oasis study point
رفتن به کانال در Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
نمایش بیشتر7 888
مشترکین
-1224 ساعت
-307 روز
-11630 روز
آرشیو پست ها
7 890
🇮🇳 सर्वोत्कृष्ट चित्ररथ 🇮🇳
---------------------------------
👉 प्रजासत्ताक दिनाला राजपथावर निघालेल्या परेडमध्ये उत्तर प्रदेशकडून राम मंदिराची प्रतिकृती उभारत चित्ररथ सादर करण्यात आला. हा चित्ररथाची यंदाचा 'सर्वोत्कृष्ट चित्ररथ' म्हणून निवड करण्यात आलीय.
7 890
*आरोग्य विभागाची परीक्षा राज्यात 28 फेब्रुवारी 2021 रोजी होणार; परीक्षेबाबत शासनाच्या महत्वपूर्ण सूचना प्रसिद्ध*
आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी राज्यात दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये अर्ज केलेले सर्व उमेदवार पात्र ठरविण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाच्या भरतीत ज्या विद्यार्थ्यांनी एस.ई.बी.सी.मधून अर्ज केले होते, त्या विद्यार्थ्यांना ई.डब्ल्यू.एस आरक्षणाचा लाभ शासनाच्या निर्णयानुसार घेता येईल परंतु याबाबत त्यांना परीक्षेच्या दिवसापर्यंत आर्थिकदृष्ट्या मागास प्रमाणपत्र सक्षम अधिकार्याकडून प्राप्त करून घ्यावे लागेल.
ज्या विद्यार्थ्यांनी ई.डब्ल्यू.एस आरक्षणाचा लाभ घेण्याबाबत पसंती कळविलेली नाही किंवा त्यांना सदर प्रमाणपत्र मिळाले नसेल अशा उमेदवारांची गणना खुल्या प्रवर्गात करण्यात येईल. त्यांना खुल्या प्रवर्गाच्या जाहिरातीत नमूद अटी लागू होणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी एस.ई.बी.सी प्रवर्गातून अर्ज करतांना 300 रुपये भरले असतील परंतु ज्यांना ई.डब्ल्यू.एस प्रमाणपत्र मिळणार नाही, त्यांनी 200 रुपये अतिरिक्त शुल्क परीक्षेच्या दिवसापूर्वी भरणे आवश्यक आहे व त्याची पावती जपून ठेवणे गरजेचे आहे.
परीक्षा शुल्क भरण्याबाबतची माहिती व परीक्षेच्या महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1.www.mahapariksha.gov.in
2.www.arogya.maharashatra.gov.in
*आरोग्य विभाग परीक्षा स्वरूप*
1.परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून ती 200 गुणांची आहे.
2.परीक्षेत प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असून शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत.
3.परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे
4.आरोग्य विभागातील तांत्रिक पदांसाठी आरोग्य विषयक 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारले जाणार आहेत तर मराठी,इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी यावर प्रत्येकी पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत.वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक या अतांत्रिक पदांसाठी इंग्रजी, मराठी,सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी यावर प्रत्येकी पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत.
5.गट क संवर्गातील पदांसाठी परीक्षेचा कालावधी दोन तासांचा आहे.
7 890
6) घड्याळात तीन वाजले आहेत. घड्याळातील तास व मिनिट या दोन काट्यांमध्ये किती अंशाचा कोन होईल ?
7 890
🏔सह्याद्रीच्या उपडोंगर रांगा🏔
👉 सातपूडा पर्वत रांगा⛰🏔
- नर्मदा व तापी नद्या वेगळ्या करते
👉 सातमाळा - अजिंठा पर्वत रांगा🏔🏔
- तापी व गोदावरी नद्या वेगळ्या करते..
👉 हरिश्चंद्र - बालाघाट पर्वतरांग🏔🏔
- गोदावरी व भिमा नद्या वेगळ्या करते.
👉 शंभू महादेव डोंगर रांग🏔🏔
- भिमा व कृष्णा नद्या वेगळ्या करते.
👉http://t.me/geographystudy
7 890
तलाठी ,ग्रामसेवक ,लिपिक, आरोग्यसेवक,अशा परीक्षासाठी pdf नोट्स , Question paper व इतर माहितीसाठी अत्यंत महत्त्वाचे telegram chanel join Kara.........
👉 https://t.me/joinchat/RAfJwTHJJpdwSGbr
