Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 137
مشترکین
+224 ساعت
-137 روز
-4130 روز
آرشیو پست ها
4 136
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Congress is clearly competing with itself to hit new lows in political discourse. The remarks by Congress President Mallikarjun Kharge calling Hon PM Narendra Modi Ji a 'terrorist' are disgraceful and reflect a complete collapse of standards.
Such language drags down the dignity of democratic debate. The nation respects and recognises the commitment and patriotism of Hon PM Narendra Modi Ji.
India expects better and people are watching.
India expects constructive approach and not destructive!
#ShameOnCongress
4 136
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नारी शक्तीला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार!
'जन-आक्रोश महिला सम्मेलन' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या आदर्श महिलांना वंदन केले.
संसदेत व विधानसभेत मातृशक्तीला योग्य स्थान मिळेपर्यंत नारी शक्ती वंदन मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महिला आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता; मात्र काँग्रेसने याकडे कधीही गांभीर्याने पाहिले नाही. 2023 मध्ये 'नारी शक्ती विधेयक' मंजूर होणार हे माहीत असल्यामुळे विरोधकांनी दिखाऊ समर्थन दिले; मात्र आता बहुमताचा प्रश्न निर्माण होताच त्यांनी खरा चेहरा दाखवत विधेयकाला विरोध केला. महिलांच्या सक्षमीकरणाच्या मार्गा अडथळा आणण्याचे काम विरोधकांनी केले आहे.
विरोधकांनी नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाला विरोध करून देशाच्या प्रगतीत अडथळा आणला आहे. आता संसदेत व विधानसभेत 33% महिला प्रतिनिधी निवडून येतील तेव्हाच ही लढाई थांबेल. नारी शक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम, मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #NariShaktiVandan
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046660069723656389?s=20
4 136
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
डिलिमिटेशनमुळे कोणत्याही राज्याचे संसदेमधील प्रतिनिधित्व कमी होणार नाही.
डिलिमिटेशन के कारण किसी भी राज्य का संसद में प्रतिनिधित्व कम नहीं होगा।
(जन-आक्रोश महिला सम्मलेन | मुंबई | 21-4-2026)
#Maharashtra #NariShaktiVandan
4 136
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
झोपेचे सोंग घेणाऱ्यांना महिलांना आरक्षण मिळावे असे वाटत नाही.
सोने का नाटक करने वालों को महिलाओं को आरक्षण मिलना स्वीकार नहीं है।
(जन-आक्रोश महिला सम्मलेन | मुंबई | 21-4-2026)
#Maharashtra #NariShaktiVandan
4 136
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
On World Earth Day, let’s pledge to save water, plant trees, reduce pollution, and protect the balance between progress and nature for a safer tomorrow.
विकास व पर्यावरणाचा समतोल राखूया,
आपल्या वसुंधरेचे संवर्धन करूया!
#Maharashtra #India #WorldEarthDay
4 136
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Building a Climate-Resilient Maharashtra
Inaugurated the 'Centre of Excellence on Extreme Heat and Sustainable Cooling' at Sahyadri Guest House in Mumbai today.
Climate change is significantly impacting the agriculture sector, particularly small and marginal farmers. To address the growing challenge of extreme heat, this Centre will play a crucial role in strengthening preparedness and will function as part of the State Disaster Management framework.
Directed that, in the initial phase, the institution undertake a priority review of Heat Wave Action Plans and Urban Climate Action Plans and extend technical support for their effective implementation in identified cities and districts.
Maharashtra is steadily progressing towards energy self-sufficiency, with a target of sourcing 52% of its energy from renewable sources by 2030 and 65% of its energy from non conventional sources by 2035. Efforts are also underway to provide 16,000 MW of solar power for the agricultural sector.
The challenges posed by rising temperatures and increasing cooling demand will be addressed through a comprehensive 'Heat Wave Action Plan' across the state. Emphasis will also be laid on promoting local, sustainable, and eco-friendly solutions in construction and daily use to ensure balanced and environment-conscious development.
Minister Girish Mahajan ji, Natural Resources Defense Council President and CEO Manish Bapna ji and other senior officials were present.
#Maharashtra #HeatResilience #SustainableCooling
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046655905035694500?s=20
4 136
CMO Maharashtra Tweets:
उष्णता प्रतिसादक्षम व शाश्वत शीतकरणासाठी सेंटर ऑफ एक्सलेन्सचा शुभारंभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘द सेंटर ऑफ एक्सलेन्स ऑन एक्स्ट्रीम हीट अँड सस्टेनेबल कूलिंग’चे उदघाटन पार पडले.
हवामान बदल या संकटाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला, विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिउष्णतेच्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी तसेच ‘उष्णता प्रतिसादक्षम व शाश्वत शीतकरणासाठी सेंटर फॉर एक्सलेन्स’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हे केंद्र भविष्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा भाग म्हणून कार्यरत होईल. दुष्काळ, गारपीट आणि वाढते तापमान यामुळे समस्या वाढत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी ‘सेंटर फॉर एक्सलेन्स’ उपयुक्त ठरणार आहे. या संस्थेमार्फत सुरुवातीला प्राधान्याने उष्णलाट कृती आराखडा आणि शहरी हवामान कृती आराखड्यांचा आढावा घेऊन, प्राधान्य दिलेल्या शहरांना आणि जिल्ह्यांना तांत्रिक अंमलबजावणीसाठी सहाय्य केले जाईल. उष्णलाट कृती आराखड्यासाठी सक्षम योजना तयार करून तिच्या वार्षिक अंमलबजावणीवर भर दिला जाईल. त्यासाठी अधिकारी, आरोग्य कर्मचारी व स्थानिक नागरिकांसाठी प्रशिक्षण आराखडा तयार करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे. 2030 पर्यंत 52 टक्के ऊर्जा नवीकरणीय स्रोतांमधून आणि 2035 पर्यंत 65 टक्के ऊर्जा अपारंपरिक स्रोतांमधून निर्माण करण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना लागणारी 16,000 मेगावॅट वीज सौर ऊर्जेद्वारे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने शासन काम करत आहे. बांधकाम क्षेत्रात आणि दैनंदिन वापरात स्थानिक व पर्यावरणपूरक उपाययोजनांना प्राधान्य देऊन विकास साधण्यावर भर दिला जाईल.
उष्णता प्रतिसादक्षम व शाश्वत शीतकरणासाठी सेंटर फॉर एक्सलेन्सचे महत्त्व
नागपूरसारख्या शहरांमध्ये दरवर्षी तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाते. वाढत्या उष्णतेचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर, कामकाजावर, पाण्याच्या उपलब्धतेवर आणि वीज वापरावर होत आहे. त्यामुळे उष्णतेचा सामना करण्यासाठी योग्य नियोजन आणि प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. हे केंद्र उष्णतेचा नागरिकांवर आणि शहरांवर होणारा परिणाम समजून घेऊन त्यावर सोपे व प्रभावी उपाय सुचवेल. सुरुवातीला हे केंद्र आयआयएम नागपूरच्या परिसरात कार्यरत राहील. येथे संशोधन, प्रशिक्षण आणि धोरणात्मक मार्गदर्शन यावर विशेष भर दिला जाईल.
राज्य आणि स्थानिक प्रशासनाला उष्णतेसंदर्भात योग्य नियोजन करता यावे, यासाठी हे केंद्र मदत करेल. तसेच, शहरांची रचना सुधारणे, ऊर्जा बचतीचे उपाय आणि परवडणाऱ्या शीतकरण तंत्रज्ञानाचा वापर यावरही काम केले जाईल. विविध शहरांमधील चांगल्या पद्धतींचा अभ्यास करून त्या इतर ठिकाणी लागू करण्याचा प्रयत्न केला जाईल. एनआरडीसी ही संस्था या केंद्राला तांत्रिक मार्गदर्शन देईल आणि महाराष्ट्र शासनासोबत समन्वय साधून आवश्यक संसाधने उपलब्ध करून देईल. आयआयएम नागपूर या केंद्रासाठी आवश्यक जागा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे. पुढील काळात हे केंद्र नागपूरमध्ये प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेत (एसआयडीएम) कायमस्वरूपी स्थलांतरित येणार आहे.
यावेळी मंत्री गिरीष महाजन, नॅच्युरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिलचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष बापना आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #HeatResilience #SustainableCooling
4 136
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
‘द सेंटर ऑफ एक्सीलेंस ऑन एक्सट्रीम हीट एंड सस्टेनेबल कूलिंग’ के उदघाटन बैठक में संबोधन...
#Maharashtra #HeatResilience #SustainableCooling
https://youtu.be/84dfg71sLkE
4 136
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
स्मृती, भावना आणि संकल्प! मतदानातूनच वारसा जपण्याचा निर्धार
आज बारामती येथे '201 - बारामती विधानसभा पोटनिवडणूक' महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासाठी आयोजित सांगता सभेत उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. याप्रसंगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना अभिवादन केले. तसेच महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आमच्यासाठी ही निवडणूक नसून, हा स्व. अजितदादांच्या स्मृतींचा पवित्र यज्ञ आहे. या यज्ञात आहुती दिली नाही, तर आयुष्यभर काहीतरी अपूर्ण राहिल्याची भावना मनात राहील. म्हणूनच या यज्ञात आपली आहुती अर्पण करण्यासाठी, स्व. अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी येथे जमलो आहोत.
जनतेप्रतीचे आपले कर्तव्य अधिक महत्त्वाचे आहे या भावनेतून सुनेत्राताई पवार यांनी आपले दुःख बाजूला ठेवले आहे. त्यांनी पक्षाची आणि शासनाची धुरा सक्षमपणे सांभाळली आहे. स्व. अजितदादा यांची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे बारामतीकर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सुनेत्राताई यांना मतदानरूपी आशीर्वाद देतील अशी खात्री आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवलेजी, मंत्री छगन भुजबळ, मंत्री बाबासाहेब पाटीलजी, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री मकरंद जाधव-पाटीलजी, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार प्रफुल्ल पटेलजी, खासदार रामराव वडकुतेजी, खासदार पार्थ पवार, खासदार सुनील ताटकरेजी, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #BaramatiByElection
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046646317334872122?s=20
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
