fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 724 مشترک است و جایگاه 5 599 را در دسته آموزش و رتبه 11 969 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 724 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 10 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -87 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.98% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.78% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 364 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 275 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 11 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 724
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-177 روز
-8730 روز
آرشیو پست ها
🟪प्रफुल्ल चंद्र पंत: राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे प्रभारी अध्यक्ष. भारताचे राष्ट्रपतींनी प्रफुल्ल चंद्र पंत यांची भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) याचे प्रभारी अध्यक्ष म्हणून पदावर नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती 25 एप्रिल 2021 पासून लागू झाली आहे. प्रफुल्ल चंद्र पंत 13 ऑगस्ट 2014 ते 29 ऑगस्ट 2017 पर्यंतच्या कालावधीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. ▪️राष्ट्रीय मानवी हक्क आयोग विषयी ‘मानवी हक्क संरक्षण कायदा 1993’ अन्वये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगास या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिकार प्रदान केले गेले आहेत. राष्ट्रीय वा राज्य मानवी आयोग स्वत:देखील मानवाधिकार उल्लंघनाची दखल घेऊन कारवाई करु शकतात. याबाबतच्या विविध तक्रारीचे निवारण करणे, गुन्हेगारास इतर कायद्यांतर्गत न्यायालयाद्वारे शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे काम आयोग करीत असते. मानवी हक्क म्हणजे काय, त्यांचे स्वरूप, त्यांचे उल्लंघन झाल्यास तक्रार करण्याची पध्दत, मानवी हक्क आयोगाचे अधिकार या सार्‍यांबाबत या कायद्यात विवेचन करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने स्वीकृत केलेल्या नागरी, राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अधिकारांच्या आंतरराष्ट्रीय जाहिरनाम्यांमध्ये व इतरही आंतरराष्ट्रीय जाहिरनाम्यातील भारतीय केंद्र सरकारने मान्य केलेले सर्व अधिकार, ज्यांना भारतीय संविधान व विविध कायद्यात मान्यता दिली गेली आहे आणि ज्यांची अंमलबजावणी भारतीय न्यायालये करु शकतात, असे सर्व अधिकार मानवी हक्क समजले जातात. ▪️मानवी हक्कांविषयी. मानवी हक्क (किंवा मानवी अधिकार / मानवाधिकार) हे प्राणी जगतातल्या मानवाचे मूलभूत हक्क आहेत. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात. मानवी हक्कांचे वैश्विक घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights -UDHR) हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने दिनांक 10 डिसेंबर 1948 रोजी पॅरिस येथे स्वीकारलेले घोषणापत्र आहे. सर्व मानवांच्या जन्मसिद्ध मानवाअधिकारांची पहिली जागतिक अभिव्यक्ती म्हणून या घोषणापत्राकडे पाहण्यात येते. त्यात एकूण 30 कलमे आहेत. घोषणापत्र आज जगातील 500 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. या घोषणापत्रावर आधारित "मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय विधेयक" याला 1976 साली आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले.

🟪भारत-ब्रिटन यांच्यात गुंतवणूक करार. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शिखर बैठकीपूर्वी १ अब्ज ब्रिटिश पौंड गुंतवणुकीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये ६५०० रोजगार निर्माण होणार आहेत. मंगळवारी दोन्ही नेत्यांमध्ये शिखर बैठक होत आहे. डाउनिंग स्ट्रीट कार्यालयाने सोमवारी सायंकाळी विस्तृत व्यापार भागीदारी करारातून अपेक्षित गुंतवणुकीचे निष्कर्ष जाहीर केले असून या करारांना दोन्ही नेते आभासी मान्यता देणार आहेत. व्यापार करारातून ब्रिटन व भारत यांच्यातील गुंतवणूक २०३० पर्यंत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांच्या दरम्यान प्रत्यक्ष चर्चेच्या वेळी मुक्त व्यापार कराराचा मार्ग प्रशस्त होण्याची शक्यता आहे. भारत व ब्रिटन यांच्यादरम्यान आर्थिक संबंध अधिक मजबूत व सुरक्षित असतील अशी ग्वाही पंतप्रधान जॉन्सन यांनी दिली आहे. ब्रिटन व भारत या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना करोनामुळे फटका बसला असून भारताच्या गुंतवणुकीनंतर ब्रिटनमध्ये ६५०० रोजगार निर्माण होणार आहेत. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया तेथे एका आस्थापनेची निर्मिती करणार असून त्याद्वारे ही रोजगारनिर्मिती होईल. मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांतील व्यापार क्षमता दुप्पट होणार आहे. व्यापार व गुंतवणूक योजना ब्रिटिश सरकारने जाहीर केली असून भारत ब्रिटनमध्ये ५३.३० कोटी पौंडाची गुंतवणूक करणार असून सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया त्यातील २४ कोटी पौंडाची गुंतवणूक करणार आहे.

🟪आयपीएल सप्टेंबरमध्ये. जैव-सुरक्षित वातावरणाचे चक्रव्यूह भेदून करोनाने प्रवेश केल्याने आता क्रिकेटपटूंनाही या संसर्गाची बाधा होऊ लागली आहे. मंगळवारी आणखी दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण झाल्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा मध्यातच अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करावी लागली आहे. सनरायजर्सचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमन साहा तसेच दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा या दोन खेळाडूंचे करोना अहवाल मंगळवारी सकारात्मक आल्यानंतर ‘आयपीएल’च्या स्थगितीचा निर्णय ‘बीसीसीआय’ला घ्यावा लागला. ‘‘अनिश्चित कालावधीसाठी आम्ही स्पर्धा स्थगित करत आहोत. या महिन्यात ही स्पर्धा घेणे अशक्य आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वेळापत्रकातून स्थान मिळवत ही स्पर्धा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. कदाचित सप्टेंबरमध्ये विश्वचषकापूर्वी ही स्पर्धा घेणे शक्य होईल. पण तूर्तास तरी आम्ही थांबत आहोत,’’ असे ‘आयपीएल’चे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले. ‘‘सध्या आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. उर्वरित स्पर्धा स्थगित केल्यानंतर आता या वर्षांत ही स्पर्धा घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी कधी मिळेल, याची चाचपणी करत आहोत. कदाचित सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा विचार असला तरी सद्य:स्थितीत या सर्व शक्यता आहेत,’’ असे ‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟥 सिम्प्लिफाईड YEAR BOOK 2020 मोफत PDF Link👇 https://drive.google.com/drive/folders/1VmS3SDSg3rvSxjRgJsIrXBvQuOLkulDi?usp=sharing ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

Final Simplified 14th Edition.pdf93.59 MB

photo content
+8

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content

photo content
+1

photo content
+4