ru
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Открыть в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Больше
6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे उद्या राज्यव्यापी आंदोलन LetsUpp | Trending ● "पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात काँग्रेस उद्या (७ जून) रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे," अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ● "मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. युपीए सरकार असताना पेट्रोलवर एक्साईज ड्युटी ९.४८ रुपये होती ती आज ३२.९० रुपये म्हणजे २५८ टक्के आहे. तर डिझेलवर ३.५६ रुपये होती ती आज ३१.८० रुपये आहे म्हणजे ८२० टक्के वाढ केली आहे. ● या दरोडेखोरी विरोधात सोमवारी सकाळी ११ वाजता राज्यभर एकाचवेळी एक हजार ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान तीन पेट्रोल पंपांवर आंदोलन करून मोदी सरकारचा तीव्र निषेध केला जाणार आहे," असे नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. To know more click here https://letsup.app.link/HENNfEYGRgb

‘माझी वसुंधरा’ अभियानात नगर जिल्ह्याने उमटविला ठसा LetsUpp | Ahmednagar ● राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात सन २०२०-२१ मध्ये नगर जिल्ह्याने ठसा उमटविला आहे. शिर्डी नगरपंचायत राज्यात प्रथम, तर कर्जत नगरपंचायतीने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. ● माझी वसुंधरा-२०२१ या अभियानेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषदा, महानगरपालिका आणि वैयक्तिकरीत्या चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ● ग्रामपंचायत गटात मिरजगावने (ता. कर्जत) द्वितीय तर लोणी बुद्रूक (ता. राहाता) ने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. नगरपंचायत गटात शिर्डी नगरपंचायतने राज्यात सर्वप्रथम क्रमांक पटकावला, तर कर्जत नगरपंचायतीला द्वितीय पारितोषिक मिळाले. नगर परिषद गटात संगमनेर नगर परिषदेने उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक पटकावला. ● यामध्ये जिल्हाधिकारी गटात अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गटात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप https://letsup.app.link/ISDRcBZnRgb

भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण 'शिवराज्याभिषेक' LetsUpp | Special ● हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जूनला किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ● छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या स्‍वराज्‍याची राजधानी रायगड किल्‍ला होता. याच ठिकाणी 6 जून 1674 या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्‍यामुळे हा दिवस भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणून ओळखला जातो. ● या पार्श्वभूमीवरच महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा झाला होता? महाराजांनी रायगडालाच का राजधानीचा दर्जा दिला होता? याविषयी माहिती जाणून घेऊयात. असा पार पडला होता शिवराज्याभिषेक : ● प्रत्यक्षात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन आपण ऐकले तर तो एक दैदिप्यमान सोहळा होता. यात राजांचा अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यावर छत्र धरण्यात आले. हे दोन मुख्य विधी पार पडल्यानंतर महाराज छत्रपती झाले. ● यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. त्यानंतर महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांनी मंत्रोच्चारण करत शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा केला. त्यानंतर 32 मण सोन्याने सजवलेल्या भव्य सिंहासनावर महाराज आरुढ झाले. महाराजांनी रायगडालाच का दिला राजधानीचा दर्जा? ● शिवाजी महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायगडास वेढा घातला होता. पुढे एका महिन्‍यानंतर हा किल्‍ला महाराजांच्या ताब्यात आला. ● तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला. त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. ● रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणा-या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप https://letsup.app.link/pcG4z32bRgb

आणखी एका लसीचा समावेश : फक्त ५०० रुपयांत दोन डोस मिळणार ? LetsUpp | Covid Helpline ● कोरोनावर मात करण्यासाठी वेगवान लसीकरण हा एकमेव उपाय आहे. सरकारने कोर्बेव्हॅक्स लसीच्या ३० कोटी मात्रांची ऑर्डर दिली आहे. या कोर्बेव्हॅक्स लसीचे दोन डोस केवळ ५०० रुपयांत मिळतील, अशी शक्यता आहे. ● नवीन लस : कोर्बेव्हॅक्स - हैदराबादस्थित बायोलॉजिकल ई या कंपनीने ही लस तयार केली आहे. - केंद्र सरकारने कोर्बेव्हॅक्स लसीच्या ३० कोटी मात्रांची ऑर्डर या कंपनीकडे नोंदवली आहे. ● या लसीचे महत्त्व काय? - केंद्र सरकारने ३० कोटी लसमात्रांची ऑर्डर नोंदवली आहे. त्यामुळे १५ कोटी लोकांचे लसीकरण करता येणार आहे. - लसीच्या प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल चाचण्यांना केंद्र सरकारने पाठिंबा दिला. तसेच १५०० कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ दिले आहे. - लसींचा तुटवडा देशात भासत असताना कोर्बेव्हॅक्सच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. ● कोर्बेव्हॅक्स आहे काय? - कोर्बेव्हॅक्स ही रिकॉम्बिनन्ट प्रोटिन सब-युनिट प्रकारची लस आहे. कोरोनाच्या स्पाइक प्रोटिन या विशिष्ट भागापासून तिची निर्मिती करण्यात आली आहे. - स्पाइक प्रोटिन विषाणूला शरीरात प्रवेश करण्यास मदत करतो जेणेकरून त्याची प्रतिकृती तयार होऊन आजार निर्माण होतो. परंतु फक्त प्रोटिनच शरीरात प्रवेश करू शकले तर त्याचा शरीरावर प्रतिकूल परिणाम होत नाही. कारण विषाणू अनुपस्थित असतो. - लसीत असलेला स्पाइक प्रोटिन शरीरात इंजेक्ट केला की त्यामुळे प्रतिकारशक्ती निर्माण होते. - हेपेटायटिस-बी लस तयार करण्यासाठी ही पद्धत गेल्या कित्येक वर्षांपासून वापरली जाते. मात्र, कोरोनाविरोधातील लढाईत कोर्बेव्हॅक्सच्या निर्मितीत प्रथमच हा प्रयोग केला जाणार आहे. कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक गोष्टी तसेच महत्वपूर्ण माहिती आता मिळवा एका क्लिकवर! https://letsup.app.link/Z8LmFankRgb

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी LetsUpp | Trending ● छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिले असून, छत्रपती संभाजीराजेंसह केवळ २० जणांच्या उपस्थितीत रायगडावर हा सोहळा संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी राज्याभिषेकासाठी शिवमुद्रा असणार आहे. ● छ. संभाजीराजे यांच्या हस्ते सकाळी राजसदरेवर शिवप्रतिमेला अभिषेक करून हा राज्याभिषेक साजरा होणार आहे. पोलीस प्रशासनाने रायगडाकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर नाकाबंदी केली आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. To know more click here https://letsup.app.link/TMl054viRgb

सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान LetsUpp | Trending ● 'माझी वसुंधरा' अभियान २०२०-२१ अतंर्गत जळगाव जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन सन्मान करण्यात आला. ● तसेच सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचा देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन सन्मान करण्यात आला. ● उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बन्सोड, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान झाला. ● राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय विभागातर्फे माझी वसुंधरा अभियानातंर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची २ ऑक्टोबर, २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत पाच गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ आज पर्यावरण दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाईन झाला. To know more click here https://letsup.app.link/qCkNJLqmQgb

ट्विटर अकाउंटच्या ब्लू टिकवरून वाद; जाणून घ्या ब्ल्यू टिकचे नियम... Letsupp | Trending मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचे पर्सनल ट्विटर अकाउंटची ब्लू टिक काढली त्यानंतर ती पुन्हा देण्यात आली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कृष्ण गोपाल, सुरेश सोनी, सुरेश जोशी आणि अरुण कुमार या नेत्यांच्या अकाऊंटची ब्लू टिक हटवल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात ब्ल्यू टिकचे नियम नक्की आहेत? ट्विटर अकाउंटची ब्लू टिक अकाउंटची सत्यता दर्शवते. युजर्स ब्ल्यू टिक मिळवण्यासाठी अ‍ॅप्लाय करू शकतात. ब्ल्यू टिक मिळवण्यासाठी अटींची पूर्तता करणे गरजेचे असते. ब्लू टिक मिळवण्याच्या नियम काय आहेत? : ● अकाउंटवरील प्रोफाइल फोटो, नाव, इमेल आयडी, फोन नंबर, व्हेरिफाय असावा. ● मागील सहा महिन्यांपासून अकाउंट अ‍ॅक्टिव्ह असावं गेल्या १२ महिन्यात ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन झालेल नसावे. ● व्हेरिफिकेशनसाठी सरकारने दिलेला आयडी, ई-मेल आयडी, ऑफिशियल वेबसाइट द्यावी. ब्लू टिक मिळण्याची प्रक्रिया काय असते? : ● ब्लू टिकसाठी अ‍ॅप्लाय केल्यानंतर ट्विटर मेलवर तुम्हाला रिप्लाय देईल. ● अकाउंट व्हेरिफाय झाल्यावर प्रोफाईलवर ब्लूटूथ दिसेल. ● अकाउंट व्हेरिफाय न झाल्यास ३० दिवसांनी पुन्हा अप्लाय करू शकता. ब्लू टिक का हटवली जाते? : ● अकाउंट खूप दिवसांपासून अ‍ॅक्टिव्ह नसेल तर. ● पद सोडल्यानंतर अकाउंटची ब्लू टिक हटवली जाऊ शकते. ● तसेच वारंवार नाव, बायो, प्रोफाईल फोटो बदलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास. ● पॉलिसीचे उल्लंघन केल्यास. To know more click here https://letsup.app.link/FGudtEH9Pgb

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर टेस्ट जरुरी आहे का ? LetsUpp | Covid Helpline ● कोरोना आणि लसीकरणावरून लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न येत आहेत. जर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तर कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे का? असे प्रश्न अनेकांच्या मनात पडले आहेत.. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर ... ● अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शन (सीडीसी) नुसार जर तुम्ही कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या असतील तर तुम्हाला कोरोना टेस्ट करणे किंवा क्वारंटाईन होण्याची गरज राहणार नाही. जरी तुम्ही एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तरी देखील याची गरज राहणार नाही. ● कोरोनावर नवीन संशोधनातून हे नवीन गाईडलाईन देण्यात आली आहे. ज्या लोकांना कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना कोरोनाचे गंभीर संक्रमण होण्याचा धोका कमी आहे. संशोधनानुसार जरी तुम्हाला कोरोना झाल तरी देखील तुमच्यापासून तो दुसऱ्यांना होण्याचा आणि लक्षणे दिसण्याचा धोका कमी असतो. कोणत्याही व्यक्तीने दोन्ही व्हॅक्सिन घेतल्या असतील तर त्याला स्क्रिनिंगचीदेखील गरज नाही. ● यावरून अमेरिकेमध्ये तज्ज्ञांचे दोन गट प़डले आहेत. सीडीसीने काही टेस्टिंग गाईडलाईन्स थोड्या बदलाव्यात. सध्याच्या संकटात सामान्य ताप आणि व्हायरसदेखील कोरोना व्हायरसकडे इशारा करतात. यामुळे टेस्टिंग क्षमतेवर दबाव वाढतो. कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक गोष्टी तसेच महत्वपूर्ण माहिती आता मिळवा एका क्लिकवर! https://letsup.app.link/UoaYIih3Pgb

बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चास सुरुवात LetsUpp | Beed बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चास सुरुवात झाली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून बीडमध्ये मराठा नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे, त्यामुळे पोलिस यंत्रणेकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप विनायक मेटे यांच्याकडून करण्यात आला आहे. प्रशासनाचा दबाव असला तरी मोर्चा सुरु राहणार असा पवित्रा विनायक मेटे यांनी घेतला आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुषांची तसेच युवकांची या मोर्च्यामध्ये उपस्थिती होते. तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचे संपूर्ण पालन होईल याची दक्षता आयोजकांनी घेतली. To know more click here https://letsup.app.link/VAPQptgXPgb

photo content

अनलॉक ! राज्यात कोठे काय सुरु राहणार? जाणून घ्या सविस्तर LetsUpp | Trending राज्यात अनलॉकचे पाच टप्पे निश्चित करण्यात आले असून सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच राज्यात 07 जूनपासून ही अधिसूचना लागू होणार असून टप्प्याटप्प्याने राज्य अनलॉक केले जाणार आहे. कोणत्या स्तरात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे? काय बंद आणि काय सुरु राहणार? ✅ पहिला टप्पा : ● सर्व प्रकारची दुकानं पूर्ववत सुरु होणार ● मॉल, दुकानं, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह नियमितपणे सुरु होणार ● लोकल सेवा पूर्ववत होईल, मात्र परिस्थितीनुसार प्रशासनाला निर्णयाची मुभा ● जिम, सलू, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली होतील ● सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत होईल, इथे जमावबंदी नसेल ● खासगी व सरकारी कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरु होतील ● विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा ● लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधनं नाही ✅ दुसरा टप्पा : ● 50 टक्के क्षमतेने हाॅटेल सुरू ● माॅल चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेने सुरू ● लोकल बंद, सार्वाजिनक जागा, खुली मैदान , मार्निंग वाॅक सायकल सुरू ● शासकीय आणि खासगी कार्यालये सगळे खुली ● शुटिंग चित्रपट सुरू ● सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के खुले ● लग्न सोहळा मॅरेज हाॅल 50 टक्के आणि जास्तीत 100 लोक उपस्थितीत ● अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल ● मिटींग आणि निवडणूक 50 टक्के उपस्थितीत ● बांधकाम, कृषी काम खुली ● इ काॅमर्स सुरू ● जीम, सलुन, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू ● शासकीय बस आसन क्षमता 100 टक्के सुरू ● जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल ● जिथ रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल ✅ तिसरा टप्पा : ● अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 तर इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील ● अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील ● मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील ● हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सुरु राहील (सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत) ● सार्वजनिक उद्याने, मैदाने, जॉगिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू रहातील ● खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील ● इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील ● सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल ● सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के खुले ● लग्न सोहळे इतर बैठकांसाठी 50 जणांची व अंत्यसंस्कारसाठी 20 जणांची उपस्थिती राहील ● बांधकाम, कृषी काम कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी ✅ चौथा टप्पा : ● अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत खुली राहणार ● इतर दुकानं, सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील ● हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील ● सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू राहणार ● अत्यावश्यक सेवेतील खाजगी व सरकारी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती ● स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील ● कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही ● लग्न कार्यासाठी 25 , अंत्यसंस्कारसाठी 20 तर इतर बैठकांसाठी 50 टक्के क्षमता राहील ● बांधकामं व कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील ● ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील ● सलून आणि जीम 50 टक्के क्षमतेने सुरू राहील ● बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहील ● संचारबंदीचे नियम लागू राहतील ✅ पाचवा टप्पा : सध्या पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही. जर पुढील आठवड्यात जास्त रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या टप्प्यामध्ये समावेश होईल. To know more click here https://letsup.app.link/Xs0K0jpDPgb

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला असून भारतीय रिझर्व्ह बँकेने आधी वर्तवलेल्या विकासदरात घट केली...! (स्रोत : भारतीय रिझर्व्ह बँक) - बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त #LetsUppApp वर! https://letsupapp.page.link/apps (Link in the bio)

photo content

photo content

म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी खासगी हॉस्पिटल्सच्या बिलांवर सरकारचे निर्बंध To know more click here https://letsup.app.link/otmTVYNsOgb

आता घरबसल्या करा कोरोनाची तपासणी... कशी ते जाणून घ्या To know more click here https://letsup.app.link/AuHkDr62Ngb

महाराष्ट्रात अनलॉकबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली होती. मात्र, राज्य आरोग्य मंत्रालयाकडून अनलॉकबा
महाराष्ट्रात अनलॉकबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली होती. मात्र, राज्य आरोग्य मंत्रालयाकडून अनलॉकबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. (स्रोत - महाराष्ट्र शासन) - बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त #LetsUppApp वर! Link in the bio. https://letsupapp.page.link/apps

अनलॉकबाबत अद्याप निर्णय नाही, राज्य सरकारचं स्पष्टीकरण LetsUpp | Trending ▪️ राज्यात 5 टप्प्यांमध्ये अनलॉकबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ▪️ मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये अनलॉकची घोषणा केली होती. ▪️ त्यानंतर आता राज्य सरकारनंच हा निर्णय अद्याप झालेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘ ▪️ राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही थांबलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. ▪️ कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. ▪️ दरम्यान, राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नसल्याचे राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. To know more click here https://letsup.app.link/atMWkio1Mgb

राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक; पाहा कुठल्या जिल्ह्यात काय स्थिती ? LetsUpp | Trending ● राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. ● दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेणार आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट बघून टप्पे बदलण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ● किती टप्प्यांचा समावेश? पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे - सर्व 18 जिल्हे अनलॉकचा निर्णय, दुसर्‍या टप्प्यात 5 जिल्हे, तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्हे, चौथ्या टप्प्यात 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. ● असे आहेत 5 टप्पे पहिला टप्पा - 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 टक्केच्या आत ऑक्सिजन बेड आहे तिथ लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स हॉटेल्स दुकाणे वेळेचे बंधन नाही. ● अनलॉक झालेले राज्यातील 18 जिल्हे भंडारा, बुलढाणा, चंदपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्ण सुरू होतील, चित्रपट गृह सुरू होतील. जिम, सलून सुरू राहणार, बस 100 टक्के क्षमतेने, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहणार, ई कॉमर्स सेवा सुरू राहणार, गार्डन, वॉकिंग ट्रॅकला परवानगी, थिएटर सुरू होणार, चित्रपट शूटिंगला परवानगी, जमावबंदी नाही. ● दुसरा टप्पा - दुसऱ्या टप्प्यात एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, अहमदनगर, अमरावती, हिंगोली, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. 50 टक्के हॉटेल सुरू, मॉल्स, चित्रपटगृह - 50 टक्के क्षमतेने सुरू, मुंबई लेवल 2 मध्ये असल्याने लोकल बंदच राहणार, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के खुले, लग्न सोहळा मॅरेज हॉल 50 टक्के आणि जास्तीत 100 लोक उपस्थितीत, अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल, मिटिंग आणि निवडणूक 50 टक्के उपस्थितीत, बांधकाम, कृषी काम खुली, जीम, सलुन, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू, शासकीय बस आसाम क्षमता 100 टक्के सुरू, जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथ रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल. ● तिसरा टप्पा - तिसऱ्या टप्प्यात एकूण 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद अत्याआवश्यक दुकाने सुरू राहणार, सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने, सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील, मॉल्स थेटर्स सर्व बंद राहतील, सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्यंत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील लोकल बंद राहतील, मॉर्निग वॉक, मैदाने, सायकलिंग पाहटे 5 ते सकाळी 9 मुभा, 50 टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू, आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार, स्टुडिओत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल, मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के दुपारी 2 पर्संत खुले असणार सोमवार ते शुक्रवार, लग्नसोहळ्याला 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोक मुभा असतील, बांधकाम दुपारी दोन पर्संत मुभा, कृषी सर्व कामे मुभा, ई कॉमर्स सेवा दुपारी 2 पर्यंत सुरू, जमावबंदी संचारबंदी कायम राहील ● चौथ्या टप्प्यात दोन जिल्ह्यांचा समावेश पुणे, रायगड ● पाचवा टप्पा - उर्वरित सर्व जिल्ह्यांचा पाचव्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. पाचव्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. तेथे निर्बंध कठोर असणार आहेत. To know more click here https://letsup.app.link/qjaWmRoSMgb

अखेर बारावीची परीक्षा रद्द; बैठकीत प्रस्ताव मंजूर! LetsUpp | Trending ● सीबीएसईपाठोपाठ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मंजूर केला आहे. ● बारावीची परीक्षा 23 एप्रिलला होणार होती. कोरोनाचा वाढत संसर्ग लक्षात घेऊन ती पुढे ढकलली. नुकत्याच केंद्राने सीबीएससीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. ● राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. To know more click here https://letsup.app.link/k7SWPyiKMgb

LetsUpp Marathi - Статистика и аналитика Telegram-канала @letsup