ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 745 подписчиков, занимая 5 597 место в категории Образование и 11 988 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 745 подписчиков.

Согласно последним данным от 11 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -76, а за последние 24 часа — 9, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 10.19%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.78% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 3 438 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 275 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 12 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 745
Подписчики
+924 часа
+27 дней
-7630 день
Архив постов
🔸आंतरराष्ट्रीय राजकारणाचे मूलाधार

🔸स्थानिक प्रशासन -ग्रामीण व नागरी

🔸भारतीय राजकारण प्रक्रिया

25 एप्रिल: जागतिक मलेरिया दिवस
25 एप्रिल: जागतिक मलेरिया दिवस

🟪 आदिवासी उमेदवारांना UPSC परीक्षा प्रशिक्षण नि:शुल्क मिळणार. 👉दिल्लीतील नामवंत क्लास मध्ये प्रशिक्षण 👉प्रति विद्यार्थी क्
🟪 आदिवासी उमेदवारांना UPSC परीक्षा प्रशिक्षण नि:शुल्क मिळणार. 👉दिल्लीतील नामवंत क्लास मध्ये प्रशिक्षण 👉प्रति विद्यार्थी क्लाससाठी ₹ 2 लाख 👉प्रति महिना ₹ 12 हजार विद्यावेतन 👉महाराष्ट्रात प्रशिक्षणास प्रति महिना ₹ 8 हजार विद्यावेतन

photo content
+2

photo content
+9

photo content
+9

“समय” और “धैर्य” वह दो हीरे मोती है जिनके बल पर व्यक्ति मुश्किल से मुश्किल लक्ष्य हासिल कर सकता है। @mpscsimplified

▪️OMR Sheet & Self Analysis Chart. ▪️आगामी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षासाठी उपयुक्त OMR Sheet आणि स्व:मूल्यमापन तक्ता

🟪'प्राणवायू’वरून दिल्ली-हरियाणात वाक्युद्ध. दिल्लीतील अनेक रुग्णालये सलग दुसऱ्या दिवशी प्राणवायूच्या टंचाईमुळे रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी धडपड करत असतानाच, या शहराला होणारा प्राणवायूचा पुरवठा रोखत असल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी बुधवारी हरियाणा सरकारवर केला. आपल्या प्रशासनातील कुणीही काहीही रोखून धरलेले नसल्याचे सांगून हरियाणा सरकारने या आरोपाचे जोरदार खंडन केले. केंद्र सरकारने दिल्लीचा प्राणवायूचा कोटा ३७८ मेट्रिक टनांवरून ७०० मेट्रिक टनांपर्यंत वाढवावा अशी मागणी ‘आप’ सरकार करीत आलेले आहे, असे सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तथापि, राज्यांसाठीचा प्राणवायूचा कोटा ठरवून देणाऱ्या केंद्राने याबाबत काहीही पाऊल उचललेले नाही, असे ते म्हणाले. ‘वाढलेला वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने आमचा ऑक्सिजनचा कोटा ७०० टनांपर्यंत वाढवावा, अशी आम्ही पुन्हा मागणी करत आहोत. उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थानसह अनेक राज्यांतील रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये भरती आहेत’, असे सिसोदिया यांनी सांगितले. हरियाणा सरकारच्या एका अधिकाऱ्याने फरीदाबादमधील संयंत्रातून दिल्लीला होणारा पुरवठा रोखला असल्याचा दावा त्यांनी केला.

🟪राष्ट्रीय योजना सादर करा. देशातील गंभीर करोनास्थितीची स्वत:हून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने प्राणवायू आणि अन्य आवश्यक औषधांबाबत ‘राष्ट्रीय योजना’ सादर करण्याची सूचना गुरुवारी केंद्र सरकारला केली. या प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होईल. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. एल. एन. राव आणि न्या. एस.आर. भट यांच्या खंडपीठाने करोनामुळे उद्भवलेल्या गंभीर स्थितीची दखल घेत केंद्राला नोटीस बजावली. प्राणवायू, आवश्यक औषधांचा पुरवठा, लसीकरणाची पद्धत आणि प्रकार या मुद्द्यांबाबत आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. टाळेबंदी लागू करण्याचा अधिकार आम्ही राज्यांकडेच ठेवू इच्छितो. न्यायपालिकेच्या निर्णयाद्वारे टाळेबंदी होऊ नये, अशी आमची इच्छा आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. देशातील किमान सहा उच्च न्यायालये करोनाशी संबंधित प्रकरणांची सुनावणी घेत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. दिल्ली, मुंबई, सिक्कीम, मध्य प्रदेश, कोलकाता आणि अलाहाबाद ही किमान ६ उच्च न्यायालये करोनाशी संबंधित मुद्दे हाताळत आहेत. ती प्रामाणिकपणे त्यांच्या अधिकार क्षेत्राचा वापर करत आहेत. तथापि, यामुळे काहीसा संभ्रम निर्माण होत आहे. एखाद्या गटाला प्राधान्य द्यावे असे एका उच्च न्यायालयाला वाटते; तर प्राधान्य दुसऱ्यांसाठी असल्याचे दुसऱ्या न्यायालयाचे मत असते, असे खंडपीठाने नमूद केले.

🟪भारतीय महिलांचे ‘सुवर्णसप्तक’ जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंनी ‘सुवर्णसप्तक’ साकारले. पोलंड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी भारताकडून गितिका, अरुंधती चौधरी, बेबीरोजिस्ना चानू, पूनम, सानामचा चानू, विन्का आणि अल्फिया पठाण या सात जणींनी सुवर्णपदकावर नाव कोरले. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात गितिकाने पोलंडच्या नतालिया कुझेव्हस्कावर ५-० असा विजय मिळवला. आशियाई विजेत्या बेबीरोजिस्नाने रशियाच्या व्हॅलेरिया लिंकोव्हाला ५-० अशी धूळ चारून ५१ किलो वजनी गटाचे जेतेपद मिळवले. सानामचाने (७५) किलो) कझाकस्तानच्या दाना दिदायवर ५-० असे वर्चस्व गाजवले. अरुंधतीने (६९ किलो) पोलंडच्या बार्बोरा मार्किनकोव्हस्काला ५-० असे नमवले. पूनमने फ्रान्सच्या स्टेलीन ग्रोसीवर ५-० अशी मात करून ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. तर विन्काने (६० किलो) अंतिम फेरीच्या सुरुवातीलाच कझाकस्तानच्या हुल्डी शायाकमेटोव्हावर जोरदार प्रहार करून तिला सामन्यातून माघार घेण्यास भाग पाडले. अल्फियाने (८१+) मोल्डोव्हाच्या दारिया कोझोरेझला ५-० असे नामोहरम केले. सात सुवर्णांसह भारताने २०१७च्या हंगामातील कामगिरीला मागे टाकले. त्यावेळी भारतीय महिलांनी तीन सुवर्णपदक मिळवले होते. शुक्रवारी पुरुषांच्या ५६ किलो वजनी गटात भारताचा सचिन सुवर्णपदकासाठी झुंजताना दिसणार आहे.

🟪राज्यांना एक लस ४०० रुपयांना तर खासगी रुग्णालयांना…; पुनावाला यांनी जाहीर केल्या किंमती. सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने भारत सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी देत असल्याची घोषणा सोमवारी केली. या निर्णयाचं आपण स्वागत करत असल्याचं ‘कोव्हिशिल्ड’ची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नव्या धोरणामुळे लसीकरणाची क्षमता वाढवता येईल तसेच राज्य सरकार, खासगी रुग्णालये आणि लसीकरण केंद्राना थेट लस देता येईल यासंदर्भात सीरमने समाधान व्यक्त केलं आहे. त्याचसोबत सीरमने खुल्या बाजारात लसीची किंमत किती असेल याचीही माहिती दिली आहे. अदर पुनावाला यांनी प्रसारमाध्यमांना लसीच्या किंमतीसंदर्भात माहिती दिलीय. पुढील दोन महिन्यांमध्ये आम्ही लस निर्मिती क्षमता वाढवणार असल्याचं सीरमने स्पष्ट केलं आहे. या पुढे आम्ही उत्पादन घेत असणाऱ्या एकूण लसींपैकी ५० टक्के लसी या भारत सरकारसाठी राखीव असतील. या लसी भारत सरकारच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत वितरित करण्यात येतील. उर्वरित ५० टक्के लसी राज्य सरकारांना आणि खासगी रुग्णालयांना विकल्या जातील असं सीरमने म्हटलं आहे.

🟪जागतिक पुस्तक दिन: 23 एप्रिल संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याच्या नेतृत्वात दरवर्षीप्रमाणे 23 एप्रिल 2021 रोजी जगभरात ‘जागतिक पुस्तक दिन’ (किंवा जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिन) साजरा करण्यात आला. 2021 वर्ल्ड बुक कॅपिटल (एका वर्षासाठी जागतिक पुस्तक राजधानी) - त्बिलिसी, जॉर्जिया. दिनाविषयी दरवर्षी 23 एप्रिल या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन साजरा केला जातो. पुस्तकांचे आणि वाचन कलेचे जीवनातले महत्त्व पट‍वून देण्याकरिता हा दिन साजरा केला जातो. 1616 साली 23 एप्रिल या तारखेला सर्व्हान्टेस, शेक्सपियर आणि इंका गॅरिसिलो डी ला वेगा या जगप्रसिद्ध साहित्यिकांचे निधन झाले होते. शिवाय ही तारीख इतर प्रसिद्ध लेखकांची जन्म आणि मृत्यूची तारीख देखील आहे. 1995 साली पॅरिस येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) परिषदेत जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यासाठी 23 एप्रिल या तारखेची निवड केली गेली. दरवर्षी UNESCO यांच्याकडून एक वार्षिक कार्यक्रम आयोजित केला जातो. प्रत्येक 23 एप्रिलपासून पुढील एका वर्षासाठी जागतिक पुस्तक राजधानी निवडली जाते.

🟪भारताला लस पुरवठा करु पण…; अमेरिकेच्या ‘फायजर’ कंपनीने घातली अट भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी भारतामध्ये २४ तासांमध्ये तीन लाखांहून अधिक करोना रुग्ण आढळून आले आहेत. भारतामध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या भारतात निर्माण होणाऱ्या लसींच्या माध्यमातून लसीकरण मोहिम मागील तीन महिन्यांपासून सुरु करण्यात आली आहे. असं असतानाही सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती फारशी समाधानकारक नसून चिंताजनक होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने आता इतर देशांमधून लसी विकत घेण्यासाठी तयारी सुरु केली आहे. अमेरिकेतील फायजर कंपनीने भारताला लस देण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यासंदर्भात त्यांनी एक महत्वाची अट घातली आहे. रशियन बनावटीच्या स्फुटनिक लसीच्या निर्मितीला परवानगी दिल्यानंतर आता भारताची नजर अमेरिकितील फायजर कंपनीच्या लसीकडे लागली आहे. त्यातच आज फायजरने भारतामध्ये लस देण्यासंदर्भात भाष्य करत लस देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यावेळी त्यांनी भारतात देण्यात येणाऱ्या लसी या केवळ सरकारी पुरवठा साखळीच्या माध्यमातून दिल्या जातील असं स्पष्ट केलं आहे. म्हणजेच बायोटेकच्या मदतीने विकसित करण्यात आलेल्या अमेरिकेतील फायजर ही लस भारतामध्ये केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “करोना बाधितांची वाढती संख्या पाहून फायजर आपल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राधान्याने सरकारी यंत्रणेला लस पुरवठा करणार आहे. केवळ सरकारी कंत्राटाद्वारेच कंपनी भारतामध्ये करोना लसींचा पुरवठा करणार आहे.”

🟪पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर . नवी दिल्ली : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. या दुर्घटनेप्रकरणी नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, रुग्णांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयामार्फत ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये रुग्णलयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची तर जखमींच्या नातेवाईकांना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे, या आगीच्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत

photo content
+9

photo content
+9