fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

ThePawanUpdates

ThePawanUpdates

رفتن به کانال در Telegram
2 432
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-97 روز
-3130 روز

در حال بارگذاری داده‌ها

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
نوامبر '26
نوامبر '260
در 0 کانال‌ها
اکتبر '260
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '260
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '260
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '260
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '260
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '260
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '260
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '260
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '260
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '260
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '250
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '250
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '250
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '250
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '250
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '250
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '250
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '250
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '250
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '250
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '250
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '250
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '240
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+3
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+2
در 1 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+7
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+5
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+1
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+3
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '24
+6
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+24
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+18
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+11
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+11
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+11
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+4
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+19
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+58
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+30
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+77
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+18
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+110
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+87
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+78
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+56
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+44
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+74
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+65
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '22
+112
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '22
+130
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '22
+283
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '22
+404
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '22
+1 926
در 0 کانال‌ها
پست‌های کانال
बीड येथील प्रसिद्ध तिरुमला समूहाच्या (कुटे ग्रुप) राज्यभरातील विविध कार्यालयांवर बुधवारी आयकर विभागाने छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली. नव्वद पेक्षा जास्त अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सहभाग असलेल्या पथकांनी विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. मात्र या कारवाईबाबत अधिकृत माहिती देण्यास आयकर विभागाने नकार दिला.
11 اکتبر 2023, 22:46

2
सोलापूर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच जिल्हाध्यक्षांनी बुधवारी सायंकाळी मोठा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागात काँग्रेसचे दोन जिल्हाध्यक्ष नेमावे अशी मागणी शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केली होती.यावरून ग्रामीण भागातील डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी व तालुकाध्यक्षकांनी तीव्र विरोध केला होता. पत्रकार परिषद घेऊन ग्रामीण भागातील तालुकाध्यक्षकांनी शहर अध्यक्षकांवर नाराजी व्यक्त केली होती. दोन जिल्हाध्यक्ष पदावरून शहर अध्यक्ष व जिल्हाअध्यक्ष असे दोन गट पडले आहेत.सोलापूर काँग्रेस मध्ये दोन जिल्हाध्यक्ष पदावरून फूट पडते की काय असे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील काँग्रेस नेत्यांनी थेट सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन शहर अध्यक्षकांना ताकीद द्यावी अशी मागणी केली आहे.
1 027
3
दापोली रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. सदानंद कदम हे शिवसेना (ठाकरे) गटाचे नेते अनिल परब यांचे फ्रंट मॅन म्हणून वावरत होते. दापोली रिसॉर्टचे अनाधिकृत बाधकाम अधिकृत करण्यासाठी ते स्थानिक अधिकाऱ्यांना धमकावत होते अशी टिपण्णी कोर्टाने केली आहे.
1 006
4
वाशिम! शिक्षक दिलीप सोनुने यांना भर दिवसा ९ आक्टोंबर सकाळच्या सुमारास अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींचा अद्यापही सुगावा लागला नाही. या आारोपीचा शोध घेऊन त्यांचे कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. दिलीप सोनुने हे नित्यनियमा प्रमाणे बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत जात असताना वाटेत दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पेट्रोल टाकून निर्दयीपणे जिवंत जाळले होते. त्यामुळे तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडाली होती. ५४ वर्षीय शिक्षकाचा मृत्यू झाल्याची हृदय हेलावणारी घटना सोमवारी (दि. ११) सकाळी १० ते साडे दहा वाजता घडल्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. या घटनेबाबत तीन दिवस उलटूनही हल्लेखोरांपर्यंत पोलीस अद्यापही पोहचू शकले नाही.
964
5
छत्रपती संभाजीनगर! १८८१ च्या जनगणनेत सर्वाधिक कुणबी म्हणून मराठवाड्यात नोंद होती. कालांतराने हैद्राबाद निजाम संस्थान १९६० ला गेल्यानंतर या नोंदी कमी कमी होत गेल्या. २०० ते ३०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मराठा पंच मंडळाकडे या जुन्या नोंदी आहेत. तेव्हापासून या पंच मंडळाकडे निजामकालीन जुनी भांडी आहेत. भांडी तांब्यांची आहेत. ज्यावर स्पष्टपणे कुणबी म्हणून उल्लेख आहे. पूर्वीचे मराठा हे मुळचे कुणबीच आहेत. खासरा पत्राच्या नोंदीनुसार सुध्दा शेती व्यवसाय करणारे मराठा समाजाचे लोक हे कुणबी म्हणून ओळखले जातात. बेगमपुऱ्यातील अनेक नागरिकांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कुणबी अशी नोंद आहे. आजही लग्न कार्यात पत्रिका न वाटता आमंत्रण देण्याची पारंपरिक पध्दत चालू आहे. या जुन्या भांड्यांवरील नोंदी मराठा कुणबी एकच असल्याबाबतचा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी मराठा पंच मंडळाने समितीकडे केली आहे.
854
6
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. राज्यात आता 23 नोव्हेंबर ऐवजी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र निवडणूक निकाल पूर्वीच्‍या नियोजनानुसार अन्‍य चार राज्‍यांमधील विधानसभा निकाला दिवशी म्‍हणजे ३ डिसेंबरलाच लागणार आहेत.
672
7
पिंपरी! माझा महापालिका आयुक्त पदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ आहे. तो कालावधी मी पूर्ण करणार, असा विश्वास महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.10) व्यक्त केला. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे झाले आहेत. आयुक्त सिंह हे पवार यांच्या पसंतीचे अधिकारी नाहीत. तसेच, त्यांची उपस्थित केलेली माहिती आयुक्तांनी वेळेत उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे पालकमंत्री पवार हे नाराज आहेत. परिणामी, आयुक्तांची बदली होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात विचारले असता ते बोलत होते.
662
8
बुलेट ट्रेन प्रकल्पांमुळे गुजरात आणि मुंबई या दोघांचाही आर्थिक व सामाजिक फायदा होईल, असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी बुधवारी व्यक्त केला. तसेच मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तरी गुजरात गुंतवणुकीला सर्वाधिक पसंतीचे राज्य असल्याचा दावाही त्यांनी केला.
547
9
"नरेंद्र मोदींना दोन वर्षांनी हिमालयात कशाला पाठवताय, त्यांना आताच हिमालयात पाठवा. देशाचं खूप भलं होईल." -VBA अध्यक्ष प्रकाश आंबेडकर
504
10
बारामती लोकसभा आम्ही शंभर टक्के जिंकणार, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
488
11
“बच्चू कडू हे माझे चांगले मित्र आहेत. ते नेहमी अपंग, कष्टकरी आणि सामान्या लोकांच्या प्रश्नासाठी लढत असतात. अनेक लढाया आम्ही एकत्रित लढल्या आहेत. संघर्षशील नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. सत्तेत गेल्यापासून बच्चू कडू यांना गुदमरल्यासारखं होतं आहे. त्यामुळे माझा त्यांना सल्ला आहे की, त्यांनी मागे फिरावं. पुन्हा एकदा आपण रान पेटवू आणि महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देऊ.” -स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी
481
12
"महाराष्ट्राला देशातील क्रमांक एकचे राज्य करण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ ला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी मावळ, पिंपरी, चिंचवड मतदारसंघातील तिन्ही आमदार कमळाच्या चिन्हावर ५१ टक्के मते घेऊन विजयी झाले पाहिजेत. मावळचा खासदार महायुतीचा होईल. उमेदवार तिन्ही पक्षाचे नेते ठरवतील. बारामती लोकसभा मतदारसंघ महायुती ५१ टक्के मते घेऊन १०० टक्के जिंकेल. लोकसभा निवडणूक जवळ येताच इंडिया आघाडीत असंतोष निर्माण होईल. मोठी ठिणगी पडेल." -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
497
13
"महाविकास आघाडी असतानाही भाजपाबरोबर जाणारी चर्चा झालीच होती. शरद पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, अजित पवार हे सगळे चर्चा करत होतेच. ५४ आमदारांनी भाजपाबरोबर जाऊ म्हणून सह्याही केल्या होत्या. त्यानंतरही शरद पवार म्हणाले जमणार नाही, तुम्हाला जायचं तर तुम्ही जा. या सगळ्या घडामोडी जेव्हा घडल्या तेव्हा घरात (शरद पवारांच्या) चर्चा झाली. ती अजित पवारांना माहित असावी. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी राजीनामा द्यायचा, त्यानंतर सुप्रिया सुळे अध्यक्ष होतील. सुप्रिया सुळेंच्या बरोबर आपण भाजपात जायचं असं ठरलं होतं. ते राजीनामा देणार याची मलाही कल्पना नव्हती. ही सगळी चर्चा त्यांच्या घरात झाली. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना माहित असणार. मी त्यावेळी सुप्रिया सुळेंना विचारलं की राजीनाम्याचं तुम्ही काही सांगितलंच नाही. तर त्या म्हणाल्या अजित पवारांना माहित होतं. पंधरा दिवस चर्चा सुरु होती असंही त्यांनी मला सांगितलं. मी त्या चर्चांमध्ये नव्हतो." -मंत्री छगन भुजबळ
450
14
"२०१४ ला जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा भाजपाने शिवसेनेशी युती तोडली. मात्र त्यांनी शरद पवार यांना निरोप पाठवला की आम्ही शिवसेनेला सोडतोय तुम्ही काँग्रेसला सोडा. ज्यानंतर काहीच कारण नसताना आम्ही काँग्रेसची साथ सोडली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सगळे पक्ष वेगळे लढले होते. त्यावेळी (२०१४) असं ठरलं होतं की काही दिवस भाजपाचं सरकार चालवेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील होईल असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. मतमोजणीच्या आदल्या दिवशीही आम्ही शरद पवारांसह होतो. कमी पडले तर बाहेरुन पाठिंबा द्यायचा हे सांगण्यात आलं होतं. मतमोजणीच्या दिवशी शरद पवारांना फोन आला की आता तुम्ही बाहेर येऊन सांगा की आम्ही पाठिंबा देतो. त्यानंतर २०१४ ला प्रफुल पटेल यांनी जाहीर केलं की आम्ही सरकारला पाठिंबा देतोय. एकनाथ शिंदे तेव्हा (२०१४) विरोधी पक्षनेते झाले होते. यानंतर अलिबागला काही दिवसांनी एक बैठक झाली. त्यात शरद पवारांनी हे थेट जाहीर केलं की भाजपाने आमचा पाठिंबा कायमस्वरुपी गृहित धरु नये. मी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील सगळे शरद पवारांना भेटलो. त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही असं का बोललात त्यावर शरद पवारांकडे काहीच उत्तर नव्हतं. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस सावध झाले. त्यानंतर त्यांना लक्षात आलं गडबड आहे. त्यांनी तातडीने एकनाथ शिंदेंना, शिवसेनेला बरोबर घेऊन त्यांना मंत्रिपदं वगैरे देऊन टाकली. २०१७ लाही एक बैठक झाली. त्यावेळी किती मंत्री, कुठली खाती? पुढच्या निवडणुकीत जागावाटप, खासदारकीच्या जागा सगळं ठरलं. त्यानंतर शरद पवारांनी असं सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर येतो पण शिवसेनेला तुम्ही सोडा. भाजपाने त्याला नकार दिला. त्यामुळे ती बोलणीही फिस्कटली असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं. २०१४ ला काँग्रेसला सोडलं, शिवसेनेला काही दिवस सत्तेबाहेर बसवलं. २०१७ ला चर्चा करुन सांगितलं शिवसेनेला सरकारबाहेर काढा. हे सगळं शरद पवारांनीच केलं होतं. २०१९ ला निवडणूक झाली. परत सगळ्या गोष्टी ठरल्या. राष्ट्रपती राजवट लावण्याची कल्पना शरद पवारांचीच होती हे देवेंद्र फडणवीस यांचीच होती. २०१९ मध्ये जे घडलं ते सगळं शरद पवारांना ठाऊक होतं. भाजपा आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन करणार हे ठरलं होतं. त्यामुळे भाजपाने शिवसेनेची साथ सोडली. त्यावेळीच भाजपा बरोबर जायला हवं होतं. मात्र शरद पवारांनी तेव्हाही माघार घातली. त्यावेळी शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि मला पाठिंबा द्यायला जमणार नाही सांगितलं. त्यानंतर एकनाथ शिंदे जेव्हा भाजपाबरोबर गेले त्याआधीही चर्चा झालीच होती." -मंत्री छगन भुजबळ
434
15
“मे महिन्यात ज्या गोष्टी घडल्या त्यात १५ दिवस आधी घरात चर्चा झाली होती. अजित पवारांना ती माहित असावी. त्यात असं ठरलं होतं की शरद पवारांनी राजीनामा द्यायचा. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम घ्यायचा, तिथे राजीनामा द्यायचा हे सगळं आधीच त्यांच्या घरात ठरलं होतं. त्यांनी राजीनामा दिला की सुप्रिया सुळेंना पक्षाचं अध्यक्ष करायचं आणि मग आपण भाजपाबरोबर जायचं. त्यामुळेच त्यांनी अचानक राजीनामा दिला. शरद पवार राजीनामा देणार याची मलाही कल्पना नव्हती. प्रफुल पटेल, अजित पवार यांना शरद पवार राजीनामा देणार याची माहिती असणार. मात्र मला त्याची काही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी दिलेला राजीनामा हा माझ्यासाठीही धक्का होता. सुरुवातीला काही चर्चा झाल्या होत्या. पण नंतर १५ दिवस त्यांच्या घरात चर्चा झाली आणि असं ठरलं आहे हे मलाही माहित नव्हतं. मग मी सुप्रिया सुळेंना विचारलं, आम्हाला याबाबत काही माहित नाही. त्यावेळी त्या म्हणाल्या अजित पवारांना सगळं माहित होतं. १५ दिवसांपासूनच चर्चा करत होतो. याची माहिती आम्हाला कुणालाच नव्हती. मी त्या चर्चांमध्ये नव्हतो. मला शरद पवारांनी सांगितलं होतं की भाजपासह जायचं असेल तर चर्चेला सुरुवात करा. त्यानुसार मी चर्चा सुरु केली होती. पण अचानक हे राजीनामानाट्य घडलं. सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करु, अध्यक्ष करु असंही आम्ही त्यांना विनवलं. त्यावेळी अजित पवार सुप्रिया सुळेंवर चिडले होते. तू शांत बस, तू गप्प बस म्हणत होते कारण त्यांचं सगळं ठरलेलं होतं. या सगळ्या गोष्टी नंतर मला समजल्या. नंतर सगळे लोक बसले काय करायचं ठरवा म्हणाले. मग त्यात प्रफुल पटेल, अजित पवार, पी. सी. चाको. जयंत पाटील, सुप्रिया सुळे असे सगळे होते. त्याआधी एक बैठक घेऊन आम्ही सगळ्यांनी दोन ठराव केले त्यातला पहिला ठराव होता की शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यायचा आणि दुसरा ठराव होता की सुप्रिया सुळेंनी कार्याध्यक्ष व्हायचं. दुसरा आणखी एक ठराव केला होता ज्यात फक्त इतकं होतं की शरद पवारांनी राजीनामा मागे घ्या. आमच्या बैठकीतले पहिले दोन ठराव प्रफुल्ल पटेल यांनी वाचले. त्यावेळी चाको यांनी विरोध केला. तर जितेंद्र आव्हाड आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातही खडाजंगी झाली. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी मध्यस्थी केली आणि दोघांना शांत केलं. दुसऱ्या दिवशी आणखी एक ठराव मांडला त्यात एवढंच होतं की शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा. त्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला.” -मंत्री छगन भुजबळ
414
16
अनुसूचित जमातीसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य जनजाती सल्लागार परिषदेमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच राज्याच्या अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेबाबत, लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद, आदिवासी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रकल्प कार्यालय सुरू करणे आदी विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह आदिवासी क्षेत्रातील खासदार, आमदार उपस्थित होते.
467
17
‘‘पश्चिम आशियातील सध्याच्या वाढत्या हिंसाचारासह जगभरात बिघडलेली सुरक्षा स्थिती आणि वाढती अशांतता ‘एक जग, एक कुटुंब’ या संकल्पनेशी अगदी विसंगत आहे. भेदभाव आणि अविश्वासाच्या सध्याच्या काळात ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारताच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधोरेखित होत आहे,’’ असे मत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये व्यक्त केले.
403
18
"आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा महाविजय झाल्यास पुढील पंधरा वर्ष महाराष्ट्रात भाजपची सत्ता राहील. पंधरा वर्षे भाजप सत्तेतून जाणार नाही. देशातील अव्वल क्रमांकाच महाराष्ट्र राज्य बनवायच असून यासाठी २० नोव्हेंबर २०२४ ला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत. महाराष्ट्रात एक हाती सत्ता येत नाही, याची खंत वाटते. यावर्षी भाजपला महाविजय करण्यासाठी कामाला लागा." -भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
394
19
मुंबई/नवी दिल्ली! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या वर्षी बिहार दौऱ्यात गोंधळ घालण्याचा गुन्हेगारी कट रचल्याबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बुधवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) सदस्यांविरुद्ध सहा राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एनआयएच्या पथकाने महाराष्ट्रातील मुंबईतील विक्रोळी भागातील अब्दुल वाहिद शेख याच्या घरावरही छापा टाकला. ठाण्याच्या राबोडीतील शाहीद नेरकर या सिमीच्या माजी सदस्यावरही अधिकाऱ्यांनी छापे टाकले. त्याला २००३ मध्ये एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनआयएच्या मुंबई आणि लखनऊ येथील अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली असून त्यातून लॅपटॉप, कॉम्प्युटर तसेच काही डिजिटल पुरावे मिळाल्याचा दावा एनआयएने केला, तसेच साडेआठ लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना सहा तास ताटकळवले 👇 अब्दुल वाहिद शेख हा विक्रोळी येथील पार्कसाइट परिसरातील एका चाळीत राहतो. छापे टाकण्यासाठी एनआयएचे अधिकारी व पोलिस यांचे संयुक्त पथक पहाटे पाच वाजता त्याच्या घरी पोहोचले. मात्र, त्याने सहा तास घराचा दरवाजाच उघडला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागले. त्याने अधिकाऱ्यांकडे वॉरंट आहे का?, अशी विचारणाही केली. कुठे टाकले छापे? 👇 महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्लीसह इतर राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले. राजस्थानमधील टोंक, कोटा, गंगापूर आणि नवी दिल्लीतील हौज काझी, बल्लीमारन येथेही छापे टाकण्यात आले.
465
20
मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी ३० कोटी रुपये खर्चासही सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. आगामी नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी, अशा सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. त्या पार्श्वभूमीवर ही पोलिस भरती राज्य सुरक्षा महामंडळांच्या जवानांतून करण्यात येणार आहे. ११ महिने किंवा भरती होण्यापर्यंतचा कालावधी यातील जो कमी कलावधी असेल तेवढ्या काळापुरती ही भरती राहणार आहे. त्यानंतर पुन्हा हे जवान सुरक्षा महामंडळाच्या सेवेत रुजू होणार आहेत. यासाठी १०० कोटी २१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, तीन महिन्यांच्या पगारासाठी ३० कोटी रुपये दिले जाणार आहेत.
365