fa
Feedback
MPSC Library

MPSC Library

رفتن به کانال در Telegram

mpsclibrary.com https://youtube.com/@mpsc_library नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो! स्पर्धा परीक्षाविषयी सखोल व संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी.नवोदित विद्यार्थ्यांपासून अनुभवी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आमचे ध्येय Contact Us :- mpsclibrary.com@gmail.com

نمایش بیشتر
1 363
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
+4030 روز
آرشیو پست ها
✅ फ्रेंच ओपन 2026 महिला एकेरीचे जेतेपद ◾️विजेती: मिरा अँड्रीवा (Mirra Andreeva रशिया) ◾️उपविजेती: माजा च्वालिन्स्काला (Maja C
फ्रेंच ओपन 2026 महिला एकेरीचे जेतेपद ◾️विजेती: मिरा अँड्रीवा (Mirra Andreeva रशिया) ◾️उपविजेती: माजा च्वालिन्स्काला (Maja Chwalińska - पोलंड) ◾️निकाल: 6-3, 6-2 ◾️मिरा अँड्रीवा ही 2005 नंतर जन्मलेली आणि ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली. ◾️मिरा अँड्रीवा चे हे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे #sports Join @mpsc_library

✅ १४ जून पर्यंतचे वन लायनर ● सिंधुदुर्ग जिल्हा घरगणना 🏠 100 टक्के पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा बनला ✌️ ● अंदमान बेटांच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री विजयपुरम-3 येथे नैसर्गिक वायूचा शोध लागला आहे. ● ग्रीन मिशन इंडिया अंतर्गत 5 जून ला नमो ऑक्सिजन पार्क 🌿चे उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले ● पश्चिम बंगाल विधानसभा ही   NeVA उपक्रमात सामील होणारी भारतातील 33 वी  विधानसभा ठरली आहे.  ● मारुती सुझुकीने भारतातील पहिली फ्लेक्स फ्युएल कार 🚗 लॉन्च केली. (E20 ते E100 पर्यंत इथेनॉल आणि पेट्रोलच्या कोणत्याही मिश्रणावर चालणारी) ● मेरा युवा भारत' (MY Bharat) ला एका आठवड्यात सर्वाधिक युजर नि ऑनलाइन क्विझ पूर्ण केल्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद 📝 झाली (3 लाख 90 हजार+ वापरकर्ता) ● सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारी वरून GDP वाढ > FY 2025-26 - 7.7% 🎯 > FY 2025-26 च्या Q4 मध्ये - 7.8% ● काळ्या वाघांच्या 🐯 मुळे चर्चेत असलेला सिमिलिपाल व्याघ्र प्रकल्प ओडीसा राज्यात आहे #

✅ आर प्रग्गानंधा Norway Chess 2026 जिंकणारा पहिला भारतीय बनला ◾️नॉर्वे बुद्धिबळ ही जगातील सर्वात प्रतिष्ठित वार्षिक बुद्धिबळ
आर प्रग्गानंधा Norway Chess 2026 जिंकणारा पहिला भारतीय बनला ◾️नॉर्वे बुद्धिबळ ही जगातील सर्वात प्रतिष्ठित वार्षिक बुद्धिबळ स्पर्धांपैकी एक ◾️स्थापना - 2013 ◾️पुरुष आणि महिलांसाठी समान बक्षीस असते ◾️प्रज्ञानंदने क्लासिकल गेममध्ये मॅग्नस कार्लसेनला दोनदा पराभूत केले ⏩ स्पर्धेबद्दल माहिती ◾️ पूर्ण नाव: Norway Chess 2026 ◾️ ठिकाण: ओस्लो, नॉर्वे ◾️ तारीख: 25 मे ते 5 जून 2026 ◾️ स्वरूप: 6 खेळाडूंची डबल राउंड-रॉबिन स्पर्धा ◾️विजेत्यासाठी बक्षीस रक्कम - 700,000 NOK (अंदाजे रु. 70.5 लाख). ⏩ पुरुष विजेता: ◾️विजेता - आर. प्रज्ञानंद (भारत 18 गुण) ◾️उपविजेता - वेस्ली सो (USA -17 गुण )  ⏩ महिला विजेता : ◾️ बिबिसारा असौबायेवा (कझाकिस्तान 16.5 गुण) ◾️Zhu Jiner (चीन - 16 गुण) #sports Join @mpsc_library

🎯 एमपीएससी गुणवंतांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र शासनाने 'निपुण सेतू' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. याअंतर्
🎯 एमपीएससी गुणवंतांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र शासनाने 'निपुण सेतू' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. याअंतर्गत एमपीएससीच्या अंतिम टप्प्यापर्यंत (मुलाखत/कौशल्य चाचणी/शारीरिक चाचणी) पोहोचूनही अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांना खासगी उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ✅ पात्रता: एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षेत अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेले पण अंतिम यादीत स्थान न मिळालेले उमेदवार. 🔹 हा उपक्रम उद्योग विभागाच्या 'मैत्री 2.0' पोर्टलअंतर्गत राबविण्यात येणार असून, उमेदवारांचा डेटा एमपीएससीकडून सुरक्षितपणे 'निपुण सेतू' पोर्टलवर हस्तांतरित केला जाईल. 📌 उद्दिष्ट: एमपीएससी गुणवंतांच्या ज्ञान, कौशल्य व प्रशासकीय क्षमतेला रोजगाराच्या नव्या संधींशी जोडणे. #maharashtra Join @mpsc_library

🌿 भारताचे १०० वे रामसर स्थळ : सुरहा ताल (उत्तर प्रदेश) 🇮🇳 उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्
🌿 भारताचे १०० वे रामसर स्थळ : सुरहा ताल (उत्तर प्रदेश) 🇮🇳 उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्यातील ‘सुरहा ताल’ याला भारताचे १०० वे रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे. 🔹 सुरहा तालची वैशिष्ट्ये • गंगा व घाघरा नद्यांदरम्यान वसलेले गोड्या पाण्याचे पाणथळ क्षेत्र • 54 प्रजातींचे 51 हजारांहून अधिक जलपक्षी येथे आढळतात • 221 वनस्पती, 66 मासे, 7 सरपटणारे व 3 उभयचर प्रजातींचे अधिवास 📌 रामसर करार – महत्त्वाची माहिती • जागतिक पाणथळ दिन – 2 फेब्रुवारी • रामसर करार – 2 फेब्रुवारी 1971 (इराण) • अंमलबजावणी – 1975 • मुख्यालय – ग्लँड, स्वित्झर्लंड • सदस्य देश – 172 • जगातील रामसर स्थळे – 2528+ 📌 भारतातील रामसर स्थळे • भारताचा समावेश – 1 फेब्रुवारी 1982 • एकूण स्थळे – 100 • पहिले रामसर स्थळ – चिल्का सरोवर (ओडिशा) • आशियात भारत प्रथम, तर जगात तिसऱ्या क्रमांकावर 📌 महाराष्ट्रातील रामसर स्थळे • नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य (2019) • लोणार सरोवर (2020) • ठाणे खाडी (2022) 🎯 तमिळनाडूमध्ये सर्वाधिक 20 रामसर स्थळे, तर उत्तर प्रदेशात 13 रामसर स्थळे आहेत. #environment Join @mpsc_library

🏔️ अरवली पर्वतरांगेच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! अरवली पर्वतरांगेतील बेकायदेशीर खाणकामांना आळा घ
🏔️ अरवली पर्वतरांगेच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! अरवली पर्वतरांगेतील बेकायदेशीर खाणकामांना आळा घालण्यासाठी आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या अरवलीची स्पष्ट व्याख्या व सीमांकन निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ५ सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. ◾️ समितीच्या अध्यक्षपदी कांचन देवी (महासंचालक, भारतीय वनसंशोधन व शिक्षण परिषद) यांची नियुक्ती ◾️ समितीला ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश ◾️ दिल्ली, राजस्थान आणि हरियाणा राज्यांच्या हितसंबंधांचा विचार करून सर्व संबंधितांकडून हरकती व सूचना मागविणार ◾️ उद्देश – अरवलीतील बेकायदेशीर खाणकाम रोखणे व पर्यावरण संरक्षणाला बळकटी देणे ⚖️ न्यायालयाने नमूद केले की, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास यामधील समतोल वैज्ञानिक व तज्ज्ञांच्या अभ्यासातूनच साध्य होऊ शकतो. #environment Join @mpsc_library

आजचा पेपर कसा होता ?
Anonymous voting

✅ Combine गट_ब पूर्व परीक्षा 2026 पेपर. दिनांक:- 14 जून 2026 Join @mpsc_library

🏵 १४ जून दिनविशेष १.१) १४ जून १८९६ = महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम पुणे येथे स्थापन केले १.२) १४ जून १९४५ = वेव्हेल योजना १.३) १४ जून २०२२ = अग्निवीर योजना #TodayinHistory Join @mpsc_library

🕯️ माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच
🕯️ माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन झाले. पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा मजबूत पाया उभारणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. 🔹 ३२ वर्षे आमदार (१९७२–७८, १९८०–९९, २००४–०९) 🔹 १३ वर्षे राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री 🔹 पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कृषी, परिवहन, शिक्षण, पुनर्वसन, कामगार आदी महत्त्वाची खाती सांभाळली. 🔹 महाराष्ट्रात 'दुधाचा महापूर' संकल्पना आणि पुनर्वसनातील 'थोपटे पॅटर्न' यासाठी विशेष प्रसिद्ध. 🔹 पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही कार्य केले. 🔹 महाराष्ट्र विधानसभा काँग्रेस (आय) पक्षाचे नेते (१९९०) 🔹 राजगड सहकारी साखर कारखाना, रायरेश्वर डोंगरी विकास परिषद आणि राजगड ज्ञानपीठ यांसारख्या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष. 🏅 क्रीडा क्षेत्रातील कामगिरी राजकारणासोबतच ते उत्कृष्ट कुस्तीपटू होते. अमृतसर, नागपूर आणि हैदराबाद येथे झालेल्या स्पर्धांमध्ये ५ सुवर्णपदके जिंकली. तसेच सलग तीन वर्षे पुणे विद्यापीठाच्या कुस्ती संघाचे कर्णधार राहिले. #personality Join @mpsc_library

🏵 १३ जून दिनविशेष १.१) गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म = १३ जून १८७९ - कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक - निधन: १६ मार्च १९४५ #TodayinHistory Join @mpsc_library

🏵 १२ जून दिनविशेष १.१) ब्राह्मोस ची पहिली चाचणी = १२ जून २००१ - ठिकाण = चंदिपुर - ब्राह्मोस = ब्रह्मपुत्रा नदी (भारत) + मॉस्को नदी (रशिया) - सुपरसॉनिक क्रुझ मिसाईल #TodayinHistory Join @mpsc_library

🏵 ११ जून दिनविशेष १.१) साने गुरुजी यांचा स्मृतिदिन = ११ जून १९५० - जन्म = २४ डिसेंबर १८९९ (१२५ वर्ष पूर्ण) रोजी कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला - १९२८ = ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले - १९३० = शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग - ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक - १९४८ = ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले - त्यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली - श्यामची आई पुस्तक नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिले #TodayinHistory Join @mpsc_library

🏆 जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर! ◾️ प्रख्यात इतिहास संशोधक व लेखक जयसिंगराव पवार यांना 40 वा राज
🏆 जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर! ◾️ प्रख्यात इतिहास संशोधक व लेखक जयसिंगराव पवार यांना 40 वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात आला. ◾️ 40 वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जात आहे. ◾️ पुरस्काराचे स्वरूप : ₹1 लाख रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र ◾️ पुरस्कार वितरण : 26 जून 2026, राजर्षी शाहू महाराजांच्या 152 व्या जयंतीदिनी. 📚 राजर्षी शाहू पुरस्कार ◾️ 1984 पासून प्रदान केला जातो. ◾️ समाजप्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा सन्मान दिला जातो. #award Join @mpsc_library

🌍 UN सुरक्षा परिषदेत पोर्तुगाल आणि ऑस्ट्रियाची निवड! ◾️ ३ जून २०२६ रोजी United Nations General Assembly ने पाच नवीन अस्थायी
🌍 UN सुरक्षा परिषदेत पोर्तुगाल आणि ऑस्ट्रियाची निवड! ◾️ ३ जून २०२६ रोजी United Nations General Assembly ने पाच नवीन अस्थायी सदस्यांची निवड केली. ◾️ यामध्ये पोर्तुगाल आणि ऑस्ट्रिया यांचा समावेश असून ते २०२७-२८ या कालावधीत United Nations Security Council मध्ये सदस्य म्हणून काम करतील ◾️ त्यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2027 पासून सुरू होईल 🔹 निवड झालेले 5 देश: 🇵🇹 पोर्तुगाल | 🇦🇹 ऑस्ट्रिया | 🇹🇹 त्रिनिदाद आणि टोबॅगो | 🇿🇼 झिम्बाब्वे | 🇰🇬 किर्गिझस्तान 📌 UN सुरक्षा परिषद (UNSC) – महत्त्वाची माहिती ◾️ स्थापना : 1945 ◾️ एकूण सदस्य : 15 ◾️ 5 स्थायी सदस्य (P5) – अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स ◾️ 10 अस्थायी सदस्य – महासभेकडून 2 वर्षांसाठी निवडले जातात. ✅ स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा: UNSC मध्ये 5 स्थायी + 10 अस्थायी = 15 सदस्य असतात. #world Join @mpsc_library