LetsUpp Marathi
رفتن به کانال در Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
نمایش بیشتر6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
6 624
👉 _*ब्रेकिंग न्यूज*_
_*...म्हणून पेटीएमवर 2% अतिरिक्त चार्ज!*_
पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केल्यास आता यूर्जसला 2 टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. 8 मार्चपासून हा नवा नियम लागूही करण्यात आला आहे. क्रेडिट कार्डमधून पैसे टाकल्यास 2 टक्के चार्ज लागत असला तरीही नेट बँकिंग आणि डेबिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकण्यास मात्र कोणताच चार्ज नसेल. दरम्यान, क्रेडिट कार्डमधून पैसे टाकल्यास तुम्हाला 2 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
पेटीएमवर क्रेडिट कार्डमधून एखादी वस्तू खरेदी किंवा बिल पेमेंट केल्यास कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही. छोट्या दुकानदारांसाठी पेटीएमने नोटाबंदीनंतर 0% प्लॅटफॉर्म फी सुरु केले होते. कारण की, त्यांनी जास्तीत जास्त पेटीएमचा वापर करावा. पण अनेक यूजर्स हे पेटीएमच्या माध्यमातून पैसे स्वीकारत होते. कोणतेही शुल्क न देता ते आपले पैसे बँकेत जमा करत होते. त्यामुळे पेटीएमने हा निर्णय घेतला.
पेटीएमकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, कंपनीला बँक ट्रांझॅक्शनसाठी मोठी किंमत द्यावी लागते. अनेकजण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरुन ते पुन्हा आपल्या बँक खात्यात टाकतात. त्यामुळे कंपनीला नुकसान सोसावे लागते. जेव्हा यूजर्स पेटीएमवरुन एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हाच कंपनीला फायदा होतो.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 जम्मू-काश्मीर - पुलवामा जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार, एकूण 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघेही लष्कर-ए-तोयबाचे
👉 नवी दिल्ली - अंतराळात 104 उपग्रह पाठवून जागतिक विक्रम केल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष यांच्याकडून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) संशोधकांचे केले अभिनंदन
👉 नवी दिल्ली - 10 रुपयांची नवीन नोट लवकरच चलनात दाखल होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या संदर्भात केली घोषणा
👉 नवी दिल्ली - क्रेडिट कार्डच्या माध्यमातून Paytm वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यास आता यूर्जसला 2 टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार
👉 नवी दिल्ली - 'सैफुल्लाहच्या वडिलांचा आम्हाला अभिमान वाटतो', राजनाथ यांचं संसदेत निवदेन
👉 भोपाळ - ऊज्जैन पॅसेंजर ट्रेन स्फोटप्रकरणी कानपूरहून दोघांना अटक, एटीएसची कारवाई, अतिरिक्त महासंचालक दलजीत चौधरींची माहिती
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 वॉशिंग्टन - अमेरिका प्रांतातील कैंजसचे गर्व्हनर सॅम ब्राऊनबॅक यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागील महिन्यात भारतीय नागरिकांवर झालेल्या हल्ल्याबाबत दिलगिरी व्यक्त केली
-----------------------------------------------------------
बॉलीवुड अभिनेता सलमान खान मोबाइल निर्मितीच्या क्षेत्रात... जाणून घेण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/74P14p
-----------------------------------------------------------
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 चेन्नई - माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आर. के. नगरच्या जागेसाठी 12 एप्रिलला पोटनिवडणूक, 17 एप्रिलला मतमोजणी
👉 यवतमाळ - मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण मी स्वत: भिकारी होणार नाही, शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे वादग्रस्त वक्तव्य
👉 नाशिक - महापौर निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहणार, भाजपचा महापौर होण्याचा मार्ग अधिक सुकर,काँग्रेसने उमेदवार न दिल्यास बिनविरोध निवडीची शक्यता
👉 अमरावती - महापौरपदी भाजपच्या संजय नरवणे यांची निवड, उपमहापौरपदी भाजपच्या संध्या टिकले यांची नियुक्ती
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - भाजपचे आमदार प्रशांत परिचारक दीड वर्षांसाठी निलंबित, परिचारकांच्या चौकशीसाठी समिती स्थापन
👉 नाशिक - सटाणा तालुक्यातील जोरण येथील तरूण शेतक-याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या, नितीन जगन्नाथ बेड़ी (23) असे मृत तरूणाचे नाव
👉 जालना - परतूर तालुक्यातील आष्टी येथे राष्टवादी कांग्रेस नेत्याच्या घरावर अवैध सावकारी प्रकरणी निबंधक विभागाचा छापा
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28929.13, निफ्टी : 8927.00, सोने भाव : 28,475 (प्रतितोळा), चांदी : 41,117 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 मुंबई - आता तुम्हाला व्हॉट्सअॅपवर जाहिरातींसारख्या कटकटचा सामना करावा लागू शकतो, व्हॉट्सअॅपकडून याबाबत अधिकृत घोषणा नाही. मात्र, कंपनीने या बाबतीत चाचणी सुरू केली असल्याचे वृत्त राउटर्सने दिले
🎯 खेळ घडामोडी :
👉 नवी दिल्ली - बंगळुरु कसोटीतील डीआरएस वादाप्रकरणी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही : आयसीसी
👉 भारतीय महिला आइस हॉकी टीमने इतिहास रचला, फिलिपाईन्सचा 4-3 ने पराभव करत एशियन चॅम्पियनशीपमध्ये पहिल्यांदाच विजय मिळविला
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 लॉस एंजिलिस - दिग्दर्शक जेए बयोना यांनी आपला चित्रपट 'ज्युरासिक वर्ल्ड 2' चा फर्स्ट लुक एका फोटोच्या माध्यमातून केला जाहीर, या फोटोत एक मोठं संग्रहालस दिसतंय
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 तुम्हाला ताजेतवाने करणाऱ्या टिप्स
Let's Up Tips & Tricks
हल्ली धावपळ वाढलीय त्यामुळे स्वत:साठी वेळ काढणंही मुश्किल होऊन बसलंय. म्हणूनच तुम्हाला काही मिनिटातच ताजेतवाने करणाऱ्या महत्वाच्या टिप्स देत आहोत...
🎯 स्कीन पर्फेक्ट
👉 दिवसा : तुम्ही मेकअप नसेल केला तर 2-3 वेळा आपला चेहरा पाण्याने धुवा. त्यामुळे चेहर्यावर प्रसन्नता कायम राहील. तेलकट असल्यास त्वचेला टिश्यू पेपरने पुसावे. त्यामुळे चेहर्यावर अतिरिक्त ऑईल जमणार नाही.
👉 रात्री : रात्री बाहेर जायचे असेल तर फेसवॉशने चेहरा चांगल्या प्रकारे धुवा. मग शाईन फ्री फाऊंडेशनचे वापर करा. झोपण्याअगोदर इक्सफोलिएटिंग फॅसवॉशने चेहरा धुऊन नाइट क्रीम लावावे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 ब्युटी चीक
👉 दिवसा : दिवसा तुम्ही पूर्ण चेहर्यावर मेकअप नाही केला तरी काही हरकत नाही, गालावर हलका मेकअप करून चेहर्याचे सौंदर्य वाढवू शकता. ब्लशच्या हलक्या व सॉफ्ट शेड किंवा ब्रॉजिंग पावडरद्वारे चेहर्याला नॅचरल लुक देऊ शकता.
👉 रात्री : रात्रीच्या वेळेस गालावर डार्कशेडचे ब्लश लावावे किंवा ब्रॉजिंग पावडर लावावी. पण हे योग्य प्रमाणात लावावे. अन्यथा चेहर्यावरची चमक निघून जाऊ शकते.
🎯 दातांचे सौंदर्य
👉 दिवसा : बाहेर जाण्याअगोदर माउथ वॉश घ्यावे. तुमचे दात चमकत नसतील तर लिंबाच्या सालांना हलक्या हाताने दातांवर घासावे.
👉 रात्री : झोपण्याआधी ब्रश जरूर करा. पार्टीत जाण्याअगोदर माउथ वॉशचा घ्यावा.
🎯 ओठांचे सौंदर्य
👉 दिवसा : वेगळा लुक देण्यासाठी ओठांवर नॅचरल शेडच्या लिप ग्लॉसचा वापर करावा. लिप पेंसिलद्वारे आऊट लाइन बनवून त्यात लिप ग्लॉस लावा. वेळ असेल तर लिपिस्टिकसुद्धा लावू शकता.
👉 रात्री : रात्रीच्या वेळेस तुम्ही रंगाशी खेळू शकता. रेड, ब्राइट पिंक, ऑरेंज, पर्पल, ब्राउन किंवा तीन-चार शेड्स एकत्र करूनसुद्धा लावू शकता. एक्सट्रा लिपिस्टिकला ब्लॉटिंग पेपरद्वारे जरूर काढावे.
🎯 डोळ्यांसाठी
👉 दिवसा : दिवसा डोळ्यांना डिफाइन करण्यासाठी आय क्रीम किंवा जेलचा वापर केला पाहिजे. मोठे डोळे दाखवण्यासाठी मस्कराचा वापर करू शकता, त्याचप्रमाणे आकर्षकतेसाठी ग्रे, ब्राउन, ब्लॅक, ब्लु कुठल्याही कलरचे आय शॅडो लावू शकता.
👉 रात्री : ब्रो बोन वर हाय लायटर लावावे आणि लायनर लावायला विसरू नका.
🎯 सॉफ्टी परफ्यूम
👉 दिवसा : दिवसा हलक्या परफ्युमचे वापर करा. परफ्युमचा प्रभाव जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी पल्स पॉइंट, मनगट, कानाखाली, मान आणि खांद्यावर लावावे.
👉 रात्री : रात्रीच्या वेळेस तुम्ही उग्र परफ्यूम वापरू शकता.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - गतवर्षीसारखाच यंदाही मान्सून अपेक्षेप्रमाणे बरसणार, ‘अल निनो’चा परिणाम होणार नाही असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला
👉 नवी दिल्ली - रिलायन्स जिओने नवनवे रेकॉर्ड केले असले तरी कंपनीने सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याची माहिती समोर
👉 नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून देशभरात सुरु होणार
👉 नवी दिल्ली - नागरिकांचे व्हॉटसअॅप मेसेज अमेरिकेची सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी हॅक करत असल्याचा विकिलिक्सचा खुलासा
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला शहरात असलेल्या एका अनाथाश्रमाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 19 मुलींचा मृत्यू झाला असून 12 हून अधिक जखमी
🎯 राजकीय घडामोडी :
👉 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील झालेल्या मतदानात 60 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
👉 मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात एकूण 22 विधानसभा मतदारसंघांसाठी विक्रमी 86 टक्के मतदान
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 पुणे - ‘विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपचे हस्तक आहेत,’ असा थेट आरोप त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे-पाटील यांनी केला
👉 परळी - महिला व पुरुष अशा दोघांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना, मयतांची अद्याप ओळख पटलेली नसून मयत प्रेमीयुगुल असल्याचा प्राथमिक अंदाज
👉 सांगली - म्हैसाळ गर्भपात प्रकरणी विजापूर मधून डॉ. रमेश व्यकटेश देवगीकर या आणखी एका डॉक्टरला 2 सोनोग्राफी मशीनसह अटक
👉 पुणे - चेन्नई-कुर्ला एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांकडून 4 कोटी 38 लाख रुपयांचे साडे पंधरा किलो सोने जप्त
🎯 खेळ घडामोडी :
👉 बंगळुरु - विराट कोहली याला तिस-यांदा बीसीसीआय 2017 चा पॉली उम्रगीर अवॉर्ड तर, आर. अश्विन याला दिलीप सरदेसाई हे मानाचे अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले
👉 लंडन - ऑल इंग्लंड ओपनमध्ये भारताच्या पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी, पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या मॅट पॉलसेनवर केली 21-10, 21-11 ने मात
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याने 'महिला दिना' निमित्त वादग्रस्त ट्विटची परंपरा कायम ठेवली, महिलांनी अभिनेत्री सनी लिओनीचा आदर्श समोर ठेवा असे अजब ट्विट त्याने केले
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 सीमा सुरक्षा दलात भरती
Let's Up Job Updates
पोस्ट : असिस्टंट कमाण्डन्ट (Works) - जागा : 07 - पात्रता : सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी
पोस्ट : असिस्टंट कमाण्डन्ट (Electrical) - जागा : 08 - पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी
शारीरिक पात्रता :
पुरुष - उंची : 165 cm I छाती : 81 cm I वजन : 50 kg
महिला - उंची : 157 cm I वजन : 46 kg
वय : दि. 01 एप्रिल 2017 रोजी 35 वर्षे
अर्ज पोहोचण्याची मुदत : दि. 01 एप्रिल 2017
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृपया जाहिरात पहावी
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/Fa7cbw
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 नॉर्थन कोलफिल्ड लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा
पोस्ट : फिटर - जागा : 240 - पात्रता : 08 वी/10 वी उत्तीर्ण, ITI
पोस्ट : वेल्डर - जागा : 48 - पात्रता : 08 वी/10 वी उत्तीर्ण, ITI
पोस्ट : इलेक्ट्रीशियन - जागा : 144 - पात्रता : 08 वी/10 वी उत्तीर्ण, ITI
वय : दि. 01 एप्रिल 2017 रोजी 16 ते 24 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager(HRD), CETI, NCL HQ, Singrauli (M.P.) 486889
अर्ज पोहचण्याची मुदत : दि. 13 एप्रिल 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/ERMy0Y
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/62isP6
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
🎯 काळाची गरज ; आरोग्य विमा
Let's Up Useful Info
आपल्या आजुबाजूच्या गोष्टी झपाट्याने बदलत चालल्या आहेत. त्यामुळे आरोग्याच्या सोयीसुविधांची उणीव भासत नाही पण अपघात, आजार इ. संकटंही तेवढीच वाढली आहेत. त्यामुळे अशा अडचणीच्या वेळी तुमच्या मदतीला येतो तो आरोग्य विमा, म्हणून हि उपयुक्त माहिती खास तुमच्यासाठी...
🎯 का गरज आहे आरोग्य विम्याची
👉 बदलती जीवनशैली, ताणतणाव, व्यायामाचा अभाव यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.
👉 वातावरणातील प्रदुषण, फळे आणि भाज्यांवर केलेली रासायनिक फवारणी, कृत्रिमरित्या पिकवलेली फळे, अन्नधान्यात आढळणारी भेसळ आणि घसरलेला दर्जा, इत्यादींमुळे आरोग्यावर परिणाम होतो.
👉 घरातील आर्थिक संकल्पामध्ये (बजेट) आरोग्याला प्राधान्य द्यायला हवे. सर्वसामान्यांना वैद्यकीय खर्च खिशाला परवडणारा राहिलेला नाही. त्यासाठी आरोग्यासाठी आर्थिक तरतूद करणे महत्वाचे आहे.
👉 घरातील वयोवृद्ध, आजारी व्यक्ती अचानक रुग्णालयात दाखल झाल्यावर घरातल्या कमावत्या व्यक्तीवर आर्थिक भार येतो. त्यामुळे आरोग्य विमा असल्यास आर्थिक मदत होते.
👉 एका संशोधनातून असे निष्कर्ष निघाले कि, ‘आरोग्य विमा असलेल्या रुग्णांना अत्याआधुनिक व चांगले उपचार, सेवा आणि सुविधा मिळाल्या आहेत.’
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आरोग्य विम्याचे प्रकार
ढोबळमानाने आरोग्य विम्याचे खालील प्रकार आहेत…
👉 जनरल इन्शुरंन्स कंपन्यांच्या आरोग्य विमा पॉलिसी
👉 हेल्थ इन्शुरंन्स कंपन्यांच्या आरोग्य विमा पॉलिसी
👉 लाईफ इन्शुरंन्स कंपन्यांच्या आरोग्य विमा पॉलिसी
👉 केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विमा योजना
🎯 आरोग्य विम्याचे नवीन नियम
भारतीय विमा नियामक आणि विकास मंडळ (आयआरएडीएआय) यांनी 2013 मधील नियम बदलून 2016 चे (आरोग्य विमा) नियम घोषित केले आहेत. या नियमांमुळे झालेले 6 महत्वाचे बदल खालील प्रमाणे आहेत.
👉 कुठल्याही आयुर्विमा (आधी फक्त मुदत योजना) आणि आरोग्य विमा ह्यांना जोडून कॉम्बी योजना बनविता येते
👉 लाभ योजनांमध्ये एकत्रित बोनससाठी परवानगी
👉 वेलनेसचा लाभ घेता येतो
👉 विमा कंपन्यांना पायलट प्रॉडक्ट सुरू करण्यास संगितले
👉 मानक घोषणापत्राचे प्रारूप बदलू शकते, आणि विमा कंपन्या आपल्या पद्धतीने त्याची रचना करू शकतात
👉 आयुर्विमा कंपन्यांना क्षतिपूर्ती आधारित उत्पादने देता येणार नाही
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 दुभत्या जनावरांचे पोषण
Let's Up Agri Katta
शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचा व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई, गावठी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी पाळल्या जातात. पण यामध्ये प्रामुख्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. गाई-म्हशींना त्यांच्या दूध उत्पादन क्षमतेनुसार सकस, संतुलित आहार देणे गरजेचे आहे. त्यांना पाणी, प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे ही पोषक घटके मिळणे आवश्यक असते. पण सर्वसामान्यपणे जनावरांना वाळलेला चारा, उपलब्ध असल्यास हिरवा चारा, शक्य असल्यास पेंड अशा प्रकारचा आहार दिला जातो. यामुळे थेट दूध उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादन घटते. जर संतुलित खाद्य, हिरवा, तसेच वाळलेला चारा (कुट्टी करून) दूध उत्पादनाच्या प्रमाणात दिल्यास अपेक्षित दूध उत्पादन मिळू शकते.
दुभत्या जनावरांच्या सामान्य पोषणासाठी त्यांना 1 ते 1.5 किलो खुराक, 15 ते 20 किलो हिरवी तर 4 ते 5 किलो वाळलेली वैरण द्यावी लागते. मात्र जास्त दूध उत्पादन हवे असल्यास, पुढील प्रत्येक 2.5 लिटर साठी 1 किलो जास्तीचे पशुखाद्य द्यावे लागते.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
आवश्यक चाऱ्याचे प्रकार :
👉 पाणी : जनावरांना दिवसभरात 80 ते 120 लिटर पाणी लागते. एक लिटर दूध निर्माण होण्यासाठी 4 ते 5 लिटर पाण्याची आवश्यकता असते.
👉 खनिजद्रव्य किंवा क्षार : जनावरांच्या शरीराची वाढ होण्यासाठी, झीज भरून काढण्यासाठी, रोग प्रतिकारक शक्तीसाठी तसेच दूध वाढवण्यासाठी जनावरांना कॅल्शियम, फोस्फरस, सोडीयम, झिंक यांसारख्या क्षारांची गरज असते.
👉 प्रथिने : संतुलित खाद्यात कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थांसोबत प्रथिनांचीही आवश्यकता असते. शरीरातील पेशींच्या वाढीसाठी स्नायू तयार करण्याकरिता प्रथिनांची गरज भासते. द्विदल धान्यात उदा. सोयाबीन, भुईमूग, हरभरा, सूर्यफूल, जवस, तीळ इ. तेलबियांपासूनही भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात. प्रथिनांच्या प्राणीजन्य स्त्रोतांमध्ये फीश मिल, मीठ मिल इ. चा समावेश होतो.
👉 जीवनसत्त्वे : ही अल्प प्रमाणात लागतात; परंतु शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. उदा. अ, ब, क इत्यादी. अशा प्रकारे निरनिराळे अन्नघटक आहारात समतोल प्रमाणात एकत्र करून संतुलित खाद्य तयार करता येते. दूध देणार्या जनावरांकरिता संतुलित खाद्यात 16-18 टक्के पचनीय प्रथिने, 70 टक्के एकूण पचनीय पदार्थ आणि 17 टक्क्यांपेक्षा कमी तंतुमय पदार्थ असावेत.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 जागतिक महिला दिन ; काय प्रेरणा घ्यायची?
Let's Up Special Update
गेल्या काही वर्षांपासून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केलाय जातोय. जगभर प्रचंड उत्साहात वेगवेगळ्या संघटना हा कार्यक्रम पार पाडतात. आपणही सारे हा कार्यक्रम अत्यंत आनंदात, उत्साहात साजरा करतो, हे निर्विवान सत्य आहे. यात कुणालाही कुणाबद्दलही शंका असण्याचे कारण नाही. प्रश्न आहे कवळ हा जागतिक महिला दिन साजरा करून आम्हाला काय मिळणार आहे? आम्ही या दिवसाची आठवण का ठेवावी? आम्हाला यापासून काय प्रेरणा घ्यायची आहे?
जागतिक महिला दिन हा महिलांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाचा, दिलेल्या लढ्याचा ऐतिहासिक दिवस आहे. ज्या महिलांनी आपल्या आयुष्याचा क्षण न क्षण आपले अधिकार मिळविण्यासाठी खर्ची घातले, प्रचंड संघर्ष करून आपल्या आयुष्याचा क्षण न क्षण आपले अधिकार मिळविण्यासाठी खर्ची घातले, प्रचंड संघर्ष करून आपल्या झोळीत एक उज्ज्वल भविष्य टाकले, त्यांचे स्मरण करणे आणि त्यांच्या पायवाटेनी पुढे चालणे हे आमच्या सामाजिक संघटनेचे आज आद्य कर्तव्य असावे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
सामाजिक संघटनांनी कार्यक्रमांची रेलचेल करण्यापेक्षा ज्या महिलांच्या आयुष्यात काही पोकळी निर्माण झाली असेल, ज्या महिलांना मार्ग सूचत नसेल, ज्यांना मागदर्शनाची गरज असेल, अशा व्यक्ती शोधून त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना सामाजिक कार्याची दिशा दाखविणे ही खरे तर जागतिक महिला दिनाची प्रेरणा ठरेल.
विविध कारणांमुळे एकट्या पडलेल्या महिलांना सामाजिक संस्थांनी समाविष्ट करून त्यांना कोणतेतरी विधायक काम सोपविण्यात पुढाकर घेण्यास हरकत नाही. आजार्यांची सुश्रृषा करणे, कॅन्सरग्रस्त रोगी, निराधार महिला आश्रम, वृद्धाश्रम, अनाथाश्रम अशा अनेक गरजू ठिकाणांसाठी आपण आपल्या आयुष्यातला थोडासा जरी वेळ दिला, तरी बरेचसे प्रश्न समाजातले आपोआप कमी होतील आणि खर्या अर्थी जागतिक महिला दिन साजरा करण्यासारखे होईल…
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 Let's Up Status Katta
👉 मंजिले बहुत है और अफ़साने भी बहुत है,
जिंदगी की राह में इम्तिहान भी बहुत है,
मत करो दुःख उसका जो कभी मिला नही
दुनिया में खुश रहने के बहाने भी बहुत है।
👉 आज मेरा दोस्त मुझसे रूठा है
मेरे सब्र का बाँध भी अब टूटा है
वो मुझे मिला ही कब था इस जमाने में
जो मैं ये सोंचता हूँ की वो मुझसे छूटा है।
👉 खूबसूरत सा एक पल किस्सा बन जाता है
जाने कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है ।
कुछ लोग जिंदगी मे मिलते है ऐसे,
जिससे कभी ना टूटने वाला रिस्ता बन जाता है।
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 डर मुझे भी लगा फांसला देख कर,
पर मैं बढ़ता गया रास्ता देख कर,
खुद ब खुद मेरे नज़दीक आती गई
मेरी मंज़िल मेरा हौंसला देख कर.!
👉 जो मुस्कुरा रहा है, उसे दर्द ने पाला होगा…
जो चल रहा है, उसके पाँव में छाला होगा…
बिना संघर्ष के इन्सान चमक नही सकता, यारों…
जो जलेगा उसी दिये में तो, उजाला होगा।
👉 कहने वालों का कुछ नहीं जाता,
सहने वाले कमाल करते हैं
कौन ढूंढें जवाब दर्दों के,
लोग तो बस सवाल करते हैं...।
👉 जीने की ख्वाहिश में हर रोज़ मरते हैं,
वो आये न आये हम इंतज़ार करते हैं,
झूठा ही सही मेरे यार का वादा है,
हम सच मान कर ऐतबार करते हैं...
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - आधार कार्ड नसेल तर कुणालाही सरकारी सुविधेपासून वंचित ठेवू नये, केंद्र सरकारचा आधार कार्ड नसणाऱ्यांना दिलासा
👉 लखनऊ - लखनऊमधील ठाकूरगंज भागात लपलेला संशयित दहशतवादी सैफुल्ला हा एटीएसने केलेल्या कारवाईत ठार, 11 तासांहून अधिक वेळ सुरु होती चकमक
👉 मुंबई - उद्योजकांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वात कमी असणाऱ्या देशांमध्ये भारताची गणना, मास्टरकार्डने केलेल्या सर्वेक्षणात माहिती उघड
👉 बंगळुरू - भारतातील आयटी क्षेत्रात मध्यम स्तरावर काम करणाऱ्या तब्बल 14 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची दाट शक्यता
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 वॉशिंगटन - अमेरिकेने जारी केली प्रवासाविषयी सूचना, या सूचनेनुसार अमेरिकन नागरिकांनी पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांग्लादेश या देशांमध्ये प्रवासास जावू नये सोबतच भारतात प्रवास करणे ही धोक्याचे
🎯 राजकीय घडामोडी :
👉 लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम टप्प्यातील एकूण 40 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाला सुरुवात
👉 मुंबई - बाळासाहेब ठाकरे स्मारक सुधारणा विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर, शिवसेनेचे मंत्री, आमदार सभागृहात नसताना विधेयक मंजूर
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा पहिला पेपर राज्यभरात सुरळीत पार पडला, व्हॉट्सअॅप व्हायरल नाहीच
👉 नागपूर - पाऱ्यात वाढ होऊन उन्हाळ्याची चाहूल लागत असताना विदर्भाला अचानक अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका
👉 वाशीम - रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील एका 32 वर्षीय दलित महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिला पेटवून दिले, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
👉 नागपूर - अवैध धंद्यांवर अपेक्षित कारवाई न करणे आणि कर्तव्यात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत 2 पोलीस उप निरीक्षकांसह 7 कर्मचाऱ्यांचे निलंबित
🎯 खेळ घडामोडी :
👉 नवी दिल्ली - फुटबॉलसारखे आता क्रिकेटच्या खेळातही रेड कार्ड वापरता येणार, त्यामुळे क्रिकेट सामन्यातील बेशिस्त खेळाडूंना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवण्याच्या अधिकार पंचांना मिळणार
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - रणबीर कपूर चक्क सात दिवस भोपाळच्या तुरुंगात बंद राहणार, घाबरू नका ‘कहानी की डिमांड’ म्हणून तो हा तुरुंगवास भोगणार
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये भरती
Let's Up Job Updates
पोस्ट : अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (विद्युत) - जागा : 02 - पात्रता : विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा, MS-CIT, मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
पोस्ट : लेखा परीक्षण व लेखा सेवा सहाय्यक लेखापाल - जागा : 05 - पात्रता : वाणिज्य शाखेची पदवी(M.COM/B.COM), ICWA किंवा CA, MS-CIT, मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
पोस्ट : नगर पंचायत लेखापाल - जागा : 04 - पात्रता : वाणिज्य शाखेची पदवी(M.COM/B.COM), ICWA किंवा CA, MS-CIT, मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
पोस्ट : नगर पंचायत लेखापरीक्षक - जागा : 04 - पात्रता : वाणिज्य शाखेची पदवी(M.COM/B.COM), ICWA किंवा CA, MS-CIT, मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
पोस्ट : अग्नीशमन सेवा संवर्ग - जागा : 10 - पात्रता : राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांचा उपस्थानक अधिकारी अभ्यासक (Sub Officers) कोर्स उत्तीर्ण
वय : दि. 31 ऑगस्ट 2016 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
फी : 300 रुपये (मागासवर्गीय 150 रुपये)
परीक्षा : दि. 26 मार्च 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 16 मार्च 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/vFKTuQ
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/b76dH2
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे येथे भरती
पोस्ट : सांख्यिकी सहायक /सांख्यिकी अन्वेषक - जागा : 04 - पात्रता : गणित /संख्याशास्त्र प्रमुख विषय घेऊन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विज्ञान शाखेचा पदवीधर, MS-CIT
पोस्ट : लेखापाल - जागा : 01 - पात्रता : वाणिज्य शाखेचा पदवीधर, MS-CIT, Tally
वय : दि. 05 मार्च 2017 रोजी 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व शालेय आरोग्य, राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, राजाबहादूर मिल रोड, नायडू हॉस्पिटल कंपाऊंड, रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे, पुणे - 411001
अर्ज पोहचण्याची मुदत : दि. 15 मार्च 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/fbr47f
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 'SMART’ म्हणजे तरी नेमकं काय?
Let's Up Knowledge Katta
'SMART’ म्हणजे काय? हे टायटल वाचूनच विचारात पडला असाल ना! पण आपल्या दैनिंदिन जीवनात 'SMART’ या शब्दाचा विचार आपण अनेक वेळेस करत असतो. अनेकदा आपण 'SMART’ या शब्दाचा अर्थ हुशार, चुणचुणीत, चलाख असा घेतो. अर्थात तो बरोबरही आहे. पण हुशार असणं म्हणजे तरी नेमकं काय? तेच 'SMART’ या इंग्रजी शब्दातल्या प्रत्येक अक्षराचा अर्थ पाहुयात...
👉 S For Specific : Specific म्हणजे तुम्ही जे काम करायचं ठरवलं आहे त्याची व्याप्ती आणि अर्थ समजावून घेऊन ते मोजक्या शब्दांत, आकड्यांत, तारखेत व्यक्त करा व ते लिहून काढा. यामुळे तुम्हाला काय करायचं याचा नीट आराखडा तयार होतो तसेच तुम्ही तुमच्या कामापासून भरकटण्याचा संभव कमी होतो. तुमच्या कामावरही फोकस राहतो.
👉 M For Measurable : M म्हणजे Measurable थोडक्यात तुम्हाला नक्की काय साध्य करायचंय याची मोजणी करा. तुम्हाला जे काम करायचंय किंवा तुमचं ध्येय आहे ते फक्त बोलण्यापुरतं ठेऊ नका त्याला मोजता येईल अशा पद्धतीत व्यक्त करा. उदा - ‘भरपूर श्रीमंत व्हायचंय’, हे ध्येय नाही तर ‘मला 1 मार्च 2018 पर्यंत 1 कोटी रुपये मिळवायचे आहेत’, हे ध्येय आहे. ध्येय मोजण्यासारखे ठरविल्यामुळे, त्यातील पायर्या, विभाग ठरविता येतात, मोजता येतात.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 A For Achievable : म्हणजे जे काम ठरवलं आहे किंवा तुमचं ध्येय आहे, ते वास्तविकतेला धरून असावं उगीच सागरावर पूल बांधण्याचा प्रयत्न करू नये. सुरवात करताना तुमच्या आवाक्यातील ध्येय ठेवा यामुळे हे ध्येय प्राप्त झाल्यास तुमचा उत्साह वाढेल व पुढच्या टप्प्यासाठी तयारी कराल. तुमच्या मर्यादा लक्षात घेऊन तुम्ही जास्तीत जास्त काय चांगलं करू शकता त्यामुळे तुमचं ध्येय Achievable असू द्या.
👉 R For Relevant : तुम्ही जे काम ठरवलं आहे किंवा तुमचं ध्येय आहे हे तुमच्या क्षेत्राशी संबंधित असायला हवं. यामुळे यशाची खात्री असते. जर अन्य क्षेत्रात प्रयत्न कराल तर तुमचा वेळ व परिश्रम वाया जाऊ शकतो, कारण त्या क्षेत्राचं पुरेसं ज्ञान तुमच्याकडे नसत. त्यामुळे तुमचे ध्येय हे Realistic असले पाहिजे.
👉 T For Time bond : प्रत्येक ध्येयाला किंवा कामाला वेळेची मर्यादा असायला हवी. कोणतीही गोष्ट फक्त साध्य करू असं म्हणून चालत नाही तर त्यासाठी वेळ ठरवणे आवश्यक असतं. यामुळे तुमच्या ध्येय गाठण्यातील टप्पे ठरवणे सोप्पे होतात. त्यामुळे तुमच्या ध्येयाला Time bond असू द्या.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - बाटलीबंद मिनरल वॉटर आता संपूर्ण देशात एकाचे दराने विकणे बंधनकारक, केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी केला निर्णय जाहीर
👉 नवी दिल्ली - रामजस महाविद्यालय आंदोलनप्रकरणी पोलिसांवर कारवाईची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली
👉 नवी दिल्ली - पनामा पेपर लीक प्रकरणाचा अहवाल तपासल्यानंतर एसआयटी चौकशीची आवश्यकता आहे किंवा नाही त्याचा निर्णय घेऊ असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले
👉 भोपाळ-उज्जैन एक्स्प्रेस स्फोट, किरकोळ जखमींना 25 हजार रुपये तर गंभीर जखमींना 50 हजार रुपये नुकसानभरपाईची मध्य प्रदेश सरकारची घोषणा
👉 गडचिरोली सत्र न्यायालयाने दिल्ली विद्यापीठाचे प्रा. साईबाबा आणि 3 आरोपींना सुनावली जन्मठेप, अन्य एक आरोपी प्रशांत राहीला 10 वर्षांची सक्तमजुरी
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 न्यूयॉर्क - अमेरिकेने इराकच्या नागरिकांना लागू केलेली प्रवेशबंदी उठवली, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कट्टरपंथीय मुस्लिमांच्या प्रवेशबंदीबाबत सुधारित निर्णय केला जाहीर
👉 श्रीलंकन नौदलाने हत्या केलेल्या मच्छीमाराच्या कुटुंबीयांना तामिळनाडू सरकारची 5 लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची घोषणा, जखमींना 1 लाख रुपये
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मुंबई - शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार महाडेश्वर यांच्यावर आणखी एक आरोप, नियमबाह्य पद्धतीने निवडणूक लढवण्याचा आरोप, निवडणूक काळात पगार घेतल्याचा दावा
👉 मुंबई - भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुख्यमंत्री आणि आशिष शेलारांच्या उपस्थितीत उत्तनमध्ये दोन दिवसांचं प्रशिक्षण
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - मुंबईतील जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेत आणलेले पेंग्विन लवकरच सर्वसामान्यांना पाहायला मिळणार, या पेंग्विनची क्वारंटाईन कक्षातून प्रदर्शनी भागात रवानगी
👉 नवी मुंबई - दरोडेखोर समजून ग्रामस्थानी पोलिसांना चोपले, नवी मुंबई पोलिसांसोबत उलवेमध्ये घडला प्रकार, जखमी पोलिस रुग्णालयात दाखल
👉 जळगाव - दहावीच्या मराठीच्या पेपर दरम्यान 13 कॉपी बहाद्दरावर कारवाई, चाळीसगाव तालुक्यातील वाघळी परीक्षा केंद्रावर 12 तर चिनावल परीक्षा केंद्रावर 1 विद्यार्थ्यावर कारवाई
👉 जळगाव - 1 हजार रुपयांची लाच घेतांना पारोळा येथील सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रगेहाथ पकडले
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28999.56, निफ्टी : 8946.90, सोने भाव : 28,899 (प्रतितोळा), चांदी : 42,373 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 मुंबई - जिओचा डाउनलोड स्पीड 17.42 मेगाबाईट प्रती सेकंड (एमबीपीएस) झाला, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने दिली माहिती, तर डाउनलोड स्पीडच्या बाबतीत आयडिया दुसऱ्या तर एअरटेल तिसऱ्या क्रमांकावर
🎯 खेळ घडामोडी :
👉 बंगळुरु - दुस-या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, 112 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाची दाणादाण, 75 धावांनी केला पराभव, मालिकेत 1-1 ने बरोबरी
👉 भारतीय क्रिकेट संघाला मिळाला नवा प्रायोजक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ओप्पो कंपनीसोबत 5 वर्षांसाठी केला करार, एप्रिल 2017 पासून सुरू होईल करार
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा आगामी सिनेमा 'नूर' चा ट्रेलर रिलीज, सिनेमामध्ये सोनाक्षी एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
🎯 घरासमोरील अंगण सजवताना
Let's Up Tips & Tricks
असं म्हणतात घराची कळा अंगणावरून कळते. घर आतून कितीही सुंदर व आकर्षित असेल तर बाहेरून पाहणारा बाहेरील वातावरणातूनच त्याच मत ठरवत असतो. घर आतून सजविण्याच्या नादात आपण हमखास अंगणाकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे घर आतून सुंदर दिसण्यासाठी आपण जितके झटत असतो तितकेच ते बाहेरून सुंदर दिसणेही आवश्यक असते. त्यामुळे घरासमोरील अंगण सजवण्यासाठी या खास टिप्स तुमच्यासाठी...
👉 फुलझाडांच्या मदतीने बगीचा अधिक सुंदर बनवता येतो. सोबतच आकर्षक फुलझाडेही लावू शकता. तसेच कुंडयांवर पेटींग्जही करू शकता.
👉 ताण घालवण्यासाठी तसेच फ्रेश होण्यासाठी बगीचा फायदेशीर ठरतो. यामुळे बगिच्यामध्ये आकर्षक फर्निचर असणे गरजेचे आहे.
👉 आकर्षक दिवे हे तुमच्या अंगणाची शोभा वाढवतात. यामुळे तुमचा बगीचा संध्याकाळी भकास वाटणार नाही. तसेच आकर्षक डिझाईन्सचे गेट लावल्यास अंगण अधिक सुंदर दिसते.
👉 खास हिवाळयाच्या दृष्टीने बगिच्यात एका ठिकाणी शेकोटीची सोय असू द्यावी. यामुळे हिवाळ्यात तुमचं कुटुंब एकत्र बसून गप्पा मारू शकतं.
👉 बगिच्याला नैसर्गिक स्वरूप प्राप्त होण्यासाठी व मनाला शांतता वाटावी यासाठी घराच्या बगिच्यात एखादे लहान कृत्रिम तळे असू द्यावे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 किचन स्वच्छ ठेवण्याच्या काही टिप्स...
👉 किचनमध्ये जिथे कचर्याचा डबा ठेवला जातो तिथे सर्वात जास्त घाण व बॅक्टेरिया असतात. त्यामुळे ती जागा नियमितपणे फिनेल टाकून स्वच्छ करावी. कचऱ्याच्या डब्याला झाकण असू द्या.
👉 किचनमधील काचेवर, खिडकीवर व दरवाज्यावर धूळ व चिकट डाग जास्त असतात. सहजा सहजी ते निघत नाहीत. अशावेळी गरम पाण्यात पेपर बुडवून त्याने काच स्वच्छ करावी. याने ती जागा आरामात स्वच्छ होते.
👉 डायनिंग टेबलला स्वच्छ करण्यासाठी नीलगिरीच्या तेलाचा वापर करू शकता. कारण दररोजच्या जेवणामुळे टेबलामधून दुर्गंधी येत असते. नीलगिरीच्या तेलामुळे ही दुर्गंधी नाहीशी होते.
👉 मिक्सर वापरताना ते वापरून झाल्यास त्यावरील घाण साफ करून त्याला कव्हर घालून ठेवा. त्यामुळे त्यावर धूळ जमा होणार नाही.
👉 फ्रीजचे दार उकळलेल्या बटाट्याच्या सालींपासून स्वच्छ करू शकता.
👉 किचनमधील नळ चकचकीत करण्यासाठी त्यावर थोडेसे टूथपेस्ट लावा आणि गरम पाण्याने धुवून टाका.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 अॅपल 3 आयफोन लाँच करणार...
Let's Up Techno Katta
अॅपल यावर्षी 3 आयफोन लाँच करणार आहे. ‘आयफोन एक्स’, ‘आयफोन 7s’ आणि ‘आयफोन 7s प्लस’ अशी त्यांची नावे आहेत. यावर्षी अॅपलचा दहावा वर्धापन दिन आहे. त्यामुळे कंपनीकडून यूनिक आयफोन बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
रिपोर्टनुसार आयफोन एक्स किंवा आयफोन 8 मध्ये 5.8 इंच आकाराची स्क्रिन असेल. तर आयफोन 7 च्या तुलनेत या फोनचं स्टोरेज अधिक असेल. तर या फोनमध्येही आयफोन 7 प्रमाणेच ड्युअल कॅमेरा असेल. बॅटरी बॅकअप वाढवला जाऊ शकतो आणि होम बटणची जागा बदलली जाऊ शकते.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 स्वाईपचा एलीट सेन्स सादर
स्वाईप कंपनीने एलीट सेन्स हा स्मार्टफोन 7499 रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना सादर केला आहे. हे मॉडेल ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे. यात 5 इंच आकारमानाचा आणि 1280 बाय 720 पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल.
यातील कॅमेरे 13 आणि 8 मेगापिक्सल्स क्षमतांचे असून यात 2500 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. याची रॅम 3 जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 16 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 64 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 चीनच्या संरक्षण खर्चात 7 टक्क्यांची वाढ
Let's Up Current Affair
चीनच्या संरक्षण खर्चाचे आकडे आकाशाला भिडताना दिसत आहेत. अनेक देशांच्या चिंतेत त्यामुळे भर पडली आहे. चीनच्या संरक्षण खर्चात 2016 च्या तुलनेत 7 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून, ते आता 1.04 ट्रिलियन युआन (म्हणजेच 152 अब्ज डॉलर) वर पोहचला असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे आता भारताच्या तीनपट चीनचा संरक्षण खर्च झाला आहे.
चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती जाहीर केली. संरक्षणावरील एकूण खर्चापैकी 1.02 ट्रिलियन युआन हे केंद्रीय अर्थसंकल्पातून देण्यात येणार असल्याचेही वृत्तात म्हटले आहे. प्रथमच चीनच्या संरक्षण खर्चाच्या आकडेवारीने ट्रिलियन युआनचा टप्पा पार केला आहे. चीनच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील (जीडीपी) 1.3 टक्के भाग हा संरक्षणावर खर्च केला जाणार आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 हैदराबाद विमानतळ अव्वल...
दरवर्षी जगभरातील सर्वोत्तम विमानतळांची एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनलतर्फे (एसीआय) निवड केली जाते. ही निवड विमानतळावर मिळणा-या सुविधेच्या (एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी -एएसआय) आधारे केली जाते. यात विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येच्या आधारे विमानतळांची विभागणी केली जाते.
हैदराबादमधील जीएमआर आंतरराष्ट्रीय विमानतळाने 2016 मधील जगातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. 50 लाख ते दीड कोटी प्रवासी प्रति वर्ष या गटात हैदराबादने बाजी मारली आहे. तर दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळाने वर्षाला चार कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या गटात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
👉 मर्सिडीजने मागवल्या 10 लाख कार
कारमध्ये आग आणि ओव्हरहीट यामुळे होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेऊन मर्सिडीज कंपनीने जगभरातील 10 लाख कार परत मागवल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे अमेरिकेत सुमारे 75 हजार कारमध्ये ओव्हरहीटिंगची समस्या असल्याचे समोर आले होते.
मर्सिडीजने परत मागवलेल्या कारमध्ये सी क्लास, इ क्लास आणि सीएलए कार शिवाय जीएल आणि जीएलसी एययूव्हीचाही समावेश आहे. 2015 ते 2017 या काळातील या सर्व कार आहेत. अमेरिकेतूनच तब्बल 3 लाख 8 हजार कार परत येणार आहेत.
सुमारे 51 तक्रारी जगभरातून मर्सिडीजला कारला आग लागण्याच्या आल्या होत्या. यातील 30 प्रकरणे ही एकट्या अमेरिकेतील आहेत. परंतु, कंपनीला या दुर्घटनेत कोणतीही हानी झाल्याचे वृत्त कंपनीकडे आलेले नाही. मर्सिडीजने अमेरिकन सरकारला सोपवलेल्या कागदपत्रांमध्ये ओव्हरहिटिंगचे कारण सांगितले आहे. वारंवार कार सुरू केल्यामुळे ओव्हरहीटिंगची समस्या येते. यामुळे कारचे साहित्य वितळण्याची शक्यता असते. कंपनी या सर्व कारची दुरूस्ती करणार असून याचे शूल्क घेणार नाही.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 मस्त करिअर : ज्वेलरी डिझायनिंग
Let's Up Career Katta
आजच्या युगात वावरताना ट्रेंड्सनुसार तयार होणं, ही गरज बनलीय. पारंपरिक आणि आधुनिकता यांचा मिलाप साधणारे अनेक ट्रेंड्स रोज नव्याने ज्वेलरी इंडस्ट्रीत दाखल होत असल्याने ज्वेलरी डिझायनिंग हे करिअरचं एक दर्जेदार क्षेत्र म्हणून पुढे येत आहे...
नवीन कल्पना जन्माला घालणं आणि त्या कागदावर रेखाटणं ही ज्वेलरी डिझायनरची प्राथमिक कामं आहेत. या क्षेत्रात काम करायचं, तर शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणं आता गरजेचं बनू लागलं आहे. या प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला स्टोन कटिंग (हिरे, माणकं, पाचू हव्या त्या आकारानुसार कापून घेणं), त्यांना पैलू पाडणं आणि सोनं-चांदी-प्लॅटिनम आदी धातूंना पॉलिश करणं आदी सर्व बाबींचं मूलभुत प्रशिक्षण दिलं जातं.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
या प्रशिक्षणात तुम्हाला इलेक्ट्रोप्लेटिंग, मेटल कलरिंग, अँडॉयझिंग, एनॅमेलिंग आणि स्टोन सेटिंग यासारखी स्पेशलाइझ्ड कामांचंही प्रशिक्षण दिलं जातं. विविध प्रकारचे खडे (स्टोन्स) ओळखणं, डिझायनिंगच्या संकल्पना, सादरीकरण (प्रेझेंटेशन), ज्वेलरी कॉस्टिंग आणि ज्वेलरी मेकिंग आदी विषयांचं ज्ञानही या प्रशिक्षणात दिलं जातं.
काही संस्थांमधील कोर्सेसमध्ये कॉम्प्युटरच्या सहाय्याने ज्वेलरी आणि अॅक्सेसरीज डिझाइन करायला शिकवलं जातं. प्रत्यक्ष काम करताना किंवा तांत्रिक बाबतीत बोलायचं तर तुम्हाला सोनं-चांदी-प्लॅटिनम आदी मौल्यवान धातूंपासून दागिने कसे बनवायचे याचं प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक दिलं जातं. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ज्वेलरी डिझायनिंग कोर्समध्ये अॅस्थेटिक (कलात्मकदृष्ट्या) आणि टेक्निकल (तांत्रिक) या दोन्ही पद्धतींचा अभ्यास करावा लागतो. तुमचा कोर्स पूर्ण झाला की, तुम्ही ज्वेलरी डिझायनर म्हणून काम करायला सुरुवात करू शकता.
पात्रता : यासाठी तुम्ही किमान दहावी-बारावी पास असणं आवश्यक आहे. दहावीनंतर डिप्लोमा कोर्स करता येतो, तर बारावीनंतर डिग्री कोर्स करणं शक्य आहे. ग्रॅज्युएशननंतर शॉर्ट टर्म कोर्सेसही करता येतात. भारतातील अनेक संस्थांमध्ये ज्वेलरी डिझायनिंगचे लाँग टर्म, शॉर्ट टर्म तसंच, डिस्टन्स प्रोग्रॅम्स (दूरस्थ शिक्षण पद्धतीचे) उपलब्ध आहेत.
करिअरच्या संधी : मान्यताप्राप्त संस्थेतून ज्वेलरी डिझायनिंगचं शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला ज्वेलरी डिझायनिंग इंडस्ट्रीत नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. एखाद्या नामांकित ज्वेलरी ब्रँडकडे, दागिने बनवणाऱ्या आणि डिझाइन करणाऱ्या कंपनीकडे, दागिन्यांच्या पेढ्या/दुकानं (शोरुम्स), अँटिक आणि आर्ट ऑक्शन हाऊसेस आदी ठिकाणी तुम्हाला संधी उपलब्ध होतील. याशिवाय, फ्री लान्स काम करण्याचा किंवा स्वत:चं रिटेल व ट्रेडिंग युनिट सुरू करण्याचा पर्यायही तुमच्यासमोर आहे.
प्रशिक्षण संस्था :
द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी (आयआयजीजे) : http://www.iigj.org/
जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी : www.jdindia.com
हे दोन्ही कोर्स तुम्ही जगाच्या कुठच्याही कोपऱ्यातून करू शकता, हे विशेष...
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - 26/11 हल्ला करण्यामागे पाकिस्तानमधीलच दहशतवादी संघटनेचा हात होता, पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहम्मद दुर्रानी यांनी दिली कबुली
👉 नवी दिल्ली - पुढच्या तिमाहीतही अर्थव्यवस्थेला काही क्षेत्रांवर नोटाबंदीचा प्रभाव दिसेल - विरल आचार्य, डेप्युटी गव्हर्नर, आरबीआय
👉 नवी दिल्ली - खोटे शपथपत्र देऊन न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप असलेले बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयाची विनाअट माफी मागितली
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 बँकॉक - मेदांता रुग्णालयाचे एअर अॅम्ब्युलन्स बँकॉकमध्ये कोसळले, पायलट ठार, दोन डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक
🎯 राजकीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना निवडणूक आयोगाची नोटीस
👉 नागपूर - गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप करणारी रिट याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली
👉 ठाणे - ईव्हीएम हे पराभवाचं कारण असू शकत नाही, पराभव मान्य करून आणि चुका सुधारून पुन्हा लढण्यासाठी सज्ज झालं पाहिजे, कारण पराभव हा पराभव असतो - शरद पवार
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - राज्य सरकारने राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे 11 हजार गावं दुष्काळमुक्त झाल्याचा दावा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केला
👉 पुणे - बैलगाडा शर्यातीवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी बैलगाडीतून आंदोलन, आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
👉 कोल्हापूर - संसदेमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणारे खासदार म्हणून खा. धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमांकाचा बहुमान मिळाला
👉 नाशिक - 56 व्या महाराष्ट्र राज्य अंतिम हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातील मेनली अमॅच्युअर्स या संस्थेच्या ‘गांधी हत्या आणि मी’ या नाटकाने पटकावला द्वितीय क्रमांक
👉 अहमदनगर - मुंबईवरील 26/11 च्या खटल्यात डेव्हीड हेडलीच्या साक्षीला दुर्रानी यांच्या कबुलीमुळे दुजोरा, पाकिस्तानने त्यांच्याकडील पुरावे कोर्टात सादर करावेत - अॅड. उज्ज्वल निकम
🎯 खेळ घडामोडी :
👉 मुंबई - नेमबाज तेजस्विनी सावंत हिला राजभवन येथील आयोजित कार्यक्रमात 'वैभव' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - अभिनेत्री जुही चावला हिला ‘विद्या वैभव’ प्रकाशनातर्फे राजभवनात आयोजित कार्यक्रमात ‘उषा वैभव’ पुरस्कार देण्यात आला
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 महाराष्ट्र समन्वयीत कृषि विकास प्रकल्पात भरती
Let's Up Job Updates
पोस्ट : क्षेत्र प्रवर्तक - जागा : 250 - पात्रता : पदवीधर किंवा कृषि डिप्लोमा
पोस्ट : जिल्हा समन्वयक - जागा : 06 - पात्रता : B.Sc (कृषि) किंवा समतुल्य
पोस्ट : व्यवस्थापक,उत्पादक समुह - जागा : 25 - पात्रता : कृषि डिप्लोमा किंवा समतुल्य
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पदानुसार वेगवेगळा त्यासाठी जाहिरात पहा.
ई-मेल : caim_pmu@msamb.com
अर्ज पोहोचण्याची मुदत : दि. 15 मार्च 2017
अधिक माहितीसाठी :
क्षेत्र प्रवर्तक : https://goo.gl/1Vymus
जिल्हा समन्वयक & व्यवस्थापक : https://goo.gl/9LaO4d
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 न्यू इंडिया ईन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये भरती
पोस्ट : सहाय्यक (Assistant Class III) - जागा : 984 - पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वय : दि. 01 जून 2016 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
फी : 500 रुपये (SC/ST/अपंग/माजी सैनिक : 50 रुपये)
परीक्षा : Tier I : दि. 22 & 23 एप्रिल 2017 I Tier II : दि. 23 मे 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 29 मार्च 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/pVYKf4
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/84iXAF
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 यशप्राप्तीचा मार्ग ; वेळेचे योग्य नियोजन
Let's Up Think Katta
या जगात सर्वांनाच सारखा वेळ मिळाला आहे. असे असूनही काहीजण यशस्वी तर काही जण अपयशी का होतात? तर याचे मूळ कारणच वेळेचे व्यवस्थापन याच्याशी निगडित आहे. जो मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करतो तो यशस्वी होतो व हे ज्याला जमत नाही तो अपयशी ठरतो. म्हणूनच समय को बरबाद करना अपने जीवन को बरबाद करना है. प्रत्येकासाठी वेळ ही फार महत्त्वाची बाब आहे. म्हणून वेळेचे महत्व जाणून त्याचे व्यवस्थापन करा...
👉 कोणत्या दिवशी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत यासाठी रोजच्या कामांसाठी एक छोटी डायरी तयार करून कामांचा अग्रक्रम ठरवा. महत्त्वाच्या कामांसाठी वेळ, त्यानंतरची कमी महत्त्वाची कामे असा क्रम ठरवा.
👉 स्वत: पासून सुरुवात करून विचार करायला हवा की आपण आपला अमूल्य वेळ कसा वाया घालवतो. तसेच प्रत्येक कामासाठी एक टार्गेट ठरवा. एका आठवड्यात तुम्हाला काय करायचे आहे. एका महिन्यात काय करायचे आहे. येत्या वर्षातले टार्गेट आणि पुढच्या दोन वर्षातले टार्गेटसुद्धा ठरवून ते तुम्ही लिहून ठेवा. यामुळे तुम्हाला समजेल की काय करायचे आहे व काय नाही.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 प्रत्येक कामासाठी तुमची टार्गेट डेट फिक्स पाहिजे आणि या वेळेमध्येच तुम्ही तुमची महत्त्वाची कामे पूर्ण केली पाहिजेत. एखाद्या दिवशी एखादे काम करायचे प्लॅनिंग करतो. पण, अचानक काही अडचणी येतात आणि ठरवलेली कामे वेळेत होऊ शकत नाहीत. अशा वेळी प्लॅनिंग मध्ये थोडी लवचिकता असू द्यावी.
👉 अनावश्यक कामांना प्राधान्य न देता महत्त्वाची कामे अगोदर पूर्णवेळ करणे. कामाची विभागणी करून प्रत्येक कामासाठी योग्य वेळ ठरवावा. दिवसभरातील कोणती वेळ तुमच्या कामासाठी योग्य आहे याचा विचार करा. स्वत:चे निरीक्षण कराल तर या गोष्टी तुमच्या लगेच लक्षात येतील. त्यामुळे महत्त्वाची कामे या वेळेत करण्याचा प्रयत्न करा. काही कामामध्ये विनाकारण वेळ वाया जातो अशी कामे लिस्टमधून काढून टाका.
👉 दिवसभराच्या कामाचे केलेले टाईमटेबल सतत आपल्या समोर राहील अशा ठिकाणी लावा. यामुळे तुम्हालाच त्याचा फायदा होईल. किंवा अलार्म किंवा रिमायंडर लावून ठेऊ शकता.
👉 जर तुम्ही यापूर्वी कधीही वेळेचे व्यवस्थापन केले नसेल तर तशी आखणी करण्यास तुम्हाला काही वेळ लागेल. परंतु एकदा तुम्ही हे योग्य प्रकारे करू शकलात तर तुम्ही निश्चितच तुमच्या ध्येयाकडे जलद पोहोचाल व यशस्वी व्हाल.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
