fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

رفتن به کانال در Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

نمایش بیشتر
6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
photo content

💁‍♂ ह्युंदाई क्रेटा नव्या रूपात लाँच LetsUp | Tech ⚡ ह्युंदाईने भारतीय बाजारात क्रेटा ही एसयुव्ही नव्या रूपात लाँच केली आहे. क्रेटाचे 5 व्हेरिअंट उपलब्ध असून 14 मॉडेल्स आहेत. 👉 यामध्ये E, EX, S, SX आणि SX (O) यांचा समावेश आहे. बीएस 6 मध्ये ही गाडी लाँच करताना कंपनीने मोठे बदल केले आहेत. 🚘 नव्या क्रेटामध्ये थ्रीडी कॅस्केडिंग ग्रील देण्यात आली असून त्यावर एलईडी हेडलाईटसोबत नवीन स्प्लिट डेटाईम रनिंग लँप दिला आहे. 💡 बंपरमध्येही बदल करण्यात आले आहेत. 17 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स आणि पाठीमागे एलईडी टेललाईट देण्यात आले आहेत. 🖥 10.25 इंचाची मोठी टचस्क्रीन डिस्प्लेसोबत इन कार कंट्रोल्स देण्यात आले आहेत. 💫 याशिवाय नवीन मल्टी फंक्षनल फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील आणि 7 इंचाचा डिजिटल इस्टुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. 📍 अ‍ॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटोही देण्यात आला आहे. या कारमध्ये ब्लूलिंक टेकसोबत 50 हून अधिक कनेक्टेड फिचर्स दिले आहेत. 🧐 असे आहेत फिचर्स : ▪ यामध्ये स्मार्टवॉच अ‍ॅप, पॅनारोमिक सनरुफ, व्हेंटिलेटेड सीट, इलेक्ट्रीक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशन मॉनिटर सिस्टिम आहे. ▪ या कारमध्ये 1.5 लीटरचे पेट्रोल, 1.5 लीटर व्हीजीटी डिझेल आणि 1.4 लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ▪ 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड अ‍ॅटोमॅटीक असे दोन गिअर बॉक्समध्ये ही कार उपलब्ध आहे. ▪ या कारची किंमत 9.9 लाखांपासून सुरु होत असून टॉप व्हेरिअंट 17.20 लाखांना एक्स शोरुम उपलब्ध आहे. 📚 वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

photo content

💥 महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी LetsUp I Update 💁‍♂ देशात आतापर्यंत 125 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत देशात 2 तर महाराष्ट्रत पहिलाच बळी गेला आहे. 👉 मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात या रुग्णाने अखेरचा श्वास घेतला. या रुग्णावर करोनासह इतर उपचारही सुरू होते. 🧐 देशात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबईतही अनेक रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. 📍 महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी हा पहिलाच मुत्यू असून यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

💁‍♂ कोरोना; ठाकरे सरकारचे 10 महत्त्वाचे निर्णय LetsUp | Update ⚡ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. 👉 मात्र गर्दी थांबवण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेत. तसेच साथीचे रोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे. 🖥 आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. 🗣 मुख्यमंत्री म्हणाले : ▪ नियम सर्वांना सारखे असून धार्मिक सण-उत्सव, समारंभांसोबतच राजकीय कार्यक्रमांनाही परवानगी देऊ नका. ▪ ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायझर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्या. ▪ परदेशातील टुर्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्य शासन कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. ▪ राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात. ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहे. ▪ कोरोनाच्या आपत्कालीन उपाययोजनांसाठी तातडीचा निधीचा पहिला हप्ता म्हणून 45 कोटी रुपये विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहेत. 🧐 मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय : 1) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 महिने लांबणीवर. 2) ग्रामीण भागातील शाळाही बंद ठेवण्यात येणार. 3) कोरोनाच्या उपाययोजनांसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी. 4) क्वॉरेंटाईन सुविधा असलेल्या ठिकाणी दूरचित्रवाणी, कॅरमबोर्ड, जेवण आदी सुविधा. 5) ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहेत, त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा. 6) आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खरेदी करण्याचा जिल्हा प्रशासनाला अधिकार. 7) उद्यापासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय. 8) नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. 9) होम क्वॉरेंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. 10) केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरेंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश. 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी ▪ निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाला नवे वळण; दोषींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे केली इच्छामृत्यूची मागणी ▪ येस बँकेच्या ग्राहकांना दिलासा;19 मार्चपासून बँकेच्या सेवा सुरळीत सुरु होणार ▪ मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारवरील संकट तूर्तास टळले; विधानसभेचे कामकाज 26 मार्चपर्यंत स्थगित ▪ इटलीत करोनाचा हाहाकार; 24 तासांत 368 जणांचा मृत्यू, तर संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ ▪ कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत मंत्रालयात सामान्यांना प्रवेश बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ▪ मुंबईत कोरोनाचे आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह; राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पोहचली 38 वर ▪ कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील कथित आरोपी आनंद तेलतुंबडे व गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला ▪ मोटोरालाचा बहुचर्चित लेटेस्ट फोल्डेबल हँडसेट मोटो रेजर आज भारतात लाँच ▪ आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमधील मानाची व प्रतिष्ठेची समजली जाणारी 'बोस्टन मॅरेथॉन' कोरोनाच्या धोक्‍यामुळे स्थगित ▪ 'जेम्स बाँड' फेम अभिनेत्री ओल्गा कुरिलेंको हिला कोरोना व्हायरसची लागण; इन्स्टाग्रामवर दिली माहिती 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

🤓 'पॉर्न हब' मोफत पाहायला मिळणार LetsUp | Trending ⚡ जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका चीननंतर इटली या देशाला बसला आहे. 🏘 पंतप्रधानांच्या आदेशानुसार इटलीतील 6 कोटी लोकांना घरात बसण्याचे आवाहन करण्यात आले होते. 📜 या परिस्थितीत पॉर्न हब ही पॉर्न वेबसाईट प्रिमियम कंटेट मोफत देणार आहे. यासंदर्भात कंपनीकडून पत्रक जारी करण्यात आलं आहे. 🖥 या निर्णयाने इटलीमध्ये 3 एप्रिलपर्यंत प्रिमियम कंटेंट पाहणं शक्य होणार आहे. दरम्यान; मॉडेलहब या त्यांच्या वेबसाइटच्या कमाईचा पैसा इटलीला मदत म्हणून देणार आहेत. 📍 अमेरिकेमध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात पॉर्नहब पाहण्यात येतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे जपान आणि युके आहे. इटलीचा यामध्ये सातवा क्रमांक लागतो. 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

🎂 Birthday Special : राजपाल यादव LetsUp | Special 🥳 बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवचा आज वाढदिवस. ▪ 16 मार्च 1971 मध्ये उत्तर प्रदेशमधील लखनऊ जवळच्या शाहजहापुर जिल्ह्यात राजपालचा जन्म झाला. ▪ बॉलिवूडमध्ये त्याची ओळख कॉमेडी अभिनेता अशीच आहे. त्याच्या या अभिनयाच्या जोरावरच राजपालनं बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ▪ राजपाल यादवचं शिक्षण शाहजहांपुर येथेच झाले. शिक्षण घेत असताना तो थिएटरमध्येही काम करत असे. यानंतर भारतेंद्रु नाट्य अकादमीमध्ये थिएटरचं शिक्षण घेण्यासाठी तो खास लखनऊमध्ये आला. ▪ दोन वर्ष लखनऊमध्ये राहिल्यानंतर नॅशन स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेण्यासाठी तो दिल्लीला गेला. त्यानंतर आपलं करिअर घडवण्यासाठी ते मायानगरी मुंबईत आला. ▪ राजपालनं दूरदर्शनवरील मुंगेरी के भाई नौरंगीलाल मालिकेत काम केले. करिअरच्या सुरुवातीच्या काळात खलनायकी भूमिकेसाठी तो फार प्रसिद्ध झाला. ▪ मात्र काही काळानंतर त्यांनी विनोदी भूमिका करायला सुरुवात केली. लोकांनी त्यांच्या विनोदी भूमिका अक्षरशः डोक्यावर घेतल्या. 🎬 सिनेकरिअर : दिल क्या करे, मस्त, शूल, जंगल, प्यार तूने क्या किया, कोई मेरे दिल से पूछे, तुमको ना भूल पाएंगे, कंपनी, हम किसी से कम नहीं, चोर मचाए शोर, एक और एक ग्यारह, द हीरोः लव स्टोरी ऑफ ए स्पाय, हंगामा यांसारख्या अनेक सिनेमांत महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या. 📚 वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

💥 पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण LetsUp I Update 💁‍♂ पुण्यामध्ये पती-पत्नीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदान झाल्याने खळबळ उडाली आहे. हे पती पत्नी 20 ते 29 फेब्रुवारी दरम्यान दुबईला गेले होते. 👫 दुबईहून पुण्यात परतल्यावर दोघांनाही सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसत असल्याने नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. 🦠 सदरील दाम्पत्याचे घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीला तपासणीसाठी पाठविण्यात आल्यावर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. 👉 सदरील रुग्ण पुण्यातील रहिवासी असून 49 आणि 51 वयाचे आहेत. महाराष्ट्रातील हे दोघे पहिलेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. 🧐 उपचार सुरु : दुबईहून आलेल्या या दोन रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार सुरू करण्यात आले आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. 📍 दरम्यान, कोरोनाला नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

🗣 शेतकऱ्यांनो, वीज बिल भरायला शिका LetsUp I Update 💁‍♂ 'महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन दिलासा दिला आहे. आता आकडे टाकणे बंद करा आणि वीज बिल भरायला शिका,' असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 👉 राज्य सरकारतर्फे आयोजित केलेल्या महाराजस्व अभियानादरम्यान कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथे पवार बोलत होते. 🧐 पवार म्हणाले..: ▪ महाराष्ट्रात माझ्या दौऱ्यादरम्यान मी बहुतांश ठिकाणी वीजचोरीसाठी टाकलेले आकडे बघतो. अशा पद्धतीने वीजचोरी करणे चांगले नाही. यामुळे वीज वितरण कंपनी अडचणीत येऊन थकबाकी आणि कर्ज वाढत आहे. ▪ राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता वीज बिले भरण्यास शिकले पाहिजे. आम्ही फक्त बोलत नाही, तर करून दाखवतो. ▪ पोलीस आणि प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली न राहाता काम करावे. चांगले काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाईल 📍 दरम्यान, राज्यात महिलांच्या सुरेक्षेसाठी लवकरच कडक कायदा आणला जाईल असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती LetsUp | Job पदाचे नाव व पद संख्या 1. डिझाइनर ग्रेड-IV (मेकॅनिकल) - 10 2. डिझाइनर ग्रेड-IV (इलेक्ट्रिकल) - 03 3. ज्युनिअर सुपरवाइझर ग्रेड-III (मॅकेनिकल) - 07 4. ज्युनिअर सुपरवाइझर ग्रेड-III (इलेक्ट्रिकल) - 09 5. ज्युनिअर सुपरवाइझर ग्रेड-III (सिव्हिल) - 07 6. ऑफिस असिस्टंट (सेक्रेटेरियल) - 09 7. ज्युनिअर फायर इस्पेक्टर - 04 8. ड्रायव्हर ग्रेड-V - 02 शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा वयाची अट : सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा फी : General/OBC: ₹200/- [SC/ST/PH: फी नाही] ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 एप्रिल 2020 (05:00 PM) अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 14 एप्रिल 2020 (05:00 PM) अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR)A.C., Hindustan Shipyard Ltd., Gandhigram (PO), Visakhapatnam- 530 005 जाहिरात पाहा : http://bit.ly/2IySOI2 ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2PXcrxk ✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

photo content

photo content

📣 *सर्व विद्यार्थ्यांना अनमोल संधी..* 👍 *चला करू श्रीमंतीला लक्ष्य....!* 👉 *जागतिक पर्यटन , हॉटेल* *इंडस्ट्रीजमध्ये सहज मासिक* 💰 *रुपये १ लाख कमवण्याची अनमोल संधी* ✔ १००% आंतरराष्ट्रीय शेफ घडविणारे प्रशिक्षण उपलब्ध ✔ अनुभवी व फॉरेन रिटर्न टीचर्स ✔ उद्योजकता विकास , बेकरी प्रशिक्षण व पासपोर्ट मोफत ✔ ७/१२ वरती शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत. ✔ कमवा व शिका योजना. ✔ मुलींसाठी मोफत हॉस्टेलची सोय 📣 *गेली 16 वर्षात 2650 विद्यार्थी देश -परदेशात नोकरी व व्यवसायात कार्यरत.* 📌 महाराष्ट्रातील नामवंत शासनमान्य साईसम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अँड हॉटेल,टुरिझम मॅनेजमेंट 📌 छञपती शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ शेफ अँड किचन आर्टस् 📌 *स्टडी कॅम्पस -: *कोल्हापूर, कराड* *व उस्मानाबाद* 📞 *संपर्क* - 8975352500/ 9822994500 👉 https://youtu.be/I3NmH3KNfaA