fa
Feedback
🇮🇳 Vidya Prabodhini MPSC

🇮🇳 Vidya Prabodhini MPSC

رفتن به کانال در Telegram

🔰दररोजच्या चालू घडामोडींची सखोल आणि विश्लेषणात्मक माहिती. 🔰इतिहास,भूगोल,राज्यघटना,अर्थव्यवस्था,सामान्य विज्ञान,पर्यावरण,गणित व बुध्दीमत्ता चाचणी इ.विषयांच्या घटकनिहाय नोटस्. 🔰सरावासाठी दर्जेदार प्रश्न 🔰लोकराज्य आणि योजना नोटस्.

نمایش بیشتر
4 110
مشترکین
+124 ساعت
+47 روز
+1130 روز
آرشیو پست ها
Emailing 21-22 जुलै 2026.pdf

🔰 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔰 ⚫️ एकूण 5707 पदांची भरती परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर, 2026 रोजी प्रचलित पद्धतीने (Offline OMR आधारित) घेण्यात येणार आहे. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - 05 ऑगस्ट, 2026 👉 1. उद्योग निरीक्षक - 9 जागा 👉 2. तांत्रिक सहायक, वित्त विभाग - 3 जागा 👉 3. कर सहायक - 282 जागा 👉 4. सहायक मोटार वाहन निरीक्षक - 461 जागा 👉 5. लिपिक-टंकलेखक, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय - 1864 जागा 👉 6. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) - 1539 जागा 👉 7. वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल - 11 जागा 👉 8. सहायक अधीक्षक - 11 जागा 👉 9. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी - 254 जागा 👉 10. लिपिक-टंकलेखक, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय - 230 जागा 👉 11. लिपिक-टंकलेखक, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग - 155 जागा 👉 12. लिपिक-टंकलेखक, आदिवासी विकास विभाग - 69 जागा 👉 13. लिपिक-टंकलेखक, महसूल व वन विभाग - 480 जागा 👉 14. लिपिक-टंकलेखक, नोंदणी व मुद्रांक विभाग - 339 जागा 🚨 एकूण जागा - 5707 🚨 MPSC महाभरती - ही सुवर्णसंधी दवडू नका...अमित लव्हटे (संचालक, विद्या प्रबोधिनी कोल्हापूर) 📆 नवीन बॅच सुरू - 20 जुलै 2026 पासून पत्ता: विद्या प्रबोधिनी, शहाजी लॉ कॉलेज समोर, शाहुपुरी 4थी गल्ली, कोल्हापूर. 📲 संपर्क - 9545387161 | 7030538777 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

फिफा विश्वचषक स्पर्धा 2026 (2026 FIFA World Cup) न्यूयॉर्क सिटी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत फिफा विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सामन्याच्या 126 मिनिटाला स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसने निर्णायक गोल करत संघाला विजय मिळवून दिला. आवृत्ती: 23वी यजमान देश: कॅनडा, मेक्सिको, युएस कालावधी: 11 जून ते 19 जुलै 2026 सहभागी संघ: 48 यजमान शहरे: 16 विजेता: स्पेन (दुसरे विजेतेपद) उपविजेता: अर्जेंटिना तिसरे स्थान: इंग्लंड चौथे स्थान: फ्रान्स एकूण गोल: 308 गोल्डन बॉल: रोड्री (स्पेन) गोल्डन शूज: किलियन एम्बाप्पे (फ्रान्स) गोल्डन ग्लोव्हज: उनाई सिमॉन (स्पेन) सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू: पाउ कुब्रसी (स्पेन) फेअर प्ले पुरस्कार: नेदरलँड ✍ संकलन: अमित लव्हटे सर (संचालक, विद्या प्रबोधिनी कोल्हापूर) Join - t.me/VidyaPrabodhiniMPSC ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

9-10 जुलै 2026.pdf1.45 MB

🚨 MPSC UPDATE 🚨 🔰 गट-क परीक्षेचा अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - 31 जुलै 2026 🔰 गट-क सेवा पूर्व परीक्षा सुधारित दिनांक
🚨 MPSC UPDATE 🚨 🔰 गट-क परीक्षेचा अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - 31 जुलै 2026 🔰 गट-क सेवा पूर्व परीक्षा सुधारित दिनांक - 25 ऑक्टोबर 2026 🔰 गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा सुधारित दिनांक - 27 डिसेंबर 2026

Emailing 40a4b37b-a185-42e1-81e7-42ae8805cdf7.pdf

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा पेपर क्र.1

10. 2025-2029 या कालावधीसाठी खालीलपैकी कोणत्या देशाची युनेस्कोच्या मॅन अँड द बायोस्फीअर (MAB) कार्यक्रमाच्या आंतरराष्ट्रीय समन्वय परिषदेत निवड झाली आहे? (1) सौदी अरेबीया (2) कतार (3) बहरीन (4) ओमान उत्तर - (4) ओमान

9. खालीलपैकी कोणी 'मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा' या राष्ट्रीय एकात्मता गीताचे शब्द लिहीले होते? (1) भीमसेन जोशी (2) लुईस बँक्स (3) पियुष पांडे (4) कैलाश सुरेंद्रनाथ उत्तर - (3) पियुष पांडे

8. जोड्या लावा (पद्म पुरस्कार, 2026) 'अ' (व्यक्ती) 'ब' (क्षेत्र) (अ) पी. नारायणन (i) सार्वजनिक व्यवहार (ब) व्ही. एस. अच्युतानंदन ‌ (ii) साहित्य व शिक्षण (क) ममूट्टी (iii) वाणिज्य व उद्योग (ड) उदय कोटक (iv) कला पर्यायी उत्तरे: अ ब क ड (1) (iv) (ii) (i) (iii) (2) (ii) (i) (iv) (iii) (3) (ii) (iii) (iv) (i) (4) (iii) (ii) (iv) (i)

7. ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यांमध्ये 400वा विजय मिळवणारा जगातील पहिला टेनिस खेळाडू कोण आहे? (1) रॉजर फेडरर (2) राफेल नदाल (3) नोव्हाक जोकोविच (4) कार्लोस अल्काराझ उत्तर - (3) नोव्हाक जोकोविच

6. खालील योग्य जोड्या जुळवा. पद्मश्री पुरस्कार विजेते कार्यक्षेत्र (i) भिकल्या लाडक्या धिंडा (अ) मानवी दुग्ध पेढी स्थापन करणे (ii) आर्मिडा फर्नांडिस (ब) रंगभूमी आणि सिनेसृष्टी (iii) सतीश शहा (क) तारपा (iv) रघुवीर तुकाराम खेडकर (ड) व्यसनांविरोधात जनजागृती पर्यायी उत्तरे: (1) i-क, ii-अ, iii-ब, iv-ड (2) i-ड, ii-क, iii-अ, iv-ब (3) i-ब, ii-अ, iii-ड, iv-क (4) i-अ, ii-ब, iii-क, iv-ड उत्तर - (1) i-क, ii-अ, iii-ब, iv-ड

5. फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्त्रायल दौऱ्यादरम्यान, कोणत्या भारतीय विद्यापीठाने 'हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ इस्त्राइल' सोबत सामंजस्य करार केला? (1) दिल्ली विद्यापीठ (2) नालंदा विद्यापीठ (3) बनारस विद्यापीठ (4) मुंबई विद्यापीठ उत्तर - (2) नालंदा विद्यापीठ

4. अंके गौडा यांना 2026 मध्ये कोणत्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? अ. ग्रंथालय क्षेत्रातील आजीवन सेवेसाठी ब. आरोग्य क्षेत्रातील आजीवन सेवेसाठी क. शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी वसतिगृहे स्थापन करण्यासाठी ड. झाडे लावणे व स्थानिक वनस्पतींच्या बियाण्यांचे संवर्धन करण्यासाठी पर्यायी उत्तरे: (1) फक्त (अ) (2) फक्त (ब) आणि (ड) (3) फक्त (क) (4) फक्त (अ) आणि (क) उत्तर - (1) फक्त अ

3. डॉ. कृष्णस्वामी कस्तूरीरंगन अलिकडे बातम्यांमध्ये होते. त्यांच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? (1) ते 2000 पासून टी.आय.एफ.आर. परिषदेचे सदस्य होते. (2) त्यांनी 1994 ते 2003 पर्यंत इस्त्रोचे अध्यक्ष म्हणून कार्य केले. (3) ते एन.ई.पी. 2020च्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक होते. (4) त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. उत्तर - (1) ते 2000 पासून टी.आय.एफ.आर. परिषदेचे सदस्य होते. स्पष्टीकरण: ते 2003 पासून टी.आय.एफ.आर. परिषदेचे सदस्य बनले होते.

2. दूर्गम गावांमधील शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एज्युकेट गर्ल्स' या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक कोण आहेत? (1) इला भट (2) सफीना हुसैन (3) अरूंधती राय (4) बानू मुश्ताक उत्तर - (2) सफीना हुसैन स्पष्टीकरण: दुर्गम गावांमधील शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘एज्युकेट गर्ल्स’ या स्वयंसेवी संस्थेला 2025च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे.

1. पुणे ग्रॅंड टूर 2026 ही भारतातील पहिली UCI 2.2 श्रेणीतील पुरुषांची रोड रेस म्हणून मान्यताप्राप्त होती. ही बहु-टप्प्यांची आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती आणि ती जागतिक सायकलिंग नियामक संस्थेकडून मान्य होती. UCI या संक्षेपाचा योग्य पूर्ण अर्थ कोणता आहे? (1) Union Cyclist Internationale (2) Union Cycliste Internationale (3) Union Cycliste International (4) Union Cyclist International उत्तर - (2) Union Cycliste Internationale

🔰 आज 12 जुलै 2026 रोजी झालेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 पेपर II मधील चालू घडामोडी या घटकावरील प्रश्न व त्यांची अतिसंभाव्य उत्तरे 🔰

7-8 जुलै 2026.pdf1.57 MB