fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

رفتن به کانال در Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

نمایش بیشتر
6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
🎯 स्पर्धा परीक्षा; सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी खास टिप्स Letsup I Career Katta सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानासंबंधित प्रश्न विचारले जातात. या सेक्शनच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची व बुद्धिमत्तेची तपासणी केली जाते. खालील काही टिप्सच्या मदतीने तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकता... 1) तुम्ही जर स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षांची तयारी करत असाल तर दररोज वर्तमानपत्र वाचायला हवे. कारण यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, खेळ, बॉलीवूड, उद्योग, अर्थजगत याविषयी माहिती मिळते. 2) चालू घडामोडी किंवा गाजलेल्या बातम्यांची संपूर्ण माहिती मिळवून त्याविषयी टिपण्या काढून ठेवा. परीक्षेच्या वेळी या टिपण्या कामी येतात. 3) सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी इंटरनेट मोठे वरदान आहे. यामुळे तुम्हाला अपडेट राहून सर्व पैलू समजून घेण्यास मदत होईल. 4) स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आधी अभ्यासक्रम समजून घेऊन त्या अनुषंगाने तयारी करा. कारण बँकेच्या परीक्षेसाठी बँकिंग व वित्तविषयक प्रश्न विचारले जातात. परंतु सिव्हिल सर्विसेसाठी राजकारण, समाजशास्त्र व इतर विषयांचा अभ्यास करावा लागतो. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - देशात 5 वर्षांत 1 लाख कोटींचे 23 हजार बँक घोटाळे, रिझर्व्ह बँकेची माहिती; बँकांना 78 कोटींचा चुना ● नवी दिल्ली - लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या टॉप-5 देशांच्या यादीत भारताचा समावेश, भारताचा लष्करी खर्च आता फ्रान्सपेक्षा अधिक ● नवी दिल्ली - महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि बल्लारशहा रेल्वे स्टेशनं देशात सर्वात सुंदर, 10 लाखांचे पहिले बक्षीस मिळवले ● नवी दिल्ली - आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 62 पर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारची पावले ● नवी दिल्ली - व्हेनेझुएला या दक्षिण अमेरिकेतील देशाने भारताला 30 टक्के कमी दराने कच्चे तेल विकण्याची दाखवली तयारी ● मुंबई - शेतकरी कर्जमाफी योजनेला पुन्हा मुदतवाढ, कर्जाच्या वन टाइम सेटलमेंटसाठी 30 जूनपर्यंत मुदत, अर्ज करण्यासाठी 20 मेपर्यंत मुदतवाढ ● मुंबई - ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्येप्रकरणी छोटा राजनसह 9 दोषींना जन्मठेप, विशेष मोक्का न्यायालयाचा निकाल ● सॅन फ्रान्सिस्को - डॉट कॉम किंवा डॉट ऑर्गप्रमाणे लवकरच डॉट अॅपनेही डोमेन रजिस्टर करता येणार ● दुबई - आयसीसी वनडे क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर, टीम इंडियाला मागे टाकून इंग्लंडने वनडेत अव्वल स्थान पटकावले ● दिल्लीचा राजस्थान रॉयल्सवर 4 धावांनी विजय, रिषभ पंत ठरला सामनावीर ● मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, सोनम कपूर, आणि स्वरा भास्कर यांच्या 'वीरे दी वेडींग'मधील 'तरीफा' गाणे झाले रिलीज For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🎯 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 191 जागांसाठी भरती Letsup I Job Update पोस्ट आणि जागा खालीलप्रमाणे : * मार्केटिंग ऑफिसर : 28 * असिस्टंट डायरेक्टर : 03 * असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल) : 04 * लेक्चरर (केमिकल) : 05 * लेक्चरर (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) : 24 * लेक्चरर (प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी) : 07 ------------------------ 👨🎓 ड्रीम जॉब हवाय? मग साईनअप करा शाईन.कॉम सोबत आणि बनवा तुमचं स्वप्नातील करिअर, त्यासाठी क्लिक करा 👉 https://goo.gl/Vs1ZVr ------------------------ वयाची अट : पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत, पद क्र.2 ते 6: 35 वर्षांपर्यंत. नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. फी : General & OBC : ₹25/- (SC/ST/महिला/अपंग : फी नाही) ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 17 मे 2018 जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/TyKXbt ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/YCkKFV For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⛳ छत्रपती शिवरायांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार Letsup I Update छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभे राहणार आहे. छत्रपती शिवरायांचा हा पुतळा जगातील सर्वात उंच (212 मीटर) ठरणार आहे. याविषयीच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 212 मीटरपर्यंत वाढविण्यास मान्यता मिळाली असून स्मारकाच्या कामाला सुरुवातही झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी 2500 कोटींचे कंत्राट मंजूर करण्यात आले असले तरी याचा पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचा एकूण खर्च 3600 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - मोबाईल सिम कार्ड घेण्यासाठी आता आधार कार्डची सक्ती नाही, केंद्र सरकारचे आदेश ● नवी दिल्ली - पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या प्रकरणांवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी विशेष कोर्टाची नियुक्ती करण्यात यावी, सुप्रीम कोर्टाचे आदेश ● नवी दिल्ली - ऐतिहासिक वारसा असलेल्या ताजमहालाच्या रंगात झालेल्या बदलाविषयी सर्वाेच्च न्यायालयाने केली चिंता व्यक्त ● मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीसाठीची ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत 20 मे पर्यंत वाढवण्यात आली ● मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीची 'सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्या'ची राज्यव्यापी अंमलबजावणी मोहीम सुरू ● मुंबई - आता व्हॉट्सअॅपने 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' हे फीचर आणले, या फीचरमुळे ग्रुप अॅडमिनला काही विशेष अधिकार मिळणार आहेत ● मुंबई - टीम इंडियाने आयसीसीच्या सुधारित कसोटी क्रमवारीतले अव्वल स्थान केले आणखी भक्कम ● बेंगळुरू - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने त्यांच्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सवर 14 धावांनी मिळवला विजय, टीम साऊथी ठरला सामनावीर ● नवी दिल्ली - बीसीसीआयमध्ये एक राज्य एक मत अनिवार्य करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास बीसीसीआय तयार ● मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत 8 मे रोजी विवाह बंधनात अडकणार, दोन्ही कुटुंबांनी दिली माहिती For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🎬 श्रीदेवीच्या जीवनावर डॉक्यूमेंट्री येणार Letsup I Update ▪ बॉलिवूडमधील लेडी सुपरस्टार श्रीदेवीचे योगदान कायम प्रेक्षकांसमोर ठेवण्यासाठी तिच्या जीवनावर आधारित एक डॉक्यूमेंट्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ▪ श्रीदेवीशी संबंधित प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकणारी एक विस्तृत डॉक्यूमेंट्री तयार केली जावी, असा बोनी कपूरचा विचार आहे. ▪ सदर डॉक्यूमेंट्रीसाठी बोनी कपूरने अनेक शिर्षकांचा विचार करून ठेवला आहे. ही नावे त्यानी फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशनकडे नोंदवूनही ठेवली आहेत. यात सुमारे 20 शिर्षकांचा समावेश आहे. ▪ या डॉक्यूमेंट्रीमध्ये श्रीदेवीच्या काही प्रकाशात न आलेल्या व्हिडीओंचाही समावेश असेल. याशिवाय श्रीदेवीबाबत अनेक संबंधितांची इंटरव्हूपण असतील. या डॉक्यूमेंट्रीचे दिग्दर्शन करण्यासाठी बोनी कपूरनी शेखर कपूरबरोबर चर्चाही केली आहे, असे समजते आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

🙏 संघर्षाची प्रेरणा देणारा कामगार दिन Letsup I Special Update ▫ देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी 1 मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला जातो. ▫ औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. कामगारांच्या विविध मागण्यांना उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व 1891 पासून 1 मे हा कामगारदिन पाळण्यात येतो. ▫ भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात 1 मे 1923 रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. ▫ दरवर्षी 1 मे रोजी जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो. ▫ कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगारांचा गौरव करण्यात येतो. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

👌 अभिमानास्पद महाराष्ट्र माझा Letsup I Special Update ▫ 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. ▫ 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. ▫ महाराष्ट्र दिन म्हणजे महाराष्ट्रात साजरे होत असलेल्या सण-उत्सवांच्या शृंखलेतील एक भव्यदिव्य असा उत्सवच आहे. हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करणे हे या पवित्र भूमीमध्ये निवास करत असलेल्या प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. ▫ संतभूमी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आदी थोर पराक्रमी महाराजांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राचे नागरिक असणे, हे आपले भाग्यच आहे. अशा पुण्यवंतांच्या महाराष्ट्राचा देशाच्या प्रगतीमध्ये कायमच सिंहाचा वाटा राहिला आहे. ▫ देशाच्या पटलावर महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे की जेथे देशातील प्रत्येक राज्यातील व्यक्तीची काही ना काही कारणास्तव येथे नाळ जोडलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र काय आहे, हे वेगळेपणे सांगण्याची आवश्यकताच नाही. ▫ व्यापकता हा या राज्याच्या मातीतील अलौकिक असा गुण आहे. येथे वर्षानुवर्षे वास्तव्य करत असलेल्या परराज्यातील मंडळींनी तो आत्मसात करून आपापल्या राज्यांत महाराष्ट्रासारखी व्यापक विचारांची विचारधारा रुजवली पाहिजे. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा! For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

LetsUp News Updates ● पाकची नवी कुरापत, भारत आणि पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानने बांधकाम करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर, बीएसएफची करडी नजर ● नवी दिल्ली - नदीकिनारची सर्वाधिक प्रदूषित शहरे महाराष्ट्रात; पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल ● नवी दिल्ली - शारदा चिटफंट घोटाळ्या प्रकरणी इडीने बजावली पी. चिदंबरम यांची पत्नी नलिनी चिदंबरम यांना नोटीस, 7 मेपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश ● पुणे - आयआयटी जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील सुरज कृष्णा देशात पहिला तर अर्णव दातार पुण्यातून पहिला ● मुंबई - शहिदांच्या पत्नींना एसटीचा आजीवन मोफत प्रवास, एका पाल्यास एसटीत नोकरी : परिवहनमंत्री रावते ● मुंबई - सोमवार ठरला घातवार, दिवसभरात विविध ठिकाणी तीन अपघातांमध्ये 14 जणांचा मृत्यू ● मुंबई - पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून विश्वजित कदम यांना उमेदवारी ● भंडारा - लाखनी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या नागपूरच्या वऱ्हाड्यांना ट्रेलरने चिरडले, 8 ठार; 13 जखमी ● पुणे - चुरशीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 13 धावांनी केली मात, शेन वॉटसन ठरला सामनावीर ● मुंबई - 'लय भारी' सिनेमाच्या घवघवीत यशानंतर अभिनेता रितेश देशमुख 'माऊली' या सिनेमातून पुन्हा भेटीला येणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🌾 लवकरच शेतकऱ्यांना 1100 कोटींची मदत Letsup I Update ▪ राज्य सरकारने बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच 1100 कोटींची मदत देण्याचा घेतला निर्णय ▪ बोंडअळीने 43 लाख हेक्टर क्षेत्रापैकी राज्यात 34 लाख हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाल्याचे राज्य सरकारने केलेल्या सर्वेक्षणात आढळले ▪ कीटकनाशकांमुळे भात व इतर खरीप पिकाचेही नुकसान झाले होते. संबंधित शेतकऱ्यांनाही उपरोक्त निधीतून मदत दिली जाणार ▪ पुढच्या आठवड्यात या मदतीचे वितरण सुरू होईल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी दिली माहिती ▪ राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकरी व त्यांचे बँक खात्यांची यादी तयार केली असून शेतकऱ्यांच्या खात्यांवर ही मदत जमा होणार आहे For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - रशियात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात प्रथमच भारत आणि पाकिस्तानचे लष्कर सहभागी होणार ● नवी दिल्ली - केंद्र सरकारने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात केली वाढ, अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली घोषणा ● नवी दिल्ली - भारताच्या 500 हून अधिक वेबसाइट्स हॅक करणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील दोघांना पटियाला हाऊस कोर्टाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ● नवी दिल्ली - भारतीय खेळाडूंनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या, चांगल्या कामगिरीच्या जोरावर पदकं जिंकली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'मन की बात' कार्यक्रमात वक्तव्य ● उत्तर कोरिया मे महिन्यात त्यांच्या देशातील अणू चाचणी परीक्षण स्थळ बंद करणार, दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाची माहिती ● पालघर - लोकसभा पोटनिवडणुकीत युती न करता शिवसेना स्वतंत्र उमेदवार देणार, 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय ● पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील, उपाध्यक्षपदी नवाब मलिक तर खजिनदारपदी हेमंत टकले यांची निवड ● टाटा स्काय कंपनीने नेटफ्लिक्स या व्हिडीओ ऑन डिमांड सेवेसोबत कंटेंटच्या पुरवठ्याबाबत सहकार्याचा करार केल्याची माहिती जाहीर ● सनरायझर्स हैदराबाने राजस्थान रॉयल्सचा 11 धावांनी केला पराभव; कोलकाताचा बेंगळुरूवर 6 गडी राखून विजय ● मुंबई - स्कोर ट्रेड्स इंडिंयाच्या 'परिपक्व' अभिनेत्रींच्या यादीत अष्टपैलू अभिनेत्री दिव्या दत्ता पहिल्या स्थानी तर 'परिपक्व' अभिनेत्यांच्या यादीत अभिनेता सलमान खान सर्वोच्च स्थानी For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👌 धोनी, रैना आणि हरभजनच्या मुलीचा 'हा' व्हिडिओ व्हायरल! Letsup I Update एकीकडे आयपीएलचा थरार सुरू असतानाच दुसरीकडे संघातल्या स्टार खेळाडूंच्या मुली एकमेकींशी मैत्री करण्यात दंग झाल्या आहेत. सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग या तिघांच्या मुलींचा एकत्र खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सुरेश रैनाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/T6XdsR For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

🏏 एमएस धोनीने केला खास विक्रम! Letsup I Update ▫ चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईने जरी पराभव पत्करला असला तरी त्यांचा कर्णधार एमएस धोनीने एक खास विक्रम केला आहे. ▫ हा सामना कॅप्टन कूल धोनीचा आयपीएलमधील कर्णधार म्हणून 150 वा सामना होता. आयपीएलमध्ये 150 सामन्यात नेतृत्व करणारा धोनी पहिलाच कर्णधार ठरला आहे. ▫ कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये सार्वधिक सामन्यात विजय मिळवण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. त्याने 150 आयपीएल सामन्यात नेतृत्व करताना 88 सामन्यात विजय आणि 61 सामन्यात पराभव मिळाले आहेत. ▫ धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 6 वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तर 2 वेळा विजेतेपद मिळवले आहे. ▫ काही दिवसांपूर्वीच धोनीने कर्णधार म्हणून टी-20 मध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. ▫ आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारे कर्णधार - एमएस धोनी : 150 सामने I गौतम गंभीर : 129 सामने I विराट कोहली : 88 सामने I रोहित शर्मा : 82 सामने I अॅडम गिलख्रिस्ट : 74 सामने For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

⚡ अच्छे दिन आनेवाले है : आसाराम बापू Letsup I Update माझे गजाआडचे दिवस अल्पकालिक आहेत, तसेच 'अच्छे दिन आनेवाले है' अशा शब्दांत आसाराम बापू याने ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपल्या साधकांना धीर दिला आहे. आसाराम बापू आणि साबरमती आश्रमातील एक साधक यांच्यात फोनवरून संभाषण झाले. त्या दोघांचे संभाषण 'रेकॉर्ड' करण्यात आले असावे. त्यानंतर ती ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली असण्याची शक्यता आहे, असे जोधपूर मध्यवर्ती तुरुंगाचे महानिरीक्षक विक्रम सिंह यांनी सांगितले. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - मुली आणि मुलांविरुद्ध होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना एकाच दृष्टीने पाहण्यासाठी पॉक्सो कायद्यात बदल करण्यात येणार ● नवी दिल्ली - देशात विकसित झालेल्या लढाऊ विमान तेजसने हवेतून हवेत मारा करणाऱ्या बीव्हीआर क्षेपणास्त्राचे केले यशस्वी परीक्षण ● नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील सिंचनासाठी 13,651 कोटींचा निधी, राज्यातील अपूर्ण 91 सिंचन प्रकल्पांना होणार फायदा ● छत्तीसगड - सुरक्षा रक्षकांनी सुकमामधून तीन नक्षलवाद्यांना केली अटक, पोलीस अधिक्षक अभिषेक मीन यांची माहिती ● मुंबई - मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार केवळ चालढकल करत आहे, त्यामुळे आता शांततेत आंदोलने होणार नाहीत, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा ● मुंबई - आता पालिकेनेही राज्य सरकारच्या पावलावर पाऊल टाकून मान्यताप्राप्त शाळांना देण्यात येणारे अनुदान बंद करण्याचा घेतला निर्णय ● मुंबई - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे राजभवनात 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा होणार, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी दिली माहिती ● गुगल कंपनीने टास्क या नावाने टु-डू-लिस्ट या प्रकारातील नवीन अॅप सादर करण्याची केली घोषणा ● मुंबई इंडियन्सकडून चेन्नई सुपर किंग्जचा 8 गडी राखून पराभव, रोहित शर्मा ठरला सामनावीर ● मुंबई - जगभरात प्रसिद्ध असलेल्या मादाम तुसाद संग्रहालयात सुपरस्टार महेश बाबूचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🎯 जाणून घ्या टेक्नो अपडेट Letsup I Techno Update ▪ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने विविध कंपन्यांच्या प्लॅन्सची तुलना करण्यासाठी ग्राहकांना नवीन टुल केले सादर ▪ अमेझॉनने भारतीय युजर्ससाठी इंटरनेट : फास्ट, लाईट अ‍ॅण्ड प्रायव्हेट या नावाने नवीन अँड्रॉइड वेब ब्राऊजर केले सादर ▪ हुआवे कंपनीने आपला पी20 लाईट हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची केली घोषणा, हे मॉडेल अ‍ॅमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - युपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, 9990 उमेदवारांची झाली निवड, उस्मानाबादचा गिरीश बदोले राज्यात प्रथम तर देशात 20 वा ● नवी दिल्ली - येत्या पाच वर्षांमध्ये 3000 अमेरिकींना भारतात इन्फोसिस कंपनी देणार रोजगार, कंपनीचे अध्यक्ष रवी कुमार यांनी दिली माहिती ● नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदासाठी नऊ जणांच्या मुलाखती 10 मे रोजी होणार ● नवी दिल्ली - लंडन सोडण्याची परवानगी नसल्याने कर्नाटक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू शकत नाही : विजय माल्ल्या ● छत्तीसगड - महाराष्ट्रानंतर छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई, सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश ● मुंबई - कमला मील आग दुर्घटना प्रकरण, मोजो बिस्टो पबचा सहमालक युग टुली याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला ● ठाणे - दाऊदचा हस्तक तारिक परवीनला अटक, मुंब्रा येथील हत्याप्रकरणी बेड्या ● मुंबई - 98 वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन मुलुंडमध्ये होणार; 13 ते 15 जून कालावधीत संमेलन होणार ● नवी दिल्ली - दुकाटी इंडिया 1 मे रोजी आपली नवीन बाईक 2018 मॉनस्टर 821 लॉन्च करणार, या बाईकची एक्स-शोरुम किंमत 10 लाख रुपये इतकी असू शकते ● दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर 55 धावांनी विजय, श्रेयस अय्यर ठरला सामनावीर ● मुंबई - मालवणी भाषेचा तडका आणि रेडियोची धम्माल घेऊन येणाऱ्या 'रेडू' सिनेमाचा गमतीदार ट्रेलर लाँच For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ सोनम कपूरच्या लग्नाबाबत अनेक गोष्टी समोर LetsUp I Update अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाबाबत अनेक महत्वपूर्ण गोष्टी समोर आल्या आहेत. त्यावर एक नजर टाकुयात... ▫ सोनमने लग्नामध्ये जास्त खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने लग्न करण्याचा घेतला निर्णय ▫ पर्यावरण संरक्षणासाठी आणि कागदाचा अपव्यय टाळण्यासाठी सोनमने लग्नपत्रिका न छापण्याचा निर्णय घेतला आहे. पाहुण्यांना लग्नाचे आमंत्रण ई-कार्डद्वारे देण्यात येणार आहे ▫ वांद्र्यामधील हेरिटेज हवेली येथे सोनमचे लग्न होणार असल्याची चर्चा आहे ▫ लग्नापूर्वीचे कार्यक्रम म्हणजे मेहंदी, संगीत हे एकाच ठिकाणी न होता वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत ▫ यातील संगीत कार्यक्रमामध्ये नृत्य दिग्दर्शिका फराह खान कोरियोग्राफी करणार आहे For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

🏏 चॅम्पियन्स ट्रॉफी कायमची रद्द LetsUp I Sports Update ▪ आयसीसीने सर्वानुमते 2021 मध्ये भारतात होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी रद्द करण्याचा घेतला निर्णय ▪ त्यामुळे यापुढे चॅम्पियन्स ट्रॉफीऐवजी टी-20 विश्वचषक पहायला मिळेल ▪ आता 2020 साली ऑस्ट्रेलियात आणि 2021 साली भारतात लागोपाठ दोन टी-20 विश्वचषकांचे आयोजन होईल For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

⚡ राहुल गांधी बचावले; पंतप्रधान मोदींनी फोन करुन केली विचारपूस LetsUp I Update काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विमानाने दिल्लीहून कर्नाटकच्या हुबळी येथे जाताना थोडक्यात बचावले. मात्र हा अपघात नसून घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एवढंच नाही तर काँग्रेसने याविरोधात कर्नाटक पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. हेलिकॉप्टरमधील बिघाडामागे, आंतरराष्ट्रीय टॅम्परिंग असल्याची शंकाही काँग्रेसने व्यक्त केली आहे. यादरम्यानच चीन दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेलिकॉप्टर बिघाडासंदर्भात राहुल गांधी यांना फोन करुन विचारपूस केल्याची माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆