ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 713 подписчиков, занимая 5 607 место в категории Образование и 11 981 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 713 подписчиков.

Согласно последним данным от 07 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -75, а за последние 24 часа — 2, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 6.26%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.17% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 2 111 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 068 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 08 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 713
Подписчики
+224 часа
-477 дней
-7530 день
Архив постов
संदीपकुमार साळुंखे, IRS अप्पर संचालक - अन्वेषण (आयकर) नैराश्य आत्महत्या यासारखे टोकाचे उपाय टाळण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करण्याआधी ही सप्तपदी जरूर मनात पूर्ण करा : १) "फक्त अधिकारी आणि अधिकारीच व्हा" असे सांगणारी  प्रेरणादायी व्याख्याने गांभीर्याने न घेता त्यातील पाहिजे तेवढा मध्यम मार्गच निवडावा.(मी देखील प्रेरणादायी व्याख्याने देतो, परंतु अधिकारीच झाले पाहिजे हे सांगणे कटाक्षाने टाळतो.) २) शक्यतो पदवीच्या काळातच वेळेचे व्यवस्थित नियोजन करून किमान ५०-६० टक्के अभ्यास संपवावा. (मी असेच केले होते) ३) शक्यतो आपल्या क्षेत्रातील पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा आधी पूर्ण करावे. ते करूनही आपण साधारणतः २२ -२३ वर्षांचे असतो, म्हणजे त्यानंतरही स्पर्धा परीक्षांसाठी ६-७ वर्षे उपलब्ध असतात. (मी हे केले नव्हते, पण तुम्ही करा) ४) पूर्णवेळ अभ्यास दोन वर्षांपेक्षा जास्त करू नये. दोन वर्षानंतर नोकरी अथवा व्यवसाय सुरू करून अर्धवेळ किंवा आठवडा सुट्टीच्या अभ्यासाचे नियोजन करावे. (मी पूर्ण अभ्यास हा नोकरी करतानाच केला) ५) प्लॅन - बी असलाच पाहिजे. "मागचे दोर कापून टाकण्याच्या भानगडीत पडू नये". तानाजी-सूर्याजी हे स्वराज्याचे युद्ध लढत होते, आपण केवळ एक परीक्षा देत आहोत हे लक्षात ठेवावे. (मी प्लॅन B ठेवला होता). ६) फक्त स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, अधिकारी व्हायचे आहे म्हणून चांगल्या शाखेमध्ये मिळणारा प्रवेश नाकारून आर्ट्स वगैरे घेण्याच्या भानगडीत पडू नये. आधी आपल्या क्षमतेनुसार उत्तम क्षेत्रातील डिग्री जरूर घ्यावी. मागच्या सुमारे आठ-दहा वर्षात सर्व स्पर्धा परीक्षांचे स्वरूप बदललेले आहे आणि आर्ट्स किंवा कॉमर्स अथवा एग्रीकल्चर यासारख्या शाखांमधील विद्यार्थ्यांना पुर्वी मिळणारा तुलनात्मक फायदा (advantage) आता अजिबात मिळत नाही. ७) पूर्णवेळ अर्धवेळ मिळून एकूण चार - पाच वर्षांपेक्षा जास्त काळ अभ्यास करू नये.

मी माझा upsc चा निकाल लागल्यापासून एक तत्व पाळत आलोय. शक्यतो भाषणबाजी करायची नाही. अभ्यासाबद्दल बोलायचे. विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान असले पाहिजे. IAS होणे एक मोठी संधी आहे. पण ती संधी सर्वोच्च नाही. आपण कोणीही Hero नाहीत. आणि १ टक्क्यांहून कमी निकाल असणाऱ्या परीक्षेत नव्व्यांनवांचे काय हा प्रश्न कायम विचारण्याचा माझा आग्रह आहे. स्वतःच्या प्रेमात पडून आपला प्रवास पुन्हा सांगण्यासाठी लिहीत नाही. पण एका विद्यार्थ्याच्या मृत्यूने अस्वस्थ झाल्याने लिहीत आहे. SBI क्लर्क, LIC ऑफिसर पासून जमतील त्या सर्व परीक्षा मी दिल्या आहेत. शिकवण्या घेतल्या आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड आपल्याला चुकलेली नाही. मुळात काही तात्विक कारणांमुळे शेवटच्या वर्षाला इंजिनीअरिंग सोडल्यानंतर समोर अंधारच होता. मराठी साहित्याच्या आवडीतून मुक्त विद्यापीठातून BA ची मिळवलेली डिग्री तेवढी होती. एक परीक्षा पास झालो म्हणून ठीक आहे. पण मराठी साहित्य आवडते म्हणून त्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे भविष्य नक्की काय आहे? आज एका शासकीय पदावर कार्यरत असताना हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की खासगी क्षेत्रापेक्षा शासकीय सेवेत पगार कमी आहेत. जबाबदारी अधिक आहे. व्यवस्था एक दोन लोकांनी बनत नाही. ती असंख्य लोक, विचार, नियम, संस्था यातून आकाराला येते. तिला चेहरा म्हटलं तर असतो, म्हटलं तर नसतो. यामुळे आपण ज्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी येऊ पाहतो त्या सोबत काही मर्यादाही आपल्याला समजून घ्याव्या लागतील. पगारात भागवणे तर आहेच, त्याशिवाय अनेक प्रकारची आव्हाने, टीका टिपण्या यांना तोंड देणे शिकत राहावे लागते. सातत्य आणि संयमाची परीक्षा कोणालाही चुकलेली नाही. पण शासकीय नोकरीच्या पलीकडेही एक जग असते. आपल्या मागे आपले घर असते. प्रत्येकाचा संघर्ष तितकाच महत्वाचा असतो. पण तो आपल्या जवळच्या लोकांपेक्षा महत्वाचा खरंच नाही. निराशेच्या एका क्षणी त्यांचा विचार केला पाहिजे. आपल्या आजूबाजूला स्पर्धा परीक्षांच्या लांब, थकवणाऱ्या प्रक्रियेत संधीची वाट पाहत असणारी अनेक तरुण मंडळी दिसतील. त्यांच्याशी संवाद साधत राहावे लागेल. आपल्याकडे आजकाल भाषा आणि सामाजिक शास्त्रातही १०० % गुण मिळतात. काही महाविद्यालयांचे प्रवेशाचे मेरिट ९९% असते. मग पुढे चालून त्यातले काही थोडे मेडिकल इंजिनीअरिंग च्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. इतर मागे पडतात. यशस्वी लोकांमधून अजून थोडे यशस्वी उरतात. सतत पुढे जाण्याच्या स्पर्धेत शेवटी जीवन नावाच्या चाकोरीच्या मर्यादेचे भान विद्यार्थ्यांना आणून देण्यात आपण कमी पडतो आहोत. यशाच्या व्याख्या बदलाव्या लागतील. चांगला माणूस म्हणून जगणे, कष्ट करणे आणि कष्टाचा एकेक रुपया हे सामाजिक यश मानणारा समाज आपण निर्माण करणार आहोत का? Survival of the fittest कडून सर्वोदयाकडे जाण्याचा मार्ग सोपा नाही. पण समाज म्हणून आपल्याला कधी ना कधी तो स्वीकारावा लागेल.. त्या तरुण मित्रास आदरांजली. कौस्तुभ दिवेगावकर IAS

photo content
+4

photo content
+9

photo content
+9

photo content
+4

photo content
+9

🟪पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असतील. ▪️राज्याचे 11वे मुख्यमंत्री असतील. ▪️पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडमधील सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री असतील

🟪राष्ट्रीय वैद्यकीय चिकित्सक / वैद्य दिवस: 1 जुलै दरवर्षी 1 जुलै या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय वैद्यकीय चिकित्सक / वैद्य दिवस’ साजरा करतात. हा दिवस वैद्यकीय समुदायाला समर्पित आहे. डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त, भारतीय वैद्यकीय संघाने (IMA) एक समारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केला. त्यादरम्यान महामारीच्या गेल्या दीड वर्षांच्या कठीण काळात, वैद्यकीय चिकित्सकांनी देशवासीयांची सेवा केल्याबद्दल 130 कोटी भारतीयांच्यावतीने पंतप्रधानांनी सर्व वैद्यकीय चिकित्सकांचे आभार मानले. ▪️आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी भारताचे प्रयत्न आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात आरोग्यक्षेत्रासाठी 15 हजार कोटी रुपये वाटप करण्यात आले होते. या वर्षी आरोग्य क्षेत्रासाठीची अर्थसंकल्पातील तरतूद दुप्पट करण्यात आली असून 2 लक्ष कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सुविधांच्या बाबतीत दुर्लक्षित भागात आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी कर्ज हमी योजनेकरिता 50 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. नवीन AIIMS, वैद्यकीय महाविद्यालये यांची स्थापना होत आहे. आता देशात 15 नव्या AIIMS संस्थांचे काम सुरु झाले आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमधील जागा दीड पटीने तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील जागा 80 टक्क्यांनी वाढविण्यात आल्या आहेत.

🟪अभिमन्यू जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू. भारताचा अमेरिकास्थित बुद्धिबळपटू अभिमन्यू मिश्रा याने बुधवारी हंगेरीतील बुडापेस्ट येथे ग्रँडमास्टरसाठीचा तिसरा टप्पा पार करत जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. अभिमन्यूने ग्रँडमास्टर सर्जी कार्याकिन यांचा गेली १९ वर्षे अबाधित असलेला विक्रम मोडला. १२ ऑगस्ट २००२मध्ये कार्याकिन यांनी १२ वर्षे आणि सात महिन्यांचा असताना ग्रँडमास्टर किताब मिळवला होता. ५ फेब्रुवारी २००९ मध्ये जन्मलेल्या अभिमन्यूने १२ वर्षे, चार महिने आणि २५ दिवसांचा असताना ग्रँडमास्टर किताबाला गवसणी घातली आहे, असे ‘चेसडॉटकॉम’ या संकेतस्थळाने म्हटले आहे. १२ वर्षीय अभिमन्यू अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहात असून त्याने आंतरराष्ट्रीय मास्टरपासून थेट ग्रँडमास्टर किताबापर्यंत झेप घेतली आहे. ग्रँडमास्टर किताबासाठीचा २५०० एलो रेटिंगचा टप्पा त्याने या स्पर्धेत पार केला. अभिमन्यूने बुडापेस्ट येथे काही महिने वास्तव्य करत लागोपाठ स्पर्धामध्ये भाग घेतला. त्याने या स्पर्धामध्ये दमदार कामगिरी करत ग्रँडमास्टर किताब आणि विक्रमाची नोंद केली.

🟪सांगली टू दुबई व्हाया ताडसर… ७८ वर्षीय आजोबा ठरले ‘ड्रॅगन फ्रूट’ची निर्यात करणारे पहिले भारतीय शेतकरी सांगलीमधील ताडसर आणि वांगी या दोन छोट्या गावांमधील दोन वयस्कर शेतकऱ्यांची सध्या पंचक्रोषीमध्ये चर्चा आहे. या चर्चेमागील कारण म्हणजे या दोघांनी आपल्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं आहे. इतकच नाही तर त्यांनी हा माल थेट दुबईला निर्यात केलाय. विशेष म्हणजे अशाप्रकारे भारतातून एखाद्या शेतकऱ्याने परदेशामध्ये ड्रॅगन फ्रूट पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतामध्ये उत्पादन घेतलं जाणारं गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रूटचं या दोघांनी उत्पादन घेतलं असून १०० किलो माल त्यांनी दुबईला पाठवल्यांचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. या दोघांनाही आपल्या शेतांमध्ये घेतलेल्या उत्पादानापैकी प्रत्येकी ५० किलोचा माल दुबईला पाठवला आहे. हे फळ कमळाच्या फुलासारखं दिसत असल्याने त्याला कमलम असंही म्हटलं जातं. सांगलीसारख्या दुष्काळग्रस्त भागातील १५० एकरावर ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं जात आहे. या फळाला चांगली मागणी असून या पिकाच्या आधारे येथील शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील अशी अपेक्षा आहे. सांगली जिल्ह्यामधील कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात द्राक्षं आणि ऊसाचं उत्पादन घेण्याऐवजी आता शेतकरी ड्रॅगन फ्रूटचं पिक घेताना दिसत आहे.

🟪शिक्षणासाठी एकात्मिक जिल्हा माहिती यंत्रणा प्लस (UDISE+) 2019-20 केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने भारतातील शालेय शिक्षणाविषयक “शिक्षणासाठी एकात्मिक जिल्हा माहिती यंत्रणा प्लस (UDISE+) 2019-20” अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. UDISE+ ही शाळांकडून ऑनलाईन माहिती/आकडेवारी संकलित करणारी एक व्यवस्था असून, 2018-19 या वर्षामध्ये ती विकसित करण्यात आली. त्याआधी कागदावर ही माहिती संकलित केली जाऊन, ती तालुका अथवा जिल्हा पातळीवर पाठवली जात असे, 2012-13 या वर्षापासून ही पद्धत अस्तित्वात होती. UDISE+ माहितीसाठी संदर्भ वर्ष म्हणून 2019-20 हे ग्राह्य धरले जात आहे. ▪️अहवालातील ठळक नोंदी 2018-19 या वर्षाच्या तुलनेत 2019-20 या वर्षात सर्व स्तरातील शालेय शिक्षणात सकल हजेरीपट नोंदणी गुणोत्तरात सुधारणा झाली आहे. तसेच सर्व शालेय शिक्षणात विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तरातही सुधारणा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 2019-20 या वर्षामध्ये, प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणपातळीत विद्यार्थिनींची नोंदणी 12.08 कोटी इतकी आहे. 2018-19 या वर्षाच्या तुलनेत त्यात 14.08 लक्ष विद्यार्थीनींची वाढ झाली आहे. वर्ष 2012-13 ते वर्ष 2019-20 या काळात, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या दोन्ही पातळ्यांवर, लिंगभाव समानता निर्देशांकात (GPI) सुधारणा झाली आहे. शाळांमध्ये वीज जोडणी, कार्यरत संगणक, इंटरनेट सुविधा या सगळ्यासह असलेल्या शाळांची संख्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. अनेक शाळांमध्ये हात स्वच्छ धुण्यासाठीची व्यवस्था केली असल्याचे निदर्शनास आले आहे. 2019-20 या वर्षामध्ये, भारतातील 90 टक्के शाळांमध्ये हात धुण्यासाठी हँडवॉशची सुविधा आहे, 2012-13 या वर्षामध्ये ही सुविधा केवळ 36.3 टक्के शाळांमध्ये उपलब्ध होती. 2019-20 या वर्षामध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळेल्या शिक्षणातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या 26.45 कोटीपेक्षा अधिक होती. 2018-19 या वर्षाच्या तुलनेत, त्यात 42.3 लक्ष विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. सर्व स्तरातील शालेय शिक्षणात, 2018-19 या वर्षाच्या तुलनेत 2019-20 या वर्षामध्ये सकल हजेरीपट नोंदणी गुणोत्तरातही सुधारणा झाली आहे.

🟪कोव्हिशिल्ड’ला नऊ युरोपीय देशांची मान्यता. युरोपातील ९ देश तेथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोव्हिशिल्ड लशीला मान्यता देत असल्याचे सूत्रांनी गुरुवारी सांगितले. ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड व स्पेन हे देश कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या लोकांना प्रवासासाठी परवानगी देत आहेत. शेंझेन देश म्हणून स्वित्झर्लंडही कोव्हिशिल्डला मान्यता देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय, जे भारतीय इस्टोनियाला जाणार आहेत, त्यांच्या बाबतीत भारत सरकारने प्राधिकृत केलेल्या लशींना आपण मान्यता देणार असल्याचे त्या देशाने सांगितले आहे. ज्या भारतीय लोकांनी कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या लशी घेतल्या आहेत व जे युरोपला जाऊ इच्छितात, त्यांना परवानगी देण्याबाबत स्वतंत्रपणे विचार करावा, अशी विनंती भारताने यापूर्वीच युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांना केली आहे. करोना महासाथीच्या काळात मुक्तपणे प्रवास करता यावा यासाठी युरोपीय महासंघाचे डिजिटल कोविड प्रमाणपत्र किंवा ‘ग्रीन पास’ गुरुवारपासून अमलात येत आहे. त्याच्या व्यवस्थेनुसार, युरोपीय औषध यंत्रणेमार्फत (ईएमए) प्राधिकृत केलेल्या लशी घेतलेल्या व्यक्तींना युरोपीय महासंघ क्षेत्रात प्रवासविषयक निर्बंधांपासून सूट दिली जाणार आहे.

🟪डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे निधन. दोनवेळा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री राहिलेले डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. एक कुशल नोकरशहा आणि आधुनिक अमेरिकी लष्कराचे द्रष्टे म्हणून त्यांनी लौकिक मिळवला होता. मात्र इराकमध्ये दीर्घकाळ चाललेल्या व महागड्या ठरलेल्या युद्धाने त्यांच्या या प्रतिमेला गालबोट लावले होते. चार माजी सहकाऱ्यांनी रम्सफेल्ड यांचे वर्णन चलाख व तितकेच आक्रमक, देशभक्त आणि राजकीयदृष्ट्या धूर्त असे केले होते. त्यांनी चार अध्यक्षांच्या हाताखाली सरकारमध्ये, तर सुमारे २५ वर्षे कॉर्पोरेट जगतात काम केले. २००८ साली निवृत्त झाल्यानंतर, जनसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच सैनिकांच्या कुटुंबीयांना सेवा पुरवण्यासाठी व मदत करण्यासाठी त्यांनी ‘रम्सफेल्ड फाऊंडेशन’ची स्थापना केली. परराष्ट्रमंत्री म्हणून रम्सफेल्ड यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ११ सप्टेंबर २००१ रोजी आत्मघातकी अपहरणकर्त्यांनी न्यू यॉर्कमधील वर्ल्डट्रेड सेंटरवर आणि पेंटॅगॉनवर हल्ला केला. यामुळे लष्कराची पुरेशी तयारी नसतानाही देश युद्धात ओढला गेला.

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content
+8

photo content
+9

🟪आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अतंर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग उन्नती योजनेला एक वर्ष पूर्ण. अन्न प्रक्रीया उद्योगातील असंघटित गटात सध्या व्यक्तिगत पातळीवर कार्यरत सूक्ष्‍म उद्योगात स्पर्धा वाढवणे आणि या क्षेत्राला प्रोत्‍साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवून आत्‍मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत केंद्र-पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्‍म अन्न उद्योग उन्‍नती योजनेने (PMFME) एक वर्ष पूर्ण केले आहे. 🔳योजनेची कामगिरी योजनेच्या ‘एक जिल्हा एक उत्‍पादन’ (ODOP) घटकाच्या अंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने राज्‍ये/ केंद्रशासित प्रदेशांद्वारे प्राप्‍त शिफारशीनुसार 137 वैशिष्ट्यपूर्ण उत्‍पादनांसह 35 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांतील 707 जिल्ह्यांकरीता ODOPला मंजूरी दिली आहे. योजनेच्या अंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने ग्राम विकास मंत्रालय, आदिवासी कार्य मंत्रालय आणि गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय यांच्यासोबत तीन संयुक्‍त पत्रांवर स्वाक्षरी केली आहे. योजनेच्या नोडल बँकेच्या रुपात यूनियन बँक ऑफ इंडिया सोबत एक करार केला आहे. 11 बँकासह योजनेकरीता आधिकृत कर्ज घेणाऱ्या भागीदारांच्या रुपात करारपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. योजनेच्या अतंर्गत, क्षमता बांधणी घटकाखाली, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM) आणि अन्न प्रक्रीया तंत्रज्ञान संस्था (IIFPT) प्रशिक्षण तसेच संशोधन विषयक सहकार्यात मोलाची भूमिका वठवत आहेत. त्याअंतर्गत 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 371 तज्ञ प्रशिक्षणार्थीं आणि 469 जिल्हा पातळीवरील प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण घेले असून इतर राज्यात ही प्रक्रीया सुरु आहे.