Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 078
مشترکین
-224 ساعت
-247 روز
-3430 روز
آرشیو پست ها
4 076
#Maharashtra #DevendraFadnavis #Nashik #SamruddhaPanchayatRajAbhiyan
11 اکتبر, 10:37
4 076
CMO Maharashtra Tweets:
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0’मधून दुष्काळ निवारण आणि जलसंधारणाला प्राधान्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नाशिक येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025-26'च्या पुरस्कारांचे वितरण आणि 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0, 2026-27' चा शुभारंभ करण्यात आला.
ग्रामीण भागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 अंतर्गत पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे, तलावांतील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे. या कामांसाठी राज्य सरकार आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामीण भागातील सामूहिक शक्तीला चालना देऊन गावांच्या विकासाला गती देणारे महत्त्वपूर्ण अभियान आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास ग्रामीण भागात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते, हे जलयुक्त शिवार अभियानाने सिद्ध केले आहे. याच अनुभवातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अभियानात सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ यांचे अभिनंदन केले. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने केलेले प्रयत्न कौतुकास्पद असून अभियानामुळे गावांमध्ये रस्ते, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही यंत्रणा, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे. तसेच पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींसह अंतिम 12 ग्रामपंचायतींना स्वतः भेट देऊन तेथील विकासकामांची पाहणी करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाण्याचे नियोजन करा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यंदा सुरुवातीला अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. दुष्काळी तालुक्यांमध्ये सरकारने 12 प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. आगामी काळात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेण्यात येतील.
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. माणसे आणि जनावरांसाठी पाणी राखून ठेवण्याला प्राधान्य देऊन रब्बी हंगामासाठी योग्य नियोजन करावे. गावांतील तलावांचा गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, जलसंधारणाच्या उपाययोजना राबविणे आणि जलतारा संरचना मोठ्या प्रमाणात उभारणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. या कामांसाठी सरकारकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
केंद्र सरकारच्या 'विकसित भारत-जी राम जी' योजनेच्या माध्यमातून विविध योजनांचे अभिसरण करून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येतील. यामुळे पाणीसाठा वाढण्यासोबतच ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांनी आपले पशुधन विकू नये, यासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याचे नियोजनही सरकार करणार आहे. पशुधनाचे संरक्षण करणे हे शेतीव्यवस्था टिकविण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
संकटाच्या काळात सरकार शेतकरी व कष्टकऱ्यांच्या पाठीशी
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत कोणताही नागरिक उपाशी राहणार नाही, याची काळजी सरकार कडून घेण्यात येईल. पात्र शिधापत्रिकाधारकांना आवश्यक अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासह शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचविण्यात येतील. शेतकऱ्यांना मदत करणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणे आणि संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे, ही सरकारची भूमिका आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात दुष्काळ निवारण आणि दुष्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येणार आहे. तलावांतील गाळ काढणे, जलसंधारणाची कामे करणे आणि उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी अभियानाच्या गुणांकन पद्धतीतही आवश्यक बाबींचा समावेश करण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, पद्मश्री पोपटराव पवार, इतर आमदार व मान्यवर उपस्थित होते.
11 اکتبر, 10:37
4 076
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
संकटाच्या काळात गोधन विकू नका, राज्य सरकार आपल्या पाठीशी असून गोधनाच्या संगोपनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करू.
संकट के समय अपने गोधन को न बेचें, राज्य सरकार आपके साथ है और गोधन के पालन-पोषण के लिए आवश्यक सभी उपाय किए जाएंगे।
(मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान | नाशिक | 11-10-2026)
#Maharashtra #SamruddhaPanchayatRajAbhiyan #Nashik
11 اکتبر, 10:21
4 076
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025-26' अंतर्गत पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींसह अंतिम 12 मध्ये स्थान मिळवलेल्या ग्रामपंचायतींना भेट देणार.
'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26' के अंतर्गत पुरस्कार प्राप्त ग्राम पंचायतों सहित अंतिम 12 में स्थान हासिल करने वाली ग्राम पंचायतों का दौरा करेंगे।
(मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान | नाशिक | 11-10-2026)
#Maharashtra #Nashik #SamruddhaPanchayatRajAbhiyan
11 اکتبر, 10:17
4 076
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Strengthening Drought Relief and Water Security Across Maharashtra!
Chaired a meeting with the central team visiting the state to assess the drought situation.
Maharashtra is facing an exceptionally challenging drought situation this year. Our priority is to stand firmly with farmers, farm labourers and rural communities with focused measures to generate employment, ensure food security, provide drinking water and meet the needs of livestock. Three central teams visited drought-affected villages across multiple districts in the state. The teams assessed agricultural conditions and water availability on the ground, while interacting directly with farmers to understand their concerns and immediate requirements.
A prolonged dry spell has severely damaged crops, particularly soybean, cotton, tur and sugarcane, putting the livelihoods of farmers and farm labourers at risk. The Maharashtra Government stands firmly with every farmer and will ensure timely assistance through employment and food security schemes, so that affected farmers and rural families receive the help they need.
A transparent, technology-driven tanker supply system is being planned, with available water reserved for drinking purposes and separate allocations for citizens and livestock. Desilting and rejuvenation of water bodies, along with strengthened fodder production, procurement and storage, and fodder and cattle camps, will help mitigate the crisis while generating rural employment.
Maharashtra Government is actively engaging with the Government of India on this crisis. Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah has assured expedited assistance so that farmers are able to avail relief measures at the earliest.
Minister Girishbhau Mahajan, Minister Dattatray Bharane, Minister Makrand Jadhav-Patil and senior officials were present.
#Maharashtra #Mumbai #Drought
https://x.com/Dev_Fadnavis/status/2109282047189746034?s=20
11 اکتبر, 09:58
4 076
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रस्तावित जागा, आराखडा आणि सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #SimhasthaKumbhMela2027
11 اکتبر, 09:51
