fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 728 مشترک است و جایگاه 5 613 را در دسته آموزش و رتبه 12 022 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 728 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 03 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -53 و در ۲۴ ساعت گذشته برابر -2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 15.97% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.82% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 387 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 289 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 04 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 728
مشترکین
-224 ساعت
-277 روز
-5330 روز
آرشیو پست ها
🟪NSG पथकाचा 37 वा स्थापना दिवस ब्लॅक कॅट्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या नॅशनल सेक्युरिटी गार्ड (NSG) या पथकाने त्याचा 37 वा स्थापना दिवस 16 ऑक्टोबर 2021 रोजी साजरा केला. ▪️नॅशनल सेक्युरिटी गार्ड (NSG) विषयी. नॅशनल सेक्युरिटी गार्ड अर्थात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) हे भारतीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारे दहशतवादविरोधी पथक आहे. ते भारताचे अतिशय आधुनिक कमांडो पथक आहे. या कमांडो पथकाची स्थापना 16 ऑक्टोबर 1984 रोजी झाली. "सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा" हे त्याचे आदर्श वाक्य आहे. दहशतवाद्यांना ठार करणे, अपहरणाच्या घटनांमध्ये कठोर कारवाई करुन अपहरणकर्त्यांना ठार करणे आणि नागरिकांची सुटका करणे या उद्देशाने या पथकाची स्थापना करण्यात आली. पथकाचा वापर सध्या अतिमहत्वपूर्ण लोकांचे संरक्षण, दहशतवादी कार्यांना उधळून लावणे तसेच अपरहण करून ओलिस ठेवल्या जाणाऱ्या नागरिकांच्या सुटकेसाठी केला जातो.

🟪एक्झरसाइज केंब्रियन पेट्रोल’ नामक गस्त सरावात भारतीय सैन्याला सुवर्ण पदक मिळाले. 13 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 या कालावधीत ब्रेकन (वेल्स, ब्रिटन) येथे आयोजित केलेल्या ‘एक्झरसाइज केंब्रियन पेट्रोल’ नामक गस्त सरावात भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 4/5 गोरखा रायफल्स (फ्रंटियर फोर्स) संघाला सुवर्णपदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ब्रिटीश लष्कराच्या भूदलाचे चीफ ऑफ जनरल स्टाफ जनरल सर मार्क कार्लटन-स्मिथ यांनी 15 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या एका औपचारिक समारंभात भारतीय लष्कराच्या संघाला सुवर्णपदक प्रदान केले. ▪️ठळक बाबी. ‘एक्झरसाइज केंब्रियन पेट्रोल’ हा एक बहुपक्षीय लष्करी गस्त सराव आहे, जो ब्रिटीश लष्कराच्या भूदलाच्यावतीने आयोजित करण्यात येतो. हा सराव म्हणजे मानवी सहनशक्ती आणि संघभावना यांची अत्युच्च चाचणी परीक्षा समजली जाते आणि जगभरातील लष्करी समुदायांमध्ये याला लष्करी गस्तीचे ऑलिम्पिक असे संबोधण्यात येते. या सरावात एकूण 96 संघ सहभागी होते. या संघांमध्ये जगभरातील विशेष लष्करी दले आणि अत्यंत सन्माननीय पलटणींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 17 आंतरराष्ट्रीय संघांचा समावेश होता. या युद्धाभ्यासामध्ये सहभागी झालेल्या संघांनी अतितीव्र वातावरण असलेले भूभाग आणि असह्य थंड वातावरण यामुळे तोंड द्याव्या लागणाऱ्या आव्हानांचा सामना केला. तसेच प्रत्यक्ष जगातील गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले, जेणेकरून प्रत्यक्ष रणभूमीवर या लष्कराचे प्रतिसाद कसे असतील याचे परीक्षण करता येईल.

🟪 भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारी संवादाची 8 वी मंत्रीस्तरीय बैठक वॉशिंग्टन डीसी येथे संपन्न. भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारी संवादाची 8 वी मंत्रीस्तरीय बैठक अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे 15 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडली. केंद्रीय वित्त आणि कंपनी कार्ये मंत्री निर्मला सीतारामन आणि अमेरिकेच्या कोषागार सचिव डॉ. जेनेट येलेन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारी संवादाच्या मंत्रिस्तरीय बैठकीदरम्यान व्यापक आर्थिक दृष्टीकोन आणि कोविड-19 परिस्थितीत सुधारणा, आर्थिक नियामक आणि तांत्रिक सहकार्य, बहुपक्षीय सहभाग, हवामान बदल रोखण्यासाठी गुंतवणूक आणि काळ्या पैश्याला प्रतिबंध आणि दहशतवादाला होणाऱ्या वित्तपुरवठ्याला आळा घालण्यासह (AML/CFT) विविध विषयांवर चर्चा झाली. परस्पर आणि जागतिक आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सौहार्दपूर्ण रणनीती आणि उपाययोजनांच्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी दोनही देशांनी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मंचांवर सहकार्य सुरू ठेवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. 2010 साली भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारीची स्थापना करण्यात आली. दोनही देशांमधील आर्थिक बंध बळकट करण्यासाठी आणि भविष्यात अधिक सहकार्य आणि आर्थिक वाढ निर्माण करण्यासाठी ते एक चौकट म्हणून कार्य करते.

🟪 पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (PFC) कंपनीला 'महारत्न' दर्जा प्राप्त भारत सरकारने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (PFC) या सरकारी कंपनीला 'महारत्न' दर्जा प्रदान केला आहे. ▪️ठळक बाबी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (PFC) ही वीज मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील असलेली सर्वात मोठी पायाभूत सुविधा वित्त कंपनी आहे. PFC ही ‘महारत्न’ श्रेणीमध्ये प्रवेश करणारी भारतातील 11 वी कंपनी ठरली आहे. कंपनीला 'महारत्न' दर्जा प्राप्त झाल्यामुळे, PFC अधिक चांगल्यापणे गुंतवणूक करण्यास, संयुक्त आर्थिक उपक्रम आणि पूर्ण मालकीच्या उपकंपन्या तयार करण्यास सक्षम असेल. तसेच कंपनी भारतामध्ये तसेच विदेशात विलीनीकरण आणि अधिग्रहण यासंबंधीचे कार्ये करू शकणार. ‘महारत्न’ दर्जाविषयी केंद्रीय सरकारने ‘महारत्न’ दर्जाच्या स्थापना 2009 साली केली. मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रमांना (C.P.S.E) आपल्या कार्याचा विस्तार करणे आणि जगातील एक मोठी कंपनी म्हणून नावारूपास येण्यास सक्षम करणे हा या मागचा हेतु आहे. ‘महारत्न’ दर्जा प्राप्त करण्यासाठी कंपनीला 'नवरत्न' दर्ज़ा प्राप्त झालेला असावा लागतो. तसेच मागील तीन वर्षांच्या कालावधीत सरासरी वार्षिक भागभांडवल 15,000 कोटी रुपये यापेक्षा अधिक असावे लागते. कंपनीची वैश्विक पातळीवर महत्वपूर्ण उपस्थिती / आंतरराष्ट्रीय कार्ये असावे लागते.

photo content

🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महारा
+4
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. 👉 आजच आपली प्रत राखून ठेवा. 👇Online Booking Available👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+2

photo content
+9

🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महारा
+4
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. 👉 आजच आपली प्रत राखून ठेवा. 👇Online Booking Available👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪विशेष प्रकरणांमध्ये 24 आठवड्यांमध्ये गर्भपात करण्यास भारतात परवानगी केंद्रीय सरकारने विशेष प्रकरणांमध्ये गर्भपाताची कालमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता, काही विशेष प्रकरणांमधून झालेल्या गर्भधारणेच्या 24 आठवड्यांमध्ये गर्भपाताची परवानगी दिली जाईल. लैंगिक अत्याचार, बलात्कार, अल्पवयीन गर्भधारी मुली, गर्भधारी विधवा किंवा घटस्फोटित महिला तसेच शारीरिक अपंगत्व असलेल्या महिला यांच्यासाठी ही कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. शिवाय मानसिकदृष्ट्या आजारी महिला, आपत्ती किंवा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये असलेल्या गर्भधारी महिला देखील यासाठी पात्र असतील. नवीन नियमांनुसार, राज्य वैद्यकीय मंडळ गर्भपाताच्या संदर्भात निर्णय घेतील. गर्भपातासाठी महिलेने केलेल्या विनंतीचा आढावा राज्य वैद्यकीय मंडळ घेणार आहे आणि विनंती प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार. विनंती मंजूर झाल्यास, पाच दिवसांच्या आत गर्भपात करावा लागेल. ▪️‘वैद्यकीय गर्भपात (दुरुस्ती) कायदा-2021’ ‘वैद्यकीय गर्भपात (दुरुस्ती) कायदा-2021’ याद्वारे ‘वैद्यकीय गर्भपात कायदा-1971” यामध्ये दुरुस्ती केली गेली आहे. महिलांसाठी सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात सेवेचा विस्तार करण्यासाठी, उपचारात्मक, मानवी आणि सामाजिक आधारावर हा कायदा तयार करण्यात आला आहे. 🟪नवीन नियमानुसार, गर्भावस्थेच्या 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी एका वैद्यकाचा आणि गर्भावस्थेच्या 20 ते 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी दोन वैद्यकांचा सल्ला घेणे आवश्यक राहील. गर्भपात करणाऱ्या महिलेचे नाव आणि इतर माहिती, कायद्याने अधिकार दिलेल्या व्यक्ती खेरीज इतर कोणत्याही व्यक्तीला दिली जाणार नाही.

🟪पहिल्यांदाच सूर्यमालेबाहेरील ग्रहावरुन मिळाले रेडिओ सिग्नल, सूर्यमालेबाहेरील पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याचा मिळाला एक नवा मार्ग क्वीसलॅड विद्यापीठाचे डॉ बेंजामिन पोप आणि नेदरलॅड इथली ‘राष्ट्रीय वेधशाळा’ यांनी संयुक्तरित्या संशोधन करत पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे. यामुळे रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून सूर्यमालेबाहेर ,आपल्या आकाशगंगेत विविध ताऱ्यांच्या भोवती असलेले पृथ्वीसदृश्य ग्रह (exoplanets) शोधण्याचा आणखी एक मार्ग उपलब्ध झाला आहे. विद्युत चुंबकीय विकिरणातील एक भाग म्हणजे रेडिओ सिग्नल. आकाशगंगेत कृष्णविवर, अवकाशातील धुलीकण ज्याच्यातून ताऱ्यांची निर्मिती होते असते अशा ठिकाणाहून रेडिओ सिग्नल येत असतात. त्याचबरोबर रेडिओ सिग्नलचा आणखी स्त्रोत म्हणजे गुरु आणि शनी सारखे जे मोठे ग्रह. अशा महाकाय ग्रहांभोवती असलेले चुंबकीय क्षेत्र आणि सौर वारे यांमुळे ध्रुवीय प्रकाश (Aurorae) तयार होत रेडिओ सिग्नलची निर्मिती होते. तेव्हा ग्रहांपासून मिळणाऱ्या रेडिओ सिग्नलच्या प्रकाराबद्दल माहिती होती. असं असतांना काही लाल बटु तारे (ताऱ्यांचा एक प्रकार, आपल्या सुर्यापेक्षा लहान आकाराचे तारे) यांच्याकडून रेडिओ सिग्नल मिळत असल्याचं संशोकांच्या लक्षात आलं. Low Frequency Array ( LOFAR ) या रेडिओ दुर्बिणीच्या माध्यमातून आणखी संशोधन आणि निरिक्षणे केल्यावर संशोधकांच्या लक्षात आलं की हे रेडिओ सिग्नल संबंधित तारे उत्सर्जित करत नसून या ताऱ्या भोवती फिरणारे ग्रह फेकत आहेत.

🟪डीडी चंदनाचे दहा लाखांहून अधिक सब्स्क्रायबर्स, डिजिटल प्रसार भारतीला दक्षिणेत चालना   दर्जेदार आशय आणि डिजिटल फर्स्ट दृष्टिकोनासह दक्षिण भारतात प्रसार भारतीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मने केवळ दोन वर्षात खूप मोठा पल्ला गाठला आहे. डीडी चंदना (कर्नाटक) यूट्यूबवर दहा लाख  ग्राहकांचा टप्पा गाठणारी दक्षिण  भारतातील  पहिली वाहिनी बनली असून  डीडी सप्तगिरी (आंध्र प्रदेश) आणि डीडी यादगिरी (तेलंगणा) पाच लाखांच्या  दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. प्रत्येकी 1 लाखाहून अधिक यूट्यूब सब्सक्राइबर्ससह, तमिळ आणि मल्याळम वृत्त विभाग  आणि दूरदर्शनची केंद्रे एकमेकांशी आणि स्थानिक भाषा प्रसार माध्यम उद्योगाशी निकोप  स्पर्धा करत आहेत. या यूट्यूब चॅनेलवर सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओमध्ये विनोदी कार्यक्रम, टेलिफिल्म्स, मान्यवरांच्या मुलाखती आणि शैक्षणिक सामग्री यांचा समावेश आहे. दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांमध्ये, आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्तवाहिनी ‘डीडी इंडिया’ने अलीकडेच यूट्यूबवर 1 लाख प्रेक्षकांचा  टप्पा ओलंडला आहे. विशेषतः तरुण आणि जागतिक प्रेक्षकांसाठी तयार केलेल्या भारताबाबत माहिती देणाऱ्या विशिष्ट आशयघन कार्यक्रमांचा यात महत्वाचा वाटा आहे.

🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महारा
+4
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. 👉 आजच आपली प्रत राखून ठेवा. 👇Online Booking Available👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+5

photo content
+9

तुमच्या प्रत्येक नवनवीन संकल्पनेला नवनवीन मिळाव्यात दिशा… तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे ह्याच विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा! 💐💐👍👍 डाॅ.अजित प्रकाश थोरबोले नागेश नवनाथ पाटील

🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महारा
+4
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. 👉 आजच आपली प्रत राखून ठेवा. 👇Online Booking Available👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

Combined च्या तिन्ही पदाचे मागणी पत्रक प्राप्त.
Combined च्या तिन्ही पदाचे मागणी पत्रक प्राप्त.

photo content
+6

photo content
+9