fa
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 124
مشترکین
+624 ساعت
-107 روز
-3530 روز
آرشیو پست ها

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: भारतीयकरण से वैश्विकरण तक, नई शिक्षा नीति के साथ शिक्षा का नया युग! नागपुर में आयोजित ‘महाराष्ट्र ज्ञान सभा 2026 : विकसित महाराष्ट्र के लिए शिक्षा’ इस राष्ट्रीय सम्मेलन का उदघाटन किया एवं उपस्थित जनों को संबोधित किया। महाराष्ट्र ज्ञान सभा 2026 का उद्देश्य 2047 तक विकसित भारत और विकसित महाराष्ट्र के लिए शिक्षा की भूमिका पर विचार-विमर्श करने एवं वर्तमान व भविष्य की चुनौतियों पर मंथन कर नीति निर्माण के लिए एक महत्वपूर्ण मंच है। साल 1985 के बाद पहली बार मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में नई शिक्षा नीति पर काम शुरू हुआ, जिसे साल 2020 में लागू किया गया। तब से इसके नवाचारों और बदलावों को लगातार अपनाने का प्रयास किया जा रहा है। नई शिक्षा नीति का उद्देश्य वैश्विक ज्ञान का भारतीयकरण और भारतीय ज्ञान का वैश्विक स्तर पर प्रसार करने के साथ-साथ ऐसे मानव संसाधन तैयार करना है, जिनमें समग्र विकास के साथ बौद्धिक, भावनात्मक, नैतिक, शारीरिक और व्यावसायिक गुण हों, ताकि वे आत्मनिर्भर बनकर देश की अर्थव्यवस्था में योगदान दे सकें। आज की वैश्विक दिशा के अनुसार हमारे बच्चे आधुनिक ज्ञान में दक्ष हों और साथ ही भारतीय ज्ञान परंपरा को जोड़ते हुए ऐसी शिक्षा विकसित की जाए, जो आधुनिक भी हो और हमारी शाश्वत परंपराओं को आने वाली पीढ़ियों तक पहुंचाए। इस शानदार आयोजन के लिए चारों संस्थाओं को हार्दिक धन्यवाद देता हूँ। इस अवसर पर शिक्षा संस्कृति उत्थान न्यास के राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी जी, VNIT नागपुर के निदेशक मंडल के अध्यक्ष एम. मदन गोपाल जी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय की कुलपति डॉ. मनाली क्षीरसागर, गोंडवाना विश्वविद्यालय, गढ़चिरौली के कुलपति डॉ. प्रशांत बोकारे जी, आईआईएम नागपुर के निदेशक डॉ. भीमराया मेत्री जी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। #Maharashtra #Nagpur #महाराष्ट्रज्ञानसभा https://x.com/Dev_Fadnavis/status/2040429960519963048?s=20

CMO Maharashtra Tweets: नवीन शिक्षण धोरणासह शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'महाराष्ट्र ज्ञानसभा 2026 : विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण' या राष्ट्रीय संमेलनाचे उदघाटन करुन उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकीकरण करणे, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच वर्तमान व भविष्यातील जागतिक आव्हानांचा विचार करत शिक्षण पद्धतीला नवी दिशा देणे आवश्यक आहे. जग अत्यंत वेगाने पुढे जात आहे. या वेगाची व त्यातून होणाऱ्या बदलांची गती लक्षात घेतली नाही तर आपण मागे राहू शकतो. या क्रांतीला गती देणाऱ्या ‘एआय’ आणि ‘डीप टेक्नोलॉजी’च्या विकासात भारतीयांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले. आम्हाला शैक्षणिक धोरणातून असा मनुष्यबळ विकास साधायचा आहे, ज्यात व्यक्तीमध्ये सर्वंकष विकासासह नैतिक व व्यावसायिक गुणांचे रोपणही अपेक्षित आहे. भौतिक, नैतिक, शारीरिक क्षमतेसह व्यावसायिक म्हणून ती व्यक्ती देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारीही ठरावी. तसेच जागतिक ज्ञान व भारतीय ज्ञान व्यवस्थेचा मेळ साधणारी आणि जागतिक आव्हानांचा सामना करणारी शिक्षण पद्धती आपल्याला विकसित करायची आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवी मुंबईत आपण एज्युसिटी विकसित करत आहोत. त्यात आपल्या मुलांना अनेक विदेशी विद्यापीठांचे शिक्षण कमी खर्चात घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आपल्या विद्यापीठांनीही या स्पर्धेत उतरून शिक्षणाचा तो स्तर गाठायला हवा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी, VNIT नागपूरच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष एम. मदन गोपाळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #महाराष्ट्रज्ञानसभा

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: स्थानिक नेतेमंडळी आणि कुटुंबीयांशी चर्चा करून वर्धा आणि नागपूर या दोन्ही ठिकाणी स्व. दत्ताभाऊ मेघे यांची स्मारके उभारली जातील. स्थानीय जनप्रतिनिधियों और परिजनों से चर्चा कर वर्धा और नागपुर दोनों स्थानों पर स्व. दत्ताभाऊ मेघे के स्मारक स्थापित किए जाएंगे। (स्व. दत्ता मेघे यांची श्रद्धांजली सभा | नागपूर | 4-4-2026) #Maharashtra #Nagpur #DattabhauMeghe

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: स्व. दत्ताभाऊ मेघे यांनी सर्व पक्षाच्या लोकांशी आपली मैत्री जपली. स्व. दत्ताभाऊ मेघे इन्होंने सभी दलों के लोगों के साथ अपनी मित्रता बनाए रखी। (स्व. दत्ता मेघे यांची श्रद्धांजली सभा | नागपूर | 4-4-2026) #Maharashtra #Nagpur #DattabhauMeghe

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: एखाद्याच्या दु:खात जमेल तशी मदत करायची ही स्व. दत्ताभाऊ मेघे यांची खरी ओळख होती. किसी के दुःख में हर संभव तरीके से मदद करना स्व. दत्ताभाऊ मेघे इनकी सच्ची पहचान थी। (स्व. दत्ता मेघे यांची श्रद्धांजली सभा | नागपूर | 4-4-2026) #Maharashtra #Nagpur #DattabhauMeghe

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: अत्यंत गरिबीतून पुढे येत शिक्षण पूर्ण करत स्व. दत्ताभाऊ मेघे यांचा राजकीय प्रवास घडला. अत्यंत गरीबी से आगे बढ़ते हुए शिक्षा पूरी कर स्व. दत्ताभाऊ मेघे इनके राजनीतिक सफर ने आकार लिया। (स्व. दत्ता मेघे यांची श्रद्धांजली सभा | नागपूर | 4-4-2026) #Maharashtra #Nagpur #DattabhauMeghe

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Tribute to Late Dattabhau Meghe: A Life Dedicated to Public Service Attended the condolence meeting held in memory of a veteran leader and former Minister, Late Dattabhau Meghe, along with Hon Union Minister Nitin Gadkari ji. His passing is a profound loss, and the reflections shared today spoke of a leader who earned deep respect through consistent action and selfless service. Across Vidarbha, he nurtured and mentored generations of leaders, leaving behind a legacy that continues to guide public life. His contributions to education were visionary, expanding access through a strong network of institutions across the region. Honouring his enduring service, on consulting with his family, 2 memorials will be established in Wardha and Nagpur as a lasting tribute to a life devoted to public service. His family continues to carry forward his legacy with the same unwavering commitment and values. MoS Dr. Pankaj Bhoyar, Nagpur Mayor Neetatai Thakre, MLA Sameer Meghe, and other dignitaries were present. #Maharashtra #Nagpur https://x.com/Dev_Fadnavis/status/2040393385786384774?s=20

CMO Maharashtra Tweets: लोकनेते माजी मंत्री स्व. दत्ता मेघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्व. दत्ता मेघे यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व. दत्ता मेघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्व. दत्ता मेघे हे अत्यंत गरिबीतून पुढे येऊन स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिलेले नेतृत्व होते. शिक्षण घेत असताना वर्तमानपत्रे टाकण्याचे काम करत त्यांनी स्वतःचा मार्ग तयार केला. युवा नेते म्हणून विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी आपली ठळक ओळख निर्माण केली आणि त्यातून त्यांचा व्यापक राजकीय प्रवास सुरू झाला. आमदार, खासदार, मंत्री अशा विविध पदांवर ते राहिले असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. स्व. दत्ता मेघे यांच्या कार्याचा अनेकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला असून त्यांच्या स्पर्शाने अनेकांचे आयुष्य बदलले, शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी शिक्षणाकडे सेवाभावाने पाहिले. आरोग्य, शिक्षण आणि सहकार या क्षेत्रांमध्ये गुणवत्तापूर्ण विस्तार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. स्व. दत्ता मेघे यांच्या कार्याला साजेसे स्मारक वर्धा आणि नागपूर येथे उभारण्याबाबत सर्व नेतेमंडळी आणि मेघे कुटुंबाशी चर्चा करून लवकर निर्णय घेतला जाईल. हे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, आमदार समीर मेघे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'महाराष्ट्र ज्ञानसभा 2026 : विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण' या राष्ट्रीय संमेलनाच्या स्मारिकेचे आणि 'गोंडवाना मॉडेल - बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी, गडचिरोली' या पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी, VNIT नागपूरच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष एम. मदनगोपाळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #महाराष्ट्रज्ञानसभा

photo content

photo content

photo content

photo content