LetsUpp Marathi
رفتن به کانال در Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
نمایش بیشتر6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
6 624
💳 डेबिट-क्रेडिट कार्ड न वापरता करता येणार व्यवहार
LetsUp । Update
⚡ भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केली नवीन नियमावली
🧐 जाणून घ्या पद्धत
💁♂ टोकन नंबर : नवीन नियमांनुसार, कोणत्याही व्यवहारासाठी बँक तुम्हाला एक टोकन नंबर देईल आणि त्याच टोकन नंबरद्वारे व्यवहार केले जातील. या नवीन प्रक्रियेत कार्डच्या माहितीला या टोकन नंबरद्वारे बदलले जाणार आहे. कोणत्याही थर्ड पार्टी अथवा वेबसाईटला केवळ हा टोकन नंबर द्यावा लागणार आहे.
😍 फायदे
▪ टोकनद्वारे व्यवहार केल्यामुळे कोणत्याही वेबसाईटवर कार्ड डिटेल सेव्ह असण्याचा धोका टळणार
▪ पीओएस आणि क्यूआर कोडचा वापर करून व्यवहार करताना देखील टोकनचा वापर होईल.
▪ प्रत्येक व्यवहारासाठी वेगवेगळे टोकन असेल व यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
📲 मोबाईल फोन आणि टँबलेटवर मिळणार ही सुविधा : सध्या टोकन नंबरची सुविधा ही केवळ मोबाईल फोन आणि टँबलेटसाठी असेल. हळहळू दुसऱ्या डिवाईससाठी हे प्रक्रिया लागू करण्यात येईल. टोकन नंबरबरोबर पिन नंबरची प्रक्रिया देखील सुरू राहणार आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💥 ब्रेकिंग! कलम 370 लोकसभेत मंजूर
LetsUp | Breaking
⚡ राज्यसभेनंतर आता लोकसभेत देखील कलम 370 पारित
👍 351 विरुद्ध 72 च्या फरकाने विधेयक मंजूर
👍 त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचे विधेयक 366 विरुद्ध 66 मतांनी मंजूर
💁♂ लोकसभेत सरकारचा ऐतिहासिक विजय, काश्मिरमधून 370 हद्दपार
💫 आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🤨 राज्य व केंद्रशासित प्रदेशमध्ये काय फरक आहे?
Letsup I Special
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या पूर्नरचनेचा निर्णय घेतल्यामुळे आता देशात 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश होतील. सद्यस्थितीत भारतात 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. मात्र आता जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला जाणार आहे.
शिवाय लडाख देखील जम्मू-काश्मीरपासून विभक्त करून त्याला देखील केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला जाणार आहे. असे असले तरी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यात नेमका काय फरक आहे? याबाबत अनेकांना माहित नसते. म्हणून आज त्याबाबत जाणून घेऊ...
📍 राज्य म्हणजे काय? :
● हे भारतीय राज्यघटने अंतर्गत येणारा एक घटक असून ज्याचे स्वतंत्र असे सरकार आहे.
● हे सरकार 'राज्य सरकार' म्हणून ओळखले जाते. या सरकारची निवड जनता मतांद्वारे करते.
● राज्यांना आपले कायदे तयार करण्याचे व त्यात दुरूस्ती करण्याचे अधिकार असतात.
● प्रत्येक राज्याला स्वतंत्र विधानसभा आणि मुख्यमंत्री असतो. या ठिकाणी राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या प्रतिनिधींच्या स्वरूपात असतात.
📍 केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय? :
● केंद्रशासित प्रदेश हा एक छोटा प्रशासकीय घटक असतो. ज्यावर केंद्र सरकाचे नियंत्रण असते.
● या ठिकाणी थेट केंद्र शासनाचे नियम लागू असतात.
● या नियमांची अंमलबजावणी उपराज्यपालांच्या माध्यमातून होत असते.
● उपराज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात, त्यांची निवड केंद्र सरकार करत असते.
● केंद्रशासित प्रदेशांच्यावतीने संसदेचे उच्च सभागृह म्हणजेच राज्यसभेत नवी दिल्ली आणि पुदुचेरी सोडले तर कोणतेही प्रतिनिधीत्व नसते.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🧐 पालकांनो, मुलांशी संवाद साधायचं विसरू नका!
Letsup I Parenting
हल्ली पालकांची मुलांविषयीची अति काळजी, अपेक्षा आणि स्पर्धेच्या नादात संवाद साधण्याऐवजी वादच जास्त घातला जातो. बऱ्याचदा मुलांना समजून घेण्याऐवजी त्यांच्यावर निर्णय थोपवले जातात. त्यातून अपेक्षित रिझल्ट नाही मिळाला कि मग आरडा-ओरड सुरु होते. जे चुकीचे आहे. असे होऊ नये म्हणून काय करता येतील? याचा विचार करू...
1) मुलांना लक्षात न घेता किंबहुना पुरेसा संवाद न साधता त्यांच्यावर एखादा निर्णय थोपवणे कितपत योग्य आहे, याचा तुम्हीच विचार करा. कारण हा निर्णय तुमचा होता, पाल्याचा नाही.
2) निर्णय थोपवून तुम्ही चूक केलीत. मग त्याच्यावर आगपाखड का? या सर्व समस्येवर उपाय म्हणजे मुलांशी संवाद साधा. निखळ, पारदर्शी आणि विश्वासपूर्ण मैत्रीचे नाते निर्माण करा, सुसंवाद वाढवा.
3) मुलांना समजून घेण्यासाठी त्यांना वेळ देणे, प्रसंगी त्यांच्या विश्वात आपणही रममाण होणे आवश्यक आहे.
4) केवळ चुका दाखविणे, उपदेश करणे, स्वतःच्याच मतांचा आग्रह धरणे, असे न करता थोड्या वेगळ्या स्वरूपात (उदा."हेच काम किंवा अभ्यास तू जर थोड्या वेगळ्या सोप्या पद्धतीने केलास तर तू ते अधिक चांगले करशील, असा मला विश्वास आहे) सांगायला हवे.
5) प्रत्येक काम अधिकाधिक नेटके व यशस्वी करण्याची मुलांना सवय लावायला हवी. यातून अभ्यासूवृत्ती जोपासली जाते व पुढील आयुष्याच्या वाटचालीत कुठल्याही प्रसंगात आत्मविश्वास वाढवणारी ठरते.
6) मुलांची इतरांसोबत तुलना करत बसू नका. अशाने मुलं स्वतःला कमी समजू लागतात. तर कधी-कधी चिडखोर बनतात. हे लक्षात घ्या.
7) दिलेली वेळ व दिलेले काम यासाठी अधिक काटेकोर राहणे, स्वच्छता, वैयक्तिक कामांची जबाबदारी आदी गोष्टी लक्षात ठेवल्या तर साहजिकच असे योग्य संदेश घरातूनच मिळाल्याने मुले सक्षम होत जातात.
8) आपल्या आनंदात तसेच अडचणींमध्ये, यश-अपयश, संकटातही आपले पालक, कुटुंब सदैव आपल्याबरोबर आहे, ही आधाराची-स्थैर्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण करा.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💁♂ Letsup I General Knowledge
1) कोणत्या भारतीय स्मारकाला ब्रिटनच्या ‘द स्ट्रक्चरल अवॉर्ड्स-2019’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले?
उत्तर : स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा)
2) सात्विकसाईराज रंकारेड्डी-चिराग शेट्टी या भारतीय जोडीने कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटाचे सुवर्णपदक पटकावले?
उत्तर : 2019 थायलंड ओपन
3) QRSAM याचे पूर्ण रूप काय आहे?
उत्तर : क्विक रिएक्शन सर्फेस-टू-एयर मिसाईल (क्षेपणास्त्र)
4) अखिल भारतीय टेनिस संघ (AITA) याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
उत्तर : वर्ष 1920
5) जागतिक बँकेच्या “ग्लोबल GDP रँकिंग फॉर 2018’ यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
उत्तर : अमेरीका (US)
6) पृथ्वी आणि चंद्र यांच्या दरम्यानचे अंदाजे अंतर किती आहे?
उत्तर : 356,400 किमी (221,500 मैल) ते 406,700 किमी (252,700 मैल)
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
📣 आयबीपीएस मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर/ प्रशिक्षणार्थी पदांच्या 4336 जागा
LetsUp । Job
💁♂ आयबीपीएस मार्फत विविध बँकाच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर/ व्यवस्थापन प्रशिक्षांर्थी पदांच्या एकूण 4336 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.
👨🎓 शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
📍 वयोमर्यादा : 1 ऑगस्ट 2019 रोजी 20 ते 30 वर्षे, (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्ष सवलत.)
👉 नोकरीचे ठिकाण : भारतात कुठेही
💰 परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ₹600/- (राखीव प्रवर्ग: ₹100/-)
📝 पूर्व परीक्षा : 12, 13, 19 आणि 20 ऑक्टोबर 2019 रोजी
🗒 मुख्य परीक्षा : 30 नोव्हेंबर 2019
👨💻 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2019
🖥 जाहिरात पहा : http://bit.ly/advertiseIBPS
📍 ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/onlineIBPS
📣 आयबीपीएस मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर/ प्रशिक्षणार्थी पदांच्या 4336 जागा
LetsUp । Job
💁♂ आयबीपीएस मार्फत विविध बँकाच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर/ व्यवस्थापन प्रशिक्षांर्थी पदांच्या एकूण 4336 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.
👨🎓 शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
📍 वयोमर्यादा : 1 ऑगस्ट 2019 रोजी 20 ते 30 वर्षे, (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्ष सवलत.)
👉 नोकरीचे ठिकाण : भारतात कुठेही
💰 परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ₹600/- (राखीव प्रवर्ग: ₹100/-)
📝 पूर्व परीक्षा : 12, 13, 19 आणि 20 ऑक्टोबर 2019 रोजी
🗒 मुख्य परीक्षा : 30 नोव्हेंबर 2019
👨💻 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2019
🖥 जाहिरात पहा : http://bit.ly/advertiseIBPS
📍 ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/onlineIBPS
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💵 एटीएम कार्ड न वापरता काढता येणार पैसे
LetsUp । Update
⚡ एसबीआयच्या योनो अॅपच्या माध्यमातून विना एटीएम कार्ड पैसे काढता येणार.
💁♂ असे काढा पैसे : एसबीआयच्या योनो अॅपमध्ये नेटबँकिंग युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. जर तुम्हाला अॅपचा वापर करायचा नसेल तर तुम्ही वेबसाइटची मदत घेऊ शकता.
▪ सहा अंकी कॅश पिन योनो अॅपमध्ये टाका
▪ त्यानंतर तुमच्या मोबाईलवर 6 आकडी क्रमांक येईल
▪ तो 6 आकडी क्रमांक तुमच्या जवळच्या एसबीआय एटीएममध्ये टाका
▪ 30 मिनिटांपर्यंत तुम्ही तो क्रमांक वैध असणार आहे.
👀 किती पैसे काढु शकता :
👉 एटीएम कार्ड न वापरता तुम्ही एसबीआयच्या माध्यमातून कमीत कमी 500 ते 10,000 रुपये काढु शकता.
👉 एका दिवसभरात तुम्ही 20, 000 पर्यंत कॅश काढु शकता.
👉 एसबीआयमध्ये 16, 500 एटीएममध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
📣 आज जागतिक हिरोशिमा दिवस
LetsUp । Special
💁♂ इतिहासातील काळा दिवस : 6 ऑगस्ट 1945 हा मानवाच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी, काळा दिवस आहे. मित्र राष्ट्रांनी जपानमधील एक संपन्न शहर हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकून सार्या जगाला स्तब्ध केले. या बॉम्बचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की, तीन लाख वस्तीचे हे शहर क्षणात नष्ट झाले. या दुर्दैवी घटनेला आज 74 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या घटनेची ही आठवण..
💣 विध्वंसाची झलक दाखविणारा ‘लिटल बॉय’ :
जवळजवळ 4 हजार किलोग्रॅम वजनाच्या या बॉमची लांबी 3 मीटर आणि व्यास 71 सेंटीमीटर होता. हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब हा युरेनियम गन टाईप अॅटोमिक बॉम्ब होता. त्याचा स्फोट हिरोशिमा शहराच्या 2000 फूट उंचावर झाला. त्यात शहराचा पाच चौ. मैल एवढा भाग नष्ट पावला.
👉 या दोन्ही शहरांत मरण पावलेल्या लोकांतील निम्मे लोक हे बॉम्ब टाकलेल्या दिवशीच मरण पावले. त्यानंतरच्या महिन्यात अनेक जण भाजलेल्या जखमांमुळे, उत्सर्जित किरणाच्या आजारामुळे, अन्य जखमा, अपुरा आहार व आजार यामुळे मृत्यू पावले.
📍 जगात अणुवस्त्र चाचण्या सुरूच :
▪ हिरोशिमा, नागासाकी शहरांवरील हल्ल्यानंतरही जगात 2 हजारांहून अधिक आण्विक शस्त्रांच्या चाचण्या झाल्या.
▪ 1945 ते 1980 या काळात जगातील 500 हून अधिक ठिकाणी वातावरणातील आण्विक शस्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या.
▪ चाचणी घेणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान व उत्तर कोरिया या देशांचा समावेश आहे.
👀 जगभरातील कोणत्या देशांकडे किती अण्वस्त्र :
1⃣ रशिया : 6800 अण्वस्त्र
2⃣ अमेरिका : 6600 अण्वस्त्र
3⃣ फ्रान्स : 300 अण्वस्त्र
4⃣ चीन : 270 अण्वस्त्र
5⃣ ब्रिटन : 215 अण्वस्त्र
6⃣ पाकिस्तान : 130-140 अण्वस्त्र
7⃣ भारत : 120-130 अण्वस्त्र
8⃣ इस्रायल : 80 अण्वस्त्र
9⃣ उत्तर कोरिया : 10-20 अण्वस्त्र
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
LetsUp News Updates
● 370 कलम प्रकरणी काश्मीरात निदर्शने सुरु, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना अटक
● कुलभूषण जाधवप्रकरणी भारत पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार
● इजिप्तमध्ये वाहनांचा भीषण अपघात; स्फोटामुळे हॉस्पिटलला लागली आग; 20 ठार
● मुंबईसह राज्यात दक्षता; काश्मीरमधील विशेष कलम हटविण्यावरून घातपाताची शक्यता
● मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरण 'इन-कॅमेरा' सुनावणीला प्रसारमाध्यमांनी विरोध दर्शविला
● पुढील दोन दिवस पुण्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा हवामान विभागाने दिला इशारा
● भारतीय टेलिकॉम कंपनी एअरटेल मार्च 2020 पर्यंत देशभरातील आपली 3 जी सेवा बंद करणार
● दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ब्रॅण्डम मॅक्यूलम याची क्रिकेटच्या सर्व प्रकरातून निवृत्ती जाहीर
● शाओमीचा ‘पावरफुल स्मार्टफोन’ पोको एफ 1 झाला 5 हजारांनी स्वस्त
● अमृता फडणवीस यांच्या आवाजातील 'तेरी बन जाऊंगी' गाणं टी सिरीज तर्फे प्रदर्शित, अवघ्या काहीच तासात 4 लाखाहून अधिक व्ह्यूज
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🤔 पावसाळ्यात आपत्ती आली तर कोणती काळजी घ्याल?
LetsUp | Health
सध्या वरूणराजा विविध ठिकाणी मुसळधार बरसत आहे. त्यामुळे आपत्ती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आपत्ती आली तर त्यासाठी नागरिकांनी कसं तयार राहिलं पाहिजे? तसलेच घरात आपात्कालीन परिस्थितीत लागणारं साहित्य, औषधं, प्रथमोचाराचं सामान, जादा खाद्यपदार्थ, पिण्याचं पाणी इत्यादी. प्रतिबंध कसा करावा? याबाबत आज जाणून घेऊयात...
सर्वात प्रथम म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत घराबाहेर पडण्याअगोदर वातावरणाचा हाल-हवाल काय आहे? याची माहिती बातम्या, इंटरनेट, मोबाईल अॅप्स किंवा वर्तमानपत्रांद्वारे घ्यावी. जेणेकरून मोठा पाऊस असल्यास त्यामध्ये तुम्ही अडकून पडणार नाही.
💁♂ आपत्ती उद्भवल्यास काय करावं? :
● सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांना पावसाळ्यात एकटं बाहेर पाठवू नका.
● लहान मुलांना पावसाच्या पाण्यात खेळायला देऊ नका.
● पावसाळ्यात रात्रीच्या वेळेस रस्त्याने जाताना काळजी घ्या. कारण पाऊस आणि काळोख असल्याने अपघात होण्याची शक्यता असते.
● ज्या ठिकाणी पाणी भरलंय त्या रस्त्यावरून जाणं टाळा. कारण अपघात होऊन दुखापत होण्याची शक्यता असते.
● पाऊस थांबल्यानंतरही वयस्कर व्यक्तींनी बाहेर जाणं टाळावं. कारण रस्ते ओले असल्याने त्यावरून घसरण्याची शक्यता अधिक असते.
● आकाशात विजा चमकत असतील तर इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद करू ठेवा. तसेच बाहेर पडणं शक्यतो टाळा.
🤨 आजारांपासून कशी काळजी घ्यावी? :
● पावसाळ्यात होणारे अनेक आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे पाणी उकळून पिण्याकडे बारकारईने लक्ष दया.
● पावसाळ्यात डास चावणार नाही याची काळजी घ्या. डास चावू नये यासाठी क्रिम तसेच रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
● आपल्या घराजवळील परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. कारण साचलेल्या पाण्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होते.
● बाहेरील साचलेल्या पाण्यात जाणे शक्यतो टाळा. साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता असते.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🚘 मारुती सुझुकीने केली 1000 कर्मचाऱ्यांची कपात
LetsUp l Update
⚡ ऑटोमोबाईल क्षेत्रातील आर्थिक मंदी उघड होण्यास झाली सुरुवात
👉🏻 गत काही महिन्यांपासून मारुतीसह अन्य वाहन कंपन्यांच्या विक्रीने ऐतिहासिक घसरण नोंदविली आहे. यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कमी केले जात आहे.
🧐 जाणून घ्या वाहन विक्रीतील घट :
▪जुलै 2019 मध्ये मारुतीने 2018 च्या तुलनेत 35.1 टक्के घट नोंदविली.
▪2018 च्या जुलैमध्ये कंपनीने 154,150 कार विकल्या.
▪2019 मध्ये आतापर्यंत कंपनीने 100,006 कार विकल्या.
▪एप्रिल ते जुलै दरम्यान कंपनीच्या 2019 मध्ये 474,487 कार विकल्या.
▪एप्रिल ते जुलै दरम्यान मारुतीने 2018 मध्ये 617,990 कार विकल्या.
💁♂ हे शोरुमही होत आहेत बंद :
बलेनो, इग्निस, सियाझ, एस क्रॉस अशा कारची मारुतीच्या दालनांमधून विक्री सुरु होती. मात्र, विक्री घटल्याने डीलरला ही दालने बंद करावी लागली आहेत. तुर्भेतील नेक्साचे शोरूम यामुळेच बंद करण्यात आले.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🚙 इंटरनेट कार्समुळे हजारोंच्या जीवाला होऊ शकतो धोका
LetsUp l Auto
⚡ अमेरिकेतील वॉच डॉग या कन्झ्युमर अॅडव्होकसी ग्रुपने दिला इशारा
🧐 काय होऊ शकतो धोका? : जगभरात अत्याधुनिक फीचर असलेल्या कारची लोकप्रियता वाढू लागली आहे. इंटरनेट कार हॅकर्ससाठी अत्यंत सोप्या असल्याने त्या सहज टार्गेट करता शकतात. त्यामुळे हजारोंच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा आहे.
👉🏻 किल स्वीच वाय कनेक्टेड कार्स कॅन बी किलिंग मशीन्स अँड हौ टू टर्न देम ऑफ या शीर्षकाखाली हा नवा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे.
👀 काय आहे अहवाल? :
▪ज्या इंटरनेट कार बाजारात आहेत, त्यांवर सायबर हल्ला होऊ शकतो.
▪होणारा हल्ला मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.
▪याचा फटका राष्ट्रीय सुरक्षेला पोहोचू शकतो.
▪या कारमध्ये सेफ्टी सिस्टीम आहे, मात्र इंटरनेटला जोडताना पर्याप्त सुरक्षेची काळजी घेतली गेली नाही.
▪ सायबर हल्य्याच्या परीस्थितीत कारची सुरक्षाप्रणाली इंटरनेटपासून वेगळी करता येनार नाही.
▪गर्दीच्या ठिकाणी एकाच वेळी अनेक कारवर सायबर हल्ला झाल्यास त्याक्षणी किमान 3000 लोकांच्या जीवित हानी होऊ शकते.
💁♂काय आहे कारचे वैशिष्ट्ये? : स्मार्टफोनद्वारे कारवर नियंत्रण ठेवता येते. त्यामध्ये इंजिन सुरु करणे, एसी सुरु करणे, लोकेशन तपासणे अशी अनेक कामे करता येतात.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🤔 काय आहे 35-ए कलम?.. जाणून घ्या
LetsUp । Breaking
⚡ केंद्रातल्या मोदी सरकारनं आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे
💁♂ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जम्मू काश्मीर मध्ये लागू असलेले कलम 370 हटवण्याची शिफारस आज राज्यसभेत मांडली. या शिफारशीला राष्ट्रपतींनी देखील मंजुरी दिली आहे.
📍 जम्मू काश्मीरबाबतच्या 5 महत्वाच्या घटना
1⃣ कलम 370 हटवल्याने जम्मू -काश्मीरचे विशेष अधिकार संपुष्टात
2⃣ हा कलम हटवल्याने जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित राज्यांची निर्मिती
3⃣ आतापासून भारतीय संविधानातील सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू होणार
4⃣ जम्मू काश्मीरची वेगळी घटना आणि झेंडा संपुष्टात येणार
5⃣ या कलमाच्या अमंलबजावणीमुळे आता जम्मू काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करू शकता
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🧐 क्रीडा घडामोडींवर एक नजर
LetsUp | Sports
🏏 टीम इंडियाचा मालिका विजय
⚡ दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे 22 धावांनी विजय मिळवत मालिका घातली खिशात
💁♂ भारताने दिलेल्या 168 धावांच्या आव्हानासमोर वेस्ट इंडिजला 15 ओव्हरमध्ये 4 बाद 98 धावाच करता आल्या
👍 यानंतर पावसाने विश्रांती न घेतल्याने अखेर डकवर्थ लुईसनुसार भारताला विजयी घोषित करण्यात आले
🏆 अष्टपैलू कामगिरी करणारा कृणाल पांड्या (20 धावा, 2 बळी) ठरला सामनावीर
🔝 रोहित शर्माने (107) ख्रिस गेलचा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा (105) विक्रम काढला मोडीत
🧢 ऑस्ट्रेलियाकडे आघाडी :
📣 अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 7 बाद 487 धावांवर डाव केला घोषित
👉 इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बिन बाद 13 धावा, आज अखेरच्या दिवशी विजयासाठी तब्बल 385 धावांचे आव्हान
👍 अॅशेस मालिकेत कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकाविणारा स्मिथ पाचवा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला
✔ कसोटी क्रिकेटमध्ये 25व्या शतकाची नोंद करणारा स्मिथ हा दुसरा वेगवान फलंदाज (119व्या डावात) ठरला
🥇 फोगटला सलग तिसरे सुवर्ण :
👌 महिला कुस्तीपटू विनेश फोगटने पोलंड खुली कुस्ती स्पर्धा जिंकून (53 किलो गट) सलग तिसऱ्या सुवर्णपदकाची केली नोंद
👉 24 वर्षीय विनेशने अंतिम सामन्यात पोलंडच्या रुक्सानाचा 3-2 असा पराभव केला
💫 गेल्या महिन्यात विनेशने स्पेनमधील ग्रां. प्रि. कुस्ती स्पर्धा आणि टर्की येथील यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💥 काश्मीरमध्ये जमावबंदी; देशभरात संभ्रमाचे वातावरण!
LetsUp | National
⚡ जम्मू काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींनी घेतला वेग, राज्यात कलम 144 (जमावबंदी) लागू
● तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ
● इंटरनेट आणि लँडलाईन सेवाही बंद
● मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला नजरकैदेत
● सर्व सरकारी शाळा, महाविद्यालयं आणि इतर संस्थांना आज सोमवारपासून सुट्टी
● कोणत्याही प्रकारची सभा, रॅली किंवा जिथे जमाव एकत्र येईल अशा सगळ्या कृतींवर बंदी
● इरफान पठाणसह 100 क्रिकेटपटूंना तत्काळ राज्य सोडण्याचे आदेश
💫 काश्मीरमध्ये घडणाऱ्या घडामोडींबाबत देशात संभ्रमाचे वातावरण, कलम 35 अ बाबतही महत्त्वाचा निर्णय या आठवड्यात घेतला जाईल अशीही शक्यता आहे
🗣 सरकार देणार उत्तर :
● काश्मीरच्या प्रश्नावर केंद्र सरकारची भूमिका काय? हे आता अवघ्या काही तासांत समजणार
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज (दि.5) सकाळी 9.30 वाजता, यात काश्मीर खोऱ्यातील प्रश्नावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता
● या बैठकीत घेतलेला निर्णय आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती यावर सरकार संसदेत उत्तर देणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
LetsUp News Updates
● काश्मीरमध्ये अनेक जिल्ह्यांत कलम 144 लागू, प्रमुख राजकीय नेते स्थानबद्ध, तसेच राज्यातील इंटरनेट सेवाही बंद
● भारताने सर्व हवामानांत व प्रदेशांत अनुकूल अशा अत्याधुनिक क्यूआरएसएएम क्षेपणास्त्राची घेतली यशस्वी चाचणी
● मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि शिर्डीमधील शाळांना आज सोमवारी (दि.5) सुट्टी जाहीर
● सरकारी रुग्णालयांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी येत्या 19 ऑगस्टला एकदिवसीय राज्यव्यापी संपाचा दिला इशारा
● प्रधानमंत्री आवास योजनेची 4 लाख 21 हजार घरे पूर्ण, राज्य सरकारची माहिती; 10 लाख 51 हजार 90 जणांनी केली नोंदणी
● गुगल, अॅपलसारख्या टेक कंपन्यांनी प्राेडक्ट रिव्ह्यूसाठी युजरचे व्हाॅइस रिकाॅर्डिंग ऐकण्यास केली मनाई
● दुसऱ्या टी-20 सामन्यात डकवर्थ नियमानुसार भारताची सामन्यात बाजी, मालिकाही खिशात, कृणाल पांड्या सामनावीर
● प्रो कबड्डी : पुणेरी पलटनचा पटणा पायरेट्सवर तर तमिळ थलैवाचा हरयाणा स्टीलर्सवर दमदार विजय
● भारताच्या सात्त्विक साईराज रैंकीरेड्डी-चिराग शेट्टीने थायलंड ओपनमध्ये जिंकला पुरुष दुहेरीचा किताब
● अभिनेता आमीर खान तमिळ चित्रपट 'विक्रम वेधा' च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार, यात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसेल
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🌱 भेंडीची लागवड पद्धती
LetsUp | Agri
🎯 पुणे, जळगाव, धुके, अहमदनगर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
⛅ जमीन व हवामान : मध्यम काळ्या किंवा पोयट्याच्या जमिनीत भेंडीची वाढ चांगली होते. हलक्या जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर अधिक करावा. जमिनीचा सामू 6 ते 7 च्या दरम्यान असावा. भेंडीला उष्ण आणि दमट हवामान मानवते. 20 ते 40 अंश तापमानात हे पीक चांगले येते. तापमान 42 अंशपेक्षा अधिक असल्यास फुलांची गळ होते. अति दमट हवेत या पिकावर भुरी रोगाचा उपद्रव होतो.
👉🏻 जाती व योग्य हंगाम : अर्का अनामिका, परभणी क्रांती, पुसा सावनी या तिन्ही जाती - खरीप व उन्हाळी दोन्ही हंगाम
अर्का अभय - अर्का अनामिकासारखीच या जातीची फळे असून विशेष म्हणजे या जातीमध्ये फांद्या फुटत असून दोन बहार मिळतात.
💁♂ खते व पाणी व्यवस्थापन : भेंडी लागवडीपुर्वी शेणखत किंवा एकरी 75 ते 100 किलो कल्पतरू सेंद्रिय खत वापरावे. उगवणीनंतर 15 ते 21 दिवसांनी खुरपणी झाल्यानंतर पुन्हा 25 ते 21 दिवसांनी खुरपणी झाल्यानंतर पुन्हा एकरी 25 ते 30 किलो कल्पतरू सेंद्रिय खताचा डोस सरीतून द्यावा. जमिनीच्या पोतानुसार व हंगामानुसार 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळ्यात ओलावा टिकून राहण्यासाठी वाळलेल्या गवताचे किंवा भाताच्या पेंढ्याचे आच्छादन दोन ओळीमध्ये घातल्याने तणांचा बंदोबस्त होऊन पाण्याचीही बचत होते.
📍 काढणी व उत्पादन :
▪फुले आल्यानंतर 4 ते 6 व्या दिवसापर्यंत काढणी करावी.
▪एक दिवसाआड भेंडीची तोडणी करावी.
▪सरासरी एकरी 4 ते 5 टन उत्पादन मिळते.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🚀 चांद्रयान-2 ने पाठवली पृथ्वीची छायाचित्रे
LetsUp । National
💁♂ इस्रोने शेअर केले फोटो : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पाठवलेले चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने मार्गाक्रमण करत आहे. या प्रवासादरम्यान चांद्रयान-2 ने पृथ्वीची काही नयनरम्य छायाचित्रे काढली असून, इस्रोने ट्विटरवरून ही छायाचित्रे शेअर केली आहेत.
📍 देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोचे चांद्रयान-2 22 जुलै रोजी दुपारी चंद्राच्या दिशेने झेपावले होते.
👉 हे यान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्राच्या जवळ पोहोचणार असून, या यानामधील विक्रम हा लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरणार आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🚆 देशातील 2 हजार रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय
LetsUp । Update
⚡ रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडून सुविधा वायफाय सुविधा उपलब्ध.
🗣 काय म्हणाले रेलटेलचे अध्यक्ष?: 74 रेल्वे स्थानक वायफाययुक्त केले असून अजून काही स्थानकांवर मोफत वायफायची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे, अशी माहिती रेलटेलचे अध्यक्ष पुनित चावला यांनी दिली.
💫 विशेष : राजस्थानातील अजमेर विभागातील राणा प्रतापनगर रेल्वे स्थानक हे मोफत इंटरनेट सेवा असलेले देशातील दोन हजारावे स्थानक ठरले आहे.
💁♂ रेलटेल कंपनीचा उपक्रम :
▪ रेलटेल या कंपनीने रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्याची सुरुवात केली होती.
▪ पहिल्या टप्प्यात 1600 रेल्वे स्थानकांवर ही सोय पुरवण्यात आली.
▪ उर्वरित स्थानकांवर इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रेलटेलने टाटा ट्रस्टची मदत घेतली आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
👌 पावसाळा स्पेशल रेसिपी
LetsUp । Recipe
पावसाळा म्हटलं कि, डोळ्यासमोर खमंग भजी व गरमागरम चहा ओघाने येतोच. विशेषतः या दिवसात भजी खाण्याचा आनंद वेगळाच असतो. चला तर आज थोडी कल्पकता वापरून वेग-वेगळ्या प्रकारची भजी कशी बनवता येतील? यासाठी काही खास रेसिपीज पाहुयात...
😋 पापडाची भजी :
🍽 साहीत्य : उडीदाचे कच्चे पापड़ (4), एक ते दीड कप ताक, एक कप तांदळाचे पीठ, एक चमचा आलं मिर्चीची पेस्ट, थोडी कोथिंबिर, अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल.
💁♂ कृती : एका बाऊलमध्ये पापडाचे तुकडे घ्या. आता त्यावर ताक घाला, थोडावेळ भिजु द्या. यानंतर हाताने कुस्करून घ्या. त्यात आलेमिरची पेस्ट, हळद, मीठ घालून त्याचे एकसारखे गोळे बनवा. नंतर गरम-गरम तेलात तळून घ्या. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही हे सर्व्ह करू शकता.
😋 मक्याच्या दाण्यांची भजी :
🍽 साहित्य : पाच कणसांचे (स्वीट कॉर्न)दाणे, एक चमचा तिखट, एक चमचा मीठ, दिड चमचा गरम मसाला, अडीच वाटी बेसन, तेल.
💁♂ कृति : मक्याचे दाणे धुऊन मिक्सरमधुन काढा. यांनतर त्यात तिखट,मीठ, गरम मसाला व जेवढे मावेल तेवढेच बेसन व अर्धा डाव तेल गरम करून घालावे. मिश्रण एकत्र करावे. महत्वाचे म्हणजे अजिबात पाणी घालू नये. यानंतर छोटी-छोटी भजी तळून तुम्ही सॉस बरोबर आस्वाद घेऊ शकता.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
