Think Maharashtra
رفتن به کانال در Telegram
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम www.thinkmaharashtra.com थिंक महाराष्ट्रच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा - https://youtube.com/user/thinkm2010
نمایش بیشتر393
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
महाराष्ट्रातील अनेक गावांना वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत. तेथे विशेष उद्योग व्यवसाय आहेत. या गावांच्या अंतरंगात शिरले की त्यांच्या भरजरी पोताची जाणीव होते. असेच एक वैशिष्ट्यपूर्ण गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यातले – येवला. ते महाराष्ट्रातीलच नाही तर देश-विदेशातील महिलांच्या जिव्हाळ्याचे गाव. स्वातंत्र्य चळवळीत या गावाचा महत्त्वाचा सहभाग होता. माधव सावरगावकर हे प्रथितयश लेखक मुळचे येवल्याचे. त्यांनी त्यांच्या गावाचा इतिहास आणि वर्तमान जिव्हाळ्याने या लेखात सांगितला आहे...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/पैठणीचे-गाव-येवला-yeola/
मी आजी सात वर्षांपूर्वी झाले आणि आजीपणाचा सांस्कृतिक वारसा नातीकडे पोचवण्याची जबाबदारी माझ्याकडे हळूहळू आली; ती म्हणजे गोष्ट सांगणे ! गोष्ट सांगणे, ही ‘गोष्ट’ वाटते तितकी सोपी नाही ! कोरोनाच्या काळात मुक्ता - माझी लेक - घरातून ‘ऑनलाईन’ काम करत असताना, माझ्याकडे नातीला गोष्ट सांगण्याची जबाबदारी अधूनमधून आली. साडेचार-पाच वर्षांच्या नातीला -अनाहिताला- व्हिडिओ कॉल करून गोष्ट ऐकण्यात गुंतवणे हे आव्हानच होते...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/निरागसपणाचा-मंत्र/
सर्वसामान्य माणसांच्या मनात गणिताविषयी जशी एक भीती किंवा हवेतर अढी म्हणू तशीच शास्त्रीय संगीताविषयीही असते. हे आपल्याला समजणार नाही अशी एक समजूत असते. अनेकांना ते ऐकायला आवडते पण ‘समजत’ नाही. शास्त्रीय संगीतातले बारकावे समजले तर ते ऐकताना त्याचा आस्वाद अधिक समृद्ध करणारा असेल अशा विचाराने या क्षेत्रातल्या विविध संकल्पना, राग, त्यांचे स्वरूप याविषयी लिहित आहेत तरूण गायक डॉ. सौमित्र कुलकर्णी...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/राग-संगीत-हेच-भावसंगीत/
सुनंदाताई पटवर्धन यांच्या दुःखद निधनाची (10 जानेवारी 2024) बातमी वाचली आणि हृदयाचा एक ठोका चुकला. सुनंदाताई आणि माझा संपर्क पंधरा वर्षांहून अधिक काळचा. मी रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन आणि प्रभाकर फाऊंडेशन यांचा प्रतिनिधी म्हणून 2007 च्या सुमारास सुनंदाताई आणि त्यांच्या ‘प्रगती प्रतिष्ठान’ संस्थेच्या संपर्कात आलो. सुरुवातीला जव्हार-मोखाडे भागात आदिवासी मुलांना सायकल वाटप, महिलांना घरघंटी वाटप अशा उपक्रमांतून सुनंदाताई यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/सुनंदाताई-पटवर्धन-एक-प्र/
आईनस्टाईन यांनी लिहिलेले एक सुपरिचित वाक्य आहे ‘जर तुमची मुले बुद्धिमान व्हावीत, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना परीकथा वाचायला द्या… जर तुम्हाला ती आणखी बुद्धिमान व्हावीत असे वाटत असेल, तर त्यांना आणखी परीकथा वाचायला द्या’. त्यामुळे छोट्या मुलांचे अवकाश वाढीला लागते, कल्पनाशक्ती विकसित होते, अनुभव घेण्याची उर्मी वाढते. संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या ‘पियूच्या वही’ने छोट्यांच्या विश्वात असाच अवचित प्रवेश केला आहे. त्यातल्या छोट्या पियूने जे जे केले ते ते करायला उत्सुक असणारी मुले. गोष्टी छोट्या पण आशयघन बदल घडवू शकणारे छोट्यांचे सगळे अनुभव. त्यातून त्यांच्या स्वतंत्र वह्या निर्माण झाल्या. असे सकस वाचन वाऱ्याच्या वेगाने फैलावले तर मोबाईल आणि इंटरनेटमध्ये अडकून कोसळणारे लहानांचे बाल्य सावरायला नक्की मदत होईल...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/piyus-journal-the-story-behind-a-story/
मुंबई शहराच्या पोटात अनेक मुंबई आहेत. संध्याकाळच्या समुद्रावर दिव्याच्या लखलखटाने उजळलेली मुंबई, उदास काळोखात तेवणारी मुंबई आणि अंधारात बुडून गेलेली भयावह मंबई यांची प्रतिबिंबे तरंगत असतात. त्यांची आपापसात सरमिसळ होत असते. अशी ही मायारूपिणी मुंबई हेच अनेकांचे ‘गाव’ असते. त्याचा इतिहास, भूगोल आणि वर्तमान प्रत्येकाला आपापल्या नजरेतून दिसतो. अशा या ‘गावाची’ विविध रूपे एकत्र करून एक कोलाज तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी मानस आहे...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/my-mumbai/
धर्मांतर म्हटले, की हिंदुस्तानातील वाचकांच्या मनात प्रथम नापसंतीची लहर उमटते. त्याचे कारण म्हणजे धर्मांतर हे पोर्तुगीजांनी गोव्यात घडवलेले माहीत असते किंवा (आजकाल) मुस्लिम धर्मात जबरदस्तीने झालेल्या धर्मांतराच्या गोष्टी माहीत असतात. मात्र ख्रिस्ती धर्मातून इस्लामचा स्वीकार करून मुस्लिम झालेले पुरुष आणि स्त्रियाही अनेक होत्या आणि ते सारेजण ब्रिटिशांची सत्ता सर्व जगात पसरलेली असताना, धर्मांतर करून मुस्लिम झाले होते ! तशाच एका धर्मांतरित महिलेची आणि तिच्या लेखनाची ही ओळख...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/एव्हीलीन-कोब्बोल्ड-स्व/
‘मोगरा फुलला’ या दालनाचे उद्दिष्ट आहे, जाणीव जागृती आणि संवेदनशीलतेचा जागर. आज भोवताली घडणाऱ्या अनेक घटनांकडे ‘हे असेच चालायचे’ किंवा ‘माझा काय संबंध’ असे म्हणत दुर्लक्ष केले जाते. हे वाईट घटनांच्या बाबतीतच घडते असे नाही तर अनेक चांगल्या, सकारात्मक घटनाही दुर्लक्षिल्या जातात. आजचा रेखा देशपांडे यांचा लेख ‘मैं वो झेलम नहीं हूँ | ‘ हेच घटीत अधोरेखीत करत आहे...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/i-am-not-that-zelum/
एकटेपणा ही संकल्पना ‘इंटरेस्टिंग’ आहे. एकट्या व्यक्तीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन, मानसिकता याचा क्वचित त्रास होऊ शकतो; तो एकटे असल्यामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यात दुसरे कोणी लुडबुड करत आहे या गोष्टीचा. ‘तू सिंगल आहेस?’ या प्रश्नामागे असलेली उत्सुकता, कुतूहल, आकर्षण किंवा बोटचेपेपणाची वृत्ती, या साऱ्याला समोर ठेवून ऋता बावडेकर यांनी केलेला विचारांचा उहापोह...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/तू-सिंगल-आहेस/
म्युझियम म्हणजेच वस्तुसंग्रहालय हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कलादालनात चित्रांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पाहिले की या विधानाचा प्रत्यय येतो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे मुंबई शहराचा मानबिंदू आहे. देशातील कला-इतिहास-संस्कृतीचा वारसा काळजीपूर्वक जतन करणारे आणि त्याचबरोबर समकालीन कला-संस्कृतीच्या वाढीकडेही तितक्याच डोळसपणे व कृतिशीलतेने पाहणारे ते देशातील एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/chhatrapati-shivaji-maharaj-vastusangrahalay/
‘वंदे मातरम’ या गीताला भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1876 मध्ये लिहिलेल्या ‘आनंद मठ’ या कादंबरीतील आहे. ते रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम देशापुढे आणले. त्या गीताला प्रसिद्ध संगीतकार पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्वरबद्ध केले आणि ते गीत अजरामर ठरले ! ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात वाराणसी येथे 1905 साली स्वीकारले गेले...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/वंदे-मातरम-हैदराबाद-मुक्/
मराठीला पहिले ज्ञानपीठ मिळवून देणारे, मागच्या शतकातले विख्यात लेखक वि.स. खांडेकर यांची 11 जानेवारी 2024 रोजी एकशेपंचविसावी जयंती आहे. कथा, पटकथा, कादंबऱ्या, नाटके, ललितलेख, निबंध, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये खाडेकरांच्या नावावर पंचाहत्तरपेक्षा जास्त लेखनकृती आहेत. आजही त्यांच्या ‘अमृतवेल’, ‘उल्का’, ‘ययाती’, ‘क्रौंचवध’ या कादंबऱ्या वाचकप्रिय आहेत. त्यांच्या एकशेपंचविसाव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे लेखनिक राहिलेले राम देशपांडे त्यांच्या आठवणी सांगत आहेत...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/remembering-v-s-khandekar/
बालपणात चांगले संस्कार व्हायला हवेत असे नेहमी म्हटले जाते. पण ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, शिक्षण नाही आणि जे सगळ्या जगापासून लांब, दुर्गम भागात राहत आहेत असे आदिवासी लोक त्यांच्या मुलांना कोणते आणि कसे संस्कार देणार? तशा मुलांना मध्य प्रदेशातील नर्मदालय येथे त्यांच्या नकळत कसे मोलाचे संस्कार मिळत आहेत हे सांगणारा उज्ज्वला बर्वे यांचा लेख...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/अखंड-कार्यरत-हसरे-चेहरे/
वर्गात शिकवण्याच्या पद्धतींच्या परिणामकारकतेवर लक्ष ठेवण्यासाठी जगभरातच कोणतीही प्रमाणित साधने वापरली जात नाहीत. असे साधन विकसित करण्याची गरज जागतिक स्तरावरील अभ्यासकांना तीव्रतेने जाणवली. त्यामधून जागतिक बँकेच्या शिक्षण गटाने TEACH हे प्रमाणित वर्गनिरीक्षण साधन विकसित केले आहे. या साधनामुळे शिक्षकांच्या अध्यापनाची गुणवत्ता, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके यांची परिणामकारकता तपासण्यासाठी एक समान आणि विश्वसनीय अशी मोजपट्टी उपलब्ध झाली आहे...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/teach-tool-for-school-inspection/
देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली. मात्र शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट समजून घेतले जात नाही. शिक्षण हे पदवी-सर्टिफिकेट घेण्यासाठी अन् पर्यायाने नोकरीसाठी गरजेचे म्हणून घेतले जाते. ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण हे मूळ उद्दिष्ट बाजूला राहते. त्यामुळे शिकवणारे, शिकणारे या सर्वांची दिशाभूल होते. सगळे लक्ष मार्क्स, श्रेणी, पर्सेंटेज यांकडे लागलेले. परीक्षांचे नियोजनदेखील त्या उद्दिष्टाने केले जाते. कोणतीही परीक्षा विद्यार्थी काय, कसे शिकला हे तपासत नाही...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/उच्च-शिक्षण-संशोधन-काही-प/
शिकवण्याची नव्हे तर शिकण्यासंबंधीची आव्हाने या शतकात वाढत जाणार आहेत. भारतीय शिक्षणव्यवस्था फक्त ‘टीचिंग’चा विचार करते; सगळा भर अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर असतो. विद्यार्थी काय व किती शिकला याचा विचार फारसा नसतो. त्याच्या शिक्षणाचे मूल्यमापन ज्या परीक्षांद्वारे होते त्याही कुचकामाच्या आहेत. शास्त्र, विज्ञान समजून घेणे खूप कठीण नाही, पण ते तसे सोपेदेखील नाही ! शिकणे याचा अर्थ पुस्तकातून माहिती गोळा करणे, दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे हा नव्हे ...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/शिक्षण-कशासाठी-हे-समजेल-क/
झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न, द.ब. पारसनीस यांनी लिहिलेले पहिले चरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील शेसव्वाशे वर्षांत अनेक लोकांनी विविध अंगांनी केला आहे, त्या सर्वांमध्ये प्रतिभा रानडे यांचे ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ हा चरित्र ग्रंथ सर्वांगसुंदर आहे. त्या वेळच्या लोकांच्या भावना; तसेच, आजूबाजूची परिस्थिती याचे उत्तम दर्शन त्या पुस्तकामधून घडते...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/queen-of-zhansi-was-manu-before-she-was-adopted/
स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सत्तेविरूद्ध उठाव 1857 च्या क्रांतियुद्धाअगोदरही झालेले होते. दक्षिणेतील वेलोर छावणीतील हिंदी शिपायांना कपाळावर गंध लावण्यास, कानात भिकबाळ्या घालण्यास किंवा दाढी राखण्यास बंदी 1806 साली घातली होती. त्यामुळे हिंदू-मुसलमानांनी त्यांच्या भावना –धर्मभावना दुखावल्या गेल्या म्हणून उठाव केलेला होता. कंपनी सरकारने साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांना पदच्युत करून त्यांचे राज्य 1839 साली खालसा केले...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/uprisings-against-british-prior-to-struggle-for-independance-of-india-in-1857/
भारतीय इतिहासात चार कर्तृत्ववान, शूर स्त्रिया होऊन गेल्या. पैकी तिघी मराठी होत्या. त्या म्हणजे शिवाजी महाराजांची सून- राजाराम यांची विधवा पत्नी ताराराणी, इंदूरच्या मल्हारराव होळकर यांची विधवा सून अहिल्याबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि कित्तूर संस्थानची विधवा राणी चन्नम्मा. त्या तिघी जणी विधवा होत्या. ताराराणी, अहिल्याबाई यांचा लढा स्वकीयांबरोबर होता. राणी चिन्नम्मा आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यामध्ये खूप साम्य आहे…
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/four-warrior-women-from-the-history-of-maharashtra/
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम (सद्भावनेचे व्यासपीठ) अंतर्गत
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
राज्यव्यापी व्याख्यान सत्र
शुक्रवार, 5 जानेवारी 2023, दुपारी तीन वाजता
स्थळ -चौथा मजला, महात्मा फुले स्मृतिभवन, प्लॉट नंबर 12-13 ,सेक्टर 3, वाशी पोलीस ठाण्याजवळ, वाशी.
व्याख्यात्या - डॉ. अपर्णा महाजन (पुणे)
