fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 715 مشترک است و جایگاه 5 607 را در دسته آموزش و رتبه 11 981 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 715 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 07 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -75 و در ۲۴ ساعت گذشته برابر 2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.26% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.17% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 2 111 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 068 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 08 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 715
مشترکین
+224 ساعت
-477 روز
-7530 روز
آرشیو پست ها
🟪‘एक देश एक शिधापत्रिका’ योजना ३१ जुलैपर्यंत लागू करण्याचे आदेश एक देश, एक शिधापत्रिका योजना ३१ जुलैपर्यंत देशातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशात लागू करण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला आहे. स्थलांतरित मजुरांना कोविड १९ स्थिती कायम असेपर्यंत कोरडा शिधा स्वस्त धान्य दुकानांमार्फत उपलब्ध करावा, असा आदेशही केंद्र सरकारला देण्यात आला आहे. न्या. अशोक भूषण व न्या. एम.आर शहा यांनी तीन कार्यकर्त्यांच्या विनंतीवर हे आदेश जारी केले असून त्यात केंद्र व राज्य सरकारांना अन्न सुरक्षा, रोख हस्तांतर व इतर कल्याणकारी योजना लागू करण्यास सांगितले आहे. संचारबंदी व टाळेबंदीमुळे स्थलांतरित कामगारांचे रोजगार गेले आहेत. दुसऱ्या लाटेतही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. एक देश एक शिधापत्रिका योजना गरीब नागरिकांच्या कल्याणासाठी असून त्यांना त्यांच्या इतर राज्यातील कामाच्या ठिकाणी शिधा उपलब्ध करून द्यावा. तिथे त्यांची शिधापत्रिका कुठे नोदली गेली आहे याचा विचार करू नये. न्यायालयाने केंद्राला असा आदेश दिला की, नॅशनल इनफॉर्मेटिक सेंटरने असंघटिक कामगारांना लाभ देण्यासाठी त्यांची नोंदणी करण्यात मदत करावी. सर्व कल्याणकारी योजना ३१ जुलैपासून लागू करण्यात याव्यात. राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांनी स्थलांतरित कामगारांसाठी कोविड साथ सुरू असेपर्यंत सामूहिक स्वयंपाक योजना राबवावी , कामगारांना शिधा देण्यासाठी केंद्राने पुरवठा करावा. ३१ जुलैपर्यंत शिधासह सर्व योजना लागू करण्यात याव्यात. आंतरराज्य स्थलांतरित कामगारांसाठीचे कंत्राटदार व आस्थापनांची रोजगार व सेवा नियम कायदा १९७९ अन्वये नोंदणी करण्यात यावी.

🟪 यंदाचा टी-२० वर्ल्डकप यूएई आणि ‘या’ देशात होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी यंदाच्या टी-२० वर्ल्डकपचे ठिकाण आणि तारीख जाहीर केली आहे. यावेळी टी-२० वर्ल्डकप यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला जाईल. १७ ऑक्टोबरला वर्ल्डकपचा पहिला सामना खेळवला जाईल. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे. करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा भारतातून बाहेर आयोजित केली जाणार आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार ही स्पर्धा भारतात होणार नसली, तरी बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करेल. ‘या’ चार स्टेडियममध्ये होणार सर्व सामने - आयसीसीच्या म्हणण्यानुसार टी-२० वर्ल्डकपचे सर्व सामने यूएई आणि ओमानमधील ४ स्टेडियमवर होणार आहेत. यामध्ये दुबई, अबुधाबीचे शेख झायेद स्टेडियम, शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी मैदान यांचा समावेश आहे.

🟪छोट्या बचत योजना, पीपीएफच्या व्याजदरासंबंधी केंद्राचा मोठा निर्णय छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे बचत योजनांवरील व्याजदर दुसऱ्या तिमाहीत जैसे थे राहणार आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच छोट्या बचत योजनांमध्ये व्याजकपात करण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाकडून मागे घेण्यात आल्यानंतर आता ही घोषणा करण्यात आली आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना झटका देत केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून छोट्या बचत योजनांमध्ये व्याजकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र नंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा आदेश चुकून निघाल्याचं सांगत व्याजदर जैसे थे राहतील असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान सरकारने सर्वसामान्यांची पसंती असणाऱ्या छोट्या बचत योजनांच्या व्याजरादत कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला असून बँक डिपॉझिट रेटच्या तुलनेत जास्त परतावा मिळणार आहे.

🟪‘भारत नेट’ योजनेंतर्गत गावागावांमध्ये इंटरनेट १६ राज्यांमधील ३ लाख ६१ हजार गावांमध्ये इंटरनेट ब्रॉडबॅण्डची सुविधा पोहोचवण्यासाठी १९ हजार कोटी तर, वीज वितरण क्षेत्रातील सुधारणांसाठी ३ लाख कोटींच्या खर्चाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या शिवाय, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या अन्य योजनांवरही शिक्कामोर्तब करण्यात आले. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त लालकिल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ६ लाख गावे १ हजार दिवसांमध्ये इंटरनेटने जोडली जातील अशी घोषणा केली होती. गरीब कल्याण धान्य योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनीच दोन आठवड्यांपूर्वी केली होती. त्यासाठी केंद्राने ९३ हजार कोटींची तरतूद केली असून ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरवले जात आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या १.१० लाख कोटींच्या कर्जहमी योजनेलाही मंजुरी देण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकूण ६.२८ लाख कोटींच्या योजना जाहीर केल्या होत्या. वीज वितरण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी केंद्राने राज्यांना आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. वीज ऊर्जा क्षेत्रासाठी ३.०३ लाख कोटींना मंजुरी देण्यात आली. मोठ्या शहरात स्वयंचलित यंत्रणा लागू करणे, सौर ऊर्जा यंत्रणेचा विस्तार करणे, गरिबांना प्रतिदिन रिचार्ज यंत्रणा लागू करणे आदी सुधारणा केल्या जाणार आहेत.

🟪शेतकरी पुत्रास जागतिक स्तरावरील ‘चेवनिंग’ शिष्यवृत्ती नेतृत्व विकासासाठी जागतिक स्तरावर दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित अशा ‘चेवनिंग’ शिष्यवृत्तीसाठी येथील राजू केंद्रे या सामाजिक कार्यकर्ता विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. शिष्यवृत्ती निवड मंडळाने राजूला शेवटचा प्रश्न विचारला, ‘तुझी या स्कॉलरशिप साठी निवड झाली नाही तर काय करशील? माझी निवड नाही झाली तरी पुढच्या १० वर्षांत १० एकलव्य चेवनिंग स्कालर्स असतील’, असे उत्तर त्याने दिले आणि जगभरातील १६० देशातील एक हजार ३५० विद्यार्थ्यांमधून राजूची निवड झाली. फॉरेन कॉमनवेल्थ विभागाच्या वतीने दिली जाणारी चेवनिंग शिष्यवृत्ती ब्रिटिश सरकारच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमातील महत्त्वाची आणि मानाची समजली जाते. जवळपास ४५ लाख रुपयांची ही शिष्यवृत्ती असून इंग्लंडमध्ये शिकायला लागणारा सर्व खर्च पुरवते. या शिष्यवृत्तीसाठी १६० देशांमधील ६३ हजार अर्ज आले होते. त्यातील पाच हजार विद्यार्थ्यांनी दोन फेऱ्यानंतर मुख्य मुलाखत दिली. त्यातून एक हजार ३५० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीकरिता अंतिम निवड झाली. मंगळवारी राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे याला ही शिष्यवृत्ती जाहीर झाली. बुलढाणा जिल्ह्यतील लोणार तालुक्यातील पिंप्री (खंदारे) हे राजू याचे गाव आहे. तेथे त्याचे आई-वडील शेती करतात. राजू केंद्रे याने यवतमाळच्या सावित्री ज्योतिबा समाजकार्य महाविद्यालात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करत असताना ‘एकलव्य अ‍ॅकेडमी’ नावाने शैक्षणिक चळवळ सुरू केली. मुख्यमंत्री फेलाशिपमध्येही त्याने यवतमाळ जिल्ह्यत अनेक पारधी बेडय़ांवर काम केले. सध्या तो यवतमाळातून एकलव्य चळवळीद्वारे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करतो. या विद्यार्थ्यांसाठी अडगळीतील पुस्तके संकलन करून ती गरजूंना देण्याचा त्याचा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांना उपयोगी पडत आहे.

🟪जागतिक कसोटीच्या प्रत्येक सामन्यासाठी समान गुण जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या दुसऱ्या पर्वाच्या नियमांत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक सामन्यासाठी समान गुण मिळणार आहेत. सामना जिंकल्यास १२ गुण, अनिर्णीत राहिल्यास ४ गुण, तर बरोबरीत (टाय) सुटल्यास ६ गुण संघांना मिळतील. भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपासून नवी नियमावली लागू होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ ऑलरडाइस यांनी जून महिन्याच्या पूर्वार्धात नियमावलीत बदलाचे संकेत दिले होते. ‘‘जागतिक कसोटी स्पर्धेच्या पहिल्या पर्वात प्रत्येक मालिकेसाठी समान म्हणजे १२० गुणांचा नियम कार्यरत होता. परंतु आता मालिका दोन कसोटींची असो किंवा पाच कसोटींची प्रत्येक सामन्यासाठी कमाल १२ गुण संघाला मिळवता येतील. मग उपलब्ध सामने व गुण याच्या टक्केवारीनुसार क्रमवारी निश्चित केली जाईल,’’ असे ‘आयसीसी’च्या कार्यकारी मंडळातील सदस्याने सांगितले.

ब्राह्मो समाज व आर्य समाज यांच्या शिकवणुकीत खालीलपैकी कोणत्या मुद्यावर एकमत नव्हते?
Anonymous voting

ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना कोणी केली होती?
Anonymous voting

इ.स.1823 मध्ये डेव्हिड हेअर यांच्या मदतीने कोलकत्ता येथे 'हिंदू कॉलेज'ची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

"वेद हेच खरे धर्मग्रंथ आहे व सर्व सत्य वेदामध्येच आहे", असे आग्रहाने कोणी प्रतिपादन केले?
Anonymous voting

कोणत्या मोगल बादशहाचे बंद केलेले निवृत्तीवेतन पुन्हा चालू करावे म्हणून राजा राममोहन हे इंग्लंडला गेले होते?
Anonymous voting

🟪Simplified Daily current Affairs 01 July 2021.pdf 🎥Video पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇 https://youtu.be/rJcFFjCcqTY

photo content
+8

photo content
+9

photo content

photo content

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

खालील वर्णन कोणाचे आहे. a) त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित आणि संस्कृत विषयाचे अध्ययन केले. b) पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूल या संस्थेच्या स्थापनेत सहभाग होता. c) काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना केली. d) 'वेदांग ज्योतिष' हा ग्रंथ लिहिला होता.
Anonymous voting

MPSC SIMPLIFIED(official) - آمار و تحلیل کانال تلگرام @mpscsimplified