fa
Feedback
महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन संघटना, महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन संघटना, महाराष्ट्र

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्र राज्यातील 5पाच लाख पेक्षा जास्त NPS ग्रस्त सरकारी कर्मचाऱयांना Telegram channel मध्ये ऍड करण्याचा प्रयत्न आहे. कृपया सर्वांनी मदत करावी. https://t.me/MRJPS1 #OPS4Maharastra #VoteForOPS

نمایش بیشتر
2 887
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-67 روز
-2330 روز
آرشیو پست ها
जुनी पेन्शन मिळवण्यासाठी शेअर करा ही नम्र विनंती

जुनी पेन्शन मिळविण्या साठी शेअर करावे ही नम्र विनंती

*सोलापूर येथील सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा जुनी पेन्शन लागू करण्याचा पुनरुच्चार..* *शिर्डी पेन्शन महा अधिवेशनाचा उल्लेख.. 💥* *_"मधल्या काळामध्ये मला शिर्डी ला बोलवलं होतं सरकारी कर्मचाऱ्यांनी... आणि त्यांची एक मागणीय, ते सुध्दा मी वचन दिलेलंय की सरकारी कर्मचाऱ्यांना मी जुनी पेन्शन योजना लागू करेल.."_* -उद्धव ठाकरे.. Live @सोलापूर... ABP माझा News..

*या राज्यातील माझ्या तमाम सर्व ज्येष्ठ कर्मचारी बांधवांना मनापासून या आम्हा NPS धारक लहान बंधू आणि भगिनींचा तुम्हास हृदया पासून लाख लाख धन्यवाद ... तुमच्या सहकार्य शिवाय हा जुनी पेन्शनचा लढा इथ पर्यंत येणे शक्यच नव्हता.....तुमचे मार्गदर्शन आणि तुमच्या छत्र छायेत लढल्या मुळेच आज या आपल्या राज्यातील सार्वजनिक निवडणुका मधून जुनी पेन्शन चा मुद्दा जाहीरनाम्यात .....तेही पहिल्याच कॅबिनेट मध्ये, पहिल्या 100 दिवसांत आपली हक्काची जुनी पेन्शन लागू करण्याचे जाहीर केले ...हा लढा आता शेवटच्या टप्प्यात ....आणि हातातोंडाशी आलेली जुनी पेन्शन चा घास मिळविण्या साठी तुम्हीच सर्वात पुढे असणार यात तिळमात्र शंका नाही....तुम्हा सर्व ज्येष्ठ बांधवांना पुन्हा नम्र विनंती की,पुन्हा एकदा तुमच्या लहान भाऊ बहिणी साठी,तुमच्या आमच्या मुलांसाठी,कुटुंबासाठी फक्त पूर्ण ताकदीने ....आपल्या जुनी पेन्शन साठी सर्व राज्य कर्मचारी वर्गास आणि सर्वसामान्यांना हात जोडून विनंती आहे की ही शेवटची संधी गेली तर आमची पेन्शनच काय...भविष्यात सर्वांची देखील पेन्शन बंद करू शकतात...* *आपण कोणत्याही विचारधारेचे असोत , यावेळी आपलं मत आपल्या म्हातारापणीचा आधार जुनी पेन्शन शिवाय पर्याय नाही....आपल्या सर्वसामान्याच्या कुटुंबातील कुणीतरी उद्या सरकारी नोकरीत येऊ शकतो.... त्यामुळे त्यांनीही याचा विचार करावा..... आता फक्त जुनी पेन्शन या मुद्यावर मत करायचं आहे,... मग तो समोर दगड का असेना.. कारण आपणही आपल्या मुद्द्याकडे पाहून आपल्याला मतदानाचे काम करायचं आहे...आपले बहुमोल मत आपल्या कुटुंबासह सर्वांनी द्यायचे आहे प्रत्येकाने आपलं म्हातारपण आणि कुटुंब सुरक्षित करायचं आहे, एव्हढंच लक्षात ठेवा. जुनी पेन्शन ची ट्रेन खूप दूर निघून गेलेली आहे.असे सर्वच म्हणत होते. जुनी पेन्शन लागू होणारच नाही. असेही म्हणत होते. परंतु *गेल्या दहा वर्षापासून आपण सर्वांनी दिलेला लढा यशस्वी ठरला आणि जाहीरनाम्यात आपला जुनी पेन्शनचा मुद्दा समाविष्ट झाला...मित्रांनो ही साधी आणि सोपी गोष्ट नव्हे..* *म्हणून....या आधी जुनी पेंशन कोणी दिली नाही? का दिली नाही? यावर चर्चा करण्यापेक्षा आता ज्यांनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागेल* आणि हो जे कर्मचारी अविश्वास दाखवत आहेत. त्यांना एकच प्रश्न आहे- *प्रश्न-मग तुम्हीच सांगा जुनी पेन्शन कोण देईल आणि कशी देतील?*

*या पुरोगामी राज्यातील सर्व राज्य कर्मचारी वर्गास आणि सर्वसामान्यांना हात जोडून विनंती आहे*🙏🙏🙏 *आपण कोणत्याही विचारधारेचे असोत , यावेळी आपलं मत आपल्या म्हातारापणीचा आधार जुनी पेन्शन साठी निर्णायक आहे, जे सरकारी कर्मचारी नसतील त्यांच्या कुटुंबातील कुणीतरी उद्या सरकारी नोकरीत येऊ शकतो, त्यामुळे त्यांनीही याचा विचार करावा..* आता फक्त जुनी पेन्शन या मुद्यावर मत करायचं आहे,... मग तो समोर दगड का असेना.. कारण त्याच्याकडे पाहून नाही तर आपल्या मुद्द्याकडे पाहून आपल्याला काम करायचं आहे... प्रत्येकाने आपलं म्हातारपण आणि कुटुंब सुरक्षित करायचं आहे, एव्हढंच लक्षात ठेवा. जुनी पेन्शन ची ट्रेन खूप दूर निघून गेलेली आहे.असे सर्वच म्हणत होते. जुनी पेन्शन लागू होणारच नाही. असेही म्हणत होते. परंतु *गेल्या दहा वर्षापासून आपण सर्वांनी दिलेला लढा यशस्वी ठरला आणि जाहीरनाम्यात आपला जुनी पेन्शनचा मुद्दा समाविष्ट झाला...मित्रांनो ही साधी आणि सोपी गोष्ट नव्हे..* *म्हणून....या आधी जुनी पेंशन कोणी दिली नाही? का दिली नाही? यावर चर्चा करण्यापेक्षा आता ज्यांनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागेल* आणि हो जे कर्मचारी अविश्वास दाखवत आहेत. त्यांना एकच प्रश्न आहे- *प्रश्न-मग तुम्हीच सांगा जुनी पेन्शन कोण देईल आणि कशी देतील?*

*Vote for OPS* *एकच मिशन जुनी पेन्शन* 👴 *राज्यात पोस्टल मतदानाला सुरुवात...* ➡️ *त्यामुळे पोस्टल मतदान कसे करावे व मतदान करतांना कोणत्या चुका टाळाव्यात याबाबत..* देशातील प्रत्येक निवडणूकीत जवळपास 10% ते 15 % कर्मचाऱ्यांचे पोस्टल बेलेट लहान लहान चुकांमुळे दरवर्षी बाद होतात असे निवडणूक आयोगाच्या आकड्यांवर दिसून येते, *त्यासाठी सर्वप्रथम पोस्टल मतदान प्रक्रिया समजून घ्या व खालील काळजी घ्यावी...*👇🏻 १. आपल्याला पोस्टल मतदानाचे जे किट प्राप्त होईल.. त्यात एक बाह्य लिफाफा ( C) मिळेल त्याच्या आत 2 गुलाबी रंगाची पाकिटे असतील- एक मोठे पाकिट ( B ) व दुसरे लहान पाकीट (A). २. वरच्या बाह्य कव्हर मधून व्यवस्थितपणे त्यातील मोठे पाकीट (B) व लहान पाकीट (A) काढून घ्यावे.. ४. मोठ्या पाकीटात कर्मचाऱ्यांने भरून द्यायचे 'घोषणापत्र' असेल तर लहान पाकीट मध्ये मतपत्रिका असेल.. ५. सर्वप्रथम लहान पाकिटातील मतपत्रिका उघडून त्यावरील अनुक्रमांक दिलेल्या घोषणापत्रात नमूद ठिकाणी नोंदवून घ्यावा तसेच पाकिटा वर (पाकीट B वर ) नमूद ठिकाणी तो नोंदवावा.(काही ठिकाणी संबंधीत उपस्थित अधिकारी ते भरून देत आहेत, तरी तो क्रमांक अचूक भरलेला असल्याची खात्री करून घ्यावी..) ६. घोषणपत्रात आपण आपले नाव, पत्ता, स्वाक्षरी , मतपत्रिका अनुक्रमांक, इत्यादी माहिती भरून झाल्यावर *सुविधा केंद्रावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून त्या घोषणपत्रास साक्षांकित करून घ्यावे (अधिकाऱ्याचा सही शिक्का घ्यावा)* ७. त्यानंतर मतपत्रिकेवर मतदान करावे.. त्यासाठी आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावा समोर दिलेल्या जागेत ✔️ अशी खूण करावी.. ही खूण करतांना ती इतर उमेदवारांच्या चौकटीच्या रेषेला टच होणार नाही याची काळजी घ्यावी. ९. मतपत्रिका लहान पाकिटात(A) टाकून ते डिंक लावून बंद करावे. १०. आणि शेवटी मोठ्या पाकिटात (B मध्ये) घोषणापत्र आणि लहान A पाकीट टाकून ते मोठे पाकीट सीलबंद करून( चिकटवून ) तिथे जमा करावयच्या लोखंडी मतदान BOX /पेटी मध्ये जमा करावे. *खालील चुका केल्यास मत बाद होते.* १.जर मतपत्रिकेवर सही केली तर मत बाद होईल.. तसेच मतपत्रिकेवर अन्य काहीही संदेश लिहिल्यास तरी ते मत बाद होईल. २.लहान पाकिटात (A) मध्ये घोषणापत्र टाकल्यास मत बाद होईल.. (कारण मतमोजणी वेळ मोठे पाकीट (B) उघडले जाते व त्यात वर स्वतंत्र घोषणापत्र व सीलबंद लहान पाकीट (A) शोधले जाते, जर घोषणपत्र दिसले नाही तर मतपत्रिकेचे लहान पाकीट उघडले जाणार नाही, त्यामुळे लहान पाकिटात घोषणापत्र टाकू नये. ते मोठ्या पाकिटात स्वतंत्र टाकावे. ३.तुम्ही जमा केल्या मोठ्या पाकिटावर (B वर) स्वाक्षरी नसेल तर मत बाद होते.. त्यामुळे या पाकिट ( B )वर दिलेल्या ठिकाणी स्वाक्षरी करावी. ४.घोषणापत्रात चुका केल्यास, उदा- आपली स्वाक्षरी नसणे, मतपत्रिका क्र. नोंदवलेले नसणे, व ते अटेस्टड(साक्षांकित) केलेले नसणे, यामुळेही मत बाद होते.. इत्यादी वरील सर्व काळजी घ्या आणि 100% कर्मचाऱ्यांनी आपले मतदान करा. हे सर्व मतदान गोपनीय पद्धतीने तिथे उभारलेल्या मतदान सुविधा केंद्रात होणार आहे.. जिल्ह्यातील विधानसभा निहाय स्वतंत्र / 2 - 3 विधानसभा मिळून एक असे बूथ असतील.. रांगेत लागून , आपले नाव, मतदार संघ, यादी भाग सांगून आपल्याला मतदान किट मिळेल.. व शाही लावून वरील प्रकारे मतदान होईल.. *आजपासून राज्यात कर्मचाऱ्यांचे पोस्टल मतदान सुरू झाले आहे कारण निवडणूक साठी नेमलेल्या मतदान अधिकारी / कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण जिल्ह्या जिल्ह्यात सुरू झालेले आहेत.* तथापि लांबच्या जिल्ह्यातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना ज्यांना अद्याप मतपत्रिका आलेल्या नसतील त्यांनी काळजी करू नये, त्यांना नंतर शेवटच्या तीन दिवसात / मतदान साहित्य घेते वेळी ती मतपत्रिका मिळेल व त्या दिवशी तिथे मतदान करता येईल. यानंतर जे कर्मचारी तहसील / जिल्हा कार्यालय ठिकाणी स्थानिक लेवलला निवडणूकीच्या ड्युटी वर आहेत, किंवा BLO आहेत व पोस्टल साठी अर्ज केलाय अश्यांना,निवडणूक सीमा नाका चेक पोस्ट वर ड्युटी वर आहेत अश्या कर्मचाऱ्यांना तसेच ज्यां अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी (पोलीस, वन इत्यादी) 12 D भरून दिलेला आहे त्यांना ते कार्यरत असलेल्या विधानसभा मतदारसंघ ठिकाणच्या मतदान सुविधा केंद्रावर दि- 16 ते 19 नोव्हेंबर च्या दरम्यान पोस्टल मतदान करता येणार आहे. ही तारीख एकदा संबंधित तालुक्यावरून खात्री करून घ्यावी.. सर्वांना मतदानासाठी खूप खूप शुभेच्छा! सर्वांनी मतदान करा, आपल्या भविष्यासाठी मतदान करा, आपल्या मुद्द्यावर मतदान करा👏🏻 *टीप-* पोस्टल मतदानाला जातांना *ओळखपत्र सोबत ठेवा,सोबतच आपला मतदारसंघ अनुक्रमांक, यादीभाग क्र, sr no.माहिती असू द्या* 🙏 *कृपया शेअर करा ही नम्र विनंती*🙏