fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 713 مشترک است و جایگاه 5 607 را در دسته آموزش و رتبه 11 981 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 713 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 07 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -75 و در ۲۴ ساعت گذشته برابر 2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.26% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.17% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 2 111 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 068 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 08 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 713
مشترکین
+224 ساعت
-477 روز
-7530 روز
آرشیو پست ها
photo content

🟪उत्तर प्रदेशात लवकरच Population Policy होणार लागू!; लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी योजना राज्यातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार योजना आणणार आहे. यासाठी ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिवसाचं औचित्य साधण्यात आलं आहे. २०२१ ते २०३० या कालावधीत लोकसंख्या नियंत्रणासाठी खास उपाययोजना आखण्यात आली आहे. “लोकांना चांगल्या सुविधा आणि राज्याचा विकास व्हावा यासाठी पावलं उचलली जात आहेत. गरीबी आणि निरक्षरता लोकसंख्या वाढीचं कारण आहे. काही समाजात लोकसंख्येबाबत जागरुकता नाही. त्यासाठी त्यांना जागरूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत”, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर याबाबत एक प्रेझेंटेशन करण्यात आलं. नव्या लोकसंख्या नियंत्रण पॉलिसीनुसार उत्तर प्रदेशात २०२६ पर्यंत जन्मदर २.१ टक्के करण्याचं लक्ष्य आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशात जन्मदर आता २.७ टक्के इतका आहे. हा आकडेवारी राष्ट्रीय जन्मदराच्या २.२ टक्क्यांहून अधिक असल्याचं समोर आलं आहे. तर २०३० पर्यंत जन्मदर १.९ टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी कुटुंब नियोजन आणि आरोग्य सुविधांवर भर दिला जाणार आहे. आरोग्य सुविधांमुळे बालमृत्यू आणि मातृ मृत्यू दर कमी करण्यास मदत होणार आहे. यामुळे नियोजनाला चालना मिळणार आहे.

🟪भारत-नेपाळ रेल सेवा करार नेपाळ आणि भारत या देशांनी ‘भारत-नेपाळ रेल सेवा करार (RSA) 2004’ यासाठी विनिमय पत्रावर (LoE) स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे दोनही देशांमधील सर्व अधिकृत मालवाहू रेलगाडी संचालकांना नेपाळमधून भारतात तसेच भारतातून नेपाळकडे आणि भारताकडून इतर तिसऱ्या देशावाटे नेपाळकडे मालवाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वे जाळ्याचा वापर करण्यास परवानगी मिळते. 💢नेपाळ देश नेपाळ हा भारत व चीन (तिबेट) या दोन राष्ट्रांदरम्यान, हिमालयाच्या दक्षिण उतारावर वसलेला एक स्वतंत्र सार्वभौम देश आहे. याच्या उत्तरेस चीन (तिबेट) आणि पूर्वेस सिक्कीम व पश्चिम बंगाल, दक्षिणेस बिहार व उत्तर प्रदेश आणि पश्चिमेस उत्तर प्रदेश ही भारताची राज्ये असल्यामुळे हा देश संपूर्णतः भूवेष्टित आहे. देशाची राजधानी काठमांडू हे शहर आहे. नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे. 🌷भारतीय रेल्वे विषयी भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारचे कें‍द्रीय रेल्वे विभाग भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो. भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ 1853 साली झाला. 1947 सालापर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. 1951 साली या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते. भारतात पहिली रेलगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले गेले होते.

🟪स्पेलिंग बी’मध्ये आफ्रिकी वंशाची मुलगी प्रथम यंदाच्या २०२१ या वर्षातील स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत प्रथमच झैला अवांत गडदे या मुलीने पहिला क्रमांक पटकावला आहे. आतापर्यंत झालेल्या ९३ स्पर्धांमध्ये आफ्रिकी-अमेरिकी विद्यार्थिनीने ही स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मुलीला बास्केटबॉलची आवड आहे. भारतीय अमेरिकी व्यक्तींनी आतापर्यंत या स्पर्धेवर नेहमीच वर्चस्व ठेवले होते. या वेळी भारतीय अमेरिकी मुलांना दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. चैत्रा थुमाला (वय १२) ही सॅनफ्रान्सिस्कोची मुलगी दुसरी आली असून भावना मदिनी ही १३ वर्षांची न्यूयॉर्कमधील मुलगी तिसरी आली आहे. अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडेन या स्पर्धेच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या. झैला अवांत गडदे हिने मुराया या आशियाई, ऑस्ट्रेलियाच्या वृक्षाचे स्पेलिंग अचूक सागितले. झैला हिला गुरुवारी पन्नास हजार डॉलरचा स्पेलिंग बी पुरस्कार मिळाला. स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा गेल्यावर्षी करोनामुळे झाली नव्हती. झैला अवांत गडदे हिने ११ उमेदवारांना मागे टाकून ही स्पर्धा जिंकली आहे. झैला ही लुईझियानाची रहिवासी असून पहिली आफ्रिकीअमेरिकी विजेती ठरली आहे. ९३ वर्षांच्या इतिहासात या समुदायाला हे विजेतेपद मिळण्याची ही पहिलीच वेळ होती.

🟪हुर्काझला नमवून बेरेट्टिनी प्रथमच अंतिम फेरीत इटलीच्या सातव्या मानांकित माटिओ बेरेट्टिनीने शुक्रवारी कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो इटलीचा पहिला टेनिसपटू ठरला आहे. दोन तास आणि ३६ मिनिटांपर्यंत रंगलेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत २५ वर्षीय बेरेट्टिनीने पोलंडच्या १४व्या मानांकित हुबर्ट हुर्काझला ६-३, ६-०, ६-७ (३-७), ६-४ असे चार सेटमध्ये पराभूत केले. आठ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या रॉजर फेडररला उपांत्यपूर्व फेरीत हरवणाऱ्या हुर्काझला बेरेट्टिनीविरुद्ध मात्र कामगिरी उंचावता आली नाही. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात बेरेट्टिनीसमोर नोव्हाक जोकोव्हिच विरुद्ध डेनिस शापोवालोव्ह यांच्यातील विजेत्याचे आव्हान असणार आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या बेरेट्टिनीने आपल्या सव्‍‌र्हिस आणि फोरहँडच्या फटक्यांच्या जोरावर हुर्काझला निष्प्रभ केले. फेडररविरुद्ध अप्रतिम खेळ साकारणाऱ्या हुर्काझला बेरेट्टिनीविरुद्ध सूर गवसलाच नाही. त्यामुळेच पहिले दोन सेट सहजपणे जिंकल्यानंतर बेरेट्टिनीला तिसऱ्या सेटमध्ये हुर्काझच्या कडव्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले.

🟪सीपीडब्ल्यूडी 12 जुलै रोजी 167 वा स्थापना दिन साजरा करणार   केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज  मंत्रालयांतर्गत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (सीपीडब्ल्यूडी) 12 जुलै 2021 रोजी देशाच्या गौरवशाली सेवेतील  167 वे वर्ष साजरे करणार आहे. महामारीमुळे हा कार्यक्रम डिजिटल पद्धतीने  होईल. सार्वजनिक बांधकामांच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय संस्था म्हणून सीपीडब्ल्यूडी जुलै 1854 मध्ये अस्तित्वात आली.  आता एक व्यापक बांधकाम व्यवस्थापन विभाग म्हणून ती  विकसित झाली आहे.  प्रकल्प संकल्पनेपासून ते प्रकल्प  पूर्ण होईपर्यंत आणि देखभाल व्यवस्थापनापर्यंतच्या सर्व  सेवा हा विभाग प्रदान करते. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज  मंत्री हरदीपसिंग पुरी या कार्यक्रमाला 'प्रमुख  पाहुणे’ म्हणून तर गृहनिर्माण व शहरी कामकाज  राज्यमंत्री कौशल किशोर ‘सन्माननीय अतिथी ’ म्हणून उपस्थित राहतील सीपीडब्ल्यूडी फुलांचा चित्ररथ : एक मौल्यवान ठेवा   , ईआरपी ई-मॉड्यूल, निर्माण भारती -सीपीडब्ल्यूडीचे  इन  हाऊस प्रकाशन आणि सीपीडब्ल्यूडी टेलिफोन डिरेक्टरी 2021 चे   प्रकाशन , मान्यवरांच्या हस्ते   उद्घाटन सोहळ्यादरम्यान करण्यात येईल. सीपीडब्ल्यूडीवरील  एक लघुपट देखील या कार्यक्रमादरम्यान दाखवला जाईल, ज्यात सीपीडब्ल्यूडीचे उपक्रम आणि कामगिरीचा आढावा घेतला आहे. या कार्यक्रमात   विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सीपीडब्ल्यूडी पदके देखील प्रदान करण्यात  येतील आणि सीपीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि इतर तज्ञांद्वारे तांत्रिक सादरीकरण केले जाईल.  

🔰Simplified कृषिशास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. 5) भारताच्या व महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार अद्ययावत आकडेवारी. *लेखिका* *स्वाती थोरात* *M.Sc. (Agri), L.L.B.* *सहायक राज्यकर आयुक्त* *संकल्पना* *डॉ. अजित थोरबोले* *(उपजिल्हाधिकारी)* *‼️पुढील लिंकवर क्लिक करून आजच आपली प्रत नोंदवा‼️* 👇👇👇👇👇👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com https://www.ksagaronline.com/krushishastra-swati-thorat-simplified-publication.html महाराष्ट्रात सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध !

photo content
+1

🟪सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2021-22 – मालिका -IV भारत सरकारची अधिसूचना क्र .4(5)-B(W&M)/2021 दिनांक  12 मे  2021,संदर्भात  सार्वभौमg सुवर्ण रोखे योजना 2021-22 – मालिका -IV निपटारा तारीख  20,जुलै, 2021.सह 12-16 जुलै  या कालावधीत उघडल्या जातील. आरबीआयने त्यांच्या 9 जुलै , 2021  रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात प्रसिद्ध केल्यानुसार  या खरेदी  कालावधीत रोख्यांची  इश्यू किंमत 4,807 रुपये (फक्त चार हजार आठशे सात रुपये) प्रति ग्रॅम असेल.  रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार भारत सरकारने ऑनलाईन अर्ज आणि देय रक्कम डिजिटल मोडद्वारे भरणाऱ्या  गुंतवणूकदारांना निर्गम मूल्यातून (इश्यू प्राईस ) प्रति ग्राम 50 रुपये (फक्त पन्नास रुपये) सूट देण्याचे ठरवले आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण रोख्यांचे मूल्य 4,757 रुपये   प्रति ग्रॅम असेल.

🟪भारत आणि नेपाळ दरम्यान रेल्वे माल वाहतुकीला मिळाली मोठी चालना. भारत आणि नेपाळ दरम्यानची द्विपक्षीय मालवाहतूक असो किंवा भारतीय बंदरातून नेपाळला जाणारी तिसऱ्या देशातील मालवाहतूक असो सर्व मालगाडी चालकांना भारतीय रेल्वे मार्गांचा वापर करण्याची अधिकृत परवानगी मिळाल्यामुळे आज भारत आणि नेपाळ दरम्यान रेल्वे माल वाहतुकीला मोठी चालना मिळाली. या उदारीकरणामुळे नेपाळमधील रेल्वे मालवाहतूक क्षेत्रात बाजारातील मागणी पुरवठा करणारे घटक पुढे येतील आणि यामुळे कार्यक्षमता आणि खर्चातील स्पर्धात्मकता वाढू शकेल परिणामस्वरूप नेपाळी ग्राहकांना फायदा होईल. या मालवाहू गाडी चालकांमध्ये सार्वजनिक आणि खासगी कंटेनर रेल्वे चालक, ऑटोमोबाईल मालवाहू रेल्वे चालक, विशेष मालवाहू रेल्वे चालक किंवा भारतीय रेल्वेने प्राधिकृत केलेल्या इतर कोणत्याही चालकाचा समावेश असेल. भारत व नेपाळच्या अधिकाऱ्यांमधील देवाणघेवाण पत्राच्या साक्षांकित प्रति आणि नोट व्हर्बलच्या औपचारिक आदानप्रदानानंतर 09.07.2021 पासून हे लागू झाले. या पत्राच्या देवघेवीनंतर एलओई नंतर, भारतातील भारतीय रेल्वे मार्गावर माल वाहून नेणार्‍या सर्व प्रकारच्या वॅगन आता नेपाळमध्येही मालाची ने आण करू शकतात. या निर्णयामुळे वॅगनद्वारे वाहतूक होणाऱ्या ऑटोमोबाईल आणि इतर काही उत्पादनांसाठीचा वाहतूक खर्च कमी होईल. नेपाळ रेल्वे कंपनीच्या मालकीच्या वॅगन्सला भारतीय रेल्वेच्या मानकानुसार व कार्यपद्धतीनुसार नेपाळला जाणारी मालवाहतूक (कोलकाता / हल्दिया ते विराटनगर / बीरगंज मार्गांवरील अंतर्गत आणि परदेशी) भारतीय रेल्वे मार्गावर नेण्यासाठीही अधिकृत केले जाईल. या देवाणघेवाण पत्रावर स्वाक्षरी केल्याने “नेबरहुड फर्स्ट” अर्थात शेजारधर्माला प्राधान्य धोरणांतर्गत प्रादेशिक संपर्क वाढविण्याच्या भारताच्या प्रयत्नांमधील हा आणखी एक मैलाचा टप्पा आहे.

🟪खारफुटीच्या खारेपणा प्रसवणाऱ्या विशिष्ट जातीची जनुकीय रचना उलगडण्यात डीबीटी-आयएलएसच्या शास्त्रज्ञांना यश भुवनेश्वरच्या डीबीटी म्हणजेच जैव तंत्रज्ञान- जीवशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ आणि तामिळनाडूच्या एसआरएम विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षणसंस्था, यांनी संयुक्तपणे केलेल्या एका अध्ययनात, पहिल्यांदाच, ‘अॅव्हीसिनिया मरीना’ या खारफुटीच्या मीठ प्रसवणाऱ्या जातीच्या संपूर्ण संदर्भ-श्रेणीतील जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच जनुकीय रचना उलगडण्यात यश मिळाले आहे. खारफुटी किंवा कांदळवन, या वनस्पतीच्या जाती, समुद्राच्या भरती-ओहोटीच्या दलदलीच्या प्रदेशात आढळतात. आणि जिथे मीठाचे प्रमाण अधिक असते, अशा ठिकाणीही या जाती जगतात. खारफुटी, ही किनारी प्रदेशातील एक महत्वाचा स्त्रोत असून पर्यावरण आणि आर्थिक स्त्रोत म्हणूनही ते महत्वाचे असतात. कांदळवने सागरी आणि भूप्रदेशातील परीसंस्थांमध्ये दुवा म्हणून काम करतात, किनारपट्टीचे रक्षण करतात तसेच, सागरी आणि भूप्रदेशादरम्यानच्या अनेक सजीवांचा ते अधिवास असतात. अॅव्हीसिनिया मरीना ही भारतातील सर्व ठिकाणच्या कांदळवनात आढळणारी एक महत्वाची जाती आहे. ही जाती, समुद्राच्या पाण्यावर तग धरणारी, आणि मीठ प्रसवणारी जाती आहे. ही जाती, 75 टक्के समुद्री जलावर जगते आणि खारे पाणी शोषून घेण्याची तिची क्षमता >250% इतकी आहे. या वनस्पतीच्या पानांमध्ये असलेल्या मीठ ग्रंथींमधून त्या 40% पेक्षा अधिक मीठ स्त्रवू शकतात. त्याशिवाय, आपल्या मूळांमार्फत शोषून घेतल्या जाणाऱ्या खारेपणाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असलेला दुर्मिळ गुणधर्म या वनस्पतीमध्ये आढळतो. नेचर कम्युनिकेशन्स बायोलॉजीच्या अलीकडच्या अंकात प्रकाशित झालेल्या या अध्ययनात, अंदाजित 462.7 Mb पैकी एकत्रित केलेली जनुके 456.6 Mb आहेत. 31 गुणसूत्रांमधील मरीना जनुके (98.7% जनुके) 88 स्काफोल्ड आणि  252 कॉन्टिग्सपासून विकसित करण्यात आली आहेत. या तफावतीतील जनुकांचे प्रमाण 0.26% होते, ज्यातून उच्च दर्जाचे एकत्रीकरण शक्य झाल्याचे आढळते. या अध्ययनात, एकत्रित करण्यात आलेली मरीना जनुके, जवळपास पूर्ण असून, त्यांना, जगभरातील, कांदळवन जातीच्या वनस्पतीची संदर्भ श्रेणीतील जनुके असून भारतातील हा अशाप्रकारचा पहिलाच अहवाल आहे. या अध्ययनात अद्ययावत जनुकीय सिक्वेन्सिंग आणि तंत्रज्ञान असेंबल करुन, 31,477 प्रोटीन कोडींग जनुके ‘सालीनोम’ ज्यात 3246 क्षार-प्रतिसादात्मक जनुके आणि क्षार-सहन करण्याची क्षमता असलेली 614 जनुके आहेत. या अध्ययनात, 614 जनुकांची ओळख पटवण्यात आली असून, त्यात 159 ट्रान्सस्क्रीप्शन घटक असून ते जनुकांसाठी होमोलोगस आहेत.

🟪अमेरिकेत तिसऱ्या ‘बुस्टर’ मात्रेची तयारी करोना प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी बारा महिन्यांनी लशीची तिसरी मात्रा देणे शक्य व्हावे, या हेतूने अमेरिकेतील फायझर कंपनी पुढील महिन्यात परवानगीसाठी अर्ज करणार आहे. अनेक देशातील संशोधनानुसार कोविड १९ लशी डेल्टा विषाणू विरोधात संरक्षण देत आहेत. आता हा विषाणू जगात पसरला असून अमेरिकेत काही जणांना हा संसर्ग झाला आहे. फायझर लशीच्या दोन मात्रा आवश्यक असून त्यामुळे करोना विषाणूविरोधात प्रतिपिंड तयार होतात. डेल्टा विषाणू विरोधातही यात प्रतिपिंड तयार होतात. जगातील अनेक लोकांना अजून पहिली मात्राही मिळाली नसून फायझरने तिसऱ्या बुस्टर म्हणजे वर्धक लशीच्या परवान्यासाठी मागणी केली आहे. कालांतराने प्रतिपिडांची संख्या कमी होत असते. त्यामुळे वर्धक लस मात्रेची गरज आहे असे फायझरचे म्हणणे आहे. फायझरचे मिलाएल डोल्टसन यांनी सांगितले, की तिसऱ्या लशीच्या मात्रेनंतर व्यक्तींमध्ये प्रतिपिंडांचे प्रमाण हे पाच ते दहा टक्के वाढत असते. ऑगस्टमध्ये फायझर लशीच्या तिसऱ्या मात्रेच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात येणार आहे. लशीच्या दोन मात्रा प्रतिपिंड वाढवण्यासाठी गरजेच्या असतात. सर्व प्रकारच्या करोना विषाणूंपासून त्यामुळे संरक्षण मिळते. केवळ डेल्टाच नव्हे तर इतर विषाणूंनाही प्रतिकार केला जातो. ऑगस्टमध्ये फायझर कंपनी ही तिसऱ्या बुस्टर लशीच्या मात्रेसाठी परवानगीकरिता अर्ज करणार आहे.

🟪केरळमध्ये झिका विषाणूचा रुग्ण आढळला जुलै 2021 महिन्यात केरळ राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. राज्यात एक गर्भवती महिला झिका विषाणू संक्रमित आढळली आहे. याचसोबत, मच्छरांमुळे पसरणाऱ्या झिका विषाणूचे संक्रमण भारतात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. त्यानंतर तिरुवनंतपुरम शहरात झिका विषाणूचा संसर्ग झालेले आणखी 13 रुग्ण आढळून आल्यानंतर केरळ आणि तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने पुणे शहरातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी' या संस्थेकडे पाठविण्यात आले होते. याआधी भारतात 2016-17 या वर्षात गुजरात राज्यात झिका विषाणूच्या संक्रमणाची प्रकरणे समोर आली होती. ⭕️झिका विषाणू एडीज प्रकारचा डास चावल्याने हा रोग पसरतो. झिका संक्रमणाची लक्षणे डेंग्यू समान असून त्यामध्ये ताप येणे, त्वचेवर लाल रंगाचे डाग, सांधे दुखी तसेच डोळे लाल होणे अशी अनेक लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात. परंतु हा आजार जीवघेणा नाही. झिका विषाणू संक्रमित व्यक्ती सात ते आठ दिवस या संक्रमणाच्या प्रभावाखाली राहतो. गर्भवती महिलांना झिका विषाणू संक्रमणाचा अधिक धोका असून त्यामुळे जन्माला येणारे मूल अविकसित मेंदूसहीत जन्माला येण्याचा धोका अधिक असतो. बाळाचे डोकं जन्माच्या वेळी सामान्यतः नेहमीपेक्षा लहान असू शकते.

🟪ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नागरी उड्डाण मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. जनरल व्ही.के. सिंग यांनी राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया यांनी आज नागरी उड्डाण मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. एका ट्विटमध्ये सिंदिया म्हणाले, “नागरी उड्डाण मंत्रालयाची सूत्रे हरदीप एस पुरी यांच्याकडून घेताना आनंद झाला. माझे कर्तव्य मनापासून निष्ठेने पार पाडण्याचा आणि त्यांनी हाती घेतलेले चांगले कार्य पुढे सुरु ठेवण्याचा मी संकल्प करतो.” माजी नागरी उड्डाण मंत्री आणि विद्यमान गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप एस पुरी आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यावेळी उपस्थित होते. यापूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 2007-2009 या काळात दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून, 2009 ते 2012 पर्यंत वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि नंतर 2012 ते 2014 ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मध्य प्रदेशातून ते चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते आणि आता राज्यसभेचे सभासद म्हणून त्यांचा हा पहिलाच कार्यकाळ आहे. सिंदिया वित्त, परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण, शिक्षण, महिला, मुले, युवक व क्रीडा संबंधी स्थायी समिती तसेच अनुमान, याचिका व विशेषाधिकार समितीचे सदस्य आणि गृह मंत्रालय सल्लागार समितीचे सदस्य होते. शैक्षणिक पार्श्वभूमी बाबत सांगायचे तर सिंदिया हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राचे पदवीधर आहेत आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून मास्टर्स ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) केले आहे.

🟪श्री. महेंद्र नाथ पांडे यांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून पदभार स्वीकारला श्री किशन पाल गुर्जर यांनी राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. श्री. महेंद्र नाथ पांडे यांनी आज केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. या प्रसंगी माध्यमांशी बोलताना मंत्री म्हणाले की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारच्या धोरणांची परिश्रमपूर्वक अंमलबजावणी देशाच्या औद्योगिक क्षेत्रात केवळ आत्ताच नव्हे तर भावी पिढ्यांसाठी प्रामाणिकपणे केली जाईल. डॉ. पांडे विद्यमान सरकारमध्ये आधी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री होते आणि त्यांनी 5 जुलै 2016 ते 2 सप्टेंबर 2017 या कालावधीत मनुष्यबळ विकास मंत्रालयात (आताचे शिक्षण मंत्रालय) राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. श्री. पांडे पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी आणि बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदीमध्ये पीएच.डी. संपादन केली आहे.

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟪INSACOG प्रयोगशाळांकडे नमुने पाठ्विण्यासाठी प्रमाणित कार्यान्वयन पद्धत (SOP) काय आहे. INSACOG प्रयोगशाळांकडे नमुने पाठ्विण्यास्ठी प्रमाणित कार्यान्वयन पद्धत आणि जनुकीय क्रमनिर्धारण विश्लेषणावर आधारित पुढील प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. विविध जिल्हे किंवा संरक्षणात्मक ठिकाणांहून प्रादेशिक जनुकीय क्रमनिर्धारण प्रयोगशाळांकडे (RGSLs)पाठविण्यात येणाऱ्या नमुन्यांचा संग्रह आणि वाहतूक यासाठी एकात्मिक रोग तपासणी कार्यक्रमाची यंत्रणा काम करते. विषाणूंची दखलपात्र रूपे  (VoI) आणि चिंताजनक रूपे (VoC), धोकादायक दखलपात्र रूपे आणि उत्परिवर्तन झालेली इतर रूपे यांची ओळख पटविणे आणि जनुकीय क्रमनिर्धारण निश्चित करणे यासाठी RGSLs जबाबदार असतात. विषाणूंची दखलपात्र रूपे  (VoI) आणि चिंताजनक रूपे (VoC) यांच्याबाबतची माहिती एकात्मिक रोग तपासणी कार्यक्रमाच्या(IDSP) केंद्रीय तपासणी विभागाकडे सादर केली जाते जेणेकरून राज्य तपासणी अधिकाऱ्याशी समन्वय साधून या नमुन्यांतील वैद्यकीय-साथ रोग संबंध स्थापित करता येऊ शकेल. INSACOG ला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शास्त्रीय आणि वैद्यकीय सल्लागार गटाशी(SCAG) चर्चा केल्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की सार्वजनिक आरोग्य विषयाशी संबंध असू शकेल अशा जनुकीय उत्परिवर्तनाची निश्चिती झाल्यानंतर RGSL ते SCAG  कडे सादर करेल. विषाणूच्या महत्त्वाच्या आणि धोकादायक रूपांविषयी तसेच इतर उत्परिवर्तनाविषयी SCAG मध्ये चर्चा होईल आणि गरज वाटली तर अधिक तपासणीसाठी ते नमुने केंद्रीय तपासणी विभागाकडे पाठविले जातील. IDSP ने निश्चित केलेले जनुकीय क्रमनिर्धारण विश्लेषण आणि वैद्यकीय-साथ रोग संबंध यांची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, ICMR, DBT, CSIR आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांना कळविली जाईल, या माहितीच्या आधारे संबंधित विभागांना सार्वजनिक आरोग्य उपाययोजना ठरविणे आणि त्यांची अंमलबजावणी करण्यास मदत होईल. विषाणूची नवीन उत्परिवर्तित रूपे, चिंताजनक रूपे यांचे प्रयोगशाळेत संवर्धन केले जाते, त्यांचा जनुकीय अभ्यास हाती घेऊन लसीची या रूपांच्या बाबतीत परिणामकारकता आणि या रूपांचे प्रतिकारशक्तीला चकवा देण्याचे गुणधर्म याबाबत अधिक माहिती मिळवता येते.

🟪ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांना बंदी. टोक्योमधील करोनारुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आणीबाणीमध्ये वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकसाठी स्टेडियमवरील प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे, असे ऑलिम्पिकमंत्री तामायो मारूकावा यांनी सांगितले. सध्याची आणीबाणी रविवारी संपल्यानंतर लगेच सोमवारपासून लागू होणारी आणीबाणी २२ ऑगस्टपर्यंत लागू असेल. त्यामुळे ऑलिम्पिकचा २३ जुलैला होणारा उद्घाटन सोहळा आणि ८ ऑगस्टचा समारोप सोहळा यांच्यापुढे आणीबाणीचे आव्हान असेल. दूरचित्रवाणीनुरूप ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांवर बंदी असेल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषद (आयओसी) आणि ऑलिम्पिक संयोजन समितीने जाहीर केले. ‘‘करोनाच्या डेल्टा उत्परिवर्तनाचा धोका लक्षात घेऊन महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना ऑलिम्पिक पाहण्यासाठी स्टेडियमला हजर राहता येण्याची शक्यता कमी आहे,’’ असे पंतप्रधानांनी आणीबाणी जाहीर करताना म्हटले होते. आणीबाणीच्या कालावधीत मद्यपींचा वावर असलेले बार, रेस्टॉरंट आणि कराओके पार्लर्सवर बंदी घालण्यात आली आहे. टोक्योमधील रहिवाशांकडून घरी थांबून दूरचित्रवाणीवर ऑलिम्पिकचा आस्वाद घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे. गुरुवारी टोक्यो शहरात ८९६ करोनारुग्णांची नोंद झाली आहे.

🟪केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय. केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तार करण्यात आल्यानंतर पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आलं आहे. माजी आयएएस अधिकारी असणाऱ्या अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला असून कामकाजाला सुरुवात केली. दरम्यान पहिल्याच दिवशी त्यांनी मोठा निर्णय घेतला असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. रेल्वे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील असा आदेशच त्यांनी दिला आहे. “रेल्वेमंत्र्यांनी सर्व कार्यालयं आणि मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील असा आदेश दिला आहे. पहिली शिफ्ट सकाळी ७ ते ४ आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते १२ असेल. आजपासून या आदेशाची अमलबजावणी सुरु झाली आहे,” अशी माहिती रेल्वे मंत्रालयाचे एडीजी पीआर डी जे नारायण यांनी दिली आहे.