fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 766 مشترک است و جایگاه 5 593 را در دسته آموزش و رتبه 11 939 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 766 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 13 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -26 و در ۲۴ ساعت گذشته برابر 19 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 12.63% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 8.01% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 4 266 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 2 704 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 14 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 766
مشترکین
+1924 ساعت
+537 روز
-2630 روز
آرشیو پست ها
Photo from Ramakant Kapse
Photo from Ramakant Kapse

▪️हेमंत नगराळे होणार मुंबईचे नवे पोलिस आयुक्त. 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/si
▪️हेमंत नगराळे होणार मुंबईचे नवे पोलिस आयुक्त. 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟧काही लोक रेल्वेची परीक्षा (NTPC) 21 मार्च ला असल्यामुळे, राज्यसेवा परीक्षा पुढे जाईल अशी अफवा पसरवत आहेत. ❌️❌️ त्या अफवांवर
🟧काही लोक रेल्वेची परीक्षा (NTPC) 21 मार्च ला असल्यामुळे, राज्यसेवा परीक्षा पुढे जाईल अशी अफवा पसरवत आहेत. ❌️❌️ त्या अफवांवर कसलाही विश्वास ठेऊ नका..❌️❌️ कारण Railway च्या परीक्षा आणी आयोगाच्या परीक्षा यांचा काहीही संबंध नाही आहे.🚆🚆 👉NMMS परीक्षा ही राज्यसेवा परीक्षा 21 मार्च ला असल्यामुळे 6 एप्रिल ला पुढे ढकलली आहे. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 मार्च ला 100% होणार आहे.. सातत्याने अभ्यास करत रहा. अश्या परीक्षा होणार नाही. negative अफवा पसविणारे यांच्यापासून या काळात चार हात लांबच थांबा. Thank-you❗️👍 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟧वाचा :- प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी”: आरोग्य आणि शिक्षण उपकर रकमेतून आरोग्यासाठी एकल अक्षय राखीव निधी आरोग्यासाठी “प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी” (PMSSN) हा एकल अक्षय राखीव निधी निर्माण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ‘वित्त कायदा 2007’ याच्या कलम 136(ब) अंतर्गत लावण्यात आलेल्या आरोग्य आणि शिक्षण उपकर रकमेतून हा निधी उभारण्यात येणार आहे. ▪️ योजनेची वैशिष्ट्ये हा सार्वजनिक खात्यात आरोग्यासाठी अक्षय राखीव निधी आहे.आरोग्य आणि शिक्षण उपकरातला आरोग्याचा वाटा निधीमध्ये जमा केला जाईल.निधीमधल्या जमा रकमेचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या खालील योजनांसाठी उपयोग केला जाईल. आयुषमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) आयुषमान भारत - आरोग्य आणि वेलनेस केंद्रे (AB-HWCs) राष्ट्रीय आरोग्य अभियान प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY) आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्तीसाठी सज्जता आणि आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रतिसाद शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याच्या दिशेने कोणताही भविष्यातला आराखडा किंवा योजना तसेच ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017’ यामध्ये ठेवण्यात आलेली उद्दिष्टेनिधीचे प्रशासन आणि देखभाल हे काम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे सोपवण्यात आले आहे. कोणत्याही वित्तीय वर्षात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अशा योजनासाठीचा खर्च सुरवातीला निधीमधून करण्यात येईल त्यानंतरचा खर्च सकल अर्थसंकल्पीय सहाय अंतर्गत करण्यात येईल.

🟧भारतीय रेल्वेने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व ट्रेन रद्द केल्या? रेल्वे मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण करोना व्हायरस पुन्हा डोकं वर काढत असताना देशभरात अनेक राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाउन किंवा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात सोशल मीडियावर भारतीय रेल्वेने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व ट्रेन रद्द केल्याचं वृत्त वेगाने पसरतंय. त्यावर अखेर रेल्वे मंत्रालयाकडून निवेदनाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ३१ मार्चपर्यंतच्या ट्रेन रद्द करण्यात आल्याचं वृत्त तथ्यांवर आधारित नसल्याचं रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. सोमवारी रेल्वे मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे, “सोशल मीडियामध्ये व्हायरल होणारं वृत्त दिशाभूल करणारं असून तथ्यांवर आधारित नाहीये. सोशल मीडियामध्ये चुकीच्या न्यूज क्लिप प्रसारित केल्या जात आहेत. व्हायरल होणारा व्हिडिओ गेल्या वर्षीचा असून चुकीच्या संदर्भासह तो व्हायरल होत आहे”, असं स्पष्टीकरण देण्यात आलं. याशिवाय, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) या संस्थेनेही स्पष्टीकरण दिलं आहे. “ट्रेन रद्द केल्याचं वृत्त जुनं आहे, भारतीय रेल्वेने ३१ मार्चपर्यंतच्या ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही. जुनी बातमी चुकीच्या संदर्भासह शेअर केली जात आहे”, असं पीआयबीकडूनही स्पष्ट करण्यात आलं आहे

🟧लस सुरक्षित असल्याचा ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’चा दावा कोविड प्रतिबंधासाठी तयार केलेली ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस सुरक्षित असल्याचा दावा अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनी व ब्रिटनच्या औषध नियंत्रक संस्थेने केला आहे. या लशीमुळे रक्तात गुठळ्या होऊन काही लोकांचे मृत्यू झाल्याच्या घटनांनंतर काही युरोपीय देशांनी या लशीचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाने त्यांची लस सुरक्षित असल्याचे सांगतानाच रक्ताच्या गुठळ्या होण्यामागे लशीचे कारण असल्याचे पुरावे नाहीत असे स्पष्ट केले आहे. नेदरलँडसने या लशीचा वापर थांबवला असून ऑक्सफर्डची लस अ‍ॅस्ट्राझेनेकाने उत्पादित केलेली आहे, तशीच भारतात ती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या पुण्यातील कंपनीने कोव्हिशिल्ड नावाने तयार केली आहे. ब्रिटिश-स्वीडिश औषध कंपनी असलेल्या अ‍ॅस्ट्राझेनेकाने लस सुरक्षित असल्याचा दावा केला असून ब्रिटनच्या औषध नियंत्रकांनीही त्याला दुजोरा दिला आहे. आतापर्यंत आयर्लंड, बल्गेरिया, डेन्मार्क, नॉर्वे व आइसलँड या देशांनी या लशीचा वापर थांबवला आहे. युरोपीय समुदाय व ब्रिटन मिळून १कोटी ७० लाख लोकांना ही लस देण्यात आली आहे. लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या झाल्याच्या घटना शंभरापेक्षाही कमी आहेत, असे अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी श्रीमती अ‍ॅन टेलर यांनी सांगितले.

🟧अन्नू राणीचा नवा राष्ट्रीय विक्रम अन्नू राणी हिने फेडरेसन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. मात्र ऑलिम्पिकचा पात्रता निकष तिला पार करता आला नाही. राणीने ६३.२४ मीटर अशी कामगिरी करत स्वत:चाच ६२.४३ मीटरचा विक्रम मोडीत काढला. टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष ६४ मीटर इतका आहे. सविता पाल हिने १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. किरण बलियान याने गोळाफेक प्रकारात १६.४५ मीटर अशी कामगिरी करत सुवर्णपदक प्राप्त केले. तामिळनाडूच्या रॉसी पौलराजने पोलव्हॉल्ट प्रकारात ३.८० मीटर इतकी कामगिरी नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली.

🟧राज्यांना आठवड्याची मुदतवाढ शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची ५० टक्के मर्यादा व सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्ग ठरविण्याचा अधिकार या दोन्ही मुद्द्यांवर राज्यांना बाजू मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक आठवड्याची मुदतवाढ दिली. मात्र मराठा आरक्षणाच्या सुनावणीला स्थगिती देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत सर्व राज्यांना नोटीस पाठवली होती. त्यावर तमिळनाडू, केरळ, हरियाणा आणि राजस्थान या चार राज्यांनी प्रतिसाद देत बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ मागितली. तमिळनाडू व केरळ या राज्यांमध्ये ६ एप्रिल रोजी विधानसभेची निवडणूक होत असल्याने विद्यमान राज्य सरकार तूर्तास कोणतीही भूमिका न्यायालयात मांडू शकत नाही. आरक्षणाचा मुद्दा घटनात्मक असल्याने त्यावर निवडणुकीपूर्वी भाष्य करणे राज्य सरकारांना शक्य नाही. निवडणूक होईपर्यंत सुनावणी स्थगित करण्याची विनंती दोन्ही राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणीदरम्यान करण्यात आली. त्यावर निवडणुकीमुळे सुनावणी स्थगित केली जाणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी न्या. अशोक भूषण, न्या. नागेश्वर राव, न्या. हेमंत गुप्ता, न्या. अब्दुल नझीर व न्या. रवींद्र भट्ट यांच्या पाचसदस्यीय पीठापुढे घेतली जात आहे. केंद्राने अनुच्छेद १०२ मध्ये दुरुस्ती केल्यानंतर राज्यांना मागास प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार आहे का? तसेच इंद्रा सहानी निकालामुळे लागू झालेल्या आरक्षणावरील ५० टक्के मर्यादेचा फेरविचार होऊ शकतो का, या दोन मुद्द्यांवर सुनावणी चर्चा केली जात आहे. २६ राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यात आल्याने राज्यांचेही मत विचारात घ्यावे, असा युक्तिवाद महाराष्ट्र सरकारच्या वतीने करून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी राज्यांना नोटीस पाठवण्याची विनंती केली होती.

🟧महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात येणाऱ्यांना एका आठवड्याचे विलगीकरण सक्तीचे मध्य प्रदेश सरकारने कोविड प्रतिबंधासाठी नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या सीमारेषेजवळील जिल्ह्यांना शेजारच्या राज्यातून येणाऱ्यांची माहिती देण्याबाबतचे आदेश दिले आहेत त्याबरोबरच त्यांना आठवडाभर विलगीकरणात ठेवण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. कोविड -१९ मुळे सध्या महाराष्ट्र राज्य सर्वात जास्त बाधीत झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कोरोनव्हायरसचे १,२७,४८० सक्रिय रुग्ण आढळले आहेत, तर मध्य प्रदेशात फक्त ४७४० इतकेच रूग्ण आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा, बालाघाट, बैतूल, सिवनी, खंडवा, बडवानी, खारगोन आणि बुरहानपूर या आठ जिल्ह्यांना महाराष्ट्राची सीमा लागली आहे . मध्य प्रदेश सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये तसेच राज्याची राजधानी भोपाळ आणि औद्योगिक केंद्र इंदूरमधील बंद सभागृहात उपस्थितीची क्षमता ५० टक्के मर्यादित असेल. शासनाने लोकांना दोरीच्या सहाय्याने सीमा तयार करून आणि दुकानासमोर गोल रेखाटून सामाजिक सावधानता पाळण्याचे आणि खबरदारीचा उपाय म्हणून सक्तीने मास्क परिधान करण्याचे निर्देश दिले आहे. कोविड -१९ प्रकरणांमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी जिल्हा संकट व्यवस्थापन समित्यांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले.

🟧महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020" प्रवेशप्रमाणपत्र जाहीर. https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com
▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

इतिहासातील_काही_कायदे_1562716050.pdf3.49 MB

इतिहास_काही_महत्त्वाचे_कायदे_By_439592297.pdf1.85 MB

photo content
+6

🟧भारतातील राज्ये व त्या राज्यातील प्रसिद्ध नृत्यप्रकार 🔰 महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य 🔰 तामिळनाडू : भरतनाट्यम 🔰 केरळ : कथकली 🔰 आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम 🔰 पंजाब : भांगडा, गिद्धा 🔰 गुजरात : गरबा, रास 🔰 ओरिसा : ओडिसी 🔰 जम्मू आणी काश्मीर : रौफ 🔰 आसाम : बिहू , जुमर नाच 🔰 उत्तरखंड : गर्वाली 🔰 मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला 🔰 मेघालय : लाहो 🔰 कर्नाटक : यक्षगान , हत्तारी 🔰 मिझोरम : खान्तुंम 🔰 गोवा : मंडो 🔰 मणिपूर : मणिपुरी 🔰 अरुणाचल प्रदेश : बार्दो छम 🔰 झारखंड : कर्मा 🔰 छत्तीसगढ : पंथी 🔰 राजस्थान : घुमर 🔰 पश्चिम बंगाल : गंभीरा 🔰 उत्तर प्रदेश : कथक

photo content
+2

🟧 चर्चेतील पुस्तके 🟧 खेळाडूची पुस्तके १) अ सेच्युरी इज नॉट इनफ - सौरभ गांगुली व गौतम भट्टाचार्य २) २८१ आणि त्यापुढे - व्ही.व्ही.एस.लक्ष्मण ३) अ टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग ४) नो स्पीइन - शेन वॉर्न ५) गेम चेंजर - शाहिद आफ्रिदी ६) अनब्रेकेबल - मेरी कोम ७) द स्मॉल वंडर - दीपा कर्माकर ८) माइंड मास्टर - विश्वनाथ आनंद ९) ड्रीम्स ऑफ ए बिलियन - पुलेला गोपीचंद १०) द विनिंग सिक्सर - डब्ल्यू वी रमन

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. At Rs. 400/- 200/- (50% OFF) https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content