fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 711 مشترک است و جایگاه 5 599 را در دسته آموزش و رتبه 11 969 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 711 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 10 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -87 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.98% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.78% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 364 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 275 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 11 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 711
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-177 روز
-8730 روز
آرشیو پست ها
photo content
+9

🟪प्रसिद्धीपत्रक MPSC चे आपले खाते अद्ययावत करण्याबाबत…
🟪प्रसिद्धीपत्रक MPSC चे आपले खाते अद्ययावत करण्याबाबत…

🟪कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाच्या MCA21च्या तिसऱ्या आवृत्तीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 24 मे 2021 रोजी झालेल्या एका आभासी कार्यक्रमात केंद्रीय वित्त व कॉर्पोरेट कार्य राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते MCA अर्थात कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाच्या MCA21 या नव्या मंचाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या (V3.0) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. MCA21 मध्ये सुधारित रचनेचे संकेतस्थळ, MCA च्या अधिकाऱ्यांसाठी नव्या ईमेल सुविधा तसेच ई-पुस्तक आणि ई-सल्लागार सेवा या दोन नव्या रचनांचा समावेश आहे. ई-सल्लागार सेवा खाली नमूद सोयी उपलब्ध करून देईल - MCA कडून वेळोवेळी प्रस्तावित करण्यात आलेल्या दुरुस्त्या आणि नवी विधेयके यांच्याबद्दल आभासी पद्धतीने नागरिकांना सल्ला सेवा पुरविणे. धोरणविषयक निर्णय जलद घेता यावे यासाठी भागधारकांकडून आलेल्या सूचना किंवा टीका यांचे संकलन, वर्गीकरण आणि श्रेणीकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेणे. MCA च्या अधिकाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली नवी ईमेल सुविधा त्यांना अंतर्गत तसेच बाह्य भागधारकांशी सुव्यवस्थित आणि सुव्यवस्थापित संपर्कासाठी अधिक उत्तम वैशिष्ट्ये आणि क्षमता बहाल करेल. MCA21 विषयी MCA21 हा भारत सरकारच्या मोहीम प्रकाराच्या प्रकल्पांचा एक भाग आहे. भूतकाळात अनेक प्रशंसा मिळवल्यानंतर, या प्रकल्पाने आता तिसऱ्या आवृत्तीपर्यंत मजल गाठली आहे. MCA21 V3.0 हा या वर्षीच्या अर्थसंकल्पीय घोषणेचा भाग आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून कॉर्पोरेट अनुपालन आणि भागीदार अनुभव अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

🟪जनमत सर्व्हेक्षण - मोदी 2.0 सरकारची दोन वर्षे, मांडा तुमचं मत नरेंद्र मोदींनी ३० मे २०१९ रोजी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली त्यास दोन वर्षे पूर्ण होत आहेत, तर त्यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्यास सात वर्षे पूर्ण होत आहेत. मोदी सरकारचं मूल्यमापन जनता कसं करते याचा अंदाज घेणारं हे सर्व्हेक्षण असून तुम्ही हा फॉर्म भरा आणि तुम्हाला काय वाटतं हे जरूर सांगा. या सर्व्हेक्षणामध्ये काय आढळलं हे २७ मे २०२१ रोजी लोकसत्ता डॉट कॉमवर प्रकाशित करण्यात येईल.

🟪रोकड व्यवस्थापनासाठी 'इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक' आणि महिंद्रा रूरल हाउसिंग फायनान्स लिमिटेड यांच्यात भागीदारी आता 1,36,000 टपाल कार्यालयांमध्ये जाऊन 'महिंद्रा'चे ग्रामीण ग्राहक कर्जाचे हप्ते भरू शकणार.   ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक’ (आयपीपीबी) आणि ‘महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल लिमिटेड’ची उपकंपनी असलेल्या महिंद्रा रूरल हाउसिंग फायनान्स लिमिटेड (एमआरएचएफएल) यांनी रोकड व्यवस्थापनासाठी सामरिक भागीदारी करीत असल्याची घोषणा केली आहे. या कराराचा भाग म्हणून, आयपीपीबी आपली संपर्क केंद्रे आणि टपाल सेवा पुरवठादार यांच्यामार्फत ‘एमआरएचएफएल’ला रोकड व्यवस्थापन आणि संकलन सेवा देणार आहे. रोकड व्यवस्थापन सेवेमुळे ‘एमआरएचएफएल’च्या ग्राहकांना 1,36,000 टपाल कार्यालयांमधून आपल्या कर्जाचे मासिक किंवा तिमाही हप्ते भरता येणार आहेत. रोकड व्यवस्थापनासाठी दोन्ही संस्थांनी केलेली भागीदारी ही वित्तीय सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भागीदारी आहे आणि यातून ग्राहकांना सामावून घेण्याचे दोन्ही संस्थांचे लक्ष्य आहे. या भागीदारीबाबत बोलताना ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जे. व्यंकटरामू म्हणाले, “विकसित तंत्रज्ञानामुळे व्यवसाय करण्याचे नवे मार्ग तयार होत आहे. अशावेळी ग्राहकांना आणि भागीदारांना सहज उपलब्ध होणारे व परवडणारे बँकिंग पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात  रोख रकमेचे व्यवस्थापन हे व्यवसायाचे कार्यस्थान असते, त्या अनुषंगाने आयपीपीबी आपल्या मजबूत नेटवर्क आणि तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कॉर्पोरेट्सना त्यांच्या प्राप्य वस्तूंचे सुरक्षित व अखंडपणे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते. ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याच्या प्रयत्नात आम्ही 'महिंद्रा रूरल हाउसिंग फायनान्स बरोबर काम करण्यास कटिबद्ध आहोत, तसेच बँकेच्या व्यवहारांपासून वंचित राहिलेल्यांपुढील अडचणी दूर करून त्यांना टपाल खात्याच्या व्यापक कार्यक्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी अखेरच्या टप्प्यापर्यत काम करण्यासही आम्ही तत्पर आहोत.”, असेही जे. व्यंकटरामू यांनी सांगितले. ‘महिंद्रा रूरल हाउसिंग फायनान्स’चे व्यवस्थापकीय संचालक अनुज मेहरा म्हणाले, “आमच्या ग्राहकांचा पाठींबा वाढविण्यासाठी  नाविन्यपूर्ण उपाय शोधत असतो. ‘आयपीपीबी’शी करार करणे हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. यातून आमच्या ग्राहकांना कार्यक्षम बँकिंग सेवांमध्ये प्रवेश मिळेल आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व सक्षम बनविण्यात मदत होईल, असा आम्हाला विश्वास आहे”.

🌅भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख यांच्याबद्दल... 🕋 पुर्ण नांव - चिंतामण द्वारकानाथ देशमुख 🕋 कालावधी - (जानेवारी १४, इ.स. १८९६ - ऑक्टोबर २, इ.स. १९८२) सी. डी. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्‍नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (इ.स. १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. १ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे.

🟪महिलांच्या मदतीसाठी भारत 10 देशांमध्ये ‘वन स्टॉप सेंटर’ उघडणार भारत सरकारच्या केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने त्याच्या ‘वन स्टॉप सेंटर’ योजनेच्या अंतर्गत 10 देशांमध्ये OSC केंद्रांची स्थापना करणार असल्याच्या संदर्भात घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, बहरीन, कुवैत, कतार, ओमान, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरबमधील जेद्दाह व रियाध या शहरांमध्ये भारत OSC केंद्र उघडणार आहे. याच्याव्यतिरिक्त आणखी 300 OSC केंद्रे भारतभर उघडण्यात येणार आहेत. विदेशांमधील OSC केंद्रांना भारत सरकारच्या केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय आणि विदेशी कार्य मंत्रालयाकडून पाठबळ मिळणार आहे. 🌑‘वन स्टॉप सेंटर’ योजना... एखाद्या महिलेला कोणत्याही प्रकारचा हिंसाचार सहन करावा लागला असेल, किंवा संकटकाळी वैद्यकीय सहाय्य, कायदेशीर मदत, कायमस्वरूपी राहण्याची जागा, मानसिक आणि भावनिक आधार अशी मदत शक्य तितक्या लवकर करता यावी आणि तश्या अवस्थेत त्यांना एकाच ठिकाणी ही सर्व मदत मिळावी या हेतूने भारत सरकारने ‘वन स्टॉप सेंटर योजना’ लागू केली आहे. ‘वन स्टॉप सेंटर योजना’ ही योजना हिंसाचाराने पीडित महिलांना मदत करण्याच्या उद्देशाने 1 एप्रिल 2015 रोजी भारत सरकारने लागू केली होती. ही योजना मुळात ‘सखी’ म्हणून ओळखली जाते. सदर योजना महिला व बालविकास मंत्रालयाने तयार केली आहे. या योजनेद्वारे, खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी दोन्ही ठिकाणी हिंसाचारामुळे पीडित महिलांना पाठिंबा व मदत मिळावी यासाठी देशभरात अनेक वन-स्टॉप सेंटर तयार केली गेली आहेत. या योजनेच्या अंतर्गत OSC मार्फत हिंसाचार, जाती, वर्ग, धर्म, लैंगिक प्रवृत्ती किंवा कोणत्याही प्रकारच्या वैवाहिक स्थितीमुळे पीडित 18 वर्षाखालील मुलींसह सर्व महिलांना मदत केली जाते. या योजनेला ‘निर्भया निधी’च्या माध्यमातून वित्तापूरवठा होतो. केंद्रीय सरकारच्या या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना 100 टक्के निधी प्रदान केला जातो.

🟪आयपीएल’चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १४व्या हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येऊ शकतात, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी मंगळवारी दिली. जैव-सुरक्षा परिघात राहूनही काही खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे ४ मे रोजी ‘आयपीएल’ स्थगित करण्यात आली. त्यामुळे उर्वरित ३१ सामने खेळवण्यासाठी ‘बीसीसीआय’ने अमिरातीचा पर्याय निवडल्याचे समजते. ‘‘बीसीसीआयने सर्व भागधारक आणि प्रक्षेपणकर्त्यांशी केलेल्या संवादानंतर १८ ते २० सप्टेंबरपैकी कोणत्याही एका दिवशी ‘आयपीएल’ सुरू होईल. १० ऑक्टोबर किंवा त्यापूर्वीच अंतिम सामना खेळवण्यात येईल. यादरम्यान तीन आठवडे उपलब्ध असल्याने जवळपास १० दिवशी प्रत्येकी दोन सामने होतील,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. याविषयी लवकरच अंतिम घोषणा करण्यात येईल, असेही त्याने नमूद केले.

‘या’ देशात राजकीय संकट गहिरं; राष्ट्रपती, पंतप्रधान लष्कराच्या ताब्यात 🟪 आफ्रिकेतील माली या देशात पुन्हा एकदा राजकीय संकट गहिरं झालं आहे. अंतरिम सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल केल्यानंतर लष्कराने बंडाचा पवित्रा घेतला आहे. बंडखोर लष्कराने राष्ट्रपती बाह दाव, पंतप्रधान मोक्टर यान आणि संरक्षणमंत्री सोलोमेन डोकोर यांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांना राजधानी बमाकोच्या बाहेर असलेल्या लष्करी मुख्यालयात ठेवलं आहे. लष्कारातील दोन अधिकाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने लष्काराने हे बंड पुकारलं आहे. त्यामुळे असंतोषाचा वणवा भडकण्याची चिन्हं आहेत. मालीमध्ये लष्कराने दुसऱ्यांदा बंडखोरी केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लष्कराने बंड पुकारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. राष्ट्रपती इब्राहिम बाउबकर कीता यांना पदावरून हटवत सत्ता मिळवली होती. त्यानंतर राष्ट्रपती बाह दाव आणि पंतप्रधान मोक्टर यान यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला होता.

photo content
+8

photo content
+9

photo content
+9

आपली ऑर्डर आजच बुक करा.... 🔸 !! श्री !! झेरॉक्स पुणे 🔸 ----------------------------------------- 📚Mpsc/UPSC previous Quest
आपली ऑर्डर आजच बुक करा.... 🔸 !! श्री !! झेरॉक्स पुणे 🔸 ----------------------------------------- 📚Mpsc/UPSC previous Question papers 📚 Mpsc/UPSC All Classes Test Series Question papers 📌 आमच्याकडे सर्व Classes test series ,सर्व क्लास च्या open Notes xerox करून संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळतील 📍कृपया आपली ऑर्डर आणि पत्ता पिन कोड सहित 9022407012 या Whatsapp नं. ला पाठवा. 📞 संपर्क : 9022407012 https://wa.me/message/SSHI25XQGYEKJ1

🟪या वर्षअखेरीस भारतात चित्ता भारतीय वन्यजीव संस्थेने (WII) काही वर्षांपूर्वी चित्त्याचा पुनरुज्जीवन प्रकल्प तयार केला होता. जगातील सर्वात वेगवान प्राणी असलेला आणि १९५२ साली भारतातून नामशेष जाहीर करण्यात आलेला चित्ता याच वर्षअखेपर्यंत आफ्रिकेतून भारतात आणण्याची योजना आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ता आणला जाईल, अशी माहिती राज्याचे वनमंत्री विजय शहा यांनी रविवारी दिली. भारतीय वन्यजीव संस्थेने (डब्ल्यूआयआय) काही वर्षांपूर्वी चित्त्याचा पुनरुज्जीवन प्रकल्प तयार केला होता. आफ्रिकेतील चित्त्यांना प्रायोगिक तत्त्वावर भारतातील अनुरूप अधिवासात परत आणण्यास सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मान्यता दिली होती. ‘‘आफ्रिकेतून शिवपूर जिल्ह्य़ातील कुनो येथे आणण्यात येणाऱ्या ५ माद्यांसह सुमारे १० चित्त्यांसाठी बंदिस्त जागा तयार करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली असून, हे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल,’’ असे शहा यांनी  सांगितले. स्रोत : लोकसत्ता

🟪भारतातील केरळ हे राज्य भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य असून त्याची एकूण साक्षरता 93.91 टक्के एवढी आहे. त्याच्या पाठोपाठ लक्षद्वीप ची साक्षरता आहे आणि त्याची एकूण साक्षरता 92.28 टक्के एवढी आहे.  ▪️साक्षरतेच्या बाबतीत प्रथम पाच राज्ये 1) केरळ (93.91%) 2) लक्षद्वीप (92.28%) 3) मिझोराम (91.58%) 4) त्रिपुरा (87.75%) 5) गोवा (87.40%) ▪️साक्षरतेच्या बाबतीत शेवटची पाच राज्ये 1) बिहार (63.82 टक्के ) 2) तेलंगणा (66.5 टक्के ) 3) अरुणाचल प्रदेश (66.95 टक्के ) 4) राजस्थान (67.06 टक्के ) 5) आंध्र प्रदेश (67.4 टक्के)

🟪ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अध्यक्षीय निवडणुकीत अन्वी भुतानी विजयी. मानव विद्या शाखेची मूळ भारतीय वंशाची विद्यार्थिनी अन्वी भुतानी ही ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अध्यक्षीय पोटनिवडणुकीत विजयी झाली आहे. भुतानी ही वांशिक जागरूकता व समानता मोहिमेची सहअध्यक्ष असून ऑक्सफर्ड इंडिया सोसायटीची अध्यक्ष आहे. २०२१-२०२२ या वर्षासाठी ती अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात होती. तिला गुरुवारी रात्री विजयी घोषित करण्यात आले. या निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान झाले असून २५०६ जणांनी मतदान केले २०१९ च्या तुलनेत ही वाढ १४६ टक्के आहे. आताच्या निवडणुकीत एकूण ११ उमेदवार रिंगणात होते. याआधी झालेल्या निवडणुकीत रश्मी सावंत ही भारतीय विद्यार्थिनी फेब्रुवारीत निवडून आली होती पण समाजमाध्यमावरा पोस्टमुळे तिने दिला होता.

​​🟪राजेश बन्सल: रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) याचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बन्सल यांची रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचा एक भाग असलेले रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक क्षेत्रात अभिनव पद्धतींचा अवलंब करण्यास पाठिंबा देणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना ऑगस्ट 2020 मध्ये झाली. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) विषयी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. RBIचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उपगव्हर्नर नियुक्त केले जातात. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.

​🟪हॉकी इंडिया आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) याच्या ‘एटिनी ग्लिचीट्च पुरस्कार’चा विजेता. ▪️हॉकी इंडिया या राष्ट्रीय संघाने आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) याच्यावतीने देण्यात आलेला ‘एटिनी ग्लिचीट्च पुरस्कार’ जिंकला. ▪️हॉकी खेळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी हॉकी इंडिया हा पुरस्कार देण्यात आला आहे. ▪️याशिवाय, व्ही कार्तिकेयन पांडियन (मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे सचिव) यांना ओडिशामधील हॉकीच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) याच्यावतीने ‘FIH प्रेसिडेंट्स पुरस्कार’ने गौरविण्यात आले. ▪️आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) विषयी ▪️आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) हे फील्ड हॉकी आणि इनडोर फिल्ड हॉकी खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे. त्याचे मुख्यालय लुसाने (स्वित्झर्लंड) येथे आहे. ▪️FIH चे पाच खंडात एकूण 128 सदस्य संघ आहेत. FIH याच्यावतीने दर चार वर्षांनंतर पुरुष हॉकी विश्वचषक (1971 सालापासून) आणि महिला हॉकी विश्वचषक (1974 सालापासून) या स्पर्धा आयोजित केल्या जातात.