fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 100
مشترکین
-224 ساعت
+217 روز
-530 روز
آرشیو پست ها
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या ग्रंथालय विभागाचे मुख्य कार्यालय लवकरच नवीन जागेत स्थलांतरित करण्यात येणार. द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई के पुस्तकालय विभाग के प्रमुख कार्यालय को जल्द ही नए स्थान पर स्थानांतरित किया जाएगा। (द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई | 13-9-2026) #Maharashtra #Mumbai #AsiaticSociety
13 سپتامبر, 07:33
13 سپتامبر, ~10:34

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: सेवा संकल्प अभियान जन सेवा से राष्ट्र सेवा LIVE | मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या समवेत पत्रकार परिषद 🕟 संध्या. ४.२४ वा | १३-९-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #PressConference https://www.youtube.com/live/OztEf3hthvU?si=BBhJEbNlwG468Tig https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1803822364368202 https://x.com/Dev_Fadnavis/status/2099089594851733799?s=20
13 سپتامبر, 06:57

CMO Maharashtra Tweets: वैभवशाली वारसा, नवे नेतृत्व, नवी दृष्टी, एशियाटिकच्या नव्या पर्वाची सुरुवात! केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई'ला भेट दिली. ऐतिहासिकदृष्ट्या मुंबईतील अत्यंत महत्त्वाची वास्तू आणि संस्था म्हणून 'द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई'कडे पाहिले जाते. या संस्थेला जवळपास 222 वर्षांचा इतिहास असून, संस्थेच्या मुख्य वास्तूलाही 200 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. भारतातील जुन्या संस्थांपैकी ही एक महत्त्वाची संस्था असून, तिच्या जडणघडणीत अनेक भारतीयांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. इतिहास, भाषाशास्त्र तसेच विविध भारतीय विद्वानांनी लिहिलेली पुस्तके, दस्तऐवज आणि साहित्य या संस्थेत उपलब्ध आहेत. सन 1841 मध्ये या संस्थेत भारतीयांचा प्रवेश सुरू झाला, त्यानंतर इतिहास, भाषाशास्त्र अशा विविध विषयांवर भारतीय तज्ज्ञांनी लिहिलेली ग्रंथे या ठिकाणी यायला सुरुवात झाली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. येथे जतन केलेले दस्तऐवज आणि ऐतिहासिक वस्तू पाहिल्यास इतिहासाशी जोडणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा परिचय होतो. मानवता, संस्कृती, विचार, अभ्यास आणि शास्त्र यांचा विकास कशा पद्धतीने झाला, याचे दस्तऐवजीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. असं मानले जाते कि, दस्ताऐवजीकरणाची परंपरा इंग्रजांच्या काळापासून सुरू झाली परंतू नालंदा विद्यापिठाच्या काळापासूनच दस्ताऐवजीकरणाचा आपल्याकडे इतिहास आहे. 'द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई'च्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आणि ऐतिहासिक ठेवा पाहायला मिळतो. तसेच या सर्वांचे जतन केले जाते. भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून हे महत्त्वपूर्ण कार्य अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नूतन पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 'द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई' नवी भरारी घेईल आणि नव्या जोमाने आपले कार्य करेल. संस्थेने केलेल्या मागणीच्या अनुषंगाने ग्रंथालय विभागाचे मुख्य कार्यालय सध्या या परिसरात आहे, त्यासाठी नवीन जागा उपलब्ध झाली असून, लवकरच हे कार्यालय तेथे स्थलांतरित करण्यात येईल. तसेच रजिस्ट्रार ऑफ स्टॅम्प्सचे कार्यालय असलेली जागाही संस्थेला उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. 'द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई'चे मुख्य कार्य अधिक प्रभावीपणे सुरू राहावे, यासाठी सरकारकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस केले. याप्रसंगी 'द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई'च्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार अमीत साटम, आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार आणि द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #AsiaticSociety
13 سپتامبر, 06:56

Full_Video_Distribution_of_the_'52nd_India_Gems_and_Jewellery_Awards'.mp4106.55 MB
13 سپتامبر, 06:53

photo content
13 سپتامبر, 06:50

photo content
13 سپتامبر, 06:50

photo content
13 سپتامبر, 06:50

photo content
13 سپتامبر, 06:50

photo content
13 سپتامبر, 06:50

photo content
13 سپتامبر, 06:50

CMO Maharashtra Tweets: केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील ऐतिहासिक 'द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई' ला भेट देऊन संस्थेतील विविध ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेव्यांची पाहणी केली. यावेळी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईद्वारे आयोजित 'गणेश ज्ञानार्थी' या प्रदर्शनाचे उदघाटन केले. ऐतिहासिक पांडूलिपी, मौर्य, सातवाहन, गुप्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील नाणी, भगवान गौतम बुद्धांच्या भिक्षापात्राचा अंश व बोधिसत्त्वाच्या पूर्णाकृतीचे अवशेष, सुवर्णपुष्प आणि सातवाहन काळातील रजत नाणे, ऐतिहासिक नकाशे, दुर्मिळ ग्रंथ व पुरावशेष, शाही दरबार अल्बम, वस्त्रोद्योगाचे नमुने, तसेच कोल्हापूर पुरातत्त्वीय उत्खननातून प्राप्त अस्थिमंजूषा, कान्हेरी गुंफांमधून प्राप्त मंजूषा, हिमालय क्षेत्रातील बुद्ध प्रतिमा, अलंकृत विटा, वाई क्षेत्रातून प्राप्त उखळपीठ आदी पुरावशेषांचा या प्रदर्शनात समावेश आहे. या प्रदर्शनातून भारताच्या समृद्ध प्राचीन इतिहासाचा, सांस्कृतिक वैभवाचा आणि पुरातत्त्वीय वारशाचा अनमोल ठेवा नागरिकांसमोर मांडण्यात आला आहे. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #AsiaticSociety
13 سپتامبر, 06:49

photo content
13 سپتامبر, 06:21

photo content
13 سپتامبر, 06:21

photo content
13 سپتامبر, 06:21

CMO Maharashtra Tweets: केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई येथील ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ येथे सदस्यांसोबत ग्रुप फोटो. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार आणि द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #AsiaticSociety
13 سپتامبر, 06:20

*CM Shri Devendra Fadnavis speech begins* 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | Distribution of the '52nd India Gems and Jewellery Awards Ceremony' at the hands of Hon Home and Cooperation Minister Amitbhai Shah 🕒 3.09pm | 13-9-2026📍BKC, Mumbai. #Maharashtra #52ndIGJA #GJEPC https://www.youtube.com/live/JDI5WV52YpI?si=lo1FbsHWrnhf-0b0 https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1280727970805389 https://x.com/Dev_Fadnavis/status/2099071178950549842?s=20
13 سپتامبر, 05:45

photo content
13 سپتامبر, 05:44

photo content
13 سپتامبر, 05:44

photo content
13 سپتامبر, 05:44

photo content
13 سپتامبر, 05:44