LetsUpp Marathi
رفتن به کانال در Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
نمایش بیشتر6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
6 624
मंत्रिमंडळ विस्तारात आज शपथविधी घेणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर...
(स्रोत : लेट्सअप न्यूज नेटवर्क)
-
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त #LetsUppApp वर!
https://letsupapp.page.link/apps
(Link in the bio)
6 624
👍 मोठी बातमी! राज्यात 15 जुलैपासून शाळांची घंटा वाजणार
LetsUpp | Breaking
💁 कोरोना नियंत्रणात आल्या नंतर आता राज्यातील शाळा सुरु होणार आहेत 15 जुलैपासून कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली.
👌 कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य सरकारच्या शिक्षण विभागातने शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर आता शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शाळा सुरु होणार असल्या तरी त्यासाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत. या नियमात बसणाऱ्या ठिकाणच्या शाळाच सुरु होऊ शकणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर करताना काही सूचना देण्यात आल्या आहेत
👉 *या असतील त्या सूचना*
● ज्या गावात एक महिन्यापासून कोरोना नसेल
● कोरोना संदर्भात गावकऱ्यांमध्ये जागृकता असेल अशा गावात
● गाव पातळीवरील समिती म्हणजेच सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, वैद्यकीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्यामाध्यमातून निर्णय घेण्यात येईल
● गावात भविष्यात देखील कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची योजना असेल अशा ठिकाणी शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/ZungTx0hHhb
6 624
महाराष्ट्रातील चौघांचा मंत्रिमंडळात समावेश; जाणून घेऊया त्यांच्याविषयी सविस्तर ...
LetsUpp | Trending
● केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात ४३ मंत्री शपथ घेत आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.
नारायण राणे
● महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत.
● जुलै २००५ मध्ये त्यांनी भारतीय कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यापूर्वी ते शिवसेनेचे सदस्य होते.
● पुत्र निलेश नारायण राणे व नितेश नारायण राणे हेदेखील राजकारणी आहेत.
● १ ऑक्टोबर २०१७ रोजी सर्व पक्षांमधून बाहेर पडून ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या पक्षाची स्थापना केली.
● भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आणि ते भाजपकडून राज्यसभेवर निवडून आले.
● १५ ऑक्टोबर २०१९ रोजी ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले आणि त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलीन झाला.
● ७ जुलै २०२१ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री
भारती पवार
● मूळ गाव कळवण या आदिवासी तालुक्यातील आहेत. त्यांचे माहेर व सासर दोन्ही नाशिकचे आहे.
● शरद पवारांचे निकटवर्ती ए टी पवार यांच्या स्नुषा आहेत.
● महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष होत्या.
● दोन वेळा उमराणे व मानूर गटातून जिल्हा परिषद सदस्य
● २०१४ मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली. त्यात त्यांचा परावभव झाला.
● ५ जुलै २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
● २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिंडोरी मतदारसंघातून निवडून आल्या.
● ७ जुलै २०२१ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री
कपिल मोरेश्वर पाटील
● आगरी समाजाचे मोठे नेते आहेत
● १९८८ साली पहिल्यांदा दिवे-अंजुर ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून निवडून आले
● ठाणे जिल्हापरिषद अध्यक्ष म्हणून निवड.
● ठाणे जिल्ह्याला प्रथम केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.
● भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत.
● मार्च २०१४पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सभासद होते.
● ७ जुलै २०२१ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री
डॉ. भागवत कराड
● औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
● औरंगाबाद शहराचे दोनवेळा महापौर होते.
● भाजप राज्य कार्यकारणीचे उपाध्यक्ष होते
● दोन वर्षे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते.
● २२ जुलै २०२० रोजी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
● ७ जुलै २०२१ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री
To know more click here
https://letsup.app.link/aFxJt2NkHhb
6 624
मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या नेत्यांची यादी जाहीर; महाराष्ट्रातून 'या' नेत्यांना संधी
LetsUpp | Trending
👉 2019 मध्ये केंद्रात बहुमताने सत्तारुढ झालेल्या नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार पार पडतो आहे. सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्ष उलटल्यानंतर आता मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय.
👉 केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार थोड्या वेळात होणार आहे. केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 43 नेत्यांची यादी जाहीर केली.
👉 महाराष्ट्रातून राज्यसभा खासदार नारायण राणे आणि भिवंडीचे खासदार कपील पाटील यांचं नाव निश्चित झाले आहेत. तसंच दिंडोरीच्या खासदार भारती पवार, राज्यसभा भागवत कराड यांचंही निश्चित झाले आहे.
1. नारायण राणे
2. सर्बानंद सोनोवाल
3. डॉ.विरेंद्र कुमार
4. ज्योतिरादित्य सिंदीया
5. रामचंद्र प्रसाद सिंह
6. आश्विनी वैष्णव
7. पशुपती कुमार पारस
8. किरेन रिजीजू
9. राजकुमार सिंह
10. हरदीप सिंघ पुरी
11. मनसुख मांडविय
12. भुपेंद्र यादव
13. पुरषोत्तम रुपाला
14. जी.कृष्णा रेडेडी
15. अनुराग ठाकूर
16. पंकज चौधरी
17 अनुप्रिया सिंग पटेल
18 सत्यपाल सिंघ भाघेल
19 राजीव चंद्रशेखर
20 सुश्री शोभा करंडलजे
21 भानू प्रताप सिंघ वर्मा
22दर्शना विक्रम जर्दोष
23 मिनाक्षी लेखी
24 अन्नपूर्णा देवी
25 अे नारायणस्वामी
26 कौशल किशोर
27 अजय भट्ट
28 बी.एल. वर्मा
29. अजय कुमार
30. चौहान देवूसिंह
31. भागवत खुबा
32. कपिल मोरेश्वर पाटील
33. सुसरी प्रतिमा भौमिक
34. सुभाष सरकार
35 भागवत कृष्णराव कराड
36 राजकुमार रंजन सिंग
37 डॉ. भारती प्रविण पवार
38. बिश्वेशवर तुडू
39. शंतनू ठाकूर
40. मुंजापारा महेंद्रभाई
41. जॉन बार्ला
42. डॉ. एल. मुरुगन
43. नितीश परमानिक
To know more click here
https://letsup.app.link/QUjGrbjfHhb
6 624
विस्तारापूर्वी 'या' केंद्रीय मंत्र्यांनी दिला राजीनामा
LetsUpp | Trending
▪️ केंद्र सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. बुधवारी संध्याकाळी ६ वा. नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
▪️ दरम्यान, मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातील अनेक नेते दिल्लीत पोहचले आहेत.
▪️ यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, सर्बानंद सोनोवाल, पशुपति पारस, नारायण राणे आणि वरूण गांधींचा समावेश आहे.
▪️ विद्यमान मंत्रिमंडळातून पाच ते सहा मंत्र्यांना वगळून त्यांना पक्षाच्या कामात घेतले जाण्याची शक्यता आहे.
▪️ तसेच, उत्तर प्रदेशसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे.
▪️ दरम्यान, डॉ. हर्षवर्धन, बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, देवोश्री चौधरी, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया आणि प्रताप सारंगी यांनी विस्तारापूर्वी राजीनामा दिला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/kDREFR29Ghb
6 624
धोनीच्या 'या' कामगिरीने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला...!
LetsUp | Birthday Special
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 40 वा वाढदिवस. वयाच्या 23 व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भारताला क्रिकेटमध्ये नंबर वनवर पोहचवणं असो किंवा वर्ल्ड कप जिंकून देणं असो प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशी कामगिरी धोनीने वारंवार करत क्रिकेटरसिकांवर आपली विलक्षण छाप पाडली. आज त्याच्या कारकिर्दीतील काही विशेष कामगिरीवर नजर टाकुयात...
1) आयसीसीच्या सर्व मालिका जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीने 2007मध्ये टी-20, 2011मध्ये वनडे वर्ल्ड कप तर 2013मध्ये आयसीसी चॅम्पियन्स टॉफी जिंकली होती.
2) 2007मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषक जिंकला होता. टी-20 प्रकारात सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीचा विक्रम आहे. त्याने 72 पैकी 41 सामन्यात विजय मिळवला आहे.
3) धोनी हा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. त्याने भारतीय संघाला 27 कसोटी, 110 वनडे आणि 41 टी-20 सामन्यात विजय मिळवून दिला आहे.
4) ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2009मध्ये प्रथमच कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते.
5) धोनीने केवळ 42 सामन्यात आयसीसीच्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान काढले होते. आयसीसी क्रमवारीत इतक्या वेगाने अव्वल स्थान गाठणारा धोनी हा सर्वात वेगवान क्रिकेटपटू ठरला आहे.
6) धोनीने अनेक वेळा षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. वनडेत धोनीने 9 वेळा षटकार मारून विजय मिळवून दिला असून हा देखील एक विक्रम आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
7) वनडेत विकेटकिपर म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्याने वनडेत नाबाद 183 धावांची खेळी केली आहे.
8) 2015मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत 3-0 असे पराभूत केले होते. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या 140 वर्षाच्या इतिहासात प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर एखाद्या संघाने क्लीन स्वीप केले होते.
9) धोनीने आत्तापर्यंत 350 वनडे सामने खेळले आहेत. या सामन्यातून त्याने 229 षटकार मारले आहे. वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही विकेटकिपरला अशी कामगिरी करता आलेली नाही.
10) 2011च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीने षटकार मारत 28 वर्षानंतर भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. ज्या बॅटने धोनीने षटकार मारला होता त्याचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावात बॅटची किमत एक लाख पाऊंड इतकी मिळाली.
11) दुसऱ्यांदा फलंदाजी करत आत्तापर्यंत चार वेळा विश्वचषक जिंकला आहे. यातील 2011मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध 274 धावा करत मिळवलेला विजय हा सर्वोच्च आहे. यात धोनी असा एकमेवर फलंदाज आहे ज्याने षटकार मारत विजेतेपद मिळवले आहे.
12) विकेटकिपर असून देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 22 षटके टाकण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. 2009च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध एक विकेट देखील घेतली होती
13) धोनीने अनेक वेळा धावांचा पाठलाग करताना विजय मिळवून दिला आहे. वनडेमध्ये धोनी 78 वेळा नाबाद राहिला आहे. हा देखील हा एक विक्रम आहे.
14) सातव्या क्रमांकावर फलंदाजीकरत सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीने 33 सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत 2 शतके केली आहेत. यामध्ये नाबाद 139 ही सर्वोच्च खेळी आहे.
15) धोनीने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी केवळ 14 खेळाडूंना करता आली आहे. पण 50हून अधिकच्या सरासरीने 10 हजार धावा करणारा धोनी हा पहिला खेळाडू आहे. अशी कामगिरी विराट कोहलीने देखील केली आहे.
16) धोनीला चौकार आणि षटकारांचा राजा या नावाने ओळखले जाते. त्याने एकदिवसीय सामन्यात 826, कसोटीत 544 आणि टी-20मध्ये 116 चौकार लगावले आहेत. षटकारांबद्दल म्हणायचे झाल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये 228 षटकार तर, कसोटीत 78 आणि टी-20मध्ये 52 षटकार लगावले आहेत.
धोनीने भारतीय संघाचे 10 वर्ष नेतृत्व केले आहे. 2007मध्ये टी-20च्या विजेतेपदापासून सुरु झालेला धोनीचा प्रवास 2017मध्ये संपला. कर्णधार म्हणून धोनीने भारतीय संघाचे 332 सामन्यात नेतृत्व केले. यात 60 कसोटी, 200 वनडे आणि 72 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे.
सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/wQUjAzkKGhb
6 624
BMC निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का; 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
LetsUpp | Trending
💁♂️ महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला आहे.
🤦♀️ मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर सिंह यांचा भाजपा प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
👉 उत्तर भारतीय समाजाचे नेते म्हणून कृपाशंकर सिंह यांनी मुंबईत दबदबा ठेवला होता. २०१९ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून दूर होते.
🗣️ मोदी सरकारने काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर काँग्रेसच्या भूमिकेशी फारकत घेत कृपाशंकर सिंह यांनी केंद्र सरकारचं कौतुक केले होते.
🤝 त्यानंतर पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत कृपाशंकर सिंह यांनी १० सप्टेंबर २०१९ रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यापासून कृपाशंकर सिंह भाजपात जातील अशी शक्यता वर्तवली जात होती.
🤔कोण आहेत कृपाशंकर सिंह
👉 मुंबईतील कलिना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर ३ वेळा आमदार झालेले कृपाशंकर सिंह हे विलासराव देशमुख सरकारच्या काळात गृहराज्यमंत्री पदी होते. त्याआधी विधान परिषदेचे सदस्य होते.
To know more click here
https://letsup.app.link/da5Tkp84Ghb
6 624
तुम्हाला सिमकार्ड बंद करण्याचा फोन आलाय? मग सावधान!
LetsUpp | Trending
⚡ कोरोनामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले असतानाच सायबर ठगांच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे नागरिकांना फसविण्याचे प्रकार वाढत आहेत.
📲 अशातच कागदपत्रे अपुरे आहेत, कार्ड जुने झाले आहेत अशी विविध कारणे देऊन सिमकार्ड बंद करण्याची भीती घालून फसवणुकीचा धंदा जोर धरू लागला आहे.
💸 मुंबईत नुकतेच एका वयोवृद्ध डॉक्टरला सिमकार्डसाठी दहा लाख गमाविण्याची घटना ताजी असतानाच खारमधील ७६ वर्षीय आजोबांना पावणे तीन लाखांना फटका बसला आहे.
👴🏻 वांद्रे परिसरात राहणारे ७६ वर्षीय मोहनबीर चंदेलसिंग यांना २४ जानेवारी रोजी व्होडाफोनमधून बोलत असल्याचे सांगून सीमकार्ड बंद होणार असल्याचे सांगितले.
👉 मोबाईल क्रमांक सुरू ठेवण्यासाठी मोबाईलवर पाठविलेल्या लिंकमध्ये माहिती भरण्यास सांगितले. गुगल पेबाबतही विचारणा केली.
🧐 गुगल पे नसून नेटबँकिंग असल्याचे सांगताच, ठगाने त्यांना दहा रुपये ऑनलाईन व्यवहार करण्यास सांगितला. ते पैसे पुन्हा मिळणार असल्याचे सांगताच, त्यांनी विश्वास ठेवून पैसे पाठविले.
💬 काही मिनिटात त्यांच्या खात्यातून २ लाख ८५ हजार रुपये काढल्याचा संदेश मोबाईलवर आला. तब्येत ठीक नसल्याने त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहता आले नाही.
👮🏻 अखेर, नुकताच पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत. त्यामुळे त्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
नागरिकांनी 'हे' करावे :
● कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून खासगी माहिती शेअर करू नये.
● येणाऱ्या कॉल, संदेशाबाबत अधिकृत ठिकाणी जाऊन खातरजमा करावी.
● कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लीक करू नये.
● कोणत्याही कॉलबाबत संशय येताच जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/pT7TNoyYGhb
6 624
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
LetsUpp l Trending
⚡ उच्च शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
💁♂️ आता महाडीबीटी पोर्टलवरून दि. १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. उच्च शिक्षण विभागाकडून १४ शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जातात.
📚 दरम्यान मात्र, २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज केले आहेत, मात्र काही त्रुटीअभावी विद्यार्थ्यांच्या लॉगीनवर हे अर्ज परत पाठवले आहेत, अशांना १५ जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.
👨🏻💻 2020-21 या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत, त्यांनाही अर्ज करण्यासाठी संधी मिळणार आहे.
💁🏻♀️ यापुढे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिले जाणार नसल्याचे उच्च शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ. अजिता शिंदे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
👉 विद्यार्थ्यांनी भरलेले शिष्यवृत्ती अर्ज संस्था अथवा विभागस्तरावर दररोज निकाली काढणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत अर्ज प्रलंबित ठेवू नयेत.
🧐 प्रलंबित राहिलेल्या अर्जासोबत भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या बाबीस संस्थेचे प्राचार्य जबाबदार राहतील, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
● शिष्यवृत्तीसाठी नव्याने अर्ज करण्यासाठी...:
- mahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा.
पोर्टलवर लॉग इन व्हा.
- तुमचे प्रोफाईल तयार करा.
- ज्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात त्यासाठी अर्ज करा.
● पुन्हा अर्ज करणाऱ्यांसाठी...
- लॉग इन करा.
- त्रुटी असलेला अर्ज दिसेल.
- त्यामध्ये दुरुस्ती करून पुन्हा एकदा सबमिट करा.
To know more click here
https://letsup.app.link/Uwg14QOQGhb
6 624
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन
LetsUpp l Trending
⚡ हिंदी चित्रपट सृस्ष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते.
🏥 दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.
👉 काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
🙏 रुग्णालयात दाखल केल्यापासूनचं त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते.
📍 पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/l3WoWSSDGhb
6 624
भाजपच्या निलंबित आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट
LetsUpp | Trending
● ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली.
● भाजपच्या निलंबित आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत स्वत:ची बाजू त्यांच्यासमोर मांडली. या प्रकरणी यथोचित कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे आमदारांनी सांगितले.
● 'विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आज घडलेल्या प्रकाराबद्दलची माहिती आम्ही राज्यपालांना दिली. त्यांच्याकडे आम्ही सत्यकथन केलं. घडलेल्या घटनेबद्दलचा अहवाल मागवून त्यासंदर्भात उचित कार्यवाही करण्याची विनंती आमच्याकडून राज्यपालांना करण्यात आली.
● राज्यपालांनी आमची बाजू ऐकून घेतली. त्यांनी काही प्रतिप्रश्न केले. त्यानंतर त्यांनी योग्य निर्णय घेण्याची ग्वाही दिली,' अशी माहिती निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
To know more click here
https://letsup.app.link/fyVtrgy8Dhb
6 624
मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा
LetsUpp | Trending
▪️ सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे.
▪️ मराठा समाजाला एसईबीसीतून आरक्षण देण्याबाबतचा अडसर दूर करण्यासाठी केंद्र सरकारने संविधानात यथोचित सुधारणा करून आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्याबाबतचा केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव विधानसभा व विधान परिषदेत मंजूर करण्यात आला आहे.
▪️ तर एसईबीसी आरक्षणाबाबतच्या न्यायालयीन लढ्यामुळे रखडलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील एसईबीसी उमेदवारांना वयाच्या ४३ वर्षांपर्यंतची सवलत तसेच परीक्षा शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
▪️ तसेच २०१४ च्या ईएसबीसी कायद्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे ११-११ महिन्यांच्या नियुक्त्या देण्यात आलेल्या उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.
▪️ त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यापूर्वी २०१४ च्या ईएसबीसी कायद्यांतर्गत झालेल्या सर्व नियुक्त्या कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/KShfun9VDhb
6 624
ब्रेकिंग! 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
LetsUpp | Trending
👉 महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात कोविड मुक्त गावातील ग्रामपंचायतीनं त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या शाळेतील इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरु करणेबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा.
👉 शाळा सुरु करताना मुलांना टप्प्या टप्प्यात शाळेत बोलवण्यात यावं. म्हणजेच अदला बदलीच्या दिवशी, सकाळी आणि दुपारी महत्वाच्या विषयांना प्राधान्य देत शासनानं दिलेल्या कार्यपद्धतीचं पालन करण्यात यावं.
💁♂️ कोरोना संबंधी अशी आहे नियमावली
👉 एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे, लगेच कोरोना चाचणी करुन घेणे
💁♀️मार्गदर्शक सूचना
👉संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
👉शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे;
👉शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे.
👉Thermometer, जंतूनाशक, साबण पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच वापरण्यात येणारे thermometer हे calibrated contactless infrared digital thermometer असावे.
👉एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.
👉 क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.
🤒 शिक्षकांची कोविड-१९ बाबतची चाचणी:
👉 संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड- १९ साठीची RTPCR / RAPID ANTIGEN चाचणी करावी.
👉 बैठक व्यवस्था:
👉वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतरच्या नियमांनुसार असावी.
👉वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.
To know more click here
https://letsup.app.link/ekL5jwQXDhb
6 624
इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!
LetsUpp | Trending
● राज्यातील 18 हजार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
● मेस्टा संघटनेकडून फी मध्ये 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
● तसेच कोरोनामुळे पालक गमावलेल्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
● अनेक पालकांनी शुल्क न भरल्याने शाळा चालवणे अवघड झाले आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने 15 टक्के फी करण्याचे सूचित केले होते. त्यामुळे मेस्टाने हा निर्णय घेतला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/gusCDUOzDhb
6 624
MPSC च्या रिक्त जागा संदर्भांत उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
LetsUpp | Trending
● 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, ही महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली आहे.
● दरम्यान, एमपीएससी परीक्षेसंदर्भात राज्य सरकार समिती गठित करणार असल्याची माहिती आहे. ही समिती एमपीएससी परीक्षा संदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/OP7gzkwBDhb
6 624
पॅराऑलम्पिक स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड
LetsUpp | Trending
● येत्या ऑगस्टमध्ये टोकियो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॅराऑलम्पिक स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर झाला असून नांदेडच्या अष्टपैलू खेळाडू भाग्यश्री जाधव यांची निवड झाली आहे.
● भारतीय संघात निवड होणाऱ्या भाग्यश्री जाधव या महाराष्ट्रातील एकमेव अष्टपैलू खेळाडू आहेत.
● नवी दिल्ली येथे 29 व 30 जून रोजी आंतरराष्ट्रीय पॅराऑलम्पिक स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली, या चाचणीत चार महिला खेळाडूंची निवड करण्यात आली, त्यातून जाधव या एकमेव महाराष्ट्रातील खेळाडू आहेत.
● नांदेड जिल्ह्यातील होनवडज येथील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्री जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून खेळात प्राविण्य मिळविले .
● सन 2019 मध्ये झालेल्या चीन येथील जागतिक पॅराॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत तिने दोन कास्य पदके मिळवून त्यावर भारताचे नाव कोरले होते.
To know more click here
https://letsup.app.link/v8qsfinzChb
6 624
https://www.youtube.com/watch?v=ZpmNKqnAlGQ
एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने जीवन संपविले... पहा संपूर्ण व्हिडिओ...
एमपीएससीच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरी न मिळाल्याने पुण्यातील एका विद्यार्थ्याने जीवन संपविले. ही घटना फुरसुंगी जवळील गंगानगर येथे घडली. स्वप्नील सुनील लोणकर असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
6 624
IPS अधिकारी शिवदीप लांडेंनी दिला युवकांना मोलाचा सल्ला
LetsUpp l Trending
● MPSC परीक्षा उत्तीर्ण करूनही नोकरी न मिळाल्याने पुण्यात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर सर्वच स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
● स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर त्यांचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी म्हटलंय की, केवळ नोकरीच्या परीक्षेत पराभव होणं म्हणजे अंत होत नाही. आयुष्य खूप सुंदर आणि आशावादी आहे.
● आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात तेव्हा वाटतं आता आपण थकलोय. पुढे काहीच दिसत नाही. परंतु अंधारानंतर प्रकाश दिसतो. मला देखील असा अनुभव खूपदा आला आहे. हिंमत न हरता मी पुढे गेलो आणि शेवटी आज इथपर्यंत येऊन पोहचलो आहे असं त्यांनी सांगितले.
● तसेच जर मला कोणती सरकारी नोकरी मिळाली नसती तर मी अन्य काही रोजगार करून माझ्या कुटुंबाची जबाबदारी आनंदाने सांभाळली असती. कारण माझ्या आयुष्यावर केवळ माझा हक्क नाही.
● प्रत्येक पराभवातून आपल्याला ताकद घ्यायला हवी. विश्वास ठेवा, पराभवातून विजय साकारण्याच्या जिद्दीला हे जग सलाम करतं असंही आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी सांगितले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/TP5HAmtnChb
