fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 715 مشترک است و جایگاه 5 604 را در دسته آموزش و رتبه 11 972 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 715 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 08 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -73 و در ۲۴ ساعت گذشته برابر 3 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.34% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.17% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 2 138 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 068 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 09 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 715
مشترکین
+324 ساعت
-317 روز
-7330 روز
آرشیو پست ها
🟪देशात आता करोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.१.६१७.२ या करोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे. डेल्टा प्लस अर्थात एवाय.१ हा करोनाचा विषाणू भारतात सध्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे त्याची धास्ती बाळगण्याचे कारण नाही, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या नव्या प्रकारामुळे करोनाची लागण कितपत तीव्र असू शकते, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, हा प्रकार मोनोक्लोनल प्रतिपिंड मिश्रण या करोनावरील उपचारांना दाद देत नाही. भारतामध्ये अलीकडे याच उपचारपद्धतीला मान्यता देण्यात आलेली आहे. दिल्लीतील सीएसआयआर-इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमिक्स अ‍ॅन्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) संस्थेचे शास्त्रज्ञ यांनी रविवारी याबाबत ट्वीट केले आहे. करोनाना हा नवा विषाणू के४१७ एन उत्परिवर्तनातून तयार झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. नवे उत्परिवर्तन हे सार्स-कोव्ही-२ च्या स्पाईक प्रोटीनमधील बदलाने झाले आहे. हे प्रथिन विषाणूला मानवी पेशीत शिरकाव करण्यासाठी मदत करते. 'पब्लिक हेल्थ इंग्लंड’ने दिलेल्या माहितीनुसार, डेल्टामध्ये (बी.१.६१७.२) के४१७ एन उत्परिवर्तन झालेले ६३ जिनोम आतापर्यंत दिसून आले आहेत.

🟪आगीच्या फुग्यांना फायटर जेट्सने दिलं उत्तर; सत्तांतरणाच्या तिसऱ्या दिवशीच गाझा पट्टीत हल्ला पॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये आग लावण्यात आलेले मोठ्या आकाराचे फुगे पाठवल्यानंतर इस्रायलच्या हवाईदलाने बुधवारी गाझा पट्टीमध्ये हवाई हल्ले सुरु केले आहेत. पोलीस आणि इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार हे आग लावलेले फुगे पाठवण्यात आल्याने गाझा आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला असतानाही हल्ले करण्यात आलेत. मागील महिन्यामध्ये २१ तारखेला (२१ मे २०२१ रोजी) दोन्ही बाजूकडून शस्त्रसंधीसंदर्भात एकमत झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा या हवाई हल्ल्यांमुळे संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. पॅलेस्टाईनमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हवाईदलाने गाझा शहराच्या दक्षिणेतील खान यूनुसच्या पूर्वेकडील एका ठिकाणावर हल्ला केला. खान यूनुसमधील एएफपीच्या एका छायाचित्रकाराने हे बॉम्ब हल्ले स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेत. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने दिलेल्या माहितीनुसार आग लावलेल्या फुग्यांचं उत्तर देण्यासाठी लढाऊ विमानांनी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना असणाऱ्या हमासच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला.

🟪हज यात्रेवर करोनाचे सावट; हज कमिटी ऑफ इंडियाने रद्द केले सर्व अर्ज करोनामुळे अनेक धार्मीक कार्यक्रमावर बंदी घालन्यात येत आहे. करोनामुळे यावर्षीही हज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने हज यात्रा २०२१ चे सर्व अर्ज रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील लोक सर्वात पवित्र आणि महत्त्वपूर्ण हज यात्रेवर जाऊ शकणार नाहीत. सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने करोना साथीमुळे इतर देशांतून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी हज यात्रेवर बंदी घातली आहे. सौदी अरेबिया केवळ ६० हजार स्थानिक लोकांना कोरोनामुळे हज करण्यास परवानगी देईल. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हज कमिटी ऑफ इंडियाने हज २०२१ साठीचे सर्व अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम समाजातील लोकांना आता हजसाठी १ वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

🟪अखेर ट्विटरकडून अनुपालन अधिकारी नियुक्त ट्विटरने मंगळवारी अंतरिम प्रमुख अनुपालन अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचे जाहीर केले असून या अधिकाऱ्याबाबतची सविस्तर माहिती लवकरच थेट माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. सरकारने ट्विटरला नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांचे पालन करण्यासाठी अखेरची संधी देत असल्याची नोटीस पाठविली होती. निकषांचे पालन न केल्यास या व्यासपीठाला दायित्वातून देण्यात आलेल्या सवलतीला मुकावे लागेल, असा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांनुसार मुख्य अनुपालन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे आश्वासन ट्विटरने सरकारला दिले होते. आता ट्विटरने अंतरिम प्रमुख अनुपालन अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून त्याबाबतचा तपशील लवकरच माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयास देण्यात येणार असल्याचे ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले. नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा कंपनी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचेही प्रवक्त्याने म्हटले आहे.

🟪कर आकारणी ग्रामपंचायतची वसुली मात्र एमआयडीसीकडे ग्रामपंचायत हद्दीतील महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रातील जमीन, इमारत, स्वच्छता कर व मालमत्ता कराची वसुली जिल्ह्यात यंदापासून एमआयडीसीमार्फत केली जाणार आहे. कर आकारणी ग्रामपंचायतमार्फत मात्र वसुली एमआयडीसीमार्फत तसेच वसुलीतील ५०:५० टक्के वाटा ग्रामपंचायत व एमआयडीसीमध्ये विभागला जाणार, अशी कार्यपद्धती अवलंबली जाणार आहे. नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यात याचा परिणाम जाणवणार आहे. त्यामध्ये नगर शहराजवळील नवनागापूर व निंबळक या दोन मोठ्या ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. उद्योजकांच्या मागणीनुसार राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने सप्टेंबर २०१९ मध्ये हा आदेश जारी केला असला तरी त्यातून काही प्रमाणातच उद्योजक, कारखानदारांचा प्रश्न सुटला आहे. मुळात उद्योजकांचा ग्रामपंचायत कर आकारणी चुकीच्या पद्धतीने होते, असा आक्षेप आहे. या अक्षेपावर मात्र ग्रामविकास विभागाकडून त्यांना स्पष्टीकरण मिळाले नाही. ग्रामपंचायत ज्या दराने व ज्या पद्धतीने बिल आकारेल, त्याची केवळ वसुली एमआयडीसीकडून होणार आहे, असेच राज्य सरकारच्या आदेशात स्पष्ट केले आहे. राज्यात इतर जिल्ह्यात ही कार्यपद्धत यापूर्वीच अवलंबली गेली. नगर जिल्ह्यात मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. सन २०२०-२१ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी अद्यापि एमआयडीसीकडे बिलेच पाठवलेली नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षभरात त्याची वसुली झालेली नाही.

🟪कोपा अमेरिका २०२१ - अर्जेटिनाची चिलीशी बरोबरी लिओनेल मेसी याने फ्री-किकवर शानदार गोल झळकावल्यानंतरही अर्जेटिनाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चिलीविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. या सामन्यात महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना आदरांजली वाहण्यात आली. पहिल्या सत्रात मेसीने फ्री-किकवर डाव्या पायाने मारलेला फटका चिलीच्या बचावपटूंच्या डोक्यावरून जात गोलरक्षक क्लॉडियो ब्राव्होने तो अडवण्याचा प्रयत्न केला. पण ब्राव्होने डाव्या बाजुला हवेत झेप घेतल्यानंतरही चेंडू त्याच्या बोटांना स्पर्श करून थेट गोलजाळ्यात गेला. विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या पात्रता फेरीत ब्राव्होने मेसीची फ्री-किक अडवली होती. मेसीने २५ मीटरवरून केलेल्या या अप्रतिम गोलमुळे अर्जेटिनाने ३३व्या मिनिटाला १-० अशी आघाडी घेतली. पण एडवाडरे वर्गास याने ५७व्या मिनिटाला चिलीला बरोबरी साधून दिली. ५७व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर आर्टुरो विदालने मारलेला फटका इमिलियानो मार्टिनेझ याने अडवल्यानंतर वर्गासने परतीच्या फटक्यावर गोल झळकावला.

थोड्याच वेळात ....
थोड्याच वेळात ....

photo content
+7

photo content
+9

❌❌सावधान❌❌ जसे भारतातील मोबाईल नंबर +91 ने सुरु होतात तसेच इतर देशांचे कोड नंबर दिलेले आहेत. या अशा नंबरने सुरूवात होणाऱ्या नंबर वरुन फोन,message, Video Call आल्यास Receive करु नका. 1 - United States, Canada, and several Caribbean nations share the international calling code 1, with each US state (or parts of US states), province, territory, or island nation given its own three-digit "area code". The following list includes the area codes for such nations outside the US and Canada, as well as those of US possessions outside of the United States proper. 2 - Africa and some others like Greenland, Faroe Islands and Aruba. 3 - Europe 4 - Europe 5 - South America 6 - Southeast Asia and Oceania 7 - Russia, Kazakhstan and parts of Abkhazia 8 - East Asia and some services like Inmarsat 9 - Central Asia, South Asia and West Asia Afghanistan 93 Albania 355 Algeria 213 American Samoa 1 684 Andorra 376 Angola 244 Anguilla 1 264 Antarctica (Australian bases) 6721 Antigua and Barbuda 1 268 Argentina 54 Armenia 374 Aruba 297 Ascension 247 Australia 61 Austria 43 Azerbaijan 994 Bahamas 1 242 Bahrain 973 Bangladesh 880 Barbados 1 246 Belarus 375 Belgium 32 Belize 501 Benin 229 Bermuda 1 441 Bhutan 975 Bolivia 591 Bonaire, Sint Eustatius and Saba 599 Bosnia and Herzegovina 387 Botswana 267 Brazil 55 British Indian Ocean Territory 246 British Virgin Islands 1 284 Brunei 673 Bulgaria 359 Burkina Faso 226 Burundi 257 Cabo Verde 238 Cambodia 855 Cameroon 237 Canada 1 Cayman Islands 1 345 Central African Republic 236 Chad 235 Chile 56 China 86 Colombia 57 Comoros 269 Congo, Democratic Republic of the 243 Congo, Republic of the 242 Cook Islands 682 Costa Rica 506 Cote d'Ivoire 225 Croatia 385 Cuba 53 Curaçao 599 Cyprus 357 Czech Republic 420 Denmark 45 Djibouti 253 Dominica 1 767 Dominican Republic 1 809, 1 829, and 1 849 Ecuador 593 Egypt 20 El Salvador 503 Equatorial Guinea 240 Eritrea 291 Estonia 372 Eswatini 268 Ethiopia 251 Falkland Islands 500 Faroe Islands 298 Fiji 679 Finland 358 France 33 French Guiana 594 French Polynesia 689 Gabon 241 Gambia 220 Gaza Strip 970 Georgia (and parts of breakaway regions Abkhazia as well as South Ossetia) 995 Germany 49 Ghana 233 Gibraltar 350 Greece 30 Greenland 299 Grenada 1 473 Guadeloupe 590 Guam 1 671 Guatemala 502 Guinea 224 Guinea-Bissau 245 Guyana 592 Haiti 509 Honduras 504 Hong Kong 852 Hungary 36 Iceland 354 India 91 Indonesia 62 Iraq 964 Iran 98 Ireland (Eire) 353 Israel 972 Italy 39 Jamaica 1 876, 1 658 Japan 81 Jordan 962 Kazakhstan 7 Kenya 254 Kiribati 686 Kosovo 383 Kuwait 965 Kyrgyzstan 996 Laos 856 Latvia 371 Lebanon 961 Lesotho 266 Liberia 231 Libya 218 Liechtenstein 423 Lithuania 370 Luxembourg 352 Macau 853 Madagascar 261 Malawi 265 Malaysia 60 Maldives 960 Mali 223 Malta 356 Marshall Islands 692 Martinique 596 Mauritania 222 Mauritius 230 Mayotte 262 Mexico 52 Micronesia, Federated States of 691 Moldova (plus breakaway Pridnestrovie) 373 Monaco 377 Mongolia 976 Montenegro 382 Montserrat 1 664 Morocco 212 Mozambique 258 Myanmar 95 Namibia 264 Nauru 674 Netherlands 31 Nepal 977 New Caledonia 687 New Zealand 64 Nicaragua 505 Niger 227 Nigeria 234 Niue 683 Norfolk Island 6723 North Korea 850 North Macedonia 389 Northern Ireland 44 28 Northern Mariana Islands 1 670 Norway 47 Oman 968 Pakistan 92 Palau 680 Palestine 970 Panama 507

🛑 15 JUNE. 🟢 Global Wind Day 💠 1st celebration of World Wind Day took place for the first time in Europe in 2007 💠 World Wind Day is organized by the organizations of the World Wind Energy Council (GWEC)  💠 GWEC : HQ : Brussles Belgium 🛑WINDS RELATED FACTS🛑 🔷 Study of Wind : Anemology 🔷 Largest wind farm in the world is Alta Wind Energy Center ,California USA 🔷 Denmark is called "Coutry of winds" 🔷 Gansu Wind Farm in China is the largest wind farm in the world 🔷 Jaisalmer Wind Park is the largest operational onshore wind farm in India

photo content
+7

photo content
+9

🟪‘भारत सरकारचे काही निर्णय लोकशाही मूल्यांशी विसंगत’ भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून तेथे कायद्याचे राज्य आहे, असे असले तरी भारत सरकारचे काही निर्णय लोकशाही मूल्यांशी विसंगत असल्याचे अमेरिकेतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधींना सांगितले आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील निर्बंध हे त्यापैकी एक चिंतेचे कारण आहे. दक्षिण आणि मध्य आशियाचे प्रभारी साहाय्यक परराष्ट्रमंत्री डीन थॉम्पसन यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लोकशाहीबाबतच्या काँग्रेस उपसमितीमध्ये वरील वक्तव्य केले आहे. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे, तेथे कायद्याचे राज्य आहे, न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे आणि भारताचे अमरिकेशी चांगले संबंध आहेत, असे थॉम्पसन म्हणाले. तथापि, भारत सरकारने घेतलेले काही निर्णय लोकशाही मूल्यांशी विसंगत आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील निर्बंध, त्याचप्रमाणे मानवी हक्क कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना ताब्यात घेण्याच्या प्रकारांचा त्यामध्ये समावेश आहे. देशातील नागरी स्वातंत्र्य कमी होत चालले असल्याची टीका परदेशी सरकार आणि मानवी हक्क गटांनी केली असली तरी भारताने यापूर्वी त्याचे खंडन केले आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशात पत्रकारांवरील निर्बंधाबाबत अमेरिकेला चिंता आहे तोच प्रकार आता भारतात घडत आहे, असे थॉम्पसन यांनी लोकप्रतिनिधींच्या प्रशद्ब्राला उत्तर देताना म्हटले आहे

🟪‘जी ७’द्वारे चीनला शह चीनच्या कोट्यवधी डॉलर्सच्या बेल्ट अँड रोड या प्रकल्पाला शह देण्यासाठी जी-७ देशांच्या बैठकीत जागतिक पायाभूत योजना जाहीर केली जाणार असल्याचे सूतोवाच अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने केले आहे. जी ७ देश चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना लोकशाहीवादी देशांकडून एकजुटीने प्रतिसाद देण्याच्या विचारात असून चीनची आर्थिक व लष्करी ताकद गेली चाळीस वर्षे वाढत गेली असून त्याला कुणी आव्हान दिलेले नाही. अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिका जी ७ देशांना एकत्र घेऊन चीनमधील कामगार पिळवणुकीवर भूमिका घेण्यास भाग पाडेल. तीन दिवसांची ही जी ७ परिषद नैर्ऋत्य इंग्लंडमध्ये होत असून या बैठकीअंती प्रसारित केलेल्या जाहीरनाम्यात चीनवर सडकून टीका केली जाण्याची शक्यता आहे. आमची मूल्ये, निकष व उद्योग पद्धती यांचा एक संघटित सकारात्मक पर्याय उभा केला नव्हता तो आता उभा केला जाईल असे अमेरिकी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या २०१३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पाला शह देण्याचा उद्देश अमेरिका बाळगून आहे. किमान १०० देशांनी बीआरआय प्रकल्पात चीनशी रेल्वे, बंदरे, महामार्ग बांधणीबाबत करार केले होते.