकसभेत अविश्वासदर्शक ठरावासाठी उपस्थित राहण्याच्या काँग्रेस पक्षाच्या खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी 🔅 कोरापूत - ओडिशामधील कोरापूत येथे झालेल्या चकमकीत 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश 🔅 न्यूयार्क - अमेरिकेचे रशियाच्या 60 राजनीतीज्ञांना देश सोडून जाण्याचे व सिएटलचा दूतावास बंद करण्याचे आदेश 🔅 मुंबई - एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या 42 उमेदवारांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले, उमेदवारांची यादीही जाहीर 🔅 मुंबई - संभाजी भिडेंना 8 दिवसात अटक न केल्यास विधानभवनाला घेराव घालू, प्रकाश आंबेडकरांचे सरकारला अल्टिमेटम 🔅 रायगड - जिल्ह्यातील भीरा येथे राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, तापमान 42.5 अंश सेल्सियसवर पोहोचले 🔅 मुंबई - बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या 'बकेट लिस्ट' या मराठीतील पहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित 🔅 नवी दिल्ली - राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी अजिंक्य रहाणेची वर्णी, बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💥 काँग्रेसने अॅप हटवले; काय लपवताय? भाजपाची विचारणा Letsup I Update डेटा चोरीच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर काँग्रेसने प्ले स्टोरमधून आपले अॅप हटवले आहे. यावरून भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले आहेत की, ‘काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेत? यांनी गुजरात निवडणुकीत लोकांचा डाटा चोरी करुन निवडणूक धोरण आखले आणि आता कर्नाटकातही तेच करत आहेत’. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

⚠ सावधान! मार्च एंडची कामे उरकून घ्या... LetsUp I Updates यंदाच्या मार्च एंडला सलग चार सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे ज्यांची बॅंकांची कामे शिल्लक असतील त्यांनी दोन दिवसातच कामे करून घ्यावीत. कारण 29 मार्चपासून 1 एप्रिलपर्यंत बॅंकांना सुट्या आहेत. यामध्ये 29 मार्चला महावीर जयंती, 30 मार्चला गुड फ्रायडे, 31 मार्चला इअर एन्डिंग आणि 1 एप्रिलला रविवार आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक बँकांनी या सलग आलेल्या सुट्यांबाबत आपल्या ग्राहकांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान बॅंका बंद असल्यामुळे एटीएममध्येही रोख रकमेची कमतरता जाणवू शकते त्यामुळे कॅशची व्यवस्थाही आधीच करून ठेवा. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

💥 खुशखबर; राज्यात मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना LetsUp I Updates राज्य सरकारने मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना केली आहे. विद्यार्थ्यांचे कला-क्रीडागुण अधिक बहरावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ पाचवी, आठवी, दहावी व बारावीची परीक्षा देऊन व त्यासाठी मोजकेच विषय निवडून विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता येणार आहे. आपल्या दोन इयत्तांपुढील शिक्षण घेण्याची बुद्धिमत्ता असणारे अतिप्रगत विद्यार्थी, दिव्यांग, कलाकार, खेळाडू अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व ते मुख्य शिक्षणप्रवाहातही राहावेत यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

💥 आधारवर चेहऱ्याची ओळख लागू होणार! LetsUp I Updates भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. येत्या 1 जुलै पासून UIDAI आधार कार्डवर डोळ्यांच्या प्रतिमा, हातांच्या पंजाचे ठशांसोबतच आता चेहऱ्याची ओळखही लागू करणार आहे. येत्या 1 जुलैपासून हा नवा बदल सुरू करण्यासाठी UIDAI सज्ज झाली आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

LetsUp I News Updates 🔅 नवी दिल्ली - शेतकर्‍यांना उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभाव देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून केली 🔅 नवी दिल्ली - राज्यसभेतील सुमारे 90 टक्के खासदार कोट्यधीश असून त्यांची सरासरी संपत्ती 55.62 कोटी रुपये एवढी आहे 🔅 नवी दिल्ली - नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करणाऱ्या युझर्सचा डेटा थर्ड पार्टीला विकला जात असल्याचा राहुल गांधींचा आरोप 🔅 नवी दिल्ली - आधारकार्डधारकांच्या व्हेरीफिकेशनसाठी एक जुलैपासून आता चेहर्‍याची ओळख हा पर्याय दिला जाणार 🔅 नवी दिल्ली - अण्णांच्या आंदोलनाला संघाची फूस, हार्दिक पटेलचा सनसनाटी आरोप, आरक्षणावरुनही निशाणा 🔅 मॉस्को - रशियातील सैबेरिया शहरातल्या कॅमरोव्हो भागात एका मॉलला भीषण आग लागून 37 जणांचा होरपळून मृत्यू 🔅 मुंबई - सरकारने लोकशाहीचा गळा दाबला, आंदोलन करण्याचा अधिकार नाकारला, प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र 🔅 मुंबई - महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने मुंबईकरांमधील आजाराचे सर्वेक्षण केले, त्यात मानसिक आजारांचा क्रमांक पहिला 🔅 मुंबई - राज्यातील ऊस गाळप हंगाम अखेरीस सुरुवात, 187 पैकी 41 साखर कारखान्यांची धुराडी बंद 🔅 नवी दिल्ली - टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या कारला अपघात, देहराडूनहून दिल्लीला जाताना ट्रकला धडक For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💑 अखेर सोनम कपूरचं लग्न ठरलं! Letsup I Update बऱ्याच चर्चेनंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजाचं लग्न ठरलं आहे. एका वृत्तपत्रानुसार, सोनम 11 आणि 12 मे दरम्यान दिमाखदार सोहळ्यात जिनिव्हात लग्न करणार आहे. या विवाहसोहळ्यात पाहुण्यांना आमंत्रण देण्याची सर्व जबाबदारी खुद्द अनिल कपूर यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे कळत आहे. संगीत, मेहंदीचा कार्यक्रम आणि पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पार पाडत तिच्या विवाहसोहळ्याची रंगत वाढणार आहे. सोनमने वेडिंग ड्रेसची जबाबदारी अबु जानी आणि संदीप खोसला यांना दिली आहे. वेडिंग वॉर्डरोबचे काम ब्रिटिश डिझायनर टमारा राल्फ आणि मायकल रूसो यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💫 सीमेवरील जवान होणार हायटेक Letsup I Update केंद्र सरकारने भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी आधुनिक रायफल्स, लाइट मशीन गन आणि क्लोजक्वार्टर बॅटल कार्बाइन्स उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. ही शस्त्रास्त्रे जलदगती प्रक्रियेतंर्गत (एफटीपी) पुरवली जाणार आहेत. याबाबत संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 72,400 असॉल्ट रायफल्स, 16,479 एलएमजी आणि 93,895 सीक्यूबी कार्बाइन्ससाठी निवडलेल्या विदेशी कंपन्यांना निविदा देण्यात आली आहे. हा व्यवहार सुमारे 5,366 कोटी रूपयांचा आहे. दहा दिवसांच्या आत हा करार निश्चित केला जाणार आहे. ही शस्त्रास्त्रे येत्या वर्षभरात भारताला सोपवली जातील अशी अपेक्षा केली जात आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

🛰 चांद्रयान-2चे प्रक्षेपण ऑक्टोबरमध्ये Letsup I Update तज्ज्ञांनी काही गोष्टींचे परीक्षण करण्याचा सल्ला दिल्यामुळे चांद्रयान-2चे प्रक्षेपण ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली. भारताचा चंद्रयान-2 हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी 800 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. चांद्रयान-2 हे पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आलेले मिशन आहे. या अवकाश यानाचे वजन 3 हजार 290 किलो असून हे यान चंद्राच्या चार बाजूंना फिरून माहिती गोळा करण्याचे काम करेल. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

📣 फेसबुकचे लॉग इन डिटेल्स विकले जातात 340 रुपयांत Letsup I Update फेसबुकवरील लॉग इनचे डिटेल्स केवळ 340 रुपयांना विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेसबुकवर एखाद्या फोटोशी तुलना करण्यासाठी, स्वभावाविषयी जाणून घेऊन ते पोस्ट करण्यासाठी आपण ज्या अ‍ॅपमध्ये लॉग इन करतो, अशा अ‍ॅपच्या माध्यमातून ही डेटाचोरी होत आहे. ब्रिटनमधील रिसर्च कंपनी केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीने डेटाचोरी केल्याचे प्रकरण समोर आणले आहे. टेस्ला, स्पेस एक्स पेज डिलीट! केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क यांनी त्यांच्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ या कंपन्याचे फेसबुकवरील पेज बंद केले आहेत. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 💥

💥 लालूंना 7 वर्षांची शिक्षा, 30 लाखांचा दंड ब्रेकिंग चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर 30 लाख रूपयांचा दंडही ठोठावला आहे. चारा घोटाळ्यात लालूंना आधीच साडेतेरा वर्षांची शिक्षा झाली असून ते सध्या रांची येथील बिरसा मुंडा तुरुंगात आहेत. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

⚡ राज्यसभा निवडणुकीत 'भाजप'ची मुसंडी Letsup I Update राज्यसभेच्या 59 जागांसाठीची रणधुमाळी अखेर काल संपली. यापैकी 10 राज्यांतील 33 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित सात राज्यांतील 26 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले आणि रात्री उशिरा मतमोजणीचा निकाल जाहीर झाला. मतदान झालेल्या 26 पैकी 12 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर एकूण 59 जागापैकी भाजपने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या आहेत. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 💥

LetsUp I News Updates ● नवी दिल्ली - गेल्या 6 वर्षात लष्कराच्या 700 जवानांनी आत्महत्या केल्याची गृह विभागाची संसदेत माहिती ● नवी दिल्ली - अण्णांच्या आंदोलनासाठी येणार्‍या नागरिकांच्या बस, रेल्‍वे सरकारने रोखल्या, अण्णा हजारे यांचा आरोप ● नवी दिल्ली - यूपीमध्ये योगींनी मारली बाजी, राज्यसभेच्या नऊ जागा जिंकून आपले वर्चस्व कायम राखले ● नवी दिल्ली - भारतात 2022 पर्यंत रोज 775.5 टन वैद्यकीय कचरा निर्माण होण्याची भीती असल्याचा इशारा ● मुंबई - राज्यात मुलींचा जन्मदर घटला, हजार मुलांमागे मुलींचा दर 904 एवढा असल्याचा अहवाल ● पुणे - पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता ● मुंबई - मंत्रालयासमोर 56 वर्षीय गुलाब मारूती शिंगारी यांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न ● मुंबई - हरिभाऊ बागडेंवरील विश्वास ठराव आवाजी मतदानाने पारीत, पक्षपातीपणाचा विरोधकांचा आरोप ● मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांची व्‍यावसायिकाविरोधात विनयभंगाची तक्रार, व्यावसायिकाला अटक ● मुंबई - क्रिकेट वर्ल्डकप पात्रता फेरी, वेस्ट इंडिजने स्कॉटलंड तर अफगाणिस्तानने आयर्लंडला हरवले For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💧 बाटलीबंद पाण्याच्या MRP बाबतचा निर्णय कायम! Letsup I Update हॉटेल आणि रेस्टॉरंट पाण्याची बॉटल एमआरपीपेक्षा जास्त दराने विकू शकतात, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये एमआरपीपेक्षा जास्त दराने पाण्याच्या बॉटलच्या विक्रीवर सरकारने बंदी घातली होती. मात्र मागील वर्षी डिसेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय बदलला. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी जागा दिली जाते, यासाठी मालकाने खर्च केलेला असतो. त्यामुळे त्यांनी एमआरपीपेक्षा जास्त दराने पाण्याच्या बॉटलची विक्री केली तर आम्ही ते रोखू शकत नाही, असे न्यायालयाने निकालात म्हटले होते. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

⚡ आपच्या 20 आमदारांना दिलासा! Letsup I Update दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीला मोठा दिलासा दिला असून न्यायालयाने आपच्या 20 आमदारांना पुन्हा आमदारकी बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने 19 जानेवारीला लाभाचे पद बाळलगल्या प्रकरणी आपच्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. दोनच दिवसात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही शिफारस मंजूर केली होती. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आम आदमी पार्टीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या आमदारांना पात्र ठरवतानाच पुन्हा हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💥 आक्षेपार्ह ट्वीट; हार्दिक पंड्याचे स्पष्टीकरण Letsup I Update डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या आरोपांनंतर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने स्पष्टीकरण दिले आहे. हार्दिकने याबाबत पत्रक प्रसिद्ध करुन सगळे आरोप फेटाळले आहेत. ‘मी अशा प्रकारचे कोणतेही ट्विट किंवा वक्तव्य ट्विटर किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी केलेले नाही. माझं नाव आणि फोटो वापरत बोगस अकाऊंटवरुन हे ट्विट करण्यात आले आहे. मी संपर्क साधण्यासाठी फक्त माझ्या अधिकृत ट्विटर अकाऊंटचा वापर करतो. आणि ज्या ट्विटवरुन गदारोळ सुरु आहे ते मी असल्याचे भासवत बोगस अकाऊंटवरुन करण्यात आले आहे’, असे हार्दिक पंड्याने स्पष्ट केले आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆