Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
رفتن به کانال در Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
نمایش بیشتر616
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
Breaking News :-- 🔥🔥
Nagpur Lockdown :-
नागपुरात दोन दिवसांचा लॉकडाऊन घोषित, सर्व बाजारपेठा बंद !
@educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥
Formula For 12th Result 👇👇
इ. १२ वीच्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन, इ. ११ वीचे वार्षिक मूल्यमापन तसेच
इ. १० वीमधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.
विद्यार्थ्यांचे एकूण मूल्यांकन लेखी आणि अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापनाआधारे ठरवले जाईल.
लेखीपरीक्षेसाठी निर्धारित एकूण गुणांपैकी ३०%गुण इ.१०वी परीक्षेत सर्वाधिक गुणप्राप्त ३ विषयांची सरासरी,इ.११वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय ३०%गुण,इ.१२वी वर्षातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्रपरीक्षा,सराव परीक्षा-चाचण्या,तत्सम मूल्यमापनातील विषयनिहाय ४०%गुण अवलंबून असतील.
निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल.
--- वर्षा गायकवाड
शिक्षणमंत्री महाराष्ट्र
@educationalupdates2021
Breaking News :--
Class 12 Result Formula Declared :-
सध्याच्या असामान्य परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या संपादणुकीची विश्वासाहार्य वा योग्य मूल्यमापनासाठी इ. १२ वीच्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन, इ. ११ वीचे वार्षिक मूल्यमापन तसेच इ. १० वीमधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.
ही तात्पुरती व्यवस्था असली तरी विद्यार्थ्यांची कोविड-१९ पूर्व काळातील (सामान्य परिस्थितीमधील) संपादणूक पातळीही विचारात घेण्यात आली आहे. सध्या बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील दोन वर्षांचा (इ.१० वी व इ.११ वी) निकाल कोविडपूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे.
विद्यार्थ्यांचे एकूण मूल्यांकन लेखी आणि अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापनाआधारे ठरवले जाईल. अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापन विहित कार्यपद्धतीनुसार केलं जाईल. यात प्रत्यक्ष प्राप्त गुण अंतिम निकालात समाविष्ट केले जातील.
लेखीपरीक्षेसाठी निर्धारित एकूण गुणांपैकी ३०%गुण इ.१०वी परीक्षेत सर्वाधिक गुणप्राप्त ३ विषयांची सरासरी,इ.११वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय ३०%गुण,इ.१२वी वर्षातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्रपरीक्षा,सराव परीक्षा-चाचण्या,तत्सम मूल्यमापनातील विषयनिहाय ४०%गुण अवलंबून असतील.
लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी इयत्तानिहाय संपादणुकीकरिता विषय वर्गवारीनुसार गुण विभागणी खालीलप्रमाणे आहे.
जे विद्यार्थी निकालाने असमाधानी असतील त्यांना कोविड १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.
बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवर मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे,यासाठी महाराष्ट्र आग्रही होता. त्यानुसार मुलांच्या मूल्यमापनात सुसुत्रूता/एकवाक्यता रहावी म्हणून केंद्रीय मंडळांनी जाहीर केलेल्या धोरणाशी सुसंगत असा धोरण आम्ही तयार केला आहे.
विद्यार्थ्यांचे निकाल अंतिम करण्यासाठी उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर मुख्याध्यापकांच्या / प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल.निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल.
पुनर्परीक्षार्थी, खाजगी, तुरळक विषय घेऊन बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील वेगळे मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे. श्रेणीसुधार योजनेंतर्गत (Class Improvement) बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी उपलब्ध राहतील.
मंडळामार्फत वेळेवर निकाल घोषित करण्यासाठी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांकडून मूल्यांकनाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व घटकांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे.
कोरोनाकाळ शिक्षणक्षेत्रासाठी अतिशय अवघड व आव्हानात्मक ठरला.२०२०-२१ शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना बरीच तडजोड करावी लागली.विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्द-चिकाटीने पालक,गुणवंत शिक्षकांच्या सहकार्याने आपली वाटचाल पुढे सुरूच ठेवली.सर्वाना उज्ज्वल भविष्य व निरोगी आरोग्याच्या शुभेच्छा!
---वर्षा गायकवाड
शिक्षणमंत्री महाराष्ट्र
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
Class 12 Result Formula Declared :-
राज्यमंडळाच्या इ.१२वी परीक्षा रद्द केल्यानंतर सर्व घटकाशी चर्चा करून विद्यार्थ्यांची मूल्यमापन व गुणदान कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.यंदा १२वी परीक्षेस प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर अंतर्गत मूल्यांकनाआधारे उत्तीर्ण करण्यासाठी राज्यशासनाने मंजुरी दिलीय.
आम्ही सदर धोरण तयार करताना सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार केला आहे. तसेच इ.१२ वी मध्ये असणारे सर्व प्रकारच्या विषयांचे प्रकार व कॉम्बिनेशन चा विचार करण्यात आला आहे.
सर्वसमावेशक असा सदर धोरण तयार करताना सन्माननीय CMO Maharashtra जी यांनी दिलेल्या मार्गदर्शन तसेच विभागातील तज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांनी दिलेल्या मौल्यवान सुचनांबद्दल आभार!
--- वर्षा गायकवाड
शिक्षणमंत्री महाराष्ट्र
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
10th Results Coming Soon 🥳
@educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥
महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंतांचा मोठा निर्णय!
कोरोना आटोक्यात आल्यानं येत्या 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं होतं. मात्र, डेल्डा प्लस व्हारियंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लावण्यात असून यासंबंधी उदय सामंत यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
"लसीकरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये सुरु करणे शक्य नाही", असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाही शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्यात आली आहेत. आता कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्यानं महाविद्यालये सुरू करा, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र लसीकरण प्रकिया अद्याप पुर्ण झाली नसल्यानं महाविद्यालयांची कुलूपं सध्यातरी बंदच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
आगामी शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2021-22 या शैक्षणिक वर्षात शासकीय इंजिनीयरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फी व्यतिरिक्त असलेल्या इतर शुल्कामध्ये 16 हजार 250 म्हणजेच अंदाजे 25 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
@educationalupdates2021
आज देश में तेजी से नए AIIMS खोले जा रहे हैं, नए मेडिकल कॉलेज बनाएं जा रहे हैं, आधुनिक हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर खड़ा किया जा रहा है।
2014 तक देश में केवल 6 AIIMS थे, वहीं इन 7 वर्षों में 15 नए AIIMS का काम शुरू हुआ।
मेडिकल कॉलेज की संख्या भी लगभग डेढ़ गुना बढ़ी है।
@educationalupdates2021
!... ℍ𝕒𝕡𝕡𝕪 𝔻𝕠𝕔𝕥𝕠𝕣𝕤 𝔻𝕒𝕪 ...!
@educationalupdates2021
Hurry up..!!! Hurry up..!!!Hurry up..!!!
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप MHT-CET 2021 साठी नोंदणी केलेली नाही त्यांनी 7 जुलै 2021 पर्यंत नोंदणी करावी.
Students who has not yet registered for MHT-CET 2021 should register upto July 7, 2021.
@educationalupdates2021
राज्यात आज 8,085 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8,623 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,09,548 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,17,098 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.00% झाले आहे.
@educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥
माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकारने कोविड - १९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थी - विद्यार्थिनींचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमाच्या इतर शुल्कांमधील जिमखाना,विविध गुणदर्शन/उपक्रम, कॉलेज मॅगेजीन,संगणक,क्रीडा निधी,वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा बाबींवर खर्च आकारण्यात आलेला नाही. त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्याचा निर्णय.
@educationalupdates2021
दहावी नंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांची शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रवेश प्रक्रिया दिनांक ३० जून २०२१ पासून सुरू होत आहे. सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना तसेच अर्ज भरण्यासाठी https://t.co/0BBoLgEHUO या संकेतस्थळास भेट द्या.
@educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥
Six medical colleges from India have found a place in the list of the World's 100 best medical colleges for the year 2021,
AIIMS in Delhi has bagged 23rd position, AFMC Pune 34th rank, CMC Vellore (49),JIPMER Pondicherry(59), Medical College Chennai (64),and IMS BHU Varanasi(72)
@educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥
As Covid Cases is all time Low in India, Government is very Serious for conducting NEET & JEE ASAP , final decision will be taken in Next 2 to 3 days Max .
@educationalupdates2021
राज्यात आज 9,974 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8,562 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 57,90,113रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,22,252 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.91% झाले आहे.
@educationalupdates2021
राज्यात आज 9,812 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8,752 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 57,81,551 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,21,251 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.93% झाले आहे.
@educationalupdates2021
राज्यात आज 9,677 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 10,138 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 57,72,799 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,20,715 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.94% झाले आहे.
@educationalupdates2021
