fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

رفتن به کانال در Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

نمایش بیشتر
6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
💥 *धारावीत कोरोनाचा शिरकाव...* *LetsUp | Mumbai* धारावीत एका सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली असून वरळी कोळीवाडय़ापाठोपाठ दाटीवाटीच्या धारावीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. धारावीत कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आधीच आरोग्य विभागाची चिंता वाढली असताना आता अजून एक रुग्ण सापडला आहे. धारावीत एका सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली असून महापालिकेच्या 52 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा सफाई कर्मचारी वरळीचा रहिवासी आहे. धारावीत त्याला तैनात करण्यात आले होते, करोनाची लक्षणे आढळल्याने अधिकाऱ्यांना त्याला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितलं होते. दरम्यान, या सफाई कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर असून त्याचे कुटुंब आणि सहकाऱ्यांना क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

😱 *नगरमध्ये आणखी 6 कोरोना पॉझिटिव्ह* *LetsUp I Ahmednagar* 💁‍♂️ कोरोना विषाणु साथसाखळीच्या आज सकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या 51 अहवालांमध्ये 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली आहे. 👉 त्यामुळे नगरमधील कोरोनाबाधितांचा आकडा 14 वर पोचला आहे. पुणे प्रयोगशाळेकडून आज सकाळी हे अहवाल प्राप्त झाले असून यामुळे खळबळ उडाली आहे. 📍 जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या या अहवालांची पडताळी केली जात असून, हे नव्याने आलेले 6 पॉझिटिव्ह नेमक्या कोणत्या परिसरातील आहे, याची माहिती काढली जात आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

😷 *जाणून घ्या जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या* *LetsUp | International* 🌎 कोरोनाबाधितांची संख्या अधिक जास्त वेगाने वाढत असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने नऊ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 🧐 कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झालेल्या देशांमधील कोरोनाबाधिताची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांचे आकडे दिले आहेत. ● जर्मनी - 77,981 (931) ● फ्रान्स - 56,989 (4,032) ● इराण - 47,593 (3,036) ● यूके - 29,474 (2,352) ● स्वित्झर्लंड - 17,768 (488) ● टर्की - 15,679 (277) ● बेल्जियम - 13,964 (828) ● नेदरलँड - 13,614 (1,173) ● ऑस्ट्रीया - 10,711 (146) ● दक्षिण कोरिया - 9,976 (169) ● कॅनडा - 9,731 (114) ● पोर्तुगाल 8,251 (187) ● ब्राझील 6,931 (244) ● इस्राईल 6,092 (26) ● ऑस्ट्रेलिया 5,105 (23) ● स्वीडन 4,947 (239) 👍 *जगातील सुपरफास्ट अपडेटसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *अमेरिका : 912 जणांचा मृत्यू!* *LetsUp l International* ⚡ अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहे. मंगळवारी कोरोनाच्या संसर्गाने एकाच दिवसांत तब्बल 912 जणांचा मृत्यू झाला. तर, तब्बल 24 हजार नवे रुग्ण आढळले. 💁‍♂️ कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकन सरकारची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेतील मृतांची संख्या ही चीनच्याही पुढे गेली आहे. 👀 जगभरातील सुमारे 180 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अवघ्या तीन महिन्यांत कोरोनाचा संसर्ग जगभरात पसरला आहे. 🧐 *धक्कादायक आकडेवारी* : अमेरिकेत आता एक लाख 88 हजारहून अधिक कोरोनाग्रस्त असून चार हजारांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. 📍 न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचे 75 हजार रुग्ण आढळले असून 1714 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील एकूण मृतांपैकी न्यूयॉर्कमधील संख्या ही जवळपास 40 टक्के आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🍻 *दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी!* *LetsUp l Update* ⚡ मेघालय सरकारने 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दारुची होम डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली आहे. 👨‍⚕️ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनच्या आधारावर दारुची होम डिलिव्हरी केली जाणार आहे. आरोग्याची जीवनावश्यक गरज म्हणून गरजू ग्राहकांसाठी ही तात्पुरती सोय करुन दिली जात असल्याची माहिती मेघालय सरकारने दिली आहे. 2️⃣ यापूर्वी केरळमध्येही असाच निर्णय घेतला होता. त्यामुळे दारुची होम डिलिव्हरी करणारे मेघालय हे दुसरे राज्य ठरले आहे. 🧐 आरोग्यासाठी आवश्यक म्हणून मेघालय सरकारने दारुची होम डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली आहे. वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनवरच ही दारु दिली जाणार असल्याचे मेघालय प्रशासनाने स्पष्ट केले. 📌 *विशेष* : 14 एप्रिलपर्यंत दारुची विक्री करता येणार असल्याचे एक्साईज विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🗞️ *आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी* ▪️ दिल्लीतील निजामुद्दीनच्या तबलिग जमात मकरजमधील प्रवाशांमुळे देशात कोरोना रुग्ण वाढले; आरोग्य मंत्रालयाचा धक्कादायक खुलासा ▪️ कोरोनाच्या लढाईतील शहीदांच्या कुटुंबीयांना 1 कोटींची मदत; दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा ▪️ 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झाली अमेरिकेची अवस्था; आतापर्यंत 4 हजार मृत्यू तर 19 हजार संक्रमित ▪️ कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत हज यात्रेला येऊ नका; सौदी सरकारने केलं जगभरातील मुस्लिमांना आवाहन ▪️ नागरिकांना 3 महिने आधीच एकत्रित धान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला मागे; 3 महिने प्रत्येक महिन्यात धान्य देण्याचा आदेश ▪️ राज्यातील 5 हजार जणांना केलं कॉरेंटाईन; सर्व जण कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळून संपर्कात; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती ▪️ राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने लावली हजेरी; रब्बी पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ▪️ करोना व्हायरसमुळे जगभरात झालेल्या लॉकडाऊन स्थितीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स अ‍ॅप्सचे 6.2 कोटी डाउनलोड्स; यूजर्समध्ये 70% वाढ ▪️ कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे IPL स्पर्धा होणार कि नाही याबाबत अनिश्चितता; चेन्नई सुपर किंग्जची मार्केट व्हॅल्यू घटली. ▪️ रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया, या सरोजिनी नायडू यांच्यावरील बायोपिकमध्ये झळकणार 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🧐 *आधीचे पॉझिटिव्ह अहवाल नंतर निगेटिव्ह* *LetsUp I Update* 💁‍♂️ खासगी लॅबमधून प्राप्त झालेले कोरोना पॉझिटिव्ह अहवाल सरकारी लॅबमध्ये पुन्हा तपासणी केल्यावर निगेटिव्ह आले असल्याची बाब समोर आली आहे. याविषयी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. 🗣️ *टोपे म्हणाले..:* ▪️ खासगी लॅबमधून रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, ते सरकारी लॅबमध्ये पुन्हा चेक केले असता, निगेटिव्ह आले, तर काही निगेटिव्ह आलेले अहवाल पुनर्तपासणीनंतर पॉझिटिव्ह आल्याचे उघड झाले आहेत. ▪️ काही खासगी लॅबकडून वेळेत अहवाल प्राप्त होत नाहीत. अहवाल देण्यासाठी सामान्यतः एक ते दोन दिवस घेतले जातात. ▪️ खासगी लॅबमध्ये किट्स उपलब्ध नसल्यामुळं तपासणीला विलंब होतो. नमुन्यांच्या तपासणीला अधिक कालावधी लागल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली असावी. 📍 दरम्यान, राज्यात मुंबईत सर्वाधिक म्हणजे 162 करोनाबाधित झाले असून 5 हजार जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

सर्वात फास्ट न्यूज आणि लोकल अपडेट आता केवळ एका क्लिकवर.📱 त्यासाठी आजच डाऊनलोड करा आपल्या भाषेतलं आपलं अ‍ॅप "लेट्सअप अ‍ॅप"! #LetsUp #LatestUpdates #NewsUpdates #Marathi #NewsApp #LetsUpApp

photo content
+1

😱 *नगरमध्ये सापडले आणखी दोन कोरोना बाधित व्यक्ती* *LetsUp | Ahmednagar* ⚡ जिल्ह्यातील एका पॉझिटिव्ह कोरोना बाधितचा रिपोर्ट आजच निगेटिव्ह आल्याचा दिलासा मिळतो तोच नगर शहरात आज अजून दोन कोरोना बाधित सापडले आहे. 👉 दरम्यान; हे दोघेही परदेशी नागरिक असून यामधील एक व्यक्ती फ्रान्स तर दुसरा आयव्हरी कोस्टचा असल्याची माहिती मिळते आहे. 👉 दरम्यान त्यांच्याशी संबंधित 09 व्यक्तींनाही ताब्यात घेण्यात आले आहे, या सर्वांचे स्त्राव चाचणीसाठी पुण्याला पाठवले आहे. 👉 तसेच या व्यक्ती ज्यांच्या संपर्कात होत्या त्या संबंधित व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे. 👉 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी व स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

photo content

😱 *कोरोना! इटलीत 24 तासांत 900 हून अधिकचा मृत्यू* *LetsUp | International* 😰 कोरोना संसर्गाचे केंद्र झालेल्या इटलीमध्ये दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत चालला आहे. 🧐 *मोठी जीवितहानी* : जगात सर्वाधिक जीवितहानी इटलीत झाली असून मागील 24 तासांत 900 हून अधिकजणांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. 😷 तर, 86 हजारहून अधिकजणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्पेनमध्येही परिस्थिती चिघळत असून एकाच दिवसात 700 हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. 🌎 युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर करोनाचा संसर्ग फैलावत आहे. ब्रिटन, स्पेन, जर्मनी सारख्या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावला आहे. 🏥 संपूर्ण जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🚫 *कलम 144 : राज्यात जमाव बंदी सुरू* *LetsUp | National* ⚡ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यरात्रीपासून 144 कलम लागू केले आहे. 📅 31 मार्चपर्यंत जमाव बंदी लागू राहणार असून या काळात संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. 👏 कोणीही घराबाहेर पडू नये. विनाकारण गर्दी करू नये. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. 👮‍♂ जमाव बंदीचं काटेकोर पालन होण्यासाठी राज्यातील सर्वच भागांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. 💁‍♂ *या गोष्टी सुरु राहणार* : आजपासून औषधे, भाजीपाला, किराणा दुकाने, धान्याची आवक, बँका आदी वगळता इतर सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. 👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🔥 *जालन्यात पेट्रोल भरताना दुचाकी पेटल्या* *LetsUp | Jalana* 👉 येथील लक्ष्मीचंद बेचरदास भारत पेट्रोल पंपावर एका दुचाकीच पेट्रोल भरताना अचानक आग लागली. 👉 अचानक लागलेल्या या आगीत दोन दुचाकी जळून खाक झाल्या. शुक्रावारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. 👉 पेट्रोल भरत असताना अचानक पेट घेतल्याने अवघा ४ मिनटात दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या. 👉 दुचाकीची पेट्रोल पुरवठा करणारी नळी चिरलेली असल्याने गरम झालेल्या इंजिनवर पेट्रोल पडले आणि तात्काळ दुचाकीने पेट घेतला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 👉 तर त्यामागे उभ्या असलेल्या दुचाकीचे टाकीचे झाकण पेट्रोल भरण्यासाठी उघलेले होते म्हणून त्या दुचाकीलाही आग लागली. 👉 अवघ्या काही मिनटातच पेट्रोल पंप कर्मचारी व पोलीसांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणती ही जिवीत हानी झाली नाही. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *पत्रकाराला पोलिसांची बेदम मारहाण* *LetsUp | Aurangabad* 💫 कोरोनामुळे संपूर्ण राज्य लॉकडाऊन झाले असून विशिष्ट घटक वगळता कुणालाही बाहेर फिरण्याची मुभा नसून ओळखपत्र जवळ असताना देवगड येथे एका पत्रकराला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ⚡ औरंगाबाद-नगर प्रवास करताना देवगडजवळ पत्रकाराला मारहाण झाली असून याबाबत त्यांनी पोलीस महासंचालकाला अर्ज पाठवला आहे. 👉 त्यामध्ये त्यांनी नमूद केले की, देवगडहून औरंगाबादला जाताना माझी गाडी अडविण्यात आली. त्यांना आपण पत्रकार असल्याचे सांगून ओळखपत्रही दाखवले. ⚡ मात्र तरीही पोलिसांनी मारहाण केली असून अरेरावीची भाषा करत शिवीगाळ ही करण्यात आली. 📍 यावेळी उपस्थित सर्व अधिकारी हा प्रकार पाहत होते. पायांना इजा झाली असून मानसिक खच्चीकरण झाले आहे. 📌 दरम्यान, उपस्थित सर्व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होऊन संबंधित पोलिसांवर कारवाई व्हावी, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *'हे' बनले कोरोना संसर्गाचे नवे केंद्र!* *LetsUp l International* ⚡ महासत्ता असणारी अमेरिका कोरोना संसर्गाचे नवे केंद्र बनल्याचे समोर आले आहे. 💁‍♂️ जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत असून चीन, इटलीलाही मागे टाकले आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी उपाययोजना आखल्यानंतरही अमेरिकेत कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणावर झाला आहे. 😨 *गंभीर परिस्थिती* : गुरुवारी एकाच दिवसात अमेरिकेत 17 हजार करोनाबाधित रुग्ण आढळले. अमेरिकेत आतापर्यंत 83 हजार 500 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, चीनमध्ये 81 हजार 782 आणि इटलीत 80 हजार 589 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 👉 *मृत्यू* : अमेरिकेत कोरोनामुळे 1300 जणांचा मृत्यू झाला, चीनमध्ये 3292 आणि इटलीत सर्वाधिक 8215 जणांचा मृत्यू झाला आहे. 📌 *10 पटीने वाढ* : अमेरिकेत गत आठवड्यात 8 हजार कोरोना रुग्ण आढळले होते. तर, या आठवड्यात त्यांची संख्या 85 हजार झाली आहे. एकाच आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या 10 पटीने वाढली आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🧐 *देशात एका दिवसात सात जणांचा मृत्यू!* *LetsUp l Update* ⚡ देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 700 च्या पुढे गेली आहे. 💁‍♂️ गुरुवारी देशभरात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशात करोनामुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. 👉 21 दिवस संपूर्ण लॉकडाउन असून, या संकटकाळात केंद्र सरकारने विशेष आर्थिक पॅकेजही जाहीर केले आहे. 📍 जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. कोरोनाने जगभरात 21 हजार जणांचे बळी घेतले आहेत. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💊 *औषधांची होणार ‘होम डिलिव्हरी'!* *LetsUp l Update* ⚡ कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या लॉकडाऊन केल्यामुळे नागरिकांना दैनंदिन अत्यावश्यक सेवा-सुविधा मिळवण्यासाठी घराबाहेर पडता येत नाही. 👍🏻 *परवानगी* : तोडगा म्हणून कोणाला औषधे आणण्यासाठी घराबाहेर पडता येत नसल्यास त्यांना आता घरपोच औषधे पुरविली जाणार आहेत. केंद्र सरकारने औषध कंपन्यांना तशी परवानगी दिली आहे. 📍 अशा प्रकारे औषधांची होम डिलिव्हरीसाठीची अधिसूचना लवकरच राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

*कोरोनाचा झटका* *LetsUp | Editorial* कोरोनाच्या प्रभावामुळे गेल्या तीन महिन्यांत जगातील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला आहे. आता तर भारतात २१ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडेल, हे सांगण्यासाठी कोणा अर्थतज्ज्ञांची गरज नाही. अगोदरच गेल्या दोन वर्षांपासून भारताच्या आर्थिक विकासाची गती मंदावली आहे. आता तर एप्रिल-जून तिमाहीचा जीडीपी ग्रोथ वेगाने कमी होईल. लॉकडाऊनमुळे देशाचे अंदाजे १२० अब्ज डॉलर (नऊ लाख १२ हजार कोटी रुपये) नुकसान होण्याची शक्यता आहे. हे एकूण जीडीपीच्या चार टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केल्यानंतर, या वर्षीची जीडीपीती वाढ दोन टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच जागतिक संस्था, तसेच रिझर्व्ह बँकेनेही भारतीय विकासाचा दर साडेचार टक्क्यांच्या आत राहील, असे म्हटले होते. आता त्याच हिशेबाने बार्कलेज बँकने अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाबाबत दिलेल्या एका संशोधन अहवालातील निष्कर्ष पाहिले, तर आर्थिक विकासाचा दर अडीच टक्के राहील, असा अंदाज आहे. चार आठवडे देश पूर्णपणे बंद आणि त्यानंतर आठ आठवड्यांसाठी काही अंशी बंद होईल असे समजून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. पूर्ण आर्थिक वर्षाचा अहवाल पाहिला, तर देशाचा आर्थिक विकास दराची गती साडेतीन टक्के राहील, असे त्यात म्हटले आहे. २०२१ मध्ये विकासाचा वेग वाढून तो ८.२ टक्के तर २०२१-२२ मध्ये आठ टक्के असेल, असे या संस्थेने म्हटले आहे. जगातील विविध बँकांनी तेथील उद्योगधंद्यांना सावरण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देण्याबरोबरच व्याजाचे दर कमी केले आहेत. आता रिझर्व्ह बँक रेपो दर ६५ बेसिस पॉइंटने कमी करेल, असा अंदाज बार्कलेने म्हटले आहे. जून-ऑगस्टच्या पतधोरण आढाव्यात शंभर बेसिस पॉइंट कमी होण्याची शक्यता आहे. आर्थिक विकासदरातील घसरणीमुळे सरकारला आर्थिक ध्येय गाठण्यात अडचणी येऊ शकतात. एकीकडेही स्थिती असताना देशभरातील लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या वर्गाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. अरविंद केजरीवाल सरकारने हातावर पोट भरणा-यांसाठी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली असली, तरी इतर राज्यांत मात्र तशी तरतूद करण्यात आलेली नाही. ज्यांनी कर्ज घेतलेले आहे किंवा हप्त्यावर काही वस्तू घेतलेल्या आहेत, अशा लोकांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊनमध्ये कमाईच नसल्यामुळे हप्ता कसा भरायचा, हा प्रश्न आहे. पैसे कमवलेच जात नाहीत, तर ईएमआय भरायचा कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्र सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. त्याचे स्वागत करताना आणखी काही उपाययोजनांची आवश्यकता आहे. इतर बँकांच्या एटीएम मशिनमधून पैसे काढण्यावरील शुल्क आणि बचत खात्यांत किमान शिल्लक न ठेवण्याबद्दल असलेला दंड यात पुढील तीन महिने सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केला. ग्राहक बँकेमध्ये येऊ नयेत, यासाठी ही पावले उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🎯 *जगातील ‘या’ देशात भारतीय रुपयाची चलती!* *LetsUp I Special* जगात वेगवेगळ्या देशांची चलने वेगळी आहेत. आज आपण जगातील अशा 5 देशांबद्दल माहिती पाहणार आहोत जिथे भारताचा रुपया मजबूत आहे. *जाणून घेण्यासाठी क्लिक करा* : https://bit.ly/3amcmLP 👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : https://letsupapp.page.link/apps