ExaM StudY Mechanical
رفتن به کانال در Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
نمایش بیشتر5 656
مشترکین
-124 ساعت
+27 روز
+1930 روز
آرشیو پست ها
✅ अमेरिका, जर्मनी, स्वीडनमधील तिघांना भौतिकशास्त्राचे नोबेल
🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉
✅ विभाजित सेकंदामध्ये अणू आणि रेणूंमधील इलेक्ट्रॉनची हालचाल व ऊर्जेचा अभ्यास करणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या तीन संशोधकांना यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
✅अमेरिकेच्या ओहायो विद्यापीठातील पीयर अॅगोस्टिन, जर्मनीच्या म्युनिक विद्यापीठातील फेरेन्क क्रॉस्झ आणि स्वीडनमधील अॅनी लुहिलियर यांना यंदाचे पारितोषिक विभागून देण्यात येईल.
✅ भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या लुहिलियर या पाचव्या महिला आहेत.
संशोधनाचे महत्त्व
✅ पदार्थाच्या प्रत्येक अणूमध्ये त्याच्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉन अत्यंत वेगाने परिभ्रमण करत असतात. भौतिकशास्त्रच नव्हे, तर रसायनशास्त्र, आपले शरीर आणि आपण वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये हे इलेक्ट्रॉन असतात. मात्र सेकंदाचे काही हजाराव्या भागात (वैज्ञानिक भाषेत अॅटोसेकंद) या इलेक्ट्रॉनची हालचाल अभ्यासणे नोबेल विजेत्यांच्या संशोधनामुळे शक्य होणार आहे.
✅ यामुळे इलेक्ट्रॉनच्या ऊर्जेची ‘पुरसटशी’ कल्पना संशोधकांना येणार असून यामुळे विज्ञानाचे एक नवे दालन खुले झाले आहे. या आधारे अधिक संशोधन झाल्यानंतर त्याचा इलेक्ट्रॉनिक्स तसेच रोगनिदान अशा विविध क्षेत्रांमध्ये फायदा होईल
✅ या त्रयीच्या योगदानाचा उल्लेख करताना अकॅडमीने नमूद केले, की त्यांच्या संशोधनामुळे अणुरचनेतील इलेक्ट्रॉन विश्वाचा वेध घेण्यासाठी-संशोधनासाठी नवीन साधने मानवजातीस प्रदान केली आहेत.
✅त्यांनी अत्यंत सूक्ष्म प्रकाशतरंग निर्मितीचा एक मार्ग खुला केला आहे ज्याचा वापर गतिमान ‘इलेक्ट्रॉन’च्या हालचाली किंवा ऊर्जा बदल करण्याच्या तीव्र वेगवान प्रक्रिया मापनासाठी केला जाऊ शकतो.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✅ महर्षी धोंडो केशव कर्वे
✅ जन्म : १८ एप्रिल १८५८. शेरवली - जी. रत्नागिरी
✅ मुळगाव : मुरुड - जी. रत्नागिरी
✅ शिक्षक म्हणून नोकरी एल्फिन्स्टंट हायस्कूल, पुणे येथे.
✅ प्राध्यापक,फर्ग्युसन कॉलेज येथे गणित विषय शिकवत असत.
✅ विधवा विवाहोत्तेजक मंडळी : १८९३ वर्धा येथे स्थापन.
✅ उद्देश: १) विधवा पुनर्विवाह साठी जनमत तयार करणे २) विधवांचा पुनर्विवाह घडवून आणणे.
✅ या संस्थेला १८९५ मध्ये 'विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळी ' हे नाव दिले.
✅ 'अनाथ बालिकाश्रम '१४ जुन १८९६ :
✅ उद्देश: विधवांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली.
✅ १९४६ हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष होते नामकरण 'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' असे करण्यात आले.
✅ महिला विद्यालय : १९०७ हिंगणे,( पुणे )
✅ निष्काम कर्ममठ : १९०८ -लोकसेवेसाठी व स्त्रियांच्या उद्धार करण्यासाठी.
✅ महिला विद्यापीठ : ३ जून १९१६
✅ बोधवाक्य : 'संस्कृता स्त्री पराशक्ती'
✅ स्वतंत्र महिलांसाठी असणारे भारतातील पहिलेच विद्यापीठ.
✅ भारत वर्षीय महिला विद्यापीठ या नावाने सुरू.
✅ पहिले कुलगुरू - रा. गो. भांडारकर.
✅ १९३६ : महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन. -ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी
✅ १९४४ समता संघ : जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलनासाठी.
✅ मिळालेले सन्मान:-
१) डि.लीट - बनारस हिंदू विद्यापीठ.
२) डि.लीट - पुणे विद्यापीठ.
३) डिलीट - SNDT महिला विद्यापीठ.
४) पद्मभूषण - भारत सरकार.
५) एल.एल. डी - मुंबई विद्यापीठ.
६) भारतरत्न - भारत सरकार.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️
✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✅ कोविड १९ लसनिर्मिती करिको, वेसमन यांना नोबेल
🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉
✅ जागतिक प्रतिष्ठेचा वैद्याकीय नोबेल पुरस्कार यंदा ‘कोविड-१९’ लशीच्या संशोधनासाठी कॅटलिन करिको आणि र्ड्यू वेसमन यांना जाहीर करण्यात आला आहे.
✅ या दोन शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे ‘कोविड-१९’ प्रतिबंधक मेसेंजर रिबोन्यूक्लिक अॅसिड (एमआरएनए) लशी विकसित करता आल्या आणि भविष्यातही या संशोधनाचा वापर होईल, असे नोबेल निवड समितीने म्हटले आहे.
संशोधन महात्म्य -
✅ लस तयार करण्यासाठी वाढणारे विषाणू किंवा त्यांचे अंश आवश्यक असतात, असे कालपर्यंतचे आकलन होते. परंतु नवसंशोधित मेसेंजर आरएनए (एमएआरएनए) हा पूर्णपणे भिन्न दृष्टिकोन आहे.
✅ प्रथिने तयार करण्याच्या सूचना असलेल्या आनुवंशिक माहितीद्वारे ही प्रथिन यंत्रणा आपले काम करते. लक्ष्यासाठी योग्य विषाणू प्रथिनाची निवड केली जाते. त्यानंतर शरीरच लसनिर्मितीच्या लहानशा कारखान्यात रूपांतरित होते. पण फक्त प्रयोगशाळेत वाढवलेला ‘एमआरएनए’ शरीरात टोचल्यानेच हे शक्य होते. या दोन शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे महत्त्व त्यामुळेच अभूतपूर्व आहे, असे नोबेल समितीने म्हटले आहे.
✅ कॅटलिन करिको या मूळ हंगेरियन वंशाच्या अमेरिकी संशोधक आहेत, तर र्ड्यू वेसमन हे अमेरिकी शास्त्रज्ञ आहेत. करिको या हंगेरीतील सेज्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत आणि पेनसिल्व्हानिया विद्यापीठातही अध्यापन करतात.
✅ वेसमन यांनी पेनसिल्व्हानिया विद्यापीठात करिको यांच्यासह हे संशोधन केले. ‘नोबेल असेंब्ली’चे सचिव थॉमस पर्लमन यांनी सोमवारी स्टॉकहोममध्ये या पुरस्काराची घोषणा केली.
✅ आधुनिक काळात मानवी आरोग्यासाठी निर्माण झालेल्या सर्वांत मोठ्या धोक्यांपैकी करोना महासाथ हा एक धोका होता. या संशोधकद्वयीने या आव्हानास समर्थपणे तोंड देण्यासाठी प्रतिबंधक लशी विकसित करून अभूतपूर्व योगदान दिले, असे नोबेल निवड समितीने निवेदनात म्हटले आहे.
✅ मानवी उत्क्रांतीमधील शोधांसाठी स्वीडिश शास्त्रज्ञ स्वांत पाबो यांना गेल्या वर्षी वैद्याकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले होते. त्यांनी मानवी पूर्वजांच्या ‘निएंडर्थल डीएनए’चा तपशील उकलला होता. त्यामुळे ‘कोविड-१९’ च्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठीच्या मानवी रोगप्रतिकारक प्रणालीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यास मदत झाली होती.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
्रिक्स परिषद २०२३
✅ १५ वी ब्रिक्स परिषद जोहान्सबर्ग ,दक्षिण आफ्रिका येथे पार पडली.
✅ कालावधी २२ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२३ दरम्यान.
✅ पंधराव्या परिषदेत संघटनेच्या विस्तारावर शिक्कामोर्तब झाले.
✅ यात इजिप्त,इथीओपिया,सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या देशांना ब्रिक्स गटात सहभागी करून घेण्यात आले.
✅ १ जानेवारी २०२४ पासून ब्रिक्सचे सदस्य देश म्हणून सहभागी करून घेण्यात येणार आहे.
✅ BRICS -↪️B- ब्राझील↪️R-रशिया↪️ I -इंडिया↪️ C-चीन↪️ S-साऊथ आफ्रिका,
✅ दक्षिण आफ्रिकेचा ब्रिक्समध्ये २०१० ला समावेश.
✅ स्थापना - सप्टेंबर २००६
✅ मुख्यालय - शांघाय (चीन)
✅ डॉलरला पर्याय म्हणून एक स्थिर चलन निर्माण करणे हे संघटनेचे उद्दिष्ट.
✅ ब्रिक्स सज्ञा सर्वप्रथम वापरली -जिम ओ निल
✅ या संघटनेतल्या देशांनी न्यू डेव्हलपमेंट बँक या वित्तीय संस्थेची स्थापना केली.
✅ जगातील पाच सर्वात मोठे विकसनशील देश प्रतिनिधित्व करतात.
✅ जागतिक लोकसंख्येच्या ४१%.
✅ जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 24%
✅ जागतिक व्यापाराचे 16%
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️
✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
Repost from The Infinity Engineering Academy
🔔 ZP MAHAMARATHON Series 2023 🔔
📣 Attention
Civil Engineers
🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
Series
for
🔠🔠 & 🔠🔠🅰️
————————
📹 Youtube Live 📹
————————
Daily
5️⃣🔤0️⃣0️⃣ 🔤🔤
————————
➡️ आत्ताच Notify Me करून ठेवा...
————————
https://www.youtube.com/watch?v=ihlmZIQJbcU
https://www.youtube.com/watch?v=ihlmZIQJbcU
https://www.youtube.com/watch?v=ihlmZIQJbcU
✅ जी. किशन रेड्डी यांनी भारतातील पहिली 5G ट्रेनिंग लॅब आणि 5G आरोग्य सेवा सुरू केली
✅ ईशान्य क्षेत्र विकास, पर्यटन आणि संस्कृती मंत्री श्री जी. किशन रेड्डी यांनी आज भारतातील पहिल्या 5G प्रशिक्षण प्रयोगशाळा आणि आरोग्य क्षेत्रातील 5G ऍप्लिकेशन्सचा शुभारंभ सर्व आठ ईशान्येकडील राज्यांमध्ये केला.
✅ हा प्रकल्प नॉर्थ ईस्ट कौन्सिलच्या माध्यमातून केंद्रीय अर्थसहाय्यित आहे आणि आसाम सरकारच्या PSU, आसाम इलेक्ट्रॉनिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
✅ श्री किशन रेड्डी यांनी ईशान्य प्रदेशात एक दोलायमान 5G डिजिटल इकोसिस्टम स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल आहे.
✅ 5G मध्ये उच्च-गुणवत्तेच्या आरोग्य सेवेसाठी शेवटच्या टप्प्यावर कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी आणि सामान्य माणसासाठी वैद्यकीय खर्च कमी करण्याची क्षमता आहे. पंतप्रधानांचे "अंत्योदय" हे स्वप्न साकार करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
Repost from The Infinity Engineering Academy
🔔 ZP MAHAMARATHON Series 2023 🔔
📣 Attention
Civil Engineers
🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
Series
for
🔠🔠 & 🔠🔠🅰️
————————
📹 Youtube Live 📹
————————
Daily
5️⃣🔤0️⃣0️⃣ 🔤🔤
————————
➡️ आत्ताच Notify Me करून ठेवा...
————————
https://www.youtube.com/watch?v=ihlmZIQJbcU
https://www.youtube.com/watch?v=ihlmZIQJbcU
https://www.youtube.com/watch?v=ihlmZIQJbcU
✅ दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्र महात्मा गांधी यांची जयंती साजरी करते.
✅ हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणूनही साजरा केला जातो. गांधीजींच्या अहिंसा आणि राजकीय/सामाजिक न्यायाच्या शिकवणींनी जगभरातील लोकांना प्रेरणा दिली आहे जून 2007 मध्ये हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.
✅ हा दिवस गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती म्हणून भारताच्या इतिहासात एक विशेष दिवस म्हणून साजरा केला जातो
✅ 2 ऑक्टोबर 2023 - 154 वी गांधी जयंती
✅ गांधी जयंती थीम २०२३ - एक तारीख एक घंटा एक साथ
✅ 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता स्वच्छतेसाठी नागरिकां 1 तास श्रमदानासाठी राष्ट्रीय आवाहन. 2014 मध्ये गांधी जयंतीला स्वच्छ भारत अभियान उदयास आले.
✅ महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळीबाई होते.
✅ १८८८ मध्ये त्यांनी भावनगरच्या श्यामल दास कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथूनच त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी लंडनला जाऊन बॅरिस्टर म्हणून शिक्षण पूर्ण केले आणि नंतर दक्षिण आफ्रिकेत सराव केला; जिथे त्यांना वांशिक भेदभावाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेत आलेल्या अनुभवामुळे गांधीजींनी सामाजिक न्यायाच्या समर्पणाला चालना दिली. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला.
✅ लोक प्रेमाने त्यांना ‘बापू’ असेही म्हणतात. तसेच गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ मानले जाते.
✅ सत्य आणि अहिंसा ही त्यांची विचारधारा ही दोन प्रमुख तत्त्वे होती.
✅ त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेष आणि खालच्या जाती आणि स्त्रियांना भेदभावपूर्ण वागणूक देण्याच्या विरोधात शांततापूर्ण निषेधाचे हे तंत्र वापरले. त्यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम घेतले आणि त्यांना हरिजन (देवाची मुले) हे नवीन नाव दिले.
✅ महात्मा गांधींनी देशाच्या विविध भागात कापूस , गिरणी कामगार आणि शेतकऱ्यांमध्ये सत्याग्रह आंदोलने, रौलेट कायद्याच्या विरोधात सत्याग्रह, ब्रिटीश राजवटीशी असहकार, दांडी मार्च , राष्ट्रीय चळवळीला जनआंदोलनात बदलले , भारत छोडो मोहीम सुरू केली.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
लेखापरीक्षण विषयक समित्या
🔷 लोक अंदाज समिती
✅पहिल्यांदा 1921 मध्ये रचना करण्यात आली.
✅ स्वातंत्र्यानंतर वित्तमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार या समितीची स्थापना १९५० मध्ये करण्यात आली.
✅ सदस्य : ३०
✅ निवड : सर्व सदस्य लोकसभेतून निवडले जातात.
✅ निवडणूक : अप्रत्यक्षपणे ( एकल संक्रमणीय मताद्वारे ).
✅ मंत्र्यांची निवड सदस्य म्हणून केली जात नाही.
✅ अध्यक्ष : लोकसभेच्या अध्यक्षा मार्फत एकाची निवड.
✅ कार्यकाळ : १ वर्ष.
✅ कार्य :
🔵प्रशासनात कार्यक्षमता व काटकसर आणण्यासाठी पर्याय सुचवणे.
🔵जमाखर्चाचे अंदाज संसदेसमोर कोणत्या स्वरूपात मांडता येतील त्याबद्दल शिफारशी करणे.
🔷 लोक लेखा समिती
✅ लोक लेखा समिती देशातील सर्वात जुनी अर्थविषयक संसदीय समिती आहे.
✅ १९१९ च्या मॉन्टफोर्ड सुधारणेने अंतर्गत १९२१पासून कार्यरत आहे.
✅ रचना : २२ सदस्य असतात.या सदस्यापैकी १५ लोकसभेतून व ७ राज्यसभेतून निवडले जातात.
✅ मंत्र्यांची निवड सदस्य म्हणून केली जात नाही.
✅ अध्यक्ष :लोकसभेच्या सदस्यांतून निवडला जातो.
✅ १९६७ पासून या समितीचे अध्यक्ष विरोधी पक्षातील असतात.
✅ १९६७ मध्ये मिनू मसानी हे अध्यक्ष झाले होते.
✅ कार्यकाळ: १ वर्ष.
✅ लोकलेखा समितीला लोक अंदाज समितीची जुळी भगिनी असे म्हणतात.
✅ कार्य:
🔵 लोकलेखा समिती राष्ट्राच्या वित्तीय बाबी मधील अनावश्यक खर्च,भ्रष्टाचार ,अकार्यक्षमता कार्यपद्धतीतील अभाव इ.बाबीची तपासणी करते.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
