1 980
مشترکین
-324 ساعت
-77 روز
-3330 روز
آرشیو پست ها
Repost from N/a
*"मी गेल्यावर माझ्या बायको-मुलांचा सांभाळ कोण करणार?"*
हे वाक्य वाचताना अंगावर काटा येतो...
एका वडिलांच्या मनात इतकी भीती, इतकी असहाय्यता आणि इतकी विवंचना साचली की त्यांनी स्वतःसह संपूर्ण कुटुंब संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकीचा आहे, यात दुमत नाही. पण त्या निर्णयामागची भीती समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे...
*"मी नसल्यावर माझ्या कुटुंबाचं काय?"*
हा प्रश्न प्रत्येक कुटुंबप्रमुखाच्या मनात कधीतरी येतो.
आपण घरासाठी EMI भरतो...
मोबाईल बदलतो...
सणवार साजरे करतो...
बाहेर जेवतो...
मुलांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या इच्छा पूर्ण करतो...
पण...
*ज्या गोष्टीवर आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आर्थिक भविष्य अवलंबून आहे, त्या टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सचा निर्णय मात्र "पुढच्या महिन्यात बघू..." म्हणून पुढे ढकलतो.*
खूप लोक म्हणतात,
*"घेऊ ना... अजून वय आहे..."*
*"थोडे पैसे साठले की घेऊ..."*
*"मला काही होणार नाही..."*
पण आयुष्य कोणालाही पूर्वसूचना देत नाही.
आज आपण आहोत...
उद्या नसूही शकतो.
तुमच्या अनुपस्थितीत...
तुमच्या पत्नीला मुलांचं शिक्षण, घरखर्च, कर्जाचे हप्ते, वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी... हे सगळं एकटीला पेलावं लागू नये म्हणून *टर्म इन्शुरन्स* असतो.
आणि एखाद्या गंभीर आजारामुळे किंवा मोठ्या हॉस्पिटलच्या बिलामुळे वर्षानुवर्षे साठवलेली बचत संपून जाऊ नये म्हणून *हेल्थ इन्शुरन्स* असतो.
एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते...
*विमा हा गुंतवणूक नाही. विमा म्हणजे संरक्षण.*
"मॅच्युरिटीला किती पैसे परत मिळतील?" या विचाराने विमा घेऊ नका.
कारण जे "परतावा" देतात, ते अनेकदा शुद्ध संरक्षण देत नाहीत.
*शुद्ध टर्म इन्शुरन्स* मात्र खूप कमी प्रीमियममध्ये तुमच्या कुटुंबासाठी कोट्यवधी रुपयांचं संरक्षण उभं करतो.
तुमच्या कुटुंबाला तुमचे पैसे नको असतात...
त्यांना तुम्ही हवे असता.
पण जर नियतीने वेगळा निर्णय घेतलाच, तर तुमच्या अनुपस्थितीत त्यांच्यासाठी आर्थिक आधार तरी उभा राहिला पाहिजे.
*विचार करत राहू नका... कृती करा.*
कारण अनेकदा निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे "योग्य वेळ" नसते...
फक्त *आजचा दिवस* असतो.
*आपण आपल्या कुटुंबावर प्रेम करतो, हे शब्दांनी नाही तर त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी घेतलेल्या निर्णयांनी सिद्ध होते.*
*तुम्ही नसाल, तरी तुमची जबाबदारी जिवंत राहिली पाहिजे.*
📱 9579929375
#TermInsurance #HealthInsurance #FinancialProtection #ProtectYourFamily #InsuranceAwareness #FinancialLiteracy #FamilyFirst #SecureTheirFuture #PureTermPlan #HealthCover #EconomicSecurity #अर्थवाहिनी #विमा_जागरूकता #कुटुंबाची_सुरक्षितता #आर्थिक_साक्षरता
💰 तुमचे विसरलेले पैसे तुमची वाट पाहत आहेत!
🔎 बँक FD, विमा, म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये तुमचे पैसे अडकले आहेत का?
भारत सरकारच्या वित्त सेवा विभागाने *"आपकी पूँजी, आपका अधिकार – Your Money Your Right"* या मोहिमेअंतर्गत एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे नागरिकांना त्यांच्या नावावर असलेली *बिनदावा (Unclaimed) आर्थिक मालमत्ता* शोधणे सोपे झाले आहे.
👉 अनेक वेळा जुनी FD, बचत खाते, विमा पॉलिसी, म्युच्युअल फंड गुंतवणूक, लाभांश (Dividend) किंवा शेअर्स यांची माहिती हरवते.
👉 पत्ता बदलणे, मोबाईल नंबर बदलणे, नामनिर्देशन (Nominee) नसणे किंवा कुटुंबाला माहिती नसणे ही त्यामागची सामान्य कारणे आहेत.
🏦 या पोर्टलवर काय शोधता येते?
✅ बँकांमधील Unclaimed Deposits
✅ विमा पॉलिसीवरील न मिळालेली रक्कम
✅ म्युच्युअल फंडातील बिनदावा गुंतवणूक
✅ शेअर्स व न मिळालेले लाभांश (Dividends)
✅ वारसदारांच्या नावाने असलेली आर्थिक मालमत्ता
📌 कसे तपासाल?
1️⃣ पोर्टलला भेट द्या
[Unclaimed Assets Portal] (https://www.unclaimedassetsportal.in)
2️⃣ संबंधित विभाग निवडा
(Bank, Insurance, Mutual Fund, Shares)
3️⃣ PAN, मोबाईल किंवा इतर आवश्यक माहिती भरून शोध घ्या
4️⃣ जर रक्कम सापडली तर संबंधित संस्थेकडे दावा (Claim) दाखल करा.
⚠️ प्रत्येक कुटुंबाने एकदा नक्की तपासावे!
विशेषतः:
* निवृत्त व्यक्ती
* ज्येष्ठ नागरिक
* दिवंगत कुटुंब सदस्यांचे वारसदार
* जुन्या गुंतवणुकी करणारे गुंतवणूकदार
* अनेक बँक खाती किंवा विमा पॉलिसी असलेले नागरिक
यांच्या नावावर विसरलेली रक्कम असण्याची शक्यता जास्त असते.
📢 अर्थवाहिनीचा सल्ला
*"गुंतवणूक करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्वाचे आहे तिची माहिती कुटुंबासोबत शेअर करणे आणि Nominee अद्ययावत ठेवणे."*
आजच 5 मिनिटे काढा.
कदाचित तुमचे किंवा तुमच्या कुटुंबाचे हजारो-लाखो रुपये तुमची वाट पाहत असतील!
अशाच प्रकारच्या आर्थिक बाबींविषयी विश्वसनीय माहितीसाठी आमचे चॅनेल फॉलो करायला आणि इतरांना शेअर करायला विसरू नका.
https://whatsapp.com/channel/0029Var4cIvICVfmaXRYlX31
#अर्थवाहिनी #YourMoneyYourRight #UnclaimedAssets #FinancialPlanning #MutualFund #Insurance #BankDeposit #InvestmentAwareness #Nominee #PersonalFinanceIndia
कोणत्याही नवीन नियुक्ती, पदोन्नती साठी पात्रता, निकष मध्ये बदल करायचा असल्यास तो विधिवत करावाच लागतो.
सेवा शर्ती अधिसूचना राजपत्र त्या त्या विभागाला प्रकाशित करावेच लागते.
आजचा शासन निर्णय... सामान्य प्रशासन विभाग
केंद्र प्रमुख पदोन्नती, विभागीय स्पर्धा परीक्षा साठी नियम बदलताना हे सगळं काही झालंच नाही.
केंद्र प्रमुख पदासाठी ग्राम विकास विभागाचे राजपत्र आवश्यक....
Repost from N/a
👤 आज एका 24 वर्षांच्या स्मार्ट फॉलोअरशी बोललो…
तो “स्मार्ट” का आहे माहितेय? चला पाहूया 👇
आजच त्याचा पहिला पगार खात्यात जमा झाला 💰
या वयात बहुतेक लोक काय करतात?
📱 महागडा मोबाईल
✈️ ट्रिप्स
⌚ लाइफस्टाइल खर्च (घड्याळ, ज्वेलरी इ.)
पण याने काहीतरी वेगळंच केलं… 👇
✅ आजच Health Insurance सुरू केला (प्रोसेस सुरू आहे)
✅ पुढच्या महिन्यात Term Plan घेणार
✅ पहिल्याच महिन्यापासून SIP सुरू
👉 हाच खरा Financial Maturity चा अर्थ आहे
💡 *पैसे वाढवण्यापूर्वी, पैसे सुरक्षित करणं महत्त्वाचं आहे.*
🏥 एक मोठं हॉस्पिटल बिल तुमच्या अनेक वर्षांच्या बचतीला संपवू शकतं
❗ त्यामुळे…
फक्त एन्जॉयमेंट, ट्रिप्स आणि महागड्या वस्तूंवर खर्च करण्यापेक्षा
👉 आधी Insurance निवडा, भविष्य सुरक्षित करा
@अर्थवाहिनी
आजचा स्मार्ट निर्णय = उद्याचं सुरक्षित आयुष्य 💯
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9579929375
अशाच आर्थिक बाबींशी संबंधित माहितीसाठी आमच्या समूहात सामील व्हा.
https://chat.whatsapp.com/CKGpP6wRUzBL2WxhwWKNWV?mode=gi_t
🚨 #BigBreaking 🚨
🙏 देशातील २५ लाख शिक्षकांना मोठा दिलासा! ✊✌️
📌 TET अनिवार्यता प्रकरणात मोठी घडामोड!
टेट संदर्भातील दाखल ४५ रिव्ह्यू याचिकांवर आता 👉 ओरल हियरिंग (प्रत्यक्ष सुनावणी) घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
⚖️ यामुळे शिक्षकांचा मुद्दा सविस्तरपणे मांडण्याची मोठी संधी मिळणार आहे.
ही एक सकारात्मक आणि दिलासादायक पायरी मानली जात आहे.
🎉 सर्व शिक्षक बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन!
✊ एकजूट आणि संघर्षाला यश मिळत आहे!
#TET #TeacherSupport #SupremeCourt #OralHearing #EducationNews
🔥 केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा – माहितीपूर्ण व संतुलित भूमिका 🔍
📌 मेरिट लिस्ट – महत्त्वाचा मुद्दा
सर्वोच्च न्यायालयातील अंजुमन प्रकरणाच्या निकालानुसार पदोन्नतीसाठी TET पात्रता आवश्यक आहे.
👉 यावरून असे दिसते की मेरिट लिस्टमधील स्थानाबरोबरच TET पात्रता पूर्ण करणे आवश्यक ठरते
👉 मेरिटमध्ये असलेल्या उमेदवारांना देखील TET उत्तीर्ण झाल्यानंतरच पुढील आदेश दिले जाण्याची प्रक्रिया अपेक्षित आहे
📌 TET 1 आणि TET 2 बाबत निरीक्षण
👉 50% पदे जी पदोन्नतीने भरली जातात, त्यासाठी TET 2 आवश्यक
👉 तर परीक्षेद्वारे होणाऱ्या पदोन्नतीसाठी TET 1 पुरेसे मानले जाते
➡️ या बाबत अधिकृत स्पष्टता आवश्यक आहे
📌 1/1/2026 – अर्जाची अंतिम तारीख
👉 या तारखेनंतर TET उत्तीर्ण झालेले व होणारे उमेदवार एकाच गटात विचारात घेतले जातात
➡️ त्यामुळे समान संधीचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो
📌 Cut-off Date बाबत विचार
👉 मूळ Cut-off Date: 1/1/2025
👉 काही उमेदवार त्या वेळी पात्र नव्हते
➡️ त्यामुळे Cut-off वाढवण्याबाबत विचार करताना सर्वांना पुरेशी संधी मिळेल का हे पाहणे आवश्यक
👉 आवश्यकता भासल्यास 1/1/2027 पर्यंत वाढवण्याचा पर्यायही विचारात घेता येऊ शकतो
📌 घाईगडबडीबाबत सावध भूमिका
⚠️ घाईने घेतलेले निर्णय काही वेळा पुढे अडचणी निर्माण करू शकतात
👉 त्यामुळे संतुलित, सर्वसमावेशक आणि न्याय्य भूमिका घेणे गरजेचे आहे
⚖️ *सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे अंतिम निर्णय माननीय Supreme Court of India यांच्या प्रक्रियेवर अवलंबून असेल.*
🙏 *ही माहिती जागरूकतेसाठी असून सर्वांनी अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे.*
https://whatsapp.com/channel/0029VbAGjDiGE56fGpE1Zz2t
https://whatsapp.com/channel/0029VbAGjDiGE56fGpE1Zz2t
*४/११/२०२५..... शिक्षण संचालक यांनी मा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन मागितले शालेय शिक्षण विभागाला*
*म्हणजे ४/११/२०२५ पर्यंत शिक्षण संचालक यांना tet बाबत स्पष्टता नव्हती.*
केंद्र प्रमुख विभागीय परीक्षा 🖥️🖱️ महत्वाच्या घडामोडी संदर्भात विश्वसनीय माहितीसाठी चॅनेल फॉलो करा https://whatsapp.com/channel/0029VbAGjDiGE56fGpE1Zz2t
TET बाबत सजल देव विरुद्ध त्रिपुरा सरकार केस..... सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
