Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 155
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-17 روز
-4730 روز
آرشیو پست ها
4 154
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे नागपूर महानगरपालिकेतील नगरसेविका निधी तेलगोटे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹21,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 154
CMO Maharashtra Tweets:
🔸Grand Launch and stone plaque unveiling of 'Godam Logistics Park' at the hands of CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari.
MLA Dr. Ashish Deshmukh, MLC Dr. Parinay Fuke, Director of Godam Logistics Park Mahavir Jain, K.K. Gupta, Rajan Agarwal, Jayprakash Gupta, Kedarnath Gupta and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'गोदाम लॉजिस्टिक्स पार्क'चा भव्य शुभारंभ आणि कोनशिला अनावरण.
यावेळी आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार डॉ. परिणय फुके, गोदाम लॉजिस्टिक पार्कचे संचालक महावीर जैन, के. के. गुप्ता, राजन अग्रवाल, जयप्रकाश गुप्ता, केदारनाथ गुप्ता व अन्य मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनके करकमलों से 'गोदाम लॉजिस्टिक्स पार्क' का भव्य शुभारंभ एवं कोनशिला अनावरण।
इस अवसर पर विधायक डॉ. आशिष देशमुख, विधायक डॉ. परिणय फुके, गोदाम लॉजिस्टिक्स प्रा. लि. के निदेशक महावीर जैन, के. के. गुप्ता, राजन अग्रवाल, जयप्रकाश गुप्ता, केदारनाथ गुप्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕛12.10pm | 24-5-2026📍Nagpur | दु. १२.१० वा. | २४-५-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Logistics
4 154
Full_Speech_Grand_Launch_of_Godam_Logistics_Park,_Nagpur_24_05_2026.mp438.21 MB
4 154
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕜 1.15pm | 24-5-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/HVl8GvK4_I0?si=bw5KaMjZlMv2KTd1
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1365690048707214
https://x.com/Dev_Fadnavis/status/2058454516769382444?s=20
4 154
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Grand Launch of 'Godam Logistics Park' along with our leader Hon Union Minister Nitin Gadkari ji
🕐 12.47pm | 24-5-2026 📍Nagpur.
#Maharashtra #Logistic #Nagpur
https://www.youtube.com/live/Jv9OG3WoXas?si=yTaXRhX497ILxnBW
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1650716976208421
https://x.com/Dev_Fadnavis/status/2058447458225864956?s=20
4 154
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Grand Launch of Godam Logistics Park | Nagpur
https://www.youtube.com/live/Jv9OG3WoXas?si=LUDWrFoOX595iS59
4 154
CMO Maharashtra Tweets:
अहिल्यानगर... भारताच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगची नवी राजधानी!
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शिर्डी, अहिल्यानगर येथे मिसाईल कॉम्प्लेक्स अँड आर्टिलरी शेल प्रोडक्शन लाईनचे उदघाटन झाले. तसेच यावेळी निबे ग्रुपच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वार, जीएफएल शेड, भारतातील पहिली 300 किमी युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चिंग सिस्टम ‘सूर्यास्त्र’ आणि इनॉग्रेशन ऑफ कैपेबिलिटी : मिलिटरी ग्रेड टीएनटी, आरडीएक्स अँड एचएमएक्स, अशा विविध प्रकल्पांचे उदघाटन व लोकार्पण झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगामध्ये शांती तेच प्रस्थापित करू शकतात, ज्यांच्याकडे शक्ती असते. भारताचा इतिहास पाहिला तर, भारताने आजवर कोणावरही आक्रमण केले नाही; पण ज्यांनी आक्रमणे केली, त्यांना परत पाठवण्याचे काम भारताने नेहमीच केले आहे. आज आपल्या देशासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’चा संदेश दिला होता आणि हा संदेश देशाच्या संरक्षण क्षेत्रात अंमलात आणण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वीकारली. यामुळे आज आपला देश संरक्षण क्षेत्रात निर्यातदार बनला असून, आत्मनिर्भर भारत अंतर्गत अत्याधुनिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारतातच तयार होत आहेत. यामुळे 'आत्मनिर्भर भारता'चे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राचे सुपुत्र गणेश निबे यांनी संरक्षण क्षेत्रात उभे केलेले कार्य गौरवास्पद आहे. गेली अनेक वर्षे ते नवीन तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रास्त्र उत्पादने विकसित करत आहेत. यामुळे आपल्या देशाची संरक्षण क्षेत्रातील शस्त्रनिर्मिती क्षमता अधिक मजबूत झाली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट लक्ष्यावर अचूक मारा करू शकणारे गाईडेड ड्रोन आणि मिसाईल्स निबे ग्रुपच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्समध्ये तयार होत आहेत. हे आपल्या देशासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेनेने अत्यंत अचूक आणि प्रभावी कारवाई करत शत्रूला गुडघे टेकायला भाग पाडत अतुलनीय कामगिरी करून दाखवली. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, क्वांटम टेक्नॉलॉजी, हायपरसॉनिक आणि डायरेक्ट एनर्जी वेपन्ससारखी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली, ज्या पूर्वी केवळ प्रगत देशांकडे होत्या, त्या आता भारतात विकसित होत आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या भूमीत स्वराज्य निर्माण करून दाखवले आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला, त्याच भूमीत आज खऱ्या अर्थाने आत्मनिर्भरता रुजत आहे. अहिल्यानगर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगचे ‘हब’ बनले असून, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर येथील डिफेन्स क्लस्टर्स तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आज देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, निबे ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #Shirdi #NibeGroup
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
