mpscCurrentinfo🔥
رفتن به کانال در Telegram
428
مشترکین
+124 ساعت
+47 روز
+430 روز
آرشیو پست ها
👉 नरेंद्र मोदी यांचे सर्व पक्षांना समर्थनाचे आवाहन.
👉 १६ एप्रिलपासून ३ दिवसीय विशेष अधिवेशन.
👉 लोकसभा व विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षण
👉 2029 निवडणुकांपूर्वी अंमलबजावणीचे लक्ष्य.
👉 जनगणना व परिसीमनानंतर जागांचे निर्धारण
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
नासाच्या (NASA) 'आर्टेमिस-2' (Artemis II) चंद्र मोहिमेवर रीड वाईझमन (कमांड), व्हिक्टर ग्लोव्हर (पायलट), क्रिस्टिना कोच (मिशन स्पेशालिस्ट) आणि जेरेमी हॅन्सन (मिशन स्पेशालिस्ट) हे चार अंतराळवीर गेले होते.
20 जुलै 1969 रोजी अपोलो-11 मोहिमेत नील आर्मस्ट्राँग यांच्या रूपाने मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.
यापर्वी POCSO कायद्यावर परीक्षेत आलेले काही प्रश्न👇👇
1] लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफन्सेस (पोक्सो) कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ? [महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 : 09 Nov 2025]
उत्तर : 2012
2] 'POCSO' कायदा कोणाशी संबंधित आहे? [मुंबई बॅण्ड्समन पेपर]
उत्तर :- मुली आणि मुलगे (18 वर्षा खालील]
3] POCSO कायदा वर्ष ? [आदिवासी विभाग परीक्षा :- 9 एप्रिल 2025]
उत्तर :- 2012 [ऑगस्ट 2024 Onelinner]
Note : लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा(POCSO ACT) 2012 हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने 2012 साली तयार केलेला कायदा आहे.
POCSO हे Protection of Children from Sexual Offences Act चे लघुरूप आहे.
👉 मुंबई–बेंगळुरू दरम्यान वंदे भारत स्लीपर धावणार
👉 रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंजुरी
👉 मार्ग → छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते केएसआर बेंगळुरू स्टेशन.
👉 लक्ष्य → डिसेंबर 2026 पर्यंत 12 स्लीपर रेक तयार
👉 कोच निर्मिती → लातूर येथील कारखाना.
👉 प्रकल्प → कायनेट रेल्वे सोल्युशन्स (रशियन सहकार्य)
महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे पार पडले.
उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.💐💐
Global Innovation Index (GII) 2025
👉 2015 मध्ये 81 वा → 2025 मध्ये 38 वा क्रमांक
👉 निम्न-मध्यम उत्पन्न गटात 1 ला क्रमांक
👉 मध्य व दक्षिण आशियामध्ये 1 ला क्रमांक 👆👆
वनताराने जगातील पहिल्या वन्यजीव आणि पशुवैद्यक जागतिक विद्यापीठाची केली स्थापना
रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखालील वनतारा (Vantara) संस्थेने गुजरातच्या जामनगरमध्ये जगातील पहिले एकात्मिक वन्यजीव आणि पशुवैद्यकीय जागतिक विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
उद्देश : वन्यजीव संवर्धन, पशुवैद्यकीय औषधनिर्माण, आणि संरक्षणाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावरील नेतृत्व तयार करणे.
अभ्यासक्रम : वन्यजीव वैद्यक, शस्त्रक्रिया, पोषण, वर्तनशास्त्र, आणि 'वन हेल्थ' यांसारख्या विषयांवर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध असतील.
आशियाई बॉक्सिंगमध्ये भारताचा सुवर्ण चौकार
मंगोलियामध्ये आयोजित 2026 च्या आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सर्सनी 4 सुवर्णपदके आणि एकूण 10 पदके जिंकून अव्वल स्थान मिळवले आहे.
सुवर्णपदक विजेते खेळाडू :
1] मीनाक्षी हुडा (48 किलो)
2] प्रीती पवार (54 किलो)
3] प्रिया घंघास (60 किलो)
4] अरुंधती चौधरी (70 किलो)
+3
"विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले..."
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐💐
राज्यात इच्छा मृत्यूपत्राला मान्यता
दुर्धर आजाराने त्रस्त रुग्णांना सन्मानाने निरोप घेण्याचा हक्क देणाऱ्या 'इच्छा मृत्यूपत्राला' (Living Will) कायदेशीर मान्यता आणि डिजिटल नोंदणीची सुविधा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
महापालिका आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांना या डिजिटल नोंदींचे संरक्षक (Custodians) म्हणून नियुक्त केले आहे.
MahaULB पोर्टलच्या माध्यमातून इच्छा मृत्यूपत्र डिजिटल स्वरूपात जतन केले जाईल.
