Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 154
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
-4530 روز
آرشیو پست ها
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Maharashtra Agri Hackathon: Driving the Future of Agriculture
Attended the prize distribution and closing ceremony of the ‘Pune Agri Hackathon’ and felicitated winners across 9 categories.
Modern research, innovation and technology integration are essential to make agriculture more sustainable, technology-driven and productive. Initiatives like the Agri Hackathon are giving a new direction to the future of agriculture.
Announced that from next year onwards, the ‘Pune Agri Hackathon’ will be expanded into a state-wide initiative as the ‘Maharashtra Agri Hackathon’. The first prize of the competition will also be instituted in the name of former DCM Late Ajit Dada Pawar, honouring his contribution to the agricultural sector.
Eighteen selected innovations from this year’s competition will receive special support and mentorship in the next phase, with efforts to help at least 12 projects enter the market.
The exhibition showcased impactful technologies such as satellite mapping and soil testing systems, moisture management solutions for efficient water usage and intelligent spraying technologies for targeted application. AI-driven technologies and drone-based systems will also help improve productivity and bring greater transparency to crop insurance processes.
Minister Chandrakantdada Patil, Minister Dattatray Bharane ji, MP Dr. Medha tai Kulkarni, MLC Yogesh Tilekar, MLA Hemant Rasane and other dignitaries were present.
#Maharashtra #AgriInnovation
https://x.com/Dev_Fadnavis/status/2056072424316448779?s=20
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Strengthening Pune’s Infrastructure and Urban Connectivity
Performed Bhoomipujan, Inauguration and unveiled the stone plaque of various development works along with DCM Sunetratai Pawar in Pune.
Inaugurated and unveiled the foundation stone plaque of 9 water storage reservoirs under the Equitable Water Supply Scheme in Ward Nos. 41 and 19 at Mohammadwadi, along with DCM Sunetratai Pawar. The scheme is being implemented to ensure clean and regular water supply for citizens through a modern distribution system.
Also performed the bhoomipujan (online) for the double-decker flyover integrated with Metro connectivity at Mahatma Phule Chowk, Mundhva. The project will help reduce traffic congestion and save travel time.
Along with DCM Sunetratai Pawar, unveiled the statue and foundation stone plaque of Swarajyarakshak, Dharmaveer and ‘Budhbhushan’ Granth Rachnakar Chhatrapati Shri Sambhaji Maharaj at Chhatrapati Shri Sambhaji Maharaj Udyan, Pune. The sculpture depicts Chhatrapati Sambhaji Maharaj authoring the historic ‘Budhbhushan’ granth, reflecting his extraordinary scholarship, vision and enduring contribution to our rich civilisational heritage.
Inspired by such visionary legacy, continuous efforts over the past decade have been undertaken to transform Pune into a modern and future-ready city through projects such as the new airport, ring road, Metro network, elevated roads and the upcoming underground tunnel network.
Union MoS Murlidhar Mohol, Minister Chandrakantdada Patil, MLC Yogesh Tilekar, MLA Bhimrao Tapkir ji, MLA Chetan Tupe, Pune Mayor Manjushatai Nagpure and other dignitaries were present.
#Maharashtra #Pune #PuneDevelopment
https://x.com/Dev_Fadnavis/status/2056055599314751670?s=20
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
महाराष्ट्र हे ‘महाविस्तार’च्या माध्यमातून कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) चा वापर करणारे पहिले राज्य ठरले आहे.
महाराष्ट्र ‘महाविस्तार’ के माध्यम से कृषि क्षेत्र में कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) का उपयोग करने वाला पहला राज्य बन गया है।
(पुणे ॲग्री हॅकेथॉन पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभ) |पुणे | 17-05-2026)
#Maharashtra #Pune #PuneAgriHackathon
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
पुढील वर्षापासून ‘ॲग्री हॅकेथॉन’ राज्यस्तरावर ‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ म्हणून आयोजित करण्यात येणार असून, सर्वोत्तम पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या नावाने प्रदान करण्यात येईल.
अगले वर्ष से ‘एग्री हैकथॉन’ का आयोजन राज्यस्तर पर ‘महाराष्ट्र एग्री हैकथॉन’ के रूप में किया जाएगा तथा सर्वश्रेष्ठ पुरस्कार पूर्व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार इनके नाम से प्रदान किया जाएगा।
(पुणे ॲग्री हॅकेथॉन पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभ |पुणे | 17-05-2026)
#Maharashtra #Pune #PuneAgriHackathon
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
राज्यात कोणतेही ऊर्जा संकट नसून, आवश्यकतेपेक्षा अधिक ऊर्जा उपलब्ध आहे.
राज्य में किसी प्रकार का ऊर्जा संकट नहीं है, बल्कि आवश्यकता से अधिक ऊर्जा उपलब्ध है।
(पुणे| 17-5-2026)
#Maharashtra #Pune #PowerSupply
4 154
CMO Maharashtra Tweets:
'पुणे ॲग्री हॅकेथॉन’ आता राज्यस्तरावर; कृषी नवकल्पनांना मोठी चालना!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'पुणे ॲग्री हॅकेथॉनचा पारितोषिक वितरण व समारोप समारंभ' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हॅकेथॉनमधील 9 विभागातील विजेते आणि उपविजेत्यांचा गौरव केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक संशोधन व नवकल्पनांची जोड आवश्यक असून ॲग्री हॅकेथॉन स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत. पुढील वर्षापासून 'पुणे ॲग्री हॅकेथॉन' राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल तसेच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या नावाने दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
राज्य शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून त्यामागे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे विशेष योगदान आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी तब्बल 1290 अर्ज प्राप्त झाले असून विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील 4 संशोधन प्रकल्पांचे उत्पादन प्रत्यक्षात सुरू झाले असून आणखी 12 उत्पादने लवकरच बाजारात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या स्पर्धेतून केवळ कल्पना मांडल्या जात नाहीत, तर त्या प्रत्यक्ष उत्पादनात उतरून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवतात. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत व मार्गदर्शन देण्यात येणार असून त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील. प्रदर्शनात शेतीतील तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबाबत उपयुक्त नवकल्पना आहेत. उपग्रह नकाशांकन आणि मृदा परीक्षणाच्या आधारे जमिनीचे अचूक विश्लेषण करणारे नमुने, शेताच्या रचनेनुसार ओलावा व्यवस्थापन करून आवश्यक तेवढाच पाणीपुरवठा करणारी यंत्रणा, तसेच तण आणि पीक ओळखून स्वतंत्र फवारणी करणारे तंत्रज्ञान अशा विविध संकल्पनांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष कौतुक केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्याची क्षमता या तंत्रज्ञानात असून भविष्यात त्याची अचूकता आणखी वाढेल. पीक विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मानवरहित यंत्रे आणि उपग्रह नकाशांकनाच्या माध्यमातून अचूक अहवाल तयार करणारे तंत्रही उपयुक्त ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
याप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, आमदार हेमंत रासने व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #AgriInnovation
4 154
CMO Maharashtra Tweets:
पुण्याच्या विकासाला नवी गती; आरोग्य, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेला बळ!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण व कोनशिला अनावरण संपन्न झाले.
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 41 व 19, मोहम्मदवाडी येथील पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचे लोकार्पण व कोनशिला अनावरण तसेच मुंढवा येथील महात्मा फुले चौक मेट्रोसमवेत दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन (ऑनलाईन) करण्यात आले. पुण्यातील नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. पाणीगळती रोखण्यासाठी आधुनिक वितरण व्यवस्था उभारण्यात येत असून, या योजनेमुळे पुणेकरांचा पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत छत्रपती श्री संभाजी महाराज उद्यान येथील स्वराज्यरक्षक, धर्मवीर, बुधभूषण ग्रंथाचे रचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व कोनशिलेचे अनावरणही केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे 'बुधभूषण' ग्रंथ लिहित आहेत अशा स्वरूपाचे शिल्प उभारण्यात आले आहे. 11 भाषा अवगत असलेले स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या 14 व्या वर्षी हा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथातील 10 श्लोकांचाही शिल्पात समावेश केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा फुले चौक ते खराडी मेट्रोसह दुमजली पूल उभारण्यात येत असून त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटण्यासह प्रवासातील 15 ते 20 मिनिटांची बचत होणार आहेत. पुण्याला गतिमान करण्याच्या प्रयत्नांतील हा एक महत्त्वाचा पूल आहे. तसेच कोंढवा परिसरातील कात्रज-कोंढवा रस्त्याचे येत्या 6 महिन्यांत भूसंपादन होऊन हा रस्ता पूर्ण होईल.
गेल्या 10 वर्षांत पुण्याला आधुनिक शहर म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. नवीन विमानतळ, रिंग रोड, एलिव्हेटेड रोड, मेट्रोचे जाळे आणि भविष्यात उभारण्यात येणारे अंडरग्राउंड टनेल नेटवर्क यांच्या माध्यमातून पुण्याची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यात येत आहे. पुणे आता देशाचे महत्त्वाचे जीसीसी (Global Capability Center) हब म्हणून उदयास येत असून, शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, आमदार भिमराव तापकीर, आमदार चेतन तुपे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #PuneDevelopment
4 154
CMO Maharashtra Tweets:
कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ची विस्तृत माहिती...
#Maharashtra #DevendraFadnavis #AgriInnovation
4 154
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमवेत आज ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप्स, नवउद्योजक आणि उपक्रमशील शेतकऱ्यांना विविध विभागांतील विजेते व उपविजेत्यांना धनादेश आणि पुरस्कारांचे वितरण केले.
🔸स्मार्ट जलव्यवस्थापन व ऑटोमेशन
✅विजेता - आयओएच इंजिनिअरिंग
✅उपविजेता - फारमोअर टीम
🔸कृषी यांत्रिकीकरण कृत्रिम बुद्धीमत्ता व रोबोटिक्स
✅विजेता - ॲग्रीटेक नेक्सस
✅उपविजेता - टीम व्हीएनएमकेव्ही
🔸कृषी प्रक्रिया व मूल्य साखळी
✅विजेता - विन विन बाईट्स
✅उपविजेता - सिल्कस्कॅन इनोव्हेटर्स
🔸अक्षय्य उर्जा व कृषी कचरा व्यवस्थापन
✅विजेता - प्रोटोफिड्स
✅उपविजेता - इको एक्सट्र्रॅक्ट
🔸पीक संरक्षण व कीड व्यवस्थापन
✅विजेता - स्मार्ट बायो डिलिव्हरी
✅उपविजेता - कृषी नेत्र
🔸हवामान अनुकूल व डिजिटल शेती
✅विजेता - डीप ॲग बॉट
✅उपविजेता - मॉडर्न व्हिलेज फ्युचर इनोव्हेशन
🔸मृदा आरोग्य व व्यवस्थापन
✅विजेता - किसान साथी
✅उपविजेता - नॅनो वीटा लिमिटेड, पुणे
🔸भूस्थानिक व GIS आधारित पीक सर्वेक्षण प्रणाली
✅विजेता - क्रॉप जेन AI
✅उपविजेता - ग्रीन माइंडस
🔸स्मार्ट कृषी प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (AI)
✅विजेता - ई-पिक ऑडिट AI
✅उपविजेता - कृषी प्रबंध
#Maharashtra #DevendraFadnavis #AgriInnovation
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
समान पाणीपुरवठा योजनेमुळे पुणेकरांची पाण्याची चिंता दूर होत आहे.
समान जलापूर्ति योजना के कारण पुणेकरों की पानी की चिंता दूर हो रही है।
(पुणे शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण | पुणे | 17-5-2026)
#Maharashtra #Pune #PuneDevelopment
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
