fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

رفتن به کانال در Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

نمایش بیشتر
6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
IDBI बँकेत 111 जागांसाठी भरती Let's Up Job Updates पोस्ट : डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) - जागा : 13 - पात्रता : पदवीधर, 12 वर्षे अनुभव पोस्ट : असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) - जागा : 17 - पात्रता : B.Tech/B.E/M. Tech. Agri /MBA Agri / M.Sc, 08 वर्षे अनुभव पोस्ट : मॅनेजर (MGR) - जागा : 81 - पात्रता : CA/ CFA/ CS /ICWA/MBA/M.E./M.Tech/कायदा पदवी, 04 वर्षे अनुभव वय : दि. 01 ऑक्टोबर 2016 रोजी DGM : 35 ते 40 वर्षे I AGM : 30 ते 36 वर्षे I MGR : 28 ते 32 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट) फी : 700 रुपये (SC/ST/अपंग 150 रुपये) परीक्षा : दि. 24 मार्च 2017 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 20 फेब्रुवारी 2017 अधिक माहितीसाठी : https://goo.gl/EgzOMp ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/Cs6zAs (Starting:01 फेब्रुवारी 2017) ----------------------------------------------------------- ग्रॅज्युएट महिलांसाठी सुवर्णसंधी, लाईफ प्लॅनिंग ऑफिसर - जागा : 10 - वय : 30 ते 50, संपर्क : 9860667433 ----------------------------------------------------------- (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती पोस्ट : ज्युनिअर लॅब केमिस्ट - पात्रता : 10वी / 12वी /B.Sc/ डिग्री पोस्ट : ज्युनिअर सिक्युरिटी ऑफिसर - पात्रता : 10वी / 12वी /B.Sc/ डिग्री पोस्ट : फायरमन - पात्रता : 10वी / 12वी /B.Sc/ डिग्री एकूण जागा : 418 वय : 28 ते 35 वर्ष फी : 800 रुपये (अनुसुचित जमातींसाठी 600 रुपये) ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत : दि. 7 फेब्रुवारी 2017 अधिक माहितीसाठी : www.mahagenco.in (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 जम्मू-काश्मीर - पुलवामा जिल्ह्यात पोलीस आणि सीआरपीएफचे जवान पेट्रोलिंग करताना दहशतवाद्यांचा हल्ला, एक पोलीस जखमी 👉 नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी 1872 ग्रॅम वजनाची 10 सोन्याची बिस्किटे जप्त केली, 2 जण अटकेत 👉 उत्तर प्रदेश - निवडणूक आचार संहिता लागू झाल्यानंतर पोलीस आणि आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत आतापर्यंत 84 कोटी 21 लाख रुपये जप्त (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून केली चर्चा, मोदींना अमेरिकेत येण्याचं आमंत्रण 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - शिवसेनेच्या तीन नगरसेवकांविरोधात तक्रार केल्याप्रकरणी अभिषेक घोसाळकर यांना पक्षातून बडतर्फ करण्यावर सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकमत 👉 औरंगाबाद - युती झाली तर शिवसेनेसोबतच, युती न झाल्यास भाजप स्वबळावर लढण्यास सक्षम - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे 👉 उत्तरप्रदेश - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीने तिस-या टप्प्यात 40 उमेदवारांची यादी जाहीर केली तर भाजपाच्या 67 उमेदवारांची यादी जाहीर 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 नवी मुंबई - मालमत्ता कर थकबाकीदारांवर नवी मुंबई महापालिकेची धडक कारवाई, 61 कोटी थकवणाऱ्या 23 थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त 👉 मुंबई - गेल्या दहा वर्षात 500 हून अधिक आदिवासी मुलींचा मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला नोटीस पाठविली 👉 मुंबई - सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंग यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहून बडोद्यातील घटनेप्रकरणी शाहरुख खानवर कारवाई करण्याची केली मागणी 👉 पुणे - केंद्र सरकारने परिवहन करांमध्ये केलेल्या वाढीविरोधात प्रवासी आणि माल वाहतूकदार संघटना आक्रमक, 31 जानेवारीला चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा 👉 रायगड - भूमी अभिलेख अधिका-यासह एकाला 35 हजार रुपयांची लाच घेताना अटक, रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई 🎯 खेळ घडामोडी : 👉 कॅनबेरा - रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत, जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानावर असलेल्या फेडररने उपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या मिशा झ्वेरेव्हवर सरळ सेटमध्ये मिळवला विजय 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 पुणे - शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा 12 वा राम कदम कलागौरव पुरस्कार ज्येष्ठ गायिका डॉ. अनुराधा पौडवाल यांना जाहीर 👉 वॉशिंग्टन - मूळ भारतीय निवासी असणाऱ्या अभिनेता देव पटेल याला ब्रिटिश सीनेमातील भूमिकेसाठी पहिल्यांदा ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळाले (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 _*आयकर पात्रतेची मर्यादा वाढणार...!*_ _*Let's Up Current Affair*_ सध्या आपल्या देशामध्ये अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणार्‍या व्यक्तीला आयकर भरावा लागतो. 4 वर्षापूर्वी ही मर्यादा निश्‍चित करण्यात आली. पण सध्या महागाईचे चित्र असे काही बदलून गेले आहे की, अडीच लाखांचे उत्पन्न हे नगण्य ठरले आहे. त्यामुळे यंदा ही मर्यादा साडेतीन लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. किमान 3 लाख रुपये तरी नक्कीच होईल असा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे. ही मर्यादा 3 लाख रुपये होऊन आयकराच्या योजनेसाठीचा पहिला स्लॅब 7 लाखांपर्यंत वाढवला जाईल असा अंदाज आहे. म्हणजे पहिला स्लॅब साडेतीन लाखांपासून 7 लाखांपर्यंत असेल आणि या स्लॅबमध्ये बसणार्‍यांना 5 टक्के कर लावला जाईल. सध्या पहिला स्लॅब अडीच लाखापासून सुरू होतो आणि तो 5 लाखांपर्यंत असतो. या स्लॅबमध्ये बसणार्‍यांना 10 टक्के कर लावला जातो. मात्र तो 5 टक्के लावला गेला तर बर्‍याच लोकांना दिलासा मिळणार आहे. उत्पन्नाची मर्यादा आणि स्लॅब या दोन्हीत बदल केल्यास साधारण 75 लाख लोक आयकराच्या कक्षेतून बाहेर जातील असा अंदाज आहे. सरकारने जर या गोष्टी केल्या तर सरकारचा नोटाबंदीचा काही तरी उपयोग झाला असे समजले जाईल. कारण नोटाबंदीचे दूरगामी परिणाम म्हणजे अधिकाधिक लोक आयकराच्या कक्षेत येणे... *जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या टस्अ‍‍ॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* https://goo.gl/XhZsJM 👉 _*अशिक्षित लोकांसाठी सरकारचे नवे अ‍ॅप*_ गरिब आणि अशिक्षित लोकांना डिजिटल व्यवहार करता यावे, यासाठी केंद्र सरकारने ‘आधार पे’चा प्रचार-प्रसार सुरू केला आहे. या माध्यमातून फिंगरप्रिंटच्या सहाय्याने व्यवहार करता येणार असून ‘आधार पे’ हे आधीपासूनच आधार कार्डशी संलग्न असलेल्या पेमेंट यंत्रणेचे एईपीएसचे व्यापार्‍यांसाठीची आवृत्ती (मर्चंट व्हर्जन) आहे. पासवर्ड आणि पिनच्या मदतीने केल्या जाणार्‍या ऑनलाईन आणि डेबिट-क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणार्‍या व्यवहारांची जागा ‘आधार पे’ घेणार आहे. या अ‍ॅपचा वापर सहजसोपा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून व्यवहार करताना लोकांना आधार नंबर, बँकेचे नाव आणि फिंगरप्रिंट द्यावे लागले. ‘आधार पे अ‍ॅप सर्व अँड्रॉईड फोनवर चालेल. यासाठी फक्त फिंगर बायोमेट्रिक डिव्हाईस जोडलेले असणे आवश्यक आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून डेबिट-क्रेडिट कार्ड आणि पिन नंबरशिवाय कॅशलेस व्यवहार करणे शक्य होणार आहे. त्यासाठी ग्राहकांकडे स्मार्टफोन असणे बंधनकारक आवश्यक असणार नाही, असे यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. पाण्डेय यांनी सांगितले आहे. सरकारने ‘आधार पे’ दुकानदारांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी बँकांच्या प्रत्येक शाखेला 30 ते 40 व्यापार्‍यांना या सुविधेशी जोडण्याच्या सूचना केल्या आहेत. आतापर्यंत आंध्रा बँक, आयडीएफसी बँक, सिंडिकेट, एसबीआय आणि इंडसइंड बँक या 5 बँका ‘आधार पे’शी जोडण्यात आल्या आहेत. लवकरच इतरही अनेक बँका ‘आधार पे’ला जोडण्यात येणार आहेत. ‘आधार पे विषयी व्यापार्‍यांच्या मनात विश्‍वास निर्माण करण्याचे काम सुरू आहे. ‘आधार पे’च्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी दुकानदारांना 2 हजार रुपयांचे बायोमेट्रिक यंत्र विकत घ्यावे लागेल. या यंत्राची किंमत व्यापार्‍यांकडून हळूहळू वसूल करण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. असे झाले तरच व्यापारी ‘आधार पे’च्या माध्यमातून व्यवहार करतील, असे सरकारला वाटते,’ अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकार्‍याने दिली आहे. ( *जॉईन लेट्स अप* : https://goo.gl/XhZsJM । Lets Up Magazine विषयी आपला *अभिप्राय कळवा* feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 जम्मू-काश्मीर - गंदेरबल जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना लष्कराकडून कंठस्नान, दहशतवाद्यांकडून 2 एके 47 रायफल्स जप्त 👉 नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर जमा झालेल्या बनावट नोटांची आकडेवारीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे नाही, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती आणली समोर 👉 पंजाब - पाकिस्तान इथे अंमली पदार्थ पाठवण्याचा प्रयत्न करतो. पण मी गृहमंत्री म्हणून असे प्रयत्न हाणून पाडणार : गृहमंत्री राजनाथ सिंह (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संपर्क करणार, भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेअकरा वाजता संवाद साधणार 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने पहिली यादी जाहीर, यादीत 18 जणांचा समावेश 👉 मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉसमध्ये स्पर्धक राहिलेली रिमी सेन हिने केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश 👉 लातूर - धीरज देशमुख निवडणुकीच्या रिंगणात, धीरज देशमुख विलासराव देशमुख यांचे पुत्र, एकूर्का गटातून निवडणूक लढवणार 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - विजय मल्ल्या बुडीत कर्ज प्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी अध्यक्षांसह 8 जणांना 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, पुढील याचिकेवर 30 जानेवारीला होणार सुनावणी 👉 मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर एसटीचा अपघात, किवळे गावाजवळची घटना, 4 ते 5 प्रवासी जखमी, दोन जणांची प्रकृती गंभीर 👉 सोलापूर - दुध भेसळप्रकरणी गणेशवाडी आणि आंधळगाव येथील केंद्रावर धाड, 1 लाख 18 हजार रुपयांचे साहित्य जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई 👉 कोल्हापूर - भाजपातील 25 वर्षांपासून काम करणाऱ्यांना घेऊन सत्ता स्थापन करून दाखवावी, त्यांचा बिंदू चौकात जाहीर सत्कार करू : सतेज पाटील 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 27375.58, निफ्टी : 8475.80, सोने भाव : 28,721 (प्रतितोळा), चांदी : 41,629 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 मुंबई - व्हिवोने V5 प्लस हा ड्युअल फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन केला लॉन्च, 27,980 एवढी या स्मार्टफोनची किंमत असणार आहे 🎯 खेळ घडामोडी : 👉 नवी दिल्ली - टी-20 सामन्यात आमच्या गोलंदाजांना प्रभाव दाखविण्याची चांगली संधी आहे व तेथेच त्यांची खरी कसोटी ठरणार आहे : कर्णधार विराट कोहली 👉 नवी दिल्ली - क्रिकेट बोर्डाच्या प्रशासकांच्या समितीसाठी नावांची यादी देण्याची सूचना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि बीसीसीआयला दिली आहे 👉 मुंबई - यष्टिरक्षक रिद्धिमान साहाने (नाबाद 203 धावा) प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधली आपली सर्वोत्तम खेळी उभारून, इराणी करंडकावर शेष भारताचे नाव कोरले 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘जॉली एलएलबी 2’चा एक नवा ट्रेलर रिलीज 👉 मुंबई - भारतीय रेल्वेने खूप वर्षे प्रवास केला नव्हता; शिवाय कमी वेळेत जास्तीत जास्त शहरांना भेट द्यायची होती म्हणून ट्रेनने जायचे ठरवले : शाहरुख खान (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

ब्रेकिंग न्यूज पीककर्जावरील 660 कोटींचे व्याज नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीककर्जावरील 660.5 कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. ज्या शेतकऱ्यांनी सहकारी बॅंकेकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अल्पमुदतीचे कर्ज घेतले होते त्यावर व्याज लागणार नसल्याचे मंत्रिमंडळाने म्हटले आहे. त्याचबरोबर या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहे. क्योटो प्रोटोकॉलच्या हरित वायूच्या उत्सर्जन कराराच्या मुदतवाढीस मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच अनिसाबाद येथे 11.35 एकर जागा विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यापुढे आयआयएममध्ये पदविका ऐवजी पदवी प्रदान केली जाणार आहे. आयआयएममधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा ऐवजी डिग्री मिळणार आहे. प्रगती मैदान येथे सांस्कृतिक केंद्रासाठी 2,254 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 मस्त करिअर : ऑनलाईन मीडिया 👉 Let's Up Career Katta ऑनलाईन मीडियाचे वाढते प्रस्त पाहता या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी खुणावत आहेत. वेबसाईट बनवून देणे, अ‍ॅनिमेशन, कंटेंट प्रोव्हाईड करणे तसेच इतरही अनेक ऑनलाईन मीडियात क्षेत्रांत तुम्ही करिअर करू शकता... वेब डिझाईनिंग : प्रत्येक व्यावसायिक, संस्था, फर्मला स्वतःची वेबसाईट लागतेच. वाढती मागणी पाहता सध्या वेब डिझाईनरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. वेब डिझाइनर होण्यासाठी तुम्हाला कुठल्याही क्षेत्रातील पदवीसहित HTML, जावा स्क्रिप्ट, फ्लॅश, फ्लॅश अ‍ॅक्शन स्क्रिप्ट यांसारख्या तांत्रिक भाषा येणे आवश्यक आहे. याशिवाय इंटरनेट व डिझाईनिंगचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे... (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) मल्टिमीडिया अँड अ‍ॅनिमेशन : भारतात टेलिव्हिजन आणि इंटरनेट यांच्या विस्तारासहित अ‍ॅनिमेशन व स्पेशल एफेक्टस् या कामांशी संबंधित व्यावसायिकांची खूप गरज भासते आहे. या क्षेत्रातील कुशल लोक टेक्स्ट, इमेज, ग्राफिक, ऑडिओ, व्हीडिओ आणि अ‍ॅनिमेशन यांच्याआधारे उत्पादन तयार करतात. पाश्‍चात्त्य देशातील कंपन्याही भारतातील फ्रीलान्सर्सची मदत घेऊन आपले उत्पादन तयार करतात. याची डिलिव्हरीही इंटरनेटद्वारेच होते. ऑनलाईन पब्लिशिंग : आता ऑनलाईन प्रकाशन ही संकल्पना लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुजली आहे. ई-पेपर, ई-बुक्स, ई-न्यूजलेटर्स, ई-मॅगझिन्स इत्यादी तयार करणार्‍या व्यावसायिकांना चांगली मागणी आहे. याशिवाय कंटेंट प्रोव्हाईडर, ग्राफिक डिझाईनर, टेक्निशियन्स आणि ऑनलाईन एस.ई.ओ. मार्केटिंग एक्सपर्ट यांची खूप आवश्यकता असते. लोकांनाही आजकाल छापिल पुस्तके विकत घेण्यापेक्षा ई-बुक वाचणे जास्त सोयीस्कर वाटते. ऑनलाईन मीडिया हे वेगाने पसरत जाणारे क्षेत्र असल्याने येणार्‍या काळात ऑनलाईन मीडियाला खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संधी वेळीच ओळखून तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता... (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 शाहरुखला पाहण्यासाठी गमावला जीव Let's Up Entertainment शाहरूख खानच्या आगामी ‘रईस’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. प्रमोशनसाठी मुंबईहून दिल्लीपर्यंत ट्रेनमधून प्रवास करणा-या शाहरूखला पाहण्यासाठी वडोदरा स्थानकावर झुुंबड उडाली व त्यातच एकाचा मृत्यू झाला. गुजरातमधील वडोदरा स्टेशनवर ही दुर्घटना घडली. वडोदरा स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत समाजवादी पक्षाच्या स्थानिक नगरसेवकाला आपला जीव गमावावा लागला आहे, तर दोन पोलीस जखमीही झाले आहेत. 👉 हृतिक-सुझेनचं ऑल ओके अभिनेता हृतिक रोशन याच्या ‘काबिल’ सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. याआधी तो कंगणा राणावत प्रकरणामुळे चर्चेत होता आणि त्याआधी तो त्याच्या घटस्फोटामुळे चर्चेत होता. आता पुन्हा एकदा हृतिक रोशन आणि त्याची घटस्फोटीत पत्नी सुझेन चर्चेत आले आहेत. नुकतच काबिल सिनेमाचं स्क्रिनिंग संपलं. सुझेनने सुद्धा काबिलची स्क्रिनिंगची पाहिली असून या सिनेमाचं तिने कौतुकही केलं व ती हृतिकच्या पार्टीलाही उपस्थित होती. त्यानंतर हृतिक रोशन आणि सुझेन हे पुन्हा लग्न करणार असल्याची चर्चा इंडस्ट्रीत रंगली आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 माझ्या राजा रं... गाणं रिलीज 'बघतोस काय मुजरा कर’ या आगामी सिनेमातील एक अतिशय हृदयस्पर्शी गाणं रिलीज करण्यात आलं आहे. शिवाजी महाराजांची होत असलेली अवहेलना या सिनेमातून मांडण्यात आली आहे. येत्या 3 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ‘माझ्या राजा रं’ असे या गाण्याचे बोल आहेत. क्षितिज पटवर्धन याने या गाण्याचे बोल लिहिले असून अमितराज यांनी संगीत दिलं आहे. तर आदर्श शिंदे याने हे गाणं गायलं आहे. 👉 राष्ट्रगीताला उभं न राहिल्याने प्रेक्षकाला मारहाण सिनेमागृहात सिनेमाआधी होत असलेल्या राष्ट्रगीताला काहीजण उभे न राहण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा अशीच एक घटना मुंबईत समोर आली असून त्या व्यक्तीला प्रेक्षकांकडून चोप देण्यात आला आहे. मुंबईतल्या गोरेगावमधील एका थिएटरमध्ये 59 वर्षीय प्रेक्षकाला चोप दिल्याचं वृत्त आहे. अमलराज दासन असे त्या व्यक्तीचे नाव असून तो एका थिएटरला ‘दंगल’ सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. सिनेमाच्या एका सीनमध्ये राष्ट्रगीत आहे. त्यावेळी थिएटरमधील सर्वचजण उभे झाले. मात्र या सीनच्या वेळी उभं न राहिल्याने एका प्रेक्षकाने मारहाण केल्याची माहिती आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

शाओमीचा रेडमी नोट 4 विक्रीस उपलब्ध Let's Up Techno Katta शाओमी कंपनीने नवा स्मार्टफोन रेडमी नोट 4 लॉन्च केला असून काल दुपारी 12 वाजतापासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच फ्लिपकार्टवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत 9999 ते 12,999 रुपये असेल तर हा फोन ब्लॅक, गोल्ड आणि डार्क ग्रे कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. रेडमी नोट 4 चे फिचर्स 👉 ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो 👉 प्रोसेसर : 625 स्नॅपड्रॅगन 👉 रॅम : 2/3/4 जीबी 👉 डिस्प्ले : 5.5 फुल एचडी डिस्प्ले 👉 कॅमेरा : रिअर 13 मेगापिक्सेल आणि फ्रंट 5 मेगापिक्सेल 👉 मेमरी : 32 जीबी आणि 64 जीबी 👉 बॅटरी : 4100 mAh (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 2. आयडियाचा 1 GB च्या किंमतीत 15 GB डेटा आयडिया सेल्युलर कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर आणली आहे. ‘फ्लिपकार्ट’वर 4G स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आयडियाचा 15 GB 4G डेटा 1 GB च्या किंमतीत उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्टवर निवडक 4G स्मार्टफोन्सच्या खरेदीवरच ही ऑफर उपलब्ध असेल. कसा मिळेल या स्कीमचा लाभ? 👉 फ्लिपकार्टवरुन खरेदी केलेल्या 4G स्मार्टफोनमध्ये आयडियाचे 4G सिम टाका. 👉 http://i4all.ideacellular.com/offers/get-headerinfo.htm या लिंकवर क्लिक करा. 👉 या लिंकवर तुमचा मोबाईल नंबर नोंदवा. 👉 रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर 1 GB चा रिचार्ज करा. ऑफरनुसार तुमच्या अकाउंटमध्ये 14 GB डेटा जमा होईल. 👉 हा डेटा वापरण्यासाठी 28 दिवसांची मुदत आहे. 👉 31 मार्चपर्यंत तीन वेळा ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

भारतीय सैन्य दलात 264 जागांसाठी भरती Let's Up Job Updates A. 49th SSC (Tech) Men & 20th SSC (Tech) Women Course OCT 2017 : 196 जागा पोस्ट : 49th शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Tech) पुरुष - जागा : 175 पोस्ट : 20th शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Tech) महिला - जागा : 20 पोस्ट : विडोवंस ऑफ डिफेन्स पर्सनल - जागा : 01 B. JAG Entry Scheme 19th Course Oct 2017- SSC Law Graduates : 14 जागा पुरुष - जागा: 10 महिला - जागा: 04 (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) C. NCC Special Entry Scheme 42st Course – OCT 2017: 54 जागा पुरुष - जागा: 50 पुरुष - जागा: 04 शैक्षणिक पात्रता : A : इंजिनिअरिंग पदवी B : 50% गुणांसह पदवीधर, NCC प्रमाणपत्र C : 55 % गुणांसह LLB वय : (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट) A : जन्म दि. 02 ऑक्टोबर 1990 ते दि. 01 ऑक्टोबर 1997 B : जन्म दि. 02 जुलै 1992 ते दि. 01 जुलै 1998 C : जन्म दि. 02 जुलै 1990 ते दि. 01 जुलै 1996 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : A : दि. 22 फेब्रुवारी 2017 I B : दि. 15 फेब्रुवारी 2017 I C : दि. 22 फेब्रुवारी 2017 अधिक माहितीसाठी : https://goo.gl/TKMrn4 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/t09Dr4 (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - निवडणुकीत पारदर्शकतेसाठी अर्थसंकल्पात कोणत्याही विशेष घोषणा होणार नाहीत - निवडणूक आयोग 👉 नवी दिल्ली - परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला, 28 जानेवारी 2018 पर्यंत राहणार कार्यरत 👉 नवी दिल्ली - विजय मल्ल्याच्या कर्ज प्रकरणात सीबीआयने किंगफिशरच्या 4 अधिका-यांसह आयडीबीआय बँकेच्या तीन माजी अधिका-यांना केली अटक 👉 नवी दिल्ली - जलिकट्टूला परवानगी देण्याचे विधेयकही तामिळनाडू विधानसभेत मंजूर झालं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन तात्काळ थांबवावे - रजनीकांत (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 पोर्ट लुईस - भारतीय वंशाचे अनिरुद्ध जगन्नाथ यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानपदाची सूत्र त्यांचा मुलगा प्रवीण्ड जगन्नाथ यांच्याकडे सोपविली 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - ज्यांना माझ्यावर विश्वास नाही त्यांनी आताच पक्ष सोडून जा, माझा निष्ठावंत शिवसैनिकांवर विश्वास - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 👉 पुणे - शिवसेनेशी युती झाली तर ठीक, अन्यथा स्वबळावर लढू, शिवसेनेकडून सकारात्मक प्रस्तावाची वाट पाहत आहोत - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - ‘शांतता क्षेत्रा’त मोडत असलेल्या शिवाजी पार्कवर भविष्यात ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी देणार नाही, असे आश्वासन देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले 👉 मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील नियोजित भव्य स्मारक मुंबईतील गिरगाव चौपाटीवर करावे व वाचलेल्या पैशातून मराठा समाजातील गरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी व आत्महत्याग्रस्त शेतक-यांसाठी ती रक्कम खर्च करावी - ओबीसी संघर्ष समितीची मागणी 👉 सिंधुदुर्ग - बांदा येथे माकडतापाचे आणखी 2 रुग्ण आढळले, रुग्णांची संख्या पोहचली 5 वर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण 🎯 खेळ घडामोडी : 👉 मुंबई - भारत आणि इंग्लंड संघामध्ये 26 जानेवारी पासून होणाऱ्या तीन टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, आर. अश्विन व जडेजाला विश्रांती 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 सातारा - आपले प्राण हातात घेऊन जीवाची बाजी लावून देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी मला सीमेवर जाऊन गायचंय - आशा भोसले (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 नव-नवीन गोष्टी शिकत रहा! 👉 Let's Up Think Katta कुठेतरी-कधीतरी रटाळ वाटायला लागतं सगळंच. नको-नको वाटायला लागतं. असं का होतं? तर आपण नवीन काहीच करत नाही, नवीन काहीच शिकत नाही. असं होऊ नये म्हणून आपण काही गोष्टींवर बारकाईने विचार केला पाहिजे. जीवन हे एक प्रकारचे शिक्षणच आहे असे मानून आपण त्याप्रमाणे वाटचाल करायला हवी. प्रत्येक दिवशी काही तरी नविन शिकलं पाहिजं. ते कसं? त्यासाठी विचार करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र सुधारणा घडवून आणा, विचारांची व्याप्ती वाढवा, स्वत:चे क्षितीज वाढवा. त्यामुळे होईल काय की तुम्ही वृध्द होणार तर नाहीतच, उलटपक्षी सदैव चिरतरुणच राहाल… (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) वृद्धापकाळ किंवा म्हातारपण त्या लोकांमध्येच येत असते, ज्यांच्यामध्ये चांगले मिळविण्याची आशा मावळते, तसेच जे लोक त्यांच्यामध्ये असणार्‍या चौकसबुद्धीला सोडचिट्टी देतात. प्रत्येक तीन ते चार वर्षांनी आपण नव-नविन विषयाला अनुसरा किंवा हात घाला. मग तो कोणताही विषय असो. जसे जपानी भाषा शिकणे, अर्थशास्त्र शिकणे, इतिहास शिकणे वगैरे वगैरे. ह्या तीन चार वर्षात तुम्ही त्याच्यावर प्राविण्य मिळवू शकणार नाहीत, परंतू तुम्ही निश्‍चितच तो विषय समजू शकाल. त्यासाठी पुस्तकांवर प्रेम करा. पुस्तके वाचा. वाचन वाढवा आणि त्यातूनच नव-नविन विषय शिकण्याचा प्रयत्न करा. एका तज्ञांना एकदा विचारले गेले की, तुम्ही केव्हा वाचता? त्यावर त्यांनी प्रतिप्रश्‍न केला की, मी केव्हा वाचत नाही? ते पुढे म्हणाले, सकाळी उठल्यावर, नाश्ता करताना, संध्याकाळी, रात्री म्हणजेच ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल, त्या त्या वेळेस मी वाचन करीत असतो. मग तो विषय कोणताही असो. बरीच माणसे ही त्यांचे शालेय शिक्षण किंवा विद्यापीठीय शिक्षण संपल्यावर वाचन करावयाचेच सोडून देतात. विश्‍वास बसत नाही ना? बरीच माणसे, आपला अमूल्य वेळ हा टी. वी. बघण्यात घालवितात. परंतू मोठ्या माणसांच्या चरित्र वाचनात मात्र घालवीत नाहीत. तर बर्‍याच माणसांनी आपल्या मनाची कवाडेच बंद करून घेतलेली असतात. ते नविन विचारांना आपल्या जीवनात थाराच देत नाहीत किंवा चांगल्या विचारांचा पाठपुरावाच करीत नाहीत. एखादे पुस्तक वाचतांना, त्यातुन मिळणार्‍या एका कल्पनेने किंवा विचाराने तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलू शकते. तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो, तुमची इतरांशी सुसंवाद साधण्याची पद्धत बदलू शकते. एखाद्या पुस्तकात वाचलेली कल्पना तुम्हाला तुमचे आयुष्य वाढविण्यास मदतच करील. तुमच्या आयुष्यात आनंद भरेल किंवा तुम्हाला तुमचा व्यापार-उदीम वाढविण्यास मदत देखील करील. याचाच अर्थ, तुम्ही घरातून बाहेर पडताना एखादे पुस्तक हातात घेवूनच बाहेर पडा आणि सदैव वाचत रहा. वाचन करता-करता आपल्या ज्ञानात भर घालीत जा. ते ज्ञान कधी ना कधी आपल्या उपयोगाचे आहे, हे आपणांस कळून येईल व त्या ज्ञानाचा आपल्या जीवनात उपयोग देखील होईल. म्हणून नव-नवीन गोष्टी शिकत रहा कारण हाच फंडा आपल्यात जीवनात पुढे-पुढे घेऊन जाईल... (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - 1 फेब्रुवारीलाच सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, अर्थसंकल्पामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला 👉 नवी दिल्ली - सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांच्या कोळसा घोटाळ्यातल्या कथित सहभागाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश दिले आहेत 👉 नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाची तयारी जोरात सुरू, पहिल्यांदाच अरबी सैनिक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार 👉 नवी दिल्ली - चिट फंड घोटाळ्यात 15 जणांना 1 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका दाम्पत्याला द्वारका पोलिसांनी केली अटक 👉 लखनऊ - महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे गेल्या कित्येक वर्षांपासून स्वतंत्र राहत आहे, समाजवादी पक्षाचे बडतर्फ नेते अमर सिंह यांचा गौप्यस्फोट 👉 कर्नाटक - येथील रायचूरमध्ये एका महिलेने चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर, या बाळाला नवजात शिशु केंद्रात ठेवण्यात आले आहे (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 श्रीलंकेत यंदा भयानक दुष्काळ, या वर्षात किमान 1 कोटी 50 हजार नागरिकांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - मनसेचे मंगेश सांगळे, काँग्रेसचे कृष्णा हेगडे आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप ताहेल भाजपात दाखल 👉 मुंबई - आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी माजी महापौर आणि शिवसेने नेत्या शुभा राऊळ, नगरसेविका शितल म्हात्रे, सेनेचे स्विकृत नगरसेवक अवकाश जाधव यांच्यावर बोरिवलीतील एमएचबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई वाहतूक विभागाच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी अतिरिक्त पोलीस महासंचालक एसीबी यांना भ्रष्टाचाराची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश 👉 नागपूर - तीन अपत्य असलेल्यांना निवडणूक लढण्यास बंदी करणाऱ्या कायद्याला आव्हान, हायकोर्टाची शासनाला नोटिस 👉 यवतमाळ - यवतमाळ-हिवरी मार्गावर स्कॉर्पिओ-ट्रकच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला, अपघातात सहा जणा ठार, दोन गंभीर जखमी 👉 पंढरपूर - मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सोमनाथ आवताडे, तर उपसभापतीपदी रघुनाथ पडळकर यांची बिनविरोध निवड 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 27117.34, निफ्टी : 8391.50, सोने भाव : 28,768 (प्रतितोळा), चांदी : 41,740 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 नवी दिल्ली - VIVO ने भारतात VIVO V5 प्लस हा स्मार्टफोन केला लाँच, या फोनची किंमत 27 हजार 980 रुपये ठेवण्यात आली आहे 🎯 खेळ घडामोडी : 👉 मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजाला विश्रांती, अमित मिश्रा आणि परवेझ रसूल यांना संधी 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - बास्केटबॉलपटू सतनाम सिंग भामरा यानेही त्याच्या जीवनावर एखादा चित्रपट साकारला जावा अशी इच्छा केली व्यक्त, अभिनेता अभिषेक बच्चनला भूमिकेसाठी दिले प्राधान्य (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 भारतात 45 टक्के वकील बोगस! Let's Up Current Affair गेल्या आठवड्यात बार कौंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी भारताचे मुख्य मुख्य न्यायमूर्ती जे.एस खेहर व अन्य एका न्यायधिशांसमोर वकीलांच्या पदवीवर सुरु असलेल्या पडताळणीमध्ये देशात 55-60 टक्के वकील हे खरे आहेत, अशी माहिती दिली आहे. बार कौंसिल ऑफ इंडियाच्या 2012 मधील निवडणुकींच्या आकडेवारीनुसार आपल्याजवळ 14 लाख वोटर्स वकील होते, पण पडताळणीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर फक्त 6.5 लाख वकीलांची नोंद झाली. मिश्रा पुढे म्हणाले, प्रॅक्टिस करत असलेल्या सर्व वकिलांच्या पदवीची पडताळणी केली असता 45 टक्के पदव्या ह्या बनावट असल्याचे समोर आले. मिश्रा म्हणाले, देशात 30 टक्के वकील बोगस आहेत. जे चुकीच्या पद्धतीने वकिलीची बोगस पदवी मिळवून प्रॅक्टीस करत आहेत. तर 15 टक्के वकिलांकडे अधिकृत पदवीच नाही. या गैरप्रकाराबाबत बार कौंसिल पुढाकार घेणार असून नोंद असलेला प्रत्येक वकील खरोखरीच प्रॅक्‍टिस करतो का? हे पाहण्याचे काम सुरु आहे. तसेच बोगस वकीलांवर कठोर कारवाई करण्याबाबत लवकरच पुढाकार घेऊन कायद्यातच तशी तरतूद करण्याबाबत बार कौंसिल ऑफ इंडियाचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 शिवसेनेचा वचननामा जाहीर बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी वचननामा जाहीर केला. शिवसेनेसाठी 23 तारीख महत्वाची असून आम्ही वचनबद्ध होत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ‘बोलतो ते करुन दाखवतो’, या टॅग लाईनखाली सेनेने आपला वचननामा जाहीर केला. 👉 शिवसेनेचा वचननामा पुढीलप्रमाणे : 👉 महापालिकेत शिक्षण घेणाऱ्या मुलांना महापालिकेच्या नोकऱ्यांमध्ये प्राधान्य 👉 आरेचा आरक्षित हरितपट्टा कायम राखणार 👉 मुंबईत स्वच्छता गृहांची संख्या वाढवणार 👉 वृक्षसंवर्धनासाठी कटीबद्ध राहणार 👉 मुंबईतील जुन्या विहिरीचं पुनर्रज्जिवित करणार 👉 मुंबई मनपा स्वत:चं हक्काचं वीज केंद्र उभारणार 👉 खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढू 👉 मुंबईचं ई-वाचनालंय उभारणार 👉 चार मोठे जलतरण तलाव उभारू 👉 डबे वाल्यांसाठी डबेवाला भवन उभारू 👉 जेनरिक मेडिसीन वाढवण्यावर भर 👉 मुलींसाठी आत्मरक्षण केंद्र उभारणार 👉 पालिकांमध्ये दर्जेदार, पौष्टीक भोजन 👉 मुंबईतील सर्व स्थानकांजवळ दुचाकी स्टँड उभारणार 👉 नॅशनल पार्कमधून गोरेगाव-मुलुंड मार्ग काढणार 👉 शेतकऱ्यांना थेट शेतीमाल विकण्यासाठी केंद्र उभारू 👉 मुंबईतील महिलांसाठी सॅनेटरी नॅपकिन पुरवणार 👉 बेस्टचा स्वतंत्र अर्थसंकल्प नाही (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up Current Affair 👉 नवनीत कौर जाणार भाजपात? नवनीत कौर राणा राष्ट्रवादीला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीमुळे अमरावती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही कार्यक्रमात त्या दिसल्या नव्हत्या, आता मात्र पदवीधर निवडणुकीत मुख्यमंत्र्यांसोबत म्हणजेच भाजपसोबत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम चांगलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं नवनीत कौर राणा यांनी म्हटलं आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 सिंधुताईंच्या गाडीला अपघात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या इनोव्हा गाडीला आज पहाटे 5 च्या सुमारास अपघात झाला असून सुदैवाने सिंधुताई पूर्णपणे सुखरुप आहेत. सिंधुताई पुण्याहून वर्ध्याच्या दिशेने जात असताना हा अपघाता घडला. नागेवाडीजवळ एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात सिंधुताई याच्या गाडीचा अपघात झाला. 👉 जलिकट्टू आंदोलकांवर लाठी हल्ला जलिकट्टू या पारंपरिक खेळावरील बंदी हटवण्यात यावी या मागणीसाठी गेल्या आठवड्याभरापासून मरीना बीचवर आंदोलन करणा-यांवर पोलिसांनी सकाळी कारवाई केली. ' तुमची मागणी आता मान्य झाली आहे, त्यामुळे आता हा परिसर रिकामा करा' असे आदेश पोलिसांनी आंदोलकांना दिले. मात्र आंदोलकांनी जागेवरून हटण्यास नकार देत पोलिसांनी कारवाई केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने बीचवरील परिस्थिती चिघळली आहे. पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांना हटवण्यास सुरुवात केली आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

फिट राहण्यासाठी चालवा नियमित सायकल Let's Up Health Katta तुम्हांला खास वेळ काढून जिममध्ये घाम गाळायला जमत नाही किंवा तुमच्याकडे वेळेची कमतरता असेल तर काही वेळ सायकल चालवलीत तर हाच व्यायामप्रकार तुमच्या आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो, तो कसा त्यावर एक नजर... 👉 काही तास सायकाल चालवल्याने ब्लड सेल्स आणि स्किनमध्ये ऑक्सीजनचा पुरेसा प्रवाह होत असल्याने त्वचा जास्त चांगली आणि चमकदार दिसते. 👉 सायकल चालवणा-यांची ब्रेन पॉवर सायकल न चालवणा-यांच्या तुलनेत 15 टक्के जास्त असते. सायकल चालवल्याने तुमचं हृदय मजबूत राहतं तसेच यामुळे तुमच्या शरिरात ब्रेन सेल्सही वाढतात. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 सायकलींगमुळे हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असलेला रक्तप्रवाह सुरळीत होतो. तज्ज्ञांच्या मते, सायकलींगमुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होऊ शकते. 👉 नियमित सायकल चालवल्यास शरीराचे स्नायू बळकट होतात. विशेषतः, कमरेखालच्या भागाचे म्हणजेच मांड्या आणि पोटर्‍यांचे स्नायू बळकट होतात. 👉 सायकल चालवल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती बळकट होते. तसेच बाह्य संसर्गांपासून शरीराचा बचाव करण्यात हा व्यायाम महत्त्वाची भूमिका बजावतो. 👉 सायकलींगमुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते. त्यामुळे ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी नियमित सायकल चालवण्याचा व्यायाम करावा. 👉 सांध्यातील लवचीकता कायम ठेवण्यासाठी मदत करणार्‍या कार्टिलेजचे संरक्षण करण्यासाठी सायकलींग फायदेशीर आहे. सायकल चालवताना होणार्‍या वर्तुळाकार हालचालींमुळे शरीरास ऊर्जा मिळते आणि सांध्यांची कार्यक्षमताही वाढते. 👉 सर्वात महत्वाचं सायकलींगने तुम्ही तुमचं वाढलेलं वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकता. 👉 जर तुम्ही सकाळी-सकाळी काही वेळ सायकल चालवली, तर तुम्हाला रात्री मस्त झोप लागेल. म्हणजे झोप न येण्याची समस्या दूर होईल. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - केंद्र सरकार पंतप्रधान जनधन खातेधारकांना सामाजिक सुरक्षा देणार, या योजने अंतर्गत खातेधारकांना तीन वर्षांसाठी 2 लाखांचा विमा मिळणार 👉 नवी दिल्ली - लोकप्रतिनिधीची संपत्ती जाहीर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची संपत्ती किती हे आता वर्तमानपत्रातून कळणार 👉 तामिळनाडू - जलिकट्टूवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी सरकारने अध्यादेशाद्वारे उठवल्यानंतर या खेळादरम्यान दोघांचा मृत्यू तर 28 जण जखमी 👉 राजकोट - गुजरातमधील राजकोट येथील कागवाड जिल्ह्यात एकाचवेळी साडेतीन लाख लोकांनी एकत्र येऊन गायले राष्‍ट्रगीत, गिनीज बुकात नोंद 👉 अरुणाचल प्रदेश - आसाम रायफलच्या जवानांनी अरुणाचल प्रदेशातील जयरामपूर जवळील कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला तर दोन जवान शहीद झाले 👉 आंध्र प्रदेश - जगदलपूर-भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसला अपघात, इंजिनासह आठ डबे रुळावरून घसरले, 39 प्रवाशांचा मृत्यू, 100 जखमी (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 वॉशिंग्टन - दक्षिण अमेरिकेतील जॉर्जिया येथे आलेल्या चक्रीवादळामुळे 11 जण ठार तर 23 जण जखमी 🎯 राजकीय घडामोडी : 👉 उत्तर प्रदेश - भाजपने 155 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकज सिंह नोएडातून निवडणूक रिंगणात 👉 मुंबई - युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवेंचा शब्द अंतिम, 'वर्षा'वरील चर्चेनंतर आशिष शेलार यांची माहिती 👉 मुंबई - शाखानिहाय बैठकीत स्वबळावर निवडणूक लढविण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संकेत दिल्याची माहिती 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 पुणे - प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी राज्यातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) 23 छात्रांची निवड 👉 औरंगाबाद - दोन गायींचे दूध प्यायल्याने गावातल्या 81 जणांना विषबाधा, सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे घडली घटना 👉 नाशिक - मध्यवर्ती कारागृहात आरोपींची तुफान हाणामारी, हाणामारी सोडवण्यास गेलेल्या पोलिसांनाही मारहाण, रेडिओचं चॅनल बदलण्यावरुन झाला वाद 👉 जळगाव - भुसावळ रेल्वे पुलाखाली अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांचा बलात्कार, बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, 4 संशयित ताब्यात 🎯 खेळ घडामोडी : 👉 कोलकाता - येथील तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडचा भारतावर 5 धावांनी विजय, भारताने मालिका 2-1 ने घातली खिशात, केदार जाधव मालिकावीर 👉 सरावक - सायना नेहवालची मलेशिया मास्टर्सच्या विजेतेपदाला गवसणी, अंतिम लढतीत सायनाने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगला सरळ गेममध्ये 22-20, 22-20 असा केला पराभव 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - अमीर खानच्या ‘दंगल’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 376.14 कोटीची कमाई करुन नवा विक्रम प्रस्थापित केला (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 उगाच अ‍ॅडजेस्ट करत बसू नका! 👉 Let's Up Think Katta आपण नेहमीच आहे त्या परिस्थितीत स्वतःला अ‍ॅडजेस्ट व्हायचा प्रयत्न करत असतो. उगीच कशाला वाकड्यात शिरायचे म्हणून आपल्याला जी वेडी वाकडी माणसे भेटत असतात त्यांच्याशी पण आपण अ‍ॅडजेस्ट करायचा प्रयत्न करत असतो. खरे म्हणजे यातून लवकर सुटका कशी करून घेता येईल याचे मार्ग आपल्याला दिसत असतात व समजत पण असतात. पण आपण याकडे दुर्लक्ष करत असतो. या सगळ्या भानगडीत आपली बरीच ताकद खर्च होत असते हे मात्र आपल्याला कळत नसते. पण जेव्हा डोक्यावरून पाणी वाहू लागते व यातून आपली सुटका करून घेण्याची वेळ येते तेव्हा सुटका करून घेण्यासाठी लागणारी ‘एनर्जी’ च आपल्याकडे शिल्लक रहात नाही. आपण मग त्यात कायमचे अडकून पडतो व दुसर्‍याला दोष देण्यापलीकडे फारसे काही करू शकत नाही... (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) अगदी हेच सांगणारी बेडकाची कथा पाहूयात. एकदा एका बेडकाला कोमट पाण्यात ठेवण्यात आले. अपेक्षा होती कि, बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल. पण तसे काही झाले नाही. मग हळू-हळू ते पाणी गरम करण्यात येऊ लागले. जसजसे पाण्याचे तापमान वाढू लागले, आतातरी बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल असे वाटू लागले. पण तसे काही घडेना. शेवटी पाणी उकळू लागले तरी पण बेडूक बाहेर येईना. शेवटी त्या बेडकाला जेव्हा उकळत्या पाण्यातून बाहेर काढले तेव्हा तो बेडूक मेलेला आढळला. तुम्हाला वाटेल कि, बेडूक उकळत्या पाण्यामूळे भाजून मेला. पण तसे नव्हते. पाण्याच्या तापमानाप्रमाणे आपल्या शरीराचे तापमान अ‍ॅडजेस्ट करायची एक खास देणगी बेडकाला मिळाली आहे. कारण बेडूक ज्या पाण्यात रहातो त्याचे तापमान नेहमीच कमी जास्त होत असते. बेडकाला कोमट पाण्यात टाकल्यावर बेडकाने आपल्या शरीराचे तापमान पाण्याच्या तापमानाप्रमाणे अ‍ॅडजेस्ट करायला सुरूवात केली. पुढे जस-जसे पाण्याचे तापमान वाढू लागले बेडकाने तोच प्रयोग चालु ठेवला. पण यामध्ये बेडकाची बरीच ताकद खर्च झाली. ज्यावेळी पाणी उकळू लागले व बेडकावर टुणकन उडी मारून पाण्याबाहेर पडण्याची वेळ आली तेव्हा उडी मारायला बेडकाकडे ताकदच शिल्लक राहीली नाही. त्यामूळे बेडकावर मरण ओढवले. जर ज्या वेळी ताकद होती त्यावेळी बेडूक उडी मारून बाहेर पडला असता तर नक्कीच वाचला असता. आपले पण असेच असते. आपण अनेकवेळा संकटे, अडथळे, अडचणी, दुःख, उदासीनता, स्वप्नभंग, निराशा यामूळे वेढले गेलेलो असतो. तसेच आपल्याला पुष्कळवेळा आपल्याला कमी लेखणारी, आपला अपमान करणारी, आपले शारिरीक, मानसीक, भावनीक व आर्थिक शोषण करणारी माणसे भेटत असतात. अशा परिस्थितीला व माणसांना तोंड देण्यासाठी देवाने आपल्याला एक आगळी वेगळी शक्ती बहाल केली आहे. पण आपण तिचा योग्य वेळी वापर करत नाही आणि वापर करायचं असं ठरवतो, तेव्हा सगळं हाताबाहेर गेलेलं असतं...त्यामुळे उगाच अ‍ॅडजस्ट करत बसू नका, परिस्थितीला बळू पडू नका, आपल्यातील शक्तीचा योग्य वेळी योग्य तो वापर करा...! (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - तामिळनाडूच्या लोकांनी जलीकट्टूसाठी दाखवलेल्या एकतेचे कौतुक, सरकार सर्वपरीने त्यांना मदत करेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी 👉 नवी दिल्ली - गरीब वर्गाची सामाजिक सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी जनधन खातेधारकांना पुढल्या 3 वर्षांपर्यंत 2 लाखांचा विमा विनामूल्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विचाराधीन, याबाबत 1 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता 👉 नवी दिल्ली - नजरचुकीने एलओसी पार गेलेले भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांची पाकिस्तानने केली सुटका, चंदू चव्हाण 29 सप्टेंबर 2016 पासून पाकिस्तानच्या ताब्यात होते 👉 तुमकूर - कर्नाटकातील कुनीगल तालुक्यातील शिमशा नदीतील पाणी आटल्यामुळे ही 700 वर्षे जुनी हनुमानाची भव्य दगडी मूर्ती सापडली (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 पाकिस्तान - कुर्रम एजन्सीच्या ईदगाह बाजारात बॉम्बस्फोट, 12 ठार तर 35 जखमी झाल्याचे वृत्त 👉 वॉशिंग्टन - अमेरिकन एअरफोर्सने सीरियातील अल कायदाच्या ट्रेनिंग कॅम्पवर केलेल्या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार, ओबामांनी शेवटच्या तासांत केली कारवाई 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - भाजपच्या निवडणूक समितीने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी केली तयार 👉 मुंबई - मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची 31 जणांची दुसरी यादी जाहीर, यादीत राष्ट्रवादी काँग्रेसने तरुण आणि महिलांना दिले प्राधान्य 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - पंकज भुजबळ यांना 2 लाखांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यावर मिळाला जामीन, मुंबई सत्र न्यायालयाने दिला जामीन 👉 नागपूर - खैरलांजी हत्याकांडातील पीडित आणि एकमेव साक्षिदार भैयालाल भोतमांगे (वय, 62) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन 👉 इंदापूर - पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ लक्झरी बसचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 13 जण जखमी, जखमींवर इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु 👉 सातारा - कास पठारावर शिकारीसाठी आलेले 3 जण ताब्यात, वनविभागाची कारवाई, तिघांविरोधात गुन्हा दाखल 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 झियाओ नान या रोबोट पत्रकाराने लिहिलेली 300 अक्षरांची बातमी चीनमध्ये प्रकाशित, त्याने हि बातमी केवळ एका सेकंदात लिहिली 🎯 खेळ घडामोडी : 👉 कटक - भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये षटकांची गती संथ राखल्याबद्दल इंग्लंडच्या संघाला 10 टक्के तर इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनलाही 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - ‘सरकार 3’ चित्रपटात यामी गौतम पहिल्यादांच निगेटिव्ह भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे 👉 मुंबई - पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका येणार, या पर्वाची कथा पुर्णता नविन असणार आहे (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 इस्रो करणार नवा विक्रम 👉 Let's Up Current Affair येत्या फेब्रुवारी महिन्यात एकाच वेळी 103 उपग्रहांचे प्रक्षेपण करून भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नवा विक्रम रचणार आहे. त्यातील केवळ 3 वगळता बाकी सगळे उपग्रह हे परदेशी आहेत. आजपर्यंत कोणत्याही देशाने अशा प्रकारची कामगिरी केलेली नाही. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण होणार आहे. यावेळी एकाच रॉकेटद्वारे 103 उपग्रह अवकाशात सोडण्यात येतील. त्यातील 100 हे परकीय असून त्यांमध्ये अमेरिका व जर्मनीचाही समावेश आहे. इस्रोच्या लिक्विड प्रॉपल्शन सिस्टिम्स सेंटरचे संचालक एस. सोमनाथ यांनी सध्या चालू असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या दुसर्‍या दिवशी खुल्या सत्रात ही माहिती दिली. एकाच वेळी 100 पेक्षा जास्त उपग्रह सोडून आम्ही शतक गाठणार आहोत, असे ते म्हणाले. इस्रोने आधी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात 83 उपग्रह सोडण्याची योजना बनवली होती. मात्र त्यात 20 उपग्रहांची भर पडल्यामुळे हे प्रक्षेपण एक आठवडा दूर गेले आणि आता ते फेब्रुवारीत पार पडेल, असे सोमनाथ म्हणाले. हे अत्यंत लहान असे 100 उपग्रह असतील. पीएसएलव्ही (पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल) - सी37 या रॉकेटद्वारे त्यांचे प्रक्षेपण होईल. या रॉकेटचे वजन 1350 किग्रॅ असेल, त्यातील 500-600किग्रॅ वजन हे उपग्रहाचे असेल, असे सोमनाथ म्हणाले. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 अ‍ॅप डाऊनलोड ; भारत पुढे अमेरीका-ब्राझील मागे गेल्या वर्षी 2016 साली गूगल प्ले-स्टोरवरून भारतातून जवळपास 6 अब्ज अ‍ॅप डाऊनलोड झाले आहेत. 2015 साली हीच संख्या 3.5 अब्ज एवढी होती. अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या बाबतीत भारताने अमेरीका आणि ब्राझीलला मागे टाकले, असे अ‍ॅप अ‍ॅन संस्थेने म्हटले आहे. त्यांनी अहवालात म्हटले आहे, की अ‍ॅपलच्या आयओएस अ‍ॅप स्टोरवरून कमाईमध्ये चीन हा पहिल्यांदाच सर्वात मोठा स्रोत बनला आहे. मात्र अ‍ॅपलच्या स्वतःच्या अहवालानुसार अमेरिका आणि जपानच्या तुलनेत चीनची बाजारपेठ अजूनही लहान आहे. भारत हा 2016 साली जगातील दुसर्‍या क्रमांकाची स्मार्ट फोनची बाजारपेठ बनला आहे. सध्या फक्त चीनमध्ये भारतापेक्षा अधिक स्मार्ट फोन वापरकर्ते आहेत. 2020 या वर्षाच्या शेवटापर्यंत गूगल प्ले-स्टोरवरून भारतात 20 अब्ज अ‍ॅप डाऊनलोड होतील आणि या यादीत भारत सर्वात वरच्या स्थानी जाईल, याची मोठी शक्यता आहे. भारतात गुगल प्ले आणि आयओएसवरून डाऊनलोड केल्या जाणार्‍या अ‍ॅपमध्ये फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप आणि यूसी ब्राऊजर यांचा क्रमांक सर्वात वरचा राहिला, तर कँडी क्रश, सबवे सर्फर्स आणि टेम्पल रन 2 हे सर्वाधिक डाऊनलोड केले गेलेले गेम्स ठरले आहेत. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 मस्त करिअर : विमानाची देखभाल 👉 Let's Up Career Katta आज जगातल्या विविध देशांकडे मालाची आणि प्रवाशांची वाहतूक करणारी निरनिराळ्या प्रकारची पाच लाखापेक्षा अधिक विमाने आहेत. त्याचबरोबर काही बड्या उद्योगपतींनी आणि व्यापक संपर्क असलेल्या कंपन्यांनी स्वत:ची छोटी विमाने घेतलेली आहेत. जगात अशा छोट्या विमानांची संख्या 40 लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे जगाच्या प्रगतीबरोबर वाढत चाललेलं आणि उत्तम, भरपूर पगाराची नोकरी देणारं करिअर म्हणजे विमानाची देखभाल... भारत विमानांची वेगाने विकसित होणारी बाजारपेठ आहे. अशा विमान कंपन्यांना विमानाची देखभाल करणार्‍या तंत्रज्ञांची तीव्र टंचाई नेहमीच जाणवत असते. त्यामुळे विमानाच्या देखभालीचे शिक्षण घेणार्‍या तरुणांना ही एक उत्तम रोजगार संधी आहे. सध्या भारतातल्या विविध विमान कंपन्यांना अशी माणसे तातडीने हवी आहेत. या कंपन्यांमध्ये हे शिक्षण घेऊन जाणार्‍या विद्यार्थ्यांना दरमहा 25 ते 40 हजार रुपये एवढे वेतन मिळते आणि हे वेतन दरमहा 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. या संबंधातल्या प्रशिक्षणाचे खास अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) विमानाच्या बाबतीत दोन प्रकारच्या नोकर्‍या असतात. विमान चालवणारी एक आणि विमानाची देखभाल करणारी एक. त्यातल्या विमान चालविणाऱ्यांना पायलट असे म्हणतात आणि पायलट होण्यासाठी घ्यावे लागणारे प्रशिक्षण अतिशय महागडे असते. ज्याला साधारणत: 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो. मात्र विमानाची दुसरी शाखा म्हणजे देखभाल करणार्‍या लोकांची शाखा. तिला मात्र प्रशिक्षणासाठी केवळ सव्वा लाख रुपये खर्च येतो. विमानाचा रखरखाव करणार्‍या या लोकांसाठी मोठा अभ्यासक्रम नाही. परंतु काही छोट्या-छोट्या संस्थांचे छोटे छोटे अभ्यासक्रम आहेत आणि हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डायरेक्टर ऑफ जनरल ऍन्ड सिव्हील एरियेशन या संस्थेचे परवाना कम् प्रमाणपत्र मिळवावे लागते. हे प्रमाणपत्र मिळणे म्हणजेच नोकरीची पात्रता. हे प्रशिक्षण घेणारा उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा लागतो. खालील संस्था हे प्रमाणपत्र देतात. 1) स्कूल ऑफ एव्हीएशन सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एअरोनॉटिक्स् ऍन्ड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एअरोनॉटीकल सायन्स, नवी दिल्ली 2) फ्लायटेक एव्हियेशन अकॅडमी, इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनिअरींग, राजीव गांधी एव्हियेशन अकॅडमी ऍन्ड हैदराबाद कॉलेज ऑफ एव्हियेशन टेक, हैदराबाद. 3) एअरोनॉटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लखनौ 4) नेहरू कॉलेज ऑफ एअरोनॉटिक्स् ऍन्ड अप्लाईड सायन्सेस, कोईमतूर, तमिळनाडू. 5) एअरक्राफ्ट मेन्टेनन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिट्यूट, कोलकत्ता 6) व्हीएसएम एअरोस्पेस अ‍ॅण्ड हिंदुस्थान एव्हियेशन अकॅडमी, बंगळूर. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)