Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 109
مشترکین
-124 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
-2330 روز
آرشیو پست ها
4 109
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
More Medals, More Glory! 🇮🇳
Once again a spectacular 1-2-3 finish at the Asian Para Games 2026! Many congratulations to Shailesh Kumar on clinching Gold, Varun Bhati on winning Silver, and Rahul on securing Bronze in the Men’s High Jump T63 event.
Heartiest congratulations to Anjanaben Bumbadiya on winning Gold and Jayanti Behera on securing Silver in the Women’s 400m T47 event.
A phenomenal showcase of talent, determination and sporting excellence. A proud moment for the nation and a triumph for Indian para-sports!
#AsianParaGames2026 #TeamIndia #Cheer4Bharat
4 109
टप्पा- 1 मध्ये रेल्वे हद्दीतील सेवांची पुनर्स्थापना व 99.34 मीटर लांबीच्या 2 तुळ्यांची स्थापना करण्यात आली. तसेच टप्पा- 2 मध्ये पूर्व व पश्चिम बाजूंच्या 500 मीटर लांबीच्या सेवा रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. पुलाची एकूण लांबी 600 मीटर असून, रुंदी 15.50 मीटर ते 17.50 मीटर आहे. पूर्वेकडील आर.सी. मार्ग आणि पश्चिमेकडील एल.बी.एस. मार्ग यांमधील प्रवासाचा कालावधी 30 मिनिटांवरून अंदाजे 10 मिनिटांवर येणार आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील उड्डाणपूल
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी व वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये जलद व सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. तसेच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील प्रस्तावित दुहेरी भूमिगत बोगद्यापर्यंत सहज व जलद पोहोचता येईल. ए.के. वैद्य मार्ग, फिल्म सिटी रोड आणि हॉटेल रत्नागिरी जंक्शन परिसरातील प्रमुख वाहतूक कोंडी कमी होण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल.
गोरेगाव पूर्व येथील हा 1.26 किलोमीटर लांबीचा, 6 मार्गिकांचा उड्डाणपूल आहे. यामध्ये पूर्वनिर्मित बॉक्स आकाराच्या काँक्रीट सेगमेंटचा वापर करण्यात आला आहे. उड्डाणपुलावर पी-7 ते पी-11 दरम्यान वक्राकार पोलादी स्पॅन आणि गुंतागुंतीची बहुदिशात्मक रचना आहे. भूस्तराच्या स्थितीनुसार पाइल्स आणि ओपन फाउंडेशनची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार राजहंस सिंह, आमदार पराग शाह, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 109
CMO Maharashtra Tweets:
मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला बळ, जनतेचा प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील वर्षा निवासस्थानी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्याविहार पूर्व-पश्चिम यांना जोडणारा रेल्वेपूल (विद्याविहार रेल्वे स्थानकावरील लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा रेल्वेपूल), शीव रेल्वेस्थानक येथील उड्डाणपूल तसेच गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी जंक्शन ते चित्रनगरी मार्गावरील संतोष नगरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर क्षेत्रात महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची वेगाने निर्मिती करण्यात येत आहे. या गतिमान पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे मुंबई महानगर क्षेत्रात पोहोचण्यासाठी '59 मिनिटांत मुंबई' या संकल्पाचे पूर्णत्व दृष्टिपथात येत आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या ‘मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी’च्या कामामुळे वेगवान संपर्क जोडणीसह नागरिकांच्या 'इज ऑफ लिव्हिंग' मध्ये कमालीची सुधारणा होणार आहे.
मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई महानगरात उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम भागात अखंड संपर्कव्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. विद्याविहार, गोरेगाव पूर्व आणि शीव येथील तिन्ही पूल प्रकल्प धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असून, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होईल. पूर्व-पश्चिम संपर्कासाठी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. विद्याविहार रेल्वेस्थानकावरील पूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडतो. या भागातील प्रवासासाठी यापूर्वी सुमारे 30 मिनिटे लागत होती. आता हे अंतर 10 मिनिटांत पार करता येईल. त्यामुळे घाटकोपर स्थानकावरील उड्डाणपुलाचा वाहतूक भारही कमी होण्यास मदत होईल.
गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शन परिसरातील उड्डाणपूल आणि उन्नत गोलाकार रस्ता प्रकल्पाची रचना प्रभावी पद्धतीने करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे रत्नागिरी हॉटेल जंक्शन तसेच लगतच्या चौकांतील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होईल. पूर्व-पश्चिम संपर्कक्षमता वाढविण्यासाठीही हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. शीव रेल्वे स्थानकावरील जुना पूल 112 वर्षे जुना आणि असुरक्षित झाला होता. नवीन पूल वाहतुकीसाठी उपयुक्त ठरण्याबरोबरच पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम हाती घेणे शक्य होणार आहे. या मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकलची संख्या आणि वारंवारता वाढविता येईल व त्याचा प्रवाशांना मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
प्रकल्पांच्या माध्यमातून शहराची संपर्कव्यवस्था वेगाने विकसित
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवीन शीव पूल पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गाला धारावी, वांद्रे व बीकेसी या पश्चिमेकडील भागांशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे शहरातील पूर्व-पश्चिम प्रवास अधिक सुलभ होईल. मुंबई महानगरपालिका काँक्रीट रस्ते, कोस्टल रोड आणि अन्य पायाभूत प्रकल्पांच्या माध्यमातून शहराची संपर्कव्यवस्था वेगाने विकसित करीत आहे.
शीव रेल्वे पूल
हा 112 वर्षे जुना पूल असुरक्षित झाल्यामुळे आणि मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या विस्तारासाठी त्याची पुनर्बांधणी हाती घेण्यात आली. यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक अधिक वेगवान होण्यास मदत होईल. शीव पूर्व आणि शीव पश्चिम भागांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, धारावी आणि वांद्रे यांच्याशी (दरम्यान) सुलभ जोडणी उपलब्ध करून देतो. या प्रकल्पाचा खर्च रेल्वे भागासाठी ₹33.51 कोटी आणि पोहोच रस्त्यासाठी ₹31.62 कोटी आहे. पुलाचे काम अंदाजे 4 महिने अगोदर पूर्ण करण्यात आले आहे.
रेल्वे पुलाची एकूण लांबी 54.5 मीटर व रुंदी 26 मीटर आहे. या पुलासाठी 496 टन वजनाचे 2 'सेमी थ्रू स्टील गर्डर' वापरण्यात आले आहेत. पोहोच रस्त्याची लांबी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाच्या दिशेने 65 मीटर, धारावीच्या दिशेने 110 मीटर आणि एल.बी.एस. मार्गाच्या दिशेने 97 मीटर आहे. एल.बी.एस. मार्ग व संत रोहिदास मार्गावर पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. सॉलिड अप्रोच व जमिनीला मजबुती देण्यासाठी 'टच पाईल्स'चा वापर करण्यात आला आहे.
विद्याविहार उड्डाणपूल (पूर्व व पश्चिम जोडणारा)
विद्याविहार पूर्व आणि पश्चिम परिसराला थेट जोडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे या पुलाचे बांधकाम करण्यात आले. घाटकोपर स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. पुलाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात आले आहे.
4 109
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Maharashtra’s son, Sangameshwar’s pride! 🇮🇳🥉
Heartiest congratulations to Pranav Desai on winning the Bronze Medal in the Men’s 100m T64 at the Asian Para Games 2026.
His grit, determination and spirit have brought pride to Maharashtra and the nation. A remarkable achievement that inspires countless aspiring athletes to pursue their dreams with courage and conviction. Wishing Pranav continued success and many more milestones ahead!
#AsianParaGames2026 #TeamIndia #Cheer4Bharat
4 109
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Advancing Maharashtra’s Chemical Industry with Investment, Innovation and Growth
Delighted to be part of the inaugural ceremony of 'India Chem 2026' in Mumbai along with the Hon Union Minister J.P. Nadda ji, bringing together industry leaders to discuss the future of India’s chemical industry.
Maharashtra’s strong industrial base, manufacturing clusters and port infrastructure offer great potential to drive growth in India’s chemical industry.
Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, competitive federalism is encouraging states to attract investment and create new opportunities in global supply chains. Maharashtra's focus is on building a future-ready chemical industry through domestic manufacturing of critical raw materials and APIs, import substitution, and opportunities in batteries, electronics and coal gasification.
Maharashtra is developing a new Chemical Industry Policy to attract investment, strengthen the industry and create jobs. Initiatives such as MAITRI and Invest Maharashtra are also making it easier for businesses to invest and grow. India Chem 2026 offers a valuable platform to strengthen industry partnerships, build resilient supply chains and advance Maharashtra’s industrial growth.
CM of Madhya Pradesh Dr. Mohan Yadav ji, CM of Odisha Mohan Charan Majhi ji, Union MoS Anupriya Patel ji, MoS of Gujarat Praful Pansheriya, Chairman of FICCI National Petrochemicals Committee & MD and CEO of HMEL Prabh Das, Chairman & Group CEO of UPL Jai Shroff and other dignitaries were present.
#Maharashtra #Mumbai #IndiaChem2026
https://x.com/Dev_Fadnavis/status/2113239795610812694?s=20
4 109
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting with the delegation of the World Bank regarding water supply and sanitation across various urban local bodies.
Regional Director for South Asia at the World Bank, Mara Warwick, Water Practice Manager for India at the World Bank, William Rex, Infrastructure Manager for South Asia at the International Finance Corporation (IFC), Nuru Lama and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पाणीपुरवठा, स्वच्छताबाबत जागतिक बँकेच्या शिष्टमंडळांसोबत बैठक.
यावेळी जागतिक बँकेच्या दक्षिण आशियाच्या प्रादेशिक संचालक मारा वॉर्विक, जागतिक बँकेचे भारतातील जलक्षेत्र व्यवस्थापक विल्यम रेक्स, आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाचे (IFC) दक्षिण आशियासाठीचे पायाभूत सुविधा क्षेत्राचे व्यवस्थापक नुरू लामा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में विभिन्न शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाओं में जलआपूर्ति, स्वच्छता के संदर्भ में विश्व बैंक के प्रतिनिधिमंडल के साथ बैठक।
इस अवसर पर विश्व बैंक की दक्षिण एशिया क्षेत्रीय निदेशक मारा वॉर्विक, विश्व बैंक के भारत में जल क्षेत्र प्रबंधक विलियम रेक्स, अंतरराष्ट्रीय वित्त महामंडल (IFC) के दक्षिण एशिया विभाग के आधारभूत संरचना क्षेत्र प्रबंधक नुरू लामा एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕒 2.55pm | 22-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. २.५५ वा. | २२-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #WorldBank
4 109
CMO Maharashtra Tweets:
🔸 Inauguration of various flyovers under the Brihanmumbai Municipal Corporation at the hands of CM Devendra Fadnavis (Online).
✅ Vidyavihar east-west connecting railway overbridge.
✅ Flyover at Sion railway station.
✅ Flyover from Ratnagiri Junction to Santosh Nagar on the Film City road in Goregaon East as part of the Goregaon-Mulund Link Road (GMLR) project.
DCM Sunetra Ajit Pawar, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Adv. Ashish Shelar, Mumbai Mayor Ritu Tawde, Deputy Mayor Sanjay Ghadi and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध उड्डाण पुलांचे लोकार्पण (ऑनलाईन).
✅ विद्याविहार पूर्व-पश्चिम जोडणारा रेल्वेपूल
✅ शीव रेल्वेस्थानक येथील उड्डाणपूल
✅ गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी जंक्शन ते चित्रनगरी मार्गावरील संतोष नगरपर्यंतच्या उड्डाणपूल
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से बृहन्मुंबई महानगरपालिका के विभिन्न फ्लाईओवरों का लोकार्पण (ऑनलाइन)।
✅ विद्याविहार पूर्व-पश्चिम को जोड़ने वाला रेलवे पुल
✅ सायन रेलवे स्टेशन स्थित फ्लाईओवर
✅ गोरेगांव-मुलुंड लिंक रोड परियोजना के अंतर्गत गोरेगांव पूर्व में रत्नागिरी जंक्शन से फिल्म सिटी मार्ग पर स्थित संतोष नगर तक का फ्लाईओवर
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री एड. आशिष शेलार, मुंबई की महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕑 2.05pm | 22-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. २.०५ वा. | २२-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 109
CMO Maharashtra Tweets:
रसायन उद्योगाच्या विकासाला नवी गती; महाराष्ट्राचे स्वतंत्र धोरण लवकरच!
केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे 'India Chem 2026' चे उदघाटन पार पडले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशाच्या रसायन उद्योगात महाराष्ट्राचे मोठे योगदान असून राज्यात सुमारे 3600 उद्योग कार्यरत आहेत. देशाच्या रसायन क्षेत्रातील सकल मूल्यवर्धनात महाराष्ट्राचा 19%, तर निर्यातीत 17% वाटा असून राज्यात पेट्रोकेमिकल्स, विशेष रसायने, कृषी रसायने आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील उद्योगांची मजबूत परिसंस्था विकसित झाली आहे.
वाढवण बंदराच्या परिसरात पालघर येथे भव्य रसायन पार्क उभारण्यासाठी 2500 ते 5000 एकर जमीन संपादित करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र सरकार रसायन उद्योगासाठी स्वतंत्र आणि विशेष धोरण तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते पूर्ण होईल. या धोरणातून उद्योगांच्या गरजा, भविष्यातील गुंतवणूक आणि उद्योगस्नेही वातावरणनिर्मितीला प्राधान्य दिले जाणार आहे.
महाराष्ट्रात बल्क ड्रग पार्क उभारून औषधनिर्मिती क्षेत्रासाठी सक्षम औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असून, त्याद्वारे जेनेरिक औषधनिर्मितीत भारताचे जागतिक स्थान अधिक बळकट करण्यासह मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
तळोजा आणि नवी मुंबई येथे विशेष रसायने, पॉलिमर्स व औद्योगिक रसायने, तारापूर आणि पालघरमध्ये रासायनिक प्रक्रिया, औषधनिर्मिती व रंगद्रव्ये, तर पाताळगंगा आणि रोहा येथे पेट्रोकेमिकल्स व सेंद्रिय रसायनांशी संबंधित उद्योग विकसित झाले आहेत. तसेच लोटे परशुराम, कुरकुंभ आणि विदर्भातील बुटीबोरी येथेही रसायन उद्योगाची मजबूत परिसंस्था निर्माण झाली आहे. याशिवाय कोल गॅसिफिकेशनचे 5 महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रगत टप्प्यात असून बॅटरी तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संबंधित रसायन उद्योगांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
राज्यात गुंतवणूकदारांना सुलभ सेवा आणि आवश्यक परवानग्या उपलब्ध करून देण्यासाठी ‘मैत्री’ एकल खिडकी प्रणाली आणि ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या माध्यमातून उद्योगस्नेही व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येत आहे. सध्या राज्यातील रसायन उद्योगातून सुमारे 3,00,000 रोजगार निर्माण होत असून योग्य धोरणांच्या माध्यमातून रोजगार दुप्पट आणि गुंतवणूक तिप्पट करण्याची क्षमता असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टात रसायन उद्योग महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच जागतिक पुरवठा साखळीतील बदलांमुळे भारतासमोर नवीन संधी निर्माण झाल्या असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, गुजरातचे राज्यमंत्री प्रफुल पानशेरिया, फिक्की राष्ट्रीय पेट्रोकेमिकल्स समितीचे अध्यक्ष, एचएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभ दास, यूपीएलचे अध्यक्ष आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #IndiaChem2026
