fa
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

رفتن به کانال در Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

نمایش بیشتر
6 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
photo content

🚩 स्वराज्यध्वज यात्रेचा दिमाखदार शुभारंभ, रोहित पवार उभारणार जगातील सर्वांत उंच ध्वज LetsUpp | Trending ● रोहित पवारांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचा आज शुभारंभ करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू संतश्री गोदड महाराज यांच्या मंदिरात गुरूवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ध्वजाचे पूजन करण्यात आले. ● आमदार रोहित पवार यांनी पुष्पाभिषेक करून ध्वजाचे पूजन केले.या पूजनानंतर स्वराज्यध्वज यात्रेस सुरूवात करण्यात आली. १२ हजार किलोमीटरचा प्रवास करून स्वराज्यध्वज पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे. ● भगव्या ध्वजावरून विविध राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या हाणामारीच्या वातावरणात स्वराज्याचा भगवा ध्वज आमदार रोहित पवार यांनी आपल्या खांद्यावर घेतला आहे. ● महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, भारतातील ६ राज्ये, ७४ प्रेरणास्थळे असा महत्वाकांक्षी प्रवास करून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. हा ७४ मीटर लांबीचा आगळा-वेगळा भगवा ध्वज देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज असणार आहे. 👍 महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी यात्रा ● निजामाविरूद्ध शिवरायांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावनभूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्ट्ण अर्थातच खर्ड्याचा भुईकोट किल्ला. या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प रोहित पवार यांनी केला आहे. ● याच प्रेरणेतून किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर देशप्रेमाची असीम ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा शौर्याचं प्रतिक असा भव्य-दिव्य भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/GBUil6qrpjb

टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या! LetsUpp l Bulletin ● मुंबई महापालिकेत आता केंब्रिज बोर्डाच्याही शाळा, महाराष्ट्रातही अशा शाळा सुरु करणार : पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ● 9 ऑक्टोबरला सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन; विमानतळ उद्घाटनाआधीच पुन्हा एकदा नारायण राणे विरुध्द शिवसेना राजकीय वाद पेटण्याची शक्यता ● केंद्र सरकारकडून उसाच्या एफआरपीवर शिक्कामोर्तब, उसाचा भाव 290 रुपये क्विंटल, 5 कोटी शेतकऱ्यांना फायदा ● औरंगाबादेत पावसाचा हाहा:कार, पिकं पाण्याखाली, मदतीसाठी प्रयत्न करणार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांचे आश्वासन ● विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोवा विधानसभेचे प्रभारी, पक्षानं सोपवली महत्त्वाची जबाबदारी; पुढील वर्षी देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार ● भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत, बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच स्पष्ट करावे", संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल ● माझ्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांची झोप उडाली आहे, ते आता भाई लोकांची मदत घेत आहेत', असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला ● ऐतिहासिक निर्णय! राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिली ● सीएए रद्द करण्याची मागणी, धर्म हा नागरिकता मिळवण्याचा आधार असू शकत नाही, असं म्हणत तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला ● लसीकरणाचा कार्यक्रम व्यवस्थित सुरु, 'डोअर टू डोअर व्हॅक्सिनेशन'चा आदेश देणार नाही: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/YuAm7DEQnjb