fa
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

رفتن به کانال در Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

نمایش بیشتر
6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
कोरोना निर्बंधमध्ये मोठे बदल; राज्य सरकारचे नवे आदेश LetsUpp | Trending ● कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस कोरोना विषाणू आढळून आल्यामुळे काही प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले आहेत. ● राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता पॉझिटिव्हिटी रेट किंवा बेड ऑक्युपन्सीचं प्रमाण कितीही कमी असलं, तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिका पुढील आदेश येईपर्यंत तिसऱ्या गटाच्या वरच असणार आहेत. ● सरकारने स्थानिक प्रशासनाला निर्बंध कमी करण्याबाबत किंवा वाढवण्याबाबत देखील फक्त RT-PCR चाचण्यांमधून समोर आलेल्या निष्कर्षांनाच आधारभूत मानण्याचे निर्देश दिले आहेत. ● आजच्या निर्देशांनुसार आता निर्बंध कमी करायचे असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून २ आठवड्यांच्या आकडेवारीचा आढावा घेतला जाईल. त्यानुसार निर्णय घेतले जातील. पुढील उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश: * पात्र नागरिकांपैकी ७० टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देणे, यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करणे, कामाच्या ठिकाणीच लसीकरणासाठी प्रोत्साहन देणे * टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणे * हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करणे * मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर चाचण्या करणे * कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारणे * गर्दी करणारे किंवा होऊ शकणारे कोणतेही कार्यक्रम किंवा घटना टाळणे * कंटेनमेंट झोन तयार करताना काळजीपूर्वक आढावा घ्या. जेणेकरून ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, अशाच ठिकाणी निर्बंध लावता येतील ● राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यामुळे त्यासंदर्भात सरकारने तातडीची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. To know more click here https://letsup.app.link/vMVZUaoonhb

उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यावरून उद्योजकाला काळे फासले; इंदापूरमधील प्रकार Letsupp | Trending ● पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे खा. उदयनराजे भोसले यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी उद्योजकाला काळे फासून धिंड काढण्यात आली. https://images.letsup.app/news_video/1624615666.mp4 ● इंदापूरमधील एमआयडीसी उद्योजक अशोक जिंदाल यांची शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या उद्योजकाला काळे फासले आहे. https://images.letsup.app/news_video/1624615500.mp4 ● यावेळी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त केला आहे. त्यानंतर या करण्यात आला आहे. To know more click here https://letsup.app.link/XTsPzEffnhb

दूध दरासंदर्भात दुग्ध विकासमंत्र्यांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा LetsUpp | Trending ● शेतकऱ्यांवर दुधाचे दर कमी झाल्याने मोठं संकट कोसळले आहे. यासाठी राज्यातील विविध संघटनांनी आंदोलन देखील केलं होतं. यानंतर शेतकरी संघटना, विविध सामाजिक संघटना सोबत दूध दरासंबंधी उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ● या बैठकीनंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करण्यात येणार असल्याचं केदार यांनी सांगितलं. आजच्या बैठकीत काय घडलं ? ● दुधाच्या दराच्या संदर्भात आज वेगवेगळ्या प्रतिनिधींशी चर्चा केली. ऊसाप्रमाणे दुधाला एफआरपीप्रमाणेच भाव मिळावा यासाठी कायदा करण्याच ठरलं आहे. त्यासंदर्भात लवकरच कायदा केला जाईल. जेणेकरून दूध उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसू शकणार नाही. ● ऊसाप्रमाणे दुधासाठी किमान आधारभूत दर मिळावा अशा पद्धतीची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे. 25 रुपये लिटर दूध अशी मागणी असली तरी सुद्धा दुधाच्या किमती बाबत वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असंही सुनील केदार म्हणाले. To know more click here https://letsup.app.link/0JtOiUadnhb

photo content

जाणून घ्या! निपाह व्हायरसची कशी होते लागण? लक्षणे आणि उपचार LetsUpp | Covid Helpline ● कोरोना संसर्गाचा सामना करत असताना आता सामन्यांच्या चिंतेत भर घालणारी अजून एक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच निपाह व्हायरस आढळून आला आहे. ● पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या (NIV) शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामध्ये महाबळेश्वरमधील वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये ‘निपाह’ व्हायरस आढळून आला आहे. या विषाणूची लागण कशी होते आणि त्यावर उपचार कसे केले जातात, याबद्दल जाणून घेऊयात…. ● हा व्हायरस २००१ मध्ये पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे निपाह विषाणू सापडला होता. त्यावेळी ६६ रुग्ण आढळले होते. त्यापैकी ४५ रुग्णांचा मृत्यु झाला होता. ● निपाहाची लक्षणे : प्रचंड ताप येणे डोकेदुखी स्नायू दुखी उलट्या होणे मन आखडणे प्रकाशाची भीती वाटणे मानसिक गोंधळ छातीत जळजळणे चक्कर येणे बेशुद्ध पडणे ●व्हायरसची लागण काशी होते ? वटवाघूळ हा नैसर्गिक वाहक असल्याने वटवाघळांनी खाल्लेली किंवा चाटलेली फळं खाल्ल्यानं निपाहचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसंच, एखाद्या व्यक्तीला निपाह विषाणूचा संसर्ग झाला असेल तर त्या व्यक्तीपासून इतर व्यक्तीला देखील याचा संसर्ग होऊ शकतो. ● निपाह व्हायरस वर उपचार कोणते ? या आजारावर अद्याप कोणतेही औषधे व लस सापडलेली नाही, त्यामुळे या विषाणू संसर्गावर थेट उपचार करता येत नाही. एखाद्या व्यक्तीला जर संसर्ग झाल्याचे लक्षात येताच त्यांना प्राथमिक उपचार केले जातात. ● महत्वाची गोष्ट : हा निपाह व्हायरस एका वटवाघळाकडून कोणत्याही दुसऱ्या वटवाघळाला संसर्ग होत नाही. जर एका वटवाघळाला या विषाणूची लागण झाल्याने दुसऱ्या वटवाघळांमध्ये ‘अ‍ॅन्टीबॉडीज’ तयार होतात. कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक गोष्टी तसेच महत्वपूर्ण माहिती आता मिळवा एका क्लिकवर! https://letsup.app.link/04UfoSq9mhb

सावधान! 'पब्जी' गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची भीती LetsUpp | Tech ▪️ 'बॅटल ग्राऊंड्स मोबाइल इंडिया' हा खेळ अधिकृतपणे लाँच झाला नसला तरी एपीके फाईल्सचा वापर करून हा गेम खेळला जात आहे. ▪️ मागील वेळीबंदी आल्याने या गेमची निर्माती असलेल्या क्राफ्टन कंपनीने टेन्सेंट कंपनीशी संबंध तोडल्याचा दावा केला आहे. ▪️ मात्र, अजूनही क्राफ्टन कंपनी टेन्सेंटच्या सर्व्हरवरच काम करत असल्याचे समजते. काय आहे एपीके ? : ▪️ एपीके म्हणजे अँड्रॉइड पॅकेज आहे. अँड्रॉइड आणि गुगलच्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एपीके असते. ▪️ काही ॲप्स गुगलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध नसतात. मात्र, ते एपीकेच्या माध्यमातून डाऊनलोड करता येते. ▪️ एपीकेच्या माध्यमातून डाऊनलोड होणारे ॲप्स बेटा स्टेजवर असतात. ▪️ त्यामुळे वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यांची माहिती चोरली जाण्याचा धोकाही आहे. सीएआयटीने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहून 'बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया' गेमवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या खेळामुळे वापरकर्त्यांची माहिती इतर देशात पाठवली जाण्याची शक्यता असल्याचे सीएआयटीचे म्हणणे आहे. To know more click here https://letsup.app.link/fi0w1IA2mhb

अकरावी प्रवेशाची CET होणार ऑफलाईन LetsUpp | Nagpur दहावीची परीक्षा रद्द करताना अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सामायिक प्रवेश परी
अकरावी प्रवेशाची CET होणार ऑफलाईन LetsUpp | Nagpur दहावीची परीक्षा रद्द करताना अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सामायिक प्रवेश परीक्षा (CET) घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र ही परीक्षा कोणत्या पद्धतीने घेण्यात येईल याची माहिती देण्यात आली नसल्याने याबाबत विद्यार्थी व पालकांत उत्सुकता होती. अखरे शालेय शिक्षण विभागाने 11वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले असून परीक्षेचे प्रारूप कसे असेल यासंदर्भातही अधिसूचना काढली आहे. 11वी प्रवेशासाठी होणारी प्रवेश परीक्षा वैकल्पिक असून ती ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सीईटी परीक्षा घेण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेत सहा सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे. ज्यात शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, एसईआरसीटीईचे संचालक, बालभारतीचे संचालक, परीक्षा परीषदेचे आयुक्त, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक सदस्य सचिव आहेत. To know more click here https://letsup.app.link/9nkiL0iDmhb

अनुसूचित जातीतील १० वीच्या परीक्षेत ९०% गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा LetsUpp | Trending ● अनुसूचित जातीतील १० वीच्या परीक्षेत ९०% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. ● ११ वी व १२ वी या दोन वर्षात प्रत्येकी एक लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. ● अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना MH-CET, JEE, NEET यांसारख्या व्यावसायिक अभयसक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे. याबाबत विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येणारी मागणी पाहता ही योजना लागू करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले होते. ● बार्टीच्या ३० व्या नियामक मंडळाची दि. २१ जून रोजी बैठक पार पडली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या आत असणे अनिवार्य असणार आहे. ● तसेच शासकीय सेवेत नोकरीला असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही योजना लागू असणार नाही. उत्पन्नाचा व जातीचा प्रमाणित दाखला देणे अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील लाभार्थी संख्या अमर्यादित असणार आहे, अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे. To know more click here https://letsup.app.link/U0oix1XWlhb

https://www.youtube.com/watch?v=mGii24Lo7ko पुण्यातील आंबील ओढा अतिक्रमण कारवाईबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय LetsUpp | Trending ● पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील आज सकाळपासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू होती. यावेळी नागरिकांनी आक्रमक होत या कारवाईला मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. ● काहींनी आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता. महापालिकेच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. ● या संदर्भात हनुमंत फडके यांनी या संदर्भात महापालिका न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीची सुनावणी झाली. पुढील आदेशापर्यंत कारवाईला स्थगिती देण्यात आल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले. ● यामुळे कारवाई दरम्यान सुरू झालेला नागरिक व प्रशासन यांच्यातला संघर्ष तूर्तास संपण्याची शक्यता आहे. To know more click here https://letsup.app.link/3j3OvIKBlhb

सर्वसामान्यांना किंचित दिलासा! खाद्यतेलांच्या किंमतीत घट LetsUpp l Trending ● काही दिवसांपासून खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये कोरोना काळात मोठी वाढ झाल्याचे आपण पाहिले आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात सुरू केल्याने आता त्यांच्या किंमतीत ३० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. ● देशात खाद्यतेलाची मागणी जास्त व पुरवठा कमी असल्यामुळे खाद्यतेलांच्या किमतीत सुमारे ४० टक्के वाढ झाली होती. ● देशात खाद्यतेलापैकी ६० टक्के आयात करण्यात येते; तर ४० टक्के उत्पादन स्वदेशातच होते. खाद्यतेलाची आयात वाढविल्याने आता किमतीमध्ये घसरण झाली आहे. नवीन किंमती : तेल : (प्रतिकिलो दर) शेंगदाणा : १५० रुपये सूर्यफूल : १४० रुपये सोयाबीन : १३० रुपये पामतेल : १२५ रुपये To know more click here https://letsup.app.link/RadPkxeFlhb

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? LetsUpp | Breaking ● डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येणार आहेत. या बाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाऊ शकतो. ● काही जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ आणि बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यांमुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी झाल्याचं समजते. आत्यवशक सेवा वगळता इतर दुकानांच्या वेळा पुन्हा कमी करण्यात येऊ शकतात. ● राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण आहेत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होऊ नये. ● डेल्टा प्लस व्हेरियंट तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ शकतो, हा धोका ओळखून राज्य सरकार लॉकडाऊन करण्याच्या तयारीत असल्याचं समजतेय. ● राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय 20 दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. पण निर्बंध शिथिल केल्यापासून कोरोनाबाधितांच्या प्रमाणात वाढ होत आहे. ● त्यातच डेल्टा प्लस व्हेरियंटचे विषाणू आढळल्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याबाबत मंत्रिडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. To know more click here https://letsup.app.link/4UzGuI9tlhb

फेक अकाउंटवर निर्बंध घालण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! २४ तासांत बंद होणार फेक अकाऊंट Letsupp | Trending ● सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बनावट अकाउंट बनवून अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना समोर येतात यासाठी आता फेक अकाउंटवर निर्बंध घालण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. या नियमाचा नव्या आयटी नियमांत अंतर्भाव करण्यात आला आहे. ● फेक अकाऊंटबाबत तक्रार आल्यास ट्विटर, फेसबुक, इस्टाग्राम आणि युट्युब सारख्या सोशल मीडिया कंपन्यांना ते अकाऊंट तक्रारीनंतर २४ तासांच्या आत हटवावे लागेल. कोणत्याही सामान्य व्यक्तीकडून फेक अकाऊंट बाबत तक्रार आल्यास ते २४ तासांच्या आत हटवणे अनिवार्य असणार आहे. ● अनेकदा फॉलोअर्स वाढवणं, संबंधित व्यक्तीवर निशाणा साधणं किंवा बेकायदेशीर कृत्य यासाठी सेलिब्रेटी किंवा अन्य प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने अकाऊंट ओपन करण्यामागे उद्देश असू शकतो. मात्र याला आळा घालण्यासाठी पुढील काही दिवसांत माहिती तंत्रज्ञान FAQ जारी करेल, हे प्रश्न नव्या नियमांशी संबंधित असतील. तसंच सोशल मीडिया युजर्संना याचा कसा फायदा हेईल आणि फेक अकाऊंट बाबत इतर संभाव्य उपायांचा यात समावेश असेल. ● या फेक अकाऊंटमुळे सामान्यांपासून आतापर्यंत कोट्यावधी डॉलर्सचे नुकसान झाले असून कित्येक वेळा फेक अकाऊंटचा वापर गुन्हेगारीसाठी केला जातो. काही कॉर्पोरेट फेक अकाऊंटमधून फिशिंग हल्ले, खोटे प्रॉ़डक्ट्स विकणे आणि स्कॅम चालवणे अशी अवैध कामे केली जातात. To know more click here https://letsup.app.link/i7q2yDFulhb

मृणाल गोरे समाजवादी कार्यकर्त्या ते राजकारणी झंझावात LetsUpp | Special ● मृणाल गोरे (२४ जून, इ.स. १९२८; खेड) या भारतातील समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले. महाराष्ट्र विधानसभेत आमदार होत्या. तसेच सहाव्या लोकसभेत या खासदार होत्या. त्यांचा जन्मदिवसानिमित्त कारकिर्दीचा घेतलेला आढावा... ● मृणाल गोरे यांनी राष्ट्र सेवा दल संघटनेच्या माध्यमातून तरुणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली. इ.स. १९७२ मध्ये मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या. मुंबईच्या गोरेगाव उपनगरात त्या पाणीवाल्याबाई म्हणून प्रसिद्ध होत्या. ● पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी ५ डिसेंबर १९५८ रोजी 'केशव गोरे स्मारक ट्रस्ट' स्थापन केला. गोरेगावातील आरे रोडला या ट्रस्टची भव्य इमारत आहे. ● यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत लाटणे मोर्चा निघाला होता. लाटणे मोर्चा-जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रीयांनी 1972 मध्ये महाराष्ट्रात आपली संघटीत ताकद दाखवून दिली. ● 1989 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना गोरे या विरोधीपक्षनेत्या होत्या. आणीबाणीच्या काळामध्ये त्यांनी विरोधात भूमिका घेतली. तुरुंगवासही भोगला. ● 1977 मध्ये त्या लोकसभेवर निवडून गेल्या. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी गोरे यांचे नाव मंत्रिपदासाठी सुचवले होते, पण मंत्रिपदापेक्षा लोकांमध्ये राहून काम करण्यात आपल्याला जास्त रस असल्याचे सांगत त्यांनी नकार दिला होता. ● संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्या अग्रेसर होत्या. १७ जुलै २०१२ रोजी वसई येथे हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप https://letsup.app.link/y1BA5Qoslhb

दिलासा! देशात गेल्या ९१ दिवसांतील सर्वांत कमी रुग्ण LetsUpp l Positive News ● भारतात गेल्या २४ तासात कोरोनाचे ४२,६४० नवे रुग्ण समोर आले तर, १,१६७ जणांचा मृत्यू झाला. गेल्या ९१ दिवसातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. ● उपचाराधीन रुग्णांची संख्या ७९ दिवसानंतर प्रथमच सात लाखाच्या (६,६२,५२१) खाली आली आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या २,९९,७७,८६१ झाली आहे. कोरोना विषाणूने देशभरात आतापर्यंत ३,८९, ३०२ जणांचा बळी घेतला आहे तर, ६८ दिवसात प्रथमच रुग्णसंख्या घटून १,१६७ झाली आहे. ● दरम्यान, राज्यात मंगळवारी ८,४७० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, १८८ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. ● राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,८७,५२१ झाली असून, बळींचा आकडा १,१८,७९५ झाला आहे. सध्या १,२३,३४० रुग्ण उपचाराधीन आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर https://letsup.app.link/AErjFGx2jhb

पाहा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय LetsUpp | Trending राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (२३ जून) पार पडली. यावेळी मंत्रिमंडळाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले, जाणून घ्या त्या निर्णयांविषयी. ● जालना जिल्ह्यातील हातवन बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पास २९७ कोटींची प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता ● प्रधानमंत्री कृषी सिंचन आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत केंद्रीय अर्थसहाय्य व राज्य हिश्यापोटी नाबार्डकडून प्राप्त कर्जाची रक्कम राज्य शासनाच्या निधीत जमा करण्याचा निर्णय ● नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सवलतधारक कंपनीच्या मालकी हक्कात बदल करण्यास मान्यता ● करदाते व वस्तू व सेवा कर विभाग यांच्यातील वाद कमी करण्याच्या दृष्टीने सुधारणा; महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक, २०२१ प्रख्यापित करणार ● मुंबईच्या गोरेगांवमधील पत्राचाळीतील रहिवाशांचे पुनर्वसन करणार; कालबद्ध पुनर्वसन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना ● मराठवाडा विभागातील पिण्याच्या पाण्याची ग्रीड टप्प्याटप्प्याने करणार; पैठणपासून सुरुवात करण्यास मान्यता *To know more click here https://letsup.app.link/adXKrrV7jhb

पोटनिवडणुकांवरून फडणवीसांचा सरकारला इशारा! LetsUpp | Trending ● राज्यासमोर करोनाचं संकट उभं असताना राज्य सरकारनं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन फक्त दोनच दिवसांचं करण्याचा निर्णय घेतला आहे. ● मात्र, असं असताना राज्यात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्यपदाच्या २०० जागांसाठीच्या पोटनिवडणुकांची घोषणा मात्र राज्य सरकारने केली आहे. ● पुढील महिन्यात यासाठी मतदान होणार असून त्यावर आता विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं कठोर शब्दांत टीका करायला सुरुवात केली आहे. ● राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी या निवडणुकांवरून थेट राज्य सरकारला उघड आव्हानच दिलं आहे! ● भाजपा या सगळ्या जागांवर फक्त ओबीसी उमेदवार लढवेल. जिंकलो, हरलो तरी आम्हाला पर्वा नाही. आम्ही त्या जागा ओबीसींसाठी आरक्षित आहेत असं समजून ओबीसी उमेदवार लढवू. ● जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भाजपा शांत बसणार नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले. To know more click here https://letsup.app.link/WuAmYMJ4jhb

LetsUpp Marathi - آمار و تحلیل کانال تلگرام @letsup