fa
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
1 637
مشترکین
+2424 ساعت
+247 روز
+2430 روز
آرشیو پست ها
🚨 द लायन्स ज्ञान संजीवनी 🚨
🚨 द लायन्स ज्ञान संजीवनी 🚨

सराव पेपर २ उत्तरतालिका

सराव पेपर २

अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा सराव पेपर पहिला

उद्या सकाळी 9 वाजता मोफत महासेमीनारला येताना सर्व विद्यार्थ्यांनी या वर्कशीटची प्रिंट काढून घेऊन यावी……..🙏🙏🙏

🚨 द लायन्स अकॅडमी लातूर 🚨 🚨चालू घडामोडी महासेमिनार 🚨 ➡️ MPSC/ COMBINE/ सरळसेवा/ पोलिस भरती या परीक्षेसाठी उपयुक्त ➡️ सरळ व सोप्या भाषेत मांडणी ➡️ संकल्पनेवर जास्तीत जास्त भर ➡️ वन लाइनर व बहुपर्यायी प्रश्नाचा समावेश ➡️ प्रिंटेड नोट्स ➡️ चला तर मग भेटूया ➡️ कुठे?- द लायन्स अकॅडमी लातूर येथे ➡️ दिनाक- 19/04/2026 ➡️ वार- रविवार ➡️ वेळ- सकाळी 09 ते 11

🚨मनसबदारी व्यवस्था 🚨 🔶जगात पहिल्यांदा मनसबदारी व्यवस्था सुरू - मंगोल शासक चेंगीजखान. 💠भारतात पहिल्यांदा मनसबदारी व्यवस्था सुरू - बाबर 🟡 मनसबदारी व्यवस्थेचे सार्वत्रिकरण भारतात - अकबर याने केले.

प्रश्न 1) ICC महिला T20 विश्वचषक 2026 कोठे आयोजित केला जाईल? 👉 उत्तर – इंग्लंड आणि वेल्स प्रश्न 2) भारताच्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटसाठी पहिल्या SEZ ला मंजुरी कुठे देण्यात आली आहे? 👉 उत्तर – धोलेरा प्रश्न 3) भारतीय नौदलाच्या कमांडर्स कॉन्फरन्स 2026 ची पहिली आवृत्ती कोठे झाली? 👉 उत्तर – नवी दिल्ली प्रश्न 4) विमेन्स कॅंडिडेट टूर्नामेंट 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? 👉 उत्तर – आर. वैशाली प्रश्न 5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? 👉 उत्तर – कर्नाटक प्रश्न 6) अणू ऊर्जा आयोगाचे (AEC) अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? 👉 उत्तर – अजित कुमार मोहंती प्रश्न 7) इस्माईल उमर गुएलेह हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? 👉 उत्तर – जिबूती प्रश्न 8) आशियातील सर्वात उंच वन्यजीव कॉरिडॉर कुठे सुरू झाला? 👉 उत्तर – भारत प्रश्न 9) 'स्पोर्ट्स जेनोमिक्स प्रोग्राम' कोणत्या राज्यात सुरू झाला? 👉 उत्तर – गुजरात प्रश्न 10) 17 एप्रिल 2026 रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची कितवी पुण्यतिथी साजरी झाली? 👉 उत्तर – 51 वी

🚨 आजचे खूप महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🎯 प्रश्न 1) अलीकडेच FICCI चे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 👉 उत्तर – अनंत स्वरूप प्रश्न 2) 15 एप्रिल 2026 रोजी हिमाचल प्रदेशचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला? 👉 उत्तर – 79 वा प्रश्न 3) मार्च 2026 साठी ICC पुरुष 'प्लेअर ऑफ द मंथ' किताब कोणी जिंकला आहे? 👉 उत्तर – संजू सॅमसन प्रश्न 4) IMF ने आर्थिक वर्ष 2027 साठी भारताचा विकास दर किती केला आहे? 👉 उत्तर – 6.5% प्रश्न 5) बोहाग बिहू हा कोणत्या राज्याचा सण आहे? 👉 उत्तर – आसाम प्रश्न 6) WWF मछली राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? 👉 उत्तर – अनीता चौधरी प्रश्न 7) आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये पेटंट दाखल करण्यात भारताचा क्रमांक कितवा आहे? 👉 उत्तर – सहावा प्रश्न 8) 'नारी शक्ती युवा संसद' चे आयोजन कोणी केले? 👉 उत्तर – युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय प्रश्न 9) 'हिम सरोवर प्रोजेक्ट' कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? 👉 उत्तर – लडाख प्रश्न 10) बिजू पटनायक हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? 👉 उत्तर – ओडिशा

💁बिहारचे सम्राट नवे मुख्यमंत्री : सम्राट चौधरी 📍बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री बसणार आहे. 📍नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी उपमुख्यमंत्रिपदी काम केलं आहे. 📍उत्तर भारतातील केवळ बिहारमध्ये आतापर्यंत भाजपला मुख्यमंत्रिपद मिळवता आलं नव्हतं. 📍सम्राट चौधरी यांच्या मागे मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील शकुनी चौधरी बिहारच्या राजकारणातील दिग्गज नेते होते. त्यांनी काँग्रेसपासून समता पक्ष आणि राजदमध्ये काम केलं. 📍आमदार ते खासदार असा राजकीय प्रवास केला. सम्राट चौधरी यांनी हाच वारसा पुढे चालवला. ✔️१९९० च्या दशकात सम्राट चौधरी यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ते मंत्री झाले. ✔️१९९० मध्ये राबडी देवी यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे राज्यमंत्रिपद होतं. त्यांच्या वडिलांनी समता पक्ष सोडून लालू यादव यांना साथ दिली. ✔️त्या बदल्यात सम्राट चौधरी यांना विधान परिषदेची आमदारकी आणि मंत्रिपद देण्यात आलं. ✔️त्यांच्या वयावरुन वाद झाला. त्यामुळे सम्राट चौधरींना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. 📍२०१४ मध्ये बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू युतीचं सरकार होतं. दोन पक्षांमधील वाद टोकाला गेले. 📍नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. पण जेडीयूचं सरकार कायम राहिलं. त्यात चौधरी यांच्या बंडाची महत्त्वाची भूमिका होती. 📍तेव्हा चौधरी लालूंच्या राजदमध्ये होते. त्यांनी राजदचे २२ पैकी १३ आमदार फोडले. 📍या आमदारांनी जेडीयूला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपशिवाय जेडीयूचं सरकार आलं. 📍नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याच पक्षाचे जीतनराम मांझी मुख्यमंत्री झाले. 📍सम्राट चौधरी त्यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. मांझी यांच्यानंतर नितीश पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्या सरकारमध्ये चौधरींना मंत्रिपद मिळालं नाही. 📍जेडीयू फारसं राजकीय महत्त्व मिळत नसल्यावं चौधरी यांनी पक्षाला रामराम केला. 📍२०१७ मध्ये सम्राट चौधरींनी भाजपचं कमळ हाती घेतलं. अनेक पक्ष बदलत ते भाजपमध्ये आले. ✔️पण अवघ्या ९ वर्षांत ते राज्य भाजपमध्ये क्रमांक एकचे नेते झाले. ✔️२०१९ मध्ये नित्यानंद राय भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. तेव्हा चौधरी यांच्याकडे उपाध्यक्षपदाची धुरा होती. ✔️सम्राट चौधरी यांना एनडीए सरकारमध्ये पंचायत राज खात्याचं मंत्रिपद मिळालं. ✔️२०२० मध्ये भाजपनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. 📍ऑगस्ट २०२२ मध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत राजदसोबत महागठबंधन सरकार स्थापन केलं. तेव्हा चौधरी यांना राजकीय ओळख मिळाली. 📍चौधरी यांच्याकडे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं. २०२३ मध्ये ते प्रदेशाध्यक्ष बनले. 📍नितीश कुमार यांनी एनडीएमध्ये घरवापसी केल्यावर भाजप पुन्हा सत्तेत गेला. तेव्हा चौधरी यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं.

🚨 द लायन्स अकॅडमी लातूर 🚨 🚨 नविन फाउंडेशन बॅच 🚨 👉वेळ- सकाळी ९ ते १२ 👉 बारावीच्या आणि विद्यापीठाच्या परीक्षा पार पडल्यान
🚨 द लायन्स अकॅडमी लातूर 🚨 🚨 नविन फाउंडेशन बॅच 🚨 👉वेळ- सकाळी ९ ते १२ 👉 बारावीच्या आणि विद्यापीठाच्या परीक्षा पार पडल्यानंतर आता पुढे काय…….असा प्रश्न पडलाय……..तर मग या बॅचला प्रवेश घ्या 👉दुसऱ्याचे लग्न लावण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या लग्नाची तयारी करा कारण आज समाजातील सत्य हे आहे की नोकरी नाही तर छोकरी नाही……आणि हे कटुसत्य आहे 👉 महाराष्ट्र सरकारच्या सर्व परीक्षा व पदासाठी तयारी करून घेतली जाणारी परिपूर्ण बॅच 👉 या डेमो लेक्चर करा मगच प्रवेश निश्चित करा 👉 आयोगाच्या धर्तीवर संकल्पनेवर जास्त भर 👉 कालावधी- १ वर्ष 👉 आपल्या अकॅडमी मध्ये फाउंडेशनच्या नावाखाली सरळसेवेची बॅच घेतली जात नाही 👉 चला तर मग डेमो लेक्चर करूया 👉 कुठे- द लायन्स अकॅडमी लातूर येथे

🚨द लायन्स अकॅडमी लातूर 🚨 🚨 गट ब पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 🚨 👉लातूरमध्ये पहिल्यांदाच आठवड्यात दोन सराव पेपर 👉 प्रत्येक प
🚨द लायन्स अकॅडमी लातूर 🚨 🚨 गट ब पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 🚨 👉लातूरमध्ये पहिल्यांदाच आठवड्यात दोन सराव पेपर 👉 प्रत्येक पेपरचे सूक्ष्म नियोजन व मूल्यमापन 👉 प्रत्येक पेपरचे सखोल विश्लेषण 👉 प्रत्येक पेपरचे प्रश्नांनुसार उत्तरे बरोबर किती चूक किती याचे मूल्यमापन 👉आयोगाच्या धर्तीवर सराव पेपर 👉दर आठवड्यात प्रत्येक बुधवारी आणि रविवारी 👉 सराव पेपरची वेळ- सकाळी ११ ते १२ 👉 नाव नोंदणी करणे आवश्यक 👉 कुठे- द लायन्स अकॅडमी लातूर येथे

💁होर्मुझनंतर अमेरिकेची नजर आता मलक्काच्या सामुद्रधुनीवर? 📍होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव वाढत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुझवर वर्चस्वासाठी प्रयत्न सुरू आहेत. ✔️जगभरात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा आणखी काही काळ बाधित होण्याची शक्यता आहे. ✔️असे असतानाच, आग्नेय आशियातील एका एका घडामोडीने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ✔️अमेरिका आणि इंडोनेशिया यांच्यातील नवीन संरक्षण करारामुळे चर्चांना उधाण आले आहे की, अमेरिकेचे लक्ष आता जागतिक व्यापाराचे दुसरा महत्त्वाचा मार्ग असलेल्या मलक्काच्या सामुद्रधुनीकडे वळू शकते. 📍या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या करारानुसार, अमेरिकन लष्करी विमानांना इंडोनेशियाच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवेश मिळाला आहे. या कराराकडे संरक्षण सहकार्य वाढवण्याचे पाऊल अशा दृष्टीने पाहिले जात आहे. ✔️असे असले तरी यामुळे मलक्का सामुद्रधुनीवर वॉशिंग्टनची पाळत ठेवण्याची आणि लष्करी हालचालींची क्षमता वाढू शकते. हा जलमार्ग हिंदी महासागराला पूर्व आशियाशी जोडतो. 📍इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तीन देशांकडून संयुक्तपणे या मार्गाचे व्यवस्थापन केले जाते. या सामुद्रधुनीमधून मोठ्याप्रमाणात जागतिक व्यापार सुरू असतो. ✔️अमेरिका आखाताच्या पलीकडे असलेल्या महत्त्वाच्या समुद्री मार्गांच्या सुरक्षेसाठी आपल्या इंडो-पॅसिफिक धोरणात बदल करत आहे का? असा प्रश्न या करारामुळे तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. 📍कच्चे तेल निर्यातीसाठी होर्मुझ हे केंद्रस्थान मानले जाते. याउलट, मलक्काची सामुद्रधुनी ही अधिक व्यापक व्यापारासाठी ओळखली जाते. 📍इंधन पुरवठ्यासोबतच तयार वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक उत्पादने यांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच या मार्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 📍पूर्व आशियाई देशांसाठी हा कॉरिडॉर विशेष महत्त्वाचा मानला जातो. चीन या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. ✔️चीन मध्ये उद्योग आणि आयात निर्यात क्षेत्रातील अभ्यासक या मार्गाकडे ‘मलक्का डायलेमा’ म्हणून पाहतात. ✔️नव्या करारामुळे चीनला अडचणीत आणण्यासाठी अमेरिका या मार्गावर वर्चस्वासाठी उत्सुक असल्याचे देखील बोलले जाते.

उग नाही माय ……….उसणी पब्लिसिटी ( पैसे देऊन) आपण नाही करत……..जे हक्काच आहे त्यांच्या घरात,गावात जाऊन यशात आनंदात सहभागी होतो………हा आमचाच विद्यार्थी, आमचेच सर्वाधिक विद्यार्थी (उसणे) या भानगडीत आपण पडत नाही………यशाचा गुलाल अस यशवंताच्या गावात जाऊन सन्मानाने साजरा करावा लागतो…….त्यासाठी यशवंत ही आपले हक्काचे असावे लागते (उसणे नाही)…………..द लायन्स अकॅडमी नेहमीच गरीबाच्या यशात आनंदात सामील असते……..काल अंजली मुंडे यांच्या गावात झालेला सत्कार सोहळा……….त्याप्रसंगी द लायन्स अकॅडमीचे संस्थापक उत्तम पवार सर, शिवाजी पवार सर, अनिल राठोड सर आणि अरुण धायगुडे सर आम्ही सर्व जण उपस्थित होतो……..तो यशाचा आनंदाचा क्षण………

🔷 आजचे खूप महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷 प्रश्न 1) बिहारच्या नवीन मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती केली जाईल? 👉 उत्तर – सम्राट चौधरी प्रश्न 2) पीटर मॅग्यार यांनी अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली आहे? 👉 उत्तर – हंगेरी प्रश्न 3) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार (NSO) मार्च २०२६ मध्ये भारताचा किरकोळ महागाई दर किती झाला आहे? 👉 उत्तर – 3.4% प्रश्न 4) क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी 'विस्डेन ट्रॉफी' कोणाला देण्यात आली आहे? 👉 उत्तर – शुभमन गिल प्रश्न 5) 'One8' चा ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 👉 उत्तर – स्मृती मानधना प्रश्न 6) भारतीय सैन्याने पहिल्या 'ब्लू-वॉटर सेलिंग एक्स्पिडिशन' ला कोणत्या ठिकाणाहून रवाना केले? 👉 उत्तर – मुंबई प्रश्न 7) मल्याळम नवीन वर्ष 'विशू' कोणत्या राज्यात साजरा केला जातो? 👉 उत्तर – केरळ प्रश्न 8) 14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? 👉 उत्तर – 135 वी प्रश्न 9) सुसान कॉयल यांची पहिली महिला लष्करप्रमुख म्हणून कोणत्या देशाने नियुक्ती केली? 👉 उत्तर – ऑस्ट्रेलिया प्रश्न 10) अलीकडेच कोणते राज्य 'नक्षलमुक्त राज्य' म्हणून घोषित करण्यात आले? 👉 उत्तर – तेलंगणा प्रश्न 11) 'खासदार क्रीडा महाकुंभ' चे आयोजन कोणत्या शहरात केले जात आहे? 👉 उत्तर – लखनऊ